Tuesday, 20 September 2016

नमस्कार लाईव्ह १९-०४-२०१६सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- टिवटिवाटासाठी आता शब्द कमी नाही पडणार 
2- श्रीलंकन क्रिकेटपटू नुआन कुलसेकराला अटक आणि सुटका 
3- उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा 
4- कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ 
5- कांगोमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांमधल्या हिंसाचारात 50 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
6- पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्याच्या हालचाली
7- उरीमध्ये दहा दहशतवादयांचा खात्मा, एक जवान शहीद 
8- एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला रस्त्यात गाठून केले २० वार
9- उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा 
10- दोन हजार कोटींची सोने तस्करी उघड
11- सेन्सेक्स सलग चौथ्या सत्रात वाढला
12- जीएसटी नेटवर्कमध्ये वाढणार केंद्र सरकारचा आर्थिक सहभाग
13- जिओला आणखी आंतरजोडणी पॉर्इंट देणार
14- भीतीच्या सावटामुळे दोन्ही निर्देशांक घसरले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
15- शेतकऱ्यांनी पाणी मागितलं, लाठ्या मिळाल्या 
16- स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, 27 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरं 
17- मुंबईत कोसळधार! पहाटेपासून पावसाची तुफान बॅटिंग
18- मराठा समाजाचे प्रश्न हाताळायला मुख्यमंत्री असमर्थ - उद्धव ठाकरे
19- सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात
20- खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे!
21- महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण
22- तारांकित हॉटेल उद्योगाचे ब्रँड इंडिया!
23- छत्रपती संभाजी राजे भोसले यांची पर्यटन दूत म्हणून निवड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
24- तरुणाच्या प्रसंगावधानाने कुर्ल्यात शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले
25- दिल्ली; एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर केले तब्बल 20 वार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
26- इशांतला चिकनगुनिया, पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार
27- विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का कानपूरमध्ये येण्याची शक्यता
28- हर्षदा निठवेला सांघिक गोल्ड
29- दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली
30- खेळपट्टीबाबतचा दृष्टिकोन बदलावा : हरभजन सिंग
31- जपानकडून किर्गिझस्तानचा धुव्वा
32- नव्या मोसमाची विजयी सुरुवात करू
33- जपान ओपन सुपर सिरीज : कश्यप मुख्य फेरीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=======================================

शेतकऱ्यांनी पाणी मागितलं, लाठ्या मिळाल्या

शेतकऱ्यांनी पाणी मागितलं, लाठ्या मिळाल्या!
धुळे : धुळ्यात पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हक्काच्या पाण्याची विचारणा करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा तालुक्यात उणापुरा 50 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे आख्खा हंगाम वाया गेला. प्यायला पाणी नाही, याची तक्रार करुनही सरकार दाद देत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाला घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही अडवली. मात्र पाणी मागायला आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं सौजन्य जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलं नाही.
त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत.
यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून जास्त आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान, सिंदखेडा तालुक्यातील खंडाला, भदाणे, मेहरगावसह 10 गावात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. तसंच पाऊस नसल्याने चाऱ्याची कमतरता आहे, त्यामुळे छावण्या सुरु कराव्या आणि पिकांची 50 टक्क्यापेक्षा कमी आणेवारी जाहीर करावी अशी मागणी आहे.

=======================================

स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, 27 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरं

स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, 27 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 5 शहरं
नवी दिल्ली : स्मार्ट सिटीची तिसरी यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. देशातील 12 राज्यांमधील 27 शहरांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातील पाच शहरांचा या 27 शहरांना समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी तिसरी यादी जाहीर केली.

महाराष्ट्रातील ‘या’ पाच शहरांचा समावेश

  1. कल्याण
  2. नाशिक
  3. नागपूर
  4. ठाणे
  5. औरंगाबाद

=======================================

पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्याच्या हालचाली

पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्याच्या हालचाली
नवी दिल्ली : ‘7 रेसकोर्स रोड’ हे पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव प्रसिद्ध आहे. मात्र हे नाव बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ‘7 एकात्म मार्ग’ असं या निवासस्थानाचं नामकरण करण्याची मागणी झाली आहे.

भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे केली आहे. लेखी यांनी दिलेल्या प्रस्तावात पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नामकरण ‘7 रेसकोर्स रोड’ ऐवजी ‘7 एकात्म मार्ग’ करण्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्लीतला संबंधित परिसर एनडीएमसी अंतर्गत येतो आणि मीनाक्षी लेखीही याच्या सदस्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या रस्त्याचं नामकरण ‘7 एकात्म मार्ग’ करावं असं त्या म्हणतात.

‘7 रेसकोर्स रोड’ हे सध्या अस्तित्वात असलेलं नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाही. मात्र नाव बदलल्यास प्रत्येक पंतप्रधानाची नाळ समाजातील शेवटच्या व्यक्तीशी जोडली जाईल, अशी आशा लेखी यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीभेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते बुधवारी होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नाहीत. त्यामुळे मीनाक्षी लेखी यांच्याकडे नगर परिषदेचं अध्यक्षपद असेल. अशा परिस्थितीत पंतप्रधान निवासाचं नवीन नामकरण निश्चित मानलं जात आहे.


=======================================

इशांतला चिकनगुनिया, पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

इशांतला चिकनगुनिया, पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार
कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

27 वर्षीय इशांतला चिकनगुनिया झाला असून तो अद्याप यातून पूर्णत: बरा झालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कानपूर कसोटी हा भारताचा 500 वा कसोटी सामना असेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.
इशांतच्या जागी अजून कोणाच्याही नावाची चर्चा नाही. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
राजधानी दिल्लीमध्ये चिकनगुनियाने थैमान घातलं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 1000 नागरिकांना चिकनगुनिया झाला आहे. 2011 पासून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 2011 मध्ये 107 जणांना चिकनगुनिया झाला होता.

=======================================

मुंबईत कोसळधार! पहाटेपासून पावसाची तुफान बॅटिंग

मुंबईत कोसळधार! पहाटेपासून पावसाची तुफान बॅटिंग
मुंबई मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई दक्षिणमध्ये 9.39, मुंबई पूर्व 20.62 आणि मुंबई पश्चिममध्ये 20.91 इतक्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभरही मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे.

कालच हवामान खात्याने येत्या तीन-चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 21 तारखेपासून पावसाचा जोर वाढेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे संचालक एन. चट्टोपाध्याय यांनी दिली.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून, धरणक्षेत्रातही पाणी वाढत आहे.

=======================================

तरुणाच्या प्रसंगावधानाने कुर्ल्यात शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले

तरुणाच्या प्रसंगावधानाने कुर्ल्यात शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले
गुरुराज सकपाळ (फोटो सौजन्य : मिड डे)
मुंबई : मुंबईतील एका जागरुक प्रवाशामुळे हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्या शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत. 23 वर्षीय इंजिनिअर गुरुराज सकपाळने कुर्ला स्थानकात रेल्वे रुळाला गेलेले तडे वेळीच पाहिल्यामुळे मोठा अपघात टळला.

चुनाभट्टीचा रहिवासी असलेला गुरुराज नेहमीप्रमाणे अंधेरीला ऑफिसला जाण्यासाठी कुर्ला स्थानकात ट्रेन बदलत होता. त्यावेळी ब्रिजवरुनच त्याने रुळाला तडे गेल्याचं पाहिलं. नेमकं त्याच क्षणी एक ट्रेन कुर्ला स्टेशन सोडण्याच्या तयारीत होती. ही ट्रेन निघाली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे गुरुराजने मोटरमनचं लक्ष त्याकडे वेधलं.

रेल्वे रुळाला किमान दोन इंचांचा तडा गेल्याचं पाहिल्याचं गुरुराज सांगतो. मोटरमन परमहंस गिरी यांनी ट्रॅकचं परीक्षण केलं असता फिशप्लेट्स ढिले झाल्याचं लक्षात आलं. गिरी यांनी तात्काळ कंट्रोल रुमला याची माहिती दिली. त्यानंतर अत्यंत कमी वेगाने लोकल या ट्रॅकवरुन नेण्यात आली.

जर हा प्रकार लक्षात आला नसता, तर रेल्वेच्या इतिहासात मोठी दुर्घटना घडली असती, अशी कबुली राष्ट्रीय रेल्वे कामगार संघटनेचे सचिव वेणू नायर यांनी दिली आहे. सकाळी 7.57 वाजता ही माहिती कंट्रोल रुमला दिल्यानंतर 15 मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
=======================================

No comments: