अंतरराष्ट्रीय]
१- लॉस एंजिलिस; सेल्फी काढून शेअर करणे ठेवते सकारात्मक
२- पाकिस्तानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू तर 100 जखमी
३- हॅन्सी क्रोनिए सामनानिश्चिती प्रकरणी आरोपी संजीव चावला अटकेत
४- दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ३५० पाणघोड्यांचा बळी?
५- काश्मीरमध्ये नि:पक्ष मिशन पाठविणे भारताला अमान्य
६- सिंगापूरसह भारतातही मिळेल यूकेची पदवी
७- नाशिकच्या रमेश रासकरांचा अमेरिकेमध्ये 5 लाख डॉलर्सच्या पुरस्काराने गौरव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- मोदी सरकार दारिद्र्य रेषेखालील गरिबांची नवीन व्याख्या ठरवणार !
९- घाऊक महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
१०- २७ हजार कि.मी. इकॉनॉमिक कॉरिडॉर
११- रिलायन्स कम्युनिकेशन व एअरसेलच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब
१२- अर्थसंकल्पांच्या एकत्रीकरणामुळे रेल्वेचे वाचणार १0 हजार कोटी रुपये
१३- किंगफिशर व्हिला लिलावात
१४- झीरो बॅलन्स ‘जनधन बँक खाती’ कमी करा
१५- बरेली; मूल जन्माला आल्यास संगोपन कोण करणार ? बलात्कार पीडितेचा न्यायालयाला सवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत
१७- गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु
१८- पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन लवकर, मुक्कामही बारा दिवस
१९- नागपूर महाराष्ट्रातलं बिहार बनतंय?
२०- मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचं पालकत्व अमृता फडणवीसांकडे!
२१- चंडीगड; मंत्र्यांवर चप्पलफेक, अध्यक्षांच्या दिशेने कागदफेक आणि 12 विधेयकं मंजूर
२२- मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
२३- सेना-भाजपा वादाला नवी फोडणी
२४- पोलिसांचे गुड मॉर्निंग पथक
२५- रस्ते घोटाळ्यात आणखी अधिकारी
२६- म.रे.कडूनही आज रात्रभर लोकल सेवा
२७- आयएनएस मार्मागोवा जलावतरणासाठी सज्ज
२८- 32 दिवस आणि 10 हजार किमी प्रवास, लोकमत दिपोत्सवचा 'पाथ'दर्शी उपक्रम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२९- मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला!
३०- नागपूर; गणपतीच्या महाप्रसादाच्या भांड्यात पडून नागपुरात चिमुरडीचा मृत्यू
31- विसर्जनानिमित्त मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेवर विशेष लोकल
३२- मुंबई-पुण्यात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट
३३- पिंपरीमध्ये अंगावर गाडी घातल्याने पोलिसाचा मृत्यू
३४- शाहजहापूर; पत्नी सुंदर दिसू नये म्हणून चावलं नाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३५- हॅन्सी क्रोनिए सामनानिश्चिती प्रकरणी आरोपी संजीव चावला अटकेत
३६- न्यूझीलंड संघाचा कसून सराव
३७- न्यूझीलंड संघाचा कसून सराव
३८- भारताचे दुसरे ‘सुवर्ण यश’
३९- विराट प्रेरणादायी : लोकेश
४०- राफेल नदाल-मार्क लोपेझचा अनोखा सराव
४१- जीएमआर वरोराला ऊर्जा व्यवस्थापनेतील राष्ट्रीय पुरस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================

माहुले कुटुंबाकडून परिसरातल्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पासाठी महाप्रसाद देण्यात येणार होता. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात काळी डाळ बनवण्यात आली होती. अंगणात खेळणारी पाच वर्षांची प्रिया अचानक या पातेल्यात पडली.
तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आले, मात्र काळी डाळ चिकट असल्यानं ती हातातून सुटली आणि पातेल्यात पडली. मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही.

गणेश विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेवर चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल.
विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.

मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भाविकांचा काहीसा हिरमोड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना वरुणराजाला अश्रू अनावर झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे. तर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

2017 मध्ये शुक्रवारी 25 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे, तर 5 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी असेल. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.
पुढच्या वर्षी जेष्ठा गौरींचे आगमन पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवार 29 ऑगस्ट रोजी होणार असून गौरी गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे गुरुवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी असल्याने बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.

महामोर्चे हे उच्चभ्रू मराठ्यांचे नसून गरीब, उपेक्षित मराठा समाजाचे आहेत. ज्या व्यक्ती समाजामुळे मोठ्या झाल्या त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोर्चे काढण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नुसते मोर्चे काढून काहीही होणार नाही तर सरकारशी चर्चा करुन मागण्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणंही आवश्यक असल्याचं भय्यूजी महाराज यांनी म्हटलं आहे.

गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु
ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
—————
पुणे : दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरापासून पांरपरिक बँडसह वैभवशाली मिरवणूक निघणार आहे.
===========================================
मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला!
पावसाची जोरदार हजेरी
उस्मानाबाद: महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. कालपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसतो आहे.
उस्मानाबादेत 72 तासात तब्बल 85 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. आज पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काल पहाटेपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली होती. रात्री उशीरा रिमझिम पावसाला सुरुवाता झाली. त्यानंतर आज पहाटे पाच वाजेपासून मात्र मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान ईट परिसरात बारा तासात तब्बल 106 मिमी पावसाची नोंदा झाली आहे. रात्री 2 वाजेपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच तुळजापूरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे.
===========================================
गणपतीच्या महाप्रसादाच्या भांड्यात पडून नागपुरात चिमुरडीचा मृत्यू
नागपूर : गणपतीसाठी बनवलेल्या महाप्रसादाच्या भांड्यात पडल्यामुळे पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिला वाचवण्याची शर्थ करणाऱ्या तिच्या वडिलांचा आणि बहिणीचा हात जळून ते गंभीर जखमी झाले आहेत.
माहुले कुटुंबाकडून परिसरातल्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पासाठी महाप्रसाद देण्यात येणार होता. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात काळी डाळ बनवण्यात आली होती. अंगणात खेळणारी पाच वर्षांची प्रिया अचानक या पातेल्यात पडली.
तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आले, मात्र काळी डाळ चिकट असल्यानं ती हातातून सुटली आणि पातेल्यात पडली. मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही.
===========================================
विसर्जनानिमित्त मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेवर विशेष लोकल
फाईल फोटो
मुंबई : गणेश विसर्जनानिमित्त आज पश्चिम आणि मध्य रेल्वेवर विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. चर्चगेट-विरार मार्गावर या विशेष लोकलच्या 4 फेऱ्या चालवण्यात येतील, तर कल्याण/ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर 8 लोकल धावतील.
गणेश विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेवर चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल.
विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.
===========================================
मुंबई-पुण्यात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट
मुंबई : सर्वांचा लाडका गणपती बाप्पा दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज निरोप घेणार आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असताना सकाळपासूनच मुंबईत पाऊस पडत आहे.
मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. भाविकांचा काहीसा हिरमोड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पाला निरोप देताना वरुणराजाला अश्रू अनावर झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे. तर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
===========================================
पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन लवकर, मुक्कामही बारा दिवस
मुंबई : गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे. मात्र निरोप देताना बाप्पांनी भक्तांसाठी खुशखबर आणली आहे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर आगमन करणार आहेत.
2017 मध्ये शुक्रवारी 25 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे, तर 5 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी असेल. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.
पुढच्या वर्षी जेष्ठा गौरींचे आगमन पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवार 29 ऑगस्ट रोजी होणार असून गौरी गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे गुरुवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी असल्याने बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असणार आहे.
===========================================
मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत
नाशिक : मराठा समाजाचे मोर्चे आत्मसन्मासाठी असून इतर समाजानं या मोर्चामुळे असुरक्षित समजण्याचं कारण नाही, असं मत भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, असंही ते म्हणाले.
महामोर्चे हे उच्चभ्रू मराठ्यांचे नसून गरीब, उपेक्षित मराठा समाजाचे आहेत. ज्या व्यक्ती समाजामुळे मोठ्या झाल्या त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोर्चे काढण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नुसते मोर्चे काढून काहीही होणार नाही तर सरकारशी चर्चा करुन मागण्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणंही आवश्यक असल्याचं भय्यूजी महाराज यांनी म्हटलं आहे.
===========================================
पिंपरीमध्ये अंगावर गाडी घातल्याने पोलिसाचा मृत्यू
पुणे : पिंपरी परिसरात दुचाकी अंगावर घातल्याने भोसरी एमआयडीसीचे एएसआय सुरेश चपटे यांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वारांना पकडण्याचा प्रयत्न करताना त्यांच्याकडून चपटेंच्या अंगावर दुचाकी घालण्यात आली होती.
पिंपरी परिसरात रविवारी संध्याकाळी तिघे जण दुचाकीवरुन जात असताना एएसआय सुरेश चपटेंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीस्वारांनी पळून जात एएसआय सुरेश चपटे यांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. तसंच त्यांच्या डोक्याला आणि नाकालाही मार लागला होता.
जखमी एएसआय यांच्यावर उपचार सुरु होते, पण झालेल्या अपघातातून न सावरलेल्या सुरेश चपटे यांना रात्री दोनदा झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या तिघांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली होती ते फरार झाले आहेत.
पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना गाडी अडवल्यामुळे मारहाण झाली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
===========================================
सेल्फी काढून शेअर करणे ठेवते सकारात्मक
लॉस एंजिलिस : स्मार्टफोनवर सेल्फी काढून इतरांसोबत शेअर करणे आपल्याला आनंदी बनवू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने सेल्फी काढून इतरांसोबत शेअर करणे आपल्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतं असं या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.
या संशोधनात 28 मुली आणि 13 मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांच्या दिवसभरातील वर्गातील, कॉलेजमधील आणि मित्रांसोबत फिरतानाच्या नोंदी ठेवण्यात आल्या. 41 मुलांवर 4 आठवडे हा अभ्यास करण्यात आला.
“स्मार्टफोनवरुन सेल्फी घेणे आणि शेअर करण्याने सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते, असं आमच्या संशोधनातून समोर येतं,” असं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे पोस्ट डॉक्टरेट आणि लेखक यू चेन यांनी स्पष्ट केलं आहे.
या संशोधनादरम्यान सेल्फी घेण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या अॅपचा वापर करण्यात आला होता. या अॅपच्या माध्यमातून मानसिक स्थितीबद्दलही माहिती संकलीत करता येते. या संशोधनामुळे सेल्फी काढून शेअर करणे आपल्याला आनंदी ठेवते अशी माहिती समोर आली आहे.
===========================================
नागपूर महाराष्ट्रातलं बिहार बनतंय?
नागपूर : नागपूर… मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची धुरा संभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं शहर. मात्र याच नागपूरची तुलना आता बिहारशी केली जात आहे. कारण नागपुरातील चिरकुट गुंडही खिशात गावठी कट्टा घेऊन फिरतो आणि वाटेल त्यावर गोळीबार करतो.
6 सप्टेंबरला ऍक्टिव्हावरुन आलेल्या हल्लेखोराने एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच, 12 सप्टेंबरला यासिन कुरेशी नावाच्या इसमावर गोळीबार झाला. आठवडाभरात दोन गोळीबाराच्या घटनांमुळे, नागपुरातील अवैध शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपुरात नोंदणीकृत पिस्तुलांची संख्या 2 हजार 5 इतकी आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात 5 हजार अवैध शस्त्र दाखल झाली आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश आणि उत्तरेकडच्या राज्यातून आलेल्या गावठी कट्ट्यांचा समावेश जास्त आहे.
===========================================
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचं पालकत्व अमृता फडणवीसांकडे!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पतीच्या खांद्यावरील काही भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावाचं पालकत्व अमृता फडणवीस यांनी स्वत:कडे घेतलं आहे.
अमृता फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी फेटरी गावाला भेट दिली. गावातील लोकांशी आणि सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गावाच्या गरजा जाणून घेतल्या आणि लवकरच या गावाचा आदर्श गाव बनवू असा निर्धारही व्यक्त केला.
===========================================
मंत्र्यांवर चप्पलफेक, अध्यक्षांच्या दिशेने कागदफेक आणि 12 विधेयकं मंजूर
चंदीगड : पंजाब विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदार तरलोचन सिंह यांनी चक्क सत्ताधारी बाकांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल पंजाबचे महसूल मंत्री विक्रम सिंह मजिठिया यांच्या पोटाला लागली.
या प्रकारावेळी विरोधी बाकांवरील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कॅगच्या अहवालाचे कागद फेकत होते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. याच गोंधळात सत्ताधारी पक्षाकडून एकूण 12 विधेयकं मंजूर करुन घेतली.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला. या घटनेनंतर सभागृहात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. संतप्त सदस्य सभागृह अध्यक्षांच्या स्थानापर्यंत पोहोचणार नाहीत, यासाठी त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांनी कडं तयार केल होतं.
===========================================
मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील
शिर्डीः राज्यभरात निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चांना जाहीर पाठिंबा आहे. अहमदनगरच्या मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार आहोत, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांच्या मोर्चांना पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या मराठा नेत्यांच्या बैठकीवरही विखे पाटलांनी टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य योग्य- विखे पाटील
मराठा समाजाची भूमिका योग्य आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून बैठका घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचं राजकारण केलं जात असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. “मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, असे मोर्चे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक होतील. मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरु आहे”, असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संघावर निशाणा साधला होता.
===========================================
मूल जन्माला आल्यास संगोपन कोण करणार ? बलात्कार पीडितेचा न्यायालयाला सवाल
- ऑनलाइन लोकमतबरेली, दि. 15 - अल्पवयीन बलात्कार पीडित तरुणीसमोर आपण मुलाला जन्म दिल्यास त्याचं संगोपन कसं करावं हा सवाल उभा आहे. कारण गर्भपात करण्यासाठी तिने मागितलेली परवानगी न्यायालयाने फेटाळली आहे. पीडित तरुणी 33 आठवड्यांची गर्भवती असल्याने मेडिकल पॅनलने याचिका फेटाळत गर्भपताला परवानगी देण्यास नकार दिला आहे. आपला निर्णय देण्यासाठी न्यायालयाने एक आठवड्याचा कालावधी घेतला. पीडित तरुणीने उच्च न्यायालयात पुन्हा एकदा दाद मागण्याचं ठरवलं असून या मुलाचं संगोपन करणार कोण ? हा सवाल याचिकेद्वारे करणार आहे.'यंत्रणेविरोधात माझी लढाई मी हारत असल्याचं दिसत आहे कारण ते समजूनही घेत नाही आहेत आणि संवेदनशीलदेखील नाही आहेत,' अशी प्रतिक्रिया हतबल झालेल्या या पीडित तरुणीने दिली आहे. 26 जुलै रोजी या तरुणीने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका केली होती. तेव्हा ती 26 आठवड्यांची गर्भवती होती. न्यायालयाने याचिका रद्द केली होता तेव्हा कुटुंबाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.'मुलाचं संगोपन करण्याच्या परिस्थितीत मी नाही. आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि हे मूल मला सारखं माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या काळ्या दिवसाची आठवण करुन देईल ज्याची मला सतत लाज वाटेल,' असं पीडित तरुणीचं म्हणणं आहे.
===========================================
शाहजहापूर; पत्नी सुंदर दिसू नये म्हणून चावलं नाक
- ऑनलाइन लोकमतशाहजहापूर (उत्तरप्रदेश), दि. 15 - आपली पत्नी सुंदर दिसू नये म्हणून विकृत पतीने तिचं नाक चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजीव राठोड असं या आरोपी पतीचं नाव आहे. आपल्या पत्नीचं अफेअर असल्याचा संशय संजीवला होता. या संशयातूनच त्याने हे विकृत कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. संजीव आणि कमलेश यांचं सात वर्षापुर्वी लग्न झालं होतं.नरोथा हंसराम या गावातील ही घटना आहे. या दांपत्याला 6 वर्षाची मुलगीदेखील आहे. संजीव खूप रागिष्ट स्वभावाचा असल्याचं शेजा-यांनी सांगितलं आहे. बुधवारी सकाळी कलमेश फोनवर कोणाशी तरी बोलत होती, हे पाहून संजीवचा राग अनावर झाला. दोघांमध्ये मोठं भांडणदेखील झालं. त्याचवेळी त्याने कमलेशचं नाक चावलं अशी माहिती शेजा-याने दिली आहे. संजीव दारुच्या नशेत होता असंही शेजा-याने सांगितलं आहे.घटनेनंतर कमलेशच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. आरोपी पती संजीव फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
- ---------------------------------------------------------------
पाकिस्तानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू तर 100 जखमी
- ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 15 - मुलतानमध्ये ट्रेनचा भीषण अपघात झाला असून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कराचीला जाणा-या आवाम एक्स्पेसची मालगाडीला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रेन रुळावरुनच घसरली. ट्रेनमधील चार डबे प्रवाशांनी भरले होते.मिळालेल्या माहितीनुसार मालगाडीच्या खाली एक व्यक्ती आली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ही मालगाडी थांबली होती. त्याचवेळी आवाम एक्स्प्रेस पेशावरहून कराचीच्या दिशेने चालली होती. शेर शहा परिसरातील बुच्छ रेल्वे स्थानकावर आवाम एक्स्प्रेस पोहोचली असता तिने मालगाडीला धडक दिली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी आहेत. यामधील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.
- =============================================
No comments:
Post a Comment