Friday, 24 June 2016

नमस्कार लाईव्ह २४-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लंडन; ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा
२- 23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज 
३- भारतीय वंशाचे मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात ? 
४- फेसबुकच्या 'व्हीआर व्हिडिओ'वर प्रतिक्रिया शक्‍य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- RelianceJio:अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा! 
६- 'अंतर्गत युद्धामुळे मोदी सरकारसमोर अडचण' 
७- व्हॉट्‌सऍपवरून दिवसाला 10 कोटी कॉल्स 
८- 'ब्रेक्‍झिट'च्या परिणामांसाठी भारत सज्ज- जेटली 
९- रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान 
११- ..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना 
१२- 'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?' - चंद्रकांत खैरे 
१३- अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल 
१४- ब्रेक्झिटचे भारतावर काय परिणाम होणार? 
१५- औरंगाबादमधील 'गीता' वाघिणीचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- चेन्नईत भरदिवसा इन्फोसिसच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या 
१७- पिंपरी-चिंचवड; तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला माजी नगरसेवकाच्या मुलीने चोपलं 
१८- मुलीच्या मदतीने पतीचं कारस्थान : मृणालिनी पाटील 
१९- कोल्हापूर; कॉलगर्लशी प्रेमप्रकरण, लग्नाची ऑफर आणि हत्येचा थरार 
२०- बंगळूरू; भारतीय कंपनीला साडेसहा कोटींचा दंड 
२१- अहमदनगर; चेंबरमध्ये गुदमरून चार शेतकऱ्यांचा मृत्यू 
२२- अंधेरी, वांद्रे, जोगेश्वरीत जोरदार पाऊस 
२३- सोलापूर : गर्भाशयाच्या पिशवीचे चुकीचे आॅपरेशन केल्याने महिलेचा मृत्यू, दोन डॉक्टरांविरूध्द गुन्हा दाखल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- मी लग्नासाठी उतावीळ आहे: सलमान खान 
२५- सोने 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जिंतुरचे भुमिपुञ श्री. शिवप्रसादजी राठी यांची भाजपा उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीत औद्योगिक वसाहत समितिच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!
************************
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 


=======================================

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना
मुंबई राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे भाजपनं विसरु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जातेय. ती वैयक्तीक मतं असू शकत नाही. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.

भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे बोलत आहेत. त्यावरुन त्यांना हे सरकार बुडवायचं आहे हे स्पष्ट होतंय. भाजपची शिवसेनेसोबत राहण्याची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरेंच्या पाठिंब्यावर सरकार चालावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

काल माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.
=======================================

'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?'

'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?'
औरंगाबाद : भाजप प्रवक्ते माधव भंडारींची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत बोलायची औकात नाही. त्यांनी यापुढे उध्दव ठाकरेंविरोधात बोलू नये. शिवसैनिक हा माथेफिरु असतो आणि तो काहीही करु शकतो. तसंच आम्ही कधी किरीट सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का? अशा शब्दात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी माधव भंडारींना आणि भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे.

त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हे मुद्द्यावरचं भांडण गुद्द्यावर येण्याची शक्यता आहे.

माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
=======================================

चेन्नईत भरदिवसा इन्फोसिसच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या

चेन्नईत भरदिवसा इन्फोसिसच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या
चेन्नई चेन्नईतील एका रेल्वे स्थानकावर इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेदरम्यान रेल्वेस्थानकावर गर्दी होती. मात्र, या तरुणीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. शिवाय, जवळपास दोन तास मृतदेह रेल्वेस्थानकावरच पडून होतं. स्वाती असं या मृत तरुणीचं नाव आहे.

ऑफिसला जात असताना हत्या

रोजच्यासारखं कामाला जात असताना तरुणीवर धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, तरुणी इन्फोसिस कंपनीत कामाला असून, ती रोजच्यासारखीच ऑफिसला जात होती. हत्येच्या अगदी काही वेळापूर्वीच तरुणीच्या वडिलांनी तिला ननगंबक्कम स्थानकावर सोडून गेले होते. त्यानंतर आपल्या लोकची वाट पाहात तरुणी स्थानकावर उभी होती. आजूबाजूला अने प्रवासही होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचे वडील केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झाले आहत. चुलाईमेडूच्या दक्षिण गंगई भागात ते राहतात. 24 वर्षीय स्वातीसोबत घडलेली या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.
=======================================

मी लग्नासाठी उतावीळ आहे: सलमान खान

मी लग्नासाठी उतावीळ आहे: सलमान खान
मुंबई: सुपरस्टार सलमान खाननं आपल्या लग्नाबाबत एक जबरदस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी लग्न करण्यासाठी उतावीळ आहे.’ कथित प्रेमिका लुलिया वंतूरसोबत लग्नाच्या प्रश्नाला बगल देत सलमाननं असं उत्तर दिलं आहे.

सलमान म्हणतो की, ‘मला कायमच लग्नबंधनात अडकायचं होतं. पण मला नेहमीच ‘समोरुन होकाराची वाट’ पाहावी लागली.’ 50 वर्षीय सलमान रियालिटी शो सारेगमपा मध्ये ‘सुल्तान’च्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी स्पर्धक जगप्रीत बाजवानं त्याला त्याच्या जीवनसाथीविषयी प्रश्न विचारला.

टीव्ही शोद्वार जारी करण्यात आलेल्या स्टेटमेन्टनुसार सलमान म्हणाला की, ‘जगप्रीत तू चुकीच्या माणसाला निशाणा बनंवलं आहे. मी याबाबतीत नेहमीच गमनशबी राहिलो आहे. पण याबाबतीत माझ्याविषयी लोकांची धारणा फारच चुकीची आहे.’

सलमान मस्करीत म्हणाला की, ‘खरं तर मी लग्नासाठी उतावीळ आहे. पण मला नेहमीच समोरुन होकाराची वाट पाहावी लागते. पुरुषांना याबाबतीत काहीही करावं लागत नाही. महिलाच असतात ज्या सारं काही ठरवतात.’
=======================================

सोने 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग

सोने 1700 तर चांदी 1400 रुपयांनी महाग
मुंबई : ब्रिटन युरोपीयन महासंघातून बाहेर पडल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारासह सोन्याच्या दरावरही झाला आहे. सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे तब्बल 1700 रुपयांची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 96 पैशांनी घसरल्याने ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.


परिणामी सोन्याचे आजची किंमत 31,614 रुपये झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने दोन वर्षांपूर्वीची उच्चांकी पातळी गाठली आहे.
=======================================

तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला माजी नगरसेवकाच्या मुलीने चोपलं

तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला माजी नगरसेवकाच्या मुलीने चोपलं
पिंपरी-चिंचवड : तरुणीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला भाजपचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलीन चोप दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी ही घटना घडली. मात्र फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


एकाच कंपनीत कामाला असलेल्या एका तरुणीचं सहकाऱ्यावर प्रेम होतं. मात्र काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. परंतु तरुणाने तिचा पिच्छा काही सोडला नाही. सार्वजनिक ठिकाणी त्याने संबंधित तरुणीची छेड काढली.


त्यानंतर तरुणीने त्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्याकडे केली. मग दुर्गे आणि त्यांच्या मुलीने तरुणाला चांगलाच चोप दिला. तिथेच उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे.
=======================================

मुलीच्या मदतीने पतीचं कारस्थान : मृणालिनी पाटील

मुलीच्या मदतीने पतीचं कारस्थान : मृणालिनी पाटील
मुंबई : तुला शीना बोरा आणि आरुषीप्रमाणे ठार मारेन, अशी धमकी स्वतःच्या मुलीला दिल्याच्या आरोपामुळे दिग्दर्शिका मृणालिनी पाटील चर्चेत आल्या. मात्र मुलीचे आरोप मृणालिनी पाटील यांनी फेटाळले आहेत. माझ्या 15 वर्षांच्या मुलीच्या मदतीने पतीने कटकारस्थान रचलं, असा दावा मृणालिनी पाटील यांनी केला आहे.


मृणालिनी पाटील यांनी आज एबीपी माझासमोर त्याची बाजू मांडली. एखादी आई आपल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी का देईल?, तसंच मुलीला खोलीमध्ये कोंडून आईला काय मिळणार आहे? असे अनेक प्रश्नही मृणालिनी पाटील यांनी उपस्थित केले.
=======================================

अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल

अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल
मुंबई: उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

तसंच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे ‘हलचल’ सिनेमातील राजपाल यादव आहेत, असा घणाघातही पेडणेकर यांनी केला आहे.

‘मनोगत’ या भाजपच्या पाक्षिकातून काल माधव भंडारी यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली होती.

मोदींनी सिनेट जिंकली, राऊत साहेब तलाक केव्हा घेताय, असं शिर्षक देऊन, भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली.
=======================================

Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!

Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन (RCom) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी फार मोठी गोष्ट घेऊन येणार आहे. अनिल अंबानींची कंपनी ही अवघ्या 93 रुपये 10जीबी 4जी डेटा पॅक देणार आहे.

भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन पुढच्या आठवड्यात जिओ सर्व्हिसच्या अंतर्गत अवघ्या 93 रुपयात 10 जीबी 4जी डेटा देणार आहे. पण ही ऑफर फक्त CDMA ग्राहक आणि काही मर्यादित सर्कल्सकरताच उपलब्ध असणार आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार 10 जीबी डेटा 93 रुपयात मिळेल तर काही राज्यात तो 97 रुपयात मिळेल.

कंपनीनं दूरसंचार विभागाला बुधवारी लिहलेल्या एका पत्रानुसार, कंपनी सुरुवातीला नेटवर्क मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुजरात आणि आंध्रप्रदेश यासारख्या 12 प्रमुख सर्कल्समध्ये सुरु करणार आहे.

=======================================

कॉलगर्लशी प्रेमप्रकरण, लग्नाची ऑफर आणि हत्येचा थरार

कॉलगर्लशी प्रेमप्रकरण, लग्नाची ऑफर आणि हत्येचा थरार
 कोल्हापूर :  कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 48 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. कॉलगर्ल प्रेयसीनं लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिचा खून केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर अक्षय शिंदेला अटक केली आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

मंगळवारी  २१ जूनला सकाळी शिवाजी पुलाच्या पलीकडे आंबेवाडी फाट्यापासून काही अंतरावर पाटील महाराज यांच्या समाधी स्थळ परिसरात गवताच्या शेतात तरुणीचा मृतदेह सापडला होता.  २२ ते २५ वार केल्यामुळे तरुणी जागीच ठार झाली होती.
कॉलगर्लशी प्रेमप्रकरण
याबाबत करवीर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पथके नेमली होती. याच परिसरात लावलेल्या सी.सी.टिव्ही च्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला. पहाटे एका दुचाकीवरुन एक व्यक्ती आणि मुलगी आंबेवाडीच्या दिशेनं गेल्याचं आणि काही वेळानं तोच दुचाकी स्वार एकटाच पर आल्याचं त्या सीसीटीव्हीत कैद झालं. याचसोबत पोलिसांनी समांतर तपासही सुरु केला, त्यात ती मुलगी कॉलगर्ल असल्याचं समोर आलं.
=======================================

ब्रेक्झिटचे भारतावर काय परिणाम होणार?

ब्रेक्झिटचे भारतावर काय परिणाम होणार?
मुंबई: ब्रिटनने जनमत चाचणीद्वारे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ब्रिटन अखेर युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं आहे. सुमारे 51.90 म्हणजेच 52 टक्के लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने म्हणजेच युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याला पसंती दिली.

काय आहे युरोपियन युनियन?
  • 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे.
  • युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकतात आणि तिथं युरो हे एकच चलन वापरलं जातं.
  • 1973 मध्ये ब्रिटननं या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
  • पण बदललेल्या आर्थिक परिस्थितीत, खास करून निर्वासितांचे लोंढे वाढल्यावर युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याच्या मागणीनं ब्रिटनमध्ये जोर धरला आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला, तर त्याचे पडसाद जगभर उमटतील.
=======================================

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा


  • ऑनलाइन लोकमत
    लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी नैतिक पराजय मान्य करत राजीनामा देण्याची घोषणा केली तसेच जनमताचा आदर करत युरोपीय महासंघातून वेगळे होण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल याची हमी दिली.
    कॅमेरून हे तीन महिने पंतप्रधानपदी राहतिल आणि त्यानंतर पायउतार होतील. या काळात ब्रिटनच्या भावी पंतप्रधानाचा निर्णय केला जाईल.
    युरोपीय संघातून बाहेर पडावे अशी स्पष्ट सूचना ब्रिटिश जनतेने केली आहे आणि तिचा आदर ठेवायला हवा असे कॅमेरून म्हणाले. येत्या ऑक्टोबरमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाची परीषद होणार असून त्यावेळी नवा नेता कोण असेल ते जाहीर केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
=======================================

23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज


  • ऑनलाइन लोकमत - 
    लंडन, दि. 24 - यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत. ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान करुन युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 23 जूनची इतिहासात स्वातंत्र्यदिवस म्हणून नोंद होऊ दे असंही ते बोलले आहेत. 
    ब्रिटन आता स्वातंत्र्य होण्याचं स्वप्न मी पाहू शकतो. आपण अनेक देशांशी लढा दिला आहे. मोठ्या राजकारणाला आपण सामोरे गेले आहोत. आपण खोटारडेपणा, भ्रष्टाचार आणि लबाडीशी लढलो आहोत असं नीजेल फारएज बोलले आहेत.
    युरोपियन महासंघात राहावं की नाही ? यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या बाजूने कौल दिला आहे.  हा ऐतिहासिक निकाल असून याचा परिणाम जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर होणार आहे.. ब्रिटनमधील 52 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या म्हणजेच 'Leave'च्या तर 48 टक्के लोकांना राहण्याच्या म्हणजेच 'Remain'च्या बाजूने मत दिल्याचं वृत्त बीबीसने दिलं आहे. सार्वमत चाचणीत 4 कोटी 65 लाख 1 हजार दोनशे 41 (4,65,01,241) म्हणजेच 71.9 टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. ब्रिटनच्या निवडणुकीत 1992 पासून झालेल्या मतदानाचा हा उच्चांक आहे.
=======================================

ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 24 - ब्रिटनने युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा परिणाम बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बाजार उघडल्यानंतर काही मिनिटातंच गुंतवणूकदारांना हा फटका बसला आहे.  सोने आणि चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1700 रुपयांनी वाढला आहे. 
    ब्रेक्झिटमुळे प्री ओपनिंग सेशन म्हणजे बाघार उघडण्याआधीच सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला होता. पाऊंडने 31 वर्षातील निच्चांक गाठला होता. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्सवरही याचा परिणाम झाला असून 1000 अंकांनी गडगडला होता. 26 हजाराच्या खाली सेन्सेक्स आला होता. निफ्टी आणि रुपयामध्येदेखील घसरण झाली होती. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. 
=======================================

भारतीय वंशाचे मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात ?


  • ऑनलाइन लोकमत 
    लंडन, दि. २४ - ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले भारतीय वंशाचे १२ लाख मतदार ब्रेक्झिटच्या विरोधात म्हणजेच ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या विरोधात मतदान करु शकतात. मतदानापूर्वी 'ब्रिटीश इलेक्शन'च्या सर्वेक्षणानुसार भारतीय वंशाच्या ५१.७ टक्के मतदारांनी ब्रेक्झिटच्या विरोधात मत नोंदवले. 
    २७ टक्के मतदार युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूचे होते. १६.८५ टक्के काय करायचे ते माहित नाही या वर्गातील होते. 
    ब्रिटनमध्ये रहाणा-या दक्षिण आशियाई देशाच्या नागरीकांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नागरीकांनीही ब्रेक्झिटच्या विरोधात मत नोंदवले. 
=======================================
भारतीय कंपनीला साडेसहा कोटींचा दंड
-

बंगळूर - ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय त्यांच्या ठावठिकाण्याची (लोकेशन्स) माहिती घेतल्याप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) मोबाईद्वारे जाहिरात करणाऱ्या "इनमोबी‘ या भारतीय कंपनीला नऊ लाख 50 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम सुमारे 6.45 कोटी रुपांपेक्षा अधिक असल्याने कंपनीला चांगलाच फटका बसणार आहे. 
=======================================
'अंतर्गत युद्धामुळे मोदी सरकारसमोर अडचण'

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे अडचणीत असल्याची टीका संयुक्त जनता (जेडीयू) दलाने केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयू नेते पवन वर्मा म्हणाले, "भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत युद्ध सुरु आहे. स्वामी हे त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना ज्यांनी राज्यसभेत पाठविले अशा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना संधी देत आहेत. स्वामी हे अरुण जेटलींवर भडक आणि तावातावाने टीका करत आहेत.‘ तसेच या संघर्षाचा शासनावर परिणाम होत असल्याची टीकाही पवन यांनी केली. "माझा प्रश्‍न आहे की हे सारे पूर्वनियोजित आहे का? असेल तर का? त्याचा परिणाम काय होईल?‘ असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
=======================================
व्हॉट्‌सऍपवरून दिवसाला 10 कोटी कॉल्स

नवी दिल्ली - देशभरात वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्‌सऍप या मेसेजिंग ऍपवरून दिवसाला 10 कोटी कॉल्स केले जात असल्याची माहिती व्हॉट्‌सऍपने ब्लॉगवरून दिली आहे. संपूर्ण जगभरात वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्‌सऍपने नुकतीच फोन कॉल्सची सुविधा यूजर्ससाठी उपलब्ध केली होती.

सुरवातीला अँड्राइड यूजर्ससाठी उपलब्ध असलेली ही सुविधा नंतर आयओएस, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोनधारकांसाठीही उपलब्ध करण्यात आली होती. नुकतेच व्हॉट्‌सऍपच्या अधिकृत ब्लॉगवरून सध्या या सुविधेचा वापर सर्वाधिक होत असून, दिवसाला 10 कोटी फोन कॉल्स होत असल्याची माहिती देण्यात आली. फेसबुकने काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या व्हॉट्‌सऍपवर सध्या फोन कॉल्सची सुविधा मोफत देण्यात येते. तुमच्या इंटरनेटच्या प्लॅननुसार तुम्हाला त्याचा आकार पडत असला, तरी मोबाईलच्या अथवा वाय-फाय इंटरनेटच्या आधारेच ही सुविधा चालते. याऊलट स्काइप आणि व्हायबर या ऍप्लिकेशन्सच्या याच सुविधेसाठी पैसे मोजावे लागत असल्याने यूजर्सनी व्हॉट्‌सऍप फोन कॉल्सना पसंती दर्शविली आहे. 
=======================================
फेसबुकच्या 'व्हीआर व्हिडिओ'वर प्रतिक्रिया शक्‍य

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - सातत्याने नावीन्याचे प्रयोग करत युजर्सना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या फेसबुकने आता व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर) व्हिडिओजवर इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया र्आणि त्यातून परस्परांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.



व्हर्च्युअल रिऍलिटीची अनुभूती देणाऱ्या व्हिडिओदरम्यान युजरला इमोजीद्वारे प्रतिक्रिया देता येणार आहे. सध्या फेसबुकवरील फोटोवर किंवा पोस्टवर सहा प्रकारच्या इमोजींच्या माध्यमातून प्रतिक्रिया देता येते. या सर्व इमोजींचा उपयोग या व्हिडिओसाठी करता येणार आहे. तसेच इतर युजर्सनी त्या व्हिडिओवरील दिलेल्या प्रतिक्रिया व्हिडिओ पाहताना किंवा अनुभवताना दिसू शकेल. व्हिडिओ सुरू असताना व्हिडिओच्या स्क्रिनवर इमोजीचा पर्याय दिसेल आणि प्रतिक्रियांही दिसू शकतील. या सुविधेमुळे अशा व्हिडिओ दरम्यान इतर युजर्सशी संवाद साधता येईल, असा दावा ऑक्‍युलस या फेसबुकच्या मालकीच्या व्हर्च्युअल रिऍलिटी कंपनीने केला आहे. ही सुविधा सॅमसंगच्या व्हर्च्युअल रिऍलिटी गॉगलच्या माध्यमातून वापरता येणार आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांचा फेसबुकसाठी व्हर्च्युअल रिऍलिटी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी फेसबुकने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी काळात या तंत्रामुळे मोठी तंत्र क्रांती होईल, असा विश्‍वास झुकेरबर्ग यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

कशी घेतात व्हर्च्युअल रिऍलिटीची अनुभूती? 
‘व्हर्च्युअल रिऍलिटी‘ची अनुभूती घेण्यासाठी प्रथम डोळे आणि कानांना सामावून घेणारे आणि संगणकाला जोडलेले गॉगलप्रमाणे दिसणारे उपकरण परिधान करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या जगात प्रवेश केल्याचा अनुभव येईल. त्यामध्ये तुमची नजर जशी फिरेल तसा समोरच्या व्हिडिओतील दृश्‍ये बदलतील. तुमच्या मित्राने शेअर केलेल्या धबधब्याच्या फोटोमध्ये तुम्ही प्रवेश करून वरच्या दिशेला पाहिलेत तर आकाश दिसेल तर खालच्या दिशेला पाहिलेत तर पाणी वाहताना किंवा जमिनीवरील इतर दृश्‍य दिसेल.
=======================================
चेंबरमध्ये गुदमरून चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अहमदनगर : पाणी शेतासाठी घेण्याकरीता धडपडणारे चार शेतकरी ड्रेनेज पापइलाइनमध्ये अडकल्याने त्यांचा गुदमरून मुत्यू झाला. शिर्डी येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

सखाराम बाबुराव शिंदे, नवनाथ भाऊसाहेब शेळके, मारूती अण्णासाहेब निमदर, आनंदा गोपीनाथ मोरे अशी मृतांची नावे आहेत. दुष्काळाचा दाह आणि नंतर लांबलेला पाऊस अशा दुहेरी अडचणींमुळे शेतकरी कोणत्या तरी मार्गांनी शेतीला पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 शिर्डी नगरपंचायतीच्या चेंबरमधील पाणी शेतासाठी घेण्याकरीता सखाराम बाबुराव शिंदे, नवनाथ भाऊसाहेब शेळके हे चेंबरमध्ये उतरले. वाहते पाणी अडवून वीजपंपाद्वारे ते शेतीसाठी वापरण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. मात्र, ते लवकर वर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी रहिवासी मारुती अण्णासाहेब निमदर आणि शेतमजूर आनंदा गोपीनाथ मोरे हे दोघे खाली उतरले. 

शेळके व शिंदे दोघे चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या मदतीसाठी गेलेल्या निमदर आणि मोरे यांनाही चेंबरमध्ये गुदमरून प्राण गमवावे लागले. प्रशासनाकडून जेसीबीच्या साह्याने पाइप तोडून मृत कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 
=======================================
'ब्रेक्‍झिट'च्या परिणामांसाठी भारत सज्ज- जेटली

नवी दिल्ली - "ब्रेक्‍झिट‘मुळे काही काळासाठी निर्माण झालेल्या अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सज्ज असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केल्या आहेत.

युरोपियन महासंघातील (ईयू) सदस्य सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात 52 टक्के नागरिकांनी अनुकूलता दर्शविल्याने आता ब्रिटन ईयूमधून बाहेर पडणार आहे. या घटनेमुळे आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था "ब्रेक्‍झिट‘च्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. "देशात पुरेशी परकीय गंगाजळी असून केंद्र आणि रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) "ब्रेक्‍झिट‘मुळे काही काळासाठी निर्माण झालेल्या अस्थिरतेचा योग्य सामना करण्यासाठी सक्षम आहेत‘, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त केला आहे. 
=======================================
औरंगाबादमधील 'गीता' वाघिणीचा मृत्यू

औरंगाबाद - येथील सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील ‘गीता‘ नावाच्या 18 वर्षांच्या वाघिणीचा आज (शुक्रवार) सकाळी मृत्यु झाला.

सिद्धार्थ उद्यानातील "गीता‘ नावाची वाघिण गेल्या काही दिवसांपासून वय झाल्याने आजारी होती. दरम्यान आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यु झाला. गीताच्या मृत्युमुळे आता सिद्धार्थ उद्यानात सचिन आणि राणी असे दोन पांढरे वाघ शिल्लक राहिले आहेत. गीताच्या मृत्युमुळे औरंगाबादवासियांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

=======================================
रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सावरला

मुंबई - युरोपियन महासंघातील (ईयू) सदस्यात्वाबाबत घेण्यात आलेल्या सार्वमत चाचणीचा भारताच्या चलनविनिमय बाजारावर परिणाम दिसून आले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 66 पैशांच्या घसरणीसह 67.91 रुपये पातळीवर उघडला.

रुपयाने 1 मार्च 2016 नंतर सर्वांत नीचांकी पातळी गाठली आहे. परंतु त्यावर उपाययोजना म्हणून रिझर्व्ह बॅंकेने डॉलरची विक्री केली. परिणामी रुपयाचे मूल्य 87 पैशांनी वाढून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 68.11 रुपयांवर पोचले आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांच्या वाढीसह 67.24 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला होता. ब्रेक्‍झिटमुळे चलनविनिमय बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला रुपयाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक्‍झिटचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम 
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत तीव्र घसरण
  • भारतातील सोन्याच्या भावात 5.54 टक्‍क्‍यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 31,670 रुपयांवर पोचला आहे.
  • भारतातील चांदीच्या भावात 3.18 टक्‍क्‍यांनी घसरून प्रतिकिलो 42,543 पोचला आहे.
=======================================


 मुंबई :- काल मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत सहकार औद्योगिक वसाहत समितिच्या प्रमुखपदी माझी निवड करण्यात आली...!




पक्षाने दाखवलेला विश्वासाबद्दल मि भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष श्री प्रदिपजी पेशकार, मा.मुख्यमंत्री देवेद्रजी फडणविस, प्रदेशअध्यक्ष रावसाहेबजी पाटिल दाणवे, उद्योग राज्यमंञी प्रविणजी पोटे,  यांचे आभार मानतो...!

यावेळी मा.उद्योग राज्यमंञी मा.ना.श्री. प्रविणजी पोटे, भाजपाचे प्रदेश संघटन महामंञी रविजी भुसारी, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष मा.श्री. प्रदिपजी पेशकार व सर्व उद्योग आघाडीचे सर्व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते

जिंतुरचे भुमिपुञ श्री. शिवप्रसादजी राठी यांची भाजपा उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीत औद्योगिक वसाहत समितिच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!

यावेळी उद्योग राज्यमंञी मा.ना.श्री.  प्रविणजी पोटे, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष श्री प्रदिपजी पेशकार, कँमलिन कंपनिचे संचालक श्री श्रीरामजी दांडेकर व सर्व उद्योग आघाडीचे प्रदेश कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते...!!

पुढिल राजकिय वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा


💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments: