Wednesday, 28 September 2016

नमस्कार लाईव्ह २७-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानला जबर धक्का, इस्लामाबादमध्ये होणारं सार्क संमेलन रद्द? 
२- जैसलमेरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा युद्ध सराव 
३- पाकिस्तान म्हणजे नेपाळ आणि भूतान नाही- मुशर्रफ
४- विज्ञानाचा आविष्कार - तिघांपासून जन्मले जगातील पहिलं बाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- भारतातले 75 टक्के मृत्यू वायू प्रदुषणामुळे : WHO
६- दुष्काळासाठी 1200 कोटींची अतिरिक्त मदत, राज्याच्या पुरवणी मागणीला केंद्र सरकारकडून मंजूरी 
७- छत्तिसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा. 
८- नागपूर: विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी, संविधान चौकात आंदोलन
९- महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावरील एमएस धोनी पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही
१०- उत्तरप्रदेश - बरेलीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या रोड शो
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- 14 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मतदार नोंदणी अभियान 
१२- 'ते' कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही : संजय राऊत 
१३- अॅट्रॉसिटी कायम राहण्यासाठी लातूरमध्ये महामोर्चा
१४- सामना कार्टून: आधी परभणीत, आता औरंगाबादेत गुन्हा
१५- मुंबईत पोलिसांसाठी 25 ते 30 हजार घरं बांधण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची घोषणा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- सायन स्टेशनवर महिला टीसीच्या मारहाणीत युवती बेशुद्ध 
१७- मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट
१८- धुळ्यात उन्हाचा तडाखा, मराठा मोर्चातील 102 जण रुग्णालयात
१९- वर्धा : मूकमोर्चासाठी वर्धेत विविध सामाजिक संघटनांची बैठक 
२०- जळगाव महापालिकेतील 2 कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
२१- छत्तीसगडमध्ये बॉम्ब स्फोटात जवान हुतात्मा 
२२- हैदराबाद; मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'वर पाकिस्तानात बंदी
२६- सैनिकांसाठी आम्ही पाकिस्तानला पराभूत करु - पीआर श्रीजेश
२७- बीसीसीआयला आदेश मानायला भाग पाडू - सर्वोच्च न्यायालय
२८- गंभीरनंतर युवराजचीही टीम इंडियात एंट्री?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करा - संभाजी ब्रिगेड 

सोयाबीन, उडीद, मुग ह्या हाताशी आलेल्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. मागील तीन वर्षापासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीचा पाऊस दिलासा देणारा होता... पण, परतीच्या पावसाने हाताशी आलेले पिक जमीनदोस्त झाले आहे. उभे पिक जमिनीवर आडवे झाले आहे. बहुतांश ठिकाणी पिकाच्या शेंगामधून मोड आलेले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हताश झाला आहे. 
या पिकांचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष संभाजी कल्याणकर व राजू मोरे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
===================
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
==================================

अॅट्रॉसिटी कायम राहण्यासाठी लातूरमध्ये महामोर्चा

अॅट्रॉसिटी कायम राहण्यासाठी लातूरमध्ये महामोर्चा
लातूर: एकीकडे मराठा समाजाचा मोर्चा निघत असताना, आता दलित समाजाचेही मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये आज दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला एमआयएमनेही पाठिंबा दिला. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली.

शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. मराठा मोर्चाप्रमाणेच अत्यंत शांतपणे हा मोर्चा काढण्यात आला.

अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. त्याचे खटले तातडीने निकालात काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं, अशा मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. शिवाय गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय तातडीने थांबवावेत, अशी मागणीही करण्यात आली.

मराठा समाजाच्या मोर्चाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हा मोर्चा आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. या मोर्चाला एमआयएमनेही पाठिंबा दिला होता. अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता.
लातूरमध्ये येत्या 15 ऑक्टोबरला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

महामोर्चाच्या प्रमुख मागण्या
  • अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
  • यासाठी खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे
  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी
  • मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं
  • गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय तातडीनं थांबवावे

======================================

सायन स्टेशनवर महिला टीसीच्या मारहाणीत युवती बेशुद्ध

सायन स्टेशनवर महिला टीसीच्या मारहाणीत युवती बेशुद्ध
मुंबई : मुंबईत सायन स्थानकावर एका महिला टीसीने महिला प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत युवती बेशुद्ध झाल्याची माहिती आहे.
सायन स्थानकात महिला टीसीचा एका महिला प्रवाशासोबत वाद झाला. या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. टीसीच्या मारहाणीत संबंधित महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचं म्हटलं जातं. यानंतर चिडलेल्या प्रवाशांनी महिला टीसीलाही मारहाण केली आहे.
या सर्व मारहाणीच्या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिला टीसीला ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी सुरु असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

==================================

'ते' कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही : संजय राऊत

'ते' कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही : संजय राऊत
नवी दिल्ली : ‘सामना’मधील कार्टून वादावर अखेर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही, असं म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे
‘सामना’मधून गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली जात आहे. गरीब मराठा समाजाबाबत सहानुभूती बाळगा, असं मत ‘सामना’तून व्यक्त केलं जात होतं.
एखादा कायदा दुसऱ्या समाजासाठी अन्यायकारक ठरत असेल, तर काळानुसार कायद्यात बदल व्हायलाच पाहिजेत, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आरक्षण मिळावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणीही राऊत यांनी केली.

==================================

'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'वर पाकिस्तानात बंदी

'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'वर पाकिस्तानात बंदी
मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाक संबंध ताणले गेल्यानंतर आता पाकिस्तानकडूनही चुळबूळ सुरु झाली आहे.
सुशांतसिंग राजपूत याची मुख्य भूमिका असलेला ‘एम एस धोनी..’ हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतासोबतच हा सिनेमा पाकमध्ये रिलीज होणार होता. मात्र पाकिस्तानने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली. सिंधु नदीच्या पाणीवाटप करारावरुन आधीच भारताने कठोर भूमिका घेतली आहे. ‘रक्त और पानी साथ साथ नही बह सकते’, असे उद्गार मोदींनी काढले होते. त्यानंतर सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला चांगलंच खडसावलं होतं.

==================================

मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट

मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट
नागपूर : नागपुरात मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा पडला आहे. या दरोड्यात तब्बल 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याची माहिती आहे.
नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत भीमचौकावरील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत ही मोठी लूट झाली. सहा लुटारुंनी शस्त्राच्या धाकावर 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती मणप्पुरमतर्फे पोलिसांना देण्यात आली आहे.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

==================================

विज्ञानाचा आविष्कार - तिघांपासून जन्मले जगातील पहिलं बाळ



  • न्यूयॉर्क, दि. 28 -  मूल होत नसलेल्या अनेक दाम्पत्यांनी परस्त्रीच्या सहाय्यानं गुणसूत्रे जुळवून सरोगसी पद्धतीनं बाळाला जन्म देण्याचा आविष्कार आपण पाहिलाय. पण मॅक्सिकोमधील डॉक्टरांनी चमत्कार करून दाखवला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तीन जणांच्या डीएनएचा वापर करून बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. न्यू सायन्टिस्ट या नियतकालिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या डीएनएमध्ये आई, वडील आणि एक माता डोनरच्या डीएनएचा वापर करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे आईच्या गुणसूत्रांमध्ये असलेले दोष बाळामध्ये आले नसून, हे बाळ निरोगी जन्माला आले आहे.
    आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद मिळविण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे या क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, त्यात नवनवीन संशोधनही केले जात आहे.

No comments: