[अंतरराष्ट्रीय]
१- कोलंबो; ...म्हणून ‘लिट्टे’शी युद्ध संपवले! - श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे
२- मिशिगन; कदाचित... हा पोपट बनणार खुनाचा साक्षीदार
३- इस्लामाबाद; युद्धाने काश्मीर जिंकणे पाकला अशक्य:रब्बानी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- गव्हर्नरपदासाठी केंद्राकडून चार नावं शॉर्टलिस्ट
५- मोदीजी अब 'यूपी वाले' है - अमित शहा
६- राजन यांच्यावरील टीका अयोग्य, मोदींची स्वामींना अप्रत्यक्ष चपराक
७- आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मौर्य यांचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- पोस्टर, पेपरनंतर आता सेना-भाजपची रस्त्यावर लढाई
९- तुकोबांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान, माऊलींची पालखीही सज्ज
१०- 'यूपी'च्या मुख्यमंत्रिपदासाठी शीलांचा नकार
११- दहा महिला माओवाद्यांनी बस्तर पोलिसांसमोर शरणागती पत्करली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- डहाणूत विक्रमी पाऊस, प. महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत
१३- चित्री; छायाचित्रकार न आल्याने वधुने मोडले लग्न !
१४- पटना; बिहारला 'टॉपर'प्रकरणी माजी सचिवास अटक
१५- कानपूर; हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक
१६- लखनऊ; अल्पवयीन मुलीने केला चिमुरड्यावर बलात्कार
१७- औरंगाबाद; गर्भसंस्कार पुस्तकावरील कारवाईला ४ आठवड्यांची स्थगिती
१८- सोलापूर : पंढरपूर ते पुणे रोडवर साडेतीन लाखांचा अवैध गुटखा जप्त
१९- *नांदेड; उमरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2015 च्या पिक विमा योजनेचा लाभन मिळाल्याबद्ल संभाजी ब्रिगेड उमरीच्या वतिने उद्या रास्ता रोको आंदोलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- बायकोविना तुषार कपूर बनला 'बाबा'
२१- फँड्री या चित्रपटातील कलाकार योगेश चौधरी याच्यासह 5 जणांना घरफोडी प्रकरणी अटक; 19 लाखांचा ऐवज जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*ADMISSIONS ARE OPEN*
in Agarwaal tutorials for classes L.K.G to7.
A unique place for students of state Board,
C. B. S.E. Semi english, and marathi medium.
Personal teaching to each student,
understanding the concept,
school homework as well as learning everything in the tuition itself.
No tension at home in limited period of time.
For admission please contact
Agarwaal tutorials
flat no 1.Vanita Apartments,
vasant nagar,
Nanded.
mobile- 9156639442, 9420538095.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================

तुकोबारायाच्या मंदिरातून निघून पालखी आज इनामदार वाड्यात मुक्कामी असणार आहे. यंदा 330 दिंड्या तुकोबांच्या पालखीत सहभागी होणार आहेत. यावर्षी पालखी सोहळा प्रस्थानाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बबन लोणीकर, गिरीश बापट, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
तुकोबांनंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही उद्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे आज आळंदीत शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत मोठी गर्दी होतेय.

पोस्टर, पेपरनंतर आता सेना-भाजपची रस्त्यावर लढाई
मुंबई: युतीत गेल्या काही दिवसांपासून पोस्टर, वर्तमानपत्रांतून सुरु असलेल्या वादानंतर आता हा वाद रस्त्यावर उतरला आहे. शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.
मुंबईजवळच्या बोरीवलीमध्ये आज भगवती हॉस्पिटलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता. यावेळी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, तर महापौर स्न्नेहल आंबेकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे देखील उपस्थित होते.
यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमल्यामुळे धुसफूस सुरु झाली. मात्र ही धुसफूस वाढत जाऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. दोन्हीही कार्यकर्ते अक्षरश: इरेला पेटले होते.
दुसरीकडे कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी सुरु असताना, दोन्ही पक्षातील नेत्यांनी सामंज्यशाची भूमिका घेणं आवश्यक होतं, मात्र उलट त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहनच दिल्याचं पाहायला मिळालं.
=======================================
तुकोबांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान, माऊलींची पालखीही सज्ज
विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आज देहूतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तुकोबांच्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.
पुणे : विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आज देहूतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तुकोबांच्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.
तुकोबारायाच्या मंदिरातून निघून पालखी आज इनामदार वाड्यात मुक्कामी असणार आहे. यंदा 330 दिंड्या तुकोबांच्या पालखीत सहभागी होणार आहेत. यावर्षी पालखी सोहळा प्रस्थानाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बबन लोणीकर, गिरीश बापट, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
तुकोबांनंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही उद्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे आज आळंदीत शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत मोठी गर्दी होतेय.
=======================================
डहाणूत विक्रमी पाऊस, प. महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत
मुंबई/पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात डहाणूमध्ये 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 10 वर्षात डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल हवामान या भागात विक्रमी पाऊस होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत आहे.
येत्या 24 तासात राज्यभरात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
=======================================
गव्हर्नरपदासाठी केंद्राकडून चार नावं शॉर्टलिस्ट
मुंबई : ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकारने चार जणांची नावं शॉर्टलिस्ट केल्याची माहिती आहे.
गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर पदाची सूत्रं सांभाळण्यासाठी नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरु झाला. आरबीआयचे विद्यमान उपगव्हर्नर उर्जित पटेल, आरबीआयचे माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबिर गोकर्ण आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदासाठी विचार होत असल्याचं म्हटलं जात आहे.
गव्हर्नरपदासाठी चौघांसोबतच विजय केळकर, अशोक लाहिरी आणि अशोक चावला या तिघांच्या नावांची चर्चा होती.

बायकोविना तुषार कपूर बनला 'बाबा'
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - तुषार कपूर बाबा बनला हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. तुषारचे लग्न झालेले नसले तरी तो एका मुलाचा बाप बनला आहे. आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आणि सरोगसी मदरच्या साहाय्याने तो एका मुलाचा पिता बनला आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला.'लक्ष्य' असे त्याने मुलाचे नामकरण केले असून, कपूर कुटुंबातील ते पहिले नातवंड आहे. अभिनेता जितेंद्र आणि त्याची पत्नी शोभा आजी-आजोबा झाले आहेत. वयाच्या चाळीशीपूर्वी आपण मुल दत्तक घेऊ किंवा सरोगसीच्या माध्यमातून पिता बनू असे तुषारने आपल्या मित्रांना सांगितले होते. लक्ष्य आता घरी आला असून त्याची प्रकृती उत्तम आहे. पिता बनण्याचा अनुभव एकदम वेगळा आहे. माझ्या ज्या भावना आहेत त्या सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत असे त्याने सांगितले आहे.आमच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असून आम्ही तुषारच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. एक मुलगा म्हणून तुषारने त्याच्या सर्व जबाबदा-या व्यवस्थित पूर्ण केल्या आहेत त्यामुळे लक्ष्यचा पिता म्हणूनही तो यशस्वी होईल याची खात्री आहे असे जितेंद्रने सांगितले. तुषार गेली नऊ महिने जसलोकमध्ये येत असून तो त्याच्या बाळाच्या प्रत्येक वाढीकडे बारकाईने लक्ष देत होता असे जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.
=======================================
...म्हणून ‘लिट्टे’शी युद्ध संपवले!
- कोलंबो : विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक तामिळ समुदायाशी मनोमिलन घडवून आणण्यासाठीच आपण ‘लिट्टे’ विरुद्धचे युद्ध समाप्त केले, असा दावा श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केला आहे.पोल्लोन्नारुवा या ग्रामीण भागातील गावात एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, विद्यमान अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना ‘लिट्टे’विरुद्ध आपल्या सरकारने केलेली कारवाई जनतेच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.मैत्री स्थापन करण्यासाठीच मी युद्ध समाप्त केले आणि आपल्या राजवटीच्या अंतिम टप्प्यात तामिळ नागरिकांना त्यांच्या मालकीची जमीन परत करण्यास प्रारंभ केला होता. ते म्हणाले की, मी निवडणुकाघेतल्या आणि या भागात स्थिती समान्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला; पण सध्याचे सरकार राजकीय द्वेषातून वेळ वाया घालवत आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ चौकशा करण्यात वेळ वाया घालवत आहे.
=======================================
कदाचित... हा पोपट बनणार खुनाचा साक्षीदार
- ऑनलाइन लोकमतमिशिगन (अमेरिका), दि. 27 - एका विचित्र प्रकरणामध्ये खुनाचा साक्षीदार म्हणून चक्क पोपटाचा विचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतल्या मिशिगनमधली ही घटना आहे. ग्लेना ड्युरम या महिलेवर तिच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मार्टिन ड्युराम पाच गोळ्या लागल्याने मरण पावले होते. त्यांच्या खुनानंतर काही वेळातच एक व्हिडीयो काढण्यात आला होता, यामध्ये ड्यराम यांच्या घरात पाळलेला पोपट डोन्ट शूट असे म्हणताना रेकॉर्ड झालं आहे. या हत्येच्या काही आठवड्यांनंतर या हत्येचा एकमेव साक्षीदार असलेल्या या पोपटाने ड्युराम पती पत्नींमध्ये झालेला संवाद ऐकवल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मार्टिन ग्लेनला घराबाहेर हाकलतो आणि त्यावर ग्लेन मी कुठे जाणार असा प्रतिप्रश्न करते. त्यानंतर मार्टिन डोन्ट शूट हे शेवटचे उद्गार म्हणतो असा त्याच्या कुटुंबियांचा दावा असून पोपटाने देखील हे शब्द उच्चारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्यामुळे मार्टिनची हत्या ग्लेननेच केली असल्याचा त्यांचा आरोप आहे, असे वृत्त वूड टीव्हीने दिले आहे.सरकारी वकिल पोपटाचे शब्द हा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतील का याचा कायद्याच्या दृष्टीकोनातून अभ्यास करत आहेत. तर ग्लेनानं मी माझ्या पतीला मारलेलं नाही, ही एकच गोष्ट वारंवार पोलीसांना सांगत आहे.मी आफ्रिकन पोपटांचा अभ्यास करत असून खटल्यामध्ये या पोपटाच्या शब्दांचा किती उपयोग होईल याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सरकारी वकिल रॉबर्ट स्प्रिंगस्टेड यांनी डेट्रॉइट फ्री प्रेसला सांगितले. तर, हा पक्षी ऐकलेलं जसंच्या तसं बोलू शकतो असा दावा मार्टिन ड्युरामची आई लिलियन यांनी केला आहे.विशेष म्हणडे आर्थिक समस्येमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे पत्र किंवा सुईसाइड नोट ग्लेन ड्युरामने तीन वेळा लिहिली आहे.
=======================================
उमरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2015 च्या पिक विमा योजनेचा लाभन मिळाल्याबद्ल संभाजी ब्रिगेड उमरी च्या वतिने रास्ता रोको आंदोलन
दि.28-06-2016 रोज मंगळवार स.11.00 वाजता.
स्थळ.भोकर रोड चौरस्ता पेट्रोल पंप जवळ
उमरी .ता उमरी,जि नांदेड.
मागील दोन वर्षापासुन शेतकरी बांधव दुष्काळ परिस्थितीमध्ये असतांनाही खरीप 2015 च्या पिक विमा योजने मध्ये तालुक्यातील जवळपास 10000 शेतकय्रांनी पै ना पै जपवुन पिक विम्याची रक्कम भरली. शेतकरी बांधव पिक विमा मिळेल या आशेवर असतांना पिक विमा योजनेतुन सोयाबिन, मुग ,उडीद या मुख्य पिंकाना वगळण्यात आले. शासनाने याकडे लक्ष देवुन तालुक्यातील शेतकर्यांना लाभ मिळवुन ध्यावा यासाठी संभाजी ब्रिगेड चा लढा आहे. शेतकर्यांच्या प्रष्नासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी या लढ्यात उस्फुर्तपने सहभाग नोंदवावा.ही नम्र विनंती ..
आशी माहीती शिवश्री गोंविद पा ढगे ता अध्यक्ष संभाजी ब्रिगेड उमरी
शिवश्री योगेश पा मोरे
ता सचिव संभाजी ब्रिगेड उमरी.यांनी दिली....

त्रिची - लग्नासाठी नवरदेवाने "व्हिडिओग्राफर‘ची सोय न केल्याने वधुकडील मंडळींनी आयत्या वेळी लग्नसमारंभ रद्द केल्याची घटना त्रिचीमधील थुरैयार येथे घडली. यावर संतप्त झालेल्या वर पक्षाने वधु पक्षाने आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्याकरिता थेट नजीकचे पोलिस स्थानक गाठले.
या वधुचे वडिल लग्नसमारंभ थाटात व्हावा, यासाठी आग्रही होते. तेव्हा लग्न हे एका मोठ्या कार्यालयात व्हावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र लग्नावर जास्त खर्च होऊ नये, अशी भूमिका असलेल्या वराने थुरैयार येथील एक छोट्या कार्यालयामध्ये लग्न करण्यासाठी वधु पक्षास तयार केले. याच वेळी, लग्नाची छायाचित्रे काढण्यासाठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफरची सोय करण्याचेही त्याने कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्याने हे आश्वासन पाळले नाही. आणि आयत्या वेळी बोलाविण्यात आलेला छायाचित्रकार कार्यलयामध्ये पोहोचला; तेव्हा लग्नाचे विधी होऊन गेले होते आणि वधु-वर पक्षामध्ये भांडण सुरु झाले होते.
वधु व वर पक्ष एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. अंतिमत: हा वाद सामोपचाराने मिटविण्यात यश आले. या प्रकारानंतर वराने वधुशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून आपल्या वडिलांचा अपमान झाल्याचे सांगत तिने लग्न मोडल्याचे निश्चित केले.
छायाचित्रकार न आल्याने वधुने मोडले लग्न !
| |
-

इस्लामाबाद - पाकिस्तानला युद्ध करुन काश्मीर जिंकण्यात यश येणार नाही, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी आज (सोमवार) केली.
"पाकिस्तान हा युद्ध करुन काश्मीर जिंकू शकणार नाही, असे मला वाटते. युद्ध जिंकण्याची आपली क्षमता नसल्याने पाकिस्तानपुढील एकमेव पर्याय हा चर्चेचा आहे. मात्र तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दोन देशांमधील समस्यांचे निराकरण होणे अशक्य आहे,‘‘ असे खार म्हणाल्या.
खार या 2011 ते 2013 या काळामध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. खार यांच्या कार्यकाळात त्यांनी भारत पाकिस्तान संबंध सुरळित करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
युद्धाने काश्मीर जिंकणे पाकला अशक्य:रब्बानी

बिहारला 'टॉपर'प्रकरणी माजी सचिवास अटक
| |
-
| |
पाटणा- बिहारमधील टॉपर गैरव्यवहारप्रकरणी बिहार शिक्षण मंडळाचे माजी सचिव हरिहरनाथ झा यांना सोमवारी अटक करण्यात आली.
टॉपर गैरव्यवहारात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) झा यांना अटक केली, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले.
टॉपर गैरव्यवहारात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) झा यांना अटक केली, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले.
या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 20 वर पोचली आहे. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष लालकेश्वरसिंह व त्यांची पत्नी उषासिंह, संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार व महाविद्यालयाचे प्राचार्य बच्चा राय व विद्यार्थिनी रुबी राय यांना यापूर्वीच अटक झाली आहे. परीक्षेत गुणवत्ताधारक रूबी राय या विद्यार्थिनीला तिच्या विषयातील साध्या प्रश्नाचा उत्तरेही देता आली नाहीत. त्या वेळी हा गैरव्यवहार उघडकीस आला.
=======================================
'यूपी'च्या मुख्यमंत्रिपदासाठी शीलांचा नकार
| |
-
| |
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र शीला दीक्षित यांनी पक्षाचा हा प्रस्ताव अमान्य केला आहे.
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसने उत्तराधिरीकारी म्हणून ब्राह्मण समाजातील नेत्याला पुढे आणणे गरजेचे आहे, असा सल्ला पक्षाचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी 16 जून रोजी अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी शीला दीक्षित यांच्या नावाबाबत चर्चा सुरू झाली होती.

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी पक्षात जोर धरू लागली आहे. याबाबतची मागणी कॉंग्रेसच्या 600 ब्लॉक अध्यक्षांनी प्रशांत किशोर यांच्याकडे केली असल्याचे समजते.
=======================================
बाराबंकी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार असल्याने, आता ते उत्तर प्रदेशचे आहेत. उत्तर प्रदेशात विकासाची जबाबदारी मोदींवर आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
मोदीजी अब 'यूपी वाले' है - अमित शहा
| |
-
| |
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी बाराबंकी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या वर्षात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी उत्तर प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक 16 जुलैपासून मोरादाबादेत येथे होत आहे.
अमित शहा म्हणाले की, मोदीजींनी गुजरात खूप विकास केला. आता उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशात विकास करण्याची मोदींवर जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशचा विकास आवश्यक असेल, तर सत्ताधारी समाजवादी पक्षाला सत्तेतून हाकलून दिले पाहिजे. गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा लोक म्हणत होते मोदीजी गुजरातचे आहेत. पण, मी त्यांना म्हणालो की मोदीजी आता गुजरातचे नाहीत. तर, वाराणसीचे खासदार आणि यूपीवाले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला नक्की दोन तृतीयांश बहुमत मिळेल.
=======================================
कानपूर - उत्तर प्रदेश राज्यातील शामली जिल्ह्यामधील कैराना गावामधील प्रतिबंधक निर्देशांचा भंग केल्याप्रकरणी अखिल भारतीय हिंदु महासभेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शगुन पांडे यांचाही समावेश आहे.
कैरानाच्या पश्चिम भागामधील हिंदु नागरिकांनी "स्थलांतर‘ केल्यासंदर्भातील वृत्ताच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हे कार्यकर्ते येथे गेल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय भूषण यांनी दिली. अटक करण्यात आल्यानंतर या सहा जणांना विभागीय दंडाधिकाऱ्यांनी वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त केले.
कैरानामधून हिंदुंचे स्थलांतर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुमारे पंधरवड्यापूर्वी उत्तर प्रदेश राज्य सरकारला नोटिस बजावली होती. या प्रकरणाची चौकशी करुन दोन आठवड्यांच्या आतमध्ये यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश आयोगाने दिले होते. कैरानामधील या वृत्तानंतर राजकीय खळबळ उडाली होती.
कैराना: हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक

लखनौ - उत्तर प्रदेश राज्यामधील कानपूर जिल्ह्यातील कुल्हौली या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीने एका 10 वर्षीय लहान मुलावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
संबंधित षोडशवर्षीय मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या या मुलास गोड बोलून तिच्या घरी नेले आणि तेथे त्याच्याबरोबर बळजबरी शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या लहान मुलाच्या गुप्तांगास गंभीर जखम झाली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणामधील दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणे अवघड जात असल्याचे येथील विशेष पोलिस अधीक्षक शलभ माथूर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी लहान मुलांवरील लैंगिक शोषणासंदर्भातील कायद्यांतर्गत तक्रार दाखल करणे शक्य असल्याचे कायदा तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीने केला चिमुरड्यावर बलात्कार

राजन यांच्यावरील टीका अयोग्य, मोदींची स्वामींना अप्रत्यक्ष चपराक
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर होणारी टीका अयोग्य आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच म्हटलं आहे. मोदींचं हे वक्तव्य म्हणजेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना अप्रत्यक्ष चपराक आहे.
टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी रघुराम राजन यांची पाठराखण केली.
गेल्या काही दिवसांपासून सुब्रमण्यम स्वामी हे रघुराम राजन यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळेच राजन यांनी पुढील टर्म स्वीकारण्यास नकार दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मोदींना विचारण्यात आलं. त्यावर मोदी म्हणाले, ” राजन यांच्यावरील टीका अयोग्य आहे. माझ्या पक्षातील असो वा कोणत्याही पक्षातील नेत्याने राजन यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे. हा जो पब्लिसिटी स्टंट आहे, त्याने कोणाचंही भलं होणार नाही”
राजन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होत असल्याचा आरोप, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी करत आहेत.
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
No comments:
Post a Comment