[अंतरराष्ट्रीय]
१- भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान
२- भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं
३- मोदी यांचे ते विधान प्रक्षोभक - पाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बीग बी आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानात सहभागी
५- राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकला
६- उरी घटना प्रचंड दु:ख देणारी: विराट कोहली
७- सीमेवर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, दहशतवादी लपल्याची शक्यता
८- 2008 मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहित सुटणार?
९- आरक्षणासाठी मुस्लीम समाजानेही मोर्चे काढावेत : अबू आझमी
१०- कामगार कायदयांत होणार मोठे बदल
११- अमेरिकन व्याजदर, परकीय वित्तसंस्थांनी तारले
१२- पैशाचे प्रेम आणि आयकराची भीती!
१३- सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- औरंगाबाद; शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण
१५- भुजबळ समर्थनार्थ मोर्चा लोकशाहीविरोधी, प्रशांत बंब विरोधात
१६- मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण
१८- यवतमाळमध्ये कुलरमधून वीजेचा धक्का, मायलेकीचा मृत्यू
१९- अमरावती; तरुण अभियंत्याच्या हातात तराजू, नवी कल्पना, भरघोस उत्पन्न
२०- मंगळुरू; सुट्ट्या पैशांवरून झाली बाचाबाची, बस कंडक्टरने चालत्या बसमधून मारली उडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- अश्विन 'अनमोल' क्रिकेटर आहे: विराट
२२- रेल्वे प्रवासात अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली
२३- अभिनेत्री सुष्मिता सेनला बीएमसीची नोटीस
२४- ५००व्या कसोटीत भारताचा न्युझीलंडवर १९७ धावांनी विजय
२५- विश्वजीत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी निवड
२६- खेळाडू - प्रशिक्षकांसाठी ‘अॅप’ तयार करणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=======================================











१- भारत युद्ध करणार नाही - पाकिस्तान
२- भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं
३- मोदी यांचे ते विधान प्रक्षोभक - पाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बीग बी आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानात सहभागी
५- राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकला
६- उरी घटना प्रचंड दु:ख देणारी: विराट कोहली
७- सीमेवर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, दहशतवादी लपल्याची शक्यता
८- 2008 मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहित सुटणार?
९- आरक्षणासाठी मुस्लीम समाजानेही मोर्चे काढावेत : अबू आझमी
१०- कामगार कायदयांत होणार मोठे बदल
११- अमेरिकन व्याजदर, परकीय वित्तसंस्थांनी तारले
१२- पैशाचे प्रेम आणि आयकराची भीती!
१३- सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- औरंगाबाद; शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण
१५- भुजबळ समर्थनार्थ मोर्चा लोकशाहीविरोधी, प्रशांत बंब विरोधात
१६- मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण
१८- यवतमाळमध्ये कुलरमधून वीजेचा धक्का, मायलेकीचा मृत्यू
१९- अमरावती; तरुण अभियंत्याच्या हातात तराजू, नवी कल्पना, भरघोस उत्पन्न
२०- मंगळुरू; सुट्ट्या पैशांवरून झाली बाचाबाची, बस कंडक्टरने चालत्या बसमधून मारली उडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- अश्विन 'अनमोल' क्रिकेटर आहे: विराट
२२- रेल्वे प्रवासात अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली
२३- अभिनेत्री सुष्मिता सेनला बीएमसीची नोटीस
२४- ५००व्या कसोटीत भारताचा न्युझीलंडवर १९७ धावांनी विजय
२५- विश्वजीत शिंदे यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी निवड
२६- खेळाडू - प्रशिक्षकांसाठी ‘अॅप’ तयार करणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=======================================
शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण
औरंगाबाद: औरंगाबादमधील पैठणचे सेना आमदार संदीपान भुमरेंची शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. साखर कारखान्याच्या सभेत प्रश्न विचारल्यानं तिळपापड झालेल्या भुमरेंनी शेतकऱ्याला मारहाण केली.
औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेवेळी जयाजीराव सुर्यवंशी या शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता. यामुळे संतप्त आमदार भुमरेंनी त्या शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली.
विशेष म्हणजे आमदारांच्या समर्थकांनीही शेतकऱ्याला चोप दिला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
=======================================
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण
पुणे : सोसायटीतील दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तक्रारदार तरुणी सेजल सराफ आणि आरोपी मिलिंद काळे कोथरुडच्या उच्चभ्रू महात्मा सोसायटीत राहतात. सेजल सराफ आणि तिच्या आईने रस्त्यावरील कुत्र्यांच्या 3 पिल्लांना घरात आश्रय दिला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळेंना या कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत होता.
त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेंनी महापालिकेची श्वानपथकाची गाडी बोलावली होती. पण ही पिल्ले दोन महिन्यांची असल्याने सेजल आणि तिच्या आईने विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेंनी सेजल आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सेजलचा दात पडला. यानंतर सेजलने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद काळेंविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काळेला अटक केली आहे.
=======================================
भुजबळ समर्थनार्थ मोर्चा लोकशाहीविरोधी, प्रशांत बंब विरोधात
नाशिक/औरंगाबाद : गेल्या 6 महिन्यांपासून जेलची हवा खात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी 3 ऑक्टोबरला ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाच्या आयोजनाच्या बैठकीत अडीच हजारांहून अधिक भुजबळ समर्थकांनी हजेरी लावली.
5 हजारांपेक्षा अधिक वाहनं तसंच लाखो रुपयांचा निधी गोळा झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाला उघडपणे विरोध केला आहे. हा मोर्चा लोकशाही विरोधी असल्याचं बंब यांनी म्हटलं आहे.
उघडपणे भुजबळांच्या समर्थनासाठीच्या मोर्चाला भाजप आमदारानं विरोध केल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत. भुजबळांचं योगदान मोठं असून निव्वळ प्रसिद्धीसाठी बंब यांचा खटाटोप सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
=======================================
यवतमाळमध्ये कुलरमधून वीजेचा धक्का, मायलेकीचा मृत्यू
यवतमाळ : नादुरुस्त कुलरमधील वीजप्रवाहाच्या धक्क्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील कळमनेरमध्ये घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
23 वर्षीय सोनाली वानखेडे प्रकृती ठीक नसल्याने दुपारी कुलर लावून झोपायला गेली होती. तेव्हा वीजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. त्याच वेळी 3 वर्षांची पंखुडीही खेळत खेळत तिच्याजवळ गेली आणि वीज प्रवाहाच्या धक्क्याने तिचाही मृत्यू ओढावला.
एकाच अपघातात मायलेकीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कळमनेर गावावर शोककळा पसरली आहे.
=======================================
मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा मोर्चांचं वादळ उत्तरेकडे वळलं आहे. बुलडाण्यातल्या मराठा मूकमोर्चासाठी विराट जनसागर उसळला होता. जयस्तंभ चौकातल्या मंचावरुन जिकडे नजर जाईल तिकडे मोर्चेकरांची गर्दी दिसत होती.
गर्दी जास्त झाल्यानं आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत केवळ महिलांना प्रवेश दिला. तर पुरुष मंडळींना जयस्तंभ परिसराच्या बाहेरचं थांबवलं गेलं.
पाहा फोटो : बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
इतर मोर्चांप्रमाणे हा मोर्चा कुठेच गेला नाही. मोर्चेकरांनी एकाच ठिकाणी बसून आपला निषेध मूकपणे नोंदवला आणि अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच आयोजनस्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं.
रात्रीच्या पावसामुळे आयोजनस्थळी मोठा चिखल जमलेला असूनही महिलांनी शिस्तबद्धपणे याठिकाणी उपस्थिती लावली.
=======================================
अश्विन 'अनमोल' क्रिकेटर आहे: विराट
कानपूर: टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं भारतीय कर्णधार विराट कोहलीनं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ‘भारताचा हा ऑफ स्पिनर ‘अनमोल’ आहे. ज्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत बरंच योगदान दिलं आहे.’
अश्विननं या सामन्यात 10 बळी मिळवले असून पहिल्या डावात महत्वपूर्ण 40 धावांची महत्वपूर्ण खेळीही केली.
भारतानं किवींवर मिळविलेल्या मोठ्या विजयानंतर कोहली म्हणाला की, “तो भारतय संघासाठी फारच महत्वाचा आहे. जगातील प्रभावशाली खेळाडूंबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचा नक्कीच पहिल्या पाचात नंबर लागेल. फारच कमी खेळाडू असतात जे आपल्या संघावर आपला प्रभाव पाडत असतात. खासकरुन गोलंदाज. मला वाटतं गोलंदाज ते आहेत जे तुम्हाला कसोटी जिंकून देतात आणि अश्विन त्याच्यापैकी एक आहे.”
इतकंच नव्हे तर विराट त्याचं यापुढे जाऊनही कौतुक केलं. ‘तो एक स्मार्ट क्रिकेटर आहे. तेवढाच बुद्धीमानदेखील. ते त्याच्या फलंदाजीमध्येही दिसून येतं. त्यामुळेच त्याच्यासारखा क्रिकेटर तुमच्या संघात असणं ही ‘अनमोल’ गोष्ट आहे.
=======================================
बीग बी आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानात सहभागी
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. या जाहिरातींचे व्हिडीओ केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लॉन्च केले.
अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर असतील. त्यांच्यापूर्वी अभिनेत्री विद्या बालन स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबेसिडर होती. स्वच्छ भारत अभियानाचे व्हिडीओ हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधून दिसतील. टीव्हीसोबतच ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडीओ लोकांसमोर येणार आहेत.
“स्वच्छ भारत अभियानासाठी दोघेही मान्यवर समर्पित भावनेने काम करण्यास इच्छुक आहेत. तसंच या दोघांनीही स्वच्छ भारत अभियानासाठी गरज असेल तेव्हा वेळ देण्याची तयारी दर्शविली आहे,” असं केंद्रीय स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.
2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु झालेल्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे 85 हजार गावांमध्ये शौचालय बांधून पूर्ण झाली आहेत. 2019 पर्यंत भारतातील सर्व गावं निर्मल करणार असल्याचंही तोमर म्हणाले.
=======================================
राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकला
लखनऊ: उत्तर प्रदेशातील सितापूर इथं रोड शो दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. राहुल गांधींना हा बूट लागला नाही.
याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राहुल गांधी रोड शो द्वारे सरकारवर हल्ला चढवत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राहुल गांधींनी केली आहे. या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राहुल गांधी उघड्या जीपमध्ये होते. त्यावेळी मागून एका व्यक्तीने राहुल गांधींच्या दिशेने बूट फेकून मारला.
अभिनेत्री सुष्मिता सेनला बीएमसीची नोटीस
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. सुष्मिता सेनच्या गॅलरीत आणि गच्चीवर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.
त्यामुळे बीएमसीने कलम 381 ब अंतर्गत सुष्मिताला नोटीस धाडली आहे. यामुळे सुष्मिताला 2000 ते 10000 रूपये दंड होऊ शकतो.
यापूर्वी अभिनेता शाहिद कपूरच्या घरातही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. तर अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू झाल्याचं उघड झालं होतं.
=======================================
उरी घटना प्रचंड दु:ख देणारी: विराट कोहली
कानपूर: उरी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. याचदरम्यान, 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवणारा कर्णधार विराट कोहली देखील या हल्ल्यानं प्रचंड दु:खी झाला आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, ‘एक भारतीय म्हणून अशा घटना फारच क्लेशकारक वाटतात, मनाला ठेच पोहचवणारी ही घटना आहे.’ दरम्यान, भारतानं हा विजय मिळवून फक्त न्यूझीलंडलाच पराभूत केलेलंनाही तर कसोटी क्रिकेटमध्ये काही आठवड्यांपूर्वीच पहिल्या स्थानी विराजमान झालेल्या पाककडून हे स्थान हिरावून घेतलं आहे.
उरी घटनेविषयी बोलताना विराट म्हणाला की, ‘सध्या जे काही सुरु ते फारच त्रासदायक आहे. आम्ही समजू शकतो की, शहिदांच्या कुटुंबीयांवर कोणता प्रसंग ओढावत असेल.’
उरी दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं केला होता.
=======================================

तरुण अभियंत्याच्या हातात तराजू, नवी कल्पना, भरघोस उत्पन्न
अमरावती: एक फोन आणि घरपोच ताजी भाजी… व्यवसायाचा हाच फंडा घेऊन अमरावतीतील एका उच्चशिक्षित अभियंत्यानं भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केलाय.
अमरावतीतील दर्यापूरचा महेंद्र टेकाडे हा अभियांत्रिकीचा पदवी धारक, पदवीनंतर काही काळ नोकरी केली,मात्र घरची शेती पुन्हा गावाकडं घेऊन आली. मोठ्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा शेतीतील मालाचं ब्रान्डिंग करण्याचं ठरवलं. आणि हा व्यवसाय उभा राहिला.
व्यवसाय उभारणीपूर्वी महेंद्रनं शहरातील 500 घरांमध्ये सर्व्हे केला. कुटुंबांची रोजची भाजीची गरज जाणून घेतली. आणि त्यांच्या गरजेनुसार भाजी पुरवण्याचं नियोजन केलं.
ग्राहकाच्या गरजेनुसार रोज भाजीपाल्याचं नियोजन केलं जातं. शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली जाते. ही भाजी महिला स्वच्छ करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार भाजीच्या पिशव्या भरल्या जातात. ही भाजी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी वातानुकुलित व्हॅन आणि दुचाकी आहे. ज्याव्दारे ही भाजी थेट ग्राहकाच्या घरात पोहचते.
9 महिन्यापूर्वी 500 ग्राहकांपासून सुरु केलेला भाजी बाजार आज दीड हजार ग्राहकांपर्यंत पोहचलाय. महेंद्रनं 13 युवक आणि युवतींना रोजगार दिलाय. तर कित्येक शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा योग्य दर मिळतोय. महेंद्र या व्यवसायातून दररोज 8 ते 9 हजार रुपये कमावतोय. म्हणजेच महिन्या अडीच लाखांची उलाढाल.
उच्च शिक्षण घेऊनही हातात तराजू धरणं महेंद्रला कमीपणाचं वाटलं नाही. त्याला फक्त एक व्यवसाय उभारणीची संधी दिसत होती. अवघ्या नऊ महिन्यात महेंद्रनं स्वयंरोजगारतून स्वत: ची आर्थिक उन्नती साधली, शिवाय इतरांच्या हातालाही काम दिलंय.
=======================================
रेल्वे प्रवासात अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली
मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान अस्वच्छता आणि गलिच्छपणाचा फटका अनेक प्रवाशांना बसल्याची अनेक उदाहरणं पाहिलं आहेत. रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान ट्विट करुन आपली गाऱ्हाणं रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मांडली आहेत. रेल्वेनेही प्रवाशांना तातडीने मदत केल्याचं आपण पाहिलं आहे.
मात्र रेल्वेतील अशाच संतापजनक घटनेचा फटका अभिनेत्री निवेदिता सराफ यांना बसला. रेल्वेप्रवासादरम्यान निवेदिता सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली.
काय आहे प्रकरण?
निवेदिता सराफ या नाटकासाठी लातूर एक्स्प्रेसने लातूरला जात होत्या. एसी सेकंड क्लासने त्यांचा प्रवास सुरु होता. प्रवासादरम्यान त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. मात्र चक्क उंदराने या पर्सकडे धाव घेऊन ती कुरतडून टाकली.
लातूर स्टेशनवर उतरत असताना, पर्स पाहिल्यानंतर निवेदिता सराफ यांच्या हा प्रकार लक्षात आला.
हे कमी म्हणून की काय, मुंबईला परतत असताना, त्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागलं. टीसीने त्यांची आरक्षित सीट आधीच दुसऱ्या प्रवाशाला दिली होती. इतकंच नाही तर ही रेल्वे एक-दोन नव्हे तर तब्बल 5 तास उशिरा आली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच मार्गावरुन धावणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्येही उंदराचा उपद्रव आढळून आला होता. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी यांसदर्भात व्हिडिओ काढून तक्रारही केली होती. पुन्हा तोच प्रकार निवेदिता सराफ यांच्यासोबत घडला आहे.
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
No comments:
Post a Comment