[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार
२- चीनची चलाखी, भारताच्या NSG सदस्यत्वाला विरोध
३- एनएसजीमध्ये समर्थनासाठी मोदींनी घेतली शि जिनपिंग यांची भेट
४- फिरोजपुर; रिट्रीट सोहळ्यातच भारत-पाक जवान भिडले
५- मोहनजी, भेटीसाठी लंडनमध्ये या! : लिओनार्डो डी कॅप्रिओ
६- अखेर पाकिस्तानला कंठ फुटला, 91 वर्षीय भारतीयाची शेवटची इच्छा पूर्ण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- मुंबई; ब्रिक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला
८- कुपवाडा; काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, आतापर्यंत 8 अतिरेक्यांना कंठस्नान
९- ... तर मुंबई मनपासाठी भाजप-रिपाइं युती होणारच : आठवले
१०- ..तर सरकारचे साह्य ‘त्या’ बँकांना नाही
११- सीएनजीवर धावणार दुचाकी
१२- वापरात नसलेल्या विमानतळांचे ‘सेझ’ होण्याची शक्यता
१३- रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला
१४- मोदी सरकारच्या जाहिराती "फुकटात'? - जाहिरात प्रसिद्धी संचालनालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- 'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा
१६- शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
१७- एमबीबीएससाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही
१८- गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर
१९- अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल, सेनेचा हल्लाबोल
२०- खडसेंनी पदाचा गैरवापर केला का, याचीही चौकशी होणार
२१- मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबईत संततधार, मराठवाड्यात जोरदार, तेरणा 15 वर्षांनी वाहिली
२३- मुंबई; पाणीच पाणी चहुकडे, वॉटर कप स्पर्धेचे यश
२४- सांगली; सांगलीच्या वालचंद कॉलेजवरून भाजप खासदार आणि जिल्हाध्यक्ष भिडले
२५- बंगळूरू; फ्लिपकार्टच्या सीईओनी खरेदी केले ३२ कोटींचे घर
२६- सोलापूर; खासगीपेक्षा सरकारी शाळांकडे ओढा
२७- मोखाडा; दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
२९- 57 अर्ज, 21 वैध, एकट्या कुंबळेची निवड, 16 वर्षांनी भारतीय प्रशिक्षक
३०- अभिनेत्रीची सेटवरच गोलंदाजी, हिरोचीच घेतली विकेट!
३१- भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' येणार : गावसकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन लाभशेटवार, प्रसाद पाटील, तेजस महाजन, मारोती वाघमारे, बालाजी जाधव, विनोद तायडे, भास्कर पाटील, बालाजी पवाडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================




सलमाननं ही प्रतिक्रिया आयफा अवॉर्ड दरम्यान दिली. अवॉर्ड सोहळ्याचा सुरुवातीला बोलताना सलमान म्हणाला की, ‘मी जास्त वेळ नाही बोलणार. कारण की, या दिवसात मी जेवढं कमी बोलेन तेच माझ्यासाठी चांगलं असेल.’

















१- लंडन; युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार
२- चीनची चलाखी, भारताच्या NSG सदस्यत्वाला विरोध
३- एनएसजीमध्ये समर्थनासाठी मोदींनी घेतली शि जिनपिंग यांची भेट
४- फिरोजपुर; रिट्रीट सोहळ्यातच भारत-पाक जवान भिडले
५- मोहनजी, भेटीसाठी लंडनमध्ये या! : लिओनार्डो डी कॅप्रिओ
६- अखेर पाकिस्तानला कंठ फुटला, 91 वर्षीय भारतीयाची शेवटची इच्छा पूर्ण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- मुंबई; ब्रिक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला
८- कुपवाडा; काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, आतापर्यंत 8 अतिरेक्यांना कंठस्नान
९- ... तर मुंबई मनपासाठी भाजप-रिपाइं युती होणारच : आठवले
१०- ..तर सरकारचे साह्य ‘त्या’ बँकांना नाही
११- सीएनजीवर धावणार दुचाकी
१२- वापरात नसलेल्या विमानतळांचे ‘सेझ’ होण्याची शक्यता
१३- रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला
१४- मोदी सरकारच्या जाहिराती "फुकटात'? - जाहिरात प्रसिद्धी संचालनालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- 'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा
१६- शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
१७- एमबीबीएससाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही
१८- गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर
१९- अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल, सेनेचा हल्लाबोल
२०- खडसेंनी पदाचा गैरवापर केला का, याचीही चौकशी होणार
२१- मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबईत संततधार, मराठवाड्यात जोरदार, तेरणा 15 वर्षांनी वाहिली
२३- मुंबई; पाणीच पाणी चहुकडे, वॉटर कप स्पर्धेचे यश
२४- सांगली; सांगलीच्या वालचंद कॉलेजवरून भाजप खासदार आणि जिल्हाध्यक्ष भिडले
२५- बंगळूरू; फ्लिपकार्टच्या सीईओनी खरेदी केले ३२ कोटींचे घर
२६- सोलापूर; खासगीपेक्षा सरकारी शाळांकडे ओढा
२७- मोखाडा; दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
२९- 57 अर्ज, 21 वैध, एकट्या कुंबळेची निवड, 16 वर्षांनी भारतीय प्रशिक्षक
३०- अभिनेत्रीची सेटवरच गोलंदाजी, हिरोचीच घेतली विकेट!
३१- भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' येणार : गावसकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन लाभशेटवार, प्रसाद पाटील, तेजस महाजन, मारोती वाघमारे, बालाजी जाधव, विनोद तायडे, भास्कर पाटील, बालाजी पवाडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार
लंडन : युरोपियन युनियन ब्रिटन बाहेर पडल्याचं बीबीसीने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीचा अधिकृत निकाल काही वेळात येत आहे. मात्र त्यापूर्वीच जगभरातील शेअर बाजाराने या निकालाचा धसका घेतला आहे.
ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिकांनी काल मतदान केलं. या जनमत चाचणीचा निकाल आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.
युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे.
======================================
ब्रिक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला
मुंबईः ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. कारण मुंबई शेअर बाजाराच्या प्री ओपनिंग सेशनला, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला.
बाजार उघडताच त्यामध्ये किंचित सुधारणा होऊन, 730 च्या आसपास घसरण पाहायला मिळाली. मात्र त्यानंतरही घसरण होत सेन्सेक्स 1 हजार अंकांपर्यंत गडगडला.
सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडनेही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला.
ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.
युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे.
======================================
चीनची चलाखी, भारताच्या NSG सदस्यत्वाला विरोध
नवी दिल्ली: आण्विक पुरवठादार देशांचा गट म्हणजेच एनएसजीमध्ये सहभागी होण्याच्या भारताच्या मार्गात चीनी ड्रॅगनने खोडा घातला आहे. ताश्कंदमध्ये झालेल्या बैठकीत चीनने भारताच्या एनएसजी गटात सहभागी होण्याला विरोध केला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राझील, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, तुर्की आणि आयर्लंड या देशांनीही भारताच्या सहभागाला आपला विरोध दर्शवला आहे.
ताश्कंदमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांची भेट घेऊन एनएसजीसाठी मदत मागितली, मात्र जिनपिंग यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही.
भारताने अद्यापही आण्विक अप्रसार करारावर स्वाक्षरी केलेली नाही, याच कारणामुळे भारताच्या एनएसजी गटात सहभागी होण्याला चीनसह इतर देशांनी विरोध दर्शवला आहे.
======================================
आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
माद्रिद (स्पेन): बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं नुकतंच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं बराच अडचणीत आला आहे. बलात्काराच्या त्या वक्तव्यावर त्याच्यावर चौफर टीकाही होत. याबाबत बोलताना सलमान म्हणाला की, “आता मला कमी बोलायला हवं, कारण की, सध्या मी जे काही बोलतो त्याचा उलट अर्थ काढला जातो.”
सलमाननं ही प्रतिक्रिया आयफा अवॉर्ड दरम्यान दिली. अवॉर्ड सोहळ्याचा सुरुवातीला बोलताना सलमान म्हणाला की, ‘मी जास्त वेळ नाही बोलणार. कारण की, या दिवसात मी जेवढं कमी बोलेन तेच माझ्यासाठी चांगलं असेल.’
बलात्काराच्या वक्तव्यावर सलमाननं जाहीर माफी मागावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. मात्र, अजूनही सलमाननं याबाबत माफी मागितलेली नाही.
======================================
काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, आतापर्यंत 8 अतिरेक्यांना कंठस्नान
फाइल फोटो
कुपवाडा (काश्मीर): काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 8 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. दोबवान वन परिक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. या सर्च ऑपरेशन दरम्यान जवानांनी लोलाब परिसरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
तर दुसरीकडे दृगमुल्ला परिसरात झालेल्या दुसऱ्या चकमकीत आणखी 3 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं आहे. तर दृगमुल्ला परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून सध्या अधूनमधून गोळीबार सुरु आहे. तसंच सर्च ऑपरेशन सुरु आहे.
======================================
57 अर्ज, 21 वैध, एकट्या कुंबळेची निवड, 16 वर्षांनी भारतीय प्रशिक्षक
मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीची शर्यत अखेर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेनं जिंकली. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी धरमशालात घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेच्या नावाची घोषणा केली.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीनं दिलेल्या अहवालानुसार कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुंबळेला एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे एकूण 57 अर्ज आले होते. बीसीसीआयच्या पहिल्या छाननीतून त्यापैकी 21 अर्ज वैध ठरले होते. बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं त्या 21 जणांमधून मोजक्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात अनिल कुंबळेसह भारतीय संघाचे माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री, ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, लालचंद राजपूत आणि प्रवीण अमरे यांचा मुख्य समावेश होता.
त्यापैकी अनिल कुंबळेच्या नावावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शिक्कामोर्तब केलं आहे.
======================================
मुंबईत संततधार, मराठवाड्यात जोरदार, तेरणा 15 वर्षांनी वाहिली
औराद शहाजानी इथं 90 मिनिटांत 94 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई: मुंबईत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. मुंबईतल्या दादर आणि वरळी परिसरात रात्रभर पाऊस झाला. तर अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगावसह पश्चिम उपनगरातही पाऊस झाला. त्यामुळं काही भागात पाणी साचलं.
सुदैवाने पावसामुळं कुठंही वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला नाही. सर्व वाहतूक सुरळीत सुरु आहे.
गुरुवारी सकाळी 8 पासून ते आज पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 28.99 मिमी, पश्चिम उपनगरात 44.72 मिमी तर पूर्व उपनगरात 41.47 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
======================================
'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा
मुंबई: भाजपच्या पाक्षिकातून काल सेनेवर जोरदार टीका केल्यानंतर सामनातून त्याला उत्तर मिळणं अपेक्षित होतं. मात्र, आज सामनामधून माधव भंडारींवर नाही तर सुब्रमण्यम स्वामी आणि जेटलीवर टीका करण्यात करण्यात आली आहे.
‘डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत, अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता? हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली आणि स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच.’ असं सामनातून म्हटलं आहे.
गेल्या दोन दिवसांआधी स्वामींनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे काँग्रेसधार्मिणे असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेटलींनी अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं सामनातून म्हटलं आहे.
======================================
अभिनेत्रीची सेटवरच गोलंदाजी, हिरोचीच घेतली विकेट!
मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिका ‘वारिस’मध्ये अंबाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती सिंह चक्क सेटवरच क्रिकेट खेळत होती.
क्रिकेट खेळणं आणि गोलंदाजी करणं तिला नेहमीच आवडतं. जेव्हा तिला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तेव्हा आरतीनं आपली ही आवड वारिसच्या सेटवरच दाखवून दिली.
तिनं आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीनं आपला सह-अभिनेता अक्षय डोगराची विकेटही घेतली.
यानंतर बोलताना आरती म्हणाली की, ‘मालिकेत अंबा ही गंभीर भूमिका साकारल्यानंतर क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी फारच आरामदायी वाटतं. मी अक्षयची विकेटही घेतली. त्यामुळे हे फारच मजेशीर होतं. मी विकेट घेतल्यानं अक्षयनं खेळाची मजा घेतली असेल असं अजिबात वाटत नाही.’ वारिस ही मालिका अॅण्ड टिव्हीवर प्रसारित होते.
======================================
भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' येणार : गावसकर
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच्या नियुक्तीचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी स्वागत करतानाच भारतीय क्रिकेटला आता ‘अच्छे दिन’ येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
कुंबळेच्या नियुक्तीनंतर एनडीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत गावसकर म्हणाले की, कोच होण्य़ासाठी तुम्हाला कोणत्याही डिग्रीची अवश्यकता नसते. तर तुमच्याकडे व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असणे गरजेचे आहे. कुंबळे यांच्य़ाकडे प्रशिक्षक पदाचा अनुभव नसला तरी ते त्यांच्याकडे व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. ते आपल्या प्रतीभेने, अनुभव आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाला अच्छे दिन आणतील.
यावेळी त्यांनी कुंबऴे यांचे मुक्त कंठाने कौतुकही केले. ते म्हणाले की, अनिल कुंबळे यांचा तत्कालिन संघात खूप आदर केला जात होता. ड्रेसिंग रुममध्येही सर्व खेळाडू त्यांच्याशी आदबीने वागत. त्यांचे विक्रमांमुळे त्यांनी स्वत:ला कसे सिद्ध केले आहे, याचा नव्या पिढीने अभ्यास करावा. कुंबळेंच्या अनुभवाचा भारतीय संघाला उत्तम फायदा होईल.
======================================
अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची निवड झाली आहे. पुढील एका वर्षासाठी अनिल कुंबळे टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील. धरमशालामधील पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेंची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या सल्लागार समितीने कोलकातामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होती. यामध्ये रवी शास्त्री, टॉम मूडी, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे आणि अनिल कुंबळे यांचा समावेश होता. अखेर यापैकी ‘जम्बो’ अर्थात अनिल कुंबळेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मणसह सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.
======================================
एमबीबीएससाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही
मुंबई : एमबीबीएसला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एमबीबीएस यापुढे एमबीबीएस प्रवेशाचा अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती न करता अर्जदाराकडून केवळ प्रतिज्ञापत्रावर हे प्रमाणपत्र सादर करण्याची हमी घेणार असल्याचे राज्य शासनाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
उर्मिला बावीसकर या विद्यार्थीनीने प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याचे तिला शिक्षण विभागाने सांगितले. त्याविरोधात तिने अॅड. रामचंद्र मेंहदाळकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी उर्मिलाने गेल्यावर्षी जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अर्ज केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यात तिचा काहीच दोष नाही. तेव्हा तिला प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी अॅड. मेंहदाळकर यांनी केली. त्यावर न्यायालयाने याबाबत खुलासा करण्याचे आदेश राज्या शासनाला दिले होते.
======================================
एनएसजीमध्ये समर्थनासाठी मोदींनी घेतली शि जिनपिंग यांची भेट
मुंबई : अणुइंधन पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी जोरदार प्रयत्न करत असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन चीनच्या पाठिंब्याची मागणी केली. दावेदारीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शि जिनपिंग यांच्याशी चर्चेत मोदी यांनी एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाचे नि:पक्ष आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करण्याची विनंती केली आणि भारतासाठी वाढत असलेल्या सर्व संमतीमध्ये योगदान देण्यास चीनला सांगितले.
तुर्कस्थान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या अन्य काही देशांनीही 48 सदस्यांच्या गटातील भारताच्या सदस्यत्वाला आक्षेप घेतला आहे; मात्र जर चीनने अनुकूल भूमिका घेतल्यास या देशांचा विरोध निष्प्रभ ठरेल, असे भारताला वाटते.
सूत्रांनी याविषयी सांगितले की, एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाच्या प्रयत्नांवर आपल्या विरोधाचे स्पष्ट संकेत देताना चीनने बुधवारी एनएसजीच्या सदस्यांमधील मतभेदांचा दाखला देताना सदस्यांनी अद्याप या मुद्द्यावर चर्चा केली नसल्याचे म्हटले होते.
======================================
गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर
अकोला : सलग तीन वर्षांपासून महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतो आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. मराठवाड्यात तर शेकडो शेतकऱ्यांनी मरण जवळ केलं आहे. अशा स्थितीत तोंडभरुन गुजरातचं कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मोफत बियाण्यांचा गुजरात पॅटर्न का स्वीकारत नाहीत, असा प्रश्न भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे
अकोला जिल्हा परिषदेमार्फत अकोल्यातील साडेतीन हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बीटी कापसाच्या बियाण्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
गुजरातमध्येही शेतकऱ्यांना मोफत कापसाचं बियाणं मिळतं. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत बियाणं उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी आंबेडकरांनी केलीय.
======================================
पाणीच पाणी चहुकडे, वॉटर कप स्पर्धेचे यश
मुंबई : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यावर वरुण राजाने सध्या चांगलीच कृपा केली आहे. मराठवाड्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस बरसतो आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी, तलाव सर्वच जलमय झाले आहेत. आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेतील अंबाजोगाईमधील पाटोदा येथील विहिरी जलमय होत आहेत.
आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांनी पुढाकार घेऊन दुष्काळाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने पाणी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या मार्फत 20 एप्रिलपासून सुमारे ११९ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा सुरु करण्यात आली होती. या स्पर्धेअंतर्गत बीडमधील अंबाजोगाई, साताऱ्यातील कोरेगाव, आणि अमरावतीतील वरुड गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून ‘जलमित्र सेना’ स्थापन केली. या सेनेला पाणी फाऊंडेशनने जलसंधारणासंदर्भात प्रशिक्षण दिले.
सध्या या स्पर्धेतील सहभागी गावांमध्ये मोठी जलक्रांती झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंबाजोगाईतील पाटोदा येथील विहिरी भरायला सुरूवात झाली आहे. पाणी फाऊंडेशनने जेव्हा हे काम हाती घेतले, तेव्हा राज्यातील हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. महाराष्ट्रात हजारो हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी निर्माण करण्याचा संकल्प केला होता. पाणी फाऊंडेशनच्या या संकल्पाला मूर्त स्वरूप येताना पाहायला मिळत आहे.
======================================
रिट्रीट सोहळ्यातच भारत-पाक जवान भिडले
फिरोजपूर (पंजाब) : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सोहळ्यातच दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे जवान भिडले. 9 जून रोजी ही घटना घडली होती. मात्र या घटनेचा व्हिडीओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
या ठिकाणी नेहमीप्रमाणे बीटिंग रिट्रीट सोहळा सुरु होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानच्या जवानाची टक्कर झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाणा करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांना वेगळं करण्यासाठी इतर जवानांना मध्ये पडावं लागलं. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
======================================
महसूल खात्याकडून बदलीचे अधिकार काढले, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : महसूल खात्यातील बदल्यांचे सर्व अधिकार विभागीय आयुक्तांना देऊन मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खाते सांभाळलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना चपराक दिली आहे.
महसूलमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण व्हायला नकोत, या हेतूने महसूल खात्याच्या मंत्रिस्तरावरील काही महत्त्वाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. पण या निर्णयामुळे महसूलमंत्र्यांचे अधिकार संपणार आहेत.
सद्यस्थितीत विविध प्रकारच्या सेवा, मुलकी सेवा, जमीन आणि जमीनविषयक कायदे आदींसह त्यांची अंमलबजावणी, यामुळे महसूल खात्याचे महत्त्व इतर खात्यांच्या तुलनेने वाढले होते.
======================================
... तर मुंबई मनपासाठी भाजप-रिपाइं युती होणारच : आठवले
नवी दिल्ली : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले असतानाच, रिपाइं मात्र भाजपसोबतच असल्याचा स्पष्टोच्चार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केला आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजप- आरपीय युती होणारच, असा दावा खासदार रामदास आठवले यांनी दिल्लीत बोलताना केला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपची युती झाली, तर रिपाइं ३५ जागा, आणि जर ही युती झाली नाही, तर रिपाइं भाजपसमोर युतीसाठी ६० जागांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
======================================
मोहनजी, भेटीसाठी लंडनमध्ये या! : लिओनार्डो डी कॅप्रिओ
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच ऑस्कर विजेता लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि उद्योजक रिचर्ड ब्रॅनसन यांची भेट घेणार आहेत. मोहन भागवत पुढील महिन्यात दोन दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात लिओनार्डो आणि ब्रॅनसन यांनी मोहन भागवतांना विशेष निमंत्रण दिलं आहे.
विशेष म्हणजे लिओ आणि ब्रॅनसन हे दोघेही शाकाहारी आहेत. त्यामुळे भागवतांच्या भेटीदरम्यान संघाने गोवंश हत्या बंदीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं आणि शाकाहाराचं समर्थन करणार आहेत. लिओनार्डो डी कॅप्रिओ इंग्लंडमध्ये प्राण्यांची कत्तल रोखण्यासाठी आधीपासूनच एका संघटनेच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.
भागवत इंग्लंड भेटीदरम्यान हिंदू स्वयंसेवक संघाने (एचएसएस) 30-31 जुलै रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबीराला उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक देशभरातल्या हिंदू स्थलांतरितांना मार्गदर्शनही करणार आहेत.
======================================
सांगलीच्या वालचंद कॉलेजवरून भाजप खासदार आणि जिल्हाध्यक्ष भिडले
सांगली : सांगलीतील वालचंद कॉलेजमधील एमटीईएस संस्थेच्या सत्तेवरून भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात तुंबळ वाकयुद्ध रंगलं.
आज संस्थेच्या वालचंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी जी.व्ही.परिषवाड यांची नियुक्ती झाल्याचं सांगत संजयकाका 700 कार्यकर्त्यांसह कॉलेजात घुसले, आणि प्राचार्यपद सांभाळणाऱ्या प्राचार्य व्ही. जी देवमाने यांना बाजूला करून बळजबरीने परिषवाड यांना खुर्चीवर बसवलं.
त्यामुळं संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी नसलेले संजयकाका पाटील हे अजित गुलाबचंद यांच्याकडून सुपारी घेऊन काम करत असल्याचा, आरोप पृथ्वीराज देशमुख यांनी केला.
तर संजयकाका यांनीही आरोपाला जशास तसं उत्तर देत गुंडगिरी आणि दहशतीच्या जोरावर देशमुखांनी अध्यक्षपद मिळवल्याचा आरोप संजयकाकांनी केला आहे.
======================================
अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल, सेनेचा हल्लाबोल
मुंबई: उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
तसंच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे ‘हलचल’ सिनेमातील राजपाल यादव आहेत, असा घणाघातही पेडणेकर यांनी केला आहे.
‘मनोगत’ या भाजपच्या पाक्षिकातून काल माधव भंडारी यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली होती.
मोदींनी सिनेट जिंकली, राऊत साहेब तलाक केव्हा घेताय, असं शिर्षक देऊन, भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली.
======================================
अखेर पाकिस्तानला कंठ फुटला, 91 वर्षीय भारतीयाची शेवटची इच्छा पूर्ण
मेरठ: नेहमीच दहशवाद आणि सीमेवरील तणाव यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात धुसफूस सुरु असते. मात्र नेहमीच चर्चेसाठी हात पुढे करणाऱ्या भारतासाठी, पाकिस्ताननेही संवेदनशीलता दाखवली आहे.
एका भारतीयाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यास पाकिस्तान सरकारने होकार दिला आहे. फाळणीमुळे घर-दार सोडावं लागलेल्या 91 वर्षीय कृष्णा खन्ना यांना, त्यांचं पाकिस्तानमधील घर पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
कृष्णा खन्ना हे आता 91 वर्षांचे झाले आहेत. कृष्णा यांचं संपूर्ण बालपण पाकिस्तानातील उढोके इथं गेलं. त्याच बालपणाची आठवणींमध्ये ते उर्वरीत आयुष्य कंठत आहेत. मात्र शेवटची इच्छा म्हणून जिथे बालपण घालवलं, जिथे वाढलो ते पाकिस्तानातील घर, अंगण पाहता यावं, अशी इच्छा कृष्णा यांची आहे.
या इच्छेसाठी ते गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानला जाण्यासाठी त्यांनी अनेकवेळा व्हिजासाठी अर्ज केला. मात्र त्यांना व्हिजा मिळाला नाही. पण अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. पाकिस्तान सरकारने कृष्णा यांना व्हिजा देण्यास मंजुरी दिली आहे. इतकंच नाही तर कृष्णा यांच्यासोबत अन्य तिघांनाही पाकिस्तानात येण्यास परवानगी दिली आहे.
======================================
वृद्ध भारतीयाची शेवटची इच्छा पाकिस्तान सरकारने केली पुर्ण
- ऑनलाइन लोकमत -मेरठ, दि. 24 - पाकिस्तानमधील आपलं पुर्वजांच घर पाहण्याची भारतीयाची शेवटची इच्छा पाकिस्तान सरकारच्या मदतीने पुर्ण होणार आहे. 91 वर्षीय कृष्णा खन्ना यांचं घर पाकिस्तानात असून फाळणीनंतर ते भारतात आले होते. मृत्यूपुर्वी आपल्याला ते घर पाहायला मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. गेली 10 वर्ष ते व्हिसासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना व्हिसा मिळत नव्हता. अखेर पाकिस्तान सरकारने त्यांची ही शेवटची इच्छा पुर्ण करण्याचा निर्णय घेत त्यांना व्हिसा दिला आहे.91 वर्षीय कृष्णा खन्ना यांचं बालपण पाकिस्तानमधील उढोके येथे गेलं आहे. 1930 च्या आसपासचा तो काळ असावा. तिथे आपल्या आजोबांसोबत घालवलेले दिवस, आठवणी अजूनही त्यांच्या मनात तशाच ताज्या आहेत. चांगल्या आठवणींसोबत काही भयानक आठवणीदेखील आहेत. 1947ला फाळणीअगोदर दंगली झाल्या तेव्हा सुरक्षेसाठी कृष्णा खन्ना यांचं कुटुंब उढोके येथून शेखूपुरा येथे गेलं होतं. गुरुद्वारामध्ये त्यांनी आसरा घेतला होता. बाहेर हातात तलवारी, हत्यारे घेऊन रक्ताने माखलेली लोक फिरत होते. कृष्णा खन्ना यांच्या कुटुंबावर हल्ला होणार होता पण तितक्यात लष्कराच्या जवानांनी त्यांना येऊन वाचवलं होतं.
======================================
शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 24 - डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत. अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ‘ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?’ हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली व स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या ‘मनोगत’ पाक्षिकातून करण्यात आलेल्या टीकेला उद्धव ठाकरे सामनातून उत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सुब्रमण्यम स्वामी आणि अरुण जेटलींचं नाव घेत भाजपावर निशाणा साधला आहे.काही दिवसांपुर्वी सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे काँग्रेसधार्मिणे असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेटलींनी अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
======================================
खडसेंनी पदाचा गैरवापर केला का, याचीही चौकशी होणार
- मुंबई : भोसरी, जि.पुणे येथील एमआयडीसीमधील जमिनीच्या खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला का, याची चौकशी करण्यात येणार आहे.या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग करणार आहेत. त्यांच्या चौकशीची कार्यकक्षा निश्चित करणारा आदेश आज सामान्य प्रशासन विभागाने काढला. या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, ही जमीन एमआयडीसी कायदा वा महसूलविषयक विविध अधिनियमान्वये हस्तांतरणीय किंवा विक्री पात्र होती का, याची चौकशी करण्यात येईल, तसेच खडसे यांनी मंत्रिपदाचा वापर या जमीन खरेदी व्यवहारात केला काय (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट), याचीही चौकशी केली जाईल. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी ही जमीन खरेदी केली होती. ती एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आधीच म्हटले आहे. तथापि, ही जमीन मूळ मालकाकडेच होती आणि त्याच्याशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता, असे खडसे यांचे म्हणणे आहे.
======================================
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
- यदु जोशी, मुंबईराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.लांबलेला पाऊस, मुख्यमंत्र्यांची विस्ताराबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी अद्याप बाकी असलेली चर्चा, शिवसेनेशीही न झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर विस्तार लांबणीवर पडला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना आपापल्या खात्याचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यामुळे कमीच दिवस मिळतील, असे दिसते. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, नव्या मंत्र्यांची नावे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री हे पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत.
======================================
..तर सरकारचे साह्य ‘त्या’ बँकांना नाही ?
- नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या व्यवस्थापनाने थकीत कर्जावर (एनपीए) तोडगा काढण्याची आपली योजना सरकारने स्थापन केलेल्या निगराणी समितीकडे डिसेंबरपर्यंत न सोपविल्यास त्यांना सरकारी प्रोत्साहनात्मक अर्थसाह्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.अशा बँकांना सरकारी मदत मिळण्यास अडचणी येऊ शकतात. बँकांना रिस्ट्रक्चरिंग प्रस्तावाला टेक्नो इकॉनॉमिक फिजिब्लिटीला प्रकरणाचा विचार करून सादर करण्यास सांगण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.थकीत कर्ज कशा रीतीने वसूल करता येईल, याबाबत त्यांचा तोडगा डिसेंबरपर्यंत सादर करण्यासाठी आम्ही बँकांवर दडपण आणत आहोत, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, अधिक गंभीर प्रकरणात ही मर्यादा मार्च २०१७ पर्यंत आहे. अशा प्रकरणांच्या निष्कर्षावरच बँकांना दिले जाणारे अर्थसाह्य अवलंबून आहे. केंद्राने चालू वित्तीय वर्षातील बँकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची रक्कम राखीव ठेवली आहे.
======================================
सीएनजीवर धावणार दुचाकी
- नवी दिल्ली : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी गुरुवारी सरकारने एक मोठे पाऊल उलचत सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. तेल आणि नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी देशात सरकार स्वच्छ इंधन पुरविण्याच्या दृष्टीने गंभीर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.इंद्रप्रस्थ गॅस लि. (आयजीएल) आणि गेल इंडिया लि. (जीआयएल) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी याही उपस्थित होत्या. सध्या देशात खपल्या जाणाऱ्या एकूण इंधनात केवळ ७ टक्के इंधनात गॅसचा वापर होतो. संपूर्ण जगात हे प्रमाण २४ टक्के आहे. सीएनजीवर दुचाकी वाहन चालविण्याचा हा प्रयोग ‘ऐतिहासिक’ असल्याचे सांगून प्रधान म्हणाले की, यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे त्याची वेगाने अंमलबजावणी केली जाईल. प्रारंभ राजधानीत करण्यात आल्याने दिल्ली स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेस चालना मिळेल. यावेळी प्रकाश जावडेकर म्हणाले की, प्रदूषण नियंत्रित करण्यास सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी २०२० पर्यंत युरो-६ इंधन प्राप्त केले जाईल. स्वच्छ इंधनाला चालना देण्यासाठी आपले मंत्रालय पूर्ण सहकार्य करील. स्वच्छ इंधनाला चालना देण्याच्या उद्देशानेच ई-रिक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय इलेक्ट्रिक व हायब्रीड कारवर सबसिडी देण्यात आली
वापरात नसलेल्या विमानतळांचे ‘सेझ’ होण्याची शक्यता
- नवी दिल्ली : वापरात नसलेल्या विमानतळांचे रूपांतर ‘विशेष आर्थिक क्षेत्रात’ (सेझ) करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.अशा विमानतळांवर विमाने भाड्याने देणाऱ्या कंपन्या आपली विमाने उभी करू शकतील आणि ती ग्राहकांना दाखवू शकतील. याशिवाय देशांतर्गत विमान क्षेत्राला आणखी आकर्षक बनविण्याचा प्रयत्नातहत भाड्याने विमान देण्यासाठी येणारा खर्चही कमी करण्यावर सरकार भर देणार आहे. नागरी उड्डयन सचिव आर.एन. चोबे यांनी ही माहिती दिली.गेल्या १५ जून रोजीच नवीन उड्डयन धोरण जाहीर करण्यात आले. त्यात क्षेत्रीय संपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विमाने भाड्याने देण्याबाबत येणारा खर्चही कमी होणार आहे.चोबे म्हणाले की, उपयोगात नसलेल्या काही विमानतळांचा वापर विमाने उभी करण्याच्या उद्देशाने करण्यासाठी आणि जुनी विमाने तोडण्यासाठीही त्याचा उपयोग केला जाण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. देशात जवळपास ४०० विमानतळ आणि हवाई पट्ट्या उपयोगात नाहीत. चोबे म्हणाले की, मी एकाला भेटलो. त्याने देशातील उपयोगात नसलेल्या विमानतळांचे रूपांतर ‘सेझ’मध्ये करण्याची सूचना केली. त्याचा दोन प्रकारे वापर होऊ शकतो. एक कंपन्यांसाठी विमाने उभी करण्याची व्यवस्था होईल आणि दुसरी विमाने तोडण्यास त्याचा वापर करता येईल. आपण जहाजे तोडण्याचे काम चांगल्या प्रकारे करू शकतो, तर विमाने तोडण्याचे का नाही? हा एक धाडसी विचार असून, विमान क्षेत्राला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास असे प्रयत्न केले जाऊ शकतात. भारतीय उड्डयन क्षेत्राची जोरदार वृद्धी होत आहे; पण ती यापुढेही अशीच कायम राहिली पाहिजे. नवीन उड्डयन धोरणात प्रस्तावित क्षेत्रीय संपर्क योजनेबाबत ते म्हणाले की, पुढील ४-५ वर्षे तेलाच्या किमती कमी राहिल्यास तोपर्यंत क्षेत्रीय विमान संपर्क मजबूत होईल.
- आहे.
======================================
फ्लिपकार्टच्या सीईओनी खरेदी केले ३२ कोटींचे घर
- ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. २३ - फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बन्सल यांनी सर्वांत मोठी खरेदी केली आहे. त्यांनी येथील कोरामंगाला या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या महागड्या घराची खरेदी केली आहे.या घराची किंमत ३२ कोटींच्या घरात असून ते १०,००० स्केअर फूट आहे. तसेच, आत्ताचे घर नऊ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या फ्लिपकार्टच्या ऑफिसपासून जवळच आहे. ३२ वर्षीय बिनी बन्सन हे बंगळुरु सारखा टेकसिटीत गेल्या काही दिवसात महागड्या घराची डील करणारे एकमेक व्यक्ती आहे.कोरामंगाला या ठिकाणी अनेक नामांकित कंपनींच्या मालकांची आणि अधिका-यांची घरे आहेत. तसेच, फ्लिपकार्टचे दुसरे सहसंस्थापक सचिन बन्सल यांची सुद्धा या ठिकाणी प्रॉपर्टी आहे.
======================================
रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला
| |
-
| |
मुंबई - युरोपियन महासंघातील (ईयू) सदस्यात्वाबाबत घेण्यात आलेल्या सार्वमत चाचणीचा भारताच्या चलनविनिमय बाजारावर परिणाम दिसून आले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 66 पैशांच्या घसरणीसह 67.91 रुपये पातळीवर उघडला.
रुपयाने 1 मार्च 2016 नंतर सर्वांत नीचांकी पातळी गाठली आहे. परंतु त्यावर उपाययोजना म्हणून रिझर्व्ह बॅंकेने डॉलरची विक्री केली. परिणामी रुपयाचे मूल्य 87 पैशांनी वाढून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 68.11 रुपयांवर पोचले आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांच्या वाढीसह 67.24 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला होता. ब्रेक्झिटमुळे चलनविनिमय बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला रुपयाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रुपयाने 1 मार्च 2016 नंतर सर्वांत नीचांकी पातळी गाठली आहे. परंतु त्यावर उपाययोजना म्हणून रिझर्व्ह बॅंकेने डॉलरची विक्री केली. परिणामी रुपयाचे मूल्य 87 पैशांनी वाढून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 68.11 रुपयांवर पोचले आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांच्या वाढीसह 67.24 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला होता. ब्रेक्झिटमुळे चलनविनिमय बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला रुपयाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
======================================
खासगीपेक्षा सरकारी शाळांकडे ओढा
| |
-
| |
दर्जा सुधारत असल्याने पालकांची इंग्रजी माध्यमाकडे पाट
सोलापूर - चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारने दोन हजार इंग्रजी शाळांना मान्यता दिली. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमातून सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्रही आशादायक आहे. जिल्हा परिषद आणि पालिका शाळांचा दर्जा आणि लुक बदलत असल्याने पालक आता या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.
खासगी इंग्रजी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. मुलांचे इंग्रजी उत्तम होते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धेत ती कुठे कमी पडत नाहीत, असे एक ना अनेक समज-गैरसमज बहुंताशी पालकांमध्ये असतात. त्यामुळे इंग्रजी शाळेत वर्षाला पंचवीस हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे मोजण्यासही ते तयार असतात. शिवाय पोशाख आणि पुस्तकांचा खर्चही पालकांच्या माथी मारला जातो. हे सर्व का होते, याचे उत्तर एकच असते. शाळांचा दर्जा उत्तम नसतो. शिक्षक मेहनत घेत नाहीत. अस्वच्छता असते. मात्र या सर्व कारणांचा शोध घेत आता सरकारी शाळांनीही कात टाकण्यास सुरवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत सरकारी शाळांनी आदर्श निर्माण केला आहे. त्या आपला दर्जा सांभाळण्याबरोबरच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा गांभीर्याने विचार करीत आहेत.
सोलापूर - चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारने दोन हजार इंग्रजी शाळांना मान्यता दिली. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमातून सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्रही आशादायक आहे. जिल्हा परिषद आणि पालिका शाळांचा दर्जा आणि लुक बदलत असल्याने पालक आता या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.
खासगी इंग्रजी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. मुलांचे इंग्रजी उत्तम होते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धेत ती कुठे कमी पडत नाहीत, असे एक ना अनेक समज-गैरसमज बहुंताशी पालकांमध्ये असतात. त्यामुळे इंग्रजी शाळेत वर्षाला पंचवीस हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे मोजण्यासही ते तयार असतात. शिवाय पोशाख आणि पुस्तकांचा खर्चही पालकांच्या माथी मारला जातो. हे सर्व का होते, याचे उत्तर एकच असते. शाळांचा दर्जा उत्तम नसतो. शिक्षक मेहनत घेत नाहीत. अस्वच्छता असते. मात्र या सर्व कारणांचा शोध घेत आता सरकारी शाळांनीही कात टाकण्यास सुरवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत सरकारी शाळांनी आदर्श निर्माण केला आहे. त्या आपला दर्जा सांभाळण्याबरोबरच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा गांभीर्याने विचार करीत आहेत.
======================================
दहशतवाद्यांच्या जामिनासाठी आदिवासींचा वापर
| |
-
| |
मोखाडा - मुंबईत घातपात घडविण्याच्या कटाप्रकरणी अटक झालेल्या दहशतवाद्यांना सोडविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील गरीब, अशिक्षित आदिवासींचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती समजली आहे. या आदिवासींना पैशाचे प्रलोभन दाखवत किंवा कर्ज काढून देतो, असे सांगत त्यांच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर दहशतवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी केला जात आहे. ही बनावट कागदपत्रे बनविणारे दहशतवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात सक्रिय आहेत.
दहशतवाद्याला जामीन राहताना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी या खेड्यातील भीमा सारक्ते या अशिक्षित आदिवासीला सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे त्याच्या भावाने मिळविलेल्या माहितीनंतर हे उघडकीस आले.
======================================
मोदी सरकारच्या जाहिराती "फुकटात'?
| |
-
| |
मुंबई - देशभरातली माध्यमे, सार्वजनिक ठिकाणची होर्डिंग लावून मोदी सरकारच्या कामाची प्रचंड जाहिरातबाजी सुरू असली तरी त्यासाठी एक रुपयादेखील खर्च झाला नाही, असा अजब खुलासा केंद्र सरकारच्या जाहिरात प्रसिद्धी संचालनालयाने केला आहे.
विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता प्रणय अजमेरा यांनी माहिती अधिकारात मोदी सरकारच्या दोन वर्षांतील जाहिरातीवर झालेल्या खर्चाबाबत माहिती मागितली होती. मात्र, जाहिरात प्रसिद्धी विभागाने उत्तरात "निल‘ (काहीही खर्च नाही) अशी माहिती दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने शंका उपस्थित केली आहे. मोदी सरकारने हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दिलेल्या आहेत. दोन वर्षांत एकही दिवस असा नाही की माध्यमांत मोदी सरकारची जाहिरात नाही. पण, त्यासाठी सरकारचा एकही रुपया खर्च झालेला नसेल तर मग या जाहिरातीचे पैसे कोण देते? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदी सरकारने दिलेल्या जाहिराती वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी मोफत दाखवल्या आहेत काय? असा सवाल करतानाच उद्योजक अदानी अथवा अंबानी यांच्या कंपन्यांनी या जाहिरातींचे पैसे दिले? असा राजकीय टोला मलिक यांनी लगावला. या जाहिरातींच्या खर्चाचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडला पाहिजे, अशी मागणीदेखील मलिक यांनी केली.
======================================
No comments:
Post a Comment