Thursday, 30 June 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लास वेगास; तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न! 
२- पाकचे पुन्हा तुणतुणे: 26/11 चे पुरावे द्या 
३- भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले... 
४- काबूलमध्ये बसवर हल्ला; 40 जण ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट 
६- युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे 
७- 'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो 
८- खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच ! - विखे पाटील 
९- राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा 
१०- पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही 
११- पीडित महिलेसोबत सेल्फी लज्जास्पद- कॉंग्रेस 
१२- जाहिरातींचा खर्च मोदींच्या कपड्यांपेक्षा कमी - आप 
१३- टपाल खात्याच्या 'पर्सनल' तिकिटांना प्रतिसाद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ 
१५- मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट 
१६- ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात 
१७- केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी 
१८- रायगड; 58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार 
१९- पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे 
२०- कानपूर; आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- अमरावती; इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष 
२२- चेंबूर; मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या 
२३- लातूर; रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
२४- हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले; यवतमाळमध्येही जोरदार पाऊस 
२५- जळगाव; मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर 
२७- पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==============================================

इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष

इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष
अमरावती : मातृत्त्व… निसर्गाने स्त्रीला दिलेलं वरदान. मात्र अमरावतीतील एका शाळकरी मुलीसाठी मातृत्त्व वरदान नव्हे तर शाप ठरला आहे. गावातील एका वासनांध सैतानाच्या अत्याचारामुळे 17 वर्षाच्या मुलीला इच्छेविरुद्ध बाळाला जन्म द्यावा लागला.
कुमारी माता हा नुसता शब्दच अस्पृश्य मानला जातो. मात्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आदिवासी, मागासलेल्या भागातील जळजळीत वास्तव आहे. मात्र मेळघाटात 17 वर्षांच्या कुमारी मातेला बाळाच्या दुधासाठी 300 रुपयांना स्वत:चा मोबाईल विकावा लागला. इतकंच नाही तर बाळाच्या वडिलांचं नाव म्हणून स्वत:च्या वडिलांचं नाव लिहावं लागलं.
खरंतर या राणीचं (नाव बदललं आहे) शाळेत जाण्याचं वय. घरी अठराविश्व दारिद्र्य. शिकून आपल्या कुटुंबाला गरिबीच्या विळख्यातून सोडवण्याचं स्वप्न राणीने पाहिलं. पण, गेल्या वर्षी उन्हाळाच्या सुट्टीत राणी गावात आली आणि तिचं आयुष्य एका खडतर वळणावर येऊन पोहोचलं.
कारण गावात राहणाऱ्या दिनेश ठाकरेने तिच्यावर अतिप्रसंग केला. दिनेश ठाकरेमुळे राणीला दिवस गेले. राणीचे आई-वडील दाद मागण्यासाठी दिनेशच्या घरी गेले. राणीवर अत्याचार करणारा दिशेन धनाढ्याचा पोर. आई-बापाने पैशांच्या जोरावर मुलाच्या चुकांवर पांघरुन घातलं.
मात्र राणीच्या पदरात एका लेकराची जबाबदारी पडली. डॉक्टरने जेव्हा बाळाच्या पित्याचं नाव विचारलं, तेव्हा राणीने रकान्यात आपल्याच बापाचं नाव लिहिलं. आता या तान्हुल्या जीवाला वाढवण्यासाठी राणीचा संघर्ष सुरु आहे.
मुलाच्या जन्मानंतर पोलिसांनी राणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनेश ठाकरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रकरणाचा तपास डीएनए रिपोर्ट अभावी खोळंबला आहे.
राणीची कैफियत घेऊन एबीपी माझाची टीम पोलीस अधीक्षकांकडे गेली. तूर्तास तरी एसपी लखी गौतम यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीचं आश्वासन दिलं आहे.
आता राणीला एक नव्हे तर तीन लेकरांना संभाळावं लागत आहे. कारण तिच्या भावाच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं भावाच्या दोन लेकरांची जबाबदारीही तिच्याच खांद्यावर आली आहे.
==============================================

सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ

सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ
अकोला : रस्ते विकासाच्या निधीवरुन अकोला महापालिकेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. माईकची तोडफोड, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे असा प्रकार महापालिका सभागृहात पाहायला मिळाला. एवढंच नाही तर काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर मदन भरगड यांनी महापालिकेचा चित्रीकरण कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला.
सरकारकडून अकोला महापालिकेला 5.75 कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीचं वाटप करताना सत्ताधारी भाजप-शिवसेनेने विरोधकांना डावलल्याच आरोप करत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भारिपच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. या गोंधळात भारिपचे नगरसेवक रामा तायडे यांच्या बोटाला दुखापत झाली असून 12 टाके पडले आहेत. इतकंच नाही तर विरोधांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना ‘चोर-चोर’ म्हणत सभागृह दणाणून सोडलं आहे.

महापौरांनी मात्र या गोंधळाप्रकरणी विरोधकांना दोषी धरलं आहे. सहा विषयांना गोंधळातच मान्यता देत सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली.
==============================================

युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे

युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना- भाजप युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही. ते दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे. ज्या धोरणात्मक  गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. वनमंत्रालयाने 1 जुलैरोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मुनगंटीवारांचं हे निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाद मिटेल की नाही माहित नाही
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे.
त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
==============================================

गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट

गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : तिसरं लिंग अर्थात थर्ड जेंडरमध्ये फक्त ट्रान्सजेंडर व्यक्तींचाच समावेश होईल; गे, लेस्बियन आणि बायसेक्शुअल यांना या गटात समाविष्ट केलं जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने 2014 मधील स्वतःचाच निर्णय बदलण्यास नकार दिला आहे.

ट्रान्सजेंडर व्यक्तींना तिसरं लिंग म्हणून सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये मान्यता दिली होती. ट्रान्सजेंडरची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत केंद्राने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केली. गे, लेस्बियन (समलैंगिक) आणि बायसेक्शुअल (उभयलिंगी) व्यक्तींना तिसऱ्या लिंगात समाविष्ट करणार नसल्याचं कोर्टाने ठणकावून सांगितलं.

LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) समुदायाला ओबीसी (मागासवर्गीय) मध्ये धरुन ओबीसींनी दिल्या जाणाऱ्या सुविधा या समुदायाला द्याव्यात का, अशी विचारणा केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेत केली होती. कोर्टाचा निर्णय लागू करण्यात अडचणी येत असल्याचं केंद्राने सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना तिसरं लिंग अशी वेगळी ओळख मिळाली होती. यापूर्वी ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्त्री किंवा पुरुष यापैकी एक पर्याय निवडण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
==============================================

मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट

मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट !
मुंबई : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाघाचा फायबरचा पुतळा भेट दिला. मुनगंटीवार यांनी ‘मातोश्री’वर जाऊन हा पुतळा भेट दिला.

वनमंत्रालयाने 1 जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे.

त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

त्यामुळे मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळे सेना-भाजपचा तणाव कमी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
==============================================

मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या

मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या
मुंबई : मुलाच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या चेंबूरमध्ये समोर आला आहे. सावित्री दोरणाली असं या महिलेचं नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.

काही वर्षांपूर्वी सावित्रीच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, यानंतर सावित्री आपल्या तीन मुलांसह या भागात राहत होती. यातील दोघांचा आजारादरम्यान मृत्यू झाला.

सावित्रीच्या सहा वर्षांच्या मुलाला मिरगीचा त्रास होता. त्याच्या उपचारासाठी गेले काही महिने सावित्रीला मोठ्या प्रमाणात खर्च येत होता.
अत्यंत कमी पगारात काम करणाऱ्या सावित्रीला आपल्या मुलावरच्या उपचारांचा खर्च झेपत नव्हता, म्हणून अखेर परिस्थितीला कंटाळून सावित्रीने ओढणीने गळा दाबून आपल्याच मुलाची हत्या केली.
==============================================

रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लातूर : रस्ता खराब असल्याने बस येत नाही. त्यामुळे तीन गावांतल्या विद्यार्थ्यांवर शाळेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहणार आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून भाड्याच्या खासगी वाहनाने विद्यार्थ्याची ने-आण सुरु केली आहे. मात्र या विद्यार्थ्यांनीच त्यावर उपायही शोधून काढला आहे. हे चिमुरडे थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहित आहेत.

हे विद्यार्थी टेम्पो आणि जीपमध्ये रोज प्रवास करतात. कारण रस्ता खराब असल्याने जाणवळाला एस टी बस येत नाही. कवठाळी ते जाणवळ ९ किलोमीटर, दवेली ते जाणवळ ६ किलोमीटर आणि आनंदवाडी ते जाणवळ १४ किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे या तीन गावातील विद्यार्थ्याना पाचवी नंतर शिक्षण घ्यावयचे झाल्यास त्यांना जाणवळाला यावे लागते, मात्र एस टी बस येतच नाही रस्त्याचे कारण दिले जाते शेवटी ह्या गावातील विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी एकत्र येत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे ते ही शाळा बंद ठेवून.

जानवळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि सरस्वती विद्यालयच्या शिक्षकांनी महिना पस्तीस हजार रुपये स्वखर्चातून जीप आणि टेम्पोचे भाडे भरत आहेत. शेवटचा उपाय म्हणून ते मुख्यमंत्र्याना पत्र लिहणार आहेत
==============================================

ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात

ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
ठाणे : मंगळवारी ठाण्यात पडलेल्या दरोड्याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी काही जणांना नाशिकमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय.

बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 5 ते 6 कोटी रुपये लुटले गेल्याची माहिती आहे.
==============================================

VIDEO: तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!

VIDEO: तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!
फोटो सौजन्य: यू ट्यूब व्हिडिओ
लास वेगास: अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका व्यक्तीनं चक्क स्मार्टफोनशी लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आली आहे.

जसा लग्नसोहळा असतो तसाच हा लग्न सोहळा देखील पार पडला. फक्त एकाच गोष्टीमध्ये फरक होता. नवरा मुलगा एरॉन चेर्वेनाकनं लग्नासाठी खास ड्रेस परिधान केला होता. पण त्याची ‘नवरी’ एका डब्यात बंद होती. लास वेगास रिव्ह्यू जनर्लमध्ये ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

लिटील वेगास चॅपलच्या पादरीनं  लग्नाच्या विधी पार पाडताना चेर्वेनाकला विचारलं की, ‘एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस? तिचा सन्मान करतोस?’ त्यावर त्यानं उत्तर दिलं की, ‘होय मी असं करतो.’

द लिटिल लास वेगास चॅपलचा मालक मायकल केलीच्या हवाल्यानं केटीएनव्ही डॉट कॉमचं म्हणणं आहे की, केलीच्या मते, ‘सगळ्यात आधी मला वाटलं की हे काय आहे? त्यानंतर म्हटलं की, ठीक आहे… करतात असं.’

केलीच्या मते, ‘चेर्वेनाकने आपल्या स्मार्टफोनशी प्रातिनिधिक स्वरुपात लग्न करुन समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. लोक आज समाजात आपल्या फोनशी एवढं जोडले गेले आहेत की, त्यांना कायम त्याच्यासोबत राहायचं असतं.’

==============================================

केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी

केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
तिरुवनंतपुरम: केरळमध्ये दुचाकी वाहनांचे वाढत्या रस्ते अपघातानं चिंतित असणाऱ्या राज्य सरकारन काल एक वेगळीच घोषणा केली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी केरळ सरकारनं फारच नामी शक्कल लढवली आहे. ज्या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही. अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे.

परिवहन आयुक्त तोमिन जे. तचनकारी म्हणाले की, ‘हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. यासंबंधी पेट्रोलियम कंपनी आणि पेट्रोल पंप मालकांना आवश्यक असे आदेश जारी करण्यात आले आहेत.’

एक ऑगस्टपासून सगळ्यात आधी तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि कोझिकोड येथे प्रायोगिक तत्वावर हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यातही हा नियम लागू केला जाईल.

परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तेल कंपन्या, डिलर आणि पेट्रोल पंप मालकांशी आमची चर्चा झाली असून विना हेल्मेट असणाऱ्या चालाकांना पेट्रोल न देण्याचे आदेश दिले आहेत.’

एक अधिकृत पत्रकात असं सांगण्यात आलं आहे की, केरळमध्ये रस्ते अपघातात 50 टक्के दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 80 टक्के लोकांना डोक्याला जबर मार लागल्यानं मृत्यू झाला आहे.
==============================================

हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले 

हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले !
हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू  या गावांना बसला. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे.

कुरुंदा गाव जलमय झालंय. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. यात 10 ते 15 घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पुरामुळे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.

या पुराच्या पाण्यामुळे दिवसा शेतात काम करण्यासाठी गेलेले काही जण शेतातच अडकून पडले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखाड्यांवरील जनावरे वाहून गेली आहेत.

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्हालळे परिसरात रात्रीतून 103 मि.मी. पावसाची नोंद झाली.
hingoli rain 3
यवतमाळमध्येही जोरदार पाऊस

यवतमाळमध्ये आज जोरदार पाऊस झाला.  यामुळे काही काळ घोटी गावजवळच्या पुलावरुन पाणी वाहतं होतं.. यवतमाळबरोबरच वर्ध्याच्या काही भागातही सरी बरसल्या आहेत. ज्या पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसलाय, त्याठिकाणी खोळंबलेल्या पेरण्याही सुरु झाल्या आहेत. आज या घडीपर्यंत विदर्भ वगळता राज्यात इतरत्र फारसा पाऊस नाही.
==============================================

'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो

'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो
कबाली हा चित्रपट 15 किंवा 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो : गलाटा.कॉम)
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाची चर्चा सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळत आहे. रजनीच्या चाहत्यांनी चॉकलेटचा पुतळा उभारुन त्याला अनोखी भेट दिली असतानाच आता ‘एअर एशिया’च्या विमानावरच थलैवाचा फोटो पाहायला मिळणार आहे.

मलेशियन एअरलाईन असलेल्या ‘एअर एशिया’ने रजनीचा चेहरा विमानावर झळकवून त्याला मानवंदना दिली आहे. कबाली या वर्षातला सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट मानला जात असून रजनीकांतसोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही यात दिसणार आहे. कबाली चित्रपटाचा टीझर आणि पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. कोट्यवधी प्रेक्षकांनी हा टीझर पाहिला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप वादात अडकली आहे.

एअर एशिया कबालीची ऑफिशिअल एअरलाईन पार्टनर आहे. चित्रपटात काही सीन्समध्ये हे विमान वापरण्यात आलं आहे. विमानाच्या बाह्य भागावर रजनीच्या डॉन अवतारातले चित्र रंगवून विमान कंपनीने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या विमानाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
==============================================

खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच !


  • ऑनलाइन लोकमत
    शिर्डी, दि. 30 : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्याकडे असलेली देश हादरविणारी माहिती दडवून ठेवू नये. ही बाब देशहिताची नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंनी ‘तो’ गौप्यस्फोट करावाच, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. खडसे यांनी काल जळगाव येथे केलेल्या विधानासंसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंकडे धक्कादायक व संवेदनशील माहिती असतानाही ते बोलणार नसतील तर त्यांनी का व कोणत्या स्वार्थासाठी मौन बाळगले, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे देश हादरण्याची चिंता सोडून खडसेंनी ती माहिती उघड करण्याची गरज आहे.
    आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भांत विरोधकांनी पुरावे न दिल्याचा खडसेंचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, राज्यातील भाजप-शिवसेना मंत्र्यांच्या भ्ररष्टाचारा संदर्भात अनेक पुरावे समोर आले. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे आणि अनेक संस्था व व्यक्तींनी वेगवेगळे पुरावे दिले.
==============================================

58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार


  • जयंत धुळप / दि.30 (अलिबाग)
    रायगड पाेलीस दलातील राष्ट्रपती पाेलीस पदक प्राप्त क्रिडापटू पाेलीस उप निरिक्षक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या वयाच्या 58 व्या वर्षी गुरुवारी सकाळी 5 वाजता रायगड जिल्हा पाेलीस मुख्यालयाच्या मैदानावरुन धावण्यास प्रारंभ करुन अलिबाग-पाेयनाड-वडखळ-साई मंदिर (पेण) आणि परत असे 58 किमी अंतर तब्बल 7 तासात पार करुन आपल्या सेवानिवृत्ती दिनी आगळा संदेश महाराष्ट्र पाेलिस दलास दिला आहे.
     या दरम्यान वडखळ येथे जयकिसान विद्यामंदिरचे शिक्षक पी.व्ही,म्हात्रे यांनी विद्याथ्यार्ंसह पाटील यांना शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी देखील पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान पाटील अलिबाग मध्ये परतल्यावर येथील जे.एस.एम.काॅलेजचे प्राचार्य प्रा.अविनाश आेक यांनी काॅलेज जवळ पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. पाेलीस मुख्यालयात पाेहाेचल्यावर एकच जल्लाेष झाला. पाेलिस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे आणि अनेक मान्यवरांनी पाटील यांचे अिभनंदन केले.
    मला आज काेणताही रेकाॅर्ड नाेंदवायचा नव्हता तर दरराेज व्यायामाकरीता वेळ दिल्यास 58 व्या वर्षी देखील आपण 58 किमी अंतर धावून पार करु शकताे हा संदेश माझ्या पाेलीस दलातील तरुण सहकार्यांना माझ्या कृतीतून द्यायचा हाेता. ताे मी देवू शकलाे याचा माेठा आनंद असल्याचे पाटील यांनी यावेळी बाेलताना सांगून माझ्या उपक्रमास सहकार्य केल्या बद्दल त्यांनी जिल्हा पाेलीस अधिक्षक माे.सुवेझ हक यांना अखेरीस धन्यवाद दिले.
==============================================

रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 30 : कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवीशास्त्री यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तो म्हणाला, रवीशास्त्री यांच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते. कुंबळे सर्वोत्कृष्ट पसंती असून ती कठोर मेहनत घेणारी व्यक्ती आहे. 
    माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला संजय मांजरेकर याने टिट्वटरवर मत मांडताना कुंबळेला पाठिंबा दिला. तो म्हणाला, माझ्यामते रवी कोचपदासाठी निवड न झाल्याने हताश आहे. हा त्याच्यासाठी नवा अनुभव असेल कारण बीसीसीआयने कोचपदी उत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे.  गंभीर याने रवी शास्त्रीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत एकप्रकारे गांगुलीला पाठिंबा दर्शवला आहे. 
==============================================

राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ३० - राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला. सरकार माझ्या विरोधात काहीही सिद्ध करु शकत नाही असा दावा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर विविध जमिन घोटाळयाचे आरोप आहेत. त्याची चौकशी सुरु आहे. 
    पुराव्याशिवाय ते काहीही सिद्ध करु शकत नाहीत. दशकभरापासून माझ्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप होत आहेत असे वड्रा यांनी म्हटले आहे. हरयाणामध्ये झालेल्या जमिन व्यवहारांच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती एस.एन.धिंग्रा आयोगाची स्थापना झाल्यानंतर लगेचच वड्रा यांनी एफबी पोस्टवरुन आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 
    बांधकाम क्षेत्रातील डीएलएफ आणि वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटलिटीमध्ये झालेल्या जमिन व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला हे मला ठाऊक आहे. पण माझी बाजू सत्याची आहे. 
    त्यामुळे मी ताठ मानेनेच चालणार. माझ्या बद्दल जे चुकीचे समज करुन देण्यात आले आहे ते दूर होतील अशा विश्वास वड्रा यांनी त्यांच्या फेसबुकमध्ये पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती धिंग्रा आयोगाने आतापर्यंत २५० फाईल्सची पडताळणी केली आहे. 
==============================================

मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी


  • जळगाव : पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज तडवी (रा.कुसुंबा ता.रावेर) याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले. बिंग फुटल्याची जाणीव होताच त्याने आपण निलंबित पोलीस आहोत, अशी बतावणी केली. दरम्यान, त्याने जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालयात, जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारातून आतापर्यंत तब्बल २६ दुचाकी चोरल्या आहेत. मुलीच्या लग्नासाठी चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
    बाविस्कर व गिरनारे यांनी तडवी याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने मी निलंबित पोलीस कर्मचारी आहे, असे सांगून त्याचे ओळखपत्र दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयात काम असल्याने येथे आलो होतो, असे सांगितले. त्यावर आम्हीही तेथेच नोकरीला आहोत, कोणाशी व काय काम आहे असे विचारल्यावर त्याची भंबेरी उडाली. 
==============================================

पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे


  • ऑनलाइन लोकमत
    सोलापूर, दि. ३० -  भाजपा सरकारने राज्यातील वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशा पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसेल या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते आ. नितेश राणे यांनी दिला. मराठा-मुस्लिम आरक्षण यल्गार मेळाव्यासाठी नितेश राणे मंगळवारी करमाळ्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
    हे सरकार जनसंघाच्या इशार्‍यावर चालत असल्याचे सांगून निलेश राणे म्हणाले, मराठा-मुस्लिमांना कदापि आरक्षण देणार नाही, त्याच्या रक्तातच ते नाही. काँग्रेसच्या सरकारने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण देऊ केले होते, पण विद्यमान सरकारने ते नाकारले. आपण राज्यभर मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण मागणीसाठी मेळावे घेत असून करमाळ्यातील हा ११ वा मेळावा झाला आहे. एक दिवस असा उगवेल की आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटून उठेल व सरकारला आरक्षण द्यावे लागेल.
    आ. राणे म्हणाले, विधिमंडळात २८८ आमदारांपैकी मराठा समाजाचे १४५ आमदार आहेत. ओबीसी ४४, इतर जाती-जमातीचे ३0, परप्रांतीय इतर मागास ३0, परप्रांतीय १९, मुस्लिम १0 व ब्राह्मण १0 याप्रमाणे जातनिहाय बलाबल असताना राज्य मंत्रिमंडळात पाच महत्त्वाच्या खात्यांवर ब्राह्मण बसले आहेत. बाकीच्या लोकांकडे लायकी नाही का? असा सवाल करून राज्यातील लोकसंख्येच्या ३२ टक्के मराठा समाज असताना व या समाजाच्या मताच्या जीवावर निवडणुका जिंकून सत्ता भोगत असतानाही आरक्षण देत नाही, हा समस्त मराठा जातीचा अपमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
==============================================

... आणि सा-यांचा जीव भांड्यात पडला !


  • ऑनलाइन लोकमत
    नागपूर, दि.३० -  शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले. दोन तासातच ती आढळली अन् तिला पाहून पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.
    वेदिका नरेंद्र गौर (वय ९ वर्षे) हिच्या कथित अपहरणाचा हा किस्सा आहे. धरमपेठच्या आदर्श शाळेत चवथीत शिकणारी वेदिका बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे काछीपु-यातून पायीच शाळेला गेली. सकाळी ११ वाजता शाळा सुटली. मात्र, १२ वाजले तरी ती घरी पोहचली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत जाऊन पाहिले. ती दिसली नाही. पुन्हा घरी आले. ती घरी पोहचलीच नव्हती. वेदिकाच्या वर्गमैत्रीणींकडे विचारणा केली असता ह्यती शाळेत आली होती. सुटी झाल्यानंतर घराकडे निघाली. कुठे गेली ते माहित नाहीह्ण, असे तिच्या मैत्रीणींनी सांगितले. परिणामी वेदिकांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला . तिला पळवून नेले असावे, अशी शंका घेत त्यांनी दुपारी २.३० वाजता सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. वेदिकाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून तिच्या अपहरणाचा संशय तक्रारीत व्यक्त केला.
==============================================

पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट


  • ऑनलाइन लोकमत
    शहानूर संकुल
    अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे.शहानूर येथे जाण्याकरिता आकोट येथून एस.टी.महामंडळाची सकाळी ७.३० ला तर परत येण्याकरीता सांयकाळी ५.३० ची बस आहे. तसेच खासगी वाहने जाता येते.आकोट येथुन पोपटखेड धरण पाहल्यानंतर शहानूर या रस्त्यामध्ये छोटे-छोटे नदीनाले लागतात. नरनाळा अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. शहानूर निसर्ग संकुल येथे वनविभागाने खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली आहे. पंरतु बुंकीग सुरू असली तर मिळेल. त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत असणे आवश्यक आहे. शिवाय जंगल फिरण्याकरीता वनविभागाची सफारी उपलब्ध असल्यास मिळु शकते. गाईड सुध्दा मिळतात. लहान मुलांना खेळण्याकरीता साहीत्य आहे. तसेच वन्यप्राणी,वनविभागाची माहीतीसह आदीवाशी बांधवाच्या संस्कृतीचा ठेवा या संकुलात पाहावयास मिळतो.शहानूर पासुन उंचावर नरनाळा किल्ला आहे. या किल्लावर जाण्याकरीता वनविभागाचे अटी व शर्ती लागु करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनाने गेल्यास एकाच दिवशी शहानूर पर्यटन केंद्र व सुरई धबधबाचा आनंद लुटता येतो.
==============================================

पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही


  • नवी दिल्ली : नियोक्त्यांकडून भविष्यनिर्वाह निधी अंशदान जमा करण्यासाठी आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस किंवा एचडीएफसी बँक यासारख्या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे.
    ईपीएफओचे विश्वस्त आणि भारतीय मजदूर संघाचे (महाराष्ट्र) सरचिटणीस पी.जे. बाणासुरे यांनी सांगितले की, वित्त, आॅडिट आणि गुंतवणूक समितीने (एफएआयसी) आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक तसेच एचडीएफसी या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ईपीएफओद्वारे या क्षणी स्टेट बँक ‘भविष्य निधी’ जमा करते.
==============================================
पाकचे पुन्हा तुणतुणे: 26/11 चे पुरावे द्या

इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये नोव्हेंबर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील न्यायालयीन खटला लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी भारताने अधिक पुरावे द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या झकि-उर-रेहमान लख्वी आणि इतर सहा दहशतवादी आरोपी आहेत.

"आमच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय परराष्ट्र सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून अधिक पुराव्यांची मागणी केली आहे. यावर भारताकडून अद्यापी उत्तर यावयाचे आहे,‘‘ असे पाक परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. अर्थात, हे पत्र केव्हा पाठविण्यात आले, यासंदर्भातील माहिती झकारिया यांनी उघड केली नाही. 
==============================================
आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली

कानपूर - उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी आपल्याला कानाखाली थप्पड मारल्याचा आरोप एका प्रकल्प अभियंत्याने केला आहे.

रामपूर जिल्ह्यातील एका उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी 25 जून रोजी समाजवादी पक्षाचे नेते तथा मंत्री आझम खान आले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे आर. के. अग्रवाल नावाच्या अभियंत्याने सांगितले. खान यांनी आपली शर्टची कॉलर पकडली, आपल्याविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि आपल्या कानाखाली थप्पड मारली असा आरोप अग्रवालने केला आहे. दरम्यान या प्रकारावर नाराज झालेल्या अभियंत्यांच्या संघटनेने काम थांबविले आहे. तसेच खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच जर त्यांनी माफी मागितली नाही तर संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे. खान यांनी यापूर्वी 2012 मध्ये एका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केले होते.
==============================================
भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले...

झुरिक - स्विस बॅंकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या काळ्या संपत्तीविरोधात भारतासहित एकंदरच जागतिक स्तरावर चालविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय नागरिकांनी स्विस बॅंकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल एक तृतीयांशाची विक्रमी घट झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारतीयांनी स्विस बॅंकांत ठेवलेली संपत्ती आता एकूण 1.2 अब्ज फ्रॅंक (8,392 हजार कोटी रुपये) इतकी असल्याचे आढळून आले आहे. स्विस राष्ट्रीय बॅंकेने यासंदर्भातील माहिती प्रकाशित केली असून 2015 च्या अखेरीस भारतीयांनी स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल 59.643 कोटी स्विस फ्रॅंक्‍सची घट झाली आहे. ही माहिती प्रकाशित होण्यास सुरुवात झाल्यापासून भारतीयांनी स्विस बॅंकांमध्ये ठेवलेली ही नीचांकी संपत्ती आहे. याचबरोबर, सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांच्या स्विस बॅंकांमधील धनामध्ये घट होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
==============================================
पीडित महिलेसोबत सेल्फी लज्जास्पद- कॉंग्रेस

नवी दिल्ली - राजस्थान महिला आयोगाच्या सदस्यांनी बलात्कारातील पीडित महिलेसोबत काढलेल्या सेल्फी म्हणजे लज्जास्पद आणि कीव येण्यासारखी गोष्ट असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या शोभा ओझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, "ज्या महिलेवर तिच्या पतीने त्याच्या मित्रासोबत बलात्कार केला अशा बलात्कारपीडित महिलेसोबत राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी सेल्फी घेणे अत्यंत लज्जास्पद आहे. कायद्यानुसार बलात्कारपीडित महिलेची ओळख सार्वजनिक करण्यावर बंदी आहे आणि येथे अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी कायदाभंग करणे लज्जास्पद आहे.‘ तसेच जर या लोकांना महिलांसाठीचे कायदे माहित नसतील तर ते महिला आयोगासाठी पात्र नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

उत्तर जयपूरमधील महिला पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉटसऍपवरून शेअर केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
==============================================
आप:जाहिरातींचा खर्च मोदींच्या कपड्यांपेक्षा कमी

केजरीवाल: रोज दहा लाख रुपयांची उधळण 

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची एकही संधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडत नाही. गोव्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर त्यांच्या कपड्यांवरून निशाणा साधला. आम आदमी पक्षाच्या (आप) जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या कपड्यांवर झाला, अशी टीका त्यांनी केली. मोदी यांच्या एका दिवसातील कपड्यांवरील खर्च 10 लाख रुपये होतो, असे ते म्हणाले. 

पणजी येथे प्रसारमाध्यमांच्या संपादकांच्या बैठकीत केजरीवाल बोलत होते. ""आम्ही जाहिरातींवर 526 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, पण ते चुकीचे आहे. "आप‘ने केवळ 76 कोटींच्या जाहिराती केल्या आहेत. दिल्लीतील आमच्या सरकारच्या सर्व विभागांचा जाहिरातींचा खर्च हा मोदी यांच्या कपड्यांवरील खर्चापेक्षा कितीतरी कमी आहे.‘‘ पंतप्रधान मोदी दिवसाला दहा लाख रुपये कपड्यांवर खर्च करतात, असा दावा त्यांनी करीत मोदी यांच्या वेशभूषेवरील खर्चाचा सर्व तपशील देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. ""मोदी परिधान करीत असलेला एक ड्रेस दोन लाख रुपयांचा असतो. मोदी दिवसातून पाच वेळा कपडे बदलतात. त्यानुसार एका दिवसातील त्यांचा कपड्यांवरील खर्च 10 लाख रुपये होतो. एकदा वापरलेले कपडे ते पुन्हा वापरत नाहीत. कपडे धुतले जात नाहीत व दुसऱ्यांदा वापरलेही जात नाहीत,‘‘ असे सांगून मोदी यांच्या कपडेपटाचा आढावाच केजरीवाल यांनी घेतला. 
==============================================
टपाल खात्याच्या 'पर्सनल' तिकिटांना प्रतिसाद

नवी दिल्ली - स्वत:चे छायाचित्र असलेल्या टपालाच्या तिकिटांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून 2010 साली सुरू झालेल्या सुविधेतून आतापर्यंत 60 कोटी तर सन 2015-16 या आर्थिक वर्षांत टपाल खात्याला 1 कोटी 38 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

टपालाच्या तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद अनेकांकडून जोपासला जातो. यामध्ये काही विक्रमही नोंदविण्यात आले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर टपालाच्या तिकिटांच्या माध्यमातून टपाल खात्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी दरवर्षी नवनवीन कल्पक आणि अनोख्या योजना राबविण्यात येतात. तसेच नवनव्या सुविधाही देण्यात येतात. अशीच एक अनोखी योजना टपाल खात्यामार्फत सुरू आहे. टपाल तिकिट खरेदी करणाऱ्यांना त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे, कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र, आप्तेष्टांचे, मित्रमंडळींचे किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे छायाचित्र असलेले तिकिट तयार करण्याची सुविधा अलिकडेच सुरू करण्यात आली होती. टपाल खात्याच्या या अनोख्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या ही सुविधा देशातील काही टपाल कार्यालयात आणि ऑनलाईन सुरू आहे. 
==============================================
काबूलमध्ये बसवर हल्ला; 40 जण ठार

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (गुरुवार) लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जण ठार झाले आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल शहराजवळ हा हल्ला झाला असून, बसमध्ये नव्याने लष्करात भरती झालेले तरुण होते. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्करी शिक्षणाचा पदवीप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर हे जवान परतत असताना हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 40 जण ठार झाले असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. लष्कराच्या अन्य एका वाहनावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

काबूलमध्ये गेल्या आठवड्यातच कॅनडाच्या दुतावासाजवळ नेपाळी सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. 
==============================================

नमस्कार लाईव्ह ३०-०६-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- इस्तंबूल; इस्तंबूलच्या विमानतळावर तिहेरी हल्ला
२- अमेरिकेत एन्ट्रीसाठी द्यावी लागणार FB, Twitter ची माहिती ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- युती तुटली नसती, तर सेनेचा मुख्यमंत्री झाला असता: खडसे
४- लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदी, शाह, जेटलींमध्ये बैठक
५- नाममधील काम म्हणजे माणूस होण्याची प्रोसेस: मकरंद अनासपुरे
६- तगडी पगारवाढ तरीही अपेक्षाभंग, वेतनवाढीवर सरकारी बाबू नाराज
७- सर्वेः भारतात 2 कोटी मुलं शिक्षणापासून वंचित
८- मंदिरात गोमास ठेवून रमझानमध्ये दंगली घडवण्याचा इसिसने रचला होता कट
९- शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार
१०- देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!
११- धक्क्यातून सावरला बाजार
१२- खरेदी वाढल्याने सोने चकाकले!
१३- अपहृत सोनू बांगलादेशमधून ६ वर्षांनी परतला घरी
१४- विजय मल्ल्यांविरोधात ईडीची 'जाहीर नोटीस'
१५- ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्राची चाचणी
१६- मोदींविरोधात तिरंग्याचा अपमान केल्याचा गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क
१८- मुंबईत पुढचे 5 दिवस लोडशेडिंग, पाहा कुठे कुठे फटका
१९- नवनिर्वाचित 57 राज्यसभा खासदारांपैकी 55 कोट्यधीश!
२०- खुशखबर, उद्यापासून बेस्ट बसचा प्रवास स्वस्त
२१- बुलढाणा; दारिद्र्य रेषेखालील यादीत बुलडाण्यातील काँग्रेस आमदाराचं नाव
२२- आठवलेंनी आपला बंगला दान द्यावा, आम्ही वाद मिटवू- प्रकाश आंबेडकर
२३- पालखी मार्गाने दाखवली जगण्याची वाट
२४- ...अन्यथा मुख्यमंत्र्यांचा घरासमोर आंदोलन करणार
२५- तेरावी प्रवेशाचा कट आॅफ नव्वदीपार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- अंधेरीत मेडिकल स्टोअरला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू
२७- सोपोरमध्ये 2 दहशतवादी अटकेत;शस्त्रास्त्रे जप्त
२८- जयपूर; बलात्कार पीडितेसोबत सेल्फी, महिला आयोग सदस्या वादात
२९- पवई; सहा वर्षांनीही मूल नसल्याने पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या
३०- यवतमाळ; विद्यार्थींनीचं लैंगिक शोषण, दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
३१- बुलढाणा; नोकरी सोडून महिन्याला 2 लाख कमावणारा इंजिनिअर शेतकरी
३२- मुलुंड; ...आणि आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतले
३३- मुंबईत सलग पाच दिवस भारनियमनाचा जाच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- जगण्याचा संघर्ष, थरारक व्हिडीओचा शेवट चुकवू नका
३५- व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन
३६- चाहे प्यादा कुर्बान हो या रानी, 'रुस्तम'चा ट्रेलर लाँच
३७- 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी
३८- शास्त्री मूर्खांच्या जगात वावरतोय - गांगुली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

अंधेरीत मेडिकल स्टोअरला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू

अंधेरीत मेडिकल स्टोअरला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू
मुंबई: मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात, एका मेडीकल स्टोअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीतील मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

सकाळी 6.18 वाजता अंधेरी पश्चिमेतील जुहू गल्ली येथील मेडीकल दुकानाला आग लागली होती. या आगीत 8 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी होता.जखमीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाल्याने, मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील  सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्यासह पाच मुलांचाही मृत्यू झाला.
======================================

जगण्याचा संघर्ष, थरारक व्हिडीओचा शेवट चुकवू नका !

VIDEO: जगण्याचा संघर्ष, थरारक व्हिडीओचा शेवट चुकवू नका !
मुंबई: गेली काही वर्ष फेसबुकवर एक व्हिडीओ चांगलाच गाजतोय. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या अस्वलाच्या छोट्या पिल्लाचा जीवघेणा पाठलाग करताना दिसतो.

अनाथ, एकाकी, असहाय पिल्लू त्या निष्ठूर भुकेल्या बिबट्याचा कसा सामना करतं ते पाहताना काहींच्या डोळ्यात पाणी तर काहींच्या काळजाचा ठोका चुकल्यावाचून राहात नाही.

या व्हिडीओच्या लेटेस्ट क्लिपला महिन्याभरात 13 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत, तर 47 हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे.

निसर्गाचं वेगळं रुप, त्यातील हा विषम सामना नेमका चित्रित कसा केला असेल असा प्रश्न अनेकांना अजूनही पडतो.
खरंतर या व्हिडिओची क्लिप पहिल्यांदा 2007 साली यू ट्यूबवर अपलोड केली होती. गेल्या 9 वर्षात आतापर्यंत ही क्लिप तब्बल 4 कोटी 30 लाख लोकांनी पाहिली आहे.
======================================

बलात्कार पीडितेसोबत सेल्फी, महिला आयोग सदस्या वादात

बलात्कार पीडितेसोबत सेल्फी, महिला आयोग सदस्या वादात
जयपूर : महिला आयोगाची सदस्या असूनही बलात्कार पीडितेसोबत असंवेदनशील वर्तणूक केल्याने एक महिला चांगलीच वादात अडकली आहे. राजस्थान महिला आयोगाच्या सदस्या सौम्या गुजर यांनी चक्क बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी गुजर यांना याप्रकरणी लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्षा स्वतः या सेल्फीमध्ये दिसत आहेत.

जयपूरच्या उत्तरेकडील महिला पोलिस स्थानकात बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी शर्मा आणि गुजर गेल्या असताना गुजर यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे.

‘मी त्यावेळी बलात्कार पीडितेशी संवाद साधत होते. अचानक माझ्या नकळत सौम्या यांनी सेल्फी काढले. मी अशा प्रकारांना थारा देत नाही. गुजर यांच्याकडे मी उद्यापर्यंत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.’ अशी माहिती राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी दिली आहे.

गुर्जर सेल्फी काढत असलेले दोन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या कुठल्यातरी व्यक्तीने त्या सेल्फी घेत असतानाचे फोटो काढले आहेत. गुर्जर यांनी कॅमेरा धरला आहे, तर शर्मा फ्रेममध्ये बघत आहेत.
======================================

चाहे प्यादा कुर्बान हो या रानी, 'रुस्तम'चा ट्रेलर लाँच

चाहे प्यादा कुर्बान हो या रानी, 'रुस्तम'चा ट्रेलर लाँच
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार वास्तवदर्शी चित्रपटांसाठी प्रसिद्ध झाला आहे. मुंबईतील गाजलेल्या नानावटी केसवर आधारित अक्षयच्या आगामी ‘रुस्तम’ चित्रपटाचा ट्रेलर ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

अक्षय कुमारने बुधवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन ‘रुस्तम’मधील आपल्या भूमिकेचं नाव सांगितलं होतं. रुस्तम सिनेमात अक्षय कुमार एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रुस्तम पावरी असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो.

अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत एलियाना डिक्रूझ झळकणार आहे. अर्जन बाजवा, एशा गुप्ता यांच्याशिवाय उषा नाडकर्णी, सचिन खेडेकर यासारखे मराठमोळे चेहरेही यात दिसणार आहेत. वेनस्डे, बेबी सारख्या चित्रपटाचे मेकर नीरज पांडे यांनी रुस्तमची निर्मिती केली असून टिनू सुरेश देसाई यांचं हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. विपुल रावल यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.
======================================

संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क

संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क
मुंबई : मुंबईच्या लोकल रेल्वेतील प्रवास महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे दिवसेंदिवस प्रयत्न केले जात आहेत. पॅनिक बटण तितकंसं प्रभावी ठरत नसल्याचं समोर आल्यानंतर ते हटवण्याचा विचार सुरु झाला. त्यानंतर महिला प्रवाशांना आपत्कालीन ​स्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधण्याची सुविधा पश्चिम रेल्वे पुरवणार आहे.

लोकलमधील महिलांसाठी आरक्षित डब्यात वॉकी-टॉकी सदृश्य सुविधा असलेल्या ‘परे’च्या दोन लोकल लवकरच सेवेत येणार आहेत. गार्डशी संपर्क करण्याच्या या सुविधेसाठी साधारण 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.

या यंत्रणेद्वारे गार्डला महिलांच्या डब्यातील परिस्थितीची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी वेळ मिळेल. लोकल पुढील स्टेशनवर थांबवावी की तात्काळ याची सूचना मोटरमनला देणंही गार्डला शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
======================================

मुंबईत पुढचे 5 दिवस लोडशेडिंग, पाहा कुठे कुठे फटका

मुंबईत पुढचे 5 दिवस लोडशेडिंग, पाहा कुठे कुठे फटका
मुंबई : आतापर्यंत मुंबईच्या वेशीबाहेर असलेले भारनियमन उपनगरात डोकावत आहे. पुढचे पाच दिवस मुंबईच्या उपनगरांतील रहिवाशांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा विद्युत केंद्राचा टॉवर मंगळवारी कोसळल्यामुळे मंगळवार आणि बुधवारी काही भागात टप्प्या टप्प्याने भारनियमन करण्यात आलं होतं. या टॉवरच्या दुरुस्तीचं काम पुढचे पाच दिवस सुरु राहणार असल्यामुळे काही भागात लोडशेडिंग करण्यात येईल.

कुठे कुठे लोडशेडिंग?

विक्रोळी, अंधेरी-वर्सोवा, साकीनाका, बोरिवली, मालाड, कुर्ला या भागात भारनियमन करण्यात येणार आहे. याचा फटका या भागातील शाळा, रुग्णालयांना बसण्याची दाट शक्यता आहे.

तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु झाले असून, जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत मुंबईकरांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार असल्याचं दिसतंय.
======================================

नवनिर्वाचित 57 राज्यसभा खासदारांपैकी 55 कोट्यधीश!

नवनिर्वाचित 57 राज्यसभा खासदारांपैकी 55 कोट्यधीश!
मुंबई : अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत निवडून गेलेल्या 57 खासदारांपैकी 55 खासदार कोट्यधीश असल्याचं निरीक्षण एडीआर या निवडणूक सुधारणेसाठी काम करणाऱ्या संस्थेने काढलाय. एडीआर-इलेक्शन वॉच या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आलीय.

एडीआर म्हणजे असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स… ही संस्था प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर निवडून गेलेल्या सदस्याच्या संपत्तीचा तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचं विश्लेषण करते. हे विश्लेषण प्रामुख्याने या आमदार-खासदारांनी स्वतःहून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारेच केलं जातं.

परवाच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर केलेल्या विश्लेषणानंतर निवडून गेलेल्या 57 खासदारांपैकी तब्बल 13 खासदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्टेशन्समध्ये गुन्ह्यांची नोंद असल्याचा निष्कर्षही एडीआर-इलेक्शन वॉचने काढलाय.

नवनिर्वाचित 57 खासदारांपैकी 55 खासदार कोट्यधीश आहेत म्हणजे, टक्केवारीच्या भाषेत जवळपास 96 टक्के खासदार कोट्यधीश आहेत. तर त्यांच्या कडील संपत्तीची सरासरी ही रूपये 35.8 कोटी एवढी प्रचंड आहे.
======================================

पगारवाढीवर केंद्रीय कर्मचारी असंतुष्ट, #7thPayCommissionDhokha हॅशटॅग ट्रेंड

मुंबई: सातव्या वेतन आयोगानं सुचवलेल्या शिफारशींपेक्षा अधिक पगारवाढ द्या, अशी मागणी करत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही याप्रकरणी केंद्रीय कर्मचाऱ्यांची ओरड सुरु आहे. ट्विटरवर #7thPayCommissionDhokha हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

अनेकांनी या पगारवाढीबाबत नाराजी व्यक्त केली असून हेच का अच्छे दिन असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारण्यास सुरुवात केली आहे. वेतन आयोगानं गेल्या ७० वर्षात सर्वात कमी पगारवाढ देण्याची शिफारस केल्याचा दावा करण्यात येत आहे.

काल केंद्रीय मंत्रिमंडळानं सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ केली. शिवाय किमान वेतन १८ हजार, वाढीव भत्ते अशा अनेक शिफारशीही केंद्र सरकारनं मान्य केल्या. ज्यामुळे केंद्राच्या तिजोरीवर १ लाख कोटींपेक्षा अधिकचा भार पडणार आहे. जानेवारी 2016 पासून ही पगारवाढ लागू केली गेली आहे. मात्र, तरीही नाराजीचा सूर आळवत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 11 जुलैपासून संपाचा इशारा दिला आहे.
======================================

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी

‘चला हवा येऊ द्या’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सामान्य प्रेक्षकच नव्हे, तर बॉलिवूडमधील सुपरस्टारनाही या शोची मोहिनी पडली असून, चक्क दबंग अभिनेता सलमान खानने ‘चला हवा…’च्या सेटवर ह

======================================

खुशखबर, उद्यापासून बेस्ट बसचा प्रवास स्वस्त

खुशखबर, उद्यापासून बेस्ट बसचा प्रवास स्वस्त!
मुंबई: मुंबईकरांसाठी एक खुशखबर, उद्यापासून बेस्ट बसचा प्रवास स्वस्त होणार आहे. गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र बेस्टच्या प्रवासी संख्येत 35 लाखांवरून थेट 28 लाखापर्यंत घट झाली. त्यामुळे वातानुकूलीत गाड्यांचं भाडं, तसंच भाडेटप्प्यात 8, 12, 17, 25, 35, 45 या टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच मासिक पासाच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे.

बेस्ट समिती आणि महापालिकेच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणानेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सध्या प्रवाशांकडून २४ दिवसांच्या तिकिटांवर मासिक पास आकारला जातो. आता हाच पास २२ दिवसांवर आकारला जाणार आहे.

म्हणजेच ६६ दिवसांच्या तिकिटाच्या शुल्कावर प्रवाशांना ९० दिवस प्रवास करता येणार आहे. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिकपासही स्वस्त करण्यात आले.

======================================

सहा वर्षांनीही मूल नसल्याने पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या

सहा वर्षांनीही मूल नसल्याने पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या
मुंबई : पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या पवईत उघडकीस आली आहे. मूल न होण्याच्या वादावरुन हे हत्याकांड घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुरेश बीजे आणि प्रीती बीजे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नसल्यामुळे दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याची माहिती आहे.

याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पतीने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर वार केल्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
======================================

विद्यार्थींनीचं लैंगिक शोषण, दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थींनीचं लैंगिक शोषण, दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल क्षीरसागर आणि यश बोरूंदीया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावं आहे.

या दोन्ही शिक्षकांकडून मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार शाळेच्या विद्यार्थिंनीनी केली. हा धक्कादायक प्रकार समजताच संतप्त पालकांनी संपूर्ण शाळेला घेराव घातला.

दरम्यान, शाळेचे संस्थाचालक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून होतो आहे. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. तसंच शाळेचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
======================================

युती तुटली नसती, तर सेनेचा मुख्यमंत्री झाला असता: खडसे

युती तुटली नसती, तर सेनेचा मुख्यमंत्री झाला असता: खडसे
जळगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली नसती, तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असता, असं धक्कादायक विधान राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी केलं आहे. जळगावमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसेंनी धक्कादायक विधानांची जणू तोफच डागली.

युती तोडण्यासाठी मी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळं भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आलं. मात्र माझ्या या कामाची कुणी दखलच घेतली नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

मध्यंतरी एकनाथ खडसेंवर एकामागे एक अनेक आरोप झाल्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र मी तोंड उघडलं तर संपूर्ण देश हादरेल, असं वक्तव्य करून खडसेंनी त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या शत्रूंना सूचक इशारा दिला आहे.
======================================

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदी, शाह, जेटलींमध्ये बैठक

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदी, शाह, जेटलींमध्ये बैठक
नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा लकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.

मंत्रिमंडळातील संभाव्य नावं आणि बदलांबद्दल या बैठकीत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुका पाहता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या खासदारांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

तर सध्या काही मंत्र्यांना बढतीही मिळण्याची शक्यता आहे. पियूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
======================================

दारिद्र्य रेषेखालील यादीत बुलडाण्यातील काँग्रेस आमदाराचं नाव

दारिद्र्य रेषेखालील यादीत बुलडाण्यातील काँग्रेस आमदाराचं नाव
बुलडाणा : केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या गॅस  कंपनीच्या वितरकाला गोरगरिबांना मोफत गॅस जोडणीची यादी नुकतिच देण्यात आली. त्यात काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे यांचे नाव असल्याने खळबळ उडाली आहे.

चिखली शहरातील दहा हजार लाभार्थ्यांची ही यादी आहे. त्यात मोजकेच लाभार्थी खरे असून, बाकी सर्व लाभार्थी बोगस असल्याचा खणखणीत आरोप आमदार राहुल बोन्द्रे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर त्वरित कारवाई हवाही अशी मागणी आमदार बोन्द्रे यांनी केली आहे.

याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यावर तहसीलदार यांच्या अनुसार या योजनेतील पात्र लाभार्थ्याची यादी बनवण्याचे काम शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागात पंचायत समितला देण्यात आले होते. त्यांनी विविध प्रगणकांकडून सर्व्हे करवून घेऊन ही यादी बनवली होती.

मात्र या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सांगत असले, तरीही गरिबांसाठी सरकारने सुरू केलेली योजनेचा सरकारी बाबू कसा बट्याबोळ करतात, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
======================================

आठवलेंनी आपला बंगला दान द्यावा, आम्ही वाद मिटवू- प्रकाश आंबेडकर

आठवलेंनी आपला बंगला दान द्यावा, आम्ही वाद मिटवू- प्रकाश आंबेडकर
मुंबईः रामदास आठवलेंनी वांद्रे येथील बंगला आपणास दान द्यावा आणि उदारमनाने झोपडीत राहायला जावं, तसं झाल्यास आपण वाद मिटवायला तयार आहोत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंचा समाचार घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या 17 मजली आंबेडकर भवनच्या वास्तूमध्ये दुप्पट जागा देऊन सध्याचा वाद मिटवावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी करताच प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर पलटवार केला आहे.

आठवलेंची आंबेडकर बंधूंवर टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कायम योगदान दिलं, मात्र त्यांचे तिन्ही नातू बाबासाहेबांच्या सर्व संस्थांमध्ये विश्वस्तपदासाठी कायम भांडत आहेत, म्हणूनच आंबेडकर बंधू समाजाच्या आदरास पात्र नाहीत, अशी टीका आठवले यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरच्या आंबेडकर भवनाचा वाद सामोपचाराने मिटवावा, असं आवाहन आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलं.
======================================

‘नाम’मधील काम म्हणजे माणूस होण्याची प्रोसेस: मकरंद अनासपुरे

‘नाम’मधील काम म्हणजे माणूस होण्याची प्रोसेस: मकरंद अनासपुरे
मुंबई : नाम फाऊंडेशनमध्ये काम करत असताना, माणूस होण्याच्या प्रोसेसमध्ये असल्याचं जाणवतं. नाममधील काम ही माणूस होण्याची प्रोसेस आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

कुणावर टीका करण्यापेक्षा माझ्या कामावर मी बोलेन

दुष्काळग्रस्तांसाठी सरकारकडून व्हायला हवी, तशी मदत न झाल्याने लोकांना नाम फाऊंडेशनला भरघोस प्रतिसाद दिला का, असा प्रश्न विचारल्यानंतर मकरंद अनासपुरे म्हणाले, “सरकारने काय काम केलं किंवा सरकारने काय करायला हवं होतं, यावर बोलण्यापेक्षा मी आम्ही काय काम केलं, यावर बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. शिवाय, तुकाराम मुंढेंसारखी प्रशासनातील माणसंही नाम फाऊंडेशनच्या कामाचं कौतुक करतायेत आणि त्यात सहभागीही झाले आहेत. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं.”
======================================

तगडी पगारवाढ तरीही अपेक्षाभंग, वेतनवाढीवर सरकारी बाबू नाराज

तगडी पगारवाढ तरीही अपेक्षाभंग, वेतनवाढीवर सरकारी बाबू नाराज
नवी दिल्लीः भरघोस वेतनवाढीच्या 7 व्या आयोगाला आज मंजूरी मिळाली असली तरी सरकारी बाबू मात्र नाराज आहेत. या शिफारसींमुळ अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्यामुळे कर्मचारी संपाची तयारी करत आहेत.

केंद्र सरकारने वाढीव भत्ता आणि वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार एकूण 23.55 टक्के वेतनवाढ केली आहे. तर मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ केली आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
======================================

सर्वेः भारतात 2 कोटी मुलं शिक्षणापासून वंचित

सर्वेः भारतात 2 कोटी मुलं शिक्षणापासून वंचित
नवी दिल्लीः भारतात 3 ते 6 वयोगटातील 7.40 कोटी मुलांपैकी तब्बल 2 कोटी मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत, असं युनायटेड नेशनची संस्था युनिसेफने एका अहवालात म्हटलं आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांपैकी 34 टक्के मुस्लिम, 25.9 टक्के हिंदू आणि 25.6 टक्के ख्रिश्चन धर्मातील मुलं आहेत.

‘स्टेट ऑफ दी वर्ल्ड चिल्ड्रेन रिपोर्ट 2016’ या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण न झाल्यास मुलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. प्राथमिक शाळेत न जाता थेट माध्यमिक शाळेत प्रवेश दिल्यास विद्यार्थी लवकरच शाळा सोडण्याची शक्यता असते, असंही युनिसेफने म्हटलं आहे.
======================================

नोकरी सोडून महिन्याला 2 लाख कमावणारा इंजिनिअर शेतकरी

नोकरी सोडून महिन्याला 2 लाख कमावणारा इंजिनिअर शेतकरी !
बुलडाणा: पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विदर्भातील एक तरुण पुन्हा गावाकडं परतला. शेळीपालन आणि दुग्धव्यवसायांचा अभ्यास केला. प्रशिक्षण घेतलं आणि व्यवसायास सुरुवात केली. आज या तरुणाला शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी २ लाखांचा पगार मिळतोय.

30 गायींचा प्रशस्त गोठा, २०० ते २५० गावठी कोंबड्या, १०० बकऱ्याचा मुक्त संचार गोठा,आणि यांच्या चाऱ्यासाठी २ एकरात यशवंत गवत, बुलडाण्याच्या उच्चशिक्षित विजयसिंग राजपूत या तरुण शेतकऱ्याचे हे शेतीपूरक व्यवसाय.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या विजयने शिक्षणानंतर पुण्यात नोकरीस सुरुवात केली. मात्र समाधान काही मिळत नव्हतं. यातच पश्चिम महाराष्ट्रातील मित्रांच्या फार्म हाऊसवर जाणं झालं. दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुकुटपालन याविषयी माहिती मिळाली. नव्या व्यवसायाचा मार्ग सापडला. नोकरीला अलविदा केला. आणि गाव गाठलं. खामगावजवळील पोरज गावातील वडिलोपार्जित जमिनीत हळूहळू व्यवसाय सुरु केला.
======================================

मंदिरात गोमास ठेवून रमझानमध्ये दंगली घडवण्याचा इसिसने रचला होता कट


  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. ३० - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी हैदराबादमध्ये छापा मारुन इसिसचे मॉडयूल उधळून लावल्यानंतर आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएने ज्या ११ युवकांना ताब्यात घेतले आहे त्यांनी शहरात घातपाती कारवायांचा कट रचला होता.
    गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची त्यांची योजना होती तसेच शहरातील प्रसिद्ध चारमिनार खाली असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस ठेवून शहरात दंगल भडकवण्याचा त्यांचा कट होता.
    रमझानच्या पवित्र महिन्यात शहरात दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश होता. ज्या युवकांना अटक केली आहे ते नोकरी करतात. ते इसिसने भारतासाठी नियुक्त केलेला मोहरक्या शफी अरमारच्या संपर्कात होते. शफीवर भारतात इसिसचे जाळे तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. मागच्या चार-पाच महिन्यांपासून एनआयएचे या युवकांच्या कारवायांवर लक्ष होते. 
======================================

व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन !

  • First Published :30-June-2016 : 07:36:22

  • ऑनलाइन लोकमत
    न्यूयॉर्क, दि. 30- मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं नेहमीच म्हटलं जातं. लहानग्यांची निरागसता अनेकांना भावते. मात्र अजूनही मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे.
    जॉर्जिया या देशाची राजधानी असलेल्या टबिलीसीच्या रस्त्यावर अनानो नावाची एक 6 वर्षांची गोंडस मुलगी हरवते. अनेक जण रस्त्यावर उभ्या असलेल्या अनानोला तू हरवली आहेत का, तू ठीक आहेस का असे प्रश्न विचारत होते. एका माणसानं तर चक्क मदतीसाठी खिशातून फोनही काढला. मात्र त्याच अनानोचा मेकओव्हर करून तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये रस्त्यावर उभं केलं असता तिच्याकडे आजूबाजूनं जाणारी माणसं साधी बघतही नव्हती.

    याचा अनुभव रेस्टॉरन्टमध्ये अनानोला पुन्हा आला. अनानोनं चांगले कपडे घालून एका रेस्टारंटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एक महिलेनं तिला जवळ घेऊन चक्क तिची पापी घेतली. दुस-या एका माणसानं तिला पैसे देऊ केले. मात्र तीच अनानो घाणेरडे कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये आली. तेव्हा ग्राहकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. काहींनी तर तिला तिथून जायला सांगितलं. एका ग्राहकानं तिथल्या स्टाफला अनानोला रेस्टॉरंटमधून बाहेर काढण्याची विनंती केली. या सर्व प्रकारामुळे 6 वर्षांची चिमुकली अनानो खूपच निराश झाली.

======================================

...आणि आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतले


  • मनीषा म्हात्रे,
    मुंबई- आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतल्याची मन सुन्न करणारी घटना मंगळवारी मुलुंडमध्ये घडली. आईचे अज्ञान आणि वेळीच न मिळालेल्या उपचारामुळे पहिल्या वाढदिवसाच्या केवळ दोन दिवस आधीच या बाळावर जीव गमावण्याची वेळ आली. तब्बल दोन तास या तान्हुल्याला घेऊन ही माता मृत्यूशी झगडत होती.
    युग अजय सिंग असे मृत बाळाचे नाव आहे. तो आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहायचा. वडील अजय हे फिल्मसिटीमध्ये डेकोरेटर म्हणून काम करतात, तर आई लक्ष्मी ही गृहिणी आहे. युग हे त्यांचे तिसरे अपत्य. १ जुलैला युगचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी सिंग यांच्या घरी तयारी सुरू होती. युगला घेऊन त्याची आई मुलुंडच्या आजीकडे राहण्यास आली होती. मुलुंड पश्चिमेकडील पळसपाडा परिसरात त्याची आजी राहते. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास युगला खाटेवर बसवून आईने घरातील काम आवरण्यास घेतले. तेव्हा खेळता-खेळता युग खाटेवरून खाली कोसळला. डोक्याला मार लागल्याने युगने हंबरडाच फोडला. आईने युगकडे धाव घेत त्याला उराशी घट्ट धरले. त्याचे रडणे थांबावे म्हणून त्याला दूध पाजले. मात्र तरी युगचे रडणे काही थांबत नव्हते. मुलाला उराशी घेऊन तिने जवळच्या क्लिनिकमध्ये धाव घेतली. मात्र तेथेही त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत. अशात
    तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या युगला घेऊन लक्ष्मी फेऱ्या मारत होती. अशातच युगचे रडणे अचानक थांबले.
    दूध पिऊन बाळ झोपले असावे, असा अंदाज तिने बांधला. फॅमिली डॉक्टरने बाळाला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यास सांगितले. कोसळणाऱ्या पावसात डोळ्यातील अश्रू आणि बाळाला घट्ट पकडून ती अग्रवाल रुग्णालयात दाखल
    झाली. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर ‘अहो माझा युग शांत का झाला? त्याला उठवाना...’ अशा आईच्या आकांताने तेथे उपस्थित सारेच गहिवरले.
    या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. युगचा मृतदेह ताब्यात घेत रात्री साडेनऊच्या सुमारास शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात युगच्या डोक्याला मुका मार लागला असताना त्याला दूध पाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. डोक्याला मार लागल्यानंतर द्रव पदार्थ (दूध) पोटात गेल्याने ते मेंदूपर्यंत पोहोचून मृत्यूस कारणीभूत ठरू शकते, असे अग्रवाल रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. युगबाबतही हेच झाले. किमान त्याच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर तो
    वाचला असता.
======================================

पालखी मार्गाने दाखवली जगण्याची वाट


  • ऑनलाइ लोकमत
    पिंपरी, दि. २९ : लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर  फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले. हे छोटे व्यावसायिक अडथळा ठरत नाहीत, तर एक प्रकारे पालखी सोहळ्याची शोभा वाढवितात. श्रीक्षेत्र देहू, आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. खेळणी विक्रीतून अवघ्या वीस दिवसांत ते हजारो रुपयांची कमाई करतात. त्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांनी पालखी मार्गाने जगण्याची वाट दाखवली, अशा भावना व्यक्त केल्या. 
    श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. आकुर्डीतील पहिल्या मुक्कामानंतर सकाळीच पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. या पालखी सोहळ्याबरोबर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या बाजूने छोट्या व्यावसायिकांची बाबा गाड्यांची रांग लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बाबागाडीवर लहान मुलांना आकर्षित करणारी विविध प्रकारची खेळणी, फुगे, पिपाण्या अडकवलेल्या. त्याबरोबर बाबागाडीला मध्ये बांधलेल्या कापडी झोक्यात बाळ झोपलेले. दुसऱ्या बाजूला स्वयंपाकासाठी लागणारा स्टोव्ह अडकवलेला. एकीकडे अडवलेल्या पिशवीत कपडे असे सर्व काही घेऊन  विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड या उक्तीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांचा लवाजमा दृष्टिपथास येत होता. 
======================================

...अन्यथा मुख्यमंत्र्यांचा घरासमोर आंदोलन करणार


  • ऑनलाइन लोकमत
    नागपूर, दि. २९  : राज्यातील शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची गाडी ह्यनाहरकतह्ण प्रमाणपत्रांमुळे अडली आहे. यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने आॅक्टोबर २०१५ पासून प्रलंबित ठेवला आहे. यामुळे नव्या सत्राची प्रवेशप्रक्रिया रखडली असून महाविद्यालयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाहरकत प्रमाणपत्रांचा हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विदर्भ शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालय कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.
    राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने डिसेंबर २०१४ रोजी एमपीएड वगळता इतर सर्व शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले. परिषदेच्या नव्या निर्देशानंतर शासनाने विद्यापीठांच्या ह्यबीसीयूडीह्ण संचालकांना पत्र पाठवून सर्व महाविद्यालयांची तपासणी करण्यास सांगितले होते. दरम्यान, उच्च शिक्षण सहसंचालकांनी २९ ते ३१ मार्चदरम्यान सर्व महाविद्यालयांची तपासणी केली. या तपासणीनंतर नागपूर विभागातील २०९ पैकी केवळ ६ शिक्षण महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी शिफारस उच्च शिक्षण विभागाद्वारे राज्य शासनाकडे करण्यात आली.
    संबंधित तपासणीची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तपासणी समितीचे बहुतांश सदस्य शिक्षण व शारीरिक शिक्षण महाविद्यालयांशी संबंधितच नव्हते. त्यांना राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या नव्या नियमांबाबत माहितीच नव्हती. या समित्यांचा अहवालच नियमबाह्य होता, असा आरोप कृती समितीतर्फे लावण्यात आला आहे.
======================================

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार


  • ऑनलाइ लोकमत
    मुंबई, दि. २९ : भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़ मित्रपक्षाच्या या पावित्र्यामुळे शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत भाजपाविरोधात थेट भाष्य करणे टाळले़
    भाजपाने वर्षभर विरोधी पक्षाची भूमिका वठवत आपल्याच मित्रपक्षाला अनेकवेळा अडचणीत आणले़ नालेसफाई, रस्ते घोटाळे उघड केल्याचे श्रेय घेत भाजपाने शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ यामुळे शिवसेना भाजपा युतीमधील वाद चिघळत गेला़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभय पक्षांनी एकमेकांच्या कार्यक्रमात राडा करण्यास सुरुवात केली आहे़
    सोमवारी भगवती रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसैनिक व भाजपाचे कार्यकर्ते भिडले़ तर मंगळवारी शिवसैनिकांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा व मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशीष शेलार यांचे पोस्टर्स फाडले़ यामुळे संतापलेले अ‍ॅड़ शेलार आणि भाजपाचे नगरसेवक रेतीबंदर येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ राजशिष्टाचार म्हणून केवळ उपमहापौर अलका केरकर या कार्यक्रमात उपस्थित होत्या़
======================================

मुंबईत सलग पाच दिवस भारनियमनाचा जाच


  • मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरच्या कळवा-सालसेट पारेषण यंत्रणेचा टॉवर मंगळवारी रात्री कोसळल्याने मंगळवार व बुधवारी दिवसभर विक्रोळी, वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, बोरीवली, मालाड आणि कुर्ला या भागांत टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले. दुरुस्तीचे काम होण्यासाठी किमान पाच दिवस लागणार असल्याने तोवर मुंबईकरांना रोज भारनियमनाचा जाच सहन करावा लागणार आहे. सदैव झगमगणाऱ्या मुंबईत प्रथमच सुमारे आठवडाभर भारनियमन होणार आहे.
    मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, रिलायन्स, टाटा पॉवर व महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. कळवा-सालसेट येथील पारेषण वाहिनीवरून वीज मुंबईत येते. त्यानंतर वीजवितरण कंपन्यांमार्फत शहर व उपनगराला वीजपुरवठा होतो.
    मुंबईत मंगळवारी रात्री कळवा-सालसेट दरम्यानच्या पारेषण वाहिनीचा टॉवर कोसळला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बोरीवली, मालाड, गोरगाव, कांदिवली आणि अंधेरी येथे भारनियमन सुरू झाले. त्यानंतर मुंबईत पुढील पाच दिवस भारनियमन होईल, असे उपनगरात वीज पुरवणाऱ्या रिलायन्स व टाटा पॉवरतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले.
======================================

देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य; तामिळनाडू दुसऱ्या स्थानी!


  • मनोज गडनीस,
    मुंबई- औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे. २०१४-१५ या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यातंर्गत उत्पन्नाने नऊ लाख ५० हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे या अहवालात नमूद केले असून, २०१३-१४ च्या तुलनेत ही वाढ ५.७ टक्के अधिक आहे.
    भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाच्या माध्यमातून विविध राज्यांतील प्रगतीची आणि तेथील आर्थिकबाबींची रंजक माहिती पुढे आली आहे. यानुसार, देशातील अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वच राज्यांपेक्षा पुढे राहिल्याचे दिसून आले आहे. राज्यांतर्गत उत्पादनाच्या वाढीमध्ये तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाच लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडू राज्य श्रीमंतीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील फारकत स्पष्ट करणाऱ्या राज्याच्या वित्तीय तुटीचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. तामिळनाडू येथील वित्तीय तुटीचा आकडा ३१ हजार ८३० कोटी रुपये इतका आहे. वित्तीय तुटीच्याबाबतीत उत्तरप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील वित्तीय तुटीचा आकडा हा ३१ हजार ५६० कोटी रुपये आहे. तर वित्तीय तुटीच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. महाराष्ट्रात वित्तीय तुटीचा आकडा ३०,७३० कोटी असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्व राज्यांच्या वित्तीय तुटीच्या आकड्याचे प्रमाण तीन लाख ३३ हजार ३३० कोटी असल्याचे दिसून आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील हे प्रमाण असून त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये ८.८ टक्क्यांनी घट झाल्याची नोंद आहे.
======================================

तेरावी प्रवेशाचा कट आॅफ नव्वदीपार


  • मुंबई : तेरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाची वाट अजूनही बिकट दिसत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नव्वदीपार राहिलेला कट आॅफ दुसऱ्या यादीतही नव्वदीखाली आला नाही. त्यामुळे ८५ ते ९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
    यामुळे पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळविण्याची शक्यता धूसर होत आहे.



======================================

इस्तंबूलच्या विमानतळावर तिहेरी हल्ला


  • इस्तंबूल : इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तिहेरी आत्मघाती हल्ल्यात ४१ ठार, तर २३९ जण जखमी झाले असून, मृतांत १८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
    शहराच्या गव्हर्नर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३९ जखमींपैकी १०९ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मृतांत सौदी अरेबियाचे पाच व इराकच्या दोन जणांसह ट्युनिशिया, उझबेकिस्तान, चीन, इराण, युक्रेन आणि जॉर्डन येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणतीही संघटना पुढे आली नाही. मात्र, तुर्कीश प्रशासनाने इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या जिहादींवर संशय व्यक्त केला आहे.
    विमानतळावरील हल्ला इसिसने घडवून आणल्याचे प्राथमिक संकेत आहेत, असे तुर्कीचे पंतप्रधान बिनाली यिलदिरीम यांनी सांगितले. ते घटनास्थळी पत्रकारांशी
    बोलत होते. पुरावे इसिसकडे अंगुलीनिर्देश करतात, असे ते म्हणाले. तुर्कीतील एकाही
    हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारलेली नाही. मात्र, प्रशासनाने अंकारात आॅक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासह अनेक हल्ल्यांसाठी इसिसकडे बोट दाखविले आहे. 

======================================

अमेरिकेत एन्ट्रीसाठी द्यावी लागणार FB, Twitter ची माहिती ...


  • ऑनलाइन लोकमत
    वॉशिंग्टन, दि. २९ : अमेरिकेत येणाऱ्या लोकांना आता पासपोर्ट सोबतच सोशल मिडियाची माहीती द्यावी लागणार आहे. फेसबूक, ट्विटर या सोशल मीडीयाच्या खात्याबाबतची माहीती द्यावी लागणार आहे. अमेरिकन सरकरने हा फतवा काढला आहे. नवीन येणाऱ्या लोकांना पासपोर्टसोबत एक फॉर्म दिला जाणार आहे. त्यामध्ये त्यांच्या सोशल मिडियावरील खात्यासंबधी माहीती भरावी लागणार आहे. यामधून त्यांचा दहशतवाद्यांशी संबध आहे का नाही ? हे पडताळाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकन सरकारने सांगीतले आहे. सोशल मिडियाची माहीती देण्याची मागीणी केली असली तरी त्यात त्यांच्या गोपनियता क्रमांक (पासवर्ड) चा समावेश नाही.
    व्हिसा वेवर कार्यक्रमाद्वारे काही देशांमधील नागरीक व्हिसा नसतानाही 90 दिवस भेट देण्याची अथवा प्रवेशाची परवानगी देण्यात येते, यामध्ये अंतर्गत देश प्रविष्ट अभ्यागतांना त्यांच्या सोशल मीडियाबाबत माहीती देण्याची आवशकता नाही.
    इसीससारखी दहशतवादी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकतील नागरीकांना इसीसमध्ये दाखल करत असल्याचे उघड झाले होते. अमेरिकेत भेट देणाऱ्या नागरीकांचा दहशतवाद्यांशी संबध अथवा संपर्क असू शकतो, त्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. 
======================================

धक्क्यातून सावरला बाजार


  • मुंबई : ब्रेक्झिटच्या धक्क्यातून सावरलेला सेन्सेक्स मंगळवारी वाढीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही वाढ मिळविली.
    सेन्सेक्स १२१.५९ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्याने वाढून २६,५२४.५५ अंकांवर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स ५.२५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा एनएसई ८,१00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. ३३.१५ अंकांची अथवा 0.४१ टक्क्याची वाढ मिळविणारा निफ्टी ८,१२७.८५ अंकांवर बंद झाला.
    मान्सून चांगली प्रगती करीत असल्याच्या वृत्तामुळे ग्राहक वस्तू विभागातील एचयूएल आणि आयटीसी यासारख्या बड्या कंपन्यांचे समभाग ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढले. लुपीनचा समभाग सर्वाधिक ४.३९ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल सिप्ला, कोल इंडिया, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग वाढले.
    सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. युरोपातील बाजारांत तेजी दिसून आली. आशियाई बाजार वाढीसह बंद झाले. 
======================================

खरेदी वाढल्याने सोने चकाकले!


  • मोरेश्वर मानापुरे,
    नागपूर- जगात अस्थिरतेचे वातावरण आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मागणी व पुरवठ्यानुसार कमी पुरवठा आणि मागणी जास्त असल्यामुळे सोन्याच्या भावाने अचानक उसळली घेतली. पुढे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसून ग्राहकांना जास्त भावातच सोने खरेदी करावे लागणार आहे.
    लग्नसराईमुळे मौल्यवान धातू असलेल्या सोन्याच्या दरातील तेजी गेल्या आठवड्यात कायम राहिली. मंगळवारी स्थानिक बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार रुपयांवर स्थिरावले.
    युरोप आणि अमेरिका आर्थिक संकटात सापडल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यादिवशी शेअर बाजार
    घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारात सोने तब्बल १४०० रुपयांनी महाग होऊन भाव ३०,९०० रुपयांवर पोहोचले होते. गेल्या दोन वर्षातील सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. नंतर दोनच दिवसात स्थानिक बाजारात मागणीअभावी सोने ३० हजारांपर्यंत खाली आले.
======================================
अपहृत सोनू बांगलादेशमधून ६ वर्षांनी परतला घरी

नवी दिल्ली - पूर्व दिल्ली येथून 2010 मध्ये अपहरण झाल्याने हरवलेला सोनू नावाचा मुलगा बांगलादेशमध्ये सापडला असून तब्बल सहा वर्षांनी तो पुन्हा घरी परतला आहे.



पूर्व दिल्लीतील सोनू नावाच्या मुलाचे 2010 मध्ये अपहरण झाले होते. एका महिलेने त्याला दिल्लीतून बांगलादेशला नेले. दरम्यान बांगलादेशमधील जमाल इब्न मुसा नावाच्या नागरिकाने त्याला पुन्हा घरी परतण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. दरम्यान बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्ताला याबाबत माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलाचे डीएनए तपासण्यास आले. हे डीएनए त्याच्या आईशी मिळते जुळते असल्याने त्याची खात्री पटली आहे. बांगलादेशमधील बरगुना येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अबु ताहेर यांनी सोनुचा ताबा भारतीय उच्चायुक्तांकडे दिला आहे. तसेच मानवतेच्या भावनेने न्यायालयाने एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सुरक्षा बॉण्डशिवाय त्याची मुक्तता करण्यात आली. सोनूच्या सुटकेबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्‌विटरद्वारे माहिती दिली आहे. "भारतीय उच्चायुक्ताने सोनुला ताब्यात घेतले आहे. तो आज (30 जून) दिल्लीला पोचेल. या कामी मदत केलेल्या बांगलादेशमधील नागरिकांचे मी आभार मानते.‘, अशा शब्दांत स्वराज यांनी माहिती दिली.

======================================
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना धाडले यमसदनी

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामधील पुलवामा जिख्यामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.

पुलवामामधील एका गावामध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये धुमश्‍चक्री सुरु होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पोलिस जवानही जखमी झाले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या कारवाईदरम्यान येथील स्थानिक आंदोलक व सुरक्षा दलामध्येही संघर्ष झाला.

या कारवाईबरोबरच आता काश्‍मीर खोऱ्यामध्ये गेल्या अवघ्या दहा दिवसांत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या 12 झाली आहे.
======================================
सोपोरमध्ये 2 दहशतवादी अटकेत;शस्त्रास्त्रे जप्त

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षकांना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52 राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष पथकाच्या जवानांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. सोपोरमधील अमरगड भागात हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शौकत अहमद भट आणि तन्वीर अहमद दार अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला हिज्बुलचा कमांडर समीर अहमद वाणी याचे ते सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. 
======================================
विजय मल्ल्यांविरोधात ईडीची 'जाहीर नोटीस'

मुंबई - फरारी घोषित केलेल्या विजय मल्ल्या यांना 29 जुलैला विशेष न्यायालयासमोर हजर होण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी जाहीर नोटीस बजावली आहे. मार्चपासून मल्ल्या लंडनमध्ये असून, तपास यंत्रणांना चकवा देत आहेत.

बॅंकांचे कर्ज आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात मल्ल्यांना विशेष न्यायालयाच्या आदेशाने मुंबई आणि बंगळुरुमधील वृत्तपत्रांत जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. किंगफिशरच्या पत्त्यावरही ही नोटीस पाठवली असून, मल्ल्यांनी मनी लॉण्डरिंग कायद्यातील कलम 4चा भंग केल्याचे यात म्हटले आहे. मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली असून, अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले आहे. याला मल्ल्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. 

किंगफिशरला दिलेल्या 9000 कोटींच्या कर्जाप्रकरणी चौकशी करण्यासाठी मल्ल्या हवे असल्याचे ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले होते. 29 जुलैला मल्ल्या अनुपस्थित राहिल्यास ईडीकडून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी म्हटले आहे. ईडीने यापूर्वी मल्ल्यांची 1411 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मल्ल्यांना रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी ईडीकडून इंटरपोललाही पुरावे सादर करण्यात आले आहेत. 
======================================
ओडिशाच्या किनाऱ्यावरून क्षेपणास्त्राची चाचणी

बालासोर - इस्राईलसोबत भारताने संयुक्तपणे विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी आज (गुरुवार) सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवरील संरक्षण तळावरून घेण्यात आली.

डीआरडीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी चंडीपूर येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाचणी स्थळावरून याची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात ‘मल्टिफंक्‍शनल सर्व्हेलिअंस‘ ही प्रणाली असून, हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही. याची अंतिम चाचणी भारताचे सुरक्षा अधिकारी, डीआरडीओ आणि इस्राईलच्या उद्योजकांसोबत घेण्यात आली.

खबरदारीचा उपाय म्हणून बालासोर जिल्हा प्रशासनाने या स्थळापासून 2.5 किलोमीटर परिसरातील 3,652 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते.

======================================
मोदींविरोधात तिरंग्याचा अपमान केल्याचा गुन्हा

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा न्यायालयाने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील न्यायालयात मोदींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 16 जुलैला मुझफ्फरपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्यावर्षी 21 जूनला राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी मोदींवर प्रकाश कुमार या पोखरारीया गावातील नागरिकाने गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कुमार यांनी या प्रकरणी पुरावे म्हणून छायाचित्रेही न्यायालयात दिली आहेत.

त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोदींनी राष्ट्रध्वजाचा अपमान करुन देशातील कोट्यवधी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. मोदींनी योग दिनाच्या कार्यक्रमात एखाद्या कपड्याप्रमाणे राष्ट्रध्वज हात आणि तोंड पुसण्यासाठी वापरला होता. 
======================================
शास्त्री मूर्खांच्या जगात वावरतोय - गांगुली

कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री संतापले. गांगुलीने मुलाखतीला आलेले उमेदवार आणि आपल्या कामाचा अनादर केल्याची टीका शास्त्रीने केली होती.
क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) सदस्य असलेल्या गांगुलीने "दादा‘ला साजेसे प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, की "कुंबळेची नियुक्ती हा समितीचा सामूहिक निर्णय होता. शास्त्रीची टीका वैयक्तिक आहे. मला फार दुःख झाले असून मी निराश झालो आहे. त्याने आणखी थोडी परिपक्वता दाखवायला हवी होती. त्याची निवड न होण्यास मी जबाबदार आहे, असे वाटत असेल तर तो मूर्खांच्या जगात वावरतोय. तो स्वतः अशा समित्यांमध्ये दहा वर्षांहून जास्त काळ आहे. त्यामुळे त्याला जाणीव असायला हवी.‘ 
======================================
======================================