Friday, 16 September 2016

नमस्कार लाईव्ह १६-०४-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला
2- बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता
3- दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक
4- चीनच्या किनारपट्टीवर धडकले ‘मेरांती’
5- हिलेरी क्लिंटन यांच्या प्रकृतीत सुधारणा
6- तालिबानी नेता दहशतवादी का नाही!
7- इस्लामिक स्टेटने अपहरण केलेल्या भारतीय शिक्षकांची सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
8- प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली 
9- केवळ 72 तासाच्या पावसाने तीन वर्षांचा दुष्काळ धुतला 
10- मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
11- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार !
12- भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडतमुक्ती नाहीच!
13- आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त
14- मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !
15- घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
16- २७ हजार कि.मी. इकॉनॉमिक कॉरिडॉर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
17- मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील 
18- आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक 
19- कुपोषणाला महिला-बालकल्याण विभागही जबाबदार: धनंजय मुंडे 
20- सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीचा ताप, डेंग्यू, मलेरियाची लागण 
21- विसर्जनादरम्यान रणधीर आणि ऋषी कपूर यांची पत्रकाराला मारहाण
22- गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी
23- कांदिवलीतील हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्यावर आग
24- लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
25- आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
26- भोसरीमध्ये उद्योजकाची डोक्यात हातोडा घालून हत्या 
27- पुण्यात विसर्जन मिरवणुकीत 1000 हून जास्त मोबाईल चोरीला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
28- अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण 
29- सॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो भारतात लाँच 
30- आर. अश्विनचं 'त्या' पाकिस्तानी नागरिकाला सडतोड उत्तरं! 
31- झिंगाटनंतर अजय-अतुलचं नवं गाणं - बेबी ब्रिंग इट ऑन 
32- ...म्हणून आलियासोबत रोमान्स करण्यास इम्रानने नकार! 
33- ...म्हणून आलियासोबत रोमान्स करण्यास इम्रानने नकार! 
34- कर्णधार सोडून सर्व कर्णधारांचा सन्मान करणार बीसीसीआय
35- स्पेनचे आव्हान पेलण्यास भारत सज्ज
36- विराट होत आहे सज्ज
37- न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून
38- जपान ओपनमधून सिंधूची माघार
39- रोनाल्डो, मोराटाची चमक रिअल माद्रिदचा विजय
40- पंड्याची एकाकी झुंज भारत ९ बाद १६९ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

------------------------------------------------------------------

आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक

आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक
नागपूर : ‘सैराट’मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने आकडा टाकून घेतलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन तरुण गंभीर जखमी झाला आहे.

नागपूरमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गणपती विसर्जन कार्यक्रमासाठी रिंकू राजगुरुला आमंत्रित केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश गजभिये यांच्या कार्यकर्त्यांनी आकडा टाकून वीज चोरली होती. आर्ची आल्याने कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. पण वीज घेताना जी तार वापरली होती, त्याला स्पर्श झाल्याने एका तरुणाला जोरदार झटका बसला आणि तो गंभीर जखमी झाला.  पोलिसांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु सरसकट वीजचोरी करणाऱ्या प्रकाश गजभिये यांच्यावर किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

------------------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील

मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई: पालघरमध्ये कुपोषणाचा आणखी एक बळी गेला आहे. वाडा तालुक्यात रोशनी सवराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट मंत्री विष्णू सवरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तसेच सरकाराची असंवेदनशीलता पुन्हा दिसून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

------------------------------------------------------------------

अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण

अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण
मुंबई : मुंबईत साथीच्या तापाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनलाही डेंग्यूची लागण झाली आहे. ‘कहानी 2’ या सिनेमाची शूटिंग करुन नुकतीच अमेरिकेतून परतलेल्या विद्याला कालच डेंग्यूचं निदान झालं.

डॉक्टरांनी विद्याला 10 दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

------------------------------------------------------------------

कुपोषणाला महिला-बालकल्याण विभागही जबाबदार: धनंजय मुंडे

कुपोषणाला महिला-बालकल्याण विभागही जबाबदार: धनंजय मुंडे
मुंबई: पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा पडलेला असताना आता याच मुद्यावरुन राजकारणही तापू लागलं आहे. एकट्या पालघरमध्ये १५ दिवसात 3 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे.

या मृत्युंना आदिवासी विभागासोबतच महिला आणि बालकल्याण विभागही जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे कुपोषणाच्या मुद्याआड मुडेंनी राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

आता पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंच्या आरोपांना नेमकं कशाप्रकरे उत्तर देतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. रविवारी धनंजय मुंडे ठाण्यातील आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत. तर विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील सोमवारी आदिवासी भागाचा दौरा करतील.

------------------------------------------------------------------

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली
नवी दिल्ली : उनावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.
संसद मार्गावरील मोर्चात नरेंद्र मोदी मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, गो रक्षक मुर्दाबादच्या घोषणा सुरु आहेत. तथाकथित गो रक्षकांच्या गुंडगिरीला तात्काळ आळा घालण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
दलितांवरील संघटित अत्याचाराविरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. दलितांवरील अत्याचाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहे. याशिवाय राज्याराज्यांमध्ये आंदोलन करणार असून 2018 मध्ये आणखी मोठं आंदोलन उभं करुन, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

------------------------------------------------------------------

केवळ 72 तासाच्या पावसाने तीन वर्षांचा दुष्काळ धुतला

केवळ 72 तासाच्या पावसाने तीन वर्षांचा दुष्काळ धुतला
उस्मानाबाद: केवळ 72 तासात उस्मानाबादच्या उत्तरेचा आणि लातूरच्या पूर्वेचा तीन वर्षांचा दुष्काळ पावसानं संपवला. लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा, उदगीर, औसा या तालुक्यातल्या 20 पेक्षा अधिक मंडळात अतिवृष्टी झाली.
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस पडतोय. गेल्या पंधरा वर्षात उमरगा तालुक्यात असा पाऊस झाला नव्हता.  ओढे-नदी-नाले-छोटे-मोठे तलाव भरुन गेले आहेत.त्रिकोळी आणि बेटजवळगा या दोन्ही गावातल्या बंद पडलेल्या बोअरवेलमधून आपोआप पाणी वाहू लागलं.
नाईचाकूर तलाव भरुन ओव्हरफ्लो झाल्यावर लातूर-उमरगा रोडवर पाणी आले. अशा पुरात सावित्रीच्या दुर्घटनेनंतरही शहाणपण न शिकलेल्या बस चालकांनी वाहने घातली.

------------------------------------------------------------------

सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीचा ताप, डेंग्यू, मलेरियाची लागण

सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीचा ताप, डेंग्यू, मलेरियाची लागण
मुंबई : सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीच्या तापाने नागरिक आजारी पडू लागले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फिव्हरमुळे जवळपास 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल आहे.
5 हजारपेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याची आकडेवारी 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यानची आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकासुद्धा चांगलीच कामाला लागली आहे.
आकडेवारी :
आजार       रुग्ण
ताप           4607
मलेरिया    315
लेप्टो         9
गस्ट्रो।       249
कावीळ      63

------------------------------------------------------------------

भोसरीमध्ये उद्योजकाची डोक्यात हातोडा घालून हत्या
भोसरीमध्ये उद्योजकाची डोक्यात हातोडा घालून हत्या
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी हद्दीतील एका उद्योजकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. विजय पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते शिवम एन्टरप्रायझचे मालक आहेत.
भोसरी एमआयडीसीच्या सेक्टर सातमध्ये विजय पवार यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

------------------------------------------------------------------

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत 1000 हून जास्त मोबाईल चोरीला

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत 1000 हून जास्त मोबाईल चोरीला
पुणे : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी डाव साधला. विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात तब्बल एक हजारहून अधिक मोबाईलची चोरी झाल्याचं उघड झालं आहे.
पुण्यात काल संपूर्ण दिवसभरात बेलबाग चौक ते अलका चौक परिसरात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये 1000 पेक्षा जास्त मोबाईलची चोरी झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केले.
दरम्यान, फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 20 मोबाईल जप्त केले आहेत. तर इतर चोर आणि मोबाईलचा तपास सुरु आहे.

------------------------------------------------------------------

सॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो भारतात लाँच

सॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो भारतात लाँच
मुंबई: सॅमसंगनं भारतात आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी ए9 प्रो लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 32,490 रु. असून 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन मिळणार आहे. मार्च महिन्यात चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता.

या स्मार्टफोनमध्ये गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांचा पसंतीस पडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

------------------------------------------------------------------

आर. अश्विनचं 'त्या' पाकिस्तानी नागरिकाला सडतोड उत्तरं!

आर. अश्विनचं 'त्या' पाकिस्तानी नागरिकाला सडतोड उत्तरं!
मुंबई: रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या भारताच्या दीपा मलिक हिच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवरुनही तिला अनेकांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विननं देखील दीपाला शुभेच्छा दिल्या. ‘अतिशय प्रतिभावान या खेळाडूंनी देशाला प्रेरणा देण्याचं काम सुरु ठेवलं आहे. खूपच भारी दीपा मलिक.’

एकीकडे दीपावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना पाकिस्तानमधील काही जणांना भारताचं हे यश पाहावलं जात नाही. पाकमधील एका व्यक्तीनं रिओ पॅरालिम्पिमधील खेळाडूंची थट्टा उडवण्याचा प्रयत्न केला. ‘एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला फक्त तीनच पदक…’ असं ट्वीट त्यानं केलं.

------------------------------------------------------------------

झिंगाटनंतर अजय-अतुलचं नवं गाणं - बेबी ब्रिंग इट ऑन

झिंगाटनंतर अजय-अतुलचं नवं गाणं - बेबी ब्रिंग इट ऑन
मुंबई: सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याने गायक, संगीतकार अजय-अतुल यांनी चाहत्यांना ठेका धरायला लावला. आता झिंगाटनंतर अजय-अतुल त्याच पठडीतील ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ हे गाणं घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

------------------------------------------------------------------

...म्हणून आलियासोबत रोमान्स करण्यास इम्रानने नकार!

...म्हणून आलियासोबत रोमान्स करण्यास इम्रानने नकार!
मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मी ‘सीरियल किसर’ म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. त्याने बऱ्याच सिनेमात अनेक अभिनेत्रींसोबत इंटिमेट सीन दिले आहेत. नुकतीच त्याला आलिया भटसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने हा चित्रपट नाकारला.
हा सिनेमा रॉमँटिक-कॉमेडी असून आलियासोबच रोमँटिक भूमिका करण्यास इम्रानला अजिबात इंटरेस्ट नाही. इम्रान आणि आलियामध्ये काहीच आलबेल नसल्याने त्याने हा सिनेमा नाकारला असावा, असा विचार तुम्ही करत असाल तर तो चुकीचा आहे.
हा सिनेमा नाकारण्यामागचं कारण म्हणजे आलिया आणि इम्रान हे चुलत भाऊ-बहिण आहे. त्यामुळे या सिनेमाच रोमँटिक भूमिका साकारणं दोघांसाठी अतिशय ऑकवर्ड होईल. इतकंच नाही तर इम्रान सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकावर नाराज असल्याचं समजतं. या भूमिकांसाठी आम्हा दोघांचा विचार कसा काय करु शकतात, असं इम्रानचं मत आहे.
“मला आलियासोबत काम करायला आवडेल. पण तिच्यासोबच ऑनस्क्रीन रोमान्स करणार नाही,” असं इम्रानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

No comments: