[अंतरराष्ट्रीय]
१- RSS ची इफ्तार पार्टी, पाक उच्चायुक्तांना फोन कॉल, तुम्ही येऊ नका
२- 'भारतीय आत्मकेंद्रीत'; चीनी माध्यमांची टीका
३- लंडन; मंगळावरील मातीत पिके घेण्यात यश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- हाफिज सईदच्या जावयाचा पंपोर हल्ल्यामागे हात, कोडवर्ड - 'अहमदवाला काम'
५- NIA कोर्टाने फेटाळला साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज
६- दादरमध्ये निघालेल्या रिपब्लिकन सेनेच्या मोर्चात दुकानांवर दगडफेक ?
७- आता कॅशलेस व्यवहारांवर रिझर्व्ह बँक देणार भर!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- ठाणे; कळवा शिवसेना शाखा कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत : आव्हाड
९- शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य, अध्यादेशाला मंजुरी
१०- श्रीनगर; भाजप नेत्याच्या घरात दहशतवादी घुसले
११- बिहार - सासाराममध्ये पुरुषोत्तम एक्सप्रेसचा एक डबा पटरीवरुन घसरला
१२- हैदराबाद हायकोर्टाने शिस्तभंगाची कारवाई करत नऊ न्यायाधिशांना केले निलंबित
१३- दादर हिंदमाता परिसरात कडकडीत बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- अमरावती; एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या?
१५- उस्मानाबाद; पतीच्या आत्महत्येनंतर 20 दिवसांच्या बाळंतीणीनेही जीवन संपवलं
१६- इंदूर; प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या
१७- नगरमध्ये झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह
१८- जयपूर; हुंडा न दिल्याने कपाळावर गोंदवलं 'मेरा बाप चोर है'
१९- बंगळूर: महिला कॅबचालकाची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला महाराष्ट्रीयन पदार्थांची भुरळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================

एकीकडे नागरिकांची घरं पाडल्यानंतर त्यांना पुन्हा घरं बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. तर शाखा बांधण्यासाठी पुन्हा परवानगी कशी मिळते, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय.
एप्रिल-मे महिन्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या शाखेचं बांधकाम पाडण्यात आलं. आता मात्र पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर अनधिकृतपणे बांधकाम सुरु असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
पालिकेनं सेनेच्या शाखा कार्यालयाचं बांधकाम थांबवलं नाही तर उपोषण करण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. आता शिवसेना याला काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कळंब तालुक्यातील पाडोळी गावात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 32 वर्षीय महिंद्रा श्रीराम टेकाळे या शेतकऱ्याने 24 तारखेला आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर चारच दिवसांत पहाटे त्याच्या 27 वर्षीय पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली.
सुप्रिया यांनी 20 दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे 20 दिवसांची चिमुरडी आणि मोठी 4 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहे. या घटनेमुळे समस्त पाडोळी गाव सुन्न झालं आहे.

पीडित तरुणीच्या पित्याने हुंड्यात 51 हजार रुपये न दिल्यामुळे सासरच्या मंडळीनी तिच्या शरीरभर शिव्या गोंदवल्या. त्याचप्रमाणे तिच्या कपाळावर ‘मेरा बाप चोर है’ असं गोंदवल्याचीही माहिती आहे. महिन्याभरापूर्वी तिला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं. तिला बेशुद्ध करुन शरीरावर शिव्या गोंदवल्याचा आरोप आहे.
विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी गोंदवलेला मजकूर मिटवण्याचा आतोनात प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलवरमधील राजगडमध्ये राहणाऱ्या जग्गू नामक युवकाशी 14 जानेवारी 2015 रोजी तरुणीचा विवाह झाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिला हुंड्यासाठी त्रास देण्यात येत होता, असंही त्यांनी म्हटलंय.

एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या?
अमरावती : अंजनगांव सुर्जीत एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व मृतदेह काठीपुरा येथील चौहान कुटुंबातील आहेत.
एकाच वेळी इतके मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मृतांमध्ये ४ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.
==================================
कळवा शिवसेना शाखा कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत : आव्हाड
ठाणे : ठाणे महानगरपालिकेनं शहरातील रस्ता रुंदीकरण करताना कळवा नाक्यावरील शिवसेनेची शाखा पाडली. मात्र, आता या शाखेची पुन्हा उभारणी सुरु झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
एकीकडे नागरिकांची घरं पाडल्यानंतर त्यांना पुन्हा घरं बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. तर शाखा बांधण्यासाठी पुन्हा परवानगी कशी मिळते, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय.
एप्रिल-मे महिन्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या शाखेचं बांधकाम पाडण्यात आलं. आता मात्र पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर अनधिकृतपणे बांधकाम सुरु असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
पालिकेनं सेनेच्या शाखा कार्यालयाचं बांधकाम थांबवलं नाही तर उपोषण करण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. आता शिवसेना याला काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
==================================
शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य, अध्यादेशाला मंजुरी
मुंबई: शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य होणार आहे. कारण फळं आणि भाजीपाला आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आला आहे.
त्यासंदर्भातल्या अध्यादेशाला आज राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.
आतापर्यंत बाजार समिती कायद्यानुसार शेतकऱ्यांना फळं आणि भाजीपाला बाजार समित्यांच्या आवारातच विक्री करावा लागत होता. मात्र व्यापाऱ्यांकडून अनेक शेतकरी नाडले जात होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
==================================
पतीच्या आत्महत्येनंतर 20 दिवसांच्या बाळंतीणीनेही जीवन संपवलं
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये चार दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीनेही टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीपाठोपाठ पत्नीनेही आत्महत्या केली असून तिने अवघ्या 20 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता.
कळंब तालुक्यातील पाडोळी गावात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 32 वर्षीय महिंद्रा श्रीराम टेकाळे या शेतकऱ्याने 24 तारखेला आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर चारच दिवसांत पहाटे त्याच्या 27 वर्षीय पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली.
सुप्रिया यांनी 20 दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे 20 दिवसांची चिमुरडी आणि मोठी 4 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहे. या घटनेमुळे समस्त पाडोळी गाव सुन्न झालं आहे.
==================================
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला महाराष्ट्रीयन पदार्थांची भुरळ
मुंबई: अभिनेत्री अमृता राव ही महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीच्या बरीच प्रेमात पडली आहे. ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेतील सहकलाकार पल्लवी जोशीनं सगळ्यानाच मराठमोळ्या जेवणाची मेजवानी दिली.
या मेजवानी बद्दलच अभिनेत्री अमृता राव हिने पल्लवी जोशीचे आभार मानले. या मालिकेत दोन मराठी कलाकार असल्यानं सेटवर बऱ्याचदा महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते.
पल्लवी नेहमीच सेटवर घरुन बनंवलेलं जेवण घेऊन येते. त्यामुळे येथील इतर कलाकारांनाही ती मराठी पदार्थ खाऊ घालते.
पल्लवीनं दिलेल्या मेजवानीनंतर अमृतानं सांगितलं की, ‘सेटवर सगळेच खाण्याचे शौकिन आहेत. महाराष्ट्रीयन पदार्थांमुळेच आमची मैत्री झाली आहे. ही गोष्ट फारच चांगली आहे की, पल्लवी आमच्यासाठी नेहमीच खास जेवण घेऊन येते.’
==================================
हाफिज सईदच्या जावयाचा पंपोर हल्ल्यामागे हात, कोडवर्ड - 'अहमदवाला काम'
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशवादी हाफिज सईदचा जावई खालिद वालिदचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले, तर 21 जवान जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठकही सुरु आहे.
मोठ्या हल्ल्याची तयारी?
सध्या जम्मू काश्मिरमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू दुजाना दबा धरून बसला आहे. तो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं गुप्तचर सूत्रांनी सांगितलं आहे.
==================================
प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या
इंदूर: प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडली आहे. हितेश नावाच्या या तरुणानं प्रेयसीच्या छळाला वैतागून गळफास घेतल्याचं वृत्त समजतं आहे.
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल जेव्हा पाहिला त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण की, त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल 351 मिस्ड कॉल होते.
हितेशनं प्रेयसीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. कारण की, सहा महिन्यापूर्वीच त्याच्यावर तिने बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
तिच्या या खोट्या केसमुळे हितेशला 1 महिना जेलमध्येही जावं लागलं होतं. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्यानंतर त्यानं प्रेयसीला भेटणं सोडून दिलं होती. पण त्यानंतर ती त्याला अधिकच छळू लागली. असंही कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
ती त्याला वारंवार फोन करायची. दिवसातून एक दोनदा नव्हे तर तब्बल 300 ते 400 फोन त्याला करायची. पोलिसांनी हितेशचा फोन ताब्यात घेतला असून ते यासंबंधी अधिक चौकशी करीत आहेत.
==================================
नगरमध्ये झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह
अहमदनगर: पारनेर तालुक्यात एका तरुणाचं अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. संतोष ढोकळे असं या तरुणाचं नाव असून तो पारनेरच्या खडकवाडी परिसरातील रहिवासी होता.
संगमनेरच्या जांबूत बुद्रुक परिसरात एका झाडाला लटकलेला त्याचा मृतदेह सापडला. संतोषचं पोल्ट्री फार्म असून रविवारी रात्री काही लोकांनी गाडीत बसवून त्याचं अपहरण केल्याची तक्रार पारनेरमध्ये नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून छेड काढल्याप्रकरणी अपहरण आणि हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
==================================
RSS ची इफ्तार पार्टी, पाक उच्चायुक्तांना फोन कॉल, तुम्ही येऊ नका
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंचने पाकिस्तान उच्चायुक्तांना दिलेलं इफ्तार पार्टीचं निमंत्रण मागे घेतलं आहे. जम्मू काश्मिरमधील पंपोर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी, पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मुस्लिम राष्ट्रीय मंचने बासित यांना फोन करुन, पार्टीला येऊ नका, असं सांगितलं.
मुस्लिम राष्ट्रीय मंचने दोन जुलैला दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. त्यासाठी बासित यांच्यासह विविध मुस्लिम राष्ट्रांच्या राजदुतांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र आता बासित यांना येऊ नका, असं सांगण्यात आलं आहे.
बासित यांचं वादग्रस्त वक्तव्य
जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले. शनिवारी झालेल्या या हल्ल्याबाबत बासित यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना बासित म्हणाले, “जम्मू काश्मिरचा प्रश्न भारत-पाकिस्तानमध्ये आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवाण्याची दोन्ही देशांची तयारी आहे. दोन्ही देश चर्चेसाठी प्रत्यक्षात तयार होतील अशी एक वेळ येईल”
==================================
हुंडा न दिल्याने कपाळावर गोंदवलं 'मेरा बाप चोर है'
जयपूर : हुंडा न दिल्यामुळे विवाहितेच्या शरीरावर शिव्या गोंदवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवरमधील रैणीमध्ये हा प्रकार घडल्याचं वृत्त आहे.
पीडित तरुणीच्या पित्याने हुंड्यात 51 हजार रुपये न दिल्यामुळे सासरच्या मंडळीनी तिच्या शरीरभर शिव्या गोंदवल्या. त्याचप्रमाणे तिच्या कपाळावर ‘मेरा बाप चोर है’ असं गोंदवल्याचीही माहिती आहे. महिन्याभरापूर्वी तिला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं. तिला बेशुद्ध करुन शरीरावर शिव्या गोंदवल्याचा आरोप आहे.
विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी गोंदवलेला मजकूर मिटवण्याचा आतोनात प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलवरमधील राजगडमध्ये राहणाऱ्या जग्गू नामक युवकाशी 14 जानेवारी 2015 रोजी तरुणीचा विवाह झाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिला हुंड्यासाठी त्रास देण्यात येत होता, असंही त्यांनी म्हटलंय.
==================================
NIA कोर्टाने फेटाळला साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २८ - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला क्लीनचीट दिल्यानंतरही विशेष एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञाचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांना जामीनासाठी पुन्हा अर्ज दाखल करावा लागणार आहे.आणखी बातम्या :(साध्वी प्रज्ञासिंहचा जामीन शक्य)(साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट)मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वीसह अन्य तिघांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले, तसेच सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, तिच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज बॉम्बस्फोटातील एका पीडिताने दाखल केला, तर तिची जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी दीपक पारेख यांनीही मध्यस्थी अर्ज दाखल केला.मात्र आज झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
==================================
दादरमध्ये निघालेल्या रिपब्लिकन सेनेच्या मोर्चात दुकानांवर दगडफेक ?
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २८ - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दादर पूर्व भागातील काही दुकान बंद करण्यात आली असून, काही दुकानांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे.स्वत:हा आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करत असून, आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलिस स्थानकापर्यंत हा मोर्चा काढला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टकडे या दोन वास्तूंची मालकी होती. सोमवारी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता.
==================================
आता कॅशलेस व्यवहारांवर रिझर्व्ह बँक देणार भर!
- सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- कॅशलेस व्यवहाराद्वारे आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी नियमांमधे रिझर्व बँक लवकरच आवश्यक बदल करणार आहे. छोटे दुकानदार, रुग्णालये, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्व ठिकाणी क्रेडिट अथवा डेबिट कार्डांद्वारे अथवा आॅनलाईन भरणा स्वीकारला जाईल, अशी ही व्यवस्था असेल. खेडी आणि छोट्या शहरांमधे कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. लवकर त्या वाढवण्याची योजना तयार होते आहे.रिझर्व बँकेच्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम इन इंडिया २0१८ या व्हिजन डाक्युमेंटनुसार भारतात सध्या कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची खूपच कमतरता आहे. हा व्यवहार वाढावा यासाठी छोट्या दुकानापासून, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश, फीचा भरणा, सरकारी कार्यालयात बिलांचा भरणा इत्यादी विविध सेवांचा या योजनेत समावेश करण्याची योजना आहे. कार्डांद्वारे सर्व ठिकाणी सहज भरणा करता यावा, यासाठी एटीएमपासून पीओएस मशिन्स कार्यान्वित करण्यापर्यंत अधिकाधिक पायाभूत सेवा व्यापक प्रमाणात वाढवण्यात येणार आहेत.रिझर्व बँकेच्या सूत्रानुसार देशभर कॅशलेस व्यवहार वाढवणे बरेच अवघड काम आहे. रोखीत व्यवहार करण्याऐवजी लोकांनी कार्डांचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी ट्रँझॅक्शन चार्ज व व्यवहारांसाठी आवश्यक आॅपरेशनल खर्च कमीत कमी पातळीवर आणण्यावर बँकेचा भर आहे. रिझर्व बँकेच्या अपेक्षेनुसार प्रचलित नियमांमुळे पायाभूत सेवांमधे वाढ होउ शकलेली नाही. नियमांमधे त्यासाठी सोयीस्कर बदल करण्याची तयारीही बँके ने चालवली आहे. देशात एटीएम सेवांची व्याप्ती वाढावी,यासाठी व्हाईट लेव्हल एटीएमचे नियम अधिक सरळ व सोपे करण्याचा विचार सध्या बँकेने सुरू केला आहे.
==================================
बीजिंग - अणुपुरवठादार गटातील सदस्यत्वाच्या (एनएसजी) प्रवेशाबाबत भाष्य करताना चीनमधील माध्यमांनी भारतावर टीका केली असून काही भारतीय अत्यंत आत्मकेंद्रित असल्याचे म्हटले आहे.
चीनमधील ‘ग्लोबल टाईम्स‘नावाच्या दैनिकातील संपादकीय लेखातून भारतावर टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘भारत हा एनपीटीमध्ये नाही. मात्र एनएसजीमधील सदस्यत्वासाठी सर्वांत क्रियाशील सदस्य आहे. सेऊलमधील बैठकीपूर्वी भारतीय माध्यमांनी या (एनएसजी) कराराचे महत्त्व दाखविले. काहींनी तर एनएसजीमधील 48 देशांच्या सदस्यांपैकी चीनसोडून उर्वरित 47 जणांनी हिरवा कंदील दाखविल्याचे म्हटले.‘ तसेच दिल्लीचा एनएसजी करार नियमामुळे बाद ठरला आहे. बीजिंगमुळे नव्हे असे संपादकीय लेखात म्हटले आहे.
"भारताला अपवादात्मक परिस्थिती म्हणून एनपीटी कराराशिवाय एनएसजीचे सदस्यत्व हवे होते. त्यामुळे भारताच्या प्रस्तावाप्रमाणे चीन आणि इतर देशही सुरक्षेच्या तत्वांतर्गत नैतिकदृष्ट्या एनएसजीसाठी पात्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहात आहोत की पाश्चिमात्य देश भारताला उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र चीनला नाही. पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने भारत "गोल्डन बॉय‘ आहे.‘‘, असेही पुढे म्हटले आहे.
'भारतीय आत्मकेंद्रीत'; चीनी माध्यमांची टीका
| |
-

भाजप नेत्याच्या घरात दहशतवादी घुसले
| |
-
| |
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे भाजपचे नेते गुलाम महमद चोपन यांच्या घरात मंगळवारी चार संशयित आरोपी घुसले. चोपन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून एके 56 रायफल हिसकावून ते पळून गेले.
बडगाम जिल्ह्यातील चांदोरा येथील घरात ही घटना घडली. त्या वेळी चोपान घरातच होते. चांदोरा गाव श्रीनगरपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. घटनेनंतर त्या भागात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून गावात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दशहतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, आज सकाळी कुपवाडा जिल्ह्यात जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर
| |
-
| |
नवी दिल्ली - भारतातील नव्या क्रिकेट मोसमाला सप्टेंबरमध्ये सुरवात होत असून, न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (मंगळवार) या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच सामन्यांची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी 22 सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळविली जाणार आहे. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे इन्दूर आणि कोलकता येथे खेळविला जाणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे.
भारतीय संघ या मालिकेपूर्वी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे.
==================================
लंडन - नासाच्या रोव्हरने (बग्गी) पृथ्वीवर पाठविलेल्या मंगळवरील मातीच्या नमुन्यात पृथ्वीवर पिके पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसेच ही भाजी मानवी आरोग्यासाठी योग्य असल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.
नेदरलॅण्डमधील वागेनिन्गेनविद्यापीठात 2013 पासून मंगळ आणि चंद्रावरील मातीच्या नमुन्यांमध्ये पीके घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचा पहिला प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला होता. त्यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारची पीके घेण्यात यश मिळाले. यापूर्वी मंगळावरील मातीच्या नमुन्यात अनेक प्रकारची खनिजे असल्याचे आढळून आले होते. याच संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणून या नमुन्यात पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. "हा निष्कर्ष नक्कीच चांगला आहे. आम्ही या भाज्यांची प्रत्यक्ष चव घेणार आहोत आणि त्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. या पिकांची चाचणी केवळ जड धातूंचे प्रमाण पाहण्यासाठी केली नसून त्यातील जीवनसत्वांचे तसेच काही मूलद्रव्यांचे प्रमाणही तपासण्यात आले आहे‘, असे वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विगेर वॅमलिंक यांनी सांगितले.
मंगळावरील मातीत पिके घेण्यात यश

या वनस्पतींमध्ये जड धातूंचे प्रमाण हे जमिनीवरील उगवलेल्या पिकांमध्ये जितके असते त्यापेक्षाही कमी होते. या नमुन्यांमध्ये जास्तीत जास्त विविध प्रकारची पिकांची चाचणी घेणे आवश्यक असून भविष्यात मंगळावर राहण्यास योग्य, खाण्यास योग्य अन्नपदार्थांचा शोध लागण्यास मदत होईल, असेही वॅमलिंक यांनी सांगितले.
==================================
बंगळूर - बंगळूरमधील महिला कॅब चालकाने सोमावारी स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथून भारती विराथ (वय 40) या शहरातील एका उपनगरात भाड्याने राहत होत्या. दरम्यान सोमवारी रात्री घरमालकाला भारती यांनी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. अशी माहिती संजय नगर येथील पोलिस निरीक्षक प्रकाश यांनी दिली. "भारती यांचे घर तिसऱ्या मजल्यावर होते. रविवार संध्याकाळपासून भारती न दिसल्याने घरमालक माहिती घेण्यासाठी सोमवारी रात्री त्यांच्या घराजवळ पोचला. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर भारती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी आम्हाला कळविले. तसेच भारती या बंगळूरमधील महिला टॅक्सी चालक असून गेल्या दोन वर्षांपासून त्या उबेरशी संलग्न असलेल्या अँगल सिटी कॅब या ऑनलाईन वाहतूक संस्थेत कार्यरत होत्या‘, असे प्रकाश यांनी सांगितले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अनैसर्गिक मृत्युची नोंद केली असून उत्तर तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
बंगळूर: महिला कॅबचालकाची आत्महत्या

No comments:
Post a Comment