Friday, 2 September 2016

नमस्कार लाईव्ह 0२-०९-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- सेक्स वर्कर म्हणणा-या वेबसाईटवर मेलेनिया ट्रम्पनी भरला खटला
2- पेशावरमध्ये ख्रिश्चन कॉलनीवर हल्ला, मर्दानमध्ये बॉम्बस्फोट
3- प्रेयसीच्या 'लव्ह बाईट'मुळे प्रियकराचा मृत्यू
4- पाकमध्ये टीव्हीवर भारतीय चॅनल्स बंद
5- न्यूझीलंडमध्ये तीव्र भूकंप
6- पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
7- तलाकच्या कायद्यात न्यायालयाची ढवळाढवळ नको - मुस्लिम लॉ बोर्ड 
8- देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर
9- डाळ आयातीचा खर्च यंदा ३0 हजार कोटी
10- दूरसंचार क्षेत्रात जिओमुळे भूकंप!
11- रिलायन्स जिओ - इनकमिंग कॉललाही पैसे पडणार?
12- रिलायन्स जिओच्या सीम कार्डवर कांदा, तूरडाळ आयुष्यभर मोफत
13- जिओ इम्पॅक्ट - आयडिया, भारतीच्या शेअर्सना 14 हजार कोटींचा फटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
14- पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे 
15- सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली
16- विमानतळाजवळ इमारती किती उंचीच्या असाव्यात?
17- जखमी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू
18- ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
19- छोटा राजनवर आरोप निश्‍चित
20- शिक्षकांच्या हक्कासाठी चर्नी रोड ते राजभवन बुलंद मोर्चा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
21- पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी 
22- सांगली - इस्लामपुरात सहा हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाला अटक. 
23- कोल्हापूर- दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित विरेंद्र तावडेला आज रात्री कोल्हापूरला आणणार. 
24- नाशिक : देवळाली कँम्प भगूर येथे महिला घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यास गेली असता विजेचा शॉक लागून मृत्यू. 
25- पुणे : कोथरूड डेपोकडे जाणा-या टेम्पोचे ब्रेक झाले फेल 
26- आंदोलन करणा-या नर्सेसवर दिल्ली सरकारने एस्मा लावला. 
27- बीफ बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस.
28- सलग ५६ व्या दिवशी काश्मीरमध्ये संचारबंदी. 
29- पुणे - १२ वीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार, तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयातील घटना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
30- 'शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण 
31- पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी
32- गर्बाइन मुगुरुजा स्पर्धेबाहेर...
33- ‘मिशन आॅलिम्पिक’साठी कोल्हापुरी बळ
34- इंडोनेशिया ओपनसाठी एच. एस. प्रणय सज्ज
35- ...हे तर मानसिक खच्चीकरण करण्यासारखेच
36- मिनी आयपीएलची योजना सध्या गुंडाळली- बीसीसीआय
37- चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे

  • First Published :02-September-2016 : 15:56:28

  • - ऑनलाइन लोकमत 
    जळगाव, दि. 2 - वेगवेगळ्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शक्तिप्रदर्शन करुन आपलं वजन अजूनही जिल्ह्यात तितकंच असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न एकनाथ खडसेंनी यानिमित्ताने केला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली. सत्ता असो वा नसो मात्र कार्यकर्त्यांचं प्रेम कायम आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे भरुन आलं असल्याची भावना खडसे यांनी व्यक्त केली.
     
    एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुन्हा एकदा राजीनाम्याचा विषय काढत माझ्याविरोधात एकही पुरावा आजही नाही, पक्ष बदनाम होऊ नये म्हणून राजीनामा दिला असल्याचं सांगितलं. विरोधकांनी खोट्या आरोपातून वातावरण बिघडवलं असल्याचा आरोपही खडसेंनी यावेळी केला. 40 वर्षांपूर्वी ज्या पक्षाला वाणी,मारवाड्यांचा पक्ष म्हणून हिणवायचे,त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून चेहरा दिला असं खडसे बोलले आहेत.
     
    बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. एकनाथ खडसेंनी मिडियावरही टीका करताना मिडियाने सळो का पळो करुन सोडलं होतं. एखाद्या माणसाला किती छळावं? मीडियासह सर्व लोक हात धुवून मागे लागले आणि माझी कारकीर्द, तपश्चर्या भंग केली असं बोलले आहेत. 
=====================================

तलाकच्या कायद्यात न्यायालयाची ढवळाढवळ नको - मुस्लिम लॉ बोर्ड

  • First Published :02-September-2016 : 15:04:24

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २ - मुस्लिम समाजातील तीन वेळा तलाख म्हणत पुरूषाने पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेचे समर्थन करताना मुस्लिम लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाने आमच्या धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करु नये असे म्हटले आहे. ट्रिपल तलाकची वैधता सर्वोच्च न्यायालयाने ठरवू नये असे मुस्लिम लॉ बोर्डाने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 
     
    ट्रिपल तलाकला इस्लाममध्ये परवानगी असून, नव-याला यावर निर्णय घेण्याचा अधिकार योग्य आहे. कारण ट्रिपल तलाकचा निर्णय आततायीपणे घेतला जात नाही असा दावा लॉ बोर्डाने केला आहे. लग्न, घटस्फोट आणि देखभालीचे नियम प्रत्येक धर्मानुसार बदलत जातात, असंही त्यांनी म्हटलं आहे. 
     
    धार्मिक बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करु नये असे मुस्लिम पर्सनला लॉ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतर पती-पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर तो योग्य निर्णय आहे असे लॉ बोर्डाचे म्हणणे आहे. 
    काही मुस्लिम महिलांनी ट्रिपला तलाकला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्याची वैधता तपासली जात आहे.
=====================================

पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी

  • First Published :02-September-2016 : 13:57:52

  • ऑनलाइन लोकमत 
    पुणे, दि. २ - पुणे पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्यानुसार पुण्यात कानठळया बसवणारे सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी घातली आहे. सुतळी बॉम्ब बरोबर अग्निबाण सोडण्यावरही बंदी घातली आहे. 
     
    रस्त्यावर किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतरावर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाके विक्रीसाठी २५ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर हा कालावधी ठरवण्यात आला आहे. 
     
    गणेशोत्सवापासून पुण्यात फटाक्याची मागणी वाढते. दिवाळीत राज्यभरातून फटाक्यांची मागणी वाढते. त्यामुळे ठिकठिकाणी फटाके विक्रीचा स्टॉल लावले जातात
=====================================

'शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण

  • First Published :02-September-2016 : 11:55:00Last Updated at: 02-September-2016 : 18:19:33

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २ - सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. दोन महत्वाकांक्षी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर ब-याच वेळा मोठ्या पडद्यावर युद्ध छेडले जाते. असाच प्रकार याही वेळेस घडला असून, तो थोडा गंभीर असल्याचे दिसत आहे. कारण यावेळी हे भांडण सुरू आहे अभिनेता अजय देवगण वि. दिग्दर्शक करण जोहर- कमाल खान यांच्या दरम्यान...
    अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'शिवाय' हा चित्रपट दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार असून त्याचवेळेस करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' हाही मोठ्या पडद्यावर येणार आहे. विक्षिप्त स्वभावाचा अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून 'शिवाय' चित्रपटाची निंदा करताना दिसत असून या आठवड्यातच ट्रेलर रिलीज करण्यात आलेल्या ' ए दिल है मुश्किल'चे मात्र गुणगान करताना दिसत आहे. यावरूनच अजय देवगण भडकला असून 'शिवाय'ची निंदा करण्यासाठी दिग्दर्शक करण जोहरनेच के.आर.केला २५ लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप अजयने केला आहे. एवढेच नव्हे तर अजयचा जवळचा मित्र असणारे व निर्मात कुमार मंगत यांचे के.आर.के.शी फोनवरून झालेले संभाषण रेकॉर्ड करून त्याने ती क्लीप ट्विटरवरही शेअर केली आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये कुमार मंगत यांनी के.आर.के. ला 'शिवाय'ची बदनामी का करत आहेस? तसेच करण जोहरच्या चित्रपटाचे इतके कौतुक कशासीठी असे विचारले असता,  ज्याने आपल्याला २५ लाख दिले, त्याच्याबाजूने काही तरी बोलावे लागेलच ना, असे उत्तर के.आर.के. ने दिले. 
=====================================

No comments: