Saturday, 25 June 2016

नमस्कार लाईव्ह २५-०६-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीनने खोडा घातल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी 
२- चीनमध्ये पावसाचे थैमान, ९८ मृत्युमूखी 
३- इस्लामाबाद; दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू 
४- तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार! - निकोला स्टर्जन 
५- भारताचा 'एनएसजी' प्रवेश रखडला;चीनचा विरोध 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी हिमकन्या 
७- ..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना 
८- 251 रुपयांत स्मार्टफोन देणारी कंपनी आता देणार सर्वात स्वस्त LED टीव्ही 
९- ऐश्वर्या-रणदीपचा 'सरबजीत' भारतातर्फे 'ऑस्कर'साठी पाठवणार? 
१०- कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा? - पवार 
११- सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी 
१२- 'एनआयटी'च्या फीमध्ये जवळपास दुप्पट वाढ 
१३- परदेश सहलींतून काय साध्य केले?-केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- धुळ्यात सुरत-नागपूर हायवेवर भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू 
१५- शिर्डीत ड्रेनेजमध्ये पडून 4 शेतकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू
१६- राज्यात कोंबड्याची झुंज थांबणार; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 
१७- पुण्यातील स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार 
१८- कृषी खात्यात १६२ नियमबाह्य बदल्या 
१९- विजयवाडा; मंदिराच्या शेतजमिनी सोडा; दलित, ख्रिश्चनांना आदेश 
२०- जयपूर; ४७ वर्षांनंतर मिळाले सनदी अधिकाऱ्याला मिळाले सुवर्ण पदक 
२१- पंतप्रधानांच्या हस्ते आज 'स्मार्ट सिटी'ची भरारी 
२२- पिंपरीमध्ये येऊन स्मार्ट सिटी पाहावे- पवार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- विश्वास नांगरे-पाटलांसह 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
२४- मुंबई; पावसामुळं तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतूक उशिरानं 
२५- येत्या 24 तासात कोकण-मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा 
२६- अहमदनगर; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात, आरोपी फरार 
२७- मीरा रोड; भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद 
२८- धुळे जिल्ह्यात अपघातात 17 जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- व्हाटसअॅप बंद होणार ? 
३०- शाहरूख म्हणतो, ती खुपच सुंदर आहे 
३१- जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक 
३२- ह्रतिकने केला सलमानचा अपमान... 
३३- द. आफ्रिकेचा पराभव करुन विंडीज अंतिम फेरीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
राजेंद्र मुळे, अनिल कांबळे, निखील पोखरकर, भगवान काळे, सुनील धोंडगे, अनिल हातने, गजानन चोटे, भिख्खू प्रज्ञानंद, एकनाथ विभूते, प्रताप सोळंके, श्रीधर पिटला, प्रशांत घुगे, नर्सिंग नाईकवाडे, गजू कळसकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी हिमकन्या

वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी हिमकन्या
हैदराबादः तेलंगना राज्याच्या दलित भागात राहणाऱ्या मुलीने वयाच्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास रचला आहे. ही मुलगी एवढ्या कमी वयात हिमशिखर सर करणारी जगातील पहिलीच व्यक्ति ठरली आहे.
मालवथ पूर्णा असं या हिमकन्येचं नाव असून ती तेलंगनामधील निझामाबाद जिल्ह्यातील आहे. पूर्णाचा जन्म 10 जून 2000 साली झाला आहे. ती सध्या 9 वीच्या वर्गात शिकते.
असा झाला पूर्णाचा प्रवास
पूर्णाच्या बाबतीत सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तिने यापूर्वी कसलंही शिखर चढलेलं नाही. पूर्णाने 10 नेपाळच्या गाईडसोबत चढाईला सुरुवात केली. चढाई करण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये प्रशिक्षण घेतलं, असं पूर्णाने सांगितलं.
======================================

पावसामुळं तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतूक उशिरानं

पावसामुळं  तिन्ही मार्गावरच्या रेल्वे वाहतूक उशिरानं
मुंबई: मुंबईत रात्री झालेल्या पावसानं पुन्हा एकदा लोकलच्या वेगाला ब्रेक लागला आहे. पश्चिम, हार्बर आणि मध्य या तीनही रेल्वे मार्गावरची लोकल उशिरानं धावते आहे.
पश्चिम रेल्वे १५ मिनिटं तर मध्य आणि हार्बर रेल्वे २० मिनिटं उशिरानं धावते आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही सकाळी बाहेर पडलेल्या लोकांना खोळंब्याच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच तीनही रेल्वेमार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळेसही प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला होता.
तर काल रात्रभर अंधेरी, पवई, जोगेश्वरी या भागात थोड्या-थोड्या अवधीनं पावसाची रिपरिप सुरुच राहिली. केवळ रिमझिम पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं मुंबई महापालिका नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या दाव्यांवर साफ खोटी ठरली..
शुक्रवारी सकाळी 8 ते आज पहाटे वाजेपर्यंत मुंबई शहरात 73 मिमी, पश्चिम उपनगरात 74.43 मिमी, तर पूर्व उपनगरात 107.79 मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय येत्या २४ तासात मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर आणखीन वाढेल., असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
======================================

येत्या 24 तासात कोकण-मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

येत्या 24 तासात कोकण-मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
मुंबई: येत्या 24 तासात मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल, अशा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. काल रात्री दक्षिण मुंबईसह, पूर्व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

अंधेरी, पवई, जोगेश्वरी मध्ये जोरदार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं मुंबईकरांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळं पालिकेच्या दावा पुन्हा खोटा ठरला आहे. दादरमध्ये पावसामुळं झाडं मुळासकट उखडून एका गाडीवर कोसळलं. ठाणे आणि नवी मुंबईतही संततधार सुरुच होती. दरम्यान सध्या पाऊस थांबला असून वाहतुकीवर काहीही परिणाम नाही.

शुक्रवारी सकाळी 8 ते आज पहाटे वाजेपर्यंत मुंबई शहरात 73 मिमी, पश्चिम उपनगरात 74.43 मिमी, तर पूर्व उपनगरात 107.79 मिमी पावसाची नोंद झाली. मान्सूननं मुंबईत उशिरा एन्ट्री केली असली तरी आता त्यानं चांगलाच जोर धरला आहे.

काल दुपारी मुंबईत पाऊस बरसताच पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरूणांनी मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस आणि गेटवे कडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. तरुणांनी या पावसाचा चांगलाच आनंद लुटला.
======================================

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात, आरोपी फरार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात, आरोपी फरार
अहमदनगर: अहमदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून या पीडितेवर अत्याचार सुरु होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित मुलीचं शिक्षण सुरु असून तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं समजतं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तरुणाचा आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टराचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
======================================

विश्वास नांगरे-पाटलांसह 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याविश्वास नांगरे-पाटलांसह 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


मुंबई राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे :


  1. पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे डीआयजी अजित व्ही पाटील यांची पदोन्नती होऊन औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आलीय.

  1. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संचालक कैसर खालिद यांची पदोन्नती होऊन पीसीआरला विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

  1. औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
======================================

भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
मिरा रोड: मुंबईत पुन्हा एकदा माणुसकीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिरा रोडमध्ये एका तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण तब्बल 2 तास मदतीसाठी प्रतीक्षा करत होता. मात्र, येणाऱ्या जाणाऱ्या एकानंही त्याला रुग्णालयात नेलं नाही. दोन तासांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही.

18 जून रोजी झालेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य आज समोर आली आहेत. अशोक साहू असं अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. अशोकच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दिरंगाईवर आरोप केला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काशिमिरा पोलीस आता जवळच्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या बाईकस्वाराचा शोध घेत आहेत.
======================================

धुळ्यात सुरत-नागपूर हायवेवर भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू

धुळ्यात सुरत-नागपूर हायवेवर भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू
धुळे : धुळ्यात सुरत-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. एक मालवाहू कंटेनर काळी पिवळीवर जाऊन धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काळी पिवळीमधील 18 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ ही दुर्घटना घडली. मृत प्रवाशांमध्ये 9 महिला आणि 8 प्रवाशांचा समावेश आहे. धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरचे (एमएच 18 एए 0978) भिरडाणे गावाजवळ पुढील टायर फुटले. त्यामुळे हा ट्रक समोरुन येत असलेल्या वडापच्या काळी पिवळीवर जाऊन आदळला.


या भीषण धडकेत काळी पिवळिचा जागीच चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातातील मृत व्यक्ती धुळे तालुक्यातील फागणे, मुकटी, अजंग, मोहाडी या गावचे रहिवाशी आहेत.
======================================

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना
मुंबई राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे भाजपनं विसरु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जातेय. ती वैयक्तीक मतं असू शकत नाही. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.

भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे बोलत आहेत. त्यावरुन त्यांना हे सरकार बुडवायचं आहे हे स्पष्ट होतंय. भाजपची शिवसेनेसोबत राहण्याची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरेंच्या पाठिंब्यावर सरकार चालावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

काल माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.
======================================

शिर्डीत ड्रेनेजमध्ये पडून 4 शेतकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू

शिर्डीत ड्रेनेजमध्ये पडून 4 शेतकऱ्यांचा गुदमरुन मृत्यू
अहमदनगर : ड्रेनेजमध्ये गुदमरल्यानं चार शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शिर्डीत घडली आहे. नगरपंचायतीच्या ड्रेनेजलाईनमधून काही शेतकरी शेतीसाठी पाण्याचा उपसा करत होते. यावेळी ही दुर्घटना घडली.

ड्रेनेजच्या चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी सुरुवातीला एक शेतकरी आत उतरला. बराच वेळ तो बाहेर आला नसल्यानं दुसरा शेतकरी आत गेला. त्यानंतर बराच वेळ हे दोघेही बाहेर न आल्यानं त्यांना पाहण्यासाठी आणखी दोघे चेंबरमध्ये उतरले. मात्र, दुर्दैवानं या चारही जणांचा मृतदेहच बाहेर काढण्यात आले.

सखाराम शिंदे, नवनाथ शेळके, आनंद मोरे आणि मारुती मिंधार अशी या शेतकऱ्यांची नाव आहेत. चेंबरमधल्या विषारी वायूमुळं गुदमरुन या चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र, नेमकं कारण शवविच्छेदनानंतरच कळेल असं पोलिसांनी सांगितलं.
======================================

राज्यात कोंबड्याची झुंज थांबणार

राज्यात कोंबड्याची झुंज थांबणार
मुंबई : राज्यात आयोजित होणाऱ्या कोंबड्यांच्या झुंजी कायमच्या बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. पशुसंवर्धन कायद्यात अंतर्गत या झुंजींवर बंदी असली, तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे या झुंजी सुरू असल्याने एन. जी. जयसिंहा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

कोंबड्यांच्या झुंजीत त्यांच्या पायाला छोटा चाकू अथवा धारदार हुक बांधले जातात. ज्यामुळे हे पक्षी घायाळ होतात,  किंवा त्यांना कायमचे अंपगत्व येते; बऱ्याचदा त्यांना प्राणही गमवावे लागताे. याशिवाय या झुंजीवर जुगारही लावला जात असल्यामुळे त्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी जयसिंहा यांनी याचिकेद्वारे केली होती.

न्यायमूर्ती केमकर आणि न्यायमूर्ती कर्णिक यांनी राज्य सरकारला यासंदर्भात त्वरित पावले उचलून, या झुंजींवर कायमची बंदी आणण्याचे आदेश दिले.
======================================

251 रुपयांत स्मार्टफोन देणारी कंपनी आता देणार सर्वात स्वस्त LED टीव्ही

251 रुपयांत स्मार्टफोन देणारी कंपनी आता देणार सर्वात स्वस्त LED टीव्ही
नवी दिल्ली : 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल्स कंपनी 1 जुलैपासून 10 हजार रुपयांहून कमी किंमतीत 32 इंचाचा एचडी LED टीव्ही लॉन्च करणार आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 32 इंचाचा हाय-डेफिनेशन एलईडी टेलिव्हिजन लॉन्च करण्याची तयारी रिंगिंग बेल्स कंपनीने केली आहे. या टीव्हीचं नावही ‘फ्रीडम’ ठेवण्यात आलं आहे.

गोयल यांनी सांगितले की, “फ्रीडम हा भारतातील सर्वात स्वस्त टीव्ही असणार आहे. कारण 10 हजार रुपयांहून कमी किंमतीचा एलईडी टीव्ही अद्याप भारतात उपलब्ध नाही. ऑनलाईन माध्यमातून या टीव्हीची विक्री होईल.”

विशेष म्हणजे, या टीव्हीसाठी ग्राहकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. ऑनलाईन बुकिंगनंतर कॅश ऑन डिलिव्हरीवर एलईडी टीव्हीची विक्री केली जाणार आहे. यावेळी रिंगिंग बेल्स कंपनी स्मार्टफोन्सच्या अॅक्सेसरीजही लॉन्च करणार आहे.

======================================

शाहरूख म्हणतो, ती खुपच सुंदर आहे

शाहरूख म्हणतो, ती खुपच सुंदर आहे
शाहरुख खान
मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी चित्रपटातील सहकलाकार सुचित्रा कृष्णमूर्ती आणि चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची मुलगी कावेरी यांच्या आवाजाच्या प्रेमात पडला आहे.

शेखर कपूर यांची मुलगी कावेरीने आज आपले पहिले रेकॉर्डेड गाणे रिलिज केले.

फॅनस्टरने ट्विटरवर सुचित्रा कृष्णमूर्ती लिहिले आहे की, ”आपली मुले कशी मोठी झाली. तुम्ही माझ्यासोबतच करिअरची सुरूवात केली. हे विशेष आहे. तिला माझा अशीर्वाद आहे.” शाहरूखने यानंतर शेखर कपूरचे अभिनंदन करून ती किती सुंदर असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

कावेरीच्या आवाजाचे दृतिक रोशन, अभिषेक बच्चन यांच्यासह शान आणि सोनू निगम यांनीही कौतुक केले आहे.
======================================

पुण्यातील स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

पुण्यातील स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
पुणे : शिवसेना-भाजपमधील दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या खडाजंगीचा परिणाम पुण्यातील कार्यक्रमावरही होणार आहे. पुण्यात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये स्मार्टसिटीचा कार्यक्रम होत आहे. मात्र उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सुुरुवातीला मनसे या कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. मात्र आता मनसेची यू टर्न घेतला आहे. कार्यक्रमाला जायचं की नाही, हे राज ठाकरेंशी बोलून ठरवू. मात्र कार्यक्रमाला जाण्याची आमची इच्छा नाही, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.


तर कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याने पुण्याचे महापौर प्रशांत जगतापही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. प्रशांत जगताप पंतप्रधानांच स्वागत करायला विमानतळावर जातील. परंतु म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
======================================

व्हाटसअॅप बंद होणार ?

व्हाटसअॅप बंद होणार ?
हे फीचर आता अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट होणं सुरु झालं आहे. हे नवं अपडेट तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळू शकेल.
मुंबई : व्हाटसअॅपवर एन्सक्रिप्शन हे नवे अपग्रेडेशन आल्याने एखाद्या ग्रुपमधील दोन व्यक्तींचा संवाद इतरांना वाचता येत नाही. याचा दहशतवादी आणि समाजकंटकांना फायदा होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. यावर येत्या 29 जुलैला सुनावणी होणार आहे.

व्हाटसअॅपवर यूजर्स सेक्यूरिटी सिस्टीम हे नवे अपग्रेडेशन सेट झाल्यानंतर कोणत्याही ग्रुपमधील यूजर्सला दोन व्यक्तींमधील संवाद वाचता येत नाही. त्यामुळे दहशतवादी आणि समाजकंटकांमधील संवाद सेक्यूरिटी संस्थासोबतच  स्वत: व्हाटसअॅपला हे संवाद डिकोड करता येणार नाहीत.

जर या याचिकेवर व्हाटसअॅपच्या विरोधात निर्णय लागल्यास इतर मोबाईल अॅप कंपनीवरही गदा येणार आहे. कारण अनेक मोबाइल अॅपलिकेशनसही सेक्यूरिटीसाठी 256 बीटचे एन्सक्रिप्शनचा वापर करित आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
======================================

पावसामुळे तिनही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २५ - मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारी दिवसभराच्या पावसानंतर शनिवारीही पावसाचा तडाखा कायम असून पावसामुळे मुंबईतील तिनही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल उशीराने धावत असून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठ मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
    मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असून हार्बर लोकलही १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही तीच परिस्थिती असून लोकलना २० मिनिटे उशीर होत असल्याने सर्व स्थानकांवर मोठी गर्दी पहायला मिळत आहे
======================================

जाणून घ्या भारताने कसा जिंकला होता पहिला विश्वचषक


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २५ : २५ जून १९८३ हा भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस आहे. भारताच्या या विश्वचषक विजयाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. भारताने एकापेक्षा एक सरस खेळाडूंनी भरलेल्या बलाढय वेस्ट इंडिजवर विजय मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये भारताला एक नवी ओळख मिळवून दिली. या विजयानंतर भारतात क्रिकेटच्या लोकप्रियतेचा जो प्रवास सुरु झाला तो आजही तसाच सुरु आहे. 
    या विश्वचषकाने फक्त भारतीय क्रिकेटलाच कलाटणी दिली नाही तर, क्रिकेटला एक नवा जगज्जेता मिळवून दिला तसचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचे वर्चस्व कमी केले. १९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. 
======================================

ह्रतिकने केला सलमानचा अपमान...


  • ऑनलाइन लोकमत
    मॅड्रिड : सलमान खान आणि वाद यांचे जुने नाते आहे. त्याची प्रसिद्धी वाढतेय तसेच त्याचे वादही वाढताहेत. सलमान खान आणि ह्रतिक रोशनचा वाद किती विकोपाला गेला आहे, या दोघांमधला पंगा आता पुन्हा एकदा नव्यानं पुढे आला आहे. याची प्रचिती आयफा सेरेमनीत दिसून आली. यांचा वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. आयफाच्या पत्रकार परिषदेसाठी ह्रतिकने सलमान सोबत स्टेज शेअर करायला नकार देऊन एकप्रकारे त्याचा अपमानच केला आहे. 
    मॅड्रिडमध्ये आयफाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, सलमान खान आणि हृतिक रोशन पोहोचले, पण सलमान तिथे असल्याने हृतिकने स्टेजवर जायला नकार दिला.
======================================

ऐश्वर्या-रणदीपचा 'सरबजीत' भारतातर्फे 'ऑस्कर'साठी पाठवणार?


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २५ : पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग यांच्या जीवनावर आधारित ऐश्वर्या-रणदीपच्या अभिनयाने सजलेला 'सरबजीत' हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. परदेशी नामकंनामध्ये भारताकडून 'सरबजीत' या चित्रपटाची निवड करण्यात आली असल्याचे वृत्त india.com ने दिले आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात डांबण्यात आलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंहची कैद्यांकडून हत्या करण्यात आली आणि तमाम भारतीयांची मने हादरली. भावाच्या सुटकेसाठी सरबजीतची बहीण दलबीर कौरने देशात आणि सीमेपार जाऊन अथक प्रयत्न केले होते. भारत-पाकिस्तान संबंधांदरम्यान हिंदोळे घेणाऱ्या जिवांची घालमेल चित्रित करणारा ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे. 
======================================

कृषी खात्यात १६२ नियमबाह्य बदल्या


  • यदु जोशी,  मुंबई
    भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्रिपद असतानाच्या १९ महिन्यांत झालेल्या १६२ अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्यांची जंत्रीच समोर आली आहे. या बदल्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याची ५०० पानी तक्रार थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे करण्यात आली आहे.
    सार्वत्रिक बदल्यांचा कालावधी नसताना देखील लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा आधार घेत या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीमध्ये खडसे व मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविण्यात आले आहे. अ‍ॅड. प्रशांत कायंदे यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे.
    नागरी सेवा मंडळास प्रस्तावित करण्यात आलेल्या बदल्या आणि या मंडळाने मान्य केलेल्या बदल्यांच्या संख्येतही मोठी तफावत आढळते. खडसे यांच्या स्तरावर काही बदल्या घुसवण्यात आल्या. अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या २६ बदल्या मंडळास प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मंडळाने त्यातील १३ मान्य केल्या असताना आणखी १३ बदल्या या मंत्री स्तरावर समाविष्ट करण्यात आल्या. कृषी उपसंचालकांच्या २७ बदल्या प्रस्तावित होत्या. त्यापैकी नागरी सेवा मंडळाने एक मान्य केली असताना १० जणांच्या बदल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र कृषी सेवा अधिकारी वर्ग ब च्या ६६ बदल्या मंडळास प्रस्तावित केल्या होत्या. मंडळाने १७ मान्य केल्या, मंत्री स्तरावर १५ अधिकाऱ्यांचा समावेश झाला. मात्र उर्वरित ४० अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला नागरी सेवा मंडळाची मान्यताच घेतली नाही. राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे कृषी खात्याचे लक्ष लागून आहे.
======================================

कुठं नेऊन ठेवलाय भारत माझा?


  • पिंपरी (पुणे) : केंद्र आणि राज्य सरकारकडून केवळ योजनांच्या घोषणाच होताहेत, प्रत्यक्षात सकारात्मक चित्र दिसत नाही. शेतकरी दुष्काळाने होरपळला असून आत्महत्या करताहेत. उद्योग संकटात आहेत. कामगारांना भविष्याची चिंता आहे... आता त्यांच्याच भाषेत बोलायचे, तर ‘कु ठं नेऊन ठेवलाय भारत माझा?’ हेच का ते अच्छे दिन, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.थेरगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘नदी स्वच्छता, नदी जोड, रेल्वे, रस्ते असे विविध प्रकल्प, अभियानांच्या घोषणा सुरू आहेत. पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेची सुरुवात होणार आहे. त्यांनी बाणेर रस्ता, बालेवाडी परिसर निवडलाय.स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आले. हा भाग मुळातच स्मार्ट आहे, अशा शहराचा समावेश केला असता, तर अधिक चांगल्या पद्धतीने शहराचा विकास झाला असता, असेही पवार म्हणाले. 
======================================

मंदिराच्या शेतजमिनी सोडा; दलित, ख्रिश्चनांना आदेश


  • विजयवाडा : आंध्र प्रदेश सरकारने हिंदूंचे मंदिर आणि मठांची जमीन बिगर हिंदूंना लागवडीखाली आणता येणार नाही, असा आदेश दिल्यानंतर आता खरीप हंगामाच्या तोंडावर अधिकाऱ्यांनी दलित, ख्रिश्चन आणि मुस्लीम शेतकऱ्यांना हुसकावण्याचे काम चालविल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. नोव्हेंबर २०१५ मधील या आदेशाची अंमलबजावणी सध्या जमिनीच्या लीजचे नूतनीकरणाच्या निमित्ताने केली जात आहे.
    जमीन भाडेपट्टीवर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील जमीन तत्काळ हस्तांतरित करावी, अशा नोटिसा या महिन्याच्या प्रारंभी बजावण्यात आल्या. हिंदूंच्या जमिनीवर शेती करायची असल्यास दलितांनी ते ख्रिश्चन धर्माचे पालन करीत नसल्याचे प्रमाणपत्र चर्चकडून सादर करावे, अशी सूचनाही त्यात आहे. नव्या नियमांनुसार मुस्लिमांना मंदिराच्या जमिनीवर पीक घेता येणार नाही.
======================================

४७ वर्षांनंतर मिळाले सनदी अधिकाऱ्याला मिळाले सुवर्ण पदक



  • जयपूर : पाच दशकांच्या संघर्षानंतर ८१ वर्षीय निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला राजस्थानच्या विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळविण्यात यश आले आहे. अजितसिंग सिंघवी असे या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. १९६९ मध्ये अजितसिंग यांनी एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. विद्यापीठाने त्यांचा गुरुवारी सुवर्ण पदक प्रदान करून गौरव केला.
    कुलगुरू जे. पी. सिंघल यांनी अजितसिंग यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले. सर्वाधिक गुण मिळवूनही त्यांना सुवर्ण पदक देण्यात आले नव्हते. त्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर ४७ वर्षांनंतर त्यांना न्याय मिळाला आणि न्यायालयाने त्यांना सुवर्ण पदक देण्याचा आदेश विद्यापीठाला दिला. 
======================================

सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी


  • नवी दिल्ली : रघुराम राजन, अरविंद सुब्रमणियन आणि केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शाब्दिक वार सुरू केले असून, भाजपा नेत्यांनी व मंत्र्यांनी विदेशात जाताना भारतीय पेहरावात जावे, टाय व सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटरसारखे दिसतात, अशी ट्विप्पणी केली आहे.
    भाजपाचे नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा वगळता कोणालाच जुमानत नसून, त्यामुळेच त्यांनी उघडपणे जेटली यांना लक्ष्य केले आहे. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी ,असा सूचक इशारा जेटली यांनी स्वामी यांना दिला होता. यावर नाव न घेता, मी तोंड बंद ठेवले, तर अनर्थ ओढवेल, अशी तिखट प्रतिक्रिया स्वामी यांनी व्यक्त केली आहे.
    अरुण जेटली गुरुवारी बँक आॅफ चायनाचे अध्यक्ष तिआन गिली यांना बीजिंगमध्ये भेटले. त्यांचे सूट व टायमधील छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच, स्वामींनी भाजपाच्या नेत्यांनी व केंद्रीय मंत्र्यांनी विदेशात भारतीय पद्धतीचे कपडे घालावेत असे ट्विट केले आणि तेवढ्यावर न
    थांबता सूट व टायमध्ये भारतीय नेते वेटर वाटतात असेही म्हटले.
======================================

चीनची भिंत आली आडवी


  • सेऊल : एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही. चीनने खोडा घातल्याने आणि अन्य काही देश भारताच्या विरोधात गेल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले.
    अर्थात, भारताने नाव न घेता यासाठी चीनला जबाबदार ठरविले आहे. एका देशाने सातत्याने अडथळे निर्माण केल्याने हे प्रयत्न यशस्वी
    झाले नसल्याचे भारताने म्हटले
    आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता.
    एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही. चीनच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनच्या राष्ट्रपतींची गुरुवारी ताश्कंदमध्ये भेट घेतली होती. मात्र प्रयत्नांना यश आले नाही आणि चीनची विरोधाची भूमिका कायम राहिली.
======================================

चीनमध्ये पावसाचे थैमान, ९८ मृत्युमूखी


  • बीजिंग : चीनच्या जियांग्सू प्रांतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवत ९८ लोकांचा बळी घेतला असून, ८०० हून अधिक लोकांना जखमी केले आहे, अशी माहिती सरकारी माध्यमांनी शुक्रवारी दिली.
    पाऊस, गारपीट आणि वादळामुळे यानचेंग शहरातील अनेक घरे कोसळली आहेत. याशिवाय फुनिंग, शेयांग परगण्यातील अनेक नगरांतही मोठा विध्वंस घडून आला आहे. १२५ कि.मी. प्रति तास एवढ्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांने फुनिंग परगण्यातील अनेक नगरांत हानी घडवून आणली. शेयांग परगण्यात वारे १०० कि.मी. प्रति तास या वेगाने वाहत होते. अनेक घरे कोसळून ५१ जणांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाले. काही भागात वीजपुरवठा खंडित होऊन घरे अंधारात बुडाली, तर काही भागांतील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली
======================================

दाऊदचा भाऊ हुमायून याचा मृत्यू


  • ऑनलाइन लोकमत
    इस्लामाबाद, दि. 24 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ हुमायून याचा पाकिस्तानमधील कराचीत मृत्यू झाला. हुमायून हा 40 वर्षांचा होता. हुमायून याला कर्करोगाच्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा दफनविधी कराचीमध्येच होणार आहे.
    हुमायून हा पाकिस्तानात दाऊद इब्राहिमसोबतच वास्तव्याला होता. इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार हुमायून हा कोणत्याही गँगमध्ये सहभागी नव्हता. तो फक्त दाऊदचा कराची आणि दुबईमधला रिअल इस्टेटचा व्यवसाय आणि हॉटेल सांभाळत होता.
    दाऊद याला 6 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. दाऊदचा मोठा भाऊ शाबीर याचा 1983मध्ये पठाण गँग हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा दुसरा भाऊ नूरा याचा किडनी निकामी झाल्यानं 2011मध्ये मृत्यू झाला होता.
    दाऊदचा भाऊ अनिस आणि मुश्ताकीन हेसुद्धा दाऊदसोबत कराचीमध्येच राहतात. दाऊद इब्राहिमचा एक भाऊ इक्बाल हा मुंबईत राहतो. दाऊदच्या दोन बहिणी शहीदा आणि हसीना यांचाही मृत्यू झाला आहे.
======================================

तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार!


  • ऑनलाइन लोकमत
    स्कॉटलंड, दि. 24 - युरोपीय संघात राहण्याच्या बाजुने असलेल्या स्कॉटलंडला जनतेच्या इच्छेविरोधात ब्रेक्झिटमध्ये सहभागी करून घेता येणार नाही असा इशारा स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी दिला आहे. ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेण्याच्या दिशेने आवश्यक तो कायदा अमलात आणण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडताना स्कॉटलंड ब्रिटनपासून विभक्त होण्याचा धोका ब्रिटनपुढे उभा ठाकला आहे. याआधीच्या सार्वमतात निसटत्या मार्जिनने स्कॉटलंडमधल्या जनतेने ब्रिटनमध्ये राहण्यास अनुकूलता दर्शवली होती.
    मात्र, ब्रेक्झिटच्या संदर्भात 62 टक्के स्कॉटिश जनतेने युरोपीय संघात राहण्याचा कौल दिला होता याची आठवण स्टर्जन यांनी करून दिली आहे.
    जर, ब्रिटन स्कॉटिश जनतेच्या मताविरोधात युरोपीय महासंघातून एक्झिट घेणार असेल, तर स्कॉटलंड ब्रिटनमध्ये राहायचं की नाही यासाठी पुन्हा सार्वमत घेईल अशी गर्भित धमकीच स्टर्जन यांनी दिली आहे.
    स्कॉटलंडच्या पहिल्या मंत्री निकोला स्टर्जन यांनी इंग्लंडसारखाच स्काटलंड हा देशही युरोपिय संघातून बाहेर पडू शकतो, असं वक्तव्य केलं आहे. लोकशाही पद्धतीनं मतदान घेतल्यावर नागरिकांनी युरोपिय संघात न राहण्याचा बाजूनं कौल दिल्यास स्कॉटलंड हा देशही युरोपिय संघातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र असल्याची माहिती यावेळी निकोला स्टर्जन यांनी दिली. अशी माहिती आरटीई न्यूज या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
    स्कॉटलंडची जनतेनं स्वतःच्या भवितव्याचा स्वतः विचार करून निर्णय घ्यायचा आहे, असा युक्तिवाद निकोला स्टर्जन यांनी मांडल्याचं वृत्त आरटीई या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
======================================
'एनआयटी'च्या फीमध्ये जवळपास दुप्पट वाढ

नवी दिल्ली - भारतीय तंत्रज्ञान संस्थेनंतर (आयआयटी) आता राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एनआयटीची वार्षिक फी 70,000 रुपयांऐवजी 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी फीमध्ये वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नव्या वर्षातील प्रवेशासाठी हा बदल लागू होणार आहे. जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत, त्यांच्या फी रचनेत कोणताही बदल होणार नाही. 

त्याशिवाय, मंत्रालयाने भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थांची (आयआयएसईआर) फी वाढवून प्रति सेमिस्टर 25,000 रुपये केली आहे. सध्या ही फी 15,000 रुपये आहे. मागील महिन्यात भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) वार्षिक फी दुप्पट करण्याचा निर्णय घेत, आयआयटीची वार्षिक शुल्क (फी) 90 हजारांहून थेट 2 लाख रुपये करण्यात आले होते. परंतु एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नगटातील अनुसुचित जाती-जमाती आणि इतर काही गटातील विद्यार्थ्यांना फी शुल्क माफ करण्यात येणार आहे. 

======================================
परदेश सहलींतून काय साध्य केले?-केजरीवाल

नवी दिल्ली - अणुइंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताचा प्रवेशाचा निर्णय लटकल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाला लक्ष्य केले. परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर पंतप्रधान मोदी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे यावरून दिसत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

चीनने एनएसजीतील भारताच्या सदस्यत्वाला जोरदार विरोध कायम ठेवल्यामुळे भारताचा एनएसजीतील प्रवेश लटकला आहे. 48 सदस्य देशांच्या या गटातील भारताचा प्रवेश तूर्त अशक्‍य दिसत आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारतासारख्या देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर कोणतेही एकमत झाले नसल्याचे चीनच्या शस्त्र विभागाचे महासंचालक वांग कून यांनी सांगितले.

याच मुद्द्यावरून केजरीवाल मोदींवर टीका करताना म्हटले की, परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांना सतत केलेल्या परदेशातील सहलींतून काय साध्य केले, हे देशातील नागरिकांना सांगितले पाहिजे. स्वित्झर्लंडनेही भारताला विरोध केल्याचे सांगण्यात येत असल्याने, मोदींनी स्वित्झर्लंडचा काही दिवस आधी दौरा करण्याची गरजच काय होती.
======================================
द. आफ्रिकेचा पराभव करुन विंडीज अंतिम फेरीत
-  गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेचा 100 धावांची पराभव करत तिरंगी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वेस्ट इंडीजची अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे.


शुक्रवारी झालेल्या या सामन्यात वेस्टइंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करताना 285 धावा केल्या. विंडीजचा डाव अखेरच्या षटकांत एक चेंडू शिल्लक असताना संपुष्टात आला. डॅरेन ब्राव्हो याने 102 धावा करत शतक झळकाविले. त्याला किरॉन पोलार्डने 71 चेंडूत 62 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी नोंदविलेल्या दीडशतकी भागीदारीमुळे विंडीज 200 धावांचा टप्पा पार करु शकले. कर्णधार जेसन होल्डर (40) आणि कार्लोस ब्रेथवेट (33 नाबाद) यांच्या खेळीमुळे विंडीज 285 धावांपर्यंत मजल मारु शकले.
======================================
पंतप्रधानांच्या हस्ते आज 'स्मार्ट सिटी'ची भरारी

पुणे - स्मार्ट सिटीच्या घोषणेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने होणाऱ्या राष्ट्रीय समारंभाचा मान पुण्याला मिळाला असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. 25 जून) पुण्यात येणार आहेत. अन्य 33 स्मार्ट सिटीचे महापौर, आयुक्तांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून सुमारे चाळीस ठिकाणी "एलईडी‘ स्क्रीनद्वारे नागरिकांना हा कार्यक्रम पाहता येईल.

"स्मार्ट सिटी‘च्या घोषणेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम करण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याची निवड केली आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी या प्रसंगी उपस्थित असतील. 
======================================
भारताचा 'एनएसजी' प्रवेश रखडला;चीनचा विरोध

सोल - चीनने अणुइंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला जोरदार विरोध कायम ठेवल्यामुळे 48 सदस्य देशांच्या या गटातील भारताचा प्रवेश तूर्त अशक्‍य दिसत आहे. 

एनएसजी सदस्य देशांच्या दोन दिवसीय बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. चीनच्या शस्त्र नियंत्रण विभागाचे महासंचालक वांग कुन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या भारतासारख्या देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर कोणतेही एकमत झाले नाही.
ते म्हणाले, की जर एखाद्या देशाला एनएसजीचे सदस्यत्व हवे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्र प्रसारबंदी (एनपीटी) करारावर स्वाक्षरी करणे आवश्‍यक आहे. हा नियम चीनने नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने बनविला आहे. जर या ठिकाणी किंवा पुन्हा एनपीटीच्या प्रश्‍नावर अपवादत्मक स्थितीत परवानगी दिली गेल्यास आंतरराष्ट्रीय प्रसारबंदी एकदम ढासळेल. 
======================================
पिंपरीमध्ये येऊन स्मार्ट सिटी पाहावे- पवार

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचा नियोजनबद्ध विकास झाला आहे. स्मार्ट सिटी कशी असते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराला भेट देऊन पाहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. 24) केले. थेरगाव येथील डांगे चौकात आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ""देशात सध्या स्मार्ट सिटीची जोरदार चर्चा आहे. शहरांचा विकास झाला पाहिजे. यामुळे चांगल्या गोष्टीला आम्ही विरोध करणार नाही. स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने तो झाला नाही. मात्र आम्ही शहराचा नियोजनबद्ध विकास केला आहे. शहराच्या विकासाबाबत जे चांगले काम करतात त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती. मात्र, त्यांनी पिंपरीकडे लक्ष दिले नाही. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीतील विकासाकरिता त्यांनी बाणेरचा रस्ता घेतला आहे. ज्यांचा नियोजनबद्ध विकास झाला आहे, असा परिसर त्यांनी घेतला. त्याऐवजी गंज पेठ, भवानी पेठ, पर्वती येथील रस्त्यांची स्मार्ट सिटीअंतर्गत कामे केली असती तर तुम्हाला मानले असते. कार्यक्रम बालेवाडीला होणार आहे. मात्र बालेवाडी कोणी निर्माण केले, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी निवडणुकीत जाहिरात केली की, कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र, त्यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, मात्र येथील शेतकऱ्यांना डावलून कसे अच्छे दिन येणार? राज्यात तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लहान वयात वीस-बाविसाव्या वर्षी मुली विधवा झाल्या. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे तरीही शेतकरी आत्महत्या का करतात, याचा विचार सरकारने केला पाहिजे. कर्जाच्या जाळ्यात बळिराजा अडकला आहे. दिल्ली व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांत लक्ष दिलेले नाही. संकटाच्या वेळी राज्यकर्त्याने नागरिकांच्या मागे उभे राहिले पाहिजे.‘‘ 
======================================
धुळे जिल्ह्यात अपघातात 17 जणांचा मृत्यू

ट्रॉलाचा टायर फुटल्याने जीपवर उलटला; जीपचा चक्काचूर; पाच जण जखमी 
धुळे - नागपूर- सुरत महामार्गावरील अजंग ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या काटसर (ता. धुळे) येथील आदिवासी वस्तीजवळ आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास 16 चाकी ट्रॉलाचा टायर फुटल्याने तो समोरून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या जीपवरच उलटला. या भीषण अपघातात ट्रॉलाखाली दाबले गेल्याने जीपमधील चालकासह 17 प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य पाच जण जखमी झाले. अपघातस्थळी छिन्न-विछिन्न झालेले मृतदेह, वाहनाचा झालेला चक्काचूर व माहिती मिळताच दाखल झालेले नातेवाइक व ग्रामस्थांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा ठरला. ट्रॉलाचा फुटलेला टायर धुळे तालुक्‍यातील 17 मृतांसाठी जणू काळच ठरला.

शहरातील मोहाडी उपनगरातील रतनसिंग गुरुदाससिंग रंधवा (वय 32) हा त्याच्या ताब्यातील 16 चाकांचा ट्रॉला (एमएच18/एए0978) घेऊन धुळ्याहून जळगावकडे जात होता. तो काटसर शिवारात आला असता ट्रॉलाचा मागचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रॉलावरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी मुकटीहून धुळ्याकडे प्रवासी वाहतूक करणारी जीप (एमएच18/ई 8471) येत होती. नियंत्रण सुटलेला ट्रॉला थेट जीपवर जाऊन उटलला. काही क्षणात झालेल्या या अपघातात जीपमधील महिला-पुरुषांसह 17 जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता, की जीपचा पूर्णतः चक्काचूर झाला. याच वेळी धुळ्याहून मुकटीकडे जाणारी मोटारसायकलही या वाहनांवर आदळल्याने त्यावरील दाम्पत्यही जखमी झाले. 
======================================

No comments: