Friday, 17 June 2016

नमस्कार लाईव्ह १७-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मॉस्को; जगातील पहिले 3D न्यूज बुलेटिन 
२- वॉशिंग्टन; फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय 
३- लंडन ; ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या 
४- यांगून; भारत म्यानमार संबंध बळकट होणार 
५- सेक्स स्कँडलमुळं हादरलं कॅलिफोर्नियातील पोलीस खातं 
६- पाकः विवाह नकार दिल्याने महिलेचा ऍसिड हल्ला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सातव्या वेतन आयोगात 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव 
८- डाळींचे दर कडाडले, तूर डाळ 200 रुपयांच्या घरात 
९- दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार  
१०- विद्यार्थ्यांनी बनविलेला उपग्रह झेपावणार 
११- अहिंसक देशामध्ये वन्यजीवांची हिंसा 
१२- कोचीमध्ये विद्यार्थीच करणार शिक्षकांचे मूल्यमापन 
१३- श्रीनगरमध्ये फडकला पाकिस्तानी झेंडा 
१४- गुगलवर भारतातून घेण्यात येणारा १० पैकी १ सर्च भारतीय चित्रपटांचा 
१५- भारतातून चहाची विक्रमी निर्यात 
१६- काळा पैसा लवकरच परत- राम विलास पासवान 
१७- 'सीबीआय' आम्हाला बदनाम करत आहे- सनातन 
१८- 'काश्‍मीरचा कारभार चालतो संघाच्या मुख्यालयातून' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१९- 'गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करा', राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
२०- जळगाव; शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी 
२१- ‘आॅनलाइन औषधविक्रीला विरोध का?’-  इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशनचा सवाल 
२२- सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र दल - मुख्यमंत्री मागणी 
२३- मुंबई; पालिकेला ४०० कोटींचा चुना 
२४- भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच 
२५- मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन 
२६- एकनाथ खडसे अंजली दमानिया विरोधात करणार १०० कोटींचा दावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- औरंगाबाद; 'तुझ्यामुळे मी आत्महत्या करतेय', मेसेज करुन विद्यार्थिनीची रेल्वेखाली उडी 
२८- पिंपरी; धावत्या रेल्वेखाली आलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं 
२९- अहमदाबाद; गुलबर्ग सोसायटी जळीतकांड : 24 पैकी 11 दोषींना जन्मठेप 
३०- पुणे; आंबेगाव येथे किराणा दुकानावर धाडसी दरोडा 
३१- येवला; दोनशे रुपये भाव मिळाल्याने महामार्गावर ओतला कांदा 
३२- फ्लिपकार्टमुळे उस्मानाबादेतील खुनाचा गुन्हा उघड 
३३- आजीच्या मायेची उब परदेशी, कळंबच्या गोधडीची अमेरिकेत विक्री 
३४- नागपुरात बर्थडे पार्टीसाठी धरणावर गेलेले चौघे युवक बुडाले 
३५- पिंपरी-चिंचवड; विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची धमकी, रिक्षाचालकाला ब्लॅकमेल 
३६- मुंबई; 2000नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यास स्थायी समितीची मंजुरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३७- चॅम्पियन्स ट्रॉफी : सुवर्णपदकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार 
३८- सेल्फीमुळे रवींद्र जडेजा अडचणीत, कारवाईची शक्यता 
३९- हाशिम अमलानं तोडला कोहलीचा विक्रम! 
४०- ऑस्ट्रेलियाकडून पराभव होऊनही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 
४१- 'उडता पंजाब' 700 पेक्षा अधिक संकेतस्थळांवर! 
४२- लंडन; भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================


फ्लिपकार्टमुळे उस्मानाबादेतील खुनाचा गुन्हा उघड

फ्लिपकार्टमुळे उस्मानाबादेतील खुनाचा गुन्हा उघड
उस्मानाबाद : कानून के हात लंबे होते है असं आपण अनेक वर्षापासून ऐकतोय.. माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उस्मानाबाद पोलीसांनी हे खरे करुन दाखवले आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीच्या वेबसाईटहून खरेदी झालेल्या एका जयपुरी कुर्त्यावरून पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावला आहे. एका आयटी इंजिनअरनं प्रेयसी आयटी इंजिनिअरची चलाखीने हत्या केली होती.
२१ डिसेंबरला २०१५ ला उस्मानाबादच्या वाघोलीत एका विहिरीत एक तरुण मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही मुलगी कुठली, तिचा खून कुणी आणि का केला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते. मयत मुलीच्या पोटावर मानेवर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. तिच्या अंगावरील कपड्यावरून ती उस्मानाबादची नसावी असा पोलिसांनी अंदाज होताच. सुरुवातीला पोलीसांना काहीच धागेदोरे मिळत नव्हते.
सहायक पोलीस अधीक्षक तिलक रोशननी मुलीच्या अंगातील जयपुरी कुर्त्याच्या लेबलवरून तो कुर्ता कुठं तयार करतात याची माहिती मिळवली. असे कुर्ते राजस्थानात तयार करून फ्लिपकार्टहून विक्री होतात हे  समजलं. पण त्याच काळात फ्लिपकार्टवरून असे अनेक कुर्ते देशभरात विकले गेले होते.
पोलिसांनी मग  फ्लिपकार्टहून हा कुर्ता खरेदी केलेल्या सर्वांचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलं. ग्राहकांचे फेसबुक अकाऊंट शोधले. त्यापैकी एका फेसबुक अंकाऊंटवरचा नंबर वाघोली जवळ ट्रेस झाला. त्यावरून पुढे तपास करत पोलिसांनी तीघांना अटक केले आहे.
==========================================

आजीच्या मायेची उब परदेशी, कळंबच्या गोधडीची अमेरिकेत विक्री

आजीच्या मायेची उब परदेशी, कळंबच्या गोधडीची अमेरिकेत विक्री
उस्मानाबाद : कधीकाळी गावाकडं घरी जेवणात भाकर आणि अंथरूणात वाकळ हमखास असायची. जुने फाटलेले कपडे.. जुनं धोतर.. लुगड्यावर अंथरून त्याला सुई- धाग्यानं शिवून आजी वाकळ तयार करायची. अलिकडे गावातून वाकळ हद्दपार झाली खरी पण कळंबच्या एका बचत गटानं 100 वाकळी अमेरिकेला विकल्या आहेत.

आजीच्या वाकळी म्हणून ‘द बिग इंडियन स्टोरी’ नावाच्या ऑनलाईन पोर्टलनं बचतगटाला वाकळी बनवण्याचं काम देऊन या वाकळी अमेरिकत पोहचत्या केल्या. देशांतर्गत विक्रीसाठी आणखी 500 वाकळी तयार होत आहेत.

अंकल सॅमच्या अमेरिकेला कळंबच्या गोधडींची भुरळ पडलीय. गेल्या वर्षीच्या कोल्ड वेवनंतर तीन महिन्यात बचतगटाच्या 100 गोधड्या अमेरिकेला विकल्या गेल्या. अमेरिकेतल्या भारतीयांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आजीच्या आठवणी म्हणून गोधडीला पसंती दिलीय.

द बिग इंडियन स्टोरीचे मालक रवी नरहिरेंच्या कल्पनेतून गोधड्यांची अमेरिकेत विक्री सुरु झाली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले रवि मूळचे कळंबचे. पुण्यात राहून ऑनलाईन पोर्टलवरुन वस्तूंची विक्री करतात. आजीच्या गोधडीला अमेरिकेत किती मार्केट मिळेल याचा रवी यांनी सर्वे केला. नंतर गोधडीचं काम बचतगटाला दिलं. परदेशात विक्री व्हावी यासाठी गोधडीला नैसर्गिक रंग वापरला.

एका गोधडीसाठी महिलांना 900 रुपये मिळतात. अमेरिकेत या गोधडीची किंमत आहे 3 हजार रुपये वाकळ, गोधडी अशा विविध नावानं प्रचलित असलेल्या वाकळी पूर्वी उन्हाळ्यात घरोघरी शिवल्या जायच्या.

जुने फाटलेले कपडे, जुनं धोतर, लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्यानं शिवली की वाकळ तयार. एक वाकळ विणायला आजीला 8 ते 10 दिवस लागायचे. रवींच्या टीमन वाकळीचे तीन भाग केले. त्यामुळे एक वाकळ तीन दिवसात तयार होते.

कधीकाळी गावाकडं घरी जेवणार भाकरी आणि अंथरुणात गोधडी हमखास असायची. हिवाळ्यात शरीराला उब देणारी उन्हाळ्यात अजिबातही गरम न होणाऱ्या गोधड्या परदेशात लोकप्रिय झाल्या आहेत. अजूनही 500 गोधड्या थोड्या दिवसात अमेरिकेला रवाना होणारायत. तुम्हीही तुमची ऑर्डर पटकन नोंदवा.
==========================================

नागपुरात बर्थडे पार्टीसाठी धरणावर गेलेले चौघे युवक बुडाले

नागपुरात बर्थडे पार्टीसाठी धरणावर गेलेले चौघे युवक बुडाले
नागपूर : नागपुरात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करायला गेलेल्या तरुणांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपुरातल्या बुटीबोरी भागातल्या रामा डॅमजवळ वाढदिवसाची पार्टी करायला गेलेले चार तरुण डॅममध्ये बुडाले.

बुडालेल्या तरुणांपैकी आदित्य चरडे आणि विकी दवंडे अशा दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. तर इतर दोघांचा शोध अजूनही सुरुच आहे.


आदित्यचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे तीन मित्र आणि एक भाऊ रामा डॅमवर गेले होते. आदित्य आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडाल्याचं सांगण्यात येतंय.
==========================================

विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची धमकी, रिक्षाचालकाला ब्लॅकमेल

विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची धमकी, रिक्षाचालकाला ब्लॅकमेल
पिंपरी-चिंचवड : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिंपरी-चिंचवडमधल्या दोन महिलांनी रिक्षाचालकाकडून खंडणी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर एका महिलेला अटक झाली आहे तर दुसरी महिला पसार झाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वकिल शिल्पा शिंदे आणि सराईत गुन्हेगार सारिका थोरात या दोघींनी खंडणीसाठी विनयभंगाचा बनाव करण्याचा कट रचला. या दोघींनी एका रिक्षाचालकाला गाठलं आणि जागा पाहाण्याच्या बहाण्यानं पिंपरी-चिंचवड परिसरात फिरवलं. मोहननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर दोघीही रिक्षा थांबवून खाली उतरल्या. त्याचवेळी आलेल्या पोलिसांना रिक्षाचालकानं आपला विनयभंग केल्याचं सांगितलं.


त्यानंतर तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं गेलं. मात्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली कोणतीही तक्रार नसल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर येत दोघींनी रिक्षाचालकाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.
==========================================

श्रीनगरमध्ये फडकला पाकिस्तानी झेंडा


  • ऑनलाइन लोकमत 
    श्रीनगर, दि. १७ - जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडा फडकवण्यात आला आहे. शुक्रवारी काश्मिरी पंडित आणि सैनिक कॉलनी विरोधात आंदोलनाच्यावेळी फुटीरतावाद्यांनी पाकिस्तान आणि इसिसचा झेंडा फडकवला. 
    फुटीरतवादी नेते मीरवाइज उमर फारुखही यावेळी आंदोलकांसोबत होता. हिंसक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. 
==========================================

एकनाथ खडसे अंजली दमानिया विरोधात करणार १०० कोटींचा दावा


  • ऑनलाइन लोकमत
    जळगाव, दि. १७ -  राष्ट्रवादी काँग्रेस हा तडजोड करणारा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व नाममात्र असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यावर आरोप करीत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, माझ्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य आरोप करणाऱ्यांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    शुक्रवारी ते जळगावात आले असता, ‘मुक्ताई’ या त्यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर व भाजपावर टीका केली. सध्या जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व हे नाममात्र आहे. आपल्या मुक्ताईनगर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिवसेनेला मदत केली.
    या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पाच हजारांच्या आत मते पडली. अपेक्षित मते न पडल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी यावी तसेच कार्यकर्त्यांना चेतना मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
==========================================

सेक्स स्कँडलमुळं हादरलं कॅलिफोर्नियातील पोलीस खातं


  • ऑनलाइन लोकमत
    शरीर विक्रय करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सहभाग असलेलं आणि कॅलिफोर्नियातील तब्बल 31 पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असलेलं सेक्स स्कँडल उघड झालं असून अमेरिकेत त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. वेश्यागृहांवर धाड पडणार आहे का अशा टिप्स किंवा पैसे देऊन अल्पवयीन मुलीला सेक्समध्ये या पोलीसांनी गुंतवल्याचा आरोप आहे. हे स्कँडल एवढं गाजतंय की शहर पोलीस प्रमुखाला राजीनामा द्यावा लागला आहे.
    आता ही तरूणी सज्ञान असली तरी ती अल्पवयीन असल्यापासून हा प्रकार सुरू होता, आणि या तरुणीने ऑकलंडमधल्या 14 पोलीस अधिकाऱ्यांशी, रिचमंडमधल्या 5 अधिकाऱ्यांशी, सान फ्रान्सिस्कोमधल्या 3 अधिकाऱ्यांशी, स्टॉकटन व लिवरमोरमधल्या एकेक अधिकाऱ्याशी, अलमेडा काउंटीतल्या 4 अधिकाऱ्यांशी आणि काँट्रा कोस्टा कंट्रीच्या 3 अधिकाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवल्याचे आणि काही प्रसंग तर ती अल्पवयीन असतानाचे असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर सेलेस्ट गुआप नावानं सदर तरूणी वावरत असून तिने फेसबुक पोस्ट व अन्य मेसेजच्या माध्यमातून खूप माहिती दिल्याचे बझफीड न्यूजनं म्हटलं आहे.
==========================================

गुगलवर भारतातून घेण्यात येणारा १० पैकी १ सर्च भारतीय चित्रपटांचा


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १७ : भारतीयांना असलेल्या चित्रपटाच्या वेडामुळे भारतीय सिने रसिकांना इमर्सिव (गुंगवून टाकणारा) अनुभव देण्यासाठी गुगल इंडिया ने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. गुगल आपल्याला भारतीय सिनेमाविषयी हवी असलेली इत्यंभूत माहिती पुरवतो. गेल्या अनेक वर्षात भारतीय सिनेमाविषयी गुगल वर विविध प्रकारची माहिती सर्च केली जाते. मग आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री, गाणी, सिनेमासंबंधी किस्से, किंवा मग सिनेमाच्या प्रदर्श्नासाबंधी माहिती असो, ही सर्व महती आपण गुगल वर एका क्लिक वर मिळवत होतो. आता तर गुगलने आपली शोध मोहीम गुगल स्पीक द्वारे अगदीच सोपी केली आहे.
    नुकतेच मुंबईतील ताज लॅण्ड एन्ड मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गुगलने भारतीय सिनेमासाठी केल्या जाणाऱ्या सर्च सबंधी आपले अनुभव व्यक्त केले. त्यांनी आपल्या एका नवीन पण हटके फिचरची ओळख करून दिली. या फिचरच्या साह्याने आपल्याला गुगल वर सर्च करताना शब्द लिहिण्याची (टायपिंग) करण्याची गरज भासणार नाही, तुमच्या आवाजाने तुम्ही गुगल वर हवं ते सर्च करू शकाल अशी नवीन ह्णगुगल स्पीकह्णची ओळख. या सर्च माध्यमातून भारतीय चित्रपटांना मानवंदना देणारा व्हिडिओ या वेळी प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये आपल्या एक मराठी चेहरा नंदू माधव यांचा दिसतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी आपल्या विशिष्ट शैली मध्ये केले.
==========================================

2000नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यास स्थायी समितीची मंजुरी


  •  ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 17- 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला आहे. शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी प्रस्तावाला एकमतानं मान्यता दिली. मात्र मनसेनं या प्रस्तावाला विरोध केला आहे. 
    2000च्या अनधिकृत झोपड्यांना मान्यता दिल्यानंतर त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला होता. पदपथ आणि रस्त्यांवरील झोपड्या, खासगी जमिनीवरील झोपड्या, समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावठाणावरील झोपड्या आणि सरकारच्या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न यामुळे उपस्थित झाला होता. मात्र आता झोपड्यांना नियमानुसार पाणीपुरवठा करता येणार आहे.  
==========================================
भारतातून चहाची विक्रमी निर्यात

कोलकाता: भारताला तब्बल 35 वर्षांनंतर चहा निर्यातीत 230 दशलक्ष किलोचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) देशातून 232.92 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली आहे. त्याबदल्यात देशाला 4,493.10 कोटी रुपये मिळाले आहेत. यापुर्वी 1980-81 साली देशातून 231.74 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती. त्याआधी 1976-77 आणि 1956-57 साली अनुक्रमे 242.42 दशलक्ष किलो आणि 233.09 दशलक्ष किलो चहा निर्यात झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात आणि पोलंडसारख्या देशांनी अधिक चहा खरेदी केल्याने निर्यात वाढली आहे.

त्याशिवाय, देशात लिलावाद्वारे विक्री झालेल्या चहालादेखील चांगली किंमत मिळाली आहे. देशात लिलाव झालेल्या चहाची किंमत आणि प्रमाण अनुक्रमे 8.05 टक्के आणि 17.82 टक्क्यांनी वाढले. उत्तर भारतात झालेल्या लिलावात चहाविक्रीचे प्रमाण 39.31 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच किंमतीत 3.27 टक्क्यांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील लिलावात चहाविक्रीचे प्रमाण 26.22 टक्क्यांनी वाढले आहे. येथे विक्री झालेल्या चहाला गेल्यावर्षीच्या तुलनेत 29.01 टक्के जास्त किंमत मिळाली आहे. 
==========================================
काळा पैसा लवकरच परत- राम विलास पासवान

मेदिनिनगर (झारखंड)- परदेशातील काळा पैसा लवकरच परत येईल, असे केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पासवान म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीदरम्यान परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. मोदी सरकार हे चांगल्याप्रकारे काम करत आहे. काळा पैसा हा भारतात लवकरच आणला जाईल. गेल्या दोन वर्षांमध्ये एकही केंद्रीय मंत्री भ्रष्टाचारामध्ये सापडलेला नाही. हे मोठे यश आहे.‘

बोगस रेशनकार्डबाबत त्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘तपासादरम्यान 10 हजार 162 बोगस रेशनकार्ड आढळून आले असून ते रद्द करण्यात आले आहेत.‘
==========================================
पाकः विवाह नकार दिल्याने महिलेचा ऍसिड हल्ला

इस्लामाबाद (पाकिस्तान)- विवाहास नकार दिल्यामुळे चिडलेल्या महिलेने एकावर ऍसिडने हल्ला केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिस अधिकारी बशीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोनिल माई (वय 32) या महिलेने विवाहास नकार दिल्यामुळे अहमद नावाच्या व्यक्तीवर ऍसिडने हल्ला केला. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.‘

दरम्यान, पाकिस्तानमध्ये एखाद्या महिलेकडून पुरुषावर हल्ला करण्याची ही प्रथमच वेगळी घटना घडली आहे. पाकिस्तानमध्ये पुरुषांकडून महिलांवर हल्ला करण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत.
==========================================
'सीबीआय' आम्हाला बदनाम करत आहे- सनातन

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला वीरेंद्र तावडे निर्दोष आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आमच्या विरोधात बोगस साक्षीदार उभे करून आम्हाला बदनाम करत आहे, असा दावा सनातन संस्थेचे अभय वर्तक व संजीव पुनाळकर यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व हेमंत करकरे यांनी हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेतली होती. ते आमचे शत्रूच होते, पण त्यांच्या हत्येशी आमच्या साधकांचा संबंध नाही. आमच्या विरोधात बोगस साक्षीदार उभे करून सीबीआय आम्हाला बदनाम करत आहे. वीरेंद्र तावडे यांच्याविरोधात सीबीआयने ज्या संजय साडविलकरला साक्षीदार बनवले आहे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. साडविलकरला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातील चांदीचा रथ बनवण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यात त्याने कोटयावधीचा भ्रष्टाचार केला. 2012 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. सनातन संस्था या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे.‘

‘साडविलकर याला साक्ष देण्यासाठी किती पैसे मिळाले, याबद्दल ब्रेन मॅपींग व नार्को टेस्टद्वारे चौकशी झाली पाहिजे. साडविलकर याचे राजकीय संबंध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांना तो भेटला आहे. सीबीआय हे राज्यातील पोलिसांनाही बदनाम करत आहे,‘ असेही ते म्हणाले.
==========================================
'काश्‍मीरचा कारभार चालतो संघाच्या मुख्यालयातून'

श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध आरोपांखाली पकडण्यात आलेल्या 22 आरोपींना नागपूरमधून दूरध्वनी आल्यानंतर सोडण्यात आले असून, काश्‍मीरचा कारभार स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून चालतो, असा आरोप जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

अनंतनाग येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना अब्दुल्ला म्हणाले, ‘जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या कटपुतलीसारख्या काम करत आहेत. नागपूर येथून संघाच्या मुख्यालयातून मुफ्ती यांना आदेश दिले जातात. संसदेमध्ये 22 आरोपींविरोधात कारवाई करू असे सांगण्यात आले होते. परंतु, या आरोपींना सोडून देण्याबरोबरच त्यांच्यावरील आरोपही काढण्यात आले.‘

‘काश्‍मीरमध्ये दंगल घडविणारे काश्‍मीरी असते तर त्यांना कारागृहात टाकले असते. परंतु, या लोकांना बोलण्याचीही परवानगी नाही. जम्मू-काश्‍मीरमध्ये एका मंदिराची तोडफोड केल्यानंतर गोंधळ उडाला होता. मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांनाच पोलिसांनी बेदम मारहाण केली,‘ असेही अब्दुल्ला म्हणाले.
==========================================

No comments: