Friday, 23 September 2016

नमस्कार लाईव्ह २२-०९-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरु ? हायवेवर केलं विमानांचं लॅडिंग
२- एफ-१६ लढाऊ विमानांच्या सरावामुळे पाकिस्तानी जनता भयभयीत
३- चीन व पाकिस्तानची मैत्री अभेदय : कियांग
४- भारताच्या ३१ शिक्षण संस्था जगात टॉपवर
५- पाकिस्तानला झटका, काश्मीरमध्ये हस्तक्षेपास यूएनचा नकार
६- युद्ध सराव करुन पाकिस्तानने पाडला आपलाच शेअर बाजार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- समान पाणी वाटप कायद्यानुसार मराठवाड्याला पाणी द्या - मुंबई हायकोर्ट
८- व्हाट्सअॅप युझर्सची माहिती फेसबूकला देऊ नका, उच्च न्यायालयाचा आदेश
९- महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करणार
१०- अन्नधान्य उत्पादन वाढणार
११- ...तर युजर्सची माहिती डीलीट होते!
१२- ‘किंगफिशर’च्या अधिकाऱ्यास तुरुंगवास
१३- सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी
१४- BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर
१५- डाळी, खाद्य तेलाच्या साठामर्यादेला मुदतवाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे
१७- गोवा - 2008 स्कारलेट कीलिंग बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपींची सुटका
१८- नवरात्रौत्सवावरही खडडयांचे सावट
१९- महिलांवर टिप्पणी करताना निर्बंध घाला
२०- मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय
२१- बांधकाम खात्यात हेवेदावे
२२- चिमुरडयाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- राजस्तान; सेल्फी काढण्याच्या नादात अजगराने घेतला चावा
२४- पंजाब; नेता पुत्राकडून गर्भवती परिचारिकेचा विनयभंग
२५- 'तुमचाही दाभोलकर करू'; रंगारी ट्रस्टला धमकी
२६- मराठवाड्यात जोरदार पाऊस; एकाचा मृत्यू
२७- कानपूर; पत्नीने चावा घेतल्याने पतीचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात
२९- आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
३०- ...तर सचिनची संघातून हकालपट्टी झाली असती!
३१- टी शर्ट-लाडूचे आमिष, तरीही प्रेक्षकांनी फिरविली पाठ !
३२- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान
३३- औरंगाबादमध्ये रंगणार राज्य पिकलबॉलचा धडाका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
========================================

व्हाट्सअॅप युझर्सची माहिती फेसबूकला देऊ नका, उच्च न्यायालयाचा आदेश


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 23 - व्हाट्सअॅप अकाऊंट डिलीट करणा-यांची माहिती तसंच डाटा लगेच काढून टाका. सोबतच व्हाट्सअॅप युझर्सची माहिती फेसबूकसोबत शेअर करु नका असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच व्हाट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅपला नियामक आराखड्यात आणू शकतो याची विचारणा सरकार आणि ट्रायकडे करण्यात आली आहे. 
     
    एखाद्या युजरचे अकाउंट समाप्त झाल्यानंतर त्या युजरची माहिती सर्व्हरवर राहत नाही, असा खुलासा बुधवारी व्हाटस्अ‍ॅपच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. व्हट्सअ‍ॅपच्या वतीने न्यायालयात असेही सांगण्यात आले की, आमचे धोरण हे युजर्सच्या गोपनीयतेचे कुठेही उल्लंघन करीत नाही; तर ‘एंड टू एंड इन्स्क्रीप्शन’मुळे तिसरी व्यक्ती मॅसेज वाचू शकत नाही. या प्रकरणी न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. 
     
    कर्मण्यासिंह सरीन व श्रेया सेठी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपने ही माहिती दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रतिभा सिंह यांनी बाजू मांडली. मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता ढिंगरा सहगल यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. अकाउंट समाप्त झाल्यानंतर युजर्सची माहिती राहते का, असा सवाल न्यायालयाने केला होता. त्यावर व्हाट्सअ‍ॅपने ही माहिती दिली होती. मेसेज डिलिव्हर्ड झाल्यानंतर तो डीलीट करण्यात येतो. तर डिलिव्हर्ड न झाल्यास तो ३० दिवसांपर्यंत ठेवण्यात येतो, असेही सांगण्यात आले. अर्थात, व्हॉट्स अ‍ॅपच्या या खुलाशाचा व नव्या गोपनीय धोरणाचा याचिकाकर्त्यांनी विरोध केला होता. 
     
    फेसबुकने व्हाटस्अ‍ॅपचा ताबा घेतल्यानंतर व्हाटस्अ‍ॅपने २५ ऑगस्ट रोजी धोरणात बदल केला आहे. त्यानुसार युजर्सला आपली माहिती शेअर करण्यासाठी या सर्वांत मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटचा फेसबुकचा पर्याय देण्यात आला आहे. अर्थात, हा पर्याय नको असल्यास ३० दिवसांच्या आत म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत युजर्सला यातून बाहेर पडता येईल.=
==========================================
==========================================

No comments: