[अंतरराष्ट्रीय]
१- अॅमेझॉनचे 10,000 नवे स्टोअर्स सुरु
२- भारताच्या बलुचिस्तानच्या भुमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?
३- अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी
४- दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र
५- ‘हिलरींची सुरक्षा काढा’
६- मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार
७- माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही
८- न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला
१०- बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
११- जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
१२- HDFC, फेडरल, DBS बँक ग्राहकांना ATM पिन बदलण्याची सूचना
१३- जेटलींपेक्षा मी उत्तम अर्थमंत्री बनू शकतो, सुब्रमण्यम स्वामींचा दावा
१४- १७ जवान शहिद तर चार पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी
१५- जनधन खात्यांतील रकमांची चौकशी सुरू
१६- दूरसंचार क्षेत्रातील दरयुद्ध ग्राहकहिताचे
१७- भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
१८- सेन्सेक्स एक आठवड्याच्या उच्चांकावर
१९- हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप
२०- मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
२१- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२२- वायफळ भांडणापेक्षा पाण्यासाठी भांडा, मकरंद अनासपुरेंचा सल्ला
२३- नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे विराट मूकमोर्चा
२४- छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जे. जे. रुग्णालयात दाखल
२५- मुंबईत झोपडपट्टींपेक्षा इमारतींमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जास्त
२६- विकलांग मूल असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 730 दिवसांची विशेष रजा
२७- अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
२८- ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
२९- आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
३०- एमपीएससी अध्यक्षांविरुद्ध गंभीर तक्रारी
३१- पोलिसांवरील हल्ले गंभीरच - हायकोर्ट
३२- मच्छिमार बोट समुद्रात बुडाली, १४ जणांना वाचवण्यात यश
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३३- साकीनाका स्टेशनवर मेट्रोखाली प्रवाशाची आत्महत्या, ट्रेनचा खोळंबा
३४- रायगड; घरात शिरलेलं पाणी उपसताना दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू
३५- नागपुरात तरुणाची हत्या, 24 तासातली खुनाची चौथी घटना
३६- गडचिरोलीत दारु समजून अॅसिड प्यायल्याने दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३७- नील-स्वानंदीचा अलविदा, लवकरच नवी मालिका
३८- दिग्दर्शकाने या अभिनेत्रीकडे एक रात्र काढण्याची केली होती मागणी
३९- प्रख्यात व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं मुंबईत निधन
४०- विराट कोहली १६ वर्ष ज्या बँकेचा ग्राहक होता आज त्याच बँकेचा ब्रँड अँबेसेडर
४१- ५०० वी कसोटी; ५०० पदार्थ!
४२- दुखापतीमुळे साऊदी कसोटी मालिकेतून ‘आऊट’
४३- दीपाचे मायदेशात जोरदार स्वागत
४४- भारत ‘अ’ संघ अडचणीत
४५- नमस्कारासाठी चमत्कार करावा लागतो
४६- कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला धक्का
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================

विशेष म्हणजे, अनासपुरे यांनी हे विधान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोरच केलं. यालाच उत्तर देताना सुभाष देशमुख यांनी मराठवाड्यातील जनतेलाच दोषी मानत, तेच कुठं तरी कमी पडत असल्याचा दाखला दिला आणि इस्रायलचं उदाहरण दिलं.

नंदू होनप शनिवारी मुंबईत एका संगीत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी होनप यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलं होतं. गायक अजित कडकडे यांच्या आवाजातलं ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणं होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

शनिवारीच हिंगोलीत मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भव्य जनसमुदाय जिल्हा परिषदेच्या मैदानावर दाखल झाला होता. हिंगोलीतील मोर्चाला दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक जण मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते.

मुसळधार पावसामुळे नारंगीकर दाम्पत्याच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं होतं. हे पाणी काढताना शॉक लागल्यानंच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शनिवारी दुपारी रामकृष्ण नारंगीकर यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून न आल्यानं शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना दोघेही जण पाण्यात पडलेले आढळून आले. दरम्यान रुग्णालयात नेलं असता नारंगीकर दाम्पत्याला मृत घोषित करण्यात आलं.

नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारात एका तरुणाचा मृतदेह सापडला. या तरुणाची हत्या करुन त्याला फेकून देण्यात आलं आहे. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यातली ही चौथी हत्या आहे. खापा गावात 20 वर्षीय नामदेव पवारची हत्या झाली होती. तर सुभाषनगर भागात रोहित हातीबेंड या 25 वर्षीय युवकाची भोसकुन हत्या झाली होती.

जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे 17 जवान शहीद झाले आहेत.
उरीमधील हल्ला अत्यंत भ्याड, दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उरी हल्ल्याचा तीव्र निषेध
===========================================
वायफळ भांडणापेक्षा पाण्यासाठी भांडा, मकरंद अनासपुरेंचा सल्ला
पिंपरी-चिंचवड : मराठवाड्यातल्या राजकारण्यांनी वायफळ भांडण्यापेक्षा पाण्यासाठी भांडावं, लोकांच्या संयमाचा फायदा घेऊ नये, असा सल्ला प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला आहे.
‘वर्षभर रिकामं राजकारण करण्यापेक्षा मराठवाड्यातील नेत्यांनी पाण्यासाठी भांडावं. आम्ही सहनशील आहोत, याचा फायदा घेऊ नये’ असा सल्ला वजा इशारा अनासपुरे यांनी दिला.
मितभाषी आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा कलाकार म्हणून ओळख असणाऱ्या मकरंद अनापुरे यांनी राजकारण्यांच्या निष्क्रीयतेवर पहिल्यांदाच बोट ठेवलं आहे. शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा मुक्तीदिन संग्रामानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विशेष म्हणजे, अनासपुरे यांनी हे विधान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोरच केलं. यालाच उत्तर देताना सुभाष देशमुख यांनी मराठवाड्यातील जनतेलाच दोषी मानत, तेच कुठं तरी कमी पडत असल्याचा दाखला दिला आणि इस्रायलचं उदाहरण दिलं.
===========================================
साकीनाका स्टेशनवर मेट्रोखाली प्रवाशाची आत्महत्या, ट्रेनचा खोळंबा
मुंबई : मुंबई मेट्रोची सेवा सकाळी काही काळ विस्कळीत झाली होती. साकीनाका मेट्रो स्थानकावर एका तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्यामुळे सेवा विस्कळीत झाली होती. तासभरापासून खोळंबलेल्या मेट्रोमुळे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती.
रविवारी सकाळी 9.20 मिनिटांनी उदय मिश्रा नामक 25 वर्षीय तरुणाने वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली उडी मारुन आयुष्य संपवलं. त्यामुळे ही सेवा काही काळ विस्कळीत झाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो मरोळ नाका स्टेशनपर्यंतच चालवल्या जात होत्या. मात्र दीड तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. एकीकडे मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक असतानाच मेट्रोही रखडल्याने प्रवाशांचा संताप व्यक्त होत आहे.
===========================================
नील-स्वानंदीचा अलविदा, लवकरच नवी मालिका
मुंबई : ‘एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू’ म्हणत खोटारडेपणाचे धडे गिरवणाऱ्या ललिता जहागिरदारची सद्दी लवकरच संपणार आहे. झी मराठी वाहिनीवर नील आणि स्वानंदी या जोडीची गाजलेली ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका येत्या महिनाअखेर निरोप घेणार असून नवी मालिका लवकरच रुजू होणार आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ असं नव्या मालिकेचं शीर्षक असून 3 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता या मालिकेचं प्रक्षेपण होणार आहे. दोन नवे चेहरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सुहास परांजपे, ऋतुजा बागवे, चिन्मय उद्गीरकर यांच्या मुख्य भूमिका असलेली नांदा सौख्यभरे ही मालिका गेल्या वर्षी सुरु झाली होती. सासू-सूनेच्या टिपीकल नात्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
===========================================
प्रख्यात व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं मुंबईत निधन
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन झालं आहे. अचानक छातीत दुखू लागल्यानंतर होनप यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नंदू होनप यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नंदू होनप शनिवारी मुंबईत एका संगीत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी होनप यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलं होतं. गायक अजित कडकडे यांच्या आवाजातलं ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणं होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.
===========================================
नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे मूकमोर्चाचं आयोजन
नांदेड : नांदेडमध्येही कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज मराठा समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता सुरु होणाऱ्या या मोर्चाला नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. तरुणी, महिला, विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे.
शनिवारीच हिंगोलीत मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भव्य जनसमुदाय जिल्हा परिषदेच्या मैदानावर दाखल झाला होता. हिंगोलीतील मोर्चाला दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक जण मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते.
अॅमेझॉनचे 10,000 नवे स्टोअर्स सुरु
नवी दिल्ली: ई-कॉमर्स क्षेत्रातली नामांकित कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपला विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टनुसार अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच कंपनीने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून 10,000 नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.
रिपोर्टमधील माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अॅमेझॉन इंडियाची फ्लिपकार्ट ( त्याची सहय्योदी कंपनी मित्राला सोडून)च्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे. त्यामुळे 2019पर्यंत अॅमेझॉन इंडियाचा विस्तार 37%नी वाढ होण्याची शक्यता रिपोर्टमधून व्यक्त केली जात आहे.
या रिपोर्टनुसार, अॅमेझॉनला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे त्याचा सर्वाधिक फटका स्नॅपडील आणि इतर छोट्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीना होणार आहे. या रिपोर्टमध्ये फ्लिपकार्ट आपले अव्वल स्थान कायम राखेल असेही म्हटले आहे.
याशिवाय आगामी सणासुदीच्या काळानिमित्त आपली धोरणे निश्चित केली असून amazon.com ने आपल्या ‘आय हॅव स्पेस’ कार्यक्रमासाठी 10,000 नवे स्टोअरस सुरु केले आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून कंपनी आपली वितरण व्यवस्था अधिकच मजबूत करत आहे. या संख्येमुळे अॅमेझॉनच्या भारतातील एकूण स्टोअर्सची संख्या 12,500पर्यंत पोहचली आहे.
===========================================

गेल्या काही दिवसात केरळमध्ये ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून बँकेनं ग्राहकांना एटीएम पीन बदलण्याची सूचना केली आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकांचा डेटा चोरीला गेल्याची भीती वर्तवली जात आहे. बँकांकडून याचा इन्कार करण्यात आला असला तरी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकेनं अशा प्रकारे ग्राहकांना एटीएम बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय तुमचा एटीएम पीन बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
HDFC, फेडरल, DBS बँक ग्राहकांना ATM पिन बदलण्याची सूचना
मुंबई : तुमच्या बँकेनं तुम्हाला एटीएम कार्डचा पीन बदलण्यास सांगितलं असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तातडीनं तुम्ही एटीएमचा पीन चेंज करा. तसं करणं तुमच्या बँकिंग व्यवहारांच्या दृष्टीने सुरक्षिततेचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात केरळमध्ये ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून बँकेनं ग्राहकांना एटीएम पीन बदलण्याची सूचना केली आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकांचा डेटा चोरीला गेल्याची भीती वर्तवली जात आहे. बँकांकडून याचा इन्कार करण्यात आला असला तरी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकेनं अशा प्रकारे ग्राहकांना एटीएम बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय तुमचा एटीएम पीन बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
===========================================
घरात शिरलेलं पाणी उपसताना दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू
रायगड : घरात शिरलेलं पाणी उपसताना शॉक लागून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील चिरनेर गावात एका दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे नारंगीकर दाम्पत्याच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं होतं. हे पाणी काढताना शॉक लागल्यानंच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शनिवारी दुपारी रामकृष्ण नारंगीकर यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून न आल्यानं शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना दोघेही जण पाण्यात पडलेले आढळून आले. दरम्यान रुग्णालयात नेलं असता नारंगीकर दाम्पत्याला मृत घोषित करण्यात आलं.
===========================================
नागपुरात तरुणाची हत्या, 24 तासातली खुनाची चौथी घटना
नागपूर : नागपुरात गेल्या 24 तासात घडलेल्या चौथ्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारात एका तरुणाचा मृतदेह सकाळी सापडला आहे. हत्येचं कारण आणि युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारात एका तरुणाचा मृतदेह सापडला. या तरुणाची हत्या करुन त्याला फेकून देण्यात आलं आहे. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यातली ही चौथी हत्या आहे. खापा गावात 20 वर्षीय नामदेव पवारची हत्या झाली होती. तर सुभाषनगर भागात रोहित हातीबेंड या 25 वर्षीय युवकाची भोसकुन हत्या झाली होती.
===========================================
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जे. जे. रुग्णालयात दाखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भुजबळ आर्थर रोड जेलमध्ये आहेत.
15 सप्टेंबरपासून भुजबळांना प्रचंड ताप असून, त्याचं संपूर्ण अंग दुखतं आहे. मदतीशिवाय भुजबळांना दोन पावलेही चालता येत नसल्याची माहिती मिळते आहे.
प्लेटलेट्स कमी झाल्या असून, ब्लडप्रेशर 104/55 इतकं आहे. प्रचंड दम लागणे, झोप न लागणे, छातीत कळ येणे असेही त्रास भुजबळांना होत आहेत.
दरम्यान, जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन भुजबळांची तपासणी केली आणि रुग्णालयात अॅडमिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
===========================================
जेटलींपेक्षा मी उत्तम अर्थमंत्री बनू शकतो, सुब्रमण्यम स्वामींचा दावा
नवी दिल्ली : मी अरुण जेटलींपेक्षा उत्तम अर्थमंत्री बनू शकतो असा विश्वास भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. मी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि ते वकील, मग ते माझ्यापेक्षा उत्कृष्ट कसे असू शकतील असा सवाल त्यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही महिन्यात जेटली आणि स्वामींमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यावर बोलताना उत्तरेचे ब्राह्मण आणि दक्षिणेचे ब्राम्हण यांच्यात फार पूर्वीपासून वैर असल्याचा टोला त्यांनी लगावला.
तुमच्या बोलण्यावर भाजपनं बंधनं घातलीयेत का या प्रश्नावर तुम्ही माझ्यापेक्षा जेटलींशीच जास्त बोलता ही खरी समस्या असल्याचं उत्तर त्यांनी दिलं.
===========================================
मुंबईत झोपडपट्टींपेक्षा इमारतींमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जास्त
फोटो सौजन्य : संदीप रामदासी
मुंबई : मुंबईत झोपडपट्टींपेक्षा इमारतींच्या परिसरात डेंग्यू पसरविणा-या डासांची उत्पत्तीस्थाने चौपट असल्याचे महापालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. महापालिकेकडून डासांच्या उत्पत्तीस्थानांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीच्या तापाने नागरिक आजारी पडू लागले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फिव्हरमुळे जवळपास 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल आहे.
मुंबई महापालिकेने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 74 लाख 78 हजार 556 घरांची संयुक्त तपासणी केली. या तपासणी दरम्यान झोपडपट्टी परिसरात ‘एडिस एजिप्ताय’ डासांची 1 हजार 828 उप्तत्तीस्थाने आढळून आली आहेत. तर इमारतींच्या परिसरात 7 हजार 118 उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. म्हणजेच झोपडपट्टी परिसरांच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात सुमारे ‘एडिस एजिप्ताय’ डासांची उत्पत्तीस्थाने तब्बल चार पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे.
विकलांग मूल असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 730 दिवसांची विशेष रजा
मुंबई : विकलांग मूल असलेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आणि काही विशेष प्रकरणात पुरुष कर्मचाऱ्यांना 730 दिवसांची विशेष बालसंगोपन रजा लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विकलांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास आणि असे मूल असून पत्नी हयात नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच मुलाच्या वडिलांना संपूर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बालसंगोपन रजा मिळू शकणार आहे.
पूर्णत: अंध, अल्पदृष्टी, कृष्ठरोगमुक्त, कर्णबधीर, अस्थीव्यंगामुळे आलेली चलनवलन विकलांगता, मतिमंदत्व आणि मानसिक आजार असलेले मूल या प्रकारातील अपत्याचे मातापिता या सवलतीस पात्र ठरू शकतील. या सवलतीसाठी अपत्याची विकलांगता याबाबतच्या अधिनियमातील विकलांगतेच्या व्याख्येनुसार असणे आवश्यक आहे. यासोबतच आत्ममग्न (ऑटीझम), सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, बहुविकलांग आणि गंभीर स्वरुपाची विकलांगता असलेल्या मुलाचे माता-पिता या सवलतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.
या सवलतीसाठी अपत्याचे वय 22 वर्षांहून कमी असणे आवश्यक असून पहिल्या 2 हयात अपत्यांसाठी ती लागू राहील. विशेष बालसंगोपन रजा एकाहून अधिक हप्त्यांमध्ये तथापि, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तीन वेळा अशा मर्यादेत घेण्यात येईल. परिविक्षाधीन कालावधीत विशेष बालसंगोपन रजा दिली जाणार नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येऊ शकेल.
===========================================
गडचिरोलीत दारु समजून अॅसिड प्यायल्याने दोघांचा मृत्यू
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अॅसिड प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. टेकडा गावात नवा पंडूम सण साजरा करण्यात आला. यावेळी ही घटना घडली.
कमली लालसू वड्डे (23) व गोंगलू पुसू नरोटी (70) या दोघांनी मोहाची दारु समजून अॅसिड प्राशन केले. कमली वड्डे या महिलेने गोंगलू पुसू नरोटी याला तिच्या घरी दारू पिण्यासाठी बोलविले होते. सदर महिलेने घरात असलेल्या अँसिडच्या बाटल्या काढल्या व प्रथम तिने स्वत: त्या बाटलीतील अँसिड दारू समजून प्राशन केले. त्यानंतर त्याच बाटलीतील अँसिड गोंगलू पुसू नरोटी यालाही पिण्यास दिले.
दोघांनी मिळून अँसिड पूर्णपणे संपविले. त्यानंतर थोड्याच वेळात कमली वड्डे ही मृत्यूमुखी पडली. कमली यांना पाच महिन्याचा एक मुलगा आहे. तर गोंगलूला विषबाधा झाली म्हणून कुटुंबीयांनी लोकबिरादरी रूग्णालय हेमलकसा येथे दाखल केले. त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. त्याचाही मृत्यू झाला.
१७ जवान शहिद तर चार पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी
- काश्मीर, दि. १८ : बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवाद्याच्या हल्लात १७ जवान शहीद झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे समजते. लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयाच्या जवळ सैनाकांनी घेराव घातला आहे. लष्काराच्या मदतीसाठी पॅराकंमाडोंना पाचारण करण्यात आलं होतं.बारामुल्ला येथील सीमेला लागून असलेल्या भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवादयांने आत्मघातकी हल्ला केला. लष्कराचे उरी येथील ब्रिगेड मुख्यालय भारत-पाक सीमेला लागून आहे. पहाटे साडे पाच वाजता दहशतवाद्यांने हा भीषण हल्ला केल्याची माहीती पोलिसांनी दिली. पहाटे झालेल्या गोळाबार आणि स्फोटाच्या आवाजानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. घटनास्थाळावर मदतीसाठी जवानांचे स्पेशल पथक पाठवण्यात आले आहे.चार दहशतवादी मुख्यालयात घुसले होते. दहशतवादयांनी मुख्यालयाच्या आत प्रवेश केल्यावर दोन - दोनच्या गटात वेगळे झाले आणि त्यांनी मुख्यालयावर अंधाधूंद गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रतिउत्तर देताना चारही दहशताद्यांना कंठस्थान घातले आहे. यमसदनी पाठवलेले चारही दहशतवादी पाकिस्थानातील असल्याचे वृत्त समोर आले आहे. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरले आहे.
===========================================
दिग्दर्शकाने या अभिनेत्रीकडे एक रात्र काढण्याची केली होती मागणी
- नवी दिल्ली, दि. १८ : अभिनेत्री सुर्विन चावलाने आपल्या स्ट्रगलच्या काळातील एक सनसनाटी खुलासा केला आहे. 'हेट स्टोरी २' मध्ये इंटीमेट सीन्स केलेल्या सुर्विनला एका दिग्दर्शकाने आपल्या सोबत रात्र काढण्याची मागणी केली होती. ती कास्टींग काऊचची शिकार झाली होती. मात्र हा प्रकार तमिळ फिल्मसाठी घडल्याचे तिने सांगितले.सध्या सुरवीन चावला अजय देवगण निर्मित आणि लीना यादव हिच्या 'पार्श' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये सुर्विनची महत्वाची भूमिका आहे. प्रमोशनसाठी आलेल्या सुर्विनने कास्टींग काऊच झाल्याचा खुलासा केला. आयुष्यातील काही कटू सत्याचा उलगडा तिने यावेळी केला. दिग्दर्शकाने तिला कसे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही खुलासा तिने केला.तमिळ चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली होती. त्यानंतर तिची निवडही करण्यात आली. चित्रपट मोठा असल्यामुळे सुर्विन खूश झाली. दिग्दर्शकाला हिंदी बोलता येत नव्हते. आपल्यासोबत रुममध्ये राहण्यास येण्याचा निरोप त्याने आपल्या मित्राकडून पाठवला होता.जर तिला या चित्रपटात काम करायचे असेल तर दिग्दर्शकासोबत रुममध्ये एकत्र राहणे आवश्यक असल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. असे जर केले नाही तर चित्रपटात भूमिका मिळणार नसल्याचे तो म्हणाला. असली ऑफर धुडकावून लावल्याचे सुर्विनने सांगितले. तिची स्क्रिनवर ज्याप्रकारची प्रतिमा तयार झाली आहे त्यामुळे लोकांना हे सोपे असल्याचे वाटते. 'हेट स्टोरी २' मध्ये भूमिका केल्यापासून तिला अनेक बोल्ड आणि सेक्सी भूमिकांसाठी ऑफर येत असल्याचेही सुर्विन म्हणाली.
===========================================
No comments:
Post a Comment