Wednesday, 7 September 2016

नमस्कार लाईव्ह 0७-०९-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लंडन; बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा 
२- आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी
३- चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा
४- पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
५- इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी
६- नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ?
७- फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- तुम्ही बुडा किंवा मरा घरखरेदीदारांना पैसे परत करा - सर्वोच्च न्यायालय 
९- राहुल गांधींच्या महायात्रेला प्रारंभ
१०- मतदानाच्या ‘कल’यंत्राबाबत पक्षांत मतभेद
११- आशुतोष यांच्या ब्लॉगने गदारोळ
१२- ‘विशिष्ट वृत्तपत्राच्या जाहिराती का कमी झाल्या हे तपासा’
१३- सेन्सेक्सचा १७ महिन्यांचा उच्चांक
१४- सौरऊर्जेवर ३0 टक्के सबसिडी
१५- गुगल विकसित करणार ‘भारत सेव्ह्ज’ वेबसाईट
१६- कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा
१७- ईएसआयची मर्यादा केली २१ हजार रुपये
१८- बीएसएनएल देणार सर्वांत स्वस्त ब्रॉडबँड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१९- उड्डाणपुलाखाली पार्किंग शक्य आहे का?
२०- प्रीती राठी प्रकरण - अंकुर पनवार दोषी; शिक्षेचा निर्णय आज
२१- ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप
२२- आरेतील विकासकामांना बसणार खीळ!
२३- जे. जे. महाविद्यालयात अध्यापकांची पदे रिक्त
२४- प्रीती राठीच्या हल्लेखोराल उद्या होणार शिक्षा
२५- 'विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य कशासाठी ?',- दिल्ली हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- मुंबई; उड्डाणपुलाखाली पार्किंग शक्य आहे का? 
२७- राजस्थान- स्पेनिश महिलेसोबत जोधपूर हॉटेलमध्ये छेडछाडी 
२८- गणेश विसर्जना दरम्यान कर्नाटकच्या तुंगभद्र नदीत १२ लोक वाहून गेल्याची शक्यता 
२९- भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये जनता उतरली रस्त्यावर 
३०- उद्या चंदीगडमध्ये नवजोत सिंग सिद्धू पत्रकार परिषद घेणार 
३१- नाशिकः शहर आणि परिसरात जोरदार पावसाची हजेरी 
३२- सिन्नर येथे बंधा-यात बुडून दोघांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी 
३४- नरसिंगप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी?
३५- साक्षी सत्यव्रतसोबत घेणार ‘सात फेरे’
३६- नदाल भारताविरुद्ध खेळणार
३७- रिओ पॅरालिम्पिक स्पर्धा आजपासून
३८- पी.व्ही. सिंधू, ललिता बाबरला राज्य शासनाचे ७५ लाख
३९- उपांत्यपूर्व फेरीत सानिया पराभूत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

तुम्ही बुडा किंवा मरा घरखरेदीदारांना पैसे परत करा - सर्वोच्च न्यायालय


  •  ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ७ - ज्या लोकांनी आपली मेहनतीची कमाई घर खरेदीमध्ये गुंतवली आहे. त्यांना बिल्डरची आर्थिक स्थिती खराब आहे म्हणून कुठलाही त्रास होता कामा नये. तुम्ही बुडा किंवा मरा त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तुम्हाला घरखरेदीदारांचे पैसे परत करावेच लागतील अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात बिल्डरला निर्देश दिले. 
     
    न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.के.गोएल यांच्या खंडपीठाने सुपरटेक बिल्डरला हे निर्देश दिले. सुपरटेक बिल्‍डरच्या नोएडातील गृहबांधणी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणा-या १७ गृहखरेदीदारांना चार आठवडयांच्या आत पैसे परत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले. 
     
    पुढच्या सुनावणीला १७ गृहखरेदीदारांचे पैसे परत केल्याचा चार्ट सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला निर्देश दिले. कंपनी आर्थिक खराब स्थितीचे कारण देऊन घरखरेदीदारांचे हक्क डावलू शकत नाही असे न्यायमूर्ती मिश्रा आणि गोएल यांनी सांगितले. नियमभंगामुळे सुपरटेकचा प्रोजेक्ट वादाच्या भोव-यात सापडला असून, १७ जणांना त्यांनी गुंतवलेले पैसे परत हवे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय घरबांधणी क्षेत्रातील अशा प्रकारांसाठी एक उदहारण ठरणार आहे. 
======================================

मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी

  • First Published :07-September-2016 : 17:02:21

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ७ - 'जिस्म २' या मादक विषयावर आधारीत सिनेमामधून सनी लिऑनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीला बॉलिवूडमध्ये येऊन चार वर्ष होत आली तरी तिला अजून आपण पूर्णपणे बॉलिवू़डचे झाल्यासारखे वाटत नाही. 
     
    मी बॉलिवूडमध्ये अजूनही फिट बसत नाही. मला अजूनही मी बाहेरची असल्यासारखी वाटते असे सनीने सांगितले. बॉलिवूडमध्ये आपल्याला काही चांगले लोक भेटल्याचेही सनी मान्य करते. 


======================================

बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा

  • First Published :07-September-2016 : 18:07:55

  • ऑनलाइन लोकमत 
    लंडन, दि. ७ - मँचेस्टरच्या सुपरमार्केटमध्ये पाच दिवसांच्या मुलीला ठोसा लगावल्या प्रकरणी एका ६३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी एमाय डयुकर्स आपल्या पाचदिवसांच्या मुलीला घेऊन बाग्युले येथील टीस्को स्टोअरमध्ये गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पती आणि सात वर्षांची मुलगी होती. 
     
    दुकानात शॉपिंग करताना डयुकर्स यांना त्यांचे शेजारी भेटले. ही शेजारी महिला त्या दुकानात नोकरी करते.  डयुकर्स त्यांना आपली मुलगी कशी दिसते ते दाखवत होत्या. तितक्यात डयुकर्स यांच्या शेजारणीला ओळखीची एक महिला दिसली. 
     
    शेजारणीने त्या महिलेला हाक मारली. ती तिच्यापतीसोबत दुकानात शॉपिंग करत होती. त्या महिलेच्या पतीने थेट येऊन पाच दिवसांच्या एल्सी रोझला ठोसा लगावला. ती खरीखुरी मुलगी नसून बाहुली असल्याचे आपल्याला वाटले म्हणून आपण ठोसा लगावला असे आरोपीने पोलिसांना सांगितले. 
     
    अचानक झालेल्या या हल्ल्याने डयुकर्स पूर्णपणे भेदरल्या. क्षणभरासाठी काय झालेय तेच त्यांना कळले नाही. दुकानातील कर्मचा-यांच्या मदतीने त्यांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आरोपीची सध्या पोलिस चौकशी सुरु आहे,. 
======================================

उड्डाणपुलाखाली पार्किंग शक्य आहे का?

  • First Published :07-September-2016 : 05:44:24

  • मुंबई : उड्डाणपुलामुळे अद्यापही दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे का? तसे नसल्यास उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करणे शक्य आहे का? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
    मुंबईत बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ही वाहने मिळेल त्या जागी पार्क केली जातात. रस्त्याच्या बाजूला अनेक वाहने पार्क करण्यात येतात. यावर उपाय म्हणून उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्याची परवानगी द्या. मुंबईची वाहतूककोंडी थोडी सुरळीत होईल, असे निरीक्षण न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने नोंदवले.
    याचिकेनुसार, मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर बाहेरून वाहने येतात. मात्र वाहने पार्किंगसाठी जागा अत्यंत कमी आहे. एमएआरडीए, एमएसआरडीसी व महापालिकेचे उड्डाणपूल आहेत, मात्र त्याखाली पार्किंगला परवानगी न देण्याची राज्य सरकारची २० आॅगस्ट २००९ची अधिसूचना आहे. या ठिकाणी पार्किंग करण्यास परवानगी मिळाली तर एक लाख चारचाकींच्या पार्किंगची समस्या सुटेल.
    मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकारात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली पार्किंग करण्यास परवानगी देण्यात यावी. मुंबईमध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध करावी, अशी मागणी याचिकाकर्ते प्रशांत पोळेकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. उड्डाणपुलाखाली पार्किंग सुरू व्हायला पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यावर महापालिकेतर्फे अ‍ॅड. तृप्ती पुराणिक यांनी दहशतवादी हल्ल्या होण्याची शक्यता आहे म्हणून उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे, असे खंडपीठाला सांगितले.
    ‘अद्यापही दहशतवादी हल्ल्याची भीती कायम आहे का? तसे नसल्यास उड्डाणपुलाखाली पार्किंगसाठी परवानगी देणार का? मुंबईत बाहेरून वाहने येतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. दिल्लीत सम-विषम सूत्र (आॅड-इव्हन) यशस्वी झाले. मुंबईत याची काय स्थिती आहे? आपण १० वर्षे पुढचा विचार करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने मुंबईत सम-विषम सूत्राचा विचार करण्यात येणार आहे की नाही, याबद्दलही महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. 
======================================

No comments: