Tuesday, 13 September 2016

नमस्कार लाईव्ह १३-०४-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार 
२- ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार
३- दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड
४- बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट
५- वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
६- कधी होता मेकॅनिक, आज जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये आहेत 22 फ्लॅट
७- दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- तामिळनाडू : राजीव गांधींच्या मारेक-यावर वेल्लोर तुरूंगात हल्ला 
९- जीएसटी एप्रिलपासून....
१०- एप्रिल-आॅगस्टमध्ये वाढली करवसुली!
११- वीस लाख टन डाळींचा राखीव साठा करणार
१२- फेडरलमुळे सेन्सेक्स आपटला
१३- छत्रपती व सरखेलांच्या आरमारी इतिहासाचा विचार आजही अनिवार्य
१४- हायवेच्या प्रगतीला इंधनाचा हातभार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार 
१६- अधिकाऱ्यांवर १० वर्षांनी घोटाळ्याचे आरोपपत्र
१७- बांधकाम तिवरांपासून केवळ तीन फुटांवर
१८- अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा
१९- विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक
२०- शिल्पा शेट्टीच्या काकांकडूनही तिवरांची कत्तल
२१- आज ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’
२२- गडकरींमध्ये स्वप्नातलं जग सत्यात उतरवण्याची क्षमता - विजय दर्डा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- दिवा स्थानकातही थांबणार फास्ट लोकल 
२४- कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली 
२५- कल्याण; गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- दीपा मलिकने जिंकले रौप्यपदक
२७- सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर
२८- भारताविरुद्ध बलाढ्य स्पेनचे आगमन
२९- रोहित शर्माचे स्थान कायम : अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
३०- इच्छामरणाची ही वेळ नव्हे!
३१- बिन्नीचे शतक हुकले; इंडिया रेड सर्व बाद ३५६
३२- साक्षी सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 


=========================================

तामिळनाडू : राजीव गांधींच्या मारेक-यावर वेल्लोर तुरूंगात हल्ला



  • चेन्नई, दि. १३ - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारीवलन याच्यावर तामिळनाडूतील वेल्लोर तुरूंगात सहकैद्याने हल्ला केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेत पेरारीवलन याच्या डोक्याल गंभीर इजा झाली असून ५-६ टाके घालण्यात आले आहेत. ' टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. 
    मिळालेल्या माहितीनुसार, पेरारीवालनला ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे तिथेच अपहरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेशलाही ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले व त्याचे पर्यवसन मोठ्या वादात झाले. तुरूंग अधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोठडीत धाव घेत त्या दोघांचेही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या राजेशने लोखंडी रॉडने पेरारीवलनला मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अधिका-यांनी उपचारांसाठी त्याला तातडीने तुरूंगातील रुग्णालयात नेले, तेथे पेरारीवलनच्या डोक्याला ५ ते ६ टाके घालण्यात आले. 
=========================================

इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार



  • वॉशिंग्टन, दि. १३ - ' इस्लामिक स्टेट' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यूमुखी पडला आहे. पेंटागॉन येथून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून अमेरिकेने गेल्या महिन्यात सीरिया येथे केलेल्या हल्ल्यात तो ठार झाल्याची माहिती मिळत आहे. 
    'सीरियातील अल बब जवळ करण्यात आलेल्या हल्ल्यात इसिसचा प्रमुख व मुख्य प्रचारक असलेल्या अबू मोहमद अल अदनानी याचा खात्मा करण्यात आला. तो तरूणांना इसिसमध्ये  भरती करत असे तसेच इसिसच्या दहशतवादी हल्ल्यांच्या आखणी करण्याची, योजनांची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली होती' असे पेंटागॉनमधील अधिका-यांनी सांगितले. '३० ऑगस्ट रोजी प्रिडेटर ड्रोनमधून अदानीच्या कारवर मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये तो ठार झाला' असेही त्यांनी सांगितले. 
    'इसिस'चा मुख्य प्रवक्ता असण्यासोबतच गेल्या वर्षभरात इसिसने पॅरिस, ब्रसेल्स आणि इंस्ताबूल विमानतळ तसेच बांग्लादेशमधील रेस्टॉरंटवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही अबू मोहमद अल अदानीने प्रमुख भूमिका निभावली होती, असे समजते.
=========================================

दिवा स्थानकातही थांबणार फास्ट लोकल



  • ठाणे, दि. १३ - मुंबईकरांची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणा-या लोकलमधील वाढती गर्दी हा प्रशासनासह चाकरमान्यांसाठीही डोकेदुखीचा विषय ठरला आहे. मात्र आता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी खुशखबर आणली असून गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणा-या 'दिवा' स्टेशनवरही आता फास्ट लोकल थांबणार असल्याने दिव्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून ही अमलबजावणी होणार असून दररोज १० फास्ट लोकल दिवा स्टेशनवर थांबतील.
    दिवा स्टेशनवर बांधण्यात येणा-या दोन नवी प्लॅटफॉर्म्सचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर कल्याण ते सीएसटी स्थानकादरम्यान धावणा-या काही फास्ट लोकलना दिवा स्टेशनवरही थांबा देण्यात येणार आहे. रोजच्या ८४ फास्ट लोकल्सपैकी निवडक १० लोकल दिव्यात थांबतील.
    दिव्याला थांबणाऱ्या लोकलची संख्या आणि प्रवाशांचं प्रमाण यात तफावत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच दिवा स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून या नव्या निर्णयामुळे स्लो लोकलवरील ताण कमी होईल आणि प्रवासाचा वेळही वाचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. 
=========================================

कावेरीचे पाणी पेटले : बंगळुरूमध्ये गोळीबारात एक ठार


  • बंगळुरू/चेन्नई : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हिंसाचार सुरू झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही राज्यांत ट्रक्स आणि हॉटेल्सवर हल्ले सुरू असून, बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागात हिंसाचाराचे प्रकार घडले. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या राजधानीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये आगारात उभ्या असलेल्या २0 बसना आगी लावल्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली. बंगळुरूच्या पिनया भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून, परिस्थिती चिघळत चालल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.
    चेन्नईतील कन्नड मालकाच्या हॉटेलवर आणि रामेश्वरममध्ये कर्नाटकच्या सात पर्यटक वाहनांवर हल्ले करण्यात आले. इरोड आणि पुडुच्चेरीमध्ये निदर्शकांनी कर्नाटकच्या बँक शाखांत गोंधळ घातला. हॉटेलवरील हल्ल्यासंदर्भात चार तर पुडुच्चेरीत २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या सरकारच्या काही कार्यालयांवर आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर हल्ले झाले. कन्नड अभिनेत्याविरुद्ध सोशल मीडियात २२ वर्षांच्या तमिळ तरुणाने कथित अवमानकारक भाष्य केल्याबद्दल त्याला बंगळुरूमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे हल्ले झाले. ते वृत्त येताच कर्नाटकातील
    बंगळुरू, मंड्या, मैसूर, चित्रदुर्ग, धारवाड जिल्ह्यांत तामिळनाडूचे रजिस्ट्रेशन असलेल्या ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली आणि काही ठिकाणी ते पेटवण्यात आले.

=========================================

कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली

कानपूरच्या बाजारात 'बादल'चा बोलबाला, तब्बल 21 लाखांची बोली
कानपूर : बकरी ईदनिमित्त बकरी आणि बोकडांना चांगलीच किंमत मिळत आहे. कानपूरमध्ये बेगनगंज बाजारात सध्या बादल नावाच्या बोकडाचा बोलबाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोकड्याला तब्बल 21 लाखांची बोली लावण्यात आली आहे.
कपड्याचे व्यापारी आकीब खां यांनी एक वर्षाआधी या बोकड्याला सूरतहून 3 लाख 10 हजार रुपयांना आणलं होतं. त्यावेळी बादल लहान होता, परंतु त्याचं वजन 140 किलो होतं. विशेष म्हणजे बादलचा महिन्याचा खर्च सुमारे 30 ते 35 हजार रुपये इतका आहे. बादलचा खुराकही तसाच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बादल दूध, देशी तूप, बदाम, खारीक, चणे, गहू, फळांसह कोल्ड्रिंगही पितो.
बादलला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. तो रस्त्यावरुन गेला तर लोक त्याचे फोटो काढतात. त्याला पाहण्यासाठी देशभरातील लोक कानपूरच्या बाजारात येत आहे. तिथे गुजरातमधील व्यापाऱ्याने बादलला तब्बल 21 लाखांना खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र हा बोकड विकणार नसून त्याची कुर्बानी देणार असल्याचं मालक आकीब खां यांनी म्हटलं आहे.

=========================================

गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप

गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप
कल्याण: कल्याणमध्ये चोरट्याने थेट गणपती समोरची दानपेटीच पळवण्याचा प्रयत्न केला. गणपती मंडळाची दानपेटी पळवणाऱ्या चोरट्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला.

कल्याण पश्चिमेत चिकणघरचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं भाविक राजाच्या दानपेटीत सढळ हस्ते दान टाकतात. रविवारी सकाळी दीपक जाधव नावाच्या चोरट्यानं बाप्पासमोरची दानपेटी पळवली.

याचवेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास त्याची धुलाई केल्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं. त्याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

=========================================

No comments: