[अंतरराष्ट्रीय]
१- बगदाद दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, 11 जणांचा मृत्यू
२- ९/११ हल्ल्यातील पीडित सौदी अरेबिया विरुद्ध खटला दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील
४- रतन टाटांचे ट्वीटर अकाउंट हॅक
५- सागरमाला नव्हे, विकासमाला
६- झाकीर नाईकचं भारतीयांना खुलं पत्र
७- कोकण विकासात व्यावसायिक बंदरांसोबतच सागरी पर्यटन व्यवसाय महत्वाचा
८- भारतीय ड्रॅगनही जागा झालाय...
९- अण्वस्त्र चाचणीचे बाजारात हादरे
१०- सोने-चांदी आणखी घसरले
११- ट्रायची दूरसंचार कंपन्यांशी चर्चा
१२- शांती सेनेसमोर अनेक नवी आव्हाने
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी
१४- एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवी शक्कल, ‘गोल्डन अवर्स’ योजना लोगू
१५- पश्चिम रेल्वेवर गणेश विसर्जनानिमित्ताने विशेष लोकल
१६- वडाळा ते लोअर परेल लवकरच मोनो धावणार, चाचणी यशस्वी
१७- निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...
१८- घटस्फोटात पत्नीची तपासणी योग्य!
१९- बीकेसीतील हत्येचे गूढ उकलले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- पाथर्डीत जुगार अड्ड्यावर छापा, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
२१- नाशिक; ट्रक-पिकअप-रिक्षाचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू
२२- नांदेड; पोलिस हद्दीच्या वादामुळे मृतदेह सात तास रेल्वे ट्रॅकवरच!
२३- ठाणे; कार घासल्याने तरुणाचा संताप, चालक महिलेचा गळा आवळला
२४- कोस्टल रोडचा आराखडा बदलावा लागणार?
२५- पॉवर ग्रीडचा 300 फुटी मनोरा कोसळला, 3 मजूर जखमी
२६- गिरणगावचे रस्ते गणेशभक्तांनी फुलू लागले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकानंतर अमेरिकन ओपनमध्ये कर्बर अजिंक्य...
२८- एका पायाने घेतली मरियप्पनने ‘सुवर्णझेप’!
२९- ईशान नक्वीचे अजिंक्यपद
३०- मरियप्पनची ‘सुवर्ण’ उडी
३१- शशांक मनोहर ‘बुडते जहाज’ सोडून निघून गेले !
३२- जोकोविच-वावरिंका जेतेपदासाठी झुंजणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
====================================

पंचवटीतील अमृतधाम परिसरात नाशिक-आग्रा महमार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षाचालक रवी बोचरे प्रवासी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी ओझरहून येणारा ट्रक आणि पंचवटीकडून येणाऱ्या पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली आणि ही दोन्ही वाहनं रिक्षावर जाऊन आदळली.
दोन्ही वाहनांमध्ये सापडून रवी बोचरे जागीच मृत्युमुखी पडला, या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गवर काही काळ रास्ता रोको करत तो रोखून धरला होता. वारंवार या भागात अपघात होत असून यावर काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

नांदेड शहराच्या लालवाडी भागातील रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात इसमांचं प्रेत आढळून आलं. संबंधित मृतदेह दोन रेल्वे रुळांच्या मध्ये नसल्यानं आमच्या हद्दीत नाही अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मयत इसमाच्या शेजारी नांदेड ते परभणी प्रवासाचे तपोवन एक्सप्रेसचे तिकीट आढळून आले आहे

30 वर्षीय समाधान शिळ-डायघर जवळील देसाईनाका परिसरातून गुरुवारी दुपारी कारने प्रवास करत होता. त्याचवेळी उल्हासनगर येथे राहणारी 29 वर्षीय गृहिणी खारघरहुन शिळफाटा मार्गे घराकडे कारने जात होती. त्यावेळी रिव्हर वूड पार्कजवळ तिची गाडी भोईरच्या गाडीला घासून गेली.
घडल्या प्रकारामुळे भोईरला आपला राग आवरता आला नाही. त्याने महिलेच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पाईपने गाडीची काच फोडून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील
- नागपूर : पतंजली फूड आणि हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांद्वारे लुबाडणूक न होता, त्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊन तो आत्महत्या करणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.मिहानमधील पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठा फूड पार्क मिहानमध्ये साकार होणार आहे. या पार्कमध्ये कृषिमालावर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. उसाप्रमाणेच विदर्भात मध्यस्थांची साखळी बंद होऊन शेतकऱ्यांच्या कृषिमालाला चांगली किंमत मिळेल. या पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. पतंजलीने शेतीचे क्लस्टर उभारावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
====================================
रतन टाटांचे ट्वीटर अकाउंट हॅक
- -ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली,दि.11- उद्योगपती रतन टाटा यांचे ट्वीटर अकाउंट हॅक करण्यात आले होते, याबाबतचा खुलासा खुद्द रतन टाटा यांनी ट्विटरवरच केला आहे.टाटा यांच्या अकाउंटवरून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे एकत्र छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियामध्ये चांगलाच गदारोळ उडाला होता.याबाबत खुलासा करताना टाटा म्हणाले , 'ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे पाहून मला धक्का बसला , त्यावर जाणीवपूर्वक चुकीचे ट्विट करण्यात करण्यात आले होते. ते ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो'.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांचेही ट्विटर अकाउंट शनिवारी हॅक झाले होते.
====================================
सागरमाला नव्हे, विकासमाला
- ऑनलाइन लोकमतदेशासह राज्यातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि येत्या काही वर्षांमधील नियोजन, याचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’चे आयोजन मुंबईमध्ये १३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. रस्ते, जलवाहतूक आणि पायाभूत सुविधा या अंगाने कॉनक्लेव्हमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मापदंड त्या देशातील वाहतूक व्यवस्था कशी आहे, यावर जोखले जातात. भारतात गेल्या काही वर्षांत रस्ते वाहतूक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात उभारले गेले आहे, पण ज्या वाहतूक क्षेत्रामुळे एके काळी भारत संपूर्ण जगाशी जोडला गेला होता, त्या क्षेत्राकडे अजूनही म्हणावे तितके लक्ष दिले जात नव्हते. ते क्षेत्र आहे सागरी वाहतुकीचे.आणखी वाचातब्बल ७५०० किलोमीटर लांबीचा सागरकिनारा भारताला लाभला आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पार दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचलेला हिंद महासागर अशी विस्तीर्ण किनारपट्टी भारताला लाभली आहे, पण या किनारपट्टीचा, तिच्या क्षमतेचा हवा तसा वापर करण्यात आतापर्यंत भारताला शक्य झालेले नाही. मात्र, केंद्र सरकारने आखलेला सागरमाला प्रकल्प या किनारपट्टीचा आणि त्या अनुषंगाने जलवाहतुकीचा विकास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणावा लागेल.वास्तविक, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्यानंतर आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हा प्रकल्प काही पुढे नेता आला नाही. सत्तापालटानंतर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र हा प्रकल्प अत्यंत गांभीर्याने घेतलेला दिसतो. त्यामुळेच या प्रकल्पाला आता चालना मिळालेली दिसते.
====================================
टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी
- -ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.11- भारतातील सर्वात वेगवान मानल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. 12 तासांपेक्षाही कमी वेळात टॅल्गो ट्रेनने दिल्ली ते मुंबई हे अंतर पार केलं.शनिवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी टॅल्गो दिल्लीहून मुंबईसाठी निघाली होती. 11 तास 48 मिनिटांत हे अंतर पूर्ण करत टॅल्गो आज पहाटे 2 वाजून 33 मिनिटांनी मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली.अंतिम चाचणीवेळी टॅल्गोचा वेग ताशी 150 किलोमीटर ठेवण्यात आला होता.2 ऑगस्ट रोजी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी झाली होती. दिल्ली ते मुंबई दरम्यान ही चाचणी पार पडली होती.साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे. सध्या सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी 16 तास लागतात.
====================================
एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवी शक्कल, ‘गोल्डन अवर्स’ योजना लोगू
- -ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.11- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात व वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. आता महामार्ग पोलिसांनी ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या वेळी एक्स्प्रेस वेवर ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत ठरावीक तासांसाठी अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. शनिवारी आणि रविवारी एक्सप्रेस-वेवर वाहनांची संख्या जास्त असते त्यामुळे या योजनेचा वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी फायदा होईल असे सांगितले जात आहे.महामार्ग पोलिसांनी शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.या आधी एक्सप्रेस वे वर ड्रोन विमानाचा व सीसीटीव्हीचा प्रयोग करण्यात आला आहे. या चाचण्यांमधून ड्रोनच्या तुलनेत सीसीटीव्ही अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.या नियमाची महामार्ग पोलिसांनी आजपासूनच अंमलबजावणी सुरु केली आहे
====================================

साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम, चार कार आणि बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भालगाव परिसरात हॉटेलच्या तळमजल्यावर तिरट सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई केली.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सरपंच, शिक्षकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाथर्डीत खळबळ उडाली आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केल्यानं पाथर्डी पोलीसांचं अपयश उघड झालं आहे.
पाथर्डीत जुगार अड्ड्यावर छापा, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर : अहमदनगरला पाथर्डीत जुगार अड्ड्यावर झालेल्या धडक कारवाईत 24 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अंदाजे सव्वा पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम, चार कार आणि बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भालगाव परिसरात हॉटेलच्या तळमजल्यावर तिरट सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई केली.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सरपंच, शिक्षकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाथर्डीत खळबळ उडाली आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केल्यानं पाथर्डी पोलीसांचं अपयश उघड झालं आहे.
====================================
नाशकात ट्रक-पिकअप-रिक्षाचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये ट्रक, पिकअप व्हॅन आणि रिक्षा यांच्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिकअप व्हॅनचालक आणि ट्रक ड्रायव्हरलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पंचवटीतील अमृतधाम परिसरात नाशिक-आग्रा महमार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षाचालक रवी बोचरे प्रवासी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी ओझरहून येणारा ट्रक आणि पंचवटीकडून येणाऱ्या पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली आणि ही दोन्ही वाहनं रिक्षावर जाऊन आदळली.
दोन्ही वाहनांमध्ये सापडून रवी बोचरे जागीच मृत्युमुखी पडला, या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गवर काही काळ रास्ता रोको करत तो रोखून धरला होता. वारंवार या भागात अपघात होत असून यावर काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
====================================
पोलिस हद्दीच्या वादामुळे मृतदेह सात तास रेल्वे ट्रॅकवरच!
नांदेड : हद्दीचं कारण सांगून कारवाईत टाळाटाळ करणं हा जणू पोलिस खात्याचा जन्मसिद्ध हक्क आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे एका व्यक्तीचा मृतदेह तब्बल सात तास एकाच ठिकाणी पडून राहिला.
नांदेड शहराच्या लालवाडी भागातील रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात इसमांचं प्रेत आढळून आलं. संबंधित मृतदेह दोन रेल्वे रुळांच्या मध्ये नसल्यानं आमच्या हद्दीत नाही अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मयत इसमाच्या शेजारी नांदेड ते परभणी प्रवासाचे तपोवन एक्सप्रेसचे तिकीट आढळून आले आहे
====================================
पश्चिम रेल्वेवर गणेश विसर्जनानिमित्ताने विशेष लोकल
फाईल फोटो
मुंबई : गणेश विसर्जनानिमित्त 15 सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर रात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी रात्री चर्चगेट-विरार मार्गावर या विशेष लोकलच्या 4 फेऱ्या चालवण्यात येतील.
गणेश विसर्जनानिमित्त चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल. विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.
====================================
कार घासल्याने तरुणाचा संताप, चालक महिलेचा गळा आवळला
ठाणे : गाडीला धक्का लागल्याच्या रागातून महिलेचा गळा आवळण्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी समाधान भाईरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
30 वर्षीय समाधान शिळ-डायघर जवळील देसाईनाका परिसरातून गुरुवारी दुपारी कारने प्रवास करत होता. त्याचवेळी उल्हासनगर येथे राहणारी 29 वर्षीय गृहिणी खारघरहुन शिळफाटा मार्गे घराकडे कारने जात होती. त्यावेळी रिव्हर वूड पार्कजवळ तिची गाडी भोईरच्या गाडीला घासून गेली.
घडल्या प्रकारामुळे भोईरला आपला राग आवरता आला नाही. त्याने महिलेच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पाईपने गाडीची काच फोडून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी समाधान भोईरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
====================================
झाकीर नाईकचं भारतीयांना खुलं पत्र
मुंबई : राजीव गांधी ट्रस्टला दिलेल्या देणगीचं प्रकरण ताज असतानाच झाकीर नाईक यानं भारत सरकारला उद्देशून एक पत्र लिहलं आहे. त्या पत्रात झाकीरनं भारतावर असहिष्णुतेचा ठपका ठेवला आहे.
झाकीर नाईकचं भारतीयांना खुलं पत्र
“सध्याच्या काळात मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय. त्यासाठी मोठ्या लोकांना फसवलं जातंय. अद्याप मला समजलेलं नाही की माझा नेमका गुन्हा काय आहे? मला सरकार आणि प्रसारमाध्यमांनी टार्गेट केलंय. माझ्याविरुद्ध तपासयंत्रणांना कोणताच पुरावा मिळालेला नाही. सर्वात पहले सरकार माझ्याविरुद्ध अहवाल तयार करतं. त्यानंतर तो अहवाल मीडियामध्ये प्रसिद्ध केला जातो.

माझ्यावर धर्म परिवर्तनाचा आरोप लावण्यात आला. मात्र, सध्या जबरदस्तीने एखाद्याचा धर्म बदलणं खरंच इतकं सोपं आहे का?
मी खरंच गुन्हा केला असेल तर मला शिक्षा द्या. मात्र, त्या आधी माझा गुन्हा काय आहे, हे तर मला सांगा. माझ्याविरुद्ध असा कट रचून भारतातल्या 20 कोटी मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जातेय. याला भारताचा असहिष्णू चेहराच म्हणावा लागेल.” – झाकीर नाईक
====================================
वडाळा ते लोअर परेल लवकरच मोनो धावणार, चाचणी यशस्वी
मुंबईः लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परेल दरम्यान सुरु होणारी मोनो लवकरच धावताना दिसणार आहे. वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ताशी 15 किमी प्रतितास वेगाने ही चाचणी घेण्यात आली. मोनोचे अंतीम स्थानक संत गाडगे महाराज स्थानक हे लोअर परेल स्टेशनपासून 1200 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे लोकल स्टेशनला लागूनच लोअर परेल स्टेशनही असणार आहे.
====================================
कोस्टल रोडचा आराखडा बदलावा लागणार?
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या कोस्टल रोडचा आराखडा मुंबई पुरातन वारसा संवर्धन समितीने फेटाळला आहे. प्रस्तावित आराखडा समुद्रकिनाऱ्यावरच्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या सौंदर्यात बाधा आणणारा असल्याची समितीची तक्रार आहे.
मरीन ड्राईव्हपासून सुरु होणाऱ्या कोस्टल रोडमुळे क्वीन्स नेकलसचं सौंदर्य कमी होईल, असं समितीचं म्हणणं आहे. त्याचसोबत बांद्रा फोर्टसमोर पर्यटकांसाठी मोठा डेक उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यामुळे फोर्टच्या सौंदर्याला हानी पोहोचू शकते असा समितीचा दावा आहे.
यामुळे मुंबई महापालिकेला पुन्हा नव्याने कोस्टल रोडचा आराखडा बनवावा लागणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
कसा असेल कोस्टल रोड?
नरिमन पॉईंट येथील आमदार निवासापासून सुरू होणारा हा 35 ते 36 किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे शहरातील 18 ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.
खार ते वर्सोव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सागरी सेतूमुळे किनारपट्टीवरील लोकांना सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यास कोणताही अडथळा येणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. म्हणून समुद्रकिनारी लागून 40 ते 60 फुटाचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे.
सागरी सेतूपेक्षा हा प्रकल्प कमी पैशात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
====================================
ट्विटरवर कांदा उत्पादकांच्या समस्यांचा पाऊस
मुंबई : ट्विटरवर आज राज्यातल्या कांदा उत्पादकांच्या समस्यांचा पाऊसच पडला. #saveonionfarmers या हॅशटॅग च्या नावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची जोरदार मोहिमच ट्विटरवर सुरु होती.
केंद्र व राज्य सरकारच्या अनास्थामुळं राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली ससेहोलपट आज ट्विटरनं जगात पोहचवली.
====================================
पॉवर ग्रीडचा 300 फुटी मनोरा कोसळला, 3 मजूर जखमी
नाशिक : नाशिकजवळच्या अवनखेड शिवारात पॉवर ग्रीडचा 300 फुटी मनोरा कोसळल्यानं 3 परप्रांतीय मजूर जखमी झाले आहेत. जखमींना दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींपैकी एका मजुराची प्रकृती अत्यवस्थ आहे. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली.
उभारणी सुरु असतानाच अचानक काही टन वजनाचा पॉवर ग्रीडचा भलामोठा टॉवर क्षणार्धात कोसळला. या टॉवरचं काम करणारे 3 मजुर या अपघातात गंभीर जखमी झाले. परिसरातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं आणि दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
====================================
No comments:
Post a Comment