[अंतरराष्ट्रीय]
१- ब्रिटीश दाम्पत्याला मुंबईत सरोगेट बेबी, मात्र परतीचा मार्ग अंधारात
२- भारतीय वंशाचा इंजिनीयर रिक्षा घेऊन पोहोचला इंग्लंडला
३- ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार
४- दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड
५- बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट
६- वर्षअखेरीस रशिया-पाकिस्तानचा संयुक्त युद्ध सराव
७- कधी होता मेकॅनिक, आज जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये आहेत 22 फ्लॅट
८- दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून होणार ई-टोलपास वितरण
१०- सामान्य पातळीहून कमी बरसला मान्सून, तूट ५ टक्के
११- ईदच्या दिवशी संचारबंदी, दगडफेक
१२- विधानसभेत झोपले आमदार रात्रभर
१३- सपामध्ये ‘गृहकलह’
१४- अर्थसंकल्पांच्या एकत्रीकरणामुळे रेल्वेचे वाचणार १0 हजार कोटी रुपये
१५- किंगफिशर व्हिला लिलावात
१६- झीरो बॅलन्स ‘जनधन बँक खाती’ कमी करा
१७- ब्रिटनच्या चलनात आल्या प्लॅस्टिक नोटा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- 'खडसेंची वाटचाल तपस्येकडून विरक्तीकडे', सामनातून खोचक टोलेबाजी
१९- खडसेंच्या लाल दिव्याच्या गाडीचे उत्तर फक्त मुख्यमंत्र्यांकडे - उद्धव ठाकरे
२०- मोर्चासाठी मराठा युवकांमध्ये तलवार कट ‘मिशी'ची क्रेझ
२१- प्रत्येक खेडेगाव होणार २०१८ अखेरीस डिजिटल
२२- मुंबई-बडोदा महामार्गाचे काम जानेवारीपासून सुरू
२३- येत्या ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !
२४- चाचणीचा मुहूर्त पुन्हा टळला
२५- टिळक टर्मिनसची जीवघेणी वाट
२६- सोसायटीचे इकोफ्रेंडली गणपती विसर्जन
२७- केईएमची ओपीडी एसी कंटेनरमध्ये
२८- विधि प्रवेशाची दुसरी यादी २० सप्टेंबरला
२९- खडसेंच्या लाल दिव्याच्या गाडीचे उत्तर फक्त मुख्यमंत्र्यांकडे - उद्धव ठाकरे
३०- अंधश्रद्धेतून चिमुकलीला चटके?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३१- चिपळूणमध्ये बाप्पांसमोर खऱ्याखुऱ्या उंदिरमामाचा डान्स
३२- महाड दुर्घटनेनंतर स्थानिकांना सावित्री नदीतील माशांची भीती
३३- माकडटोपी न दिल्याने नाशकात कैद्याकडून सहकैद्याची हत्या
३४- वसई भरदिवसा ज्वेलर्समध्ये चोरी, भिंतीला भगदाड पाडून शिरकाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३५- व्हायरल सत्य : रिंकू राजगुरुने शाळा सोडली!
३६- रिओ पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाला सुवर्ण
३७- रिओतील सुवर्णही अंध धावपटूंपुढे फिके
३८- विराटकडून बरेच काही शिकण्यासारखे : विल्यम्सन
३९- भारताला नमवणे आव्हानात्मक
४०- नदालकडून शिकण्यास मिळेल
४१- दिग्गजांना मागे टाकण्याची विराटला संधी
४२- इंडिया ब्लू संघाला ४७६ धावांची आघाडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=====================================

क्रिस आणि न्यूमेन या दाम्पत्याने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला होता. मात्र आता मुंबईमधून बाळ इंग्लंडला घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत.
क्रिस आणि न्यूमेन यांचा व्हिसा 7 ऑक्टोबरला संपणार आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्म झालेल्या लिलीसाठी 3 जून रोजीच पासपोर्टचा अर्ज करण्यात आला होता. मात्र 7 ऑक्टोबरपर्यंत तो मिळणं शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.
इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ब्रिटीश दुतावास पासपोर्टबाबत काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.
या मुलीसाठी क्रिस आणि न्यूमेन यांना भारतात स्थायिक व्हावं लागेल किंवा तिला अनाथालयात ठेवावं लागेल. सध्या या चिमुरडीचं भविष्य ब्रिटीश गृहमंत्रालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

माकडटोपी न दिल्याच्या रागातून सचिन चावरे नावाच्या कैद्याने तानाजी माने या कैद्याची हत्या केली. वादानंतर सचिन चावरेने 70 वर्षीय तानाजीला वीट फेकून मारली, यात त्याचा मृत्यू झाला.

पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 इव्हेंटमध्ये देवेंद्र झांझरियाने सुवर्णवेध घेतला. झाझरियाच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत 2 सुवर्ण पदक, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जमा झालं आहे.
विशेष म्हणजे झाझरियानं 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. 62.15 मीटर इतक्या विक्रमी थ्रोसह त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. यंदा स्वतःचाच विक्रम मोडित काढत 63.97 मीटरची विक्रमी नोंद केली. जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
35 वर्षीय देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे. देवेंद्र झाझरियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने तर 2012 मध्ये पद्मश्रीने गौरवलं आहे. हा सन्मान पटकावणारा तो पहिला पॅरालिम्पिकपटू आहे.

मुख्य नाक्यावर असलेलं चामुंडा ज्वेलर्स हे दहा दिवसांपूर्वीच सुरु झालं होतं. दुपारी दोन ते चारच्या सुमारास ज्वेलर्स मालक आपले दुकान बंद ठेवून जेवण्यासाठी घरी गेला असता. त्याची संधी साधून पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी बाजूच्या दुकानातील भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला.

व्हायरल सत्य : रिंकू राजगुरुने शाळा सोडली!
सोलापूर : सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु यंदा दहावीत शिकत आहे, मात्र आर्चीने आता शाळेलाच रामराम केला आहे. आर्चीने 30 जूनला शाळा सोडली आहे.
प्रचंड प्रसिद्धी आणि सध्या मिळत असलेली कामं, यामुळे आर्चीने शाळा सोडली आहे. रिंकूने 17 नंबरचा फॉर्म भरला असून, ती घरी अभ्यास करुन बाहेरून परीक्षा देणार आहे.
=====================================
चिपळूणमध्ये बाप्पांसमोर खऱ्याखुऱ्या उंदिरमामाचा डान्स
नवी मुंबई / रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातल्या अलोरे गावातल्या घटनेवर आपल्या कुणाचाही विश्वास बसणार नाही. राजू चिपळूणकर यांच्या बाप्पांसमोर चक्क उंदिरमामाने डान्स केला आहे.
चिपळूणकरांच्या घरी आलेला हा उंदीर पाळीव नाही. तरीही तो बाप्पांसमोर बिनधास्त बागडत आहेत. बाप्पांसमोर ठाण मांडलेल्या या उंदीरमामांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी रांग लागली. अनेक जण घरी येऊन बाप्पासोबतच उंदराचंही दर्शन घेऊ लागला.
=====================================
'खडसेंची वाटचाल तपस्येकडून विरक्तीकडे', सामनातून खोचक टोलेबाजी
मुंबई: ‘जे पेराल तेच उगवते याचा अनुभव सध्या खडसे घेत आहेत.’ अशा शब्दात सामनातून एकनाथ खडसेंच्या पक्ष हद्दपारीवर खोचक टोलेबाजी करण्यात आली आहे. ‘युती तोडल्याचा आनंद खडसेंनी घेतला. मात्र, त्यांच्या आनंदावर इतक्या लवकर विरजण पडेल असं वाटलं नव्हतं.’ शिवसेना-भाजपच्या युतीसाठी खडसे प्रतिकूल होते. त्यामुळे खडसेंच्या कृतीचं उट्टं सामनामधून काढण्यात आलं आहे.
दाऊद इब्राहिमशी संबंध, भोसरीतील एमआयडीसी जमीन प्रकरण अशा वादामुळे खडसेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. दरम्यान, ‘अविश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाली.’ अशी भावना खडसेंनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
=====================================
ब्रिटीश दाम्पत्याला मुंबईत सरोगेट बेबी, मात्र परतीचा मार्ग अंधारात
मुंबई : इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे. याचा फटका मुंबईत सरोगसीच्या माध्यमातून कन्याप्राप्त झालेल्या ब्रिटिश दाम्पत्याला बसला आहे.
क्रिस आणि न्यूमेन या दाम्पत्याने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला होता. मात्र आता मुंबईमधून बाळ इंग्लंडला घेऊन जाण्यात अडचणी येत आहेत.
क्रिस आणि न्यूमेन यांचा व्हिसा 7 ऑक्टोबरला संपणार आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्म झालेल्या लिलीसाठी 3 जून रोजीच पासपोर्टचा अर्ज करण्यात आला होता. मात्र 7 ऑक्टोबरपर्यंत तो मिळणं शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.
इंग्लंडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ब्रिटीश दुतावास पासपोर्टबाबत काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.
या मुलीसाठी क्रिस आणि न्यूमेन यांना भारतात स्थायिक व्हावं लागेल किंवा तिला अनाथालयात ठेवावं लागेल. सध्या या चिमुरडीचं भविष्य ब्रिटीश गृहमंत्रालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
=====================================
महाड दुर्घटनेनंतर स्थानिकांना सावित्री नदीतील माशांची भीती
रायगड : महाड तालुक्यातील आदिवासी मच्छीमारांनी सावित्री नदीतून पकडलेल्या माशांना स्थानिक खरेदी करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तहसीलदारांना पत्र लिहून याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. महाड दुर्घटनेमुळे हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.
मागच्याच महिन्यात महाडमधील सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्यामुळे दोन एसटी बससोबत अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या. यात जवळपास 42 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या नदीतील मासे खाणे अपशकुनी असल्याची भीती व्यक्त करत स्थानिकांनी माशांची खरेदी करणं बंद केलं आहे.
“आदिवासींच्या प्रतिनिधी मंडळाने आपली भेट घेऊन राज्य सरकारने या प्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. तसंच रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील मासे खाण्यासाठी सुरक्षित आहेत, पण स्थानिक ते खाण्यास तयार नसल्याने मच्छीमारांनी निवेदन सादर केलं आहे. पुढील कारवाईसाठी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे,” अशी माहिती महाडचे तहसिलदार औदुंबर पाटील यांनी दिली.
=====================================
माकडटोपी न दिल्याने नाशकात कैद्याकडून सहकैद्याची हत्या
नाशिक : तुरुंगात दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माकडटोपी न दिल्याच्या वादातून नाशकातील जेलमध्ये ही हत्या झाली.
माकडटोपी न दिल्याच्या रागातून सचिन चावरे नावाच्या कैद्याने तानाजी माने या कैद्याची हत्या केली. वादानंतर सचिन चावरेने 70 वर्षीय तानाजीला वीट फेकून मारली, यात त्याचा मृत्यू झाला.
नाशिकरोड जेलमध्ये ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मानेचा मृत्यू झाला. तानाजी माने हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, तर चावरे हा 5 महिन्याची शिक्षा भोगत होता. नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=====================================
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाला सुवर्ण
रिओ डि जनैरो : रिओ पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक गुड न्यूज आहे. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 इव्हेंटमध्ये देवेंद्र झांझरियाने सुवर्णवेध घेतला. झाझरियाच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत 2 सुवर्ण पदक, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जमा झालं आहे.
विशेष म्हणजे झाझरियानं 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. 62.15 मीटर इतक्या विक्रमी थ्रोसह त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. यंदा स्वतःचाच विक्रम मोडित काढत 63.97 मीटरची विक्रमी नोंद केली. जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
35 वर्षीय देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे. देवेंद्र झाझरियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने तर 2012 मध्ये पद्मश्रीने गौरवलं आहे. हा सन्मान पटकावणारा तो पहिला पॅरालिम्पिकपटू आहे.
=====================================
सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून होणार ई-टोलपास वितरण
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ईलेक्ट्रॉनिक टॅग वितरित करण्यासाठी सार्वजनिक बँकांची मदत घेणार आहे. ऑटोमॅटिक टोल पासची संख्या 50 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेऊन ही योजना बनवली जात आहे. या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीएफसी बँक आणि पेटीएमच्या माध्यमातून ई-टोलपास दिले जाणार आहेत.
“सर्व टोल प्लाझांसोबत सहज व्यवहार व्हावेत, हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या आम्ही आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून टोलपास वितरित करत आहोत. आतापर्यंत 60 हजार टोल पास टॅग्स वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी काही बँकांसोबत ईलेक्ट्रॉनिक वॉलेटचीही मदत घेतली जाणार आहे,” असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा यांनी सांगितलं.
देशभरातील 356 टोल प्लाझावर ईलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनची सुविधा देण्यात आली आहे. तसंच या योजनेत नव्याने सहभागी झालेल्या बँक आणि पेटीएमची प्रायोगिक तत्त्वावर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य सर्व्हरवर चाचणी सुरु आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत 50 टक्क्यांपर्यंत टोल कलेक्शन ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्याचं उद्दिष्ट आहे चंद्रा पुढे म्हणाले.
=====================================
वसई भरदिवसा ज्वेलर्समध्ये चोरी, भिंतीला भगदाड पाडून शिरकाव
वसई : वसईत चामुंडा ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 35 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत. विशेष म्हणजे दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरांनी ऐवज लांबवला.
नायगाव पूर्वेकडील वाकीपाडा परिसरात चामुंडा ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली. सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात वालिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झालं आहे.
मुख्य नाक्यावर असलेलं चामुंडा ज्वेलर्स हे दहा दिवसांपूर्वीच सुरु झालं होतं. दुपारी दोन ते चारच्या सुमारास ज्वेलर्स मालक आपले दुकान बंद ठेवून जेवण्यासाठी घरी गेला असता. त्याची संधी साधून पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी बाजूच्या दुकानातील भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला.
| Add caption |
No comments:
Post a Comment