Wednesday, 28 September 2016

नमस्कार लाईव्ह २८-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- राष्ट्रसंघात पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे
२- सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव
३- पाकिस्तानमधील 'सार्क' परिषदेवर भारताचा बहिष्कार 
४- भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- तणावात भावनिक क्षण घेऊन आली 'समझोता एक्स्प्रेस' 
६- भारतानंतर आता बांगलादेश, अफगाणिस्तानचाही सार्क परिषदेवर बहिष्कार
७- सिंधू पाणी करार रद्द होण्याच्या भीतीने पाकिस्तानची धावाधाव
८- ‘डिजिटल इंडिया’ची अल्पावधीत मोठी मजल
९- मागणी घटल्यामुळे सोने-चांदी घसरले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी 
११- शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई 
१२- अल्पवयीन मुलांनाही दुचाकीचा परवाना मिळणार?
१३- व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना 
१४- सामनाच्या कार्यकारी संपादकांना 'कार्टून' म्हणावसं वाटतं: आशिष शेलार 
१५- राजीनाम्याच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरेंचं मंत्र्यांना मातोश्रीवर बोलावणं 
१६- कर्नल पुरोहितचा जामीन फेटाळला 
१७- राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- धुळ्याच्या मोर्चात सर्वात वयोवद्ध दाम्पत्याचा सहभाग 
१९- जवळचं भाडं नाकारल्याने रिक्षाचालकाशी वाद, प्रवाशाला बेदम मारहाण 
२०- मुंबईला डेंग्यूचा विळखा वाढला, मनपा क्षेत्रात 3287 संशयित रुग्ण
२१- नंदुरबार; मॅजिक पेनचा वाळू ठेकेदारांकडून गैरवापर, सरकारला लाखोंचा चुना 
२२- वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रोला मंजुरी 
२३- बिहार; रुग्णवाहिका नसल्याने चक्क प्लास्टिक पिशवीतून नेला मृतदेह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा पोस्टर रिलीज 
२५- दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंभीरचे पुनरागमन 
२६- चाहत्यांच्या संघात विराट, गांगुलीला स्थान नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog

-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया 

गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
========================================

कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी

कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
वादग्रस्त व्यंगचित्र आणि दगडफेक
मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
‘सामना’त श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी लिहिलं आहे की, “सामनाच्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
“व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे.
२५ सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्यामुळेच हा खुलासा करीत आहे.”

========================================

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई
मुंबई : ‘सामना’तील व्यंगचित्रावरुन शिवसेनेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. व्यंगचित्र प्रकरणावरुन जनतेचा रोष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी तिघांनी आपले राजीनामे पाठवल्याचं सांगितलं आहे.
मात्र आता शिवसेनेच्या नेत्यांनीच उद्धव ठाकरेंकडे कोणाचेही राजीनामे आले नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
माफी मागण्याचा प्रश्नच नाही : शिवसेना
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

========================================

 अल्पवयीन मुलांनाही दुचाकीचा परवाना मिळणार?

आता अल्पवयीन मुलांनाही दुचाकीचा परवाना मिळणार?
मुंबईः अल्पवयीन मुलांना आता 100 सीसींपेक्षा कमी क्षमतेच्या ‘नॉन गियर’ दुचाकी चालवण्याची परवानगी मिळणार आहे. यासंबंधी मोटार वाहन कायद्यात काही नव्या तरतुदी केल्या जाणार असून त्यात 16 ते 18 वयोगटातल्या मुलांना 100 सीसीपर्यंतच्या नॉन गियर दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केली आहे.

यासंदर्भात प्रत्येक राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही नुकतीच चर्चा करण्यात आली. यावर कॅबिनेटकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या 16 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना 50 सीसीपेक्षा कमी क्षमतेची नॉन गियर दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो.

सध्या 50 सीसी क्षमतेच्या दुचाकींचं उत्पादन जवळपास बंद झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीचा वापर करता यावा, यासाठी 50 सीसी क्षमतेची अट शिथिल करण्याचा विचार सुरू आहे.


========================================

धुळ्याच्या मोर्चात सर्वात वयोवद्ध दाम्पत्याचा सहभाग

धुळ्याच्या मोर्चात सर्वात वयोवद्ध दाम्पत्याचा सहभाग
धुळे: धुळ्यातील मराठा मोर्च्यात सर्वात वयोवृद्ध दाम्पत्यांनी सहभागी होऊन कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवाला. या वयोवृद्ध दाम्पत्यांपैकी नारायण तोताराम पाटील यांचे वय 105 वर्षे आहे, तर त्यांची पत्नी सोजाबाई यांचे वय 95 वर्षे आहे. हे दोघेही शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावमधील रहिवासी आहेत.

दरम्यान, या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मराठा समाजातील बांधव धुळे शहरात दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा सुरुवात झाली.

या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेदेखील सहकुटुंब सहभागी झाले.

========================================

राष्ट्रसंघात पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे

राष्ट्रसंघात पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे
फोटो सौजन्य: संयुक्त राष्ट्रसंघ (UNGA)
न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर Right To Response अंतर्गत दोन्हीकडून प्रतिक्रीया येत आहेत. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा मुखवटा फाडल्यानंतर पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या राजदूत मलीहा लोधी यांनी काश्मीरमधील अशांततेचं खापर भारत पाकिस्तानवर फोडत असल्याचा आरोप केला. तसेच काश्मीर हा भारताचा कधीही अविभाज्य भाग नसल्याचे म्हटलं. यावर संयुक्त राष्ट्र संघातील भारतीय मिशमच्या प्रथम सचिव इनम गंभीर यांनी लोधींना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पाकिस्तानने राष्ट्रसंघाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत वाभाडे काढले. तसेच दहशतवादाला रोकण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळवूनही पाकिस्तानच्याच धरतीवर दहशतवादाचे नंदनवन वसले आहे. यामागची कारण स्पष्ट करावीत अशी मागणी केली.

========================================

सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव

सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव
इस्लामाबाद: भारताकडून 56 वर्षापूर्वीचा करार रद्द करण्याच्या हलचालींमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे. पाकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्ल्ड बँकेकडे धाव घेऊन मदतीची याचना केली आहे.

पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अश्तर औसाफ अली यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने वॉशिंग्टन डीसीमधील वर्ल्ड बँकेच्या मुखालयात बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन 1960 मधील सिंधू करारसंदर्भात मध्यस्थी करण्याची मागणी केली.

याशिवाय पाकिस्तानमधील जिओ न्यूज या न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडेही याप्रकरणी धाव घेतली आहे. मात्र, याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली नाही.

पाकिस्तानने 19 ऑगस्ट रोजी भारताकडे औपचारीक रुपात नीलम आणि चिनाब नदीवरील वीजनिर्मितीसंदर्भातील वादावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली होती. सध्या हे प्रकरण पाणीवाटप लवादाकडे आहे.

========================================

जवळचं भाडं नाकारल्याने रिक्षाचालकाशी वाद, प्रवाशाला बेदम मारहाण

जवळचं भाडं नाकारल्याने रिक्षाचालकाशी वाद, प्रवाशाला बेदम मारहाण
मुंबईः मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनवर रिक्षाचालकाने जवळचं भाडं नाकारल्याने प्रवासी आणि रिक्षाचालकात वाद झाला. त्यानंतर स्टेशनवरील इतर रिक्षाचालकांनी मिळून प्रवाशाला बेदम मारहाण केली.

रिक्षाचालकांच्या या गुंडगिरीनंतर प्रवाशांनीही त्याला उत्तर देत 2-3 रिक्षांची तोडफोड केली. दरम्यान रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या या मारहाणीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या निमित्ताने रिक्षाचालकांची अरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रवाशाने केवळ जवळचं भाडं का नाकारता असा सवाल केल्यामुळे रिक्षाचालकांचा संताप अनावर झाला. त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.

========================================

मॅजिक पेनचा वाळू ठेकेदारांकडून गैरवापर, सरकारला लाखोंचा चुना

मॅजिक पेनचा वाळू ठेकेदारांकडून गैरवापर, सरकारला लाखोंचा चुना
नंदुरबार : वाळू वाहतूक रॉयल्टी पावतीवर मॅजिक पेनचा उपयोग करुन वाळू ठेकेदारांकडून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील कौठळ वाळू ठिय्यावर हा प्रकार सर्रास रित्या सुरु असुन प्रशासन मात्र या सर्व प्रकराकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत आहे.
शाई गायब होते!
मॅजिक पेनच्या शाईला पावतीच्या खालच्या बाजुने थोडी उष्णता दिल्यास शाई नष्ट होऊन वाळू वाहतुकीची पावती पुन्हा ठेकेदारांकडुन वापरात आणली जाते.
‘अशी’ फसवणूक केली जाते!
मॅजिक पेनचा वापर करण्यात आलेल्या पावत्या नंदुरबारचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कौठळ वाळू ठिय्यावरुन वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून ताब्यात घेतल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या पावत्याच डुप्लिकेट असून या पावत्यांना उष्णता दिल्यास, त्यावरची शाईच गायब होत असल्याने या प्रकारातून वाळू ठेकेदारांकडून शासनाची फसवणूक केली जात आहे.

========================================

पाकिस्तानमधील 'सार्क' परिषदेवर भारताचा बहिष्कार

पाकिस्तानमधील 'सार्क' परिषदेवर भारताचा बहिष्कार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत आणखी एक कठोर भूमिका घेतली आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क परिषदेला भारत हजेरी लावणार नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये सार्क देशांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
एका देशाने परिषदेसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण केलं आहे, असं भारतातर्फे सार्कच्या अध्यक्षांना सांगण्यात आलं आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला गैरहजेरी लावण्याची शक्यता आहे.

========================================

व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना

व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापून आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रावरुन बराच वादंग निर्माण झाला आहे. आज ‘सामना’च्या नवी मुबंई आणि ठाण्यातील कार्यालयांवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. या संपूर्ण प्रकारानंतर शिवसेनेनं आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पेटवत आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

वादग्रस्त व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नाही असं म्हणत शिवसेनेनं प्रसिद्धीपत्रकातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे देखील हेच पक्ष असल्याचा सेनेनं आरोप केला आहे.

दरम्यान, व्यंगचित्राप्रकरणी सुरु असलेल्या राजकारणामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मात्र त्यांचा हा विघ्नसंतोषीपणा खपवून घेतला जाणार नाही. असंही सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

========================================

सामनाच्या कार्यकारी संपादकांना 'कार्टून' म्हणावसं वाटतं: आशिष शेलार

सामनाच्या कार्यकारी संपादकांना 'कार्टून' म्हणावसं वाटतं: आशिष शेलार
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून वादग्रस्त कार्टून छापल्यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपसह सगळेच राजकीय पक्ष सरसावले आहेत.

‘सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच कार्टून म्हणावंस वाटतं.’ अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे कार्टूनवरुन शिवसेना आणि भाजपमध्येही जुंपली आहे. तर याच मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे.


========================================

मुंबईला डेंग्यूचा विळखा वाढला, मनपा क्षेत्रात 3287 संशयित रुग्ण

मुंबईला डेंग्यूचा विळखा वाढला, मनपा क्षेत्रात 3287 संशयित रुग्ण
मुंबई: मुंबईला डेंग्यूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईमध्ये डेंग्यूचे 136 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार होण्यात कारणीभूत ठरल्याप्रकरणी 13 हजार नागरिकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतरही योग्य पावले न उचलणाऱ्यांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल करणार आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सप्टेंबर 2015 मध्ये डेंग्यूचे 248 रुग्ण होते, तर या वर्षी सप्टेंबर महिन्यातच एकूण 296 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 3287 वर पोहचली असून यातील 80 टक्के रूग्ण 15 ते 45 वयोगटातील आहेत. मुंबईत आतापर्यंत डेंग्यूमुळं तिघांचा बळी गेला आहे.

दरम्यान, डेंग्यूच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या 927 जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. डेंग्यूच्या वाढत्या धोक्यामुळे डासशोधकांना कामात असहकार्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार, असल्याचे मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी राजन नारींग्रेकर यांनी सांगितले.

========================================

No comments: