Saturday, 17 September 2016

नमस्कार लाईव्ह १७-०४-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही 
२- न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला 
३- बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- दुबईतील बुर्ज खलिफासारखीच असेल पोर्ट ट्रस्टची इमारत - गडकरी 
५- भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण 
६- अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला भगदाड 
७- दूरसंचार क्षेत्रातील दरयुद्ध ग्राहकहिताचे 
८- जनधन खात्यांतील रकमांची चौकशी सुरू
९- भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
१०- सेन्सेक्स एक आठवड्याच्या उच्चांकावर
११- हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप
१२- मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी
१३- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दूर ठेवून मराठा आंदोलनाची कोंडी फोडावी: संभाजीराजे 
१५- सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार 
१६- आरक्षण मागणाऱ्यांना लग्नावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं: अजित पवार 
१७- महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सुरूच राहणार 
१८- हजार टन निर्माल्यापासून खतनिर्मिती 
१९- शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या 
२०- पुजित अगरवालच्या कोठडीत वाढ 
२१- उत्सवाच्या मंडपांसाठी ज्यादा शुल्क नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुस्लीम असल्याने फ्लॅट देण्यास नकार, वसईतील प्रकार 
२३- ठाण्यातील शीळमध्ये विवाहित जोडप्याची राहत्या घरी हत्या 
२४- उद्या मध्य रेल्वेचा 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक 
२५- मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार 
२६- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील चित्र पालटलं 
२७- हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे 
२८- नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयचे अझरूद्दीनला निमंत्रण
३०- कोटलावर न्यूझीलंडच्या फलंदाजांचे वर्चस्व
३१- आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १५० धावांची आघाडी
३२- नरसिंग डोप प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
३३- मॅँचेस्टर युनायटेडचा पराभव
३४- अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

====================================

मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दूर ठेवून मराठा आंदोलनाची कोंडी फोडावी: संभाजीराजे

मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दूर ठेवून मराठा आंदोलनाची कोंडी फोडावी: संभाजीराजे
उस्मानाबाद: कोपर्डीच्या घटनेनं राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच घुसळून निघतं आहे. लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या मराठा मोर्चेकरांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चांमुळे सरकारभोवतीही प्रश्नांचं मोहळ तयार झालं आहे.

राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपतींनी यांनी मोर्चांबाबत आपल्या मनातील अनेक गोष्टी उघड केल्या. संभाजीराजेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

‘पुढाऱ्यांना दूर ठेवून मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी’

‘माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालं. मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी आहे. एक विशेष कॅबिनेट बैठक रायगडावर घ्या. त्यातून योग्य तो मेसेज जाईल. समाजातल्या नेत्यांना नव्हे. काही अभ्यासूंना सोबत घेऊन चर्चेची कोंडी फुटू शकते.’ असं म्हणत संभाजीराजेंनी पुढाऱ्यांना चर्चेपासून दूर ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

====================================

सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार

सरकारी अनास्था हेच मराठा उद्रेकाचं प्रमुख कारण: शरद पवार
औरंगाबाद: राज्यातील मराठा समाजाचे मोर्चे हे सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक असल्याचा घणाघात करत राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. एबीपी माझा दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवारांनी मराठा आरक्षण, मोर्चे आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यावर भाष्य केलं.

कर्जमाफी, मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी मराठा तरुण स्वयंप्रेरणेतून रस्त्यावर उतरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सत्तेत नसलेल्या मराठा नेत्यांची या मोर्चांना फूस असल्याचा आरोप धादांत चुकीचा असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनील असल्यानं अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळेच अस्वस्थता हे मोर्चाचं मुख्य कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच इतर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात काही नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही पवारांनी केली आहे.

====================================

आरक्षण मागणाऱ्यांना लग्नावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं: अजित पवार

आरक्षण मागणाऱ्यांना लग्नावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं: अजित पवार
बारामती: मराठा मूकमोर्चांमधून आरक्षणाची मागणी जोर धरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता आरक्षणाच्या दुसऱ्या बाजूवर बोट ठेवलं आहे. ‘अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवून आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. ते आज बारामतीत बोलत होते.

‘माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे पण लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे… लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय’ असं म्हणत पवारांनी आरक्षणाची दुसरी बाजू मांडली.

एकीकडे मराठा समाज आरक्षण मुद्यावर आक्रमक होत आसताना अजित पवारांनी केलेले हे विधान त्यांना चांगलंच भोवू शकतं. बारामती पंचायत समितीच्या वतीनं मोरोपंत सभागृहात आर्दश शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

====================================

मुस्लीम असल्याने फ्लॅट देण्यास नकार, वसईतील प्रकार

मुस्लीम असल्याने फ्लॅट देण्यास नकार, वसईतील प्रकार
वसई : वसईत राहणाऱ्या एका व्यक्तीला सोसायटीत रुम विकत घेण्यास नकार दिला आहे. केवळ मुस्लीम असल्याच्या कारणावरून सोसायटीने हरकत घेतली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी देखील या प्रकाराविरोधात तक्रार घेण्यास नकार दिला आहे.

विकार खान यांनी नुकताच वसईच्या साईनगर परिसरातील हॅप्पी जीवन या इमारतीती एक फ्लॅट विकत घेतला. त्यासाठी त्यांनी पैसे देखील जमवायला सुरुवात केली. मात्र, आता या सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावर हरकत घेतली असून, विकार खान यांना फ्लॅट देण्यास नकार दर्शवला आहे. केवळ मुस्लीम असल्याने पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

====================================

भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण

भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई: राष्ट्रवादीच्या प्रफु्ल्ल पटेलांच्या टीकेला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाल्यांची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेसमुळं राष्ट्रवादी बुडाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या मागं चौकशीचा समेमीरा लावला अशी टीका प्रफुल पटेलांनी केली होती.

त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी जशास तसं उत्तर देत राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळं राष्ट्रावादी बुडाली काँग्रेसमुळं नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

====================================

ठाण्यातील शीळमध्ये विवाहित जोडप्याची राहत्या घरी हत्या

ठाण्यातील शीळमध्ये विवाहित जोडप्याची राहत्या घरी हत्या
ठाणे : ठाण्याजवळील शीळमध्ये एका विवाहित जोडप्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंब्र्यातील डायघर पोलिसांनी अज्ञांतांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांचं पथक उत्तरप्रदेशात रवाना झालं आहे.

उत्तर प्रदेशातील राहणारा अवघ्या 30 वर्षांचा तरूण विजय यादव आपल्या पत्नीसह डायघर येथे राहात होता. 15 तारखेला शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता, दोघही पती-पत्नी मृतावस्थेत आढळले.

विजय याचे सुफिया मन्सुरी हीच्याबरोबर प्रेम होते. सुफियाने धर्म बदलून विजयशी घरच्याना न सांगता लग्न केले आणि डायघरजवळ संसार थाटला. प्रिया ही गरोदर होती. अज्ञातांनी या दोघांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. दोन्ही मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाले होते. डायघर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

====================================

दुबईतील बुर्ज खलिफासारखीच असेल पोर्ट ट्रस्टची इमारत

दुबईतील बुर्ज खलिफासारखीच असेल पोर्ट ट्रस्टची इमारत
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासासाठी 5 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दुबईतील बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी उभारली जाईल असं स्पष्ट केलं आहे.

“मुंबईला जगाच्या नकाशावर योग्य जागा मिळवून देण्यासाठी या पोर्टचा उपयोग होणार आहे. तसंच दुबईतील बुर्ज खलिफा किंवा सिंगापूरमधील वॉटरफ्रंटसारखाच या नव्या पोर्ट ट्रस्टच्या इमारतीचा आराखडा असेल,” असंही नितिन गडकरी यावेळी म्हणाले.


मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 1800 एकर जागेपैकी 500 एकर जागेवर विविध विकासकामं करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विशेषज्ञांकडून याचा मास्टरप्लॅन बनवण्यात येणार आहे. या विकासकामांमध्ये केंद्र सरकारच्या ऑफिससाठी एक इमारत बांधण्यात येणार आहे. तसंच मरिना, वॉकवे, इको पार्क, एंटरटेनमेंट हब, स्केटिंग रिंग आणि इतर गोष्टींची उभारणीही करण्यात येणार आहे.

====================================

अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला भगदाड

अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला भगदाड
इटानगर: अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठे भगदाड पडलं आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या 42 समर्थक आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह समोर आले आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभेत 60 जागा असून यातील 44 जागांवर काँग्रेसचे आमदार होते. मात्र शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री चोवना मेन यांच्यासह 42 आमदारांनी पीपीएमध्ये प्रवेश केला.

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्ष भाजपप्रणित पूर्वोत्तर विकास आघाडीतील घटक पक्ष आहे. मे 2016 मध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या आघाडीची स्थापना केली होती. 25 खासदार देणाऱ्या पूर्वोत्तर राज्यांवरील पकड मजबूत करण्यासाठी भाजपने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करुन या आघाडीची स्थापना केली होती.

====================================

उद्या मध्य रेल्वेचा 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक

उद्या मध्य रेल्वेचा 10 तासांचा विशेष मेगाब्लॉक
फाईल फोटो
मुंबई: मुंबईत उद्या मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या दहा तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी-कल्याण नवीन जलद लाईनचं काम केलं जाणार असल्याने मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल लाईनच्या कट-कनेक्शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे सीएसटी ते कल्याणपर्यंत नवीन जलद लाईन उपलब्ध होणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार असल्यानं कोयना, सिंहगड, प्रगती, गोदावरी अशा 10 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय लोकांची गैरसोय पाहता, इतर लोकल गाड्यांनी विशिष्ठ ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत

दरम्यान, यापुढच्या काही दिवसात दर पंधरा दिवसांनी असे मोठे ब्लॉक घेण्याचं रेल्वेनं नियोजन केलं आहे. याच धर्तीवर उद्या 10 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून आवश्यकता नसल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

====================================

मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार

मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार
उस्मानाबाद: महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसानं मराठवाड्याचा पार कायापालट केला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी या पावसानं सुखावला आहे. गेल्या तीन दिवसात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली.

नांदेडच्या शेवडी गावावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. एवढा पाऊस या विभागानं कधीही पाहिला नव्हता. औरंगाबादेतही सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं आहे. लातूरवरही वरुणराजाची कृपा झाली असून निलंग्यातला मसलगा प्रकल्प 95 टक्के भरला आहे.

मराठवाड्यासह कोकणालाही परतीच्या पावसानं झोडपलं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. काल कणकवली, लांजा, रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. मोठ्या विश्रांतीनंतर कोसळणाऱ्या पावसामुळं भात पिकाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळं कोकणातला बळीराज सुखावला आहे.

दरम्यान, मुंबईसह नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईतील अनेक भागात संततधार सुरु आहे.

====================================

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील चित्र पालटलं

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील चित्र पालटलं
बीड: एका रात्रीत पडलेल्या परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील चित्र पालटलं आहे. बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून एकट्या केज तालुक्यात 98.0 मी. मी पावसाची नोंद झाली. कालच्या पावसाने केजमधील केजडी नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे.

परतीच्या पडलेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम करण्यात आली होती, त्यामुळे या कामाची फलश्रुती दिसून येते आहे.

येथील नागरिकांकडून केज नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. काल रात्री झालेल्या पावसामुळे ही नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचे चीज झाले अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या.

मुसळधार पावसामुळे धनेगावच्या मांजरा धरणाची पाणी पातळी साडे तीन मीटरने वाढली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण आहे.

====================================

हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे

हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे
मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थानिकांनी आपली साम्राज्ये स्वतंत्र भारतात विलीन केली. मात्र, दक्षिणेतील हैदराबाद संस्थान विलीनीकरणास तयार नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळूनही 13 महिने येथील जनतेला गुलामीचे जीवन जगावे लागत होते. यामुळे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 17 सप्टेंबर रोजी सैनिकी कारवाईने हे संस्थान विलीन करून येथील जनतेला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. आज या घटनेला 68 वर्षे पूर्ण होत आहेत.

ब्रिटिशांनी येथील संस्थानिकच्या मार्फत चालणारा राज्यकारभाराचा फायदा उचलत विविध राजवटींमधील संघर्ष, स्वतःच्या फायद्यासाठी चातुर्याने वापरून घेतला. यासाठी कधी राजांशी तह करून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 600 पेक्षा अधिक छोटी-मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती. या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासनासंदर्भात मर्यादित स्वायत्तता होती, मात्र सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वांत मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते.

====================================

नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू

नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा संशयास्पद मृत्यू
नाशिक: नाशिकमध्ये भाजप नगरसेविका ज्योती गांगुर्डेंच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह  एका कारमध्ये संशयास्पद आढळला असून त्यांच्या मृत्यूमागचे कारण आद्याप अस्पष्ट आहे.

अर्जुन गांगुर्डेंच्या पतीचा मृतदेह पेठरोडजवळील एका निर्जन स्थळी वॅगेनार कारमध्ये सापडला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला, आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाशेजारी चिठ्ठी सापडली असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.

====================================

No comments: