[अंतरराष्ट्रीय]
१- उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी
२- 26/11 हल्ल्यातील आरोपीविरोधात पाकिस्तानला मिळेना पुरावा
३- पाकला एकाकी पाडा, निर्बंध घाला - नरेंद्र मोदी
४- अमृता फडणवीस यांचा रॅम्प वॉक
५- नेताजींचा मृत्यू झाला विमान अपघातातच
६- लख्वीसह ७ आरोपींना नोटीस
७- सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- फक्त एका वर्षात हवा प्रदूषणामुळे भारतात 14 लाख लोकांचा मृत्यू
९- बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल पहिलेच गांधी
१०- ज्या बांधकामासाठी लाच मागितली ते कपिल शर्माचं ऑफिसच अनधिकृत ?
११- तुम्ही फार काळ कायदा मोडू शकत नाही! - अंबानी
१२- सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर
१३- ऊर्जित पटेल यांना सुरक्षा रक्षकाने गेटवरच अडविले
१४- महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य
१५- मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी
१६- साखर साठ्याची मर्यादा रद्द करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- खड्ड्यांचे विघ्न अद्यापही कायमच
१८- बेस्ट प्रवासी संख्या वाढवणावर
१९- दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला
२०- वरळीत पोलिसाच्या अंगावर गाडी घातली
२१- भांडणानंतर विवाहितेची हत्या, पती गजाआड
२२- ज्या बांधकामासाठी लाच मागितली ते कपिल शर्माचं ऑफिसच अनधिकृत ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- कपिल शर्माचा आरोपावर कडक कारवाई करणार - दक्षता विभागाच्या मुख्य अभियंत्यांचं वक्तव्य
२४- लातूरः विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज लातूर दौ-यावर.
२५- ओडिशा; बस पुलावरुन खाली कोसळल्याने अपघात. 15 मृत्यू; 17 जखमी.
२६- मुंबई - मालाडमध्ये नेव्ही भरतीआधी चेंगराचेंगरी
२७- कावेरी नदी पाण्याच्या मुद्यावरुन आज कर्नाटक बंद.
२८- औरंगाबाद : मिरची, कोथिंबीर, कांद्याला कवडीमोल दर... निराश शेतकऱ्यानं भाजीपाला फेकला रस्त्यावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- सेरेनाचे २३व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले
३०- केईचा खळबळजनक विजय
३१- रिओ पॅरालिम्पिकमध्ये झांझरियाने उंचावला तिरंगा
३२- रोहितचा मुंबई संघात समावेश
३३- भारतापुढे नदाल-फेररचा अडथळा
३४- भारत ‘अ’ २३० धावांत गारद
३५- पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस
३६- जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
--------------------------------------
!!..गणपती बाप्पा मोरया...!!
वाजत गाजत आले गणराया..
स्वागत तयांचे करूया..
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या मखरांनी सजवून
शोभा तयांची वाढवूया
********************
खास घरगुती गणेशांचे डेकोरेशन करण्यासाठी फुलांनी सजविलेले स्टँड / मखर
फ्लावर एन फ्लावर्स मध्ये उपलब्ध आहेत
संपर्क - 9423785456
======================================
१- उत्तर कोरियाने पुन्हा केली अणूचाचणी
२- 26/11 हल्ल्यातील आरोपीविरोधात पाकिस्तानला मिळेना पुरावा
३- पाकला एकाकी पाडा, निर्बंध घाला - नरेंद्र मोदी
४- अमृता फडणवीस यांचा रॅम्प वॉक
५- नेताजींचा मृत्यू झाला विमान अपघातातच
६- लख्वीसह ७ आरोपींना नोटीस
७- सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- फक्त एका वर्षात हवा प्रदूषणामुळे भारतात 14 लाख लोकांचा मृत्यू
९- बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल पहिलेच गांधी
१०- ज्या बांधकामासाठी लाच मागितली ते कपिल शर्माचं ऑफिसच अनधिकृत ?
११- तुम्ही फार काळ कायदा मोडू शकत नाही! - अंबानी
१२- सेन्सेक्स १७ महिन्यांच्या उच्चांकावर
१३- ऊर्जित पटेल यांना सुरक्षा रक्षकाने गेटवरच अडविले
१४- महिंद्रा-ओलाचे 40 हजार गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य
१५- मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी
१६- साखर साठ्याची मर्यादा रद्द करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- खड्ड्यांचे विघ्न अद्यापही कायमच
१८- बेस्ट प्रवासी संख्या वाढवणावर
१९- दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला
२०- वरळीत पोलिसाच्या अंगावर गाडी घातली
२१- भांडणानंतर विवाहितेची हत्या, पती गजाआड
२२- ज्या बांधकामासाठी लाच मागितली ते कपिल शर्माचं ऑफिसच अनधिकृत ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- कपिल शर्माचा आरोपावर कडक कारवाई करणार - दक्षता विभागाच्या मुख्य अभियंत्यांचं वक्तव्य
२४- लातूरः विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज लातूर दौ-यावर.
२५- ओडिशा; बस पुलावरुन खाली कोसळल्याने अपघात. 15 मृत्यू; 17 जखमी.
२६- मुंबई - मालाडमध्ये नेव्ही भरतीआधी चेंगराचेंगरी
२७- कावेरी नदी पाण्याच्या मुद्यावरुन आज कर्नाटक बंद.
२८- औरंगाबाद : मिरची, कोथिंबीर, कांद्याला कवडीमोल दर... निराश शेतकऱ्यानं भाजीपाला फेकला रस्त्यावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- सेरेनाचे २३व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले
३०- केईचा खळबळजनक विजय
३१- रिओ पॅरालिम्पिकमध्ये झांझरियाने उंचावला तिरंगा
३२- रोहितचा मुंबई संघात समावेश
३३- भारतापुढे नदाल-फेररचा अडथळा
३४- भारत ‘अ’ २३० धावांत गारद
३५- पंकज अडवाणीची पद्मभूषणसाठी शिफारस
३६- जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
--------------------------------------
!!..गणपती बाप्पा मोरया...!!
वाजत गाजत आले गणराया..
स्वागत तयांचे करूया..
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या मखरांनी सजवून
शोभा तयांची वाढवूया
********************
खास घरगुती गणेशांचे डेकोरेशन करण्यासाठी फुलांनी सजविलेले स्टँड / मखर
फ्लावर एन फ्लावर्स मध्ये उपलब्ध आहेत
संपर्क - 9423785456
======================================
कपिल शर्माच्या मुखवट्याआडून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ९ - महापालिकेने आपल्याकडे ५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप कॉमेडी किंग कपिल शर्माने केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई महापालिकेने शर्मा यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ' ज्याप्रमाणे तुम्ही कपिलच्या आरोपाची गंभीर दखल घेत त्याचा प्रश्न लगेच सोडवलात त्याचप्रमाणे आमच्यासारख्या सामान्य मुंबईकरांकडेही लक्ष देवून त्यांचे प्रश्न सोडवा', अशी मागणी 'कपिल शर्मा'च्या मुखवट्याआडून काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी कपिलचा मास्क घालून शूट केलेल्या एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील अनेक समस्यांची आठवण करून देत त्याविषयी प्रश्न विचारले आहेत.' मीही मुंबई महानगरपालिकेत होणार भ्रष्टाचार, रस्त्यावर पडलेले खड्डे, नालेसफाई, पाणीचोरी व अशा असंख्य प्रश्नांबद्दल आपल्याला पत्र लिहीले आहे, निवेदने दिली आहेत. त्या प्रश्नांसाठी मी अनेकवेळा मुंबई महापालिकेच्या पाय-याही झिजवल्या आहेत. पण आजपर्यंत कोणीही माझी दखल घेतली नाही, ऐकलं नाही. म्हणून आज आमच्यावर ' हम भी कपिल शर्मा' असं म्हणण्याची वेळ आली आहे. आता तरी तुम्ही आमचं ऐकाल ना?' असा सवाल नितेश यांनी विचारला आहे.
======================================
ज्या बांधकामासाठी लाच मागितली ते कपिल शर्माचं ऑफिसच अनधिकृत ?
- - ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - आपल्या कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप करणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा स्वत:च अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ज्या बांधकामासाठी लाच मागितली असल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे त्या ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्यामध्ये या ऑफिसचं बांधकाम सुरु आहे.महापालिकेने आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे. कपिल शर्माने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेने लाच मागितल्याचा आरोप केला असून याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सवाल विचारत नाराजी व्यक्त केली आहे.
======================================
बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल पहिलेच गांधी
- - ऑनलाइन लोकमतअयोध्या, दि. 9 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्येच्या दौरा करत 26 वर्षापुर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. राहुल गांधी यांनी सकाळी हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर महंत ज्ञानदास यांची भेट ते घेणार आहेत. विश्व हिंदू परिषदेविरोधात भुमिका मांडल्याने महंत ज्ञानदास चर्चेत आले होते.किसान यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून देवरिया ते दिल्ली असा सुमारे २५०० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी या यात्रेमध्ये करणार आहेत. त्यामध्ये ते विविध ठिकाणी खाट सभा घेणार असून, वेगवेगळ्या लोकांनाही भेटणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीकडे लक्ष ठेवूनच राहुल गांधींच्या दौ-याचे आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.राहुल गांधी यांच्या अयोध्या दौ-याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. 26 वर्षांपुर्वी राहुल गांधी यांचे वडिल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी 1990मध्ये सद्भावना यात्रेसाठी अयोध्येत आले होते. त्यावेळी वेळ नसल्याने हनुमान गढी मंदिरात ते जाऊ शकले नव्हते.
======================================
फक्त एका वर्षात हवा प्रदूषणामुळे भारतात 14 लाख लोकांचा मृत्यू
- - ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भारतामध्ये 2013 साली हवा प्रदूषणामुळे तब्बल 14 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 16 लाख लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. वर्ल्ड बँक, इन्सिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.हवा प्रदुषणामुळे झालेल्या वेगवेगळ्या आजारांमुळे जगभरात 2013 साली एकूण 50 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील 60 टक्के मृत्यू सर्वात जास्त लोकसंख्या असणा-या चीन आणि भारतात झाले आहेत. हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, ह्रद्याचे आजार होतात, ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.भारत आणि चीनला लोकसंख्या जास्त असल्याचा फटका बसला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 1 लाख लोकांच्या मागे मृत्यूचं प्रमाण पाहिल्यास जगभरातील देशांमध्ये चीन सहाव्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सोबतच बांगलादेश 11, श्रीलंका 12 आणि पाकिस्तान 15व्या क्रमांकावर आहे.
======================================
सुंदर मुलीची दाढी गिनीज बुकात !
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - इंग्लंडमधली शिख मॉडेल आणि क्रीडा प्रसारक हरनाम कौर हिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेतली आहे. वयाच्या 24व्या वर्षी दाढी वाढवल्यानं तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या किताबानं गौरवण्यात आलं आहे. हरनाम हिची दाढी तिच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही, असं तिनं सांगितलं आहे.ती म्हणाली, "ब-याचदा माझ्या वाढलेल्या दाढीवरून लोक माझी चेष्टा करत होते. मात्र मी कधीही त्यांच्यापुढे झुकली नाही." या परिस्थितीवर मात करत ती उत्तम मॉडेल आणि प्रतिमा संवर्धन कार्यकर्ती म्हणून नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे 24व्या वर्षीच तिची दाढी 6 इंच लांब आहे.इंग्लंडमध्ये हरनाम कौर ही सध्या मीडियाच्या केंद्रस्थानी आहे. मार्च 2016मध्ये लंडन फॅशन वीकमध्ये वॉक करणारी ती पहिली दाढी असणारी मुलगी ठरली होती. हरनाम तिच्या या यशावर आनंदित आहे. "आता मी गर्वानं सांगू शकते की मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा किताब मिळवला आहे," अशी प्रतिक्रिया हरनाम हिनं दिली आहे.
- ==========================================
अमृता फडणवीस यांचा रॅम्प वॉक
- न्यूयॉर्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मॅनहॅटन येथे पार पडणा-या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी झाल्या असून त्या शो टॉपर म्हणून रॅम्पवरही उतरल्या. या फॅशन शोमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यात येत असून हातमागावरील भारतीय कपड्यांचे प्रमोशन हा देखील उद्देश आहे.पुण्यातील चासा इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने अमृता फडणवीस यांना ही संधी मिळाली. ही इन्स्टिट्यूट गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या फॅशन वीकमध्ये विद्यार्थ्यांनीच डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रमोशन करण्यात येत आहे. हे कपडे परिधान करु न मॉडेल रॅम्पवर उतरल्या तेव्हा त्यांच्या हातात मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन करणारे पोस्टर्सदेखील होते.ज्यांनी हे कपडे डिझाईन केले आहेत त्या सर्व शेतकरी आणि मजुरांच्या मुली आहेत. हा अभिनव उपक्र म आहे. मुलगी शिकली की एक कुटुंब शिकते आणि देशाची प्रगती होते, अशी भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. वरिष्ठ बँक अधिकारी असलेल्या अमृता या उत्तम गायिकादेखील आहेत.
- ======================================
तुम्ही फार काळ कायदा मोडू शकत नाही!
- मुंबई : रिलायन्स जिओच्या ४-जी सेवेचे उद्घाटन करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘अन्य कंपन्यांनी अंतर्गत जोडण्या न दिल्यामुळे आपल्या कंपनीचे ५ कोटी कॉल अवघ्या एका आठवड्यात फेल झाले’ असा आरोप केला होता. आता एका मुलाखतीत अंबानी यांनी ही समस्या काही आठवड्यांत सुटेल, असे म्हटले आहे. तुम्ही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कायदा मोडू शकत नाही, असा इशाराच अंबानी यांनी अन्यकंपन्यांना दिला आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अंबानी म्हणाले की, सर्व दूरसंचार कंपन्यांना अंतर्गत जोडण्या देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. तुमच्या परवान्यातच हे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी नेहमीसाठी अंतर्गत जोडण्या नाकारू शकणार नाही. कोणताच कायदा तुम्ही फारकाळमोडू शकत नाही.
- ================================
जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो
- - ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - गणेशोत्सव सण सुरु करण्यामागे लोकमान्य टिळकांचा असलेला मुख्य उद्देश म्हणजे सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र यावं. पण आज इतक्या वर्षांनी जेव्हा गणेशोत्सवाचं पारंपारिक रुप बदललं आहे तेव्हा उद्धेशदेखील बदलला आहे का ? प्रत्येक धर्माने आपला देव निवडला आहे अशावेळी दुस-या धर्माला मदत करण्याची वेळ येते तेव्हा नेमकं काय होतं ? नेमकं याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रयोग म्हणून फंक यू या ग्रपुने युट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये एक हिंदू मुलगा गणेशोत्सवासाठी मुस्लिमांकडे पैसे मागताना दिसत आहे.आपल्या आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी दिलेले पैसे हरवले आहेत असं सांगत हा 8 वर्षाचा मुलगा मुस्लिमांकडे पैशांची मदत मागत आहे. अनेकांना या मुलाला कोणीच मदत करणार नाही, याउलट त्याला धर्माचे उपदेश देतील आणि पाठवतील असं वाटलं असेल पण तसं काहीच होत नाही. मुलाने पैसे मागितल्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. या व्हिडीओमुळे माणुसकी धर्मातच असते हे पुन्हा एकदा दिसून येतं.
No comments:
Post a Comment