[अंतरराष्ट्रीय]
१- युरो कपमध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, मैदानावर फेकले जळते फटाके
२- लंडन; ब्रिटनमध्ये खासदार जो कॉक्स यांची गोळी झाडून हत्या
३- फरार आरोपी मल्ल्या लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा अतिथी
४- अमेरिकेमध्ये दोन बीयरच्या आधी बंदुका!
५- 'रिओ'त ऑलिंपिकपूर्वी आर्थिक आणीबाणी घोषित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची चौकशी
७- सुरेश प्रभू, अंबानींसह PMOचे फोन टॅप, एस्सार ग्रुपवर आरोप
८- ठाणे ड्रग रॅकेट: 2000 कोटींच्या ड्रगशी ममता कुलकर्णींचा संबंध?
९- हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी 15000ची सशस्त्र सेना
१०- भारतमातेला वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखं काय ? - वैंकय्या नायडू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री
१२- आठवड्यात एक दिवस खादीचे कपडे, सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन
१३- महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग कालवश
१४- कल्याण; लेडीज डब्यात प्रवेशाला विरोध, धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं
१५- मुंबईतील अनधिकृत झोपडपट्टीत आता अधिकृतपणे पाणी
१६- विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात
१७- दिघ्यातील विस्थापितांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी
१८- अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत संपली
१९- ५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही
२०- 'विकृतीच्या छाताडावर नाचण्याची शिवसेनेत ताकद
२१- राज्यात सोमवारपासून पाऊस बरसणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- यवतमाळ; बँक मॅनेजरची मुजोरी, शेतकऱ्याला मॉनिटर फेकून मारला
२३- गुगलची हृदयस्पर्शी जाहिरात, बीडच्या अभिनेत्याचा ठसा
२४- तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार
२५- हवाई दलाचं फायटर प्लेन उडवण्यास महिला पायलट सज्ज
२६- विरार; 'रेशनिंग कार्ड बनवतो, पण मला 'ते' हवं'
२७- औरंगाबादेत पाटबंधारे विभागातील लिपिक महिलेची आत्महत्या
२८- व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन वाद, नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्ते आमने-सामने
२९- गोदावरी आटल्याने 'त्यांना' मिळाला रोजगार!
३०- लखनऊ; जीन्स-टीशर्ट घातल्याने डोके फिरते- जिल्हाधिकारी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक
३१- तिरुवन्नमलाई; रहस्यपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू
३३- मॅच फिक्सर्सवर घालावी आजन्म बंदी - आमीर
२४- प्रियांका वद्रांच्या बंगल्याची परवानगी रद्द करा - सुरेश भारद्वाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================

रसिका कालिदास फड असं महिलेचं नाव असून त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून चिमुकलीसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत सहा वर्षांची चिमुकली बालंबाल बचावली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सातारा परिसरातील पृथ्वीनगरात घडली.
ज्यावेळी या त्यांनी विहिरीत उडी मारली तेव्हा पेपर वाटणाऱ्या मुलानं आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे त्यांची मुलगी वाचू शकली, मात्र रसिका यांचा मृत्यू झाला.

मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी सूर्यकांत जोग यांनी 1984 मध्ये राज्याचे पोलीस महासंचालकपद भूषवलं. जोग यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे

कल्याण-ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. कल्याण स्टेशनला आरोपी दिनेश यादवने जबरदस्ती लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेखा आणि तिच्या आईने या तरुणाला विरोध केला. दिनेशची पत्नीही त्याच लेडीज डब्यातून प्रवास करत होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत दिनेशने रेखाला ट्रेनबाहेर फेकलं.

खादीला प्रोत्साहन देण्याचं मोदी सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कार्यालयांमध्ये यावं, अशा प्रकारचं आवाहन काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. खादी आणि ग्रामविकास महामंडळाला केंद्र सरकारने सूचना केल्या होत्या. यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसेल.

तिरुवन्नमलाईतील श्री बालसुब्रमणियर थिएटरमध्ये आंध्र प्रदेशातील दोन व्यक्ती गुरुवारी ‘कॉन्ज्युरिंग 2’ चित्रपटाचा लेट नाईट शो पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना एकाला छातीदुखीचा त्रास जाणवू लागला. काहीच क्षणात त्याची शुद्धही हरपली.
त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सोबतच्या व्यक्तीला सांगितलं. मात्र मृतदेहासह तो परागंदा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलिस परिसरातील रिक्षाचालक आणि लॉजमालकांकडे चौकशी करत असून प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

2000 सालानंतरच्या सगळ्या झोपड्यांना आता घरात पाण्याचा नळ मिळणार आहे. अर्थात भाजप आणि शिवसेनेनं बहुमतानं हा प्रस्ताव पारीत केला आहे. तर मनसेनं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्यास तीव्र विरोध केलाय. यामुळे परप्रातियांचे लोंढे वाढतील अशी भीती मनसेने व्यक्त केली.
विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याच्या प्रस्तावात जाचक अटी आणि शर्थी असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. येत्या वर्षभरात मुंबई पालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातोय.

खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री
पुणे: सरकारचं काम प्रामाणिकपणे सुरु आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. जनतेला कन्व्हिन्स करु शकत नाहीत, म्हणून कन्फ्युज करण्याचा विरोधकांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडून, काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात रस्त्यावर उतरून, गावोगावचे भ्रष्टाचार बाहेर काढा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.
येत्या वर्षभरात मुंबई पुण्यासह पाच महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरु आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पाठराखण केली.
शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
==============================
दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची चौकशी
मुंबई: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. याप्रकरणी सबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे.
यामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश आहे. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलीत कदम यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण हायकोर्टानं त्यांना जामीन दिला. त्यानंतर त्यांनी सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.
यात फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर यांना प्रशिक्षण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
एवढंच नाही तर दाभलोकरांच्या हत्येसाठी वापरलेली रिव्हॉल्वर बनविण्यात पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा संशय आहे.
==============================
सुरेश प्रभू, अंबानींसह PMOचे फोन टॅप, एस्सार ग्रुपवर आरोप
नवी दिल्ली : मल्टीनॅशनल कंपनी एस्सार ग्रुपवर देशातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे फोन कॉल अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप होत आहे. एस्सार ग्रुपने 2001 ते 2006 या काळात एनडीए आणि यूपीए सरकारच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांचेही फोन कॉल टॅप केले होते. इतकंच नाहीतर अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळातील पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
इंग्लिश वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुरेन उप्पल यांनी 1 जून रोजी यासंदर्भात 29 पानांची एक तक्रार पीएमओला पाठवली. एस्सार ग्रुपच्या एका कर्मचाऱ्यावर कथित फोन कॉल टॅप केल्याचा आरोप आहे. सुरेन उप्पल हे त्या कर्मचाऱ्याचे वकील आहेत. एनडीए सरकारमधील मंत्री प्रमोद महाजन यांचाही फोन टॅप केल्याचंही समजतं. काही फोन टॅपिंग टेलिकॉम परवानासंबंधी झाले होते.
==============================
ठाणे ड्रग रॅकेट: 2000 कोटींच्या ड्रगशी ममता कुलकर्णींचा संबंध?
ठाणे : ठाण्यात उघडकीस आलेल्या 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रॅग रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीविरोधात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहे. ठाणे पोलिस आयुक्त आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. आता आणखी पुरावे मिळाल्यानंतर ममता कुलकर्णीलाही आरोपी बनवलं जाऊ शकतं. या प्रकरणात ममताचा पती विकी गोस्वामी हा ड्रग रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचं कळतं.
==============================
गुगलची हृदयस्पर्शी जाहिरात, बीडच्या अभिनेत्याचा ठसा
मुंबई: अनेक मराठमोळ्या कलाकारांनी जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यातच आता मराठवाड्यातील बीडचा अभिनेता नंदू माधवचाही समावेश झाला आहे. कारण नंदू माधवने थेट गुगलच्या जाहिरातीमध्ये अभिनयाची झलक दाखवून, सर्वांना भावूक केलं आहे.
गुगलने सुमारे सहा मिनिटाची नवी जाहिरात प्रदर्शित झाली आहे. पावलोपावली गुगल सर्च तुम्हाला किती उपयुक्त ठरु शकतं, हे या जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे.
या जाहिरातीमध्ये नंदू माधव यांनी एका पित्याची भूमिका साकारली आहे. तर मसान चित्रपटातील अभिनेता विकी कौशल त्यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे.
चित्रपटात भूमिका साकारण्याचं स्वप्न असलेल्या वडिलांची इच्छा, मुलगा गुगलच्या मदतीने कसा पूर्ण करतो, हे या जाहिरातीतून दाखवण्यात आलं आहे.
==============================
तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार
नाशिक : तूरडाळीने पुन्हा एकदा 200 रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर सरकारला जाग आली आहे. तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार सरकार करत आहे, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.
==============================
हवाई दलाचं फायटर प्लेन उडवण्यास महिला पायलट सज्ज
हैदराबाद : भारतीय हवाई दलात आज इतिहास घडणार आहे. पहिल्यांदाच तीन महिला पायलट आज हवाई दलाचं फायटर प्लेन उडवणार आहे. या तिन्ही महिला पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून आज फायटर प्लेन उडवण्यास सज्ज झाल्या आहेत.
हैदराबादच्या इंडियन एअर फोर्स अकॅडमीतून भावना कंठ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह या तीन प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपवून आज भारतीय हवाई दलाच्या सेवेत सज्ज होत आहेत. हवाई दलाचं फायटर प्लेन उडवणाऱ्या या पहिल्याच महिला ठरणार आहेत.
==============================
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक
लंडन : भारताला नमवून ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र असं असलं तरी भारताने रौप्यपदक पटकावलं आहे. तब्बल 34 वर्षांनी भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे.
लंडनमध्ये सुवर्णपदकासाठी झालेल्या या सामन्यात दोन्ही हाफमध्ये एकही गोल झाला नाही. अखेर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने हा सामना 1-3 असा गमावला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने कांगारुंना एकही गोल करु दिली नाही. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ चढला. ऑस्ट्रेलियाने चौदा वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे.
==============================
'रेशनिंग कार्ड बनवतो, पण मला 'ते' हवं'
विरार: भाईंदरमध्ये एका रेशनिंग ऑफिसरला अटक करण्यात आली आहे. अजित कासोरे असं या रेशनिंग ऑफिसरचं नाव असून, तो भाईंदर पूर्वेकडील रेशनिंग कार्यालयात कामाला होता.
रेशनिंग कार्ड बनवण्यासाठी आलेल्या एका महिलेला फोन करुन शारिरिक संबध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप कासोरेवर आहे.
संबंधित महिला २ जूनला रेशन कार्ड मागण्यासाठी कार्यालयात गेली असता, रेशनिंग कार्ड अजून तयार झाले नसल्याचे सांगत, कासोरेने त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने संबंधित महिलेशी संपर्क साधून, सतत फोन करण्यास सुरुवात केली.
एके दिवशी कासोरेने फोन करुन मी तुमच्या नवऱ्याचा मित्र बोलत आहे, असं सांगत तिच्याशी शारिरिक संबंधाची मागणी केली. त्या महिलेने फोन कट केल्यावर पुन्हा फोन लावला असता तो फोन बंद करुन ठेवला होता.
अखेर या महिलेने नवऱ्याच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नवघर पोलिसांनी मोबाईल नंबरची चौकशी केली असता तो मोबाईल कासरे याचाच असल्याचं निदर्शनास आलं.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी अजित कासरेला अटक केली आहे.
==============================
औरंगाबादेत पाटबंधारे विभागातील लिपिक महिलेची आत्महत्या
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी मारली असून यात महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चिमुकली बचावली आहे. आत्महत्या करणारी महिला पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक असल्याची माहिती आहे.
रसिका कालिदास फड असं महिलेचं नाव असून त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून चिमुकलीसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत सहा वर्षांची चिमुकली बालंबाल बचावली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सातारा परिसरातील पृथ्वीनगरात घडली.
रसिका यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा तिच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे. रसिका फड पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक होत्या तर त्यांचे पती कालिदास फड करमाड येथील राजीव गांधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. प्राध्यापक पती, नणंद, सासू यांच्या छळाला कंटाळल्याचा आरोप आहे.
ज्यावेळी या त्यांनी विहिरीत उडी मारली तेव्हा पेपर वाटणाऱ्या मुलानं आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे त्यांची मुलगी वाचू शकली, मात्र रसिका यांचा मृत्यू झाला.
==============================
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग कालवश
मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते आपले नातू कौस्तूभ यांच्याकडे उपचार घेत होते. मंत्रालयाशेजारील वसाहतीमधील नातवाच्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी त्यांच्यावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी सूर्यकांत जोग यांनी 1984 मध्ये राज्याचे पोलीस महासंचालकपद भूषवलं. जोग यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे
==============================
हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी 15000ची सशस्त्र सेना
नवी दिल्ली: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी देशातील हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी १५०००ची सेना कार्यरत असल्याची माहिती दिली आहे. सीबीआयकडून यासंदर्भात स्पष्ट करण्यात आले.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर हत्येप्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी सनातन संस्थेचा सदस्य विरेंद्र तावडे याने २००९मधील गोवा बॉम्बस्फोटातील अरोपी सारंग अक्कोलकर याला इमेल केला होता. या इमेलमध्ये काही संधिग्द शब्दांचा वापर करण्यात आला होता. सारंग अक्कोलकर याला यापूर्वीच इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.
तावडेच्या मेलमध्ये १५००० जणांच्या सशस्त्र तुकडीचा उल्लेख होता. या तुकडीची स्थापना हिंदू विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सेनेचा खर्च दानधर्मातून करावा. जर गरज पडल्यास यासाठी लुटदेखील करण्याचे सांगण्यात आले होते.
==============================
व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन वाद, नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्ते आमने-सामने
नालासोपारा: व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन वाद उद्भवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांमधला हा वाद हाणामारी करण्यापर्यंत गेला आहे. भाजप युवा अध्यक्ष बीजेंद्र कुमार आणि एका महिला कार्यकर्तीमधला वाद विकोपाला गेला आहे.
भाजप नालासोपारा या व्हॉट्सअॅप ग्रुप वर बीजेंद्र कुमार आणि इतर भाजप कार्यकर्ते आहेत. त्यामध्ये प्रतिभा पाध्ये नावाची कार्यकर्ती नव्यानं अॅड झाली. बीजेंद्र आणि प्रतिभा यांच्यामधील मतभेद पक्षाच्या व्हॉट्स अप ग्रुपवर उतरले आणि शाब्दिक वाद विकोपाला गेला. ग्रुपवरचं मारामारीच्या मेसेज पोस्ट केले. त्यानंतर संतप्त प्रतिभा पाध्ये यांनी आपल्या कार्य़कर्त्यांसह बीजेंद्रकुमारला मारहाण करण्यास वसंत नगरीत आल्या.
प्रसंगावधान राखून बीजेंद्रकुमारनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही सगळी दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली असून. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
==============================
युरो कपमध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी, मैदानावर फेकले जळते फटाके
युरो कपमध्ये मैदानावरच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरची हुल्लडबाजीच जास्त चर्चेत आहे. शुक्रवारी क्रोएशिया आणि चेक रिपब्लिकमधल्या युरो कपच्या सामन्यात चाहत्यांनी मैदानावर फटाके फेकले. त्यामुळं जवळपास चार मिनिटं खेळ थांबवण्यात आला.
हे फटाके दूर करताना मैदानावरचा एक अटेंडंट जखमी झाला. क्रोएशियन चाहत्यांवर हे फटके फेकल्याचा आरोप असून युएफानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात इंग्लंड आणि रशियाच्या चाहत्यांमध्ये झालेल्या दंगलीनंतर युएफानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. खरं तर नोव्हेंबर महिन्या पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये आणिबाणी लागू आहे.
त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारानं स्टेडियम्सच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. चाहत्यांनी मैदानात फटाके फेकले, तेव्हा क्रोएशियाचा संघ सामन्यात 2-1नं आघाडीवर होता. पण अतिरिक्त वेळेत टॉमस नेसिडनं गोल करून चेक रिपब्लिकला बरोबरी साधून दिली.
==============================
लेडीज डब्यात प्रवेशाला विरोध, धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं
प्रातिनिधीक फोटो
कल्याण : गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या धावत्या ट्रेनमधून तरुणीला एका युवकाने बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणजवळ घडलेल्या घटनेत 22 वर्षीय तरुणी रेखा नवले जखमी झालेली आहे.
कल्याण-ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. कल्याण स्टेशनला आरोपी दिनेश यादवने जबरदस्ती लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेखा आणि तिच्या आईने या तरुणाला विरोध केला. दिनेशची पत्नीही त्याच लेडीज डब्यातून प्रवास करत होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत दिनेशने रेखाला ट्रेनबाहेर फेकलं.
आरोपी दिनेश यादवला अटक झाली असून 20 तारखेपर्यंत कोठडी बजावण्यात आली आहे.
==============================
आठवड्यात एक दिवस खादीचे कपडे, सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन
मुंबई : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना आता आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालावे लागणार आहेत. अर्थात हे अनिवार्य नसलं तरी राज्य सरकारनं यासंदर्भात आवाहन करणारं परिपत्रक काढलं आहे.
खादीला प्रोत्साहन देण्याचं मोदी सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कार्यालयांमध्ये यावं, अशा प्रकारचं आवाहन काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. खादी आणि ग्रामविकास महामंडळाला केंद्र सरकारने सूचना केल्या होत्या. यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसेल.
==============================
रहस्यपट पाहताना प्रेक्षकाचा थिएटरमध्येच मृत्यू
तिरुवन्नमलाई : हॉलिवूडमधील गाजलेला रहस्यपट ‘द कॉन्ज्युरिंग’चा सिक्वेल अर्थात ‘कॉन्ज्युरिंग 2’ पाहताना एका प्रेक्षकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तमिळनाडूमधील तिरुवन्नमलाईमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा थिएटरमध्येच मृत्यू ओढावला.
तिरुवन्नमलाईतील श्री बालसुब्रमणियर थिएटरमध्ये आंध्र प्रदेशातील दोन व्यक्ती गुरुवारी ‘कॉन्ज्युरिंग 2’ चित्रपटाचा लेट नाईट शो पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना एकाला छातीदुखीचा त्रास जाणवू लागला. काहीच क्षणात त्याची शुद्धही हरपली.
त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं होतं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सोबतच्या व्यक्तीला सांगितलं. मात्र मृतदेहासह तो परागंदा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलिस परिसरातील रिक्षाचालक आणि लॉजमालकांकडे चौकशी करत असून प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
==============================
बँक मॅनेजरची मुजोरी, शेतकऱ्याला मॉनिटर फेकून मारला
यवतमाळ: यवतमाळमधील एका बँक मॅनेजरनं शेतकऱ्यावर कॉम्प्युटरचा मॉनिटर फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी गावामध्ये ही घटना घडली आहे. येथील बँकेत शेतकरी कर्जाची मागणी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी बँक मॅनेजरनं शेतकऱ्यावर थेट मॉनिटर फेकल्याची घटना घडली.
दरम्यान, याप्रकरणी बँक मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
==============================
मुंबईतील अनधिकृत झोपडपट्टीत आता अधिकृतपणे पाणी
मुंबई : मायानगरीतल्या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये आता महापालिका अधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
2000 सालानंतरच्या सगळ्या झोपड्यांना आता घरात पाण्याचा नळ मिळणार आहे. अर्थात भाजप आणि शिवसेनेनं बहुमतानं हा प्रस्ताव पारीत केला आहे. तर मनसेनं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्यास तीव्र विरोध केलाय. यामुळे परप्रातियांचे लोंढे वाढतील अशी भीती मनसेने व्यक्त केली.
विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याच्या प्रस्तावात जाचक अटी आणि शर्थी असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. येत्या वर्षभरात मुंबई पालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातोय.
==============================
ब्रिटनमध्ये खासदार जो कॉक्स यांची गोळी झाडून हत्या
लंडन: इंग्लंडमध्ये विरोधी पक्षाच्या महिला खासदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जो कॉक्स यांच्यावर उत्तर इंग्लंडमध्ये त्यांच्या मतदारसंघात जीवघेणा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी सुरुवातीला चाकूनं वार करुन नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी 52 वर्षीय हल्लेखोराला अटक केलं आहे. त्याच्याकडून हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.
==============================
फरार आरोपी मल्ल्या लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा अतिथी
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. १८ - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई न्यायालयाने गुन्हेगार म्हणून घोषित केलेला विजय मल्ल्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारत सरकारचा उच्चायुक्तही या कार्यक्रमाला उपस्थित होता.या आठवडयात हा कार्यक्रम झाला. सुहेल सेठ लिखित 'मंत्रास फॉर सक्सेस इंडियाज ग्रेटेस्ट सीईओ टेल्स यू हाव टू विन' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भारतीय उच्चायुक्त नवतेज सरनाही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मल्ल्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते असा दावा सुहेल सेठ यांनी केला आहे.ज्यांना उपस्थित रहायचे आहे त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता असे सेठ यांनी सांगितले. मल्ल्या प्रेक्षकांमध्ये बसला होता. मल्ल्याला बघितल्यानंतर उच्चायुक्त नवतेज मध्यावरुनच निघून गेले असे सेठ यांनी सांगितले. १०० फूट जर्नी क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासंबंधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय पत्रक प्रसिध्द करु शकते.
==============================
विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ - गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी ही माहिती दिली आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून सक्रीय होणार असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज आहे.महाराष्ट्रात मान्सूनतेच्या सक्रीयतेसाठी अनुकूल वातावरण आहे. बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. बिहार, ओदिशा, पश्चिबंगाल, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि केरळमध्ये भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.केरळ आणि लक्षव्दीपमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उखडली गेली तसेच काही घरांचे नुकसान झाले. मान्सून अपेक्षित अंदाजापेक्षा आठवडभर उशिराने आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या सक्रीयतेला अनुकूल वातावरण आहे.
==============================
भारतमातेला वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखं काय ? - वैंकय्या नायडू
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १८ - ‘भारत माता’ हे केवळ भौगोलिक चित्र नव्हे; सव्वाशे कोटी भारतीयांची ती माता आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतलेल्या मातेला ‘भारत माता की जय’ असे म्हणून वंदन करण्यात अपराधी वाटण्यासारखे काय आहे, असा सवाल करत, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या महात्म्यांच्या जीवनचरित्रांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्यांची सिंहगर्जना’ या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉ. दीपक टिळक, मुक्ता टिळक आदि मान्यवर उपस्थित होते.
==============================
विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ - गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी ही माहिती दिली आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून सक्रीय होणार असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज आहे.महाराष्ट्रात मान्सूनतेच्या सक्रीयतेसाठी अनुकूल वातावरण आहे. बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. बिहार, ओदिशा, पश्चिबंगाल, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि केरळमध्ये भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.केरळ आणि लक्षव्दीपमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उखडली गेली तसेच काही घरांचे नुकसान झाले. मान्सून अपेक्षित अंदाजापेक्षा आठवडभर उशिराने आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या सक्रीयतेला अनुकूल वातावरण आहे.
==============================
दिघ्यातील विस्थापितांच्या पुनर्वसन प्रस्तावाला मंजुरी
- मुंबई : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत शुक्रवारी रात्री १२ वाजता संपली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत २ लाख १६ हजार १४९ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. तरी विद्यार्थ्यांना आता कट आॅफची चिंता लागली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ६४९ अर्ज दाखल झाले होते. त्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत कन्फर्म झालेल्या अर्जांची संख्या २ लाख १६ हजार १४९ होती. तर १ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरून कन्फर्म केलेले नव्हते आणि २ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. त्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण अर्ज भरून तो कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.एकंदरीत प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्क्यात मात्र यंदा एका टक्क्याची घट झाली आहे.
- नवी मुंबई : दिघा येथील रस्ता रुंदिकरणात बाधीत ठरलेल्यांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला शुक्रवारी महासभेने मंजुरी दिली. या पात्र लाभार्थींमध्ये ११ वाणिज्य, ३ निवासी बांधकामे असुन दोघांना दोन्हीपैकी एकाचा लाभ मिळणार आहे. रामनगर येथे महापालिकेने उभारलेल्या इमारतीमध्ये ३० वर्षाकरिता वार्षिक १ रुपये दराने लिव्ह अॅण्ड लायसन तत्वावर त्यांना गाळे व घरे देण्यात येणार आहेत.ठाणे बेलापुर मार्गावर दिघा येथे रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत होती. परंतु तिथल्या गाळे व घरांच्या पुनर्वसनावरुन रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबीत होता. परंतु महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर अवघ्या आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढला. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे तात्काळ हटवा नाहीतर कारवाई करु असे आयुक्तांनी आदेश देताच नागरिकांनी स्वतहुन जागा मोकळी केली होती. यानंतर अवघ्या एक महिण्यात रस्ता रुंदीकरणात बाधीत ठरलेल्या पात्र लाभार्थींच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी आला. त्यास सर्वमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी प्रस्तावाच्या अनुशंघाने नगरसेविका अपर्णा गवते यांनी पुनर्वसनासाठी प्रशासनाने अवघ्या १६ जणांच्याच पुनर्वसनाच्या घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्याठिकाणचे अनेक रहिवाशी व गाळाधारक पालिकेचे करदाते असतानाही त्यांना अपात्र ठरवल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. शिवाय जर १६ जणांचेच पुनर्वसन करायचे होते, तर प्रशासनाने ६५ गाळे व दोन मजली रहिवाशी इमारत कशासाठी उभारली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीचे गाळे किंवा घर होते, त्या संपुर्ण कुटूंबाला एकाच वास्तुसाठी पात्र ठरवल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. पुनर्वसनाचे आश्वासन मिळाल्यामुळेच अनेकांनी स्वतहुन रस्त्यालगतची बांधकामे हटवरुन प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. त्यामुळे लाभ द्यायचा असेल तर तो पुर्णपने सर्वांनाच द्या, अन्यथा नको अशी भावणा देखिल अपर्णा गवते यांनी सभागृहात व्यक्त केली. नगरसेवक नविन गवते यांनीही ज्यांच्याकडे ग्रामपंचायत काळापासुनचे पुरावे आहेत, त्यांनाही अपात्र ठरवल्याचा संताप व्यक्त केला. परंतु रस्ता रुंदीकरणात बाधीत ठरलेल्यांचे विशेष बाब म्हणुन पुनर्वसन केले जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे इतरांनाही त्यात समाविष्ट करुन घेण्याची गवते दांपत्यांची उपसुचना त्यांनी नाकारली.
==============================
अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत संपली
- मुंबई : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत शुक्रवारी रात्री १२ वाजता संपली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत २ लाख १६ हजार १४९ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. तरी विद्यार्थ्यांना आता कट आॅफची चिंता लागली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ६४९ अर्ज दाखल झाले होते. त्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत कन्फर्म झालेल्या अर्जांची संख्या २ लाख १६ हजार १४९ होती. तर १ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरून कन्फर्म केलेले नव्हते आणि २ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. त्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण अर्ज भरून तो कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.एकंदरीत प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्क्यात मात्र यंदा एका टक्क्याची घट झाली आहे.
==============================
५0 महिला डब्यांत १५0 सीसीटीव्ही
- मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवून त्याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला वेग आला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. जवळपास १५0 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे.लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना गर्दुल्ले किंवा चोरांकडून मारहाणीबरोबरच विनयभंगाच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आल्या आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही काही महिन्यांपूर्वीच बसविण्यात आले आणि त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले. एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत असून हे काम प्रगतिपथावर आहे.
==============================
अमेरिकेमध्ये दोन बीयरच्या आधी बंदुका!
- - अपर्णा वेलणकर (थेट अमेरिकेतून)सॅन फ्रान्सिस्को : ‘तसे म्हटले तर अंगभर पीनट बटर फासून भल्या सकाळी माझ्या किचनमध्ये नग्न होऊन नाचण्याचा हक्क मला आहे. पण मी तसे करतो का? बंदुक विकत घेण्याचा हक्क आहे, म्हणून शाळकरी मुलांपासून ओमर मतीनपर्यंत जो दुकानात जाईल, त्याला अंडरवेअर खरेदी करावी इतक्या सहजतेने या देशात गन मिळते. का? कशासाठी?’- सीएनएन वृत्तवाहिनीवर दोन मुलांचा बाप असलेला एक गोरा अमेरिकन कळवळून विचारत होता.सरसकट जिकडेतिकडे होत असलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांनी धास्तावलेले जाणतेनागरिक, पैशाच्या राशीवर बसलेल्या ‘गन लॉबी’च्या हातातली खेळणी बनून कॅपिटॉल हिलवर गन कंट्रोलच्या विरोधात राजकारण करण्याचा आरोप झेलणारे रिपब्लिकन्स, बंदुक बाळगण्याचा घटनात्मक हक्क आणि त्याचे वर्तमानातले भीषण परिणाम या गर्तेत अडकलेले चर्चाविश्व आणि अमेरिकेतल्या ‘गन कल्चर’ला आळा घालण्यात टोकाचे अपयश आल्याचे स्वीकारून संतप्त हतबलता व्यक्त करणारे प्रेसिडेण्ट ओबामा... हे सध्याचे अमेरिकेतले चित्र आहे.
==============================
नाशिक - गेल्या तीस वर्षांत गोदावरी नदीतील पाण्याची पातळी सर्वांत कमी झाल्याने नदीच्या पाण्यात सोने आणि इतर वस्तू शोधणाऱ्या झारेकऱ्यांना व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. या व्यवसायातून त्यांना दररोज 400 ते 500 रुपयांचा उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत नदीत झारेकऱ्यांची गर्दी दिसत आहे.
गोदावरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्यात उतरून "सोनझारी झरेका‘ समुदायाला रोजगार मिळाला आहे. शहरातील घारपुरे घाटाजवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक हनुमान घाटावर गेले आठ-दहा दिवसांपासून गर्दी वाढली आहे. गेल्या तीस वर्षापासून एवढी पाणी पातळी खाली गेली नव्हती. मात्र याचा "सोनझारी-झरेका‘ यांना फायदा होत आहे. झारेकऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना ही संधीच उपलब्ध झाली आहे. हे लोक दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सातपर्यंत पाण्यात डुबकी मारून लाकडी घमेल्यातून वाळू व गाळ बाहेर काढतात. मग नदीतच पाण्यात उभे राहून घमेल्यात चांदी-सोने, मणी, नाणी व मौल्यवान वस्तूंचा ते शोध घेतात. नदीतील गाळात घाटांवर चांदी-सोने, नाणे, जोडवी, दागिने याशिवाय अनेक लहान-मोठ्या वस्तू सापडतात. त्या विकून यांना चांगले पैसे मिळतात. याशिवाय गाळामध्ये ब्रिटिश कालीन नाणीही सापडतात. अशा नाण्यांनाही चांगलाच भाव मिळतो. या वस्तू विकून दररोज 400 ते 500 रुपयांचे उत्पन्न सुरू झाले आहे.
गोदावरी आटल्याने 'त्यांना' मिळाला रोजगार!
| |
-

इस्लामाबाद - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीच्या कारवाईला सामोरे गेलेला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने आता मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी, असे वक्तव्य केले आहे.
मॅच फिक्सर्सवर घालावी आजन्म बंदी - आमीर
| |
-
| |
आमीर 2010 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडला होता. त्याला कारागृहात राहण्याची आणि पाच वर्षे बंदीची शिक्षा झाली होती. या शिक्षेनंतर त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. पाकिस्तानचा संघ या महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आमीरचे संघात निवड झाली असून, तो इंग्लंडमध्ये पुन्हा खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आमीरने फिक्सिंगप्रकरणी वक्तव्य केले आहे.
==============================
मुंबई - ‘महाराष्ट्रावर अभद्र सावल्या पडल्या असताना मराठी माणसाचे मराठीपण, हिंदुत्वाचा अंगार पेटून उठला नाही तर तो शिवरायांचाच अपमान ठरेल. जे घडावे असे वाटते ते घडवण्याची शक्ती शिवसेनेच्या मनगटात नक्कीच आहे. आज संधी अनुकूल आहे, काळ अनुकूल आहे. एकंदर वातावरण अनुकूल आहे. विश्वासघाताला, अहंकाराला, नतद्रष्टपणाला, करंट्या मनोवृत्तीला आणि खुरटलेल्या, कुजलेल्या अवस्थेतील विकृतीला महाराष्ट्रात थारा मिळू नये. या विकृतीला गाडून त्याच्या छाताडावर नाचण्याची ताकद शिवसेनेत आहे! शिवसेना अमर आहे! शिवसेना अमर आहे!!‘, अशा शब्दांत शिवसेनेने पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर "सामना‘तील अग्रलेखातून शिवसेनेचे महत्त्व विषद केले आहे.
'विकृतीच्या छाताडावर नाचण्याची शिवसेनेत ताकद'
| |
-
| |
==============================
जीन्स-टीशर्ट घातल्याने डोके फिरते- जिल्हाधिकारी
| |
-
| |
लखनौ - उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एन. के. एस. चौहान यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करत, जीन्स-टीशर्ट घातल्याने डोके फिरते असा अजब तर्क लावला आहे.
चौहान यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक काढत जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स-टीशर्ट घालण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंडही आकारण्यात येणार आहे. या पत्रकात लिहिले आहे, की सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या साध्या वेशातच यावे. जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी आहे. तसेच कोणताही कर्मचारी धुम्रपान करताना आढळल्यास त्यालाही दंड करण्यात येणार आहे.
जीन्स-टीशर्ट परिधान करण्यावर यापूर्वीही हरियानातील काही खाप पंचायतींकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आता सरकारी कार्यालयातही बंदी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
==============================
'प्रियांका वद्रांच्या बंगल्याची परवानगी रद्द करा'
| |
-
| |
शिमला - शिमल्याजवळील छाराब्रा येथे गेल्या सहा वर्षांपासून प्रियांका गांधी-वद्रा यांच्या सुरु असलेल्या बंगल्याची परवानगी रद्द करण्याची मागणी, भाजपचे शिमल्यातील आमदार सुरेश भारद्वाज यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
प्रियांका गांधी यांच्या बंगल्याचे सुरु असलेले बांधकाम अति संवेदनशील परिसरात सुरु असल्याने या बंगल्याची परवानगी रद्द करण्याची मागणी भारद्वाज यांच्याकडून करण्यात आली आहे. भारद्वाज यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहिले आहे. शिमलातील भारतीय हवाई दलाच्या तळापासून प्रियांकाचा बंगला अवघ्या 15 किमी अंतरावर आहे. या बंगल्यात हेलिपॅडही आल्याचे त्यांनी उघडकीस आणले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कमांडर देविंदरजीत सिंग यांनाही याठिकाणी बंगल्यास परवानगी नाकारण्यात आली होती. पण, प्रियांका यांच्या बंगल्याला देण्यात आलेल्या परवानगींबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 2400 स्केअर फूट भागात होत असलेल्या या बंगल्याच्या बांधकामाची नुकतीच प्रियांका गांधी व सोनिया गांधी यांनी पाहणी केली होती.
==============================
'रिओ'त ऑलिंपिकपूर्वी आर्थिक आणीबाणी घोषित
| |
-
| |
रिओ दी जानेरो - यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविणाऱ्या ब्राझीलमधील रिओ दि जानेरो राज्यात आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राज्याचे गव्हर्नर फ्रान्सिस्को डॉर्नेल्स यांनी ही आणीबाणी घोषित केली असून, स्पर्धांच्या व्यवस्थापनासाठी फेडरल फंड्सची मागणी केली आहे.
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो शहरात यंदाची ऑलिंपिक स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासाठी शहरात 5 लाखांहून अधिक परदेशी नागरिक येण्याचा अंदाज आहे. स्पर्धांसाठी बहुतांश निधीची तरतूद शहर प्रशासनाने केली आहे. परंतु दळणवळण आणि कायदा व सुव्यवस्थापनाची जबाबदारी राज्य प्रशासनाची असते.
"राज्यात उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीचा ऑलिंपिकवर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही", असे आश्वासन शहराचे महापौर रिओ गव्हर्नर डुआर्डो पेस यांनी ट्विटवरुन दिले आहे. तसेच, देशाचे प्रभारी अध्यक्ष मिशेल टेमर यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
रिओ राज्याचे बहुतांश उत्पन्न तेल उद्योगावर अवलंबून आहे. परंतु गेल्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तसेच कर उत्पन्नात घट झाल्याने तेथे आर्थिक मंदी उद्भवली आहे. तसेच सध्या देशात राजकीय अस्थिरता आहे. शिवाय, ब्राझील झिका विषाणूच्या प्रसारामुळे उद्भवलेल्या समस्येचादेखील सामना करीत आहे.
==============================
राज्यात सोमवारपासून पाऊस बरसणार
| |
-
| |
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी पूर्व भारतातील पश्चिम बंगालचा बहुतांशी भाग व्यापून बिहार आणि ओडिशाच्या पूर्व भागापर्यंतचा टप्पा गाठला आहे. अरबी समुद्रावरून वाटचालीस पोषक वातावरण असल्याने सोमवारपर्यंतच्या (ता. 20) दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सून वाऱ्यांनी शुक्रवारी बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापला आहे. आंध्र प्रदेशच्या संपूर्ण रायलसीमा भागात मजल मारत किनाऱ्याकडील भागात मॉन्सून दाखल झाला. पश्चिम बंगालचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापला. कारवार, गदग, कर्नूल, कलिंगपट्टण, कटक, जमशेदपूरपर्यंत मॉन्सूनचे वारे पोचल्याच्या हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले.
पश्चिम राजस्थान ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे, तर दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशालगत हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे वाहत होते. कर्नाटक आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मॉन्सूनच्या वाटचालीस आवश्यक वातावरणीय स्थिती तयार झाल्याने सोमवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

No comments:
Post a Comment