Thursday, 22 September 2016

नमस्कार लाईव्ह २२-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- गूगल, याहू, मायक्रोसॉफ्ट साईट्सवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती बंद 
२- पाकिस्तानला झटका, काश्मीरमध्ये हस्तक्षेपास यूएनचा नकार 
३- युद्ध सराव करुन पाकिस्तानने पाडला आपलाच शेअर बाजार
४- पाकिस्तान एक दहशतवादी देश - भारत
५- शरीफ यांनी आळवला पुन्हा ‘काश्मीर’ राग
६- भारतीय लष्करानं प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून 20 दहशतवाद्यांचा केला खात्मा ?
७- नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- उरणमध्ये 4 संशयित, पोलिसांकडून शोधमोहिम सुरु 
९- उरी हल्ल्याचा बदला, LOC पार करुन 20 अतिरेक्यांचा खात्मा 
१०- पेलेट गन वापरावर बंदी आणण्यास उच्च न्यायालयाचा नकार 
११- डाळी, खाद्य तेलाच्या साठामर्यादेला मुदतवाढ
१२- पैसे जमा करण्यासाठी यापुढे बँकेत जायचीच गरज नाही
१३- काळा पैसा; सीबीडीटीकडून एसएमएस
१४- स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
१५- राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण अॅट्रॉसिटी रद्द होऊ देणार नाही : आठवले 
१७- केवळ 'एसी'मध्ये झोपण्यासाठी हा पठ्ठ्या चोरायचा होंडा सिटी 
१८- आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला पावसाचा फटका, करावी लागली पायपीट
१९- पुढच्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
२०- मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली
२१- पंकजांनी घेतली भुजबळ यांची भेट
२२- उरणजवळ दिसले शस्त्रधारी संशयित, नौदलाकडून हाय अलर्ट
२३- गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- पुणे; विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी चोरी 
२५- अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर 
२६- संभाजी भिडे गुरुजींचा मराठा मोर्चाला पाठिंबा 
२७- वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली, 400 जण अडकले 
२८- ट्रॅफिक जॅम, आरोग्यमंत्री 2 किमी चालत, खारेगाव नाका टोल फ्री 
२९- 'आप' आमदार सोमनाथ भारती यांना अटक 
३०- बॉलीवूडमधल्या स्टंटमनने पळवली 98 लाखांची ऑडी, चार तासांत अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- टीम इंडियाची घसरगुंडी, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 9 बाद 291 धावा
३२- भारताच्या दिवसअखेर 9 बाद 291 धावा
३३- बीसीसीआयच्या नव्या निवड समितीकडे फक्त १३ कसोटी सामन्यांचा अनुभव
३४- पन्नास आॅलिम्पिक पदकांसाठी योजना
३५- केनला बाद करणे, विजयाचे दार उघडण्यासारखेच!
३६- अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व
३७- अजय शिर्के यांच्यावर मानहानीचा आरोप होऊ शकतो 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
======================================

उरणमध्ये 4 संशयित, पोलिसांकडून शोधमोहिम सुरु

उरणमध्ये 4 संशयित, पोलिसांकडून शोधमोहिम सुरु
रायगड: उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.
सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागरिकांनी घाबरु नये, पोलिसांनी माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन
उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.
काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे.

======================================

विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी चोरी

विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी चोरी
पुणे: विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी पैसे हवेत, असं सांगून एका अल्पवयीन मुलाच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  भारत किसन पवार असं आरोपीचं नाव आहे. त्याचा एक साथीदार पसार आहे.

काय आहे प्रकरण?
पुण्यात मंगळवार पेठेत पवार कुटुंब राहतं. त्यांचा मुलगा परिसरातील एका मंडळाचा कार्यकर्ता. या मंडळातील भारत पवार आणि साळुंखे नावाच्या तरुणांनी वेगळाच कट आखला होता. पवारांचा मुलगा हौशी होता, त्यामुळे आपल्याही मंडळाच्या बाप्पासमोर भन्नाट डीजे वाजावा अशी त्याची इच्छा होती.
मात्र पैसे नसल्याने मिरवणूक काढणे शक्य नव्हते. आरोपींनी पवारांच्या मुलाला भावनिक आवाहन केलं. आपल्या बाप्पाची जंगी मिरवणूक काढायची तर पैसे हवेत. तुझ्या घरी खूप सोने आहे, ते कुठे ठेवतात त्याची माहिती घे, आपण मिरवणुकीत डीजे लावू, असं त्याला सांगितलं.
त्यानंतर पवार कुटुंब परगावी गेल्यानंतर, आरोपींनी त्यांच्या घरातील सोन्यावर हात साफ केला.
यानंतर पवार कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पण काहीच सुगावा लागेना. मग घरातल्याच एका अल्पवयीन मुलाची कसून चौकशी सुरु झाली आणि बिंग फुटलं.  डीजेसाठी या मुलांनी चोरी केल्याचं उघड झालं.
पुण्यात घरफोडीच्या अनेक घटना घडतात, मात्र डीजे लावण्यासाठी अशा प्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

======================================

आता गूगल, याहू, मायक्रोसॉफ्ट साईट्सवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती बंद

आता गूगल, याहू, मायक्रोसॉफ्ट साईट्सवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती बंद
नवी दिल्ली : गूगल, याहू आणि मायक्रोसॉफ्ट सर्च इंजिनवर आता लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती आणि माहिती दिसणार नाही. केंद्र सरकारने या संदर्भातील एका याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाला माहिती दिली की, या तिन्ही कंपन्यांवरील लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती, माहिती ऑटो ब्लॉक करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबण्यात आली आहे.

“लिंग परीक्षणासंबंधी माहिती, जाहिराती जे कीवर्ड्स टाईप केल्यानतंर दिसते, असे 22 कीवर्ड्स शोधून काढण्यात आले आहेत. या 22 कीवर्ड्सपैकी कोणतंही कीवर्ड टाईप केल्यानंतर लिंग परीक्षणासंबंधी माहिती समोर सर्च होते. ते सर्व कीवर्ड्स ऑटो ब्लॉक करण्यात येणार आहेत.” अशी माहिती सर्च इंजिन कंपन्यांनीही कोर्टात दिली.

लिंग परीक्षणाच्या जाहिरातींविरोधात डॉ. साबू जॉर्ज यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत काही कीवर्ड्सचा उल्लेख केला होता. डॉ. जॉर्ज यांचा आरोप होता की, ऑनलाईन सर्च इंजिन कंपन्या लिंग परीक्षणासंबंधी जाहिराती दाखवून कायद्याचं उल्लंघन करत आहेत.

भारतातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे.

======================================

मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण अॅट्रॉसिटी रद्द होऊ देणार नाही : आठवले

मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण अॅट्रॉसिटी रद्द होऊ देणार नाही : आठवले
मुंबई : माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करण्यासही तयार आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही. अॅट्रॉसिटी रद्द करायचा असेल तर आधी अत्याचार बंद करा, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठणकावलं. राज्यभरात सुरु असलेल्या मराठा मोर्चांमधील मागण्यांबाबत बोलताना आठवले बोलत होते.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही. आवश्यक बदल सुचवले तर मंत्रालय विचार करेल. कोणते बदल हवेत, त्याचा मसूदा द्यावा, त्यावर निश्चित विचार केला जाईल, असंही आठवलेंनी सांगितलं. तसंच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी आवाहन करणार असल्याचं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाला पाठिंबा
मराठा आरक्षणाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. 25 टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न सुटू शकतो. यासाठी घटनेत बदल करावा लागेल. पण यासाठी प्रयत्न करण्याची आणि पंतप्रधानांशी चर्चा करण्याची तयारी माझी तयारी आहे. प्रत्येक राज्यात आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. या सर्व समाजांना क्रिमीलेयरमध्ये आरक्षण द्यायला हवं.”

======================================

अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर

अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर
अमरावतीः औरंगाबादपासून सुरु झालेला मराठा समाजाचा मोर्चा आता राज्यभर विस्तारला आहे. आज अमरावतीत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही लाखोंचा जनसागर रस्यावर उतरला होता.

अमरावतीमध्ये कडाक्याचं उन असूनही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने या मोर्चात सहभाग घेतला. तर काही आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या उन्हाचा त्रासही झाला. नेहरु मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गानं हा मोर्चा निघाला. शेवटी गर्ल हायस्कूलमध्ये निवेदनाचं वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर निवेदन देऊन मोर्चा संपल्याचं घोषित करण्यात आलं.

कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तसंच  मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशा प्रमुख मागण्या मराठा आंदोलनकर्त्यांच्या आहेत.

======================================

टीम इंडियाची घसरगुंडी, पहिल्या दिवअखेर भारताच्या 9 बाद 291 धावा

टीम इंडियाची घसरगुंडी, पहिल्या दिवअखेर भारताच्या 9 बाद 291 धावा
कानपूर: कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी किवी गोलंदाजांनी टीम इंडियाची घसरगुंडी उडवली. त्यामुळे भारताची पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात 9 बाद 291 अशी अवस्था झाली.  या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया उपाहारापर्यंत एक बाद 105 अशा भक्कम स्थितीत होती. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.

भारताकडून मुरली विजयने सर्वाधिक 65 धावांची आणि चेतेश्वर पुजारानं 62 धावांची खेळी केली. तर रविचंद्रन अश्विनने 40 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा रवींद्र जाडेजा 11 धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर खेळत होता.
————————————
कानपूर कसोटीत न्यूझीलंडनं जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारतानं पाच गडी गमावून 210 धावांपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्मा आणि अश्विन सध्या मैदानात आहेत. या सामन्यात उपाहारापर्यंत भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पण उपाहारानंतर किवी गोलंदाजांनी भारताला एकापाठोपाठ एक दणके देण्यास सुरुवात केली.

======================================

संभाजी भिडे गुरुजींचा मराठा मोर्चाला पाठिंबा

संभाजी भिडे गुरुजींचा मराठा मोर्चाला पाठिंबा
सांगली: सांगलीत 27 सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजींनी पाठिंबा दिला आहे.
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून  रॅली काढत, मराठा मोर्चा कार्यालयाला भेट दिली. यावेळी भिडे गुरुजींनी संघटीत झालेल्या मराठा समाजाचे कौतुक करत, मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.
महाराष्ट्रातील मराठा पेटून उठलाय ही चांगली गोष्ट आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने संबंध मराठा आणि महाराष्ट्र पेटून उठालाय, हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकतं, असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.

======================================

उरी हल्ल्याचा बदला, LOC पार करुन 20 अतिरेक्यांचा खात्मा

उरी हल्ल्याचा बदला, LOC पार करुन 20 अतिरेक्यांचा खात्मा
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील उरी इथं झालेल्या हल्ल्यानंतर, पाकिस्तानला चोख उत्तर द्या, अशी मागणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या चर्चेच्या फैरी झडत असताना, तिकडे भारताच्या दोन तुकड्यांनी नियंत्रण रेषा पार करुन एक-दोन नव्हे तर 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ‘द क्विंट’ या वेबसाईटने  हा दावा केला आहे.

हेलिकॉप्टरने एलओसी पार
‘द क्विंट’च्या बातमीनुसार, उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांच्या दोन तुकड्यांनी सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने थेट एलओसी अर्थात नियंत्रण रेषा पार केली. भारतीय जवान थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसले आणि त्यांनी सुमारे 20 अतेरिक्यांचा खात्मा केला.
भारताच्या या दोन तुकड्यांमध्ये 18 ते 20 जवानांचा समावेश होता. या जवानांनी उरी हल्ल्याचा बदला थेट LOC पार करुन घेतला. या जवानांनी 20 अतिरेक्यांना शोधून शोधून टिपलं, शिवाय सुमारे 200 जणांना जखमी केल्याचा दावाही ‘द क्विंट’ने केला आहे.

======================================

वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली, 400 जण अडकले

वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली, 400 जण अडकले
वसई : मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे. इथल्या 125 जणांच्या घरात पाणी शिरलं असून सुमारे 400 लोक अडकले आहेत.
अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. तर अग्निशम दलाने बोटीच्या साहाय्याने 25 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मात्र काही नागरिक घरी राहणंच पसंत करत आहेत.
दरम्यान, परतीच्या पावसाने वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विरार पूर्वमध्ये भाताणे पूल पाण्याखाली गेल्याने आजूबाजूच्या भाताणे, जाभूळपाडा, नवसई, तळ्याचा पाडा, हत्तीपाडा, काजूपाडा, आडने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील 24 तासात 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसंच विरार पूर्वमधीलच फुलपाडा पापडखींड धरण भरल्याने आसपासचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

======================================

ट्रॅफिक जॅम, आरोग्यमंत्री 2 किमी चालत, खारेगाव नाका टोल फ्री

ट्रॅफिक जॅम, आरोग्यमंत्री 2 किमी चालत, खारेगाव नाका टोल फ्री
ठाणे: मुंबई – अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद पडल्यानं शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला. गेल्या तीन तासांपासून दीपक सावंत ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी चालत जाणं पसंत केलं. दोन किलोमीटरपर्यंत आरोग्यमंत्री चालत गेले.
या पायपीटीनंतर डॉ. दीपक सावंत यांनी खारेगाव टोलनाक्यावर दुपारी चारपर्यंत टोलमुक्ती देण्याची घोषणा केली.

======================================

'आप' आमदार सोमनाथ भारती यांना अटक

'आप' आमदार सोमनाथ भारती यांना अटक
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या आमदारांचं अटकसत्र सुरुच आहे. कारण सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आपचे आमदार सोमनाथ भारती यांना अटक झाली आहे.
सोमनाथ यांनी ऑल इंडिया इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात एम्समध्ये सुरक्षा रक्षकांशी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांना दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अटक केली.
एम्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी आर एस रावत यांनी सोमनाथ भारतींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
स्वत: सोमनाथ भारती यांनीच आपल्याला अटक झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.
काय आहे वाद?
एम्सची एक भिंत तोडण्यासाठी सोमनाथ भारती एक जेसीबी आणि जमाव घेऊन आले होते. एम्सच्या भिंतीच्या मागे एक रस्ता आहे. त्याच्या डागडुजीचं काम सुरु आहे, त्यासाठी भिंत हटवण्याचा सोमनाथ भारतींचा मानस होता.
जो रस्ता आहे तो PWD चा आहे, मात्र तो बंद केल्याने एम्सला पोहोचण्यासाठी फेरा मारावा लागतो. जर ती भिंत हटवली, तर नागरिकांना ये-जा करणं सुलभ होईल, असा स्थानिकांचा दावा आहे. मात्र हीच भिंत हटवण्याच्या प्रयत्नात, भारतींची सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे.

======================================
======================================

No comments: