Monday, 20 June 2016

नमस्कार लाईव्ह २०-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- काबूलमध्ये मिनी बसवर दहशतवादी हल्ला, १४ नेपाळी सुरक्षारक्षकांचा मृत्यू 
२- एनएसजीमध्ये भारतासंबंधी चर्चाही नाही - चीन 
३- पाकिस्तानमध्ये 'ॐ' लिहिलेल्या चपलांची विक्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं' - साक्षीदार संजय साडलीकर 
५- दहीहंडीत 12 वर्षांच्या गोविंदांना सहभागी होऊ द्या : सरकार 
६- शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार 
७- भारत जगातील सर्वांत खुली अर्थव्यवस्था - मोदी 
८- इतिहास रचण्यासाठी "इस्रो' सज्ज 
९- मद्यबंदीशिवाय योगाचा फायदाच काय:नितीशकुमार 
१०- हवाई क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणूक, निर्णयानंतर सेन्सेक्सची २०० अंकांची उसळी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- बॅटरी चोरीमुळे पश्चिम रेल्वे ठप्प, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर 
१२- मुंबई; मनसे नगरसेवकाविरोधात पाचव्या पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल 
१३- आरोग्यमंत्र्याच्या सचिवाचे महिला डॉक्टरबरोबर अश्लील संभाषण ? 
१४- कर्नाटक कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची चिन्हे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- कोची; बलात्कार प्रकरणातील आरोपी प्राण्यांबरोबर करायचा संभोग 
१६- यवतमाळ; आरटीओने २० हजारात सोडली ओव्हरलोड वाहने 
१७- मुझ्झफरनगर; 'कैराना'चा मुद्दा निवडणुकीत वापरणार नाही: भाजप 
१८- कोल्हापूर - पल्लवी बोरकर आत्महत्या प्रकरण, सहा ताब्यात. 
१९- नाशिक-संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कपिल शर्माची सलमान खानवर मात  
२१- एका महिन्यात स्मार्टफोनचं किंमतमूल्य होते अर्ध! 
२२- ३.५ एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होणार 
२३- फेसबुक मेसेंजरवर आता 'बर्थ डे' नोटिफिकेशन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=================================

दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं'

दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं'
कोल्हापूर: महाराष्ट्राला हादरवरुन सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास कासव गतीनं सुरु असल्याचा आरोप होत आहे. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला ज्याच्यामुळे वेग मिळाला, ज्यानं दाभोलकरांच्या हत्येबाबत महत्वाचा तपशील दिला, त्या  साक्षीदाराने पहिल्यांदाच एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.

दाभोलकरांची हत्या, त्यात सारंग अकोलकर, वीरेंद्र तावडे यांची भूमिका असे अनेक पदर साक्षीदार संजय साडवीलकर यांनी एबीपी माझाला उलगडून दाखवले आहेत.

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचं रेखाचित्र जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच मी सारंग अकोलकरला ओळखलं होतं.  त्याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कही केला. मात्र मला गाभिर्यानं घेतलं गेलं नाही, असा दावा साडवीलकर यांनी केला आहे.

याशिवाय दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा मला 2004 पूर्वीच भेटला होता. हिंदुत्ववादी म्हणून आम्ही परिचीत होतो. आम्ही एकत्र काम करत होतो. मात्र काही काळानंतर आमच्या भेटीत खंड पडला. अचानक 2008-09 च्या दरम्यान तावडे पुन्हा भेटीला आला. त्यांनी मला पिस्तुल बनवायचं असल्याचं सांगितलं. तसंच दोन आक्रमक मुलं हवी, त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आम्ही स्वीकारु, असा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती साडवीलकर यांनी दिली.
=================================

बॅटरी चोरीमुळे पश्चिम रेल्वे ठप्प, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

बॅटरी चोरीमुळे पश्चिम रेल्वे ठप्प, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
मुंबई :  मुंबईची लाईफलाईन म्हणून समजली जाणारी लोकल ही कधी आणि कोणत्या कारणामुळे बंद पडेल याचा काही नेम नाही. कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी रुळांवर पाणी साचल्यामुळे. पण आज पश्चिम रेल्वेवर झालेल्या खोळंब्यामागचं कारण ऐकाल तर तुम्हीदेखील डोक्याला हात लावून घ्याल.

माहीम सबस्टेशनवरील एक बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील अप-डाऊन, फास्ट – स्लो सर्व वाहतूक रखडली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांचा खोळंबा झाला. परिणामी दादर स्टेशवर गर्दीचा महापूर आला होता.

सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दादर स्थानकाच्या पुढे हा बिघाड लक्षात आला. त्यानंतर सुमारे दीड तास हा गोंधळ असाच सुरु होता.  अखेर मोठ्या प्रयत्नांतर हा बिघाड दुरुस्त करण्यात पश्चिम रेल्वे प्रशासनाला यश आलं असलं तरीही या बिघाडाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर जाणवतोय.
=================================

कपिल शर्माची सलमान खानवर मात 

कपिल शर्माची सलमान खानवर मात !
मुंबई : कॉमेडीच्या किंगने बॉलिवूडच्या सुलतानला धोबीपछाड दिली आहे. कारण कॉमेडी किंग कपिल शर्मा सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेता ठरला आहे.
एका सर्व्हेनुसार टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी कपिल शर्माला पसंती दिली आहे. प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’ या रिअलिटी शोचा अँकर सलमान खानपेक्षा कपिलच लोकप्रिय असल्याची पावती दिली आहे. इतकंच नाही तर गुत्थी म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता सुनील ग्रोव्हरही सलमानच्या पुढे आहे.
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीत ‘स्प्लिट्सविला’चा चार्मिंग आणि हँडसम अँकर रणविजय तिसऱ्या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित पाचव्या क्रमांकावर आहे.
=================================

काबूलमध्ये मिनी बसवर दहशतवादी हल्ला, १४ नेपाळी सुरक्षारक्षकांचा मृत्यू

काबूलमध्ये मिनी बसवर दहशतवादी हल्ला, १४ नेपाळी सुरक्षारक्षकांचा मृत्यू
काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला करत एका मिनीबसवर निशाणा साधला. या हल्ल्यात तब्बल 14 नेपाळी सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. पोलीस जखमींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ता सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आत्मघातकी हल्लेखोरांनी विदेशी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या बसला निशाणा बनवलं. सध्या आम्ही जखमी नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

पण एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्या ठार झालेले 14 लोकं हे नेपाळी नागरिक होते. जे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. तर जखमींमध्ये चार अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे.

हा हल्ल्याची जबाबदारी तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने घेतली आहे. तालिबान्यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि अफगाणी सुरक्षा जवानांवर देशभरात हल्ले वाढवले आहेत.
=================================

एका महिन्यात स्मार्टफोनचं किंमतमूल्य होते अर्ध!

एका महिन्यात स्मार्टफोनचं किंमतमूल्य होते अर्ध!
मुंबई: जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करण्याचा विचार करीत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही  स्मार्टफोन घेतल्यानंतर त्याची एका महिन्याच्या आत अर्धी किंमत झालेली असते. एका रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली.

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, एखाद्या कारच्या किंमतीत एका वर्षात 20 टक्के घट होते. तर स्मार्टफोनमध्ये एका महिन्यात 65 टक्के घट होते.

निष्कर्षावरुन असं समजतं की, आयफोन हा अँड्रॉईडपेक्षा अधिक महत्वाचा आहे. आयफोन 4 आपल्या सुरुवातीच्या पाच वर्षानंतरही 39 किंमत टिकवून असतं. तर आयफोन (16 जीबी) बाजारात आल्यानंतर एका वर्षापर्यंत 50 टक्के आपली किंमत टिकवतं.
=================================

दहीहंडीत 12 वर्षांच्या गोविंदांना सहभागी होऊ द्या : सरकार

दहीहंडीत 12 वर्षांच्या गोविंदांना सहभागी होऊ द्या : सरकार
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गोविंदांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाला आहे. दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको, अशी भूमिका राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात मांडणार आहे.

एवढंच नाही तर 12 वर्षांपर्यंतच्या गोविंदांना दहीहंडीत सहभागी होऊ द्या, अशी विनंतीही सरकारच्या वतीने हायकोर्टात केली जाणार आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती दहीहंडी उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. त्यात दहीहंडीचे नियम शिथील करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या 2014 च्या आदेशानुसार, सध्या 18 वर्षांखालील गोविंदाला दहीहंडी उत्सवात सहभाही होता येत नव्हतं. शिवाय 20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या थरही लावता येत नव्हता.

परंतु 2014 सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या 20 फूट उंच थराच्या मर्यादेला स्थगिती दिली होती. तसंच गोविंदांची वयोमर्याद 18 वरुन 12 वर्षांवर आणली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचा 2014 मधील निर्णय अंतिम राहावा, अशी भूमिका राज्य सरकार उच्च न्यायालयात मांडणार आहे.
=================================

मनसे नगरसेवकाविरोधात पाचव्या पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

मनसे नगरसेवकाविरोधात पाचव्या पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगावचा नगरसेवक चांगलाच अडचणीत आला आहे. कारण ललित कोल्हेविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी खुद्द उपराष्ट्रपतींनी याची दखल घेत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
“ललित कोल्हे हा रंगेल स्वभावाचा असून, त्याची पाच लग्न झाली आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील एका बारबालेशी त्याचे संबंध आहेत. त्याने माझी फसवणूक केली असून, मला मारहाण केली आहे” असा आरोप, कोल्हेच्या पाचव्या बायकोने केला आहे.

ललित कोल्हेची बायको भक्तीने आपलं गाऱ्हाण थेट उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे मांडलं. यानंतर उपराष्ट्रपतींनी तातडीने दखल घेत, जानेवारी महिन्यातच जुहू पोलिसांशी संपर्क साधून, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

भक्ती कोल्हे यांनी पतीविरोधातील सर्व पुरावे जमा करुन, उपराष्ट्रपतींच्या निदर्शणास आणून दिलं. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ललित कोल्हेविरोधात फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=================================

आरोग्यमंत्र्याच्या सचिवाचे महिला डॉक्टरबरोबर अश्लील संभाषण ?


  •  ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 20 - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्याविरोधात महिलेशी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली असून, तक्रारदार महिलेनं यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं कथन केल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 
    या आधी सुनील माळी यांच्याविरोधात लाच घेतल्याचा आरोपही दाखल झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्यमंत्र्यांचे सचीव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात, असा आरोप डॉ. राहुल घुले यांनी केला असून, यासंदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सुनील माळी हे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत नेहमीच असतात. या आरोपांमुळं आरोग्यमंत्र्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.
=================================

भारताचे NSG सदस्यत्व कार्यक्रमपत्रिकेवरही नाही - चीन


  • ऑनलाइन लोकमत 
    बिजींग, दि. २० - एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही असे चीनने सोमवारी सांगितले. त्यामुळे एनएसजीमध्ये भारताच्या समावेशाला चीनचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
    परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन विरोध करणार नाही असे म्हटले होते. स्वराज यांच्या विधानानंतर काही तासातच चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्रसचिव एस.जयशंकर यांनीही चीनचे मन वळवण्यासाठी १६-१७ जूनला चीनचा दौरा केला होता. 
    अणवस्त्रप्रसारबंदीवर स्वाक्षरी न केलेल्या देशांना समावेश देण्यावरुन एनएसजीमध्ये मतभेद आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. २४ जूनला एनएसजी देशांची दक्षिण कोरिया येथे बैठक होणार आहे. 
=================================

केरळ बलात्कार प्रकरणातील आरोपी प्राण्यांबरोबर करायचा संभोग


  • ऑनलाइन लोकमत 
    कोची, दि. २० - केरळमधल्या गाजलेल्या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीरुल इस्लामविषयी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमीरुल लैंगिकदृष्टया विकृत आहे. त्याला प्राण्यांबरोबर संभोग करायची सवय होती. पाळलेल्या बक-यांबरोबर संभोग केल्यानंतर अमीरुल त्यांची हत्या करायचा. 
    अमीरुलची कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही माहिती दिली. काहीवेळा तो संभोग केलेल्या बक-यांचे गुप्तांग कापून टाकायचा. पेरुमबावूरमध्ये अमीरुल एका बकरीबरोबर सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला. त्यानंतर त्याच्या या लैंगिक विकृतीची माहिती पोलिसांना मिळाली. 
    बांधकाम साईटवर अमीरुल काम करायचा. फावल्यावेळेत त्याला मोबाईलवर पॉर्न चित्रपट पहाण्याची सवय होती. एक मजूराने अमीरुलच्या या लैंगिक विकृतीचा व्हिडीओ काढला होता. अमीरुल केरळमधल्या गाजलेल्या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 
=================================

आरटीओने २० हजारात सोडली ओव्हरलोड वाहने

  • First Published :20-June-2016 : 14:00:00Last Updated at: 20-June-2016 : 14:41:30

  • यवतमाळमधल्या पिंपळखुटीनं सोडली मात्र, देवरी, आदिलाबाद चेकपोस्टने अडविली
    सुरेंद्र राऊत, यवतमाळ
    गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि तेलंगाणामधील आदिलाबाद जिल्ह्यातल्या आरटीओ चेकपोस्टने अडविलेली ओव्हरलोड वाहने यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटीच्या (ता.पांढरकवडा) आरटीओ चेकपोस्टने २० हजार रुपये घेऊन बिनधास्त सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष असे, ट्रेलरच्या चालकाने पैसे दिल्याची बाब कबूल केली आहे.
    जी.जे.२२/टी-०७६९ आणि जी.जे.०६/एव्ही-७४५५ असे या ट्रेलरचे क्रमांक आहेत. रायपूरवरून हैदराबादला हे ट्रेलर अवजड साहित्य घेऊन निघाले होते. ६ जून रोजी सर्वप्रथम देवरी (जि.गोंदिया) येथील आरटीओ चेकपोस्टवर ही दोनही वाहने अडविण्यात आली. एका ट्रेलरमध्ये सात टन, तर दुसºयामध्ये नऊ टन अतिरिक्त वजन आढळून आले. त्यामुळे या दोनही वाहनांना अनुक्रमे ३० हजार व २८ हजार ९०० एवढा दंड आकारला गेला. त्यानंतर ही वाहने नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील पिंपळखुटी (जि.यवतमाळ)च्या आरटीओ चेकपोस्टवर ९ जूनला पोहोचली. वास्तविक तेथे या वाहनांची ओव्हरलोडची तपासणी व दंड अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात तेथील अधिकाºयांनी या दोनही वाहनांच्या चालकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन ही ओव्हरलोड वाहने कोणत्याही कारवाईशिवाय ९ जूनच्या रात्री ‘पास’ करण्यात आली. 
    त्यानंतर ही ओव्हरलोड वाहने तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यांतर्गत येणाºया भोरट येथील आरटीओ चेकपोस्टवर पोहोचली. तेथे ही वाहने ओव्हरलोड असल्याने अडवून ठेवण्यात आली. तेथे दंड करून त्यांना सोडून देण्यात आले. देवरी व भोरट आरटीओ चेकपोस्टवर दंड झालेली वाहने पिंपळखुटी येथून कोणत्याही शासकीय दंडाशिवाय सोडली गेल्याने आरटीओचे हे चेकपोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चेकपोस्टची मासिक उलाढाल एक कोटींच्या घरात आणि त्यातील बाहेरील घटकांना वाटप ३९ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. या ओव्हरलोड ट्रेलर पासिंगमुळे यवतमाळचे डेप्यूटी आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
    अजहर कुरेशी करतो ‘डील’
    महाराष्ट्रातील आरटीओच्या पिंपळखुटी चेकपोस्टवर आदिलाबादमधील अजहर कुरेशी हा ‘डील’ करीत असल्याचे सांगितले जाते. त्याच्याच इशाऱ्यावरून ओव्हरलोड वाहने चेकपोस्टवरून पास होतात. उपरोक्त दोन वाहनेसुद्धा अशीच ‘पास’ झाली. विशेष असे, या चेकपोस्टवर आरटीओतील कुण्या अधिकारी, कर्मचाºयाची ड्यूटी लावायची याचेही सेटींग अजहरच करीत असल्याची माहिती आहे. पिंपळखुटी चेकपोस्ट नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. 
=================================

शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 20 - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून आरोपी श्याम रायला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे. विशेष सीबीआय न्यायलयाने श्याम रायला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली आहे. आरोपी श्याम रायने स्वत: माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असं दोन पानी पत्रच श्याम रायने न्यायालयाला लिहिलं होतं. 
    शीना बोरा हत्या प्रकरणी मी सर्व खुलासा करणार आहे. माझी आणि इतरांची या हत्येत काय भुमिका होती मी खुलासा करेन असं श्याम रायने न्यायालयात सांगितलं आहे. शीना बोरा हत्येप्रकरणी सर्वात पहिली अटक श्याम रायला झाली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर म्हणून काम करणा-या श्याम रायला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर ख-या अर्थाने या हत्येचा उलगडा झाला होता. 
=================================
भारत जगातील सर्वांत खुली अर्थव्यवस्था - मोदी
-

नवी दिल्ली - संरक्षण, हवाई प्रवास आणि औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) यामुळे भारत आता जगामधील सर्वांत खुली अर्थव्यस्था झाल्याचे स्पष्ट केले.

""आज झालेल्या बैठकीमध्ये सुधारणा कार्यक्रमासंदर्भातील अत्यंत संवेदनशील निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे होणाऱ्या बदलामुळे भारतामध्ये रोजगारनिर्मितीस मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,‘‘ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 
=================================
एनएसजीमध्ये भारतासंबंधी चर्चाही नाही - चीन

नवी दिल्ली - अण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) नव्या देशांच्या समावेशासंदर्भात सदस्य देशांमध्ये अद्यापी मतभेद असून सेऊल येथे या आठवड्यामध्ये होणाऱ्या गटाच्या परिषदेदरम्यान नव्या देशांना सदस्यत्व देण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेसही घेतला जाणार नाही, असे चीनकडून आज (सोमवार) स्पष्ट करण्यात आले.

एनएसजीचे सदस्यत्व भारतास मिळण्यासंदर्भात चीनचा विरोध नसल्याचे विधान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून ही रोखठोक भूमिका स्पष्ट करण्यात आली. 

=================================
'कैराना'चा मुद्दा निवडणुकीत वापरणार नाही: भाजप

मुझफ्फरनगर : कैराना गावातील कुटुंबाचे स्थलांतर हे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नसेल, असे केंद्रीय संसंदीय मंत्री वेंकया नायडू यांनी आज स्पष्ट केले. 2017 ची विधानसभा निवडणुक विकासाच्या मुद्‌द्‌यावर लढेल. कैरानाचा प्रश्‍न हा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे, असे नायडू यांनी सांगितले.

नायडू यांनी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडून जातीचे राजकारण होत असल्याचा आरोप केला. यादरम्यान, एका भाजप खासदाराने म्हटले होते की, एका विशिष्ट समाजामुळे भयभीत होऊन अनेक हिंदु कुटुंबांनी कैराना शहर सोडले आहे. त्याचप्रमाणे मथुरा आणि कैराना घटनेवरून समाजवादी पक्षाच्या सरकारवर टीका करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते की, राज्यातील वातावरण तणावाचे आणि हिंसेचे असून ही बाब चिंतेची आहे. दरम्यान, नायडू यांनी म्हटले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मुस्लिमांना (मुख्तार अब्बास नक्वी आणि एम.जे.अकबर) यांना उतरविले होते. शहरातील एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नायडू म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाने राज्यसभेच्या 57 जागापैकी एकही जागा मुस्लिमांना दिलेली नाही. नक्वी झारखंडमधून तर अकबर मध्यप्रदेशमधून निवडून आले.
=================================
इतिहास रचण्यासाठी "इस्रो' सज्ज

वीस उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसलव्हीचे काउंटडाऊन सुरु


श्रीहरीकोटा, ता. 20 : पीएसएलव्ही-सी34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 48 तासांचे काउंटडाऊन सुरू केले आहे. बावीस जूनला सकाळी 9.26 वाजता येथील सतीश धवन अवकाशकेंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.
उड्डाणानंतर पन्नास मिनीटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी "इस्रो‘चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत. यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्‍य होणार आहे. अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे. भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल. तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे. प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटानंतर "पीएसएलव्ही‘ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
याआधी पीएसएलव्ही-सी9 च्या साह्याने "इस्रो‘ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते.

1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन
5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया) 


एकाच वेळी सोडलेले उपग्रह
33 : रशिया (2014)
29 : नासा (2013)
20 : भारत (2016) 
=================================
३.५ एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होणार?

नवी दिल्ली : तंत्रज्ञान दर दिवशी बदलत असते असे म्हणतात, मात्र या बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आपल्याशी अनेक वर्षांपासून सोबत असणाऱ्या आपल्याला सवयीच्या झालेल्या गोष्टी बदलू लागल्या की टेकसॅव्हींना त्याचा राग येतो. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ आपल्याला सुश्राव्य संगीत ऐकवणारा 3.5 एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे, (उलटी गणती सुरूच झाली आहे म्हणा ना!) त्यामुळेच आता टेकसॅव्ही नेटकरांनी फेसबुक, ट्विटरवर "सेव्हजॅक‘ या हॅशटॅगच्या आधारे या "जॅक‘ला वाचविण्यासाठी मोहीम राबविली आहे.

कोणत्याही फोनला, टीव्हीला, संगणकाला, कारमधील आणि अन्य म्युझिक सिस्टिम्स, गेम कन्सोल्सना असलेला हा 3.5 एमएम जॅक काढून "लिइको‘ या मोबाईल कंपनीने वेगळे तंत्रज्ञान असलेला हेडफोन बाजारात आणला खरा. पण यामुळे गेल्या 50 वर्षाची परंपरा मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जगातील इतरही मोबाईल कंपन्या लवकरच ही पद्धत अवलंबतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच "ऍपल‘ या आघाडीच्या मोबाईल कंपनीनेही आयफोन 7 मधून 3.5 एमएम जॅक काढल्याच्या चर्चा आहेत. ‘ऍपल‘सारख्या ट्रेंड सेटर्सना छोट्या कंपन्या लगेचच फॉलो करत असल्याने हा "जॅक‘ कधीही कालबाह्य होऊ शकतो अशी भीती आहे.

अर्थात या सर्वांवरच पर्याय म्हणून काही जण वायरलेस हेडफोनही वापरतील; पण अद्याप तरी ही टेक्‍नॉलॉजी तितक्‍या प्रभावीपणे मार्केटमध्ये येण्याची चिन्हे कमी आहेत. वायरलेस टेक्‍नॉलॉजी आली किंवा "जॅक‘ बदलला तरी तुमचे सध्याचे हेडफोन तुम्हाला लवकरच कचऱ्यातच फेकावे लागणार आहेत. 
=================================
फेसबुक मेसेंजरवर आता 'बर्थ डे' नोटिफिकेशन

नवी दिल्ली - फेसबुक रिसर्च सेंटरकडून रोज नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. फेसबुक मेसेंजर वापरणाऱ्यांसाठी आता वाढदिवसाचे नोटिफिकेशन देण्यास फेसबुकने सुरवात केली आहे.

फेसबुक मॅसेंजर वापरणाऱ्यांची संख्या महिन्याला 90 कोटी (900 मिलियन) आहे. या ऍपची अद्यावत श्रेणी पाहता ही संख्या निश्‍चितच वाढणार आहे. या ऍपमध्ये बिजनेस चॅट्‌स, रोजच्या बातम्या, व्हिडिओ कॉलिंगची सुविधा यामुळे युजर्सच्या फेवरेट्‌समध्ये ते आले आहे. मेसेंजरच्या विंडोमध्ये तुम्हाला हवी ती सर्व व्यावसायिक संवाद, चर्चा टॉप ऑफ करून आपल्या मेन स्क्रिनवर पाहू शकता. नवीन फेव्हरेट सेक्‍शनमध्ये प्रमुख युजर्सना ठेवून ताजे चॅट्‌स, संवाद करू शकता, पाहू शकता. ब्राऊजरवर ते संवाद एका "ग्रीन डॉट‘ने तुम्हाला दिसतील.
फेव्हरेट सेक्‍शनमधील व्यक्तींचे ताजे संदेश ठळक अक्षरात दिसतील, असे फेसबुकने दिलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुकच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये जसे उजव्या कोपऱ्यात नोटीफिकेशनमध्ये "बर्थ डे‘चा रिमाइंडर येतो तसाच आता मेसेंजरच्या ऍपमध्येही उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे फेसबुकच्या लोकप्रियतेत निश्‍चितच भर पडेल. एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला विसरणार नाही.
=================================
पाकिस्तानमध्ये 'ॐ' लिहिलेल्या चपलांची विक्री
-

कराची - पाकिस्तानमधील सिंध प्रांतात काही दुकानदारांकडून ‘ॐ‘ लिहिलेल्या चपलांची विक्री होत असल्याने, अल्पसंख्यांक हिंदू समुदायाकडून नाराजी दर्शविण्यात आली आहे.

पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे प्रमुख रमेश कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही चपलांवर ‘ॐ‘ शब्दाचा वापर केल्याने सिंध प्रांतातील सरकार व स्थानिक प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. चप्पल विक्रेत्यांकडून करण्यात येत असलेले हे कृत्य दुर्दैवी व ईश्वरनिंदात्मक आहे. तांडो आदम खान परिसरात या चपलांची सर्रास विक्री करण्यात येत आहे. हिंदू समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. सोशल मिडीयावरूनही या चपलांचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही दुकानदारांना अशा चपला विकणे बंद करावे, असे आवाहन केले आहे.
=================================
कर्नाटक कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची चिन्हे

फेरबदलानंतर नाराज मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस बंगळूर - कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात मोठे बदल झाल्याने प्रदेश कॉंग्रेसमधील अनेक नेते नाराज झाले असून बंडखोरी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळातून बाहेर काढलेल्या काही मंत्र्यांनी जाहीरपणे आंदोलन करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कर्नाटकच्या मंत्रिमंडळात काल (ता. 19) फेरबदल होऊन चौदा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला, तर तेरा नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज राज्यपाल वाजुभाई वाला यांच्या उपस्थितीत झाला. "अकार्यक्षमता‘ हा मंत्र्यांना बाहेर काढण्याचे कारण असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, यामुळे नाराज मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली. यावेळी काही प्रमाणात हिंसा होऊन अनेक ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली होती. व्ही. श्रीनिवास प्रसाद, एम. एच. अंबरिश, शिवराज तंगाडगी या डच्चू मिळालेल्या मंत्र्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. या निर्णय घेताना अंधारात ठेवल्याची टीकाही या नेत्यांनी केली आहे.
मंत्रिपदाची अपेक्षा असणारे आमदार नाराज एम. कृष्णप्पा यांना पद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगळूर-म्हैसूर महामार्ग रोखून धरत काही ठिकाणी दगडफेक केली. अंबरिश यांच्या कार्यकर्त्यांनीही मांड्या येथील महामार्गावरील वाहतूक ठप्प केली. राजशेखर पाटील यांनी बिदर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी मोटारसायकल रॅली काढत दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करायला लावली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी दगडफेक करत वाहने आणि दुकानांचे नुकसान केले. 
=================================
मद्यबंदीशिवाय योगाचा फायदाच काय:नितीशकुमार
पटणा - मद्यपानावर बंदी घालण्यात आली नाही; तर योगासनांची हाती घेण्यात आलेली मोहिम निरर्थक असल्याचे कठोर मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच व्यक्त केले. 

झारखंडमधील पलामु येथील एका सभेमध्ये बोलताना कुमार यांनी मद्यबंदीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मद्यपानावर बंदी आणण्यासंदर्भात कार्यरत असलेल्या महिलांच्या एका संघटनेने या सभेचे आयोजन केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता असलेल्या राज्यांमध्ये तरी मद्यपानावर बंदी आणावी, असे आवाहन या सभेमध्ये बोलताना कुमार यांनी केले. आपण योगासने करत असलो; त्तरी त्याची प्रसिद्धी करत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 
"योग ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. मात्र देशभरात मद्यपानास बंदी केल्याशिवाय या योगमोहिमेस काही अर्थ नाही. मद्यपानापासून लांब राहणे हा योगासने करण्याचा पहिला नियम आहे. योग दिन व मद्यविक्री एकाच वेळी केली जाऊ शकत नाही. मात्र मोदी सरकारने प्रत्येक गोष्टीचा "इव्हेंट‘ बनवून टाकला आहे. खऱ्या आव्हानांवर हे सरकार काहीही उपाययोजना करत नाही. याचबरोबर गुजरातमध्ये मद्यविक्रीवर असलेल्या बंदीचे श्रेयही मोदी यांनी घेऊ नये. कारण या राज्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच मद्यविक्रीवर बंदी आहे,‘‘ असे कुमार म्हणाले.
=================================

No comments: