नमस्कार लाईव्ह ११-09-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
==========================
[राष्ट्रीय]
1- संजय राऊतांच्या उपस्थितीत सुभाष वेलिंगकरांची पणजीत बैठक
2- बकरी ईदची सुट्टी लांबणीवर, सोमवार ऐवजी मंगळवारी रजा
3- दहावी ते पीएचडी... लवकरच डिजिटल डिग्री!
4- कितीही मोर्चे निघूदेत, अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही : आठवले
5- रामदेव बाबा वस्त्रोद्योग क्षेत्रात, स्वदेशी जीन्स बाजारात
=========================
[राज्य]
6- पक्षानं अविश्वास दाखवल्यानं 40 वर्षांची तपश्चर्या वाया : खडसे
7- प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात
8- पुण्याच्या ट्रॅफिकचा अजित पवारांना फटका, रिक्षाने प्रवास
=========================
प्रादेशिक]
9- कल्याणमध्ये पोलीस कर्मचा-यावर रॉडने हल्ला
10- 'लालबागचा राजा' मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दादागिरी
11- मुख्य सचिवांवर पोटच्या मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप
12- लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्ते भिडले!
13- गडचिरोली : कोरची तालुक्यांचा गेल्या 22 तासा पासून वीज पुरवठा खंडीत
14- उल्हासनगर :- शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 वर्षाच्या मुलावर अत्याचार
15- कोल्हापूर - गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर शहरातून ११२ गुंड हद्दपार
16- स्मानाबाद्- तुळजापूर बसस्थानक परिसरात एकावर तलवारीने हल्ला
17- अकलूज मधील होंडा शोरूमला भीषण आग, लाखोंचं नुकसान
18- घाटकोपर; बकरे खरेदी करण्यासाठी दुचाकीवरुन ट्रिपल सीट जात असलेल्या दोन भावंडाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू
19- जळगाव - मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू.
=========================
[इतर]
20- क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा समाजवादी पक्षात प्रवेश
21- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीची बैठक
22- क्रिकेटचा देव सचिन लालबागच्या राजाच्या दर्शनाला
23- सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्डर 2 लवकरच बाजारात
24- आयसीसी टी-20 क्रमवारीत कोहलीच 'एक नंबर'
25- रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य...
26- एका पायाने घेतली मरियप्पनने ‘सुवर्णझेप’!
===========================
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
==============================================

==============================================

आज (रविवारी) होणारं चंद्रदर्शन उद्या (सोमवार)वर गेल्यामुळे ईदची सुट्टी परवा देण्यात आली आहे. या अचानकच्या बदलामुळे सलग सुट्ट्यांचा प्लॅन करुन बाहेरगावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र कसरत करावी लागणार आहे.
गणपतीच्या सुट्ट्यांना जोडून शनिवार, रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस सुट्टी आल्यानं अनेकजण बाहेरगावी गेलेले होते. त्यांना आता आपला बेत बदलावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही सोमवारी शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे. त्याऐवजी मंगळवारी सुट्टी मिळणार आहे.

==============================================

पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी अजित पवार पुण्यात आले होते. मात्र शनिवार असल्याने रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळेच पवारांनी चक्क रिक्षा पकडली आणि केसरीवाड्यात गेले.
कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाड्यात दर्शनासाठी निघाले. त्यानंतर अप्पा बळवंत चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं गाडीने जाणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे तात्काळ त्यांनी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांना रिक्षामधून उतरताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिकही अवाक झाले. यावेळी रिक्षामध्ये अजित पवारांसोबत महापौर प्रशांत जगताप आणि सभागृह नेते शंकर केमसेसुद्धा होते.

कोपर्डीच्या आरोपींना फाशीची मागणी करा : आठवले

प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात
- नागपूर, दि. ११ - केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असून, अगोदर शहरीकरणाकडे नकारात्मक नजरेने पाहिले जायचे. शहरीकरणाचे व्यवस्थापन आवश्यक असून, सर्वसमावेशक प्रभावशाली धोरण हवे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लोकमत महाचर्चेमध्ये बोलताना सांगितले.त्यांच्या हस्ते या महाचर्चेचे उदघाटन झाले. यावेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी शासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत .स्मार्ट सिटीची चर्चा होत असताना शाश्वत विकासावर भर द्यावा असे सांगितले.या चर्चासत्रात नागपूरच्या विकास , समस्या, अपेक्षा व नियोजन यावर चर्चा होणार असून, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.
==============================================
कल्याणमध्ये पोलीस कर्मचा-यावर रॉडने हल्ला
- ऑनलाइन लोकमतकल्याण, दि. ११ - गणेश विसजर्नाच्यावेळी विसजर्न तलावात एका पोलिस अधिका-याला बुडवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना मोहने परिसरातील यादवनगरात राहणा-या पोलिसावर एका तरुणाने लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या पोलिसाचे नाव उत्तम अडसूळ असे असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.पोलिसावर हल्ला होऊन देखील हल्ला करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली नसल्याने पोलिसांच्या कुटुंबियानी नाराजी व्यक्त केली आहे. अडसूळ हे ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. अडसूळ हे मोहने येथील यदवनगरात राहतात. काल शनिवारी रात्री ते कामावर जाण्यापूर्वी त्यांच्या पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी सोबत घेऊन गेले होते.
==============================================
'लालबागचा राजा' मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दादागिरी
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ११ - लालबागमधील प्रसिध्द 'लालाबागचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर दादागिरी केल्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांवर फौजदार सत्यवान पवार यांना धक्काबुकी केल्याचा आरोप आहे.लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ सत्यवान पवार बंदोबस्ताला होते. शनिवारी दुपारी भाविकांना मंडपात सोडत असताना धक्काबुक्कीची ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.'लालबाग राजा' मंडळाच्या कार्यकर्त्याने पोलिस अधिका-याला अडवलेसीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचबाची, वादावादी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी उत्सवाच्या पहिल्याचदिवशी ऑनडयुटी पोलिस अधिका-याबरोबर गैरवतर्णूक केल्याच्या आरोपाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
==============================================
मुख्य सचिवांवर पोटच्या मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप
- ऑनलाइन लोकमतजयपूर, दि. ११ - राजस्थानचे मुख्य सचिव ओम प्रकाश मीना यांच्यावर त्यांची पत्नी आणि मुलीने अत्यंत गंभीर स्वरुपाचे धक्कादायक आरोप केले आहेत. यावर्षी २१ एप्रिलला मीना यांच्या मुलीने उच्च न्यायालयात आईच्या समर्थन करताना वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला.माझे वडिल नेहमी माझा आणि माझ्या आईचा छळ करायचे. मी त्यांच्यावर ओझे आहे अशा प्रकारची ते मला नेहमी वागणूक द्यायचे. मी १३ वर्षांची असताना त्यांनी माझा विनयभंग केला. माझ्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करुन माझ्यावर जबरदस्ती केली. जवळपास दोनवर्ष माझ्याबरोबर हे सर्व सुरु होते. कोणाला काय सांगणार अशी माझी परिस्थिती होती. रात्र रात्रभर मी बिछान्यात रडत रहायचे असे गीतांजली सिंहने सांगितले.
==============================================
क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा समाजवादी पक्षात प्रवेश
- ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. ११ - क्रिकेटपटू प्रवीण कुमारने उत्तरप्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. प्रवीण कुमार मेरठ विधानसभा मतदारसंघातून २०१७ सालची उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. प्रवीण कुमार मुळचा मेरठचा आहे.भारताच्या राष्ट्रीय संघाबाहेर असलेला प्रवीणकुमार सध्या आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा सदस्य आहे. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा सदस्य होता. प्रवीण कुमारने सपामध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला पण पुढच्यावर्षीची निवडणूक लढवण्याविषयी तो काहीही बोलला नाही.स्विंग गोलंदाजी करण्यात माहिर असलेला प्रवीण कुमार ब-याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. भारताचा आणखी एक क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. कैफ काँग्रेसचा सदस्य असून, २०१४ साली अलहाबाद फुलपूरमधून त्याने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
==============================================
पक्षानं अविश्वास दाखवल्यानं 40 वर्षांची तपश्चर्या वाया : खडसे
जळगाव : भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच पक्षावर थेट निशाणा साधला आहे. भाजपने अविश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाल्याची भावना खडसेंनी बोलून दाखवली.
जळगावच्या फैजपूर येथील मनपा शाळेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले होते.
प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका, अशा आशयाचा सल्ला विनोद तावडेंनी उपस्थितांना दिला. मात्र, तावडेंच्या त्या वक्तव्यावर कोटी एकनाथ खडसेंनी सणसणतील टोला हाणला. भाजपनं प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला आणि माझी चाळीस वर्षांची तपश्चर्या वाया घालवली, असा टोला खडसेंनी हाणला.
==============================================
लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्ते भिडले!
मुंबई : लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजसमोर बंदोबस्तावर असलेले भायखळा पोलिस स्टेशनचे पीएसआय सत्यवान पवार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली, असा आरोप लालबागचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तर कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.
एक महीला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी स्टेजवर जात होती. त्या महिला पत्रकाराला सत्यवान पवार यांनी रोखले तसेच त्यांच्या एका पोलिस शिपाईच्या नातेवाईकांना चुकीच्या मार्गाने दर्शनासाठी सोडले. त्यावेळी लालबागचा राजा मंडळाचा कार्यकर्ता रोहित श्रीवास्तव याने महीला पत्रकाराला सोडण्यासाठी सांगितले. त्यानंतर पीएसआय सत्यवान पवार याने रोहीत श्रीवास्तवला बेदम मारहाण केली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
यावेळी मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सत्यवान पवार यांना मारहाणीचा जाब विचारला असता पीएसआय पवार याने साळवी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. ‘तुमचा उत्सव बंद करून टाकेन…’ या मारहाणीत रोहितच्या कानाचा पडदा फाटला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रोहितला उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या संदर्भात लालबागचा राजा मंडळाचे पदाधीकारी काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना झालेल्या गंभीर मारहाणीसंदर्भात लालबागचा राजा मंडळ आत थेट मुंबई पोलिस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत.
==============================================
संजय राऊतांच्या उपस्थितीत सुभाष वेलिंगकरांची पणजीत बैठक
पणजी (गोवा) : गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यात काल गोव्यात बैठक झाली. सुमारे दोन तास दोघांमध्ये खासगीत चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांच्यावर पक्षानं गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीनं पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गोव्यात वेलिंगकर यांनी आरएसएसमधून बाहेर पडत गोवा प्रांताचा स्वतंत्र संघ स्थापन केला आहे. पणजीत राऊत यांनी प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाखाली सुभाष वेलिंगकरांची जाहीर सभा पार पडली. या बैठकीत भाजपला निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी संघाचा बॅनर लावण्यात आला. या सभेला 2 हजार लोक उपस्थित होते.
==============================================
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीची बैठक
नवी मुंबईः न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड उद्या केली जाणार आहे. त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक उद्या सकाळी मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला जाईल.
टीम इंडियाने नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत 2-0 असा विजय साजरा केला होता. विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या सहा महिन्यांत 13 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या या परिक्षेची सुरूवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात कुणाला स्थान मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
==============================================
बकरी ईदची सुट्टी लांबणीवर, सोमवार ऐवजी मंगळवारी रजा
मुंबई : बकरी ईदसाठी राज्य सरकारनं सोमवारी जाहीर केलेली सुट्टी एक दिवसाने लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता सोमवारी ठरलेली रजा मंगळवारी मिळणार आहे.
आज (रविवारी) होणारं चंद्रदर्शन उद्या (सोमवार)वर गेल्यामुळे ईदची सुट्टी परवा देण्यात आली आहे. या अचानकच्या बदलामुळे सलग सुट्ट्यांचा प्लॅन करुन बाहेरगावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र कसरत करावी लागणार आहे.
गणपतीच्या सुट्ट्यांना जोडून शनिवार, रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस सुट्टी आल्यानं अनेकजण बाहेरगावी गेलेले होते. त्यांना आता आपला बेत बदलावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही सोमवारी शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे. त्याऐवजी मंगळवारी सुट्टी मिळणार आहे.
==============================================
क्रिकेटर प्रवीण कुमार राजकीय मैदानात, समाजवादी पक्षात प्रवेश
मेरठ(उत्तर प्रदेश): टीम इंडियाचा जलद गोलंदाज प्रवीण कुमार आता राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रविण कुमारने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत प्रवीण कुमारने सपात प्रवेश केला.
यूपी निवडणुकांसाठी प्रवीण कुमार केवळ प्रचारकाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे. कारण तो या निवडणुकीसाठी उभा राहणार नसल्याचं त्याने ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितलं. अखिलेश यादव यांचं काम आवडल्याने त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पण त्यांची इच्छा असेल तर निवडणूकही लढवेल, असं प्रवीणने सांगितलं.
==============================================
दहावी ते पीएचडी... लवकरच डिजिटल डिग्री!
नवी दिल्लीः दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन असो किंवा पीएचडी सर्व पदवी प्रमाणपत्र आता इतिहास जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांना आता डिजिटल डिग्री देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच ही डिग्री डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवली जाणार आहे.
सध्याची युवा पिढी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने तांत्रिक बाबींची पूर्तता चालू आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
देशातील सर्व विद्यापीठांचा डाटाबेस तयार करण्यात येणार असून यामध्ये सीबीएसई बोर्डाचा देखील समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल पदवीचं वितरण यापुढे दिक्षांत समारंभात करण्यात यईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.
==============================================
क्रिकेटचा देव सचिन लालबागच्या राजाच्या दर्शनाला
मुंबई : क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होते.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटीही गर्दी करतात, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी रांग असते. त्यातच आज सचिन तेंडुलकरने सहकुटुंब दर्शन घेतलं. लालबागच्या राजाला मनोभावे प्रार्थना करुन सचिन आपल्या कुटुंबासह रवाना झाला.
सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
==============================================
पुण्याच्या ट्रॅफिकचा अजित पवारांना फटका, रिक्षाने प्रवास
पुणे : पुणे शहरासाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. जो पुण्यात गाडी चालवू शकतो, तो जगात कुठेही चालवू शकतो, असंही म्हटलं जातं. पुण्याच्या वाहतूककोंडीचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाही बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली.
पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी अजित पवार पुण्यात आले होते. मात्र शनिवार असल्याने रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळेच पवारांनी चक्क रिक्षा पकडली आणि केसरीवाड्यात गेले.
कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाड्यात दर्शनासाठी निघाले. त्यानंतर अप्पा बळवंत चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं गाडीने जाणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे तात्काळ त्यांनी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांना रिक्षामधून उतरताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिकही अवाक झाले. यावेळी रिक्षामध्ये अजित पवारांसोबत महापौर प्रशांत जगताप आणि सभागृह नेते शंकर केमसेसुद्धा होते.
======================================
कितीही मोर्चे निघूदेत, अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही : आठवले
पुणे : अॅट्रोसिटी कायद्यात योग्य बदल सुचवण्यात आले तर त्याबाबत विचार करु, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. मात्र कितीही मोर्चे निघाले तरी अॅट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही, असंही आठवलेंनी आवर्जून सांगितलं.
महाराष्ट्रात दलित-मराठा ऐक्याशिवाय राजकारण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे 7 ऑक्टोबरला दलित-मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन करेन, अशी माहितीही रामदास आठवलेंनी दिलं. अॅट्रोसिटी कायद्यात योग्य बदल सुचवण्यात आले तर त्यासंदर्भात विचार करु, मात्र कितीही मोर्चे निघाले तरी अॅट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही, असं आठवलेंनी स्पष्ट केलं.
कोपर्डीच्या आरोपींना फाशीची मागणी करा : आठवले
‘मराठा समाजानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करण्याऐवजी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीची मागणी करावी.’ असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं होतं. सांगलीत गेल्या आठवड्यात पार पडलेल्या एका सत्कार समारंभात ते बोलत होते.
=====================================
रामदेव बाबा वस्त्रोद्योग क्षेत्रात, स्वदेशी जीन्स बाजारात
नागपूर : योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलीच्या माध्यमातून गारमेंटच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. यात सर्वप्रथम परिधान नावाने स्वदेशी जीन्स पॅन्ट बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी 10 प्लॅन्टही उभारले जाणार आहेत.
“स्वदेशी वेशभूषा हे आमचं ध्येय आहे. पण त्यासोबतच आम्ही विदेशी वेशभूषेला स्वदेशी बनवणार आहोत, त्यासाठी स्वदेशी जीन्स बनवून बाजारात आणण्याचा विचार केला आहे,” असं पतंजलीकडून नागपुरात झालेल्या मीट द प्रेसमध्ये सांगण्यात आलं. सोबतच लवकरच स्वदेशी शूज बाजारात आणण्याचा विचार असल्याचंही पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
येत्या एक ते दीड वर्षात पतंजलीची वार्षिक उलाढाल 50 हजार कोटींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे पतंजली हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, पेप्सी, कोकाकोला, आणि प्रोक्टर अँड गॅम्बलच्या तुलनेत मोठी कंपनी असेल असंही यावेळी सांगण्यात आलं. पतंजलीने मिळणारा 100 टक्के नफा सामाजिक कार्यात लावणार असल्याचं म्हटलं आहे.
=====================================
सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्डर 2 लवकरच बाजारात
मुंबई : सॅमसंगने आपल्या आगामी गॅलेक्सी फोल्डर 2 ची अधिकृत घोषणा केली आहे. सध्याच्या बारफोनच्या ट्रेंडपेक्षा हा फोन वेगळा बनवण्यात आला आहे.
सॅमसंगच्या या फ्लिप फोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये बाजारात आणला जाईल, त्यानंतर जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये उतरवला जाईल.
सॅमसंगने मागच्याच वर्षी गॅलेक्सी फोल्डर हा फोन बाजारात आणला होता. त्याच सीरिजमधील गॅलेक्सी फोल्डर 2 लवकरच लॉन्च केला जाणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी फोल्डरचे फीचर्स :
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड मार्शमेलो 6.0
रॅम : 2 जीबी
बॅटरी : 1950 mAh
कॅमेरा : रिअर 8 मेगापिक्सल आणि फ्रंट 5 मेगापिक्सल
डिस्प्ले : 3.8 इंच, 480×800 पिक्सल रिझॉल्यूशन
प्रोसेसर : 1.4 GHz क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
मेमरी : 16 जीबी, 128 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल
इतर फीचर्स : 4 जी, जीपीएस, वायफाय
======================================
No comments:
Post a Comment