Wednesday, 15 June 2016

नमस्कार लाईव्ह १५-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी
२- व्हॅनहॅटूमध्ये ६.२ रेक्टरस्केलचा भुकंप 
३- वॉशिंग्टन; ओरलँडोचा हल्लेखोर ओमर मतीन होता समलैंगिक  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- मला फिट घोषित करण्याचा ईडीचा घाट: छगन भुजबळ 
५- फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू ताजमहालच्या प्रेमात 
६- मुझफ्फरनगर; कैराना स्थलांतरप्रकरणी भाजपची कोलांटउडी 
७- पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात अफ्रिकन देशांचा दौरा करणार. 
८- जम्मूमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोबाईल सेवा बंद  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- लॉटरी घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी आरोप फेटाळाले 
१०- जम्मूमध्ये राडा, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड 
११- दिघावासियांना आता सुप्रीम कोर्टाकडून आशा, याचिकेवर आज सुनावणी 
१२- बॅट क्रिकेटसाठी, हाणामारीसाठी नाही, कोर्टाने दरडावलं 
१३- गीरमध्ये २०० नव्या डरकाळ्या, १०० सिंहीणींना गर्भधारणा 
१३- मंत्रालयात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
१५- विक्रोळी; फी वाढीबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांना कोंडले 
१६- देशात प्लास्टिक मनीच्या वापरात लक्षणीय वाढ 
१७- विनाअनुदानित शाळांना 20 टक्के वेतन अनुदान 
१८- मोसमी पाऊस रविवारपर्यंत राज्यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- नांदेड; बैल बनून मुलांनी खांद्यावर घेतला नांगर 
२०- अहमदनगर; पुत्रप्राप्तीचा प्रसार केल्याबद्दल बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा 
२१- पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 
२२- बेळगाव; व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बिझनेस, इंजिनिअर तरुणांनं लढवली अनोखी शक्कल 
२३- रायगड परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरुच, महाडमध्ये तीन फ्लॅटमध्ये चोरी 
२४- अहमदाबाद; रमजान महिन्यात अंजुमन-ए-इस्लाममध्ये योगाचे धडे 
२५- गुवाहाटी; अधिकाऱ्याच्या घरी सापडले वाघाचे कातडे, 2 कोटी 
२६- पंजाबमधल्या मोगा इथं छत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- लंडन; चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची द. कोरियावर मात 
२८- सलमान-अनुष्काचे ठुमके, 'सुलतान'मधील 440 व्हॉल्ट्स रिलीज 
२९- जॅकी चॅनचा 'बल्ले बल्ले' डान्स 
३०- कठीण परिस्थितीत सचिनपेक्षा विराट महान-इम्रान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- जि.प. अंतर्गत बदल्यांची माहिती आयुक्तांनी मागविली; स्थगिती येण्याच्या शक्यतेने शिक्षकांत खळबळ 
३२- सिंहस्थ पर्वणीनिमित्त शाहीस्नानाने गोदाकाठी गर्दी 
३३- हक्काच्या मागण्यासाठी अपंगांचे उपोषण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 
३४- वनीकरण विभागाच्या माध्यमातून होणार सहा लाख वृक्ष लागवड 
३५- बारूळ; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानीला वैतागून ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
बालाजी कोल्हे, कालिदास अनंतोजी, पंजाब चव्हाण, गोविंद बियाणी, राजेश ठाकूर, प्रवीण कुंभोजवार, बसवंत हाडोळे, अनिल कडबे, अतिश गायकवाड, बालाजी गिरी, चंद्रमणी कांबळे, मोहसीन सौदागर, सत्या पांचाळ, रविराज सूर्यवंशी, शंकर मोरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

====================================

सलाम तुमच्या जिद्दीला... बैल बनून मुलांनी खांद्यावर घेतला नांगर!

सलाम तुमच्या जिद्दीला...  बैल बनून मुलांनी खांद्यावर घेतला नांगर!
नांदेड: नांदेडच्या होनवजड गावातल्या अनुसयाबाईंनी पतीच्या निधनानंतरही हार न मानता आपल्या शेतात पेरणी करायला घेतली आहे. हलाखीची परिस्थिती असलेल्या अनुसयाबाईंकडे नांगरायला बैलही नव्हते. मग काय त्यांची दोन मुलंच या काळया मातीसाठी राबायला तयार झाले.

नांदेडची मदर इंडिया… होय… मदर इंडियाच… होनवजड गावातल्या उदगीरवाड कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला. कर्ज झालं होतं डोक्यावर, धन्यानं जीव दिला, मागे बायको, पोरं टाकून. पण म्हणून अनुसयाबाई खचल्या नाहीत.

पहिलं वर्ष मजुरीत गेलं. पण यंदा त्या आपल्याच शेतात पेरत्या झाल्या. पण पहिली अडचण आली. नांगरायला बैल कुठून आणायचे? पोरंच बैलं झाली आणि अनुसयाबाईंनी नांगर हाती धरला. बेण्यागणिक आईचा जीव तीळतीळ तुटत होता. पण मदतीला कुणीच आलं नाही.

कर्जाच्या विवंचनेतून आयुष्य संपवण्याचा विचारात असलेल्या, खचलेल्या बापांना या माईनं आपल्या कर्तृत्वातून संदेश दिला आहे. पेरलेलं उगवायलाही जमीन फोडून बाहेर पडण्याची धमक लागते. तीच धमक अनुसयाबाईंमध्ये होती. म्हणून यंदा त्यांचं पीकही जोमानं येणार यात शंका नाही.
====================================

पुत्रप्राप्तीचा प्रसार केल्याबद्दल बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा

बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा
अहमदनगर : लेखक बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार केल्याने, प्रकाशक आणि तांबेंविरोधात प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हा गुन्हा सिद्ध झाल्यास बालाजी तांबेंसह प्रकाशकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.


सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सांकडे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते.
====================================

लॉटरी घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी आरोप फेटाळाले

लॉटरी घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी आरोप फेटाळाले
मुंबई : लॉटरी घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण राज्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नसल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

एकच निविदा आल्यानं मंजुरी

सध्या जयंत पाटील अमेरिकेत असून एका पत्रकाद्वारे एबीपी माझाकडे त्यांनी हा स्पष्टीकरण दिलं आहे. दोन अंकी लॉटरीसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र एकच निविदा आल्यानं ती मंजूर करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
====================================

जम्मूमध्ये राडा, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड

जम्मूमध्ये राडा, वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड
जानीपूर (जम्मूकाश्मीर) : जम्मूच्या जानीपूरमध्ये काल रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी एका गटानं थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली.

या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन आणि इंटरनेवर वापरावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

धार्मिक स्थळात प्रवेश केल्यावरुन एका युवकाला काही जणांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानं भडका उडाला आणि हा राडा झाला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.

तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करत पेटवून दिली. तब्बल सात तास आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही धुमश्चक्री सुरु होती. यावेळी वार्तांकन करायला आलेले सात पत्रकारही या घटनेत जखमी झाले आहेत.
====================================

दिघावासियांना आता सुप्रीम कोर्टाकडून आशा, याचिकेवर आज सुनावणी

दिघावासियांना आता सुप्रीम कोर्टाकडून आशा, याचिकेवर आज सुनावणी
नवी मुंबई दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पावसाळ्यात दिघ्यातील कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका एमआयडीसीनं केली होती. मात्र हायकोर्टानं एमआयडीसीची याचिका फेटाळली. त्यामुळं दिघावासियांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहेत.

जर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर दिघावासियांना ऐन पावसाळ्यात बेघर व्हावं लागणार आहे.
====================================

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची द. कोरियावर मात

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची द. कोरियावर मात
लंडन : लंडनमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतानं कोरियावर 2-1 असा विजय मिळवला आहे. भारताने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या सामन्यात एस. सुनिलनं 39 व्या मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. सामना संपायला तीन मिनिटं शिल्लक असताना किम युहूननं गोल डागून कोरियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण तीस सेकंदानंतरच निकिन थिमय्यानं गोल झळकावून भारताचा 2-1 असा विजय निश्चित केला.

कोरियावरील या विजयामुळे भारतानं 36 व्या हिरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत गुरुवारी भारताचा सामना होणार आहे.
====================================

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं पैशासाठी केलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. चमेली अमित गुटाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.

चमेली स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर होती. 2015 मध्ये अमित गुटाळशी तिचा विवाह झाला. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी, माहेरुन पैसे आणावेत अशी मागणी अमितनं केली. त्यासाठी त्यानं चमेलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.


अमित पैशांसाठी चमेलीकडे तगादा लावायचा, त्याचप्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशयही घ्यायचा, असा आरोप होत आहे. चमेलीच्या आत्महत्येनंतर तिच्या भावानं सहकारनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर चमेलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अमित गुटाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
====================================

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बिझनेस, इंजिनिअर तरुणांनं लढवली अनोखी शक्कल

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बिझनेस, इंजिनिअर तरुणांनं लढवली अनोखी शक्कल
बेळगाव: बेळगावातल्या कुमेल बरफवाला या तरुणानं व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून भाजीपाला आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या कुमेलनं अवघ्या चार महिन्यांत या व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलं आहे.

व्हॉटस्अॅपवरुन ताजी भाजी घरपोच मिळत असल्यानं ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे.

कुमेल बरफवाला या मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या तरुणाने व्हाटसअॅपच्या माध्यमातून भाजी आणि फळे विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

कुमेलच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित व्यवसाय कोल्ड स्टोरेजचा आणि तो पेशानं इंजिनियर. पण त्याने सोशल मीडियाचा खुबीनं वापर करून भाजी आणि फळं विक्रीचा व्यवसाय सुरु केला. व्हाटसअॅप त्याने कॉम्प्युटरला जोडलं असून त्या व्हाटसअॅप क्रमांकावर ग्राहक आपल्याला आवश्यक असलेल्या भाजीची ऑर्डर देतात.

ऑर्डर आल्यावर त्याप्रमाणे भाजी एका ट्रेमध्ये भरली जाते आणि नंतर भाजी ग्राहकाला घरपोच केली जाते. बाजारातल्या भाजी इतकाच त्याचा दर असून ग्राहकाला ताजी आणि घरपोच भाजी मिळते. ताजी भाजी आणि फळं ग्राहकांना घरपोच दिल्यानं चार महिन्याच्या काळातच कुमेलने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
====================================

बॅट क्रिकेटसाठी, हाणामारीसाठी नाही, कोर्टाने दरडावलं

बॅट क्रिकेटसाठी, हाणामारीसाठी नाही, कोर्टाने दरडावलं
मुंबई : बॅट ही क्रिकेट खेळण्यासाठी आहे, हाणामारी करण्यासाठी नाही, असे मुंबई हायकोर्टाने दोन गटातील हाणामारी प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान निक्षून सांगितलं. हाणामारी करणाऱ्यांना सेवाभावी संस्थेला मदत करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मानखुर्द येथे गेल्या वर्षी 9 जानेवारीला क्रिकेट मॅच खेळताना वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली. काही तरुणांनी एकमेकांना बॅटने मारलं. यात 4 तरुण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटातील तरूणांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. नंतर या दोन्ही गटातील वाद सामोपचराने मिटला. त्यामुळे पोलीस तक्रार झालेल्या 15 तरुणांनी ही तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ‘बॅट ही क्रिकेट खेळण्यासाठी असून हाणामारीसाठी नाही’ असं मत व्यक्त केलं. बॅटने हाणामारी करणाऱ्यांचा गुन्हा विनंती केल्यावर तात्काळ रद्द केल्यास, समाजात चुकीचा संदेश जाईल.

भविष्यात बॅटने अशाप्रकारे हाणामारी करणार नाही, यासाठी याचिकाकर्त्यांनी सेवाभावी संस्था अथवा पोलीस कल्याण मंडळाला निधी द्यावा व त्याची माहिती न्यायालयाला द्यावी. त्यानंतरच तक्रार रद्द केली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी येत्या 25 जूनपर्यंत पुढे ढकलली.
====================================

मला फिट घोषित करण्याचा ईडीचा घाट: छगन भुजबळ

मला फिट घोषित करण्याचा ईडीचा घाट: छगन भुजबळ
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीद्वारे सादर केलेला मेडिकल रिपोर्ट माझा नसून इतरांचा, मेडिकल रिपोर्ट सादर करुन मला फीट घोषित करण्यात येत आहे. असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भुजबळांच्या मेडीकल तपासणीसाठी जेजे रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पॅनल तयार केलं आहे. मात्र, या डॉक्टरांकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जन्मतारीख, एक्स रे रिपोर्टवरची तारीख, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची वेळ ही संपूर्ण माहिती चुकीची असल्याचं भुजबळ यांचे वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात म्हटलं आहे.

यावर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयानं गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून पुढील कारवाई गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
====================================

सलमान-अनुष्काचे ठुमके, 'सुलतान'मधील 440 व्हॉल्ट्स रिलीज

सलमान-अनुष्काचे ठुमके, 'सुलतान'मधील 440 व्हॉल्ट्स रिलीज
मुंबई : ‘बेबी को बास पसंद है’ गाण्यातून चाहत्यांना ठेका धरायला लावल्यानंतर आणि ‘जग घुमेया’मधून मन हेलावून टाकल्यानंतर सलमानच्या आगामी सुलतान चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. 440 व्हॉल्ट्स या पेपी साँगमध्ये सलमानसह अनुष्का ठुमके लगावताना दिसत आहेत.

440 व्हॉल्ट्स गाण्यात सुलतान अली म्हणजेच सलमान, आर्फा अर्थात अनुष्काचं मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. सलमानच्या सिग्नेचर डान्स स्टेप्समुळे चाहते फिदा आहेत. चमचमतं जॅकेट आणि धोतर अशा अनोख्या स्टाईलमध्ये सल्लूमियानेही फॅन्सना खुश केलं आहे.

मिका सिंगच्या आवाजात हे गाणं ऐकायला मिळणार आहे. गीतकार इर्षाद कमिलच्या शब्दांना विशाल-शेखरने संगीतबद्ध केलं आहे. सलमानने ट्विटरवरुन हे गाणं शेअर केलं आहे.
====================================

फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू ताजमहालच्या प्रेमात

फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू ताजमहालच्या प्रेमात
नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू आणि स्पेनचे रिअल मेड्रीट क्लबचे प्रशिक्षक जिनोदीन जिदान सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांनी आपल्या पत्नीसोबत ताजमहालची सफर केली. या सफरीमध्ये ते ताजमहालचे सौंदर्य पाहून आवाक झाले होते.

ताजमहालच्या सौंदर्याचे त्यांनी यावेळी मुक्त कंठाने कौतूक केले. ताजमहालचे सौंदर्य सर्वांना आपल्याकडे खेचून आणते, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी आपल्या पत्नीसोबत फोटोसेशनही केले. जिदान ताजमहाल पाहाण्यासाठी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
====================================

रायगड परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरुच, महाडमध्ये तीन फ्लॅटमध्ये चोरी

रायगड परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरुच, महाडमध्ये तीन फ्लॅटमध्ये चोरी
अलिबाग: गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडात चोऱ्यांचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतं आहे. जिल्ह्यातल्या महाड, अलिबाग, मुरुड इथं एकाच दिवशी चोऱ्या झाल्या असून हजारोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

महाड शहरातल्या एकाच इमारतीतल्या एकाच मजल्यावरील तीन फ्लॅटसमध्ये चोरी झाली. तर अलिबाग आणि मुरुडमध्येही घरफोड्या करण्यात आल्या.

अलिबाग तालुक्यातील काविर येथील वैशाली पाटील या बाहेरगावी गेल्या असताना त्यांच्या  घराची कडी तोडून चोरी करण्यात आली. यामध्ये पाटील यांच्या घरातून सुमारे ४१ हजार रुपये रोख रक्कम आणि २० हजारांचे दागिने चोरण्यात आले आहेत.

तसेच, मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील राजेश साधू यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून सुमारे ६७ हजार रुपयांच्या दागिन्याची चोरी केली आहे.
====================================

गीरमध्ये २०० नव्या डरकाळ्या, १०० सिंहीणींना गर्भधारणा

गीरमध्ये २०० नव्या डरकाळ्या, १०० सिंहीणींना गर्भधारणा
मुंबई : गीरच्या अभयारण्यात तब्बल शंभर सिंहीणी गर्भवती असल्याचे वृत्त समोर आल्याने वनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गीर अभयारण्यामधील एसीएफ नवल अपारनाथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीर अभयाण्यात १२५ सिंहीणी आहेत. यापैकी शंभर सिंहीणी गर्भवती आहेत. यामुळे गीर अभयारण्यातील सिंहांच्या संख्येत वाढ होणार आहे.

एक सिंहीणी या २ ते ४ छाव्यांना जन्म देते. त्यामुळे आगामी काळात गीरमधील सिंहांच्या संख्येत २०० ते ४०० ने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०१० मधील गणनेनुसार गीरमध्ये ४११ सिंहांची संख्या होती. त्यानंतर २०१५ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गीरमधील सिंहांच्या संख्येत वाढ होऊन ५२३ झाली होती. सध्या या अभयारण्यात ७०० सिंहांची संख्या आहे.

वन आधिकाऱ्यांच्या मते प्रत्येक ६ सिंहीणींमागे ५ गर्भवती आहेत. त्यानुसार १२५ सिंहीणीपैकी शंभर सिंहीणी गर्भवती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सिंहीणीच्या प्रसूतीचा काळ जवळ आला असल्याने १६ जून ते १६ ऑक्टोंबर दरम्यान पर्यटकांना गीर अभयारण्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
====================================

ओरलँडोचा हल्लेखोर ओमर मतीन होता समलैंगिक ?


  • ऑनलाइन लोकमत - 
    वॉशिंग्टन, दि. 15 - फ्लोरिडा येथील ओरलँडो शहरात समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून 50 जणांना ठार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलैंगिक होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राग आणि लाजेखातर त्याने आपली ओळख लपवून ठेवली होती अशी शंका ओमरचे मित्र आणि पत्नीने व्यक्त केली आहे. 
    ओमर मतीनचा त्याची पत्नी सितोरा युसुफीसोबत घटस्फोट झाला होता. ओमर समलैंगिक असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असा दावा सितोरा युसुफीने केला आहे. विशेष म्हणजे ओमर नेहमी या समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये अशी माहिती क्लबमधील काही लोकांनी दिली आहे. 
    ओमरचे वडील त्याला समलैंगिकच म्हणत असत अशी माहिती सितोरा युसुफीने दिली आहे. ओमर गे-डेटिंग अॅपचादेखील वापर करत होता अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा सध्या तपास करत असून तो किती वेळा नाइट क्लबला गेला होता ? तसंच अॅपचा वापर करत होता की नव्हता ? याचा तपास करत आहे. ओमर आणि माझी ओळख 2008 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये आम्ही लग्न केलं अशी माहिती सितोरा युसुफीने दिली आहे. 
====================================

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची ISISला धमकी


  • ऑनलाइन लोकमत 
    वॉशिंग्टन, दि. 15 - 'इराक आणि सिरियामधून इसीसचं अस्तित्व कमी होत असून परदेशी हल्लेखोर या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याचं प्रमाणही कमी झाल्याचा', दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. 'इसीस आपली जमीन गमावत आहेत. सोबतच या दहशतवादी संघटनेला जिवंत ठेवण्याचा महत्वाचा वाटा असलेला पैसा मिळणंही बंद झालं असल्याचं', बराक ओबामा बोलले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना बराक ओबामा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
    'आपण त्यांच्या तेलसाठ्यांच्या ठिकाणावर केलेल्या हल्ल्यांमुळे महिन्यामागे त्यांना मिळणारा लाखो डॉलर्सचा महसूल आपण रोखला आहे. पैसे ठेवण्याची त्यांची ठिकाणंही आपण उद्ध्वस्त केली आहेत, ज्यांमुळे त्यांच आर्थिक नुकसान वाढलं असल्याचंही', बराम ओबामा बोलले आहेत.' इसीसला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणारी आर्थिक मदतही मिळणं बंद झाली असल्याचा', दावा बराक ओबामांनी केला आहे. 
====================================

जॅकी चॅनचा 'बल्ले बल्ले' डान्स


  • ऑनलाइन लोकमत - 
    शांघाई, दि. 15 -  अॅक्शन स्टार जॅकी चॅनला अॅक्शन करताना तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल पण तुम्ही त्याला कधी नाचताना पाहिलय का ? नाही ना...पण नुकतच एका कार्यक्रमात जॅकी चॅनने पंजाबी गाण्यावर डान्स केला. जॅकी चॅनला यावेळी साथ दिली ती अभिनेता सोनू सुदने. 19व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या दरम्यान गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने फुल्ल ऑन डान्स करत धम्माल उडवून दिली. 
    अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोनू सूद सध्या जॅकी चॅनसोबत ' कुंग-फू-योगा' चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचं शुटिंग अद्याप सुरु आहे. जॅकी चॅन मार्चमध्ये शुटिंगसाठी भारतातदेखील आला होता. 'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.
  • विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास ' आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार असून आता जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण फक्त भारतात नव्हे तर चीन आणि इर देशांमध्येही होणार आहे. या गाण्यात जॅकी कुर्ता, धोती आणि मोजडी या पारंपारिक भारतीय वेशातही दिसणार आहे.  
====================================

मंत्रालयात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न


  • मुंबई : सतत पाठपुरावा करूनही कामे होत नसल्याने वैतागलेल्या तिघा जणांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस साधून मंगळवारी मंत्रालयात आलेल्या तीन जणांनी मुख्यमंत्र्यांचे दालन असलेल्या सहाव्या मजल्यावर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्री आपल्या दालनात होते. औरंगाबाद येथील शेतकरी दिलीप मोरे यांच्या भावाची २०११ मध्ये हत्या झाली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी त्याची आत्महत्या म्हणून नोंद केली होती. त्याविरोधात मोरे सतत मंत्रालयात चकरा मारत होते. आजही ते याच कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी आत न सोडल्यामुळे मोरे यांनी बाटलीतून आणलेल्या विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मोरेना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाल्याने ते बेशुद्ध होऊन खुर्चीतून खाली पडले. काही मिनिटांच्या फरकाने दुसरी घटना घडली. गेली वर्षभर पाठपुरावा कॅनही आपले काम होत नसल्याने वैतागलेले मुलुंड येथिल दिनेश पिडयाळ या युवकाने मुख्यमंत्री दालनातच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. जळगावचा हिरालाल प्रभाकर ढाकणे शिष्यवृत्ती मिळत नसल्याची तक्रार घेऊन मुख्यमंत्री कार्यालयात आला होता. मात्र त्याचीही निराशा झाल्याने त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. 
====================================

फी वाढीबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांना कोंडले


  • मुंबई : शाळेच्या फी वाढी विरोधातील पालकांच्या आंदोलनाबाबत संस्थाचालकाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या दोघा पत्रकारांना चक्क काहीकाळ खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार मंगळवारी घडला. विक्रोळी येथील अभय इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही घटना घडली. मात्र त्यांचे गांभीर्य लक्षात येताच चालकांनी दोघाची सुटका करुन माफीनामा मागित लोटांगण घातले.
    अभय इंटरनॅशनल शाळेत फी वाढीविरोधात पालकांचे सुरू असलेले आंदोलन कव्हर करण्यासाठी दोन मराठी वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी गेले होते. पालकांची मागणी समजून घेतल्यानंतर ते शाळाचालकांची भूमिका जाणून घेण्यासाठी शाळेत गेले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी एका खोलीत बराच वेळ बसवून ठेवले. त्यानंतर दरवाजा बाहेरुन बंद केला. या प्रकाराची कल्पना येताच त्यांनी अन्य पत्रकार व पोलिसांना त्याबाबत कळविले. अन्य पत्रकार त्याठिकाणी आल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना सोडून दिले. 
====================================

देशात प्लास्टिक मनीच्या वापरात लक्षणीय वाढ!


  • मुंबई : देशात डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली असून, रोखीने होणाऱ्या व्यवहारात झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. प्लास्टिक मनीच्या वाढत्या वापरामुळे व्यवहार खर्चात बचत होत असतानाच, काळ््या पैशांचे व्यवहारातील प्रमाणही कमी होण्यास फायदा होत आहे.
    रिझर्व्ह बँकेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात होणाऱ्या वित्तीय व्यवहारात कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण २०१३ च्या ३० टक्क्यांच्या तुलनेत, २०१५ मध्ये ४१ टक्क्यांवर पोहोचले असून, यामध्ये वर्षाकाठी २४.९ टक्क्यांची सरासरी वाढ होताना दिसत आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, यामुळे कार्डांवरून होणाऱ्या व्यवहारांच्या संख्येतही मोठी वाढ नोंदली गेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१२ मध्ये देशातील डेबिट आणि क्रेडिट कार्डांची एकत्रित संख्या ही ३३ कोटी ३७ लाख इतकी होती, तर २०१५ मध्ये दोन्ही कार्डांच्या एकत्रित आकडेवारीने ५२ कोटी ९० लाख कार्डांचा टप्पा पार केला आहे. कार्डांच्या या संख्येत वाढ होण्यामागचे प्रमुख कारण हे ‘जन-धन’ योजनेचा वेगाने झालेला प्रसार हेदेखील आहे. या योजनेंतर्गत बँक खाते सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस डेबिट कार्ड देण्यात आलेले आहे.
    कार्डाच्या वापरासंदर्भात आलेली माहितीदेखील महत्त्वपूर्ण आहे. कारण लोकांनी कार्डाच्या माध्यमातून पैसे काढून ते खर्च करण्याऐवजी कार्डावरून खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. ही खरेदी ‘पॉइंट आॅफ सेल’ मशिनच्या माध्यमातून होते. या मशिनची संख्या वाढत असल्याचा मोठा फायदा झाला आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारासाठी बऱ्याच प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्यामुळे रोखीने होणाऱ्या व्यवहारांना पायबंद घालण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी एटीएम मशिनमधून काढण्यात येणाऱ्या पैशांच्या व्यवहाराला मर्यादा घातली आहे, तर लोकांनी थेट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार करावे, याकरिता कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारावरील व्यवहार शुल्क सरकारने रद्द केल्यामुळे कार्डांचा वापर वाढताना दिसत आहे. उदाहरणाने सांगायचे, तर एखाद्या रोखीने होणाऱ्या व्यवहाराला जर २० रुपये खर्च येत असेल, तर थेट कार्डाच्या माध्यमातून होणाऱ्या त्याच व्यवहारासाठी ८ ६ ते ८८ रुपये खर्च होत असल्याचे दिसून आले आहे.
====================================
रमजान महिन्यात अंजुमन-ए-इस्लाममध्ये योगाचे धडे

अहमदाबाद - ‘योग‘ म्हणजे कुठल्याही विशिष्ट धर्माची मक्तेदारी नसून, प्रत्येकानेच योगाभ्यास केला पाहिजे असा संदेशच जणू येथील अंजुमन-ए-इस्लाम शाळेमधील विद्यार्थी जगाला देत आहेत. जागतिक योग दिन जवळ येत असतानाच हे विद्यार्थी रमजान महिन्यातदेखील दररोज किमान ३० मिनिटे योगाभ्यास करत आहेत.

"योगाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच ठावूक आहेत. ‘योग‘ कुठल्याही धर्माशी निगडित नसून प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीला योगाभ्यास करण्याची मुभा आहे. रमजानचे रोजे सुरु असताना आम्ही दिवसभरात पाण्याचा घोटही घेत नाही, त्यामुळे आमच्या शरीरावर साहजिकच बराच ताण येतो. दररोज योगाभ्यास केल्याने रमजान महिन्यातील उपवासाचे दिवस आमच्यासाठी सुकर होतात." असे या शाळेतील नमीरा या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे.

शाळेच्या शारिरिक शिक्षणाच्या प्रशिक्षिका मलिक हुसेनबाई यांनी सांगितले की, योगाभ्यास करताना ‘ओंकार‘ उच्चारणे वा ना उच्चारणे हे विद्यार्थ्यांच्या मर्जीवर सोडलेले असते. योगाचा सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.

पाच हजारवर्षे प्राचीन असलेली योग परंपरा म्हणजे संपूर्ण जगासाठी एक अनमोल उपहार असल्याचे सांगत, 21 जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘योग दिन‘ म्हणून ओळखले जावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत 11 डिसेंबर 2014 मध्ये केले होते. त्यानुसार या वर्षी 21 जून ला दुसऱ्यांदा जागतिक योग दिवस साजरा केला जाणार आहे.
====================================
कठीण परिस्थितीत सचिनपेक्षा विराट महान-इम्रान

नवी दिल्ली - संघ कठीण परिस्थितीत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली महान फलंदाज असल्याचे, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी म्हटले आहे की, विराट कोहली हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजांचा काळ असतो. 1980 मध्ये सर व्हिव्हियन रिचर्डस यांचा आणि त्यानंतर ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर यांचा काळ होता. पण, माझ्यामते विराट हा परिपूर्ण फलंदाज आहे. तो दोन्ही पायांची व्यवस्थित मुव्हमेंट करुन मैदानाच्या कोणत्याही भागात चेंडू मारु शकतो. विराटने अनेकवेळा कठीण परिस्थितीत चांगला खेळ केलेला आहे. त्यामुळे टेम्परामेंटच्या बाबतीत सचिनपेक्षा विराट कितीतरी पुढे आहे.

ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव होताना दुःख वाटले, पण विराटने चांगली फलंदाजी केली. हे मी एक गोलंदाज म्हणून सांगत आहे, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. 
====================================
अधिकाऱ्याच्या घरी सापडले वाघाचे कातडे, 2 कोटी

गुवाहाटी - आसाममधील वन खात्याच्या विभागीय अधिकाऱ्याच्या घरातून पोलिसांनी वाघ आणि हरणाचे कातडे, 2 कोटींची रोख रक्कम आणि एक किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महत चंद्र तालुकदार असे या विभागीय अधिकाऱ्याचे नाव असून, तो ट्रक मालकांकडून लाच स्वीकारत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उत्तर आसाममधील धेमाजी येथे या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. या छाप्यात त्याच्या घरातून प्राण्यांच्या कातड्यासह संपत्ती सापडली आहे. अद्याप या अधिकाऱ्याच्या दोन लॉकरची चौकशी करणे शिल्लक आहे. या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 

भाजपने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक वन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. भाजप आसाममध्ये सत्तेत आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. तालुकदार यांच्याकडे प्राण्यांची कातडी कोठून आली, याबाबतची चौकशी करण्यात येत आहे.
====================================
विनाअनुदानित शाळांना 20 टक्के वेतन अनुदान

मुंबई -राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना वीस टक्के अनुदान देण्यास फडणवीस सरकारने तत्त्वत: मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. 

मूल्यांकनाच्या निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील 1628 शाळा व 2452 तुकड्यांमधील 19 हजार 247 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 टक्के वेतन अनुदान मिळणार आहे. 
राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार वीस टक्के वेतन अनुदान देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. या अनुदानापोटी 163.21 कोटी रुपयांचा भार सरकारवर पडणार आहे. 
गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानासह राज्यातील विविध शहरांच्या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल सरकारने घेतला आहे. 
====================================
मोसमी पाऊस रविवारपर्यंत राज्यात

पुणे - गोव्याच्या उंबरठ्यावर गेल्या चार दिवसांपासून मुक्काम असलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) पुढील प्रवास सुरू होणार आहे. येत्या रविवापर्यंत (ता. 19) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

मॉन्सूनने शुक्रवारी कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीवर दमदार हजेरी लावली. तेथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्याच वेळी आंध्र प्रदेशाचा काही भागी त्याने व्यापला. मात्र, मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे कर्नाटकातील कारवारपर्यंत आणि गोव्याच्या उंबरठ्यावर मॉन्सूनने गेले चार दिवस मुक्काम ठोकला होता. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेचा पुढे प्रवास सुरू होईल, असा विश्‍वास हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेली दोन वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या आणि पावसाची आतुरतेने पाहात असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून हजेरी लावेल.
बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या हवेच्या कमी दाबपट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनची वेगाने वाटचाल सुरू आहे. बंगालच्या उपसागरावरून ईशान्य भारताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मॉन्सूनच्या शाखेने मंगळवारी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पश्‍चिम बंगालचा हिमालय पर्वताकडील भाग आणि सिक्कीमच्या काही भागांपर्यंत मजल मारली. 
====================================
कैराना स्थलांतरप्रकरणी भाजपची कोलांटउडी

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशमधील कैराना येथून होणाऱ्या हिंदू स्थलांतरामागे हिंदू-मुस्लिम जातीवाद हे कारण देता येणार नाही, अशी सारवासारव भारतीय जनता पक्षाचे आमदार हुकूमसिंह यांनी केली आहे. या प्रकरणातील संशयितांच्या नावावरूनच हे लोक कोण आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. पत्रकारांशी आज बोलताना त्यांनी हे स्थलांतर जातीवादामुळे होत नसल्याचे म्हटले आहे. 

हुकूमसिंह म्हणाले, ""हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडणारा कोणी एखादी व्यक्ती नाही; तर त्यांची संख्या अधिक आहे. हिंदू-मुस्लिम जातीवादातून हे स्थलांतर होत नाहीये. मात्र स्थलांतरितांची संख्या 400-500 पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. हे प्रकरण योग्यरीतीने हाताळण्यासाठी; तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी प्रयत्नांची आवश्‍यकता आहे.‘‘ स्थलांतरितांमध्ये मुस्लिमांचाही समावेश आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, त्यांनी सारवासारव करत त्याची वैयक्तिक व वेगळी कारणे आहेत, असे मत व्यक्त केले. 

हुकूमसिंह यांनी काही दिवसांपूर्वी स्थलांतरितांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात आत्तापर्यंत 346 कुटुंबीयांनी त्यांचे मूळ ठिकाण सोडल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यांनी आज दुसरी यादी जाहीर केली त्यात शामली जिल्ह्यातील कांडला गावामधील 63 हिंदू कुटुंबांनी स्थलांतर केल्याचा दावा त्यांनी केला. 
दरम्यान, शामली जिल्हा न्यायदंडाधिकारी सुजीत कुमार यांनीही स्थलांतरामागे जातीवाद असण्याची शक्‍यता फेटाळली. हुकूमसिंह यांनी जाहीर केलेल्या यादीबद्दल बोलताना ते म्हणाले, ""आम्ही आत्तापर्यंत 119 कुटुंबांची चौकशी केली त्यापैकी 10-15 कुटुंबे अद्याप कैरानामध्येच राहत असून, 68 कुटुंबीयांनी तेथून 10-15 वर्षांपूर्वीच स्थलांतर केल्याचे निष्पन्न झाले आहे. कायद्याचे उल्लंघन होईल असा एकही प्रकार आतापर्यंत आढलेला नाही.‘‘ 
====================================

No comments: