========================================
'बिग बॉस'मध्ये घुमणार महिलेचा आवाज! तृप्ती देसाई होणार सहभागी?
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ - महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाई आता प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ' बिग बॉस'चा १० वा सीझन पुढील महिन्यात येणार असून तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या शोमध्ये नेमही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतात, मात्र यावेळी शोमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी होता येणार आहे.आवाज महिलेचा ठेवा तर सहभागी होईन - तृप्ती देसाईंची अनोखी अटआम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची बिग बॉसनेही दखल घेतली असून त्यांनीच मल शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारण केली. गेल्या महिन्यात आमची मीटिंगही झाली. मात्र या शोमध्ये सहभागी झाल्यास संपूर्ण ९० दिवस बिग बॉसच्या घरात रहावे लागते, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही, असे मला कळले. मात्र माझ्या आधीच काही कमिटमेंट्स असून त्या तारखा अॅडजस्ट झाल्यास मी शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करेन, असे मी चॅनेलवाल्यांना सांगितले. मात्र यो शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी त्यांच्यासमोर अट ठेवली आहे. या शोमधील ' बिग बॉस' चा आवाज महिलेचा असावा. गेल्या ९ सीझनपासून एका पुरूषाने ही धुरा सांभाळली आहे, मात्र आता ती जबाबजारी महिलेकडे दिल्यास इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे 'महिला' हे क्षेत्रही गाजवतील असा मला विश्वास वाटतो, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
========================================
'वनी' पुन्हा चर्चेत, काश्मीरचा सुपुत्र करणार देशाचं रक्षण
- -ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि.१२ - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी 'बुरहान वणी' मारला गेल्यामुळे एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच त्याच काश्मीरमध्ये 'वनी' या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा 'वनी' म्हणजे काश्मीरचा सुपूत्र बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेतील टॉपर नबील अहमद वनी होय.. २६ वर्षीय नबील अहमद वनी देशाच्या रक्षणासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रुजू होणार आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतीच वनी यांची भेट घेतली. बीएसएफच्या प्रमुखांनीच वनी आणि सिंग यांची भेट घालून दिली. उधमपूरच्या या तरूणाचं कौतूक करताना राजनाथ यांनी 'तुम्ही' राज्यातील तरूणांचे आदर्श असल्याचं म्हटलं आहे.नबील अहमद सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रूजू होणार असून त्यांच्या या यशामुळे त्यांची आई हनीफा बेगम देखील आनंदी आहे. मुलाची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच ' माझा मुलगा पूर्ण इमानदारी आणि मेहनतीने काम करून देशात शांतता कायम राखण्यासाठी कायम प्रयत्नशील असेल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नबीलने मिळवलेलं यश म्हणजे काश्मिरमधील तरूण किती प्रभावशाली आहेत हेच दाखवतं, ते कश्मीरी तरूणांसाठी प्रेरणादायी आहेत असं राजनाथ सिंग म्हणाले. जम्मू-काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी झालेल्या बैठकीतही वणी यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, आयबीचे प्रमुख दिनेश्वर शर्मा, गृह सचिव राजीव महर्षि आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वनी म्हणाले, बेरोजगारी ही तरूणांपुढील सर्वात मोठी समस्या आहे आणि शिक्षण हा एकमेव त्यावरील उपाय आहे. वनी यांनी पठाणकोटमधून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. हातात दगड घेऊन शिक्षण घेता येत नाही मात्र हातात लेखणी घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. वनी यांचे वडील शिक्षक होते त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
========================================
गुटख्याची पिचकारी वीजेच्या तारेवर पडून तरूणाचा मृत्यू
- मालेगाव, दि. १२ - गुटख्याची पिचकारी वीजेच्या तारेवर मारणे तरूणाच्या जीवावर बेतले असून वीजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावात घडली आहे. मोहम्मद यासिन मोहम्मद सलीम असे त्या तरूणाचे नाव असून तो अवघा २१ वर्षांचा होता.मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा काल (रविवार) अब्दुल खालिक पार्कजवळ त्याच्या भावाला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा भाऊ मोहम्मद अमिन हा गफर अब्दुल हनिफ यांच्या कापड कारखान्यात कामाला आहे. या दुमजली इमारतीच्या वरच्या मदल्यावर तो काम करत असताना मोहम्मद यासिनने त्याला भेटायला गेला व बोलता बोलता त्याने तोंडातील गुटख्याची पिकारी बाहेर टाकली. मात्र ती पिचकारी इमारतीच्या जवळून जाणा-या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पडली आणि मोहम्मद यासिन विद्युत दाबाच्या दिशेने खेचला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मालेगावात गुटखा बंदी असतानाही ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.
========================================
'ते' ट्विट पडणार महागात! पाडकामाचा खर्च पालिका कपिलकडून करणार वसूल?
- मुंबई, दि. १२ - कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे 'ट्विट' कॉमेडी किंग कपिल शर्माला महागात पडण्याची चिन्हं दिसत आहेत. ' ज्या बांधकामासाठी लाच मागितल्याचा आरोप कपिलने केला होता, ते बांधकाम अवैध होतं व त्यासंबंधी महापालिकेने त्यावा 16 जुलै 2016 रोजी नोटीसदेखील पाठवली होती, अशी माहिती आता समोर आली असून', ते अवैध बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च आता महापालिकाकडून कपिलकडूनच वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा हा ट्विटर बॉम्ब त्याच्यावरच उलटण्याची चिन्हे आहेत.'मी गेली 5 वर्ष न चुकता 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझ्या कार्यालयासाठी महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते', असं ट्विट कपिल शर्माने केलं होतं, एवढंच नव्हे तर ' हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सवाल विचारत त्याने पंतप्रधान मोदी टॅग केलं होतं. या सर्व प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. महापालिकेने कपिल शर्माला तक्रार नोंद करण्यासाठी सांगत ज्या व्यक्तीने लाच मागितली त्याचं नाव उघड करण्याची मागणी केली होती. मात्र काही काळानंतर कपिलच्या कार्यालयाचे बांधकामच अवैध असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पालिकेने जुलै महिन्यात कपिलला नोटीस पाठवून ते बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. आपले आरोप आपल्याच अंगाशी येत असल्याचं पाहून कपिलने लगेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
========================================
MRPच्या मनमानीला चाप, दूध, साखर, डाळींचे दर सरकार ठरवणार
मुंबई : एमआरपीच्या नावाखाली मनमानीपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सरकार चाप लावणार आहे. कारण, डाळ, दूध, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकार आता निश्चित करणार आहे.
ग्राहक आणि अन्न-नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतला आहे. सुट्या आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरात मोठा फरक असतो. म्हणून अनेकदा दुकानदार हव्या त्या किमतींना वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सरकार हा महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.
तसं झाल्यास सरकारनं निश्चित केलेल्या दरांपेक्षा दुकानदाराला त्यापेक्षा वाढीव दरानं विक्री करता येणार नाही. तरीही एखाद्या दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरुच असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे.
========================================
शिंगाड्याचा बेस, साबुदाण्याचं टॉपिंग, 'डॉमिनोज्'चा शाकाहारी पिझ्झा
मुंबई : नवरात्रीसाठी डॉमिनोजनं खास शाकाहारी पिझ्झा सर्व्ह करण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे एक ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेपासून जवळपास अर्ध्याहून अधिक डॉमिनोजची रेस्टॉरंट शाकाहारी होणार आहेत.
उत्तर आणि दक्षिण भारतातील डॉमिनोजच्या 500 आऊटलेट्समध्ये मांसाहारी पदार्थ सर्व्ह केले जाणार नाहीत. पहिल्यांदाच एखाद्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थ कंपनीनं नवरात्रीसाठी अशा मोठ्या प्रकाराचा बदल केला आहे.
मांसाहार, गहू, कांदा-लसूण यांच्याऐवजी शिंगाडा, साबुदाणा यासारख्या उपवासाच्या पदार्थांचा समावेश असेल. नवरात्रीमध्ये मासांहारी पदार्थाची मागणी खूपच कमी होते. त्यामुळे गेल्या 2 वर्षात डॉमिनोजला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे धंद्याला नवी उभारी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
========================================
जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये भारतीयाचे 22 फ्लॅट
दुबई : जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’मध्ये जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल या भारतीय व्यावसायिकाचे तब्बल 22 फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने रविवारी ही बातमी दिली आहे.
या भारतीय व्यावसायिकाने मेकॅनिक म्हणून सुरुवात केली होती. सध्या हा व्यावसायिक जीईओ नावाची कंपनी स्थापन करुन वातानुकूलन उद्योगात आपला जम बसवतो आहे.
“मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही. जर मला पटणाऱ्या किंमतीत अजून फ्लॅट मिळाले तर मी तेही विकत घेईन,” असं या व्यावसायिकाने खलीज टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
केरळमध्ये जन्मलेल्या नेरियापाराम्बिल यांनी एका नातेवाईकाने बुर्ज खलिफावरुन मस्करी केल्यावर फ्लॅट खरेदी करण्यास सुरुवात केली. 822 मीटर उंचीच्या या इमारतीमध्ये 900 फ्लॅट आहेत. यापैकी 22 फ्लॅट या भारतीय व्यावसायिकाचे आहेत. सध्या त्याने 5 फ्लॅट भाड्याने दिले आहेत, तर उरलेल्या फ्लॅटसाठी त्याने भाडेकरुंचा शोध चालवला आहे.
========================================
लालबागच्या दरबारात पोलिसाकडून पत्रकाराला धक्काबुक्की
मुंबई: लालबागच्या राजाच्या दरबारात काल पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. पोलिसाचं हे कृत्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, याआधी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली होती.
काल, आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनेचे पत्रकार उदय जाधव यांना सहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकर यांनी धक्काबुक्की केली. जाधव हे काही विचारण्यासाठी पाटणकर यांच्याकडे गेले असताना, त्यांनी ऐकून घेण्याऐवजी त्यांना जोरानं ढकलून दिलं.
दरम्यान, काल पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच वाद झाला होता. हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केला आहे. पोलिसांनी एकाच्या अंगावर हात उगारल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतं आहे.
कार्यकर्त्यांनी दादागिरीची भाषा केल्याचा आरोप संबंधित पोलिसांकडून करण्यात येतो आहे. तर पोलीसच अंगावर धावून आल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतं आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
========================================
दक्षिणेतून मुंबईत येणाऱ्या रेल्वे हाऊसफुल्ल, कोकणातील प्रवाशांचे हाल
रत्नागिरी: गणेशोत्सव आटोपून परतताना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना वेठीस धरल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समोर आला आहे.
दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे या आधीपासूनच फुल्ल होऊन येत आहेत, शिवाय त्या गाड्यांचे दरवाजे उघडले जात नसल्यानं अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यात रेल्वे पोलिसांनी कोणतेही नियोजन केले नसल्यानं खोळंब्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे नक्की कोकण रेल्वे आहे कुणासाठी? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
फक्त रत्नागिरीच नाही, तर चिपळूण, खेड आणि संगमेश्वर स्थानकातही देखील अशीच परिस्थिती असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोकणवासियांसाठी धावणारी रेल्वे जर त्यांच्याच कामी येत नसेल, तर तिचा काय उपयोग असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
========================================
वाशी, खारघर टोलनाक्याजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा
नवी मुंबई: सुट्टी संपवून परतणाऱ्यां पर्यटकांमुळे मुंबईच्या एन्ट्री पॉईन्टला मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळीच वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाशीसोबतच खारघर टोलनाक्यावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे.
गणपतीचे दिवस आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी मुंबईबाहेर जाणं पसंत केलं होतं. त्याच सुट्ट्या संपवून अनेक जण आज मुंबईत परतत आहे. त्यामुळे नवी मुंबईजवळ वाहतुकीची कोंडी झाली आहे.
========================================
विद्या बालनच्या साडीवरुन उत्तर प्रदेशच्या राजकारणात घमासान
लखनौ : उत्तर प्रदेशातील अखिलेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालन हिच्या साडीवरुन आता वाद सुरु झाला आहे. विरोधी पक्षांनी विद्या बालनच्या साडीवर आक्षेप घेत आरोप केला आहे की, “सरकारी जाहिरातींमध्ये विद्या बालनने समाजवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि समाजवादी पक्ष सरकारी पैशांनी पक्षाचा प्रचार करत आहे.”
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला अखिलेश सरकारने समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर बनवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एकदा खंत व्यक्त केली होती की, समाजवादी पक्षाने काम खूप केलंय. मात्र, त्या कामांचा प्रचार केला नाही. त्यानंतरी योजनेची जाहिरात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्या बालनला लोक ओळखतात आणि त्यामुळे तिच्या माध्यमातून लोकांपर्यंत सरकारची कामंही लोकांपर्यंत पोहोचवता येईल. यातूनच विद्या बालनला योजनेच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
========================================
व्होडाफोन-BSNL ची हातमिळवणी, 2G इंटर-सर्कल करार
नवी दिल्लीः ग्राहकांना मजबूत कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी व्होडाफोन आणि सरकारी कंपनी बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आणि व्होडाफोन यांनी राष्ट्रीय स्तरावरील 2G इंटर सर्कल करार केला आहे.
काय आहे 2G इंटर सर्कल करार?
बीएसएनएल आणि व्होडाफोनच्या या करारामुळे कॉल ड्रॉपच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठीही मदत होणार आहे. तसंच दोन्ही कंपन्यांचा नेटवर्क क्षेत्र वाढून ग्राहकांना फायदा होणार आहे.
गोव्यात पुढच्या महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनात दोन्ही कंपन्या अखंड कनेक्टीव्हिटी उपलब्ध करणार आहेत. बीएसएनएलचे ग्रामीण भागात जास्त ग्राहक आहेत. मात्र या करारामुळे शहरातील ग्राहक वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.
========================================
अॅम्बुलन्स न मिळाल्याने मृतदेह 20 किमी सायकलवर नेला
फोटो सौजन्यः आज तक
शहडोल (मध्य प्रदेश): अॅम्बुलन्स न मिळाल्यामुळे मृतदेह 20 किलोमीटरपर्यंत सायकलवर न्यावा लागल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील शहडोल जिल्ह्यातील ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. कोणाचंही सहकार्य न मिळाल्यामुळे पीडित व्यक्तिवर ही वेळ ओढावली.
रामाबाई गौड या 70 वर्षीय महिलेचा मुलीच्या घरी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्यासाठी जावई गोरे सिंह यांनी वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणीही येण्यास तयार न झाल्यामुळे सायकलवरुन मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. भर दुपारी गोरे सिंह यांनी मृतदेह सायकलवर बांधला आणि रामाबाईंच्या मूळगावी पोहचवला.
गोरे सिंह यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलं होते. सर्वांनी आळीपाळीने सायकल चालवली. या घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे गोरे सिंह यांना मदत करण्यासाठी सरकार तर दूरच मात्र त्यांचे शेजारी आणि इतर कोणाचेही हात धजावले नाही.
========================================
सणांच्या काळात फ्लिपकार्टमध्ये 10 हजार जागांची भरती
नवी दिल्लीः फ्लिपकार्ट आगामी सण-उत्सवांच्या काळात 10 हजार कंत्राटी कामगारांची भरती करणार आहे. ग्राहकांना जलद सेवा पुरवता यावी, यासाठी लॉजिस्टीक आणि डिलीव्हरीसाठी कंत्राटी कामगारांची भरती करण्याचा निर्णय फ्लिपकार्टने घेतला आहे.
सण-उत्सवांच्या काळात फ्लिपकार्टकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना जलद सेवा पुरवण्याचं उद्दीष्ट लक्षात घेता देशभरात 10 हजार कंत्राटी कामगारांची आवश्यकता आहे, अशी माहिती फ्लिपकार्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी नितीन सेठ यांनी दिली.
फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपडीलनेही 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 10 हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्याचं जाहीर केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी फ्लिपकार्टनेही तत्परता दाखवली आहे.
No comments:
Post a Comment