Saturday, 4 June 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- 'इसिस'च्या बालेकिल्ल्यात सीरियन फौजा 
2- चीनकडे दुर्लक्ष करून भारत विकणार 'ब्राह्मोस' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
3- चेन्नईच्या इंजिनिअरने बनवलाय ISIS चा झेंडा 
4- सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने पाठवले 94 कोटी ई-मेल 
5- मला धमकी देणारा पकडला, दाभोळकर- पानसरेंचे मारेकरीही शोधा - अण्णा हजारे 
6- बँकांनी सायबर सुरक्षा चोख ठेवावी - भारतीय रिझर्व्ह बँक  
7- आधी जैन, नंतर भुजबळ अन्‌ आता खडसे! 
8- खडसेंवर गुन्हा दाखल करा - कॉंग्रेस  
9- मान्सून पुढील ३ दिवसांत केरळात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल, पुणे वेधशाळेचा अंदाज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
10- आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं 
11- खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार? 
12- नारायण राणेंकडून एकनाथ खडसेंची पाठराखण 
13- एकनाथ खडसे यांची कारकीर्द 
14- दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण 
15- पत्रकारांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
16- जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले 
17- नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची गुंडगिरी, घरात घुसून अमानुष मारहाण 
18- सोलापुरात पावसाची सर्वदूर हजेरी 
19- मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- 'हाऊसफुल 3' चित्रपटाची पहिल्याच दिवशी 'फुल' कमाई 
21- कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=====================================

आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं

आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेछूट आरोपांवर कुठलेही पुरावे न देता भाजप सरकारची बदनामी सुरु आहे. त्यामुळंच सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आपण मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसंच मी आजही सांगतो, माझ्याविरोधात एकही पुरावा द्या, मंत्रिपद नव्हे तर राजकारण सोडेन, असं आव्हान खडसेंनी दिलं. 
थोड्याच वेळापूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. 
अशी मीडिया ट्रायल अनुभवली नाही
गजानन पाटीलनं खडसेंसाठी 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप असो किंवा मग भोसरी एमआयडीसीतलं प्रकरण किंवा मग लिमोझिनच्या मॉडिफिकेशनचा वाद या सगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत. मात्र त्यानंतरही मीडिया ट्रायल सुरु असल्यानं आपण व्यथित झाल्याचंही खडसे म्हणाले.
=====================================

खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?

खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?
मुंबई: अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.

खडसे आजच राजीनामा देणार याबाबतची बातमी एबीपी माझाने सकाळीच दिली होती.

खडसेंची मंत्रिपदं कोणाला?
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या जागी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता ‘एबीपी माझा’कडे विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. खडसेंऐवजी विदर्भातील नेता आणि बहुजन चेहरा हे जाती-पातीचं, विभागाचं गणित सोडवण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर आहे. त्यामुळे विदर्भातील आणि बहुजन चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर येत आहे.

त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. तसंच ते 15 जून रोजी पदभार स्वीकारण्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.
=====================================

नारायण राणेंकडून एकनाथ खडसेंची पाठराखण

नारायण राणेंकडून एकनाथ खडसेंची पाठराखण
मुंबई : जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतल्याप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मात्र खडसेंची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा बळी घेतल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
 
इतके गंभीर आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, असं नारायण राणे म्हणाले. खडसेंचा राजीनामा हा बहुजन समाजावर अन्याय आहे, असं म्हणत बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंचा बळी घेतल्याचा निशाणाही राणेंनी साधला.


अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.


खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.
=====================================

एकनाथ खडसे यांची कारकीर्द

एकनाथ खडसे यांची कारकीर्द
मुंबई: अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.



एकनाथ खडसे यांची कारकीर्द

 *2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाळी गावात जन्म झाला.
*खडसेंचे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण कोठाळी गावातील शाळेतच झालं.
*खडसेंना सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच राजकारणात सक्रीय होते.
*एकनाथ खडसे 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तिथूनच्या त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला
*1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
*खडसेची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली.
*1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं.
*2010 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ खडसेंची निवड झाली.
*तर 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
*ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने खडसे नाराज होते, मात्र त्यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागली.
*एकनाथ खडसे यांची सून रक्षा या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत.
*खडसे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी या महानंद डेअरीच्या संचालक झाल्या.
*तसंच मुलगी रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
=====================================

दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण

दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : केवळ एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही, तर त्यांची दाऊद कॉलप्रकरणात चौकशी होणं आवश्यक आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

खडसेंविरोधात भक्कम पुरावे होते, त्यामुळे राजीनामा देणं आवश्यक होतंच. मात्र केवळ राजीनामा नको तर त्यांची चौकशी व्हावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तसंच खडसेंविरोधात अनेक पुरावे होते, त्यामुळे जातीच्या राजकारणातून खडसेंचा बळी घेतला असं मी म्हणणार नाही, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

भोसरीतील जमीन व्यवहारापेक्षा दाऊद कॉलप्रकरण गंभीर आहे. त्याची केंद्राने चौकशी करुन स्पष्टीकरण द्यावं. हा मुद्दा देशाच्या सुरक्षेचा आहे, त्यामुळे कदाचित हे प्रकरण पुढे येऊ नये, म्हणूनच खडसेंचा राजीनामा घेतला की काय, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
=====================================

जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले

जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले
मुंबई : अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.
jalgaon shivsena jallosh
खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. मात्र जळगावमधील शिवसैनिकांनी फटाक्या फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, खडसेनी राजीनामा सोपवल्यानंतर ते जळगावकडे रवाना होणार आहेत. यानंतर खडसे काही निर्णय घेतात का..याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

मुक्ताईनगरात शुकशुकाट

दरम्यान खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काही भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून निषेध व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी दुकानं बंद झाली आहेत.
=====================================

नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची गुंडगिरी, घरात घुसून अमानुष मारहाण

नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची गुंडगिरी, घरात घुसून अमानुष मारहाण
नागपूर : गुंड मारत होते, मार खाणारे नागरिक संरक्षणासाठी पोलिसांना फोन करत होते आणि पोलिस पत्ता सापडत नाही म्हणून निवांत बसले होते.


नागपुरातील गुंडाराज फोफावत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागपुरमध्ये खडगाव रोडवरील ओम साई सृष्टी सोसायटीतील नागरिकांना काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. डीजेचा आवाज कमी करायला सांगितल्यामुळे ही मारहाण केली आहे. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये काँग्रेसचा स्थानिक कार्यकर्ता रॉबिन शेलारे हा देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे.


महिलांसह वृद्धांना अमानुष मारहाण

सोसायटीच्या बाजूला तिरुपती बालाजी मंगल कार्यालय आहे. मंगल कार्यालयात मध्यरात्रीही कर्कश आवाजात डीजे वाजत असल्यामुळे सोसायटीचे काही ज्येष्ठ नागरिक मंगल कार्यालयात विनंती करण्यासाठी गेले. मात्र या महाशयांचा पारा चढला आणि शाब्दिक वाद झाला. त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.
=====================================

चेन्नईच्या इंजिनिअरने बनवलाय ISIS चा झेंडा

चेन्नईच्या इंजिनिअरने बनवलाय ISIS चा झेंडा!
नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयएसआयएसचा झेंडा आणि याचा लोगो बनवणाऱ्या मोहम्मद नासिरने चेन्नईतून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. एनआयएने शुक्रवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख आहे. एनआयएने या प्रकरणी नासिरच्या वडिलांना प्रमुख साक्षीदार केलं आहे. कोर्टात आता 9 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी होईल.

नासिरला कुठे आणि कसं पकडलं?

– चेन्नईमधील कॉलेजमध्ये बीई करत असतानाच नासिर 2014 मध्ये दुबईत वेब डेव्हलपर म्हणून नोकरीही करत होता.

– आयएसआयएसच्या प्रोपगेंडा व्हिडीओने प्रभावित होऊन तो सुदानला गेला.

– मात्र सुदानमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्यो त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं.

– मुलगा सीरियामधील युद्धात सहभागी होण्यासाठी गेला आहे अशी माहिती नासिरच्या वडिलांनीच दिली.

– नासिरला शोधण्यासाठी त्याचे वडील आमेर मुहम्मद पैकर दुबईहून भारतात पोहोचले होते.

– आमेर यांचा जबाब सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत नोंदवण्यात आला.

– आमेर यांना मुलाविरोधात महत्त्वाचा साक्षीदार म्हणून वापरण्यात येणार आहे.

– एनआयए आमेर आणि नासिरमध्ये झालेले ई-मेल, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअॅप मेसेज पुरावे म्हणून सादर करणार आहे.

नासिरचा वडिलांना मेसेज

– आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच एनआयएने न्यायाधीश अमर नाथ यांना सांगितलं होतं की, नासिरने सुदानहून वडिलांना भावनिक मेसेज केला होता. मी इथे अतिशय आनंदी आहे, असं त्याने लिहिलं होतं.

– त्याने लिहिलं होतं की आई आणि सुमैयाची काळजी घ्या. मी इथे सुरक्षित आहे. इथलं आयुष्य फारच सुंदर आहे. मला वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी सीरियाला यावं.

नासिर सुदानला कधी आणि कसा पोहोचला?

– 2008: इस्त्रायल, आरएसएस आणि विहिंपविरोधात तिरस्कार पसरवण्यासाठी नासिरने इस्लामिक ऑर्गनायझेशन तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) मध्ये प्रवेश केला होता.

– ऑगस्ट 2011: त्याने चेन्नईमधून एथिकल हॅकिंगचा चार महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केला होता.

– 2014: त्याने मुस्लिम आणि जिदाहींवर होणाऱ्या अत्यचारांबाबत लिहिण्यासाठी वेबसाईट बनवली होती.

– फेब्रुवारी 2015: ट्विटरच्या माध्यमातून नासिर हमीदान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला, जो इस्लाम Q&A नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवायचा. इथूनच त्याने आसिससाठी लोगो बनवण्यास सुरुवात केली.

– एप्रिल 2015: मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर अकाऊंट सुरु केलं आणि आयएसआयएसमध्ये सामिल लोकांच्या संपर्कात आला.

– ऑगस्ट 2015: नासिर नंतर एका मुल्लाच्या संपर्कात आला. त्याने नासिरला सुदान येण्यास सांगितलं, जिथून तो सीरियाला जाऊ शकेल.

– 25 सप्टेंबर 2015: नासिरने विमाने दुबईहून सुदानला रवाना झाला. यानंतर वडिलांना ई-मेल केला की, मी आयएसआयएसमध्ये सामिल होण्यास जात आहे.

– 5 ऑक्टोबर 2015: नासिरला सुदान प्रशासनाने त्याब्यात घेतलं. त्यानंतर 10 डिसेंबरला त्याला भारताकडे सोपवण्यात आलं.
=====================================

'हाऊसफुल 3' चित्रपटाची पहिल्याच दिवशी 'फुल' कमाई

'हाऊसफुल 3' चित्रपटाची पहिल्याच दिवशी 'फुल' कमाई
मुंबई : अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही भन्नाट कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल 15.21 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
 
तीन जून 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटाची स्पर्धा नव्हती. गेल्या आठवड्यातील फोबिया, वीरप्पन बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी बजावू शकले नाहीत. त्यातच अक्षय-रितेश-अभिषेक या तगड्या कलाकारांसोबत जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाक्री, लिसा हेडन या अभिनेत्रीही चित्रपटात झळकल्या आहेत.


ओपनिंग डेच्या कमाईत ‘फॅन’ वरचढ

 
शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाने ओपनिंग डे म्हणजेच रिलीजच्या दिवशी केलेल्या माईत वर्चस्व राखलं आहे. 2016 मध्ये पहिल्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हे बिरुद ‘फॅन’ने कायम राखलं आहे. हाऊसफुल सिरीजमधल्या या चित्रपटाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
=====================================

कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये महाराष्ट्रासह देशाला ‘याड लावणाऱ्या’ सैराट चित्रपटाची टीम येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
 
आतापर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त बॉलिवूडमधील चित्रपट कलाकारांना निमंत्रित केलं जात असे. मात्र बॉलिवूडला दखल घ्यायला लावणाऱ्या सैराटच्या यशानंतर आता पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या टीमला कपिलच्या शोमध्ये पाचारण करण्यात येईल.


कपिलच्या कार्यक्रमात ‘सैराट’ची टीम उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित असले तरी कार्यक्रमाचे चित्रिकरण अद्याप झालेले नाही. यासोबतच हा कार्यक्रम केव्हा टेलिकास्ट होणार याबाबतही कोणतीही माहिती नाही.


बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने आतापर्यंत 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी सिनेमाने इतकी कमाई केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.
=====================================

सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने पाठवले 94 कोटी ई-मेल


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 04 - केंद्र सरकारला सत्तेत दोन वर्ष पुर्ण झाल्यानंतर सरकारची लोकप्रियता कमी झाली की वाढली हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. मात्र मोदी सरकारच्या डिजीटल कार्यक्रमांमधील लोकांचा सहभाग वाढतो आहे हे स्पष्ट आहे. मोदी सरकारने कामकाजांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी 94 कोटी ई-मेल्स पाठवले होते, जे अनेकांनी वाचून आपलं मत नोंदवलं आहे. ई-मेल्स वाचणा-यांचा आकडा पाहता मोदी सरकारच्या डिजीटल कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. 
     
    इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 46 हजार लोकांना धन्यवाद देणारा ईमेल पाठवण्यात आला होता. 96 टक्के लोकांनी हा ईमेल वाचला होता. मोदी सरकारने आतापर्यंत 217 ई-मेल कॅम्पेन केले असून हा सर्वात यशस्वी ठरला आहे. 
     
    मोदी सरकारने केलेल्या ई-मेल कॅम्पेन्सपैकी रिडरशिपच्या दृष्टीने पाहता सर्वात यशस्वी ठरलेले पाच ई-मेल कॅम्पेन्स या सहा महिन्यांमध्येच करण्यात आले. प्रत्येत ई-मेल कॅम्पेनला रिडरशिप वाढत असल्याचं दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मलेशिया आणि सिंगापूर दौ-याची माहिती देणारा तसंच लोकांना फॉलो करण्याचं आवाहन करणारे 74.16 लाख ईमेल पाठवण्यात आले होते. या ई-मेल्सना 12 टक्के रिडरशिप मिळाली होती. मात्र या कॅम्पेनला फॉलो करण्यासाठी देण्यात आलेल्या युआरएलवर 92 हजार लोकांनी क्लिक केलं होतं. जो आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. 
=====================================

मला धमकी देणारा पकडला, दाभोळकर- पानसरेंचे मारेकरीही शोधा - अण्णा हजारे


  • ऑनलाइन लोकमत - 
    अहमदनगर, दि. 04 -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणा-या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांनी 'ज्या गांभीर्याने मला धमकी देणार्‍या आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला तशाच प्रकारे डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांची हत्या करणारे आरोपी पकडले जावेत व त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी', अशी मागणी केली आहे. 
     
    'मला अनेक वेळा धमक्या आल्या. पण मी अशा धमक्यांना कधीच भीक घालत नाही. अशा वेळी नेवासा येथून वारंवार धमक्या येत होत्या. हे कृत्य करणारा आरोपी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने पोलिसांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची आहे', असं अण्णा हजारे बोलले आहेत. 'धमकी देणारा आरोपी सापडला असल्याने आता सरकारने माझे संरक्षण कमी करावे... संरक्षणासाठी फार मोठी यंत्रणा वापरली जाते हे बरे वाटंत नाही', असं मतही अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. 
=====================================

बँकांनी सायबर सुरक्षा चोख ठेवावी - भारतीय रिझर्व्ह बँक 


  • मुंबई : डिजिटल तंत्रज्ञानामुळे आॅनलाइन बँकिंगकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी बँकांनी आपल्या सायबर सुरक्षेकडे चोख लक्ष द्यावे असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.
    सध्या नियमित बँकिंग व्यवहाराच्या तुलनेत आॅनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. पैशाच्या हस्तांतरणासाठीही लोक प्रामुख्याने नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. याखेरीज अन्य व्यवहार किंवा मग बँकांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांमध्येही इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक व्यवहार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही पद्धतीचे हँकिंग होऊ नये अथवा आॅनलाइन व्यवहारात गंडा घातला जाऊ नये, याकरिता बँकांनी आपल्या संगणकीय यंत्रणा आणि आॅनलाइन व्यवस्था यातील सुरक्षेच्या मुद्द्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
=====================================
'इसिस'च्या बालेकिल्ल्यात सीरियन फौजा

बैरुत : ‘इसिस‘चा बालेकिल्ला असलेल्या रक्का शहरावर धडक कारवाई करून या दहशतवादी संघटनेला धक्का देण्यास सीरियाच्या फौजांनी आजपासून (शनिवार) सुरवात केली आहे. या धडक कारवाईमुळे 2014 नंतर प्रथमच रक्का शहरामध्ये सीरियाच्या अधिकृत फौजेला पाय रोवता आले आहेत. आता सीरियामधील सर्वांत मोठे धरण पुन्हा ताब्यात घेण्याच्या दिशेने सीरियन फौजांनी कूच केली आहे. याच ठिकाणी हवाई दलाचा तळही आहे.

रक्का शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर तब्का धरण आहे. गेल्या महिन्यातही या धरणावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या कुर्दिश बंडखोरांनी केला होता. ‘2014 च्या ऑगस्ट महिन्यानंतर प्रथमच सीरियन फौजा आज रक्का शहरात दाखल झाल्या. यासाठी सीरियाच्या लष्करी तुकड्यांना रशियाच्या हवाई दलाने मदत केली. या तुकड्यांना रशियन सैन्यानेच प्रशिक्षण दिले आहे,‘ अशी माहिती सीरियातील मानवाधिकार संघटनेचे निरीक्षक रामी अब्देल रेहमान यांनी सांगितले. ‘अमेरिका आणि रशियामध्ये या कारवाई प्रकरणी अघोषित समन्वय असल्याचे दिसत आहे. दोन्ही सरकारने पाठिंबा दिलेल्या फौजांनी जवळपास एकाच वेळी ‘इसिस‘वर हल्लाबोल केला आहे,‘ असे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. रक्कावर ताबा मिळविण्याच्या लढाईमध्ये किमान 26 दहशतवादी ठार झाले आहेत. सीरियाच्या लष्करातील नऊ सैनिकही मृत्युमुखी पडले.

2014 च्या ऑगस्टमध्ये ‘इसिस‘ने या शहरावर पूर्णपणे ताबा मिळविला होता. त्यानंतर ‘इसिस‘ने एकूण 160 सैनिकांना ठार केले होते.
=====================================
आधी जैन, नंतर भुजबळ अन्‌ आता खडसे!
-

हो-नाही करता करता अखेर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. यथावकाश त्या आरोपांची चौकशी होईल. ज्यांनी आरोप केले ती मंडळी प्रकरणे कशी पुढे रेटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तथापि, या घडामोडींचा मोठा धक्‍का बसलाय तो उत्तर महाराष्ट्राच्या, खासकरून खानदेशातील राजकारणाला. केळीच्या बागा फुलविणाऱ्या अन्‌ पाहुण्यांना वांग्याचे भरीत प्रेमाने खाऊ घालणाऱ्या लेवाबहुल टापूमधील समाजमन या राजीनाम्याने ढवळून निघणे स्वाभाविक आहे. त्याचे राजकीय पडसाद नजीकच्या भविष्यातही पाहावयास मिळतील. कोथळीचे सरपंचपद व मुक्‍ताईनगर (जुने एदलाबाद) पंचायत समिती सदस्यत्वापासून सुरू झालेल्या खडसेंच्या तीस-पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला बसलेला हा खूप मोठा धक्‍का आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, ती उत्तर महाराष्ट्रातील सुरेशदादा जैन, छगन भुजबळ व आता एकनाथ खडसे या तीन दिग्गज नेत्यांची जवळजवळ एकसारखी राजकीय घसरण. अनुक्रमे जळगावचा घरकुल गैरव्यवहार, दिल्लीतला महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि भोसरीची जमीन किंवा दाऊद इब्राहीमच्या कराचीतल्या घरून आलेले फोन ही प्रकरणे या तिघांना भोवली. तिघांचाही राजकीय उदय, बहर व घसरणीपासून इतरांनी बोध घ्यावे, असे बरेच काही त्यांच्या वाटचालीत आहे. 
=====================================
सोलापुरात पावसाची सर्वदूर हजेरी
-

सोलापूर : पूर्वमोसमी पावसाने सोलापूर जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वदूर दमदार हजेरी लावली. अक्कलकोट, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, तालुक्‍यात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. सकाळी आठ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी 12.59 मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी रात्रीपासूनच वातावरणात एकदम बदल झाला होता. रात्री उशीरा पावसाने हलकी हजेरी लावली. पण त्यानंतर त्याने विश्रांती घेतली. पण वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाट मात्र सुरुच होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास मात्र पावसाने चांगलाच वेग घेतला आणि जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्‍यात हजेरी लावली. सकाळी सात वाजेपर्यंत थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरुच होती. पण त्यातही कमी-अधिक जोर राहिला. अक्कलकोट तालुक्‍यात सर्वाधिक 26.33 मिलीमीटर, दक्षिण सोलापुरात 29.17, सांगोला 17.78, उत्तर सोलापुरात 13.10 मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्‍यातही पावसाने चांगली सुरुवात केली. पण त्यामध्ये फारसा जोर नव्हता.
=====================================
खडसेंवर गुन्हा दाखल करा - कॉंग्रेस 
-

File Photoनवी दिल्ली - एकनाथ खडसे यांनी जनतेच्या कार्यालयाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, "केवळ राजीनामानाट्य पुरेसे नाही. त्यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी बोलल्याचे थेट आरोप आहेत. 30-40 कोटी रुपयांची जमीन सरकारकडून अत्यल्पदरात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजीना दिल्याने त्यांच्यावरील आरोप पुसले जाणार आहेत का? याचे उत्तर स्पष्टपणे नाही असे आहे.‘ असे म्हणत "जनतेच्या कार्यालयाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा‘ अशी मागणी सूरजेवाला यांनी केली आहे.

दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संभाषण व भोसरी जमीन गैरव्यवहारामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या खडसे यांनी आज (शनिवार) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
=====================================
मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

औरंगाबाद : मराठवाड्यातील हिंगोली वगळता सात जिल्ह्यांत गत चोवीस तासांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या मॉन्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक जोर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाबरोबरच चार जिल्ह्यांत वीज पडून सहा जण ठार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातील हवामान बदलल्याचे चित्र आहे. 2 जूनला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक पाऊस झाला. तीन जूनला मात्र या मॉन्सूनपूर्व पावसाने थोडा जोर पकडला. जालना वगळता इतर सातही जिल्ह्यांत तुरळक का होईना पावसाने हजेरी लावली होती. 4 जूनच्या पहाटेपर्यंत या मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर आणखी वाढल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. 4) सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 0.49 मिलिमीटर, जालना जिल्ह्यात 1.59 मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात 3.05 मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यात 5.93 मिलिमीटर, बीड जिल्ह्यात 2.35 मिलिमीटर, लातूर जिल्ह्यात 15.06 मिलिमीटर तर उस्मानाबाद जिल्ह्यात 11.42 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनांनी घेतली आहे. वीज पडून ठार झालेल्यांमध्ये औरंगाबाद, नांदेडमधील प्रत्येकी दोन व जालना, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
=====================================
चीनकडे दुर्लक्ष करून भारत विकणार 'ब्राह्मोस'

नवी दिल्ली : चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ‘ब्राह्मोस‘ हे क्षेपणास्त्र व्हिएतनामला विकण्यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी भारताने केली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उद्यापासून (रविवार) व्हिएतनामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यानच ‘ब्राह्मोस‘च्या विक्रीची चर्चा करण्याची तयारी झाली आहे.

अशा स्वनातीत क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यासाठी व्हिएतनाम गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, ‘ब्राह्मोस‘ हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी विकसित केले आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र तिसऱ्या देशास विकण्यासाठी दोन्ही देशांची परवानगी आवश्‍यक आहे. या व्यवहारास चीनचा तीव्र आक्षेप असल्याने यापूर्वी भारत सरकारने त्या दिशेने पावले उचलली नव्हती. मात्र, व्हिएतनामशी हा करार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री पर्रीकर आग्रही होते, असे संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितल्याचे ‘इंडिया टुडे‘ने म्हटले आहे. 
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================

No comments: