Sunday, 25 September 2016

नमस्कार लाईव्ह २५-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अॅमेझॉनकडून डिजिटल प्रिंटिंग सेवा लॉन्च 
२- व्हॉट्सअॅपला गुगल 'अॅलो'ची तगडी टक्कर 
३- काश्मीरची अस्वस्थता हे उरी हल्ल्याचे कारण
४- पाक-रशिया संयुक्त कवायती पेशावरमध्ये
५- अमेरिकेतील एका घरात आढळले तीन मृतदेह
६- पुराव्याशिवाय भारताचे आरोप, पाकिस्तानच्या उलटया बोंबा
७- अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, ४ ठार
८- पाकिस्तान-रशियामध्ये PoK ऐवजी पेशावरमध्ये होणार युद्ध सराव
९- पाक - रशिया पहिल्यांदाच करणार लष्करी संचलन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
१०- पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे 
११- नुसते इशारे नको, ठोस कृती करा, सेनेच्या मोदींना कानपिचक्या
१२- मुंबई आयआयटीच्या उद्या ‘प्रथम’ची गरुडझेप?  
१३- टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं : अण्णा 
१४- सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक
१५- व्हॉट्सअ‍ॅपची माहिती फेसबुकला देऊ नका
१६- वीस लाखांपर्यंतच्या व्यवसायाला करसूट
१७- महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१८- कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं - रितेश 
१९- ट्रॅफिक जाम झाली तर टोलमुक्ती!, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना 
२०- पनवेलमधील संशयित निघाला पोलीसपुत्र
२१- एलईडी दिवे लावण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले...
२२- लोकलमध्ये स्मार्ट फोन चोरीच्या घटनांत वाढ
२३- दहा लाख कचरा डबे खरेदी रखडली
२४- डबेवालेही मोर्चात सहभागी होणार
२५- अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
२६- एकमताने अध्यक्ष केले तरी होणार नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- पुण्यात मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ 
२८- पाण्याच्या जोरानं लातूरच्या बामणी गावातला पूल कोसळला 
२९- मनसे नेते अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस 
३०- बिंदुसरा धरणावर सेल्फी घेताना तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- धोनीने घेतली सुपरस्टार रजनीकांतची भेट 
३२- पाकिस्तानात शो करण्यास राजू श्रीवास्तवचा नकार
३३- सानिया-बार्बराने जिंकले जेतेपद
३४- कोल्हापूर लय भारी!
३५- रिकी, शहान यांना पोल पोझिशन
३६- मानसी चिपळूणकरचा डबल धमाका
३७- पावसामुळे निवड चाचणी स्पर्धेला ‘खो’
३८- धोनीने घेतली सुपरस्टार रजनीकांतची भेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
==================================

पुण्यात मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ


LIVE : पुण्यात मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ
Update : पुण्यातील मराठा मोर्चात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, विश्वजित कदमही सहभागी
पुण्यात मराठा मोर्चाला या राजकीय नेत्यांची उपस्थिती
  • अजित पवार
  • राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले
  • शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
  • शिवसेना खासदार श्रीरंग बारणे
  • राज्यमंत्री विजय शिवतारे
  • हर्षवर्धन पाटील
  • विश्वजीत कदम
  • भाई जगताप
==================================

नुसते इशारे नको, ठोस कृती करा, सेनेच्या मोदींना कानपिचक्या

नुसते इशारे नको, ठोस कृती करा, सेनेच्या मोदींना कानपिचक्या
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमधील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले. उरी हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे त्यांनी यावेळी देशवासियांना सांगितले. यावरुन भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधानांच्या पाकिस्तानविषयक भूमिकेचे स्वागत करतानाच फक्त इशारे देऊन भागणार नाही, ठोस कृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. त्यांनी यावेळी बोलताना पाकिस्तान म्हणजे ‘लातो के भुत बातो से नही मानते’ असंही सांगितलं.

यासोबत सावंत यांनी आमदार आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीकेची झोड उठवली. या दोघांचीही नावे न घेता, त्यांचे बोलविते धनी दुसरेच असल्याचं सांगतलं. तसेच लायकी नसणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडण्याची घोषणा केली, अशी टीका सावंत यांनी यावेळी केली.

==================================

व्हॉट्सअॅपला गुगल 'अॅलो'ची तगडी टक्कर

व्हॉट्सअॅपला गुगल 'अॅलो'ची तगडी टक्कर
मुंबई : गुगलने अॅलो हे आपलं चॅटिंग अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपमध्ये बिल्ट-इन सर्च इंजिन आहे. अॅलो मोबाईल नंबरच्या सहाय्याने काम करतं. तसंच या अॅपमधून आपलं गुगल अकाऊंटही वापरता येतं.

गुगलने व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च केल्याचं बोललं जात आहे. अॅलोमध्ये वेगवेगळ्या इमोजी आणि स्टिकर्स देण्यात आले आहेत. @google लिहून यूजर इन्स्टंट चाटही करु शकतो. व्हॉट्सअॅप आणि हाईकपेक्षा जास्त चांगले फीचर्स देण्याचा गुगलने प्रयत्न केला आहे.

सध्या अॅलोमधून कॉलिंग आणि फाईल शेअरिंग करता येत नाही. पण गुगल DUO या आपल्या दुसऱ्या अॅपमधून ऑडीओ आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधा देणार आहे.

==================================

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची 2 वर्षे 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 2014 रोजी मोदींनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आजच्या 24 व्या कार्यक्रमातूनही ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

ऑल इंडिया रेडिओवरुन 3 ऑक्टोबर 2014 रोजी या कार्यक्रमाचे पहिल्यांदा प्रसारण झालं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जनतेशी संवाद साधण्यासोबतच जनतेकडून त्यांचे प्रश्न, मते मागितली आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही सहभागी घेऊन भारतीयांशी संवाद साधला होता.

आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काळा पैसा, स्वच्छ भारत अभियान, व्यसनाधिनता आदी विषयांसोबतच लहान मुलांनाही या कार्यक्रमात सहभागी करुन घेत परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले होते.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय बोलतील याकडे आज साऱ्या देशवासियांचे लक्ष्य लागून आहे.

==================================

अॅमेझॉनकडून डिजिटल प्रिंटिंग सेवा लॉन्च

अॅमेझॉनकडून डिजिटल प्रिंटिंग सेवा लॉन्च
मुंबई : ऑनलाईन मार्केटिंग कंपनी अॅमेझॉनने शटरफ्लाय नावाने फोटो प्रिंटिंग सेवा सुरु केली आहे. शटरफ्लायच्या माध्यमातून डिजिटल फोटो प्रिंटिंग आणि कस्टमाईझ फोटो बुक्सही तयार करता येतील.

फोटो प्रिंट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे फोटो अॅमेझानच्या क्लाउड स्टोअरेजवर अपलोड करावे लागतील. आपल्याला हवा तो आकार आणि प्रकार निवडून चेकआऊट करावं लागणार आहे. सध्या ही सेवा नवीन असल्याने वर्षाला जवळपास 800 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

अॅमेझॉनच्या क्लाउडसाठीही ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. फोटोचा आकार, थीम, पेपरचा प्रकार यावरुन फोटोची किंमत ठरणार आहे. 1 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या ऑर्डरवर फ्री शिपिंग दिलं जाणार आहे.

==================================

पाण्याच्या जोरानं लातूरच्या बामणी गावातला पूल कोसळला

पाण्याच्या जोरानं लातूरच्या बामणी गावातला पूल कोसळला
लातूर: लातूर तालुक्यातील बामणी या गावचा पूल सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने गावाला जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली आहे.

लातूरपासून 15 किमीवर असलेल्या बामणी या गावात जाण्यासाठी 25 वर्षापूर्वी जाना नदीवर बांधण्यात आला होता. मात्र हा पूल काल सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे.

त्यामुळे आता या गावात जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नदीच्या एका बाजूला या ग्रामस्थांची शेतं आहेत, तर दुसऱ्या बाजूला गाव अशी स्थिती आहे. त्यामुळे हा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आता तब्बल 40 किमीचे अंतर कापावे लागणार आहे.

==================================

मुंबई आयआयटीच्या उद्या ‘प्रथम’ची गरुडझेप?

मुंबई आयआयटीच्या उद्या ‘प्रथम’ची गरुडझेप?
मुंबई: विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सुरू केलेल्या योजनेतील सातवा उपग्रह सोमवारी अंतराळात झेपावणार आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे नाव ‘प्रथम’ असून या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणू मोजता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधन विषयात गोडी लागावी यासाठी ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आता आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी विकसित केलेले प्रथम हे उपग्रह अंतराळात झेपावणार आहे.

या उपग्रहावर आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. देशातील 15 विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदविलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे. या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.

==================================

एकमताने अध्यक्ष केले तरी होणार नाही


  • डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एकमताने मला देऊ केले, तरीही त्याचा मी स्वीकार करणार नाही. कारण, आता माझे वय झाले आहे. माझे लिखाणाचे कामही मंदावले आहे. त्यामुळे माझ्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा असली तरी मला अध्यक्षपद नको आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व
    समीक्षक म.सु. पाटील यांनी ‘लोकमत’कडे केले.
    दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनाची तुलना ‘बैलबाजारा’शी केली होती. गेल्या काही वर्षांत राजकारण्यांचा संमेलनाच्या ठिकाणी वाढलेला वावर पाहता आणि संमेलनातील साहित्यिक चर्चांचा घसरलेला स्तर पाहता ती टीका अनाठायी नाही, असे उद्गार ‘मसुं’नी काढले.
  • ============================================

मनसे नेते अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

मनसे नेते अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबई : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी धमकावल्याप्रकरणी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

==================================

टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं : अण्णा

टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं : अण्णा
मुंबई : टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. अण्णा हजारेंच्या जीवनावर आधारित ‘अण्णा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. त्यानिमित्ताने अण्णांनी ‘माझा कट्टा’वर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
अण्णा म्हणाले की, “टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं. काहींनी टीम अण्णा फोडण्याचा प्रयत्न केला तर आमिषाला बळी पडून काही फुटले. देशाच्या सरकारमध्ये परिवर्तन करण्याची ताकद टीम अण्णामध्ये होती. जनशक्तिच्या दबावामुळे सरकारला काही निर्णय घेणं भाग पाडलं असतं. टीम अण्णावर लोकांचा विश्वास होता.”
‘टीम अण्णामधील संवाद नाही’
मात्र पुन्हा टीम अण्णा तयार होऊ शकणार नाही, असंही यावेळी अण्णा हजारे म्हणाले. टीम अण्णामधील सदस्यांशी आता संवाद राहिलेला नाही. ते संवादाच्या पलिकडे गेलं आहे. कारण सत्तेची नशा चढली की ती उतरत नाही, असा म्हणत अण्णांनी व्ही के सिंह, किरण बेदी यांना टोला लगावला.

==================================

टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं : अण्णा

टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं : अण्णा
मुंबई : टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. अण्णा हजारेंच्या जीवनावर आधारित ‘अण्णा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. त्यानिमित्ताने अण्णांनी ‘माझा कट्टा’वर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
अण्णा म्हणाले की, “टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं. काहींनी टीम अण्णा फोडण्याचा प्रयत्न केला तर आमिषाला बळी पडून काही फुटले. देशाच्या सरकारमध्ये परिवर्तन करण्याची ताकद टीम अण्णामध्ये होती. जनशक्तिच्या दबावामुळे सरकारला काही निर्णय घेणं भाग पाडलं असतं. टीम अण्णावर लोकांचा विश्वास होता.”
‘टीम अण्णामधील संवाद नाही’
मात्र पुन्हा टीम अण्णा तयार होऊ शकणार नाही, असंही यावेळी अण्णा हजारे म्हणाले. टीम अण्णामधील सदस्यांशी आता संवाद राहिलेला नाही. ते संवादाच्या पलिकडे गेलं आहे. कारण सत्तेची नशा चढली की ती उतरत नाही, असा म्हणत अण्णांनी व्ही के सिंह, किरण बेदी यांना टोला लगावला.

==================================

मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, रितेश म्हणतो...

मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, रितेश म्हणतो...
मुंबई : मुद्दा कोणताही असो, कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं, अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडा अन्यथा धडा शिकवू, असं अल्टिमेटम दिलं आहे. त्यावर रितेश देशमुखने कलाकारांची बाजू मांडत त्यांचा बचाव केला आहे.

ट्रॅफिक जाम झाली तर टोलमुक्ती!, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

ट्रॅफिक जाम झाली तर टोलमुक्ती!, एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना
ठाणेः ठाणे-भिवंडी महामार्गावर यापुढे वाहतूक कोंडी झाली तर खारेगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्यात येऊ नये, असे आदेश सार्वजानिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. गेले तीन दिवस ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक बोलवली होती.

या बैठकीत नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून संयुक्तरित्या कंट्रोल रुम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जेएनपीटी आणि तलासरी या ठिकाणी ही कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहेत. तसंच गुजरातला जाणारी अवजड वाहनं भिवंडीऐवजी चाकणमार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान या बैठकीवेळी यापुढे ठाणे-भिवंडी मार्गावर वाहातूक कोंडी झाल्यास, खारेगाव टोल नाक्यावर टोल न घेता वहान सोडली जातील, असे आदेश शिंदे यांनी दिले. याचबरोबर भिवंडीला असलेली गोडाऊनमध्ये दोन शिफ्टमध्ये करणे, आणि मानकोलीच्या अदीपासून असलेला पाईप लाईन रोड दुरूस्त करून हलकी वाहाने तिथून जाण्यास परवानगी देण्याच्याही सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

==================================

बिंदुसरा धरणावर सेल्फी घेताना तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू

बिंदुसरा धरणावर सेल्फी घेताना तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू
बीडः बीडमधील बिंदुसरा धरणावर सेल्फी घेण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शेख गाजिक शेख अख्तर या 20 वर्षीय तरुणाचा बिंदुसरा नदीच्या धरणावर सेल्फी घेताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..

बिंदुसरा नदीला चार वर्षात पहिल्यांदाच पूर आला आहे. त्यामुळे नागरिक पाणी पाहण्यासाठी बिंदुसरा धरण आणि नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामध्ये सेल्फी घेण्याचा मोह न आवरता आल्याने अशा घटना घडत आहेत.

मराठावाड्यात परतीच्या मुसळधार पावसाने जवळपास सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पाणी पाहण्यासाठी गेल्यानंतर अनेक जण सेल्फी घेतात. मात्र हे सेल्फी जिवावर बेतत आहेत. त्यामुळे धरणावर किंवा कोणत्याही धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह आवरणं गरजेचं आहे.

==================================

कोल्हापूर लय भारी!


  • पुणे : महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या सत्रात कोल्हापूर हरिकेन्स संघाने पुणे पॅन्थर्सवर शनिवारी ३४-२६ने मात करीत महिला गटामधून बाद फेरीत प्रवेश केला.
    म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मध्यंतरापूर्वी कोल्हापूर संघ अत्यंत सावध खेळ करीत बचावाचे धोरण स्विकारले होते. मात्र पुण्याच्या शिवनेरी चिंचवले व ऐश्वर्या शिंदे यांनी आक्रमक पावित्रा घेतला. या दोघींसह अदिती जाधवने एक-एक खेळाडू टिपत आघाडी वाढवत नेली. कोल्हापूर संघानेही याला प्रत्युत्तर देत मोनिका शिंदे व स्नेहल शिंदे हे आपले हुक्के चढाईला पाठवले. मात्र त्यांना मध्यंतरापूर्वी सुर गवसला नाही. परिणामत: कोल्हापूर संघ मध्यंतराला ११-१४ने माघारला होता.
    मध्यंतरानंतर लगेचच स्नेहल शिंदेने अव्वल चढाई करीत कोल्हापूरला १५-१४ अशी आघाडी मिळवून दिली. हाच सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरला. त्यानंतर पल्लवी जाधवने पकड घेत १९-१५ अशी आघाडी वाढविली. पुनम तांबे व पल्लवी जाधव यांनीही चांगल्या पकडी घेतल्या. त्यानंतर मोनिका शिंदे व स्नेहल शिंदे यांनी सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत सातत्याने आक्रमक खेळ केला. सामना संपण्यास १० मिनिटे बाकी असताना कोल्हापूरकडे २२-१७ ने आघाडी होती. सामन्याचा शेवट ७ मिनिटांवर आला असताना पुण्याच्या ऐश्वर्या शिंदेने २ गडी बाद करीत पिछाडी २१-२२ने कमी करून सामन्यात रंगत आणली. मात्र मोनिका शिंदेने तृप्ती सोनवणेची पकड घेत कोल्हापूरला २६-२२ ने आघाडीवर नेले. सामना संपण्यास १ मिनिट असताना कोल्हापूरकडे ३१-२५ने आघाडी होती. अखेरच्या मिनिटाला ३ गुण घेत कोल्हापूरने बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
    कोल्हापूरला नमवून पुण्याच्या पुरुषांचे आव्हान कायम
    पुरूष विभागात पुणे पॅन्थर्स संघाने कोल्हापूर हरिकेन्स संघावर ३५-२९ असा विजय मिळवित स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पुणे संघाने सुरवातीपासून नियोजनबद्ध आणि सावध खेळ केला. यामध्ये अक्षय जाधव व सचिन पाटील यांच्या चढाया तर सुनिल लांडे व गणेश ढेरंगे यांनी घेतलेल्या पकडी मुळे हा विजय सोपा झाला. मध्यंतराला पुणे संघाकडे १९-१३ने आघाडी होती.
  • ==========================================

No comments: