Tuesday, 20 September 2016

नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ 
२- कांगोमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांमधल्या हिंसाचारात 50 ठार
३- उरी हल्ला - काश्मीर मुद्दा लपविण्यासाठी भारताकडून जगाची दिशाभूल
४- मेक्सिकोमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा
५- पाकिस्तानपेक्षा जास्त उत्पन्न एकट्या इंडियन ऑइलचं
६- रशियन संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाचा विजय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- शहीद चंद्रकांत गलांडे अनंतात विलीन 
८- दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग 
९- दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग 
१०- भारतीय लष्कर सक्षम, आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल 
११- तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला 
१२- सोन्या-चांदीच्या भावात वाढ
१३- दोन हजार कोटींची सोने तस्करी उघड
१४- सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात वाढला
१५- जीएसटी नेटवर्कमध्ये वाढणार केंद्र सरकारचा आर्थिक सहभाग
१६- जिओला आणखी आंतरजोडणी पॉर्इंट देणार
१७- भीतीच्या सावटामुळे दोन्ही निर्देशांक घसरले
१८- व्हॉटसअॅपनेही दिली 'टॅग' करायची सोय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१९- नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम 
२०- एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त 
२१- मराठा समाजाचे प्रश्न हाताळायला मुख्यमंत्री असमर्थ - उद्धव ठाकरे
२२- अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
२३- ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
२४- आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
२५- एमपीएससी अध्यक्षांविरुद्ध गंभीर तक्रारी
२६- पोलिसांवरील हल्ले गंभीरच - हायकोर्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- बिहार; वडील शहीद झाल्याचं कळल्यानंतरही मुली परीक्षेला हजर! 
२८- जालना; जेव्हा विराट मोर्चा अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट देतो... 
२९- नाशिक; न विचारता बाईक वापरल्याने वहिनीची हत्या, दीर ताब्यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'भाभीजी घर पे है'मधून सनी लिओनचं मालिकेत पदार्पण 
३१- मोटो ई3 पॉवरवर 7000 पर्यंत सूट, 32 जीबी एसडी कार्ड मोफत! 
३२- मुंबई; अभिनयाच्या नावाखाली छेडछाड, तरुणीचा आरोप 
३३- व्हॉटसअॅपनेही दिली 'टॅग' करायची सोय 
३४- मैत्रिणीचं चुंबन महिलेला पडलं महागात  
३५- विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का कानपूरमध्ये येण्याची शक्यता
३६- हर्षदा निठवेला सांघिक गोल्ड
३७- दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली
३८- खेळपट्टीबाबतचा दृष्टिकोन बदलावा : हरभजन सिंग
३९- जपानकडून किर्गिझस्तानचा धुव्वा
४०- नव्या मोसमाची विजयी सुरुवात करू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
=======================================

शहीद चंद्रकांत गलांडे अनंतात विलीन

LIVE: शहीद चंद्रकांत गलांडे अनंतात विलीन
मुंबई : काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे. उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले, त्यात महाराष्ट्रातील चार जवानांचा समावेश आहे.
————————–
लान्स नायक शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या अंत्यविधी संपन्न, साताऱ्यातील जाशी गावात शोकाकूल वातावरणात अखेरचा निरो
————————–
उरी हल्ल्यातील शहीद पंजाब उईके यांचं पार्थिव अमरावती विमानतळावर दाखल

=======================================

नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम

नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम
नाशिक : उरीमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप ठोक यांना सोमवारी अखेरचा सलाम देण्यात आला. नाशिकच्या खडांगळी या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

यावेळी ‘भारत माता की जय’, ‘शहीद संदीप ठोक अमर रहे’ अशा घोषणा देत गावकऱ्यांनी संदीप यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणाही देण्यात आल्या. शहीद संदीप यांच्या मृत्यूनं अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. खडांगळी गावात ठोक यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिक लोटले होते.

=======================================

वडील शहीद झाल्याचं कळल्यानंतरही मुली परीक्षेला हजर!

वडील शहीद झाल्याचं कळल्यानंतरही मुली परीक्षेला हजर!
गया (बिहार): वडील शहीद झाल्यानंतरही त्याच्या तीन मुलींनी शाळेत जाऊन मोठ्या धैर्यानं परीक्षा दिली.  बिहारच्या गयामध्ये ही हृदयद्रावक चित्र पाहायला मिळालं.

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बिहारचे सुनील कुमार शहीद झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त त्यांच्या गावी पोहोचलं. मात्र, त्यांच्या तिन्ही मुलींची परीक्षा होती. त्यामुळे वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही तिन्ही मुलींनी शाळेत जाऊन परीक्षा दिली.

सुनील कुमार यांची मोठी मुलगी आरती कुमारी आठवीत, दुसरी मुलगी अंशु कुमारी सहावीत तर छोटी मुलगी अंशिका कुमारी दुसरीत शिकते. वडिलांच्या निधनानंतरही परीक्षा देणाऱ्या या सावित्रींच्या लेकींचं देशभरातून कौतुक होतं आहे.

=======================================

जेव्हा विराट मोर्चा अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट देतो...

जेव्हा विराट मोर्चा अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट देतो...
जालना : मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत असताना या मोर्चातल्या शिस्तीचंही सर्वांकडून कौतुक होत आहे. मोर्चा सुरु असतानाच नागरिकांनी एका रुग्णवाहिकेला मोकळी वाट करुन देत माणुसकीचं दर्शन घडवलं.

जालन्यात ज्या मार्गावरुन मराठा समाजाचा मोर्चा जात होता, त्याच मार्गावरुन एक रुग्णवाहिका  जात होती. त्यावेळी मोर्चेकरांनी भान राखून या रुग्णवाहिकेला वाट करुन दिली.

शिस्तीबरोबरच या विराट मोर्चात सामाजिक भानही जपलं जात असल्याचं समोर आलं आहे. मोर्चा आटोपल्यानंतर मार्गावरचा कचरा उचलण्यासाठी शेकडो हात गुंतलेले पाहायला मिळालं.

जालना शहरात सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण, तसंच अॅट्रोसिटी रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणी, महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.

=======================================

न विचारता बाईक वापरल्याने वहिनीची हत्या, दीर ताब्यात

न विचारता बाईक वापरल्याने वहिनीची हत्या, दीर ताब्यात
नाशिक : न विचारता बाईक वापरल्यामुळे दीराने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. आरोपी मुरारी चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इंदिराबाई चव्हाण ही महिला काही कामानिमित्त मामेदीर मुरारी चव्हाणची दुचाकी घेऊन बाहेर गेली. ती परतल्यानंतर मुरारीला हा प्रकार लक्षात आला. मात्र आपली संमती घेतल्याशिवाय दुचाकी वापरलीच कशी या रागातून त्याने वहिनीवर कोयत्याने वार केले.

आरोपीने केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यात इंदिराबाईंचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री अंबडमधल्या दत्तनगर परिसरात ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी आरोपी मुरारीला ताब्यात घेतलं असून अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

=======================================

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग
नवी दिल्ली : उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर दिवसभर दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्लाची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिली. राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींनी प्रणव मुखर्जींना माहिती दिली.

याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई कऱण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर येते आहे. याशिवाय पाकिस्तानवर कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्णय होणार आहे.

लवकरच सर्वपक्षीय बैठक

केंद्र सरकार लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. उरीमधील दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानवर कारवाईबाबत या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

=======================================

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग
नवी दिल्ली : उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर दिवसभर दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्लाची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिली. राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींनी प्रणव मुखर्जींना माहिती दिली.

याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई कऱण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर येते आहे. याशिवाय पाकिस्तानवर कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्णय होणार आहे.

=======================================

भारतीय लष्कर सक्षम, आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल

भारतीय लष्कर सक्षम, आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल
नवी दिल्ली: ‘पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असल्याच सांगत आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू.’ अशा भाषेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं आहे.

जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर छावणी परिसरातील शोधकार्य पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या शोधकार्यात ४ एके रायफल्स, ४ हातबॉम्ब प्रक्षेपक तसेच ४ ग्रेनेड लॉन्चर सापडली आहेत. ही सर्व हत्यारे पाकिस्तानी बनावटीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर दिवसभर दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्लाची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिली. राष्ट्रपती भवनात जाऊन मोदींनी प्रणव मुखर्जींना माहिती दिली.

याशिवाय पाकिस्तानविरोधात कारवाई कऱण्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याची माहितीही समोर येते आहे. याशिवाय पाकिस्तानवर कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्णय होणार आहे.

=======================================

एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त

एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त
ऊमुंबई: एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत मोठी भरती केली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळात तब्बल 15 हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या जागा भरण्यासाठी एसटी भरती प्रक्रिया सुरु करण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशी एसटी महामंडळाची सध्या बोलणी सुरु आहे.

दोन वर्षापूर्वी एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत भरती करण्यात आली नव्हती. १५ हजार पदं ही सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरावी लागणार आहे.

या भरतीत चालक आणि वाहक पदक मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. तसेच कारगीर आणि साहाय्यक कारगीर पदे देखील रिक्त आहेत. दरम्यान, ही भरती प्रकिया अद्याप विचारधीन असून याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, त्यामुळे लवकरच तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

=======================================

'भाभीजी घर पे है'मधून सनी लिओनचं मालिकेत पदार्पण

'भाभीजी घर पे है'मधून सनी लिओनचं मालिकेत पदार्पण
मुंबई : मोठ्या पडद्यावर बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘बिग बॉस’, ‘स्प्लिट्सव्हिला’ यासारख्या कार्यक्रमात दिसल्यानंतर सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.

‘अँड टीव्ही’वर गाजलेल्या ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत सनी दिसणार आहे. सोमवारपासून सनीने चित्रीकरणाला सुरुवात केली असून ती स्वतःच्याच भूमिकेत दिसणार आहे.

अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे), अनिता (सौम्या टंडन), विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन (रोहिताश गौड) यांच्यासोबत सनी स्क्रीन शेअर करणार आहे. आपल्या सिनेमाच्या हिरोच्या शोधात सनी दिग्दर्शकासोबत येते, असं कथानक पाहायला मिळेल.

सनी स्वभावाला अत्यंत लाघवी असून शूटिंग करताना खूप मजा आल्याचं अभिनेत्री शुभांगी अत्रेने सांगितलं. तिने पटकन सगळ्यांशी जुळवून घेतलं, माझा ‘सही पकडे है’ हा डायलॉग शिकवताना मजा आली, असंही शुभांगी म्हणते.

=======================================

मोटो ई3 पॉवरवर 7000 पर्यंत सूट, 32 जीबी एसडी कार्ड मोफत!

मोटो ई3 पॉवरवर 7000 पर्यंत सूट, 32 जीबी एसडी कार्ड मोफत!
मुंबई: मोटोरोलानं भारतात आपला नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर लाँच केला. हा स्मार्टफोन ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत 7999 रु. आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसोबतच कंपनीनं फ्लिपकार्टच्या साथीनं बऱ्याच ऑफरही दिल्या आहेत.

या स्मार्टफोनवर देण्यात आलेली सगळ्यात महत्वाची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तब्बल 7000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर असणार आहे. तसंच यासोबत No cost EMI असणार आहे. तसंच 599 रुपयांचं 32 जीबी सॅनडिस्क मायक्रोएसडी कार्ड मोफत मिळणार आहे. जर तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं पेमेंट केलं तर 800 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जाईल. ही ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल डिस्प्ले आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ मीडियाटेक क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं असून त्यात 2 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. तर 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच अँड्रॉईड  6.0 मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. तसेच यात ड्युल सिम सपोर्ट आहे.

=======================================

अभिनयाच्या नावाखाली छेडछाड, तरुणीचा आरोप

अभिनयाच्या नावाखाली छेडछाड, तरुणीचा आरोप
मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख,  अभिनेता अर्जून कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांनी जिथे अभिनयाचे धडे गिरवले त्या संस्थेत एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईच्या जॉन बेरी या प्रसिद्ध अॅक्टिंग स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीनं आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संस्थेतील अतुल नावाच्या शिक्षकानं अभिनयाच्या नावाखाली नको ते प्रकार करण्यास सांगितल्याचा आरोप या विद्यार्थिनीनं केला आहे. त्यानं मारहाण केल्याचा आरोपही तरुणीन तक्रारीत केला आहे.

संस्था चालक जॉन बेरी यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच असा विश्वास व्यक्त केला.

=======================================

व्हॉटसअॅपनेही दिली 'टॅग' करायची सोय

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. २० - आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात 'इन्स्टंट मेसेजिंग' अॅप्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'व्हॉटसअॅप'वर एक नव्या फीचरचा समावेश झाला आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणेच आता व्हॉटसअॅपनेही टॅग करायची सोय उपलब्ध करून दिली आहे.
    त्यामुळे युझर्ससाठी व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सुलभ झाला आहे. या नव्या फीचरनुसार, ' तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये चॅटिंग करताना कीपॅडमधील ' @' हे बटण वापरल्यास ग्रुपवरील सर्व सदस्यांची माहिती ( contacts) तुम्हाला एकाच वेळी दिसू शकतील. त्यामुळे फेसबूक वा ट्विटरसारखं तुम्ही व्हॉट्सअॅपवरही ग्रुप चॅटमध्ये एखाद्या ठरावीक सदस्याला टॅग करून संदेश देऊ शकता.
    मात्र या फीचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉटसअॅप अपडेट करून घ्यावे लागेल. 

No comments: