[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं
२- डेन्मार्क महिला सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपींना जन्मठेप
३- दक्षिण कॅलिफोर्निया; ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बोलण्याची संधी न मिळाल्यानं आमदार चक्क बाकावर उभे राहिले!
५- उडता पंजाब प्रकरण; तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट
६- साखरेवर 25 टक्के निर्यात शुल्काचा प्रस्ताव
७- भाजपचे दलित प्रेम खोटे- शंकराचार्य
८- मेनकासोबत चहा प्या; जावडेकरांना सल्ला
९- १० वर्षांपेक्षा जास्त डिझेलच्या जुन्या वाहनांवर बंदी घालण्याच्या आदेशाला केरळ हायकोर्टाची स्थगिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
११- नाशिक होईल 'मॉडेल सिटी'
१२- सुवर्ण ठेवीचे व्यवहार सोमवारपासून NSE मध्ये
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- अहमदाबाद; लग्न करायला बोलावून महिलांनी एकास लुटले
१४- सातारा; राष्ट्रवादीला अन् सेनेला घाबरत नाही- नलावडे
१५- कोल्हापूर - हुपरीतील चांदी उद्योजकाच्या बंगल्यात चोरी, सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांचा ऐवज जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- युरो करंडक वेळापत्रक पहा येथे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================

==================================
अहमदाबाद- राजकोट येथील एका 50 वर्षीय नागरिकाला विवाह करण्यास बोलावून त्याला तीन महिलांनी लुटल्याची घटना घडली. तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
परसोतम मारविया (रा. नाना मावा, राजकोट) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मंजुळा ऊर्फ मोना वाघेला (वय 37), दैसी माकवान (वय 45), शीला ख्रिश्चियन (वय 54) व मायकेल जोसेफ (वय 25, सर्व रा. मानिनगर, खोख्रा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरसोतम यांच्या पत्नीचे साडेतीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. परसोतम यांना पाच मुली व दोन मुले आहेत. परसोतम यांना त्यांच्या मुलांनी दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबीयांनी शिलाशी संपर्क साधून वधू शोधण्यास सांगितले होते. शिलाने अनेकदा 50 वर्षांच्या पुढील वधू दाखविल्या होत्या. परंतु, परसोतम यांनी त्या नाकारल्या होत्या. मंजुळाने परसोतम यांना दूरध्वनी करून विवाहास इच्छुक असल्याचे सांगितले. मंजुळाने पुन्हा काही दिवसांनी दूरध्वनी केला व माझे तुमच्यावर प्रेम आहे. माझ्याशी विवाह न केल्यास तुमचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करणार आहे. अहमदाबाद येथे मला भेटायला या, असे सांगून बोलावून घेतले.
१- वॉशिंग्टन; मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं
२- डेन्मार्क महिला सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपींना जन्मठेप
३- दक्षिण कॅलिफोर्निया; ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बोलण्याची संधी न मिळाल्यानं आमदार चक्क बाकावर उभे राहिले!
५- उडता पंजाब प्रकरण; तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट
६- साखरेवर 25 टक्के निर्यात शुल्काचा प्रस्ताव
७- भाजपचे दलित प्रेम खोटे- शंकराचार्य
८- मेनकासोबत चहा प्या; जावडेकरांना सल्ला
९- १० वर्षांपेक्षा जास्त डिझेलच्या जुन्या वाहनांवर बंदी घालण्याच्या आदेशाला केरळ हायकोर्टाची स्थगिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
११- नाशिक होईल 'मॉडेल सिटी'
१२- सुवर्ण ठेवीचे व्यवहार सोमवारपासून NSE मध्ये
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- अहमदाबाद; लग्न करायला बोलावून महिलांनी एकास लुटले
१४- सातारा; राष्ट्रवादीला अन् सेनेला घाबरत नाही- नलावडे
१५- कोल्हापूर - हुपरीतील चांदी उद्योजकाच्या बंगल्यात चोरी, सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाखांचा ऐवज जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- युरो करंडक वेळापत्रक पहा येथे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================
बोलण्याची संधी न मिळाल्यानं आमदार चक्क बाकावर उभे राहिले!
नवी दिल्ली: भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या ड्रामेबाजीमुळं दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकला. सभागृहात टँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू होती. त्यात अरविंद केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये पती-पत्नीचं नातं असल्याचा आरोप केला.
दरम्यान, हे सगळं घमासान सुरू असताना बोलण्याची संधी न मिळाल्यामुळं आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावर उभे राहिले. विजेंद्र गुप्ता यांची शाळेतल्या मुलाप्रमाणं सुरू असलेली वर्तणुक पाहून सभागृहातील आमदारांना हसू आवरलं नाही.
पहिल्या बाकावर बसलेले अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया तर विजेंद्र गुप्तांचा तो पवित्रा पाहून जोरजोरात हसत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी वारंवार विनवणी केल्यानंतर विजेंद्र गुप्ता बाकावरून खाली उतरले आणि पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाली.
==================================
तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट
मुंबई : एकादा सिनेमा चांगला आहे की वाईट हे प्रेक्षकांना ठरवू द्या. तुमचं काम चित्रपटाला प्रमाणपत्रं देण्याच आहे, असं म्हणत ‘उडता पंजाब’च्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं आहे.
‘उडता पंजाब’ चित्रपटाप्रकरणी हायकोर्टात सुरु असलेली सुनावणी संपली असून आता सोमवारी अंतिम निकाल देण्यात येणार आहे.
‘उडता पंजाब’वरील आजच्या सुनावणीत हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलंच धारेवर धरलं. तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे, टीव्ही असो की सिनेमा प्रेक्षकांना तो पाहू द्या, प्रत्येकाला निवड करण्याचा हक्क आहे, अशा शब्दात हायकोर्टाने ठणकावलं.
==================================
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.
राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात.
जिल्ह्यावर नियंत्रण कोणत्या पक्षाचं आणि अध्यक्षपदी कोण, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. अखेर आज ही सोडत जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या सामाजिक घटकासाठी आहे हे पाहून राजकीय पक्ष आपले डावपेच आखतात.
==================================
मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे भाषण करताना दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे म्हणत अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली होती.'पाकिस्तानचे भारतासोबत संबंध सुधारावेत यासाठी अमेरिकेने उचललेलं हे पाऊल असल्याचं', अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं आहे. 'पाकिस्तान आणि भारताने एकमेकांशी चर्चा तसंच मदत केल्यास परिस्थिती सुधारु शकते. यासाठी काही पावलं उचलण्याची गरज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपल्या देशातील जमिनीवर भारतावर हल्ला करण्यासाठी कट रचले जात नाहीत ना याची खातरजमा करावी. तसंच आपल्या देशातील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी', असंही मार्क टोनर बोलले आहेत.
==================================
डेन्मार्क महिला सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपींना जन्मठेप
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 10 - डेन्मार्क महिला सामूहिक बलात्कार प्रकरणी तीस हजारी न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पाचही आरोपींना सामूहिक बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. महेंद्र उर्फ गंजा, मोहम्मद राजा, राजू, अर्जून आणि राजू चक्का अशी आरोपींची नावे आहेत. 14 जानेवारी 2014 मध्ये चाकूचा धाक दाखवत डेन्मार्क महिलेवर बलात्कार करुन तिला लूटण्यात आलं होतं.या खटल्यातील एक आरोपी श्यामलाल (वय 56) याचा यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिहार कारागृहात मृत्यू झाला होता तर आणखी तीन आरोपी गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होते. त्यांच्याविरुद्ध बालगुन्हेगार न्यायमंडळासमोर चौकशी सुरू आहे.नवी दिल्ली रेल्वेस्थानकाजवळ जानेवारी 2014 मध्ये 52 वर्षांच्या डेन्मार्क महिला पर्यटकाने तिच्या हॉटेलचा पत्ता विचारला असता नऊ जणांनी चाकूच्या धाकाने तिला जवळच असलेल्या विभागीय रेल्वे अधिकारी क्लबनजीक निर्मनुष्य जागेत नेले होते. तेथे तिच्याकडील ऐवज लुटून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
==================================
नाशिक होईल 'मॉडेल सिटी'
| |
-
| |
आपलं शहर शांत, स्वच्छ आणि सुंदर असावं असं कुणाला वाटत नाही! आपल्या शहराविषयी प्रत्येकाच्या काही ना काही कल्पना असतातच आणि रोज भेडसावणार्या समस्यांवर कुणाकडे तरी काहीतरी तोडगाही असतो.. आपल्या शहराविषयी भावना व्यक्त करण्याचा आणि इतर मुद्दे मांडण्यासाठी सर्वसामान्य वाचकांना ‘ई-सकाळ‘चे व्यासपीठ उपलब्ध आहे..-------------------------------------------------------------------------
मी सध्या पुण्यात राहणारा; मूळ नाशिकचा. तसं नाशिक हे बऱ्यापैकी मोठे शहर आहे. पुण्यातल्या किंवा इतर शहरांमधील बऱ्याच लोकांसाठी नाशिकची ओळख म्हणजे ‘कुंभमेळा‘ आणि ‘त्र्यंबकेशवर‘ एवढीच आहे. पण नाशिक हे एक औद्योगिक शहरही आहे. जवळपास 20 लाख लोकसंख्या असलेले हे एक मध्यम शहर आहे.
पुणे-नाशिकमधील अंतरदेखील फार नाही. अगदी पाच-सहा तासांत गाठता येण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्यासारखे अनेक नाशिककर नोकरीनिमित्त किंवा कुटुंबासह पुण्यात स्थायिक आहेत. पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या तीनही शहरांपासून नाशिक 200 किलोमीटरच्या आसपास आहे. तसेच, गुजरातमधील सुरत शहरही जवळच आहे.
पुणे-नाशिकमधील अंतरदेखील फार नाही. अगदी पाच-सहा तासांत गाठता येण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्यासारखे अनेक नाशिककर नोकरीनिमित्त किंवा कुटुंबासह पुण्यात स्थायिक आहेत. पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या तीनही शहरांपासून नाशिक 200 किलोमीटरच्या आसपास आहे. तसेच, गुजरातमधील सुरत शहरही जवळच आहे.
==================================
साखरेवर 25 टक्के निर्यात शुल्काचा प्रस्ताव
| |
-
| |
नवी दिल्ली : साखरेची अतिरिक्त निर्यात थांबविण्यासाठी अन्नधान्य मंत्रालयाने साखरेवर 25 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
"आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे अधिक नफा मिळविण्यासाठी व्यापारी साखरेची निर्यात वाढवू शकतात. मर्यदित निर्यातीसाठी 25 टक्के शुल्काचा प्रस्ताव आहे. त्यामुळे देशात मुबलक प्रमाणात साखरेचा साठा राहिल आणि त्याच्या किंमतीदेखील नियंत्रित राहतील, असे पासवान म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन महिन्यांपासून ब्राझीलमधून येणाऱ्या साखरेचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहे. परंतु भारतात मात्र सध्या जेवढे उत्पादन होत आहे तेवढीच मागणी वाढत आहे. त्यामुळे सरकार निर्यातीवर नियंत्रण आणू पाहत आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून देशातून आतापर्यंत 14 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात 11 टक्के घट झाल्याने किरकोळ किंमती 40 रुपयांच्या पार पोचल्या आहेत.
==================================
सुवर्ण ठेवीचे व्यवहार सोमवारपासून NSE मध्ये
| |
-
| |
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सोमवारपासून (ता.13) गोल्ड बॉंडचे व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. गोल्ड बॉंडच्या व्यवहारांना नुकताच रिझर्व्ह बॅंक आणि भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडून मंजुरी देण्यात आली. एनएसईतील गुंतवणूकदारांना गोल्ड बॉंडच्या निमित्ताने नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी गोल्ड बॉंड (सार्वभौम सुवर्ण रोखे) बाजारात दाखल केले होते. त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने या रोख्यांच्या व्यवहारासाठी एनएसईची निवड केली आहे. एनएसईमध्ये गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक आहे.
गोल्ड बॉंडनुसार गुंतवणूकदारांना सोन्याच्या किमतींसदृश्य परतावा मिळेल. त्याचबरोबर दर सहा महिन्यांनी 2.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल, असे एनएसईच्या फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख हुजेन मेस्त्री यांनी सांगितले. किमान 8 वर्षे मुदतीचे गोल्ड बॉंड असून यात 5 वर्षांनंतर गुंतवणूक काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर गोल्ड बॉंडमधील गुंतवणुकीवर टीडीएस भरावा लागणार नाही. कर्जासाठी गोल्ड बॉंड गहाण ठेवता येतील, असे त्यांनी सांगितले.
==================================
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दलित प्रेम हे खोटे आहे. दलित कुटुंबीयांसोबत भोजन करणे हे एक राजकीय कृत्य आहे, असे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, ‘दलितांना पूर्व सूचना न देता का नाही ते त्यांच्यासोबत भोजन करत. उज्जैनमधील क्षिप्रा नदीत दलितांसोबत स्नान करणे ही सुद्धा राजकीय फायद्यासाठी नवीन कल्पना आहे. नदी, मंदिर व धार्मिक स्थळांवर जाती, धर्म व भेदाच्या माध्यमातून कोणताही भेदभाव केला जात नाही.‘
‘उत्तर प्रदेश, हरियाना, आसाम व पश्चिम बंगालमध्ये गायींची तस्करी केली जाते. शिवाय, खुलेआम कत्तल केली जात आहे. गोहत्या बंदीनंतरही हे थांबत नसेल तर सरकारचे अपयश आहे,‘ असेही शंकराचार्य म्हणाले.
भाजपचे दलित प्रेम खोटे- शंकराचार्य

लग्न करायला बोलावून महिलांनी एकास लुटले
| |
-
| |
परसोतम मारविया (रा. नाना मावा, राजकोट) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मंजुळा ऊर्फ मोना वाघेला (वय 37), दैसी माकवान (वय 45), शीला ख्रिश्चियन (वय 54) व मायकेल जोसेफ (वय 25, सर्व रा. मानिनगर, खोख्रा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरसोतम यांच्या पत्नीचे साडेतीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. परसोतम यांना पाच मुली व दोन मुले आहेत. परसोतम यांना त्यांच्या मुलांनी दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबीयांनी शिलाशी संपर्क साधून वधू शोधण्यास सांगितले होते. शिलाने अनेकदा 50 वर्षांच्या पुढील वधू दाखविल्या होत्या. परंतु, परसोतम यांनी त्या नाकारल्या होत्या. मंजुळाने परसोतम यांना दूरध्वनी करून विवाहास इच्छुक असल्याचे सांगितले. मंजुळाने पुन्हा काही दिवसांनी दूरध्वनी केला व माझे तुमच्यावर प्रेम आहे. माझ्याशी विवाह न केल्यास तुमचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करणार आहे. अहमदाबाद येथे मला भेटायला या, असे सांगून बोलावून घेतले.
==================================
राष्ट्रवादीला अन् सेनेला घाबरत नाही- नलावडे
| |
-
| |
सातारा- गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्यांनी काहीच केले नाही आणि आता तेच विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला इशारा देत आहेत. अशा इशाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य चालविण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या राष्ट्रवादीने पहिल्यांदा आपले घर दुरुस्त करा आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकावावे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्षा कांताताई नलावडे यांनी व्यक्त केले. शिवसेनेला आम्ही घाबरत नाही. संजय राऊत सेनेला "डॅमेज‘ करीत आहेत असेही वक्तव्य त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्त भारतीय जनता पार्टीद्वारे देशभरात विकास पर्व रथाचे आयोजन केले आहे. या रथाचे सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता. 9) आगमन झाले. त्याची माहिती देण्यासाठी श्रीमती नलावडे यांनी आज (शुक्रवार) विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.
श्रीमती नलावडे म्हणाल्या, देशात आणि महाराष्ट्रात आम्ही विकास पर्व उभे केले आहे. अनेक प्रलंबित योजना मार्गी लावल्या. तरी ही कुणाच्या पोटात दुखत असेल तर आम्ही काय करणार. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 15 वर्षात काय केले हे सर्वांनाच माहीत आहे. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी आम्हाला मदत करण्याची तयारी केली होती आणि आता इशारे देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही या इशाऱ्यांना भीक घालत नाही. पहिल्यांदा आपले घर सांभाळा आणि मग दुसऱ्याच्या घरी डोकवा.

युरो करंडक वेळापत्रक पहा येथे...
| |
-
| |
पॅरिस - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर सर्वाधिक उत्कंठावर्धक आणि चुरशीने खेळली जाणारी स्पर्धा म्हणजे युरो करंडक स्पर्धा. ही स्पर्धा यंदा फ्रान्समध्ये होत असून, भारतीय वेळेनुसार 11 जून ते 11 जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेत मुख्य फेरीपर्यंत यजमान फ्रान्ससह 24 देशांनी मजल मारली आहे. ड गटात क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, स्पेन आणि तुर्कस्तान या तुल्यबळ संघांचा समावेश आहे. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर या स्पर्धेवर दहशतवादाचे सावट आहे. 2012मध्ये झालेल्या युरो करंडक स्पर्धेत स्पेनना इटलीचा पराभव करत तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.
युरो करंडक फुटबॉल 2016 वेळापत्रक :
दिनांक : सामना : वेळ
11 जून : फ्रान्स विरुद्ध रुमानिया : रात्री 12.30
11 जून : अल्बेनिया विरुद्ध स्वित्झर्लंड : सायंकाळी 6.30
11 जून : वेल्स विरुद्ध स्लोव्हाकिया : रात्री 9.30
12 जून : इंग्लंड विरुद्ध रशिया : रात्री 12.30
12 जून : तुर्कस्तान विरुद्ध क्रोएशिया : सायंकाळी 6.30
12 जून : पोलंड विरुद्ध उत्तर आयर्लंड : रात्री 9.30
13 जून : जर्मनी विरुद्ध युक्रेन : रात्री 12.30
13 जून : स्पेन विरुद्ध चेक प्रजासत्ताक : सायंकाळी 6.30
13 जून : आयर्लंड विरुद्ध स्वीडन : रात्री 9.30
14 जून : बेल्जियम विरुद्ध इटली : रात्री 12.30
14 जून : ऑस्ट्रिया विरुद्ध हंगेरी : रात्री 9.30
15 जून : पोर्तुगाल विरुद्ध आईसलॅंड : रात्री 12.30
15 जून : रशिया विरुद्ध स्लोव्हाकिया : सायंकाळी 6.30
15 जून : रुमानिया विरुद्ध स्वित्झर्लंड : रात्री 9.30
16 जून : फ्रान्स विरुद्ध अल्बेनिया : रात्री 12.30
16 जून : इंग्लंड विरुद्ध वेल्स : सायंकाळी 6.30
16 जून : युक्रेन विरुद्ध उत्तर आयर्लंड : रात्री 9.30
17 जून : जर्मनी विरुद्ध पोलंड : रात्री 12.30
17 जून : इटली विरुद्ध स्वीडन : सायंकाळी 6.30
17 जून : चेक प्रजासत्ताक विरुद्ध क्रोएशिया : रात्री 9.30
18 जून : स्पेन विरुद्ध तुर्कस्तान : रात्री 12.30
18 जून : बेल्जियम विरुद्ध आयर्लंड : सायंकाळी 6.30
18 जून : आईसलॅंड विरुद्ध हंगेरी : रात्री 9.30
19 जून : पोर्तुगाल विरुद्ध ऑस्ट्रिया : रात्री 12.30
20 जून : स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स : रात्री 12.30
20 जून : रुमानिया विरुद्ध अल्बेनिया : रात्री 12.30
21 जून : स्लोव्हाकिया विरुद्ध इंग्लंड : रात्री 12.30
21 जून : रशिया विरुद्ध वेल्स : रात्री 12.30
21 जून : उत्तर आयर्लंड विरुद्ध जर्मनी : रात्री 9.30
21 जून : युक्रेन विरुद्ध पोलंड : रात्री 9.30
22 जून : क्रोएशिया विरुद्ध स्पेन : रात्री 12.30
22 जून : चेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्कस्तान : रात्री 12.30
22 जून : हंगेरी विरुद्ध पोर्तुगाल : रात्री 9.30
22 जून : आईसलॅंड विरुद्ध ऑस्ट्रिया : रात्री 9.30
23 जून : स्वीडन विरुद्ध बेल्जियम : रात्री 12.30
23 जून : इटली विरुद्ध आयर्लंड : रात्री 12.30
राऊंड ऑफ 16
25 जून : पहिला सामना : सायंकाळी 6.30
25 जून : दुसरा सामना : रात्री 9.30
26 जून : तिसरा सामना : रात्री 12.30
26 जून : चौथा सामना : सायंकाळी 6.30
26 जून : पाचवा सामना : रात्री 9.30
27 जून : सहावा सामना : रात्री 12.30
27 जून : सातवा सामना : रात्री 9.30
28 जून : आठवा सामना : रात्री 12.30
उपांत्यपूर्व फेरी
1 जुलै : पहिला सामना : रात्री 12.30
2 जुलै : दुसरा सामना : रात्री 12.30
3 जुलै : तिसरा सामना : रात्री 12.30
4 जुलै : चौथा सामना : रात्री 12.30
उपांत्य फेरी
7 जुलै : पहिला सामना : रात्री 12.30
8 जुलै : दुसरा सामना : रात्री 12.30
11 जुलै : अंतिम सामना : रात्री 12.30
---
काही सामने रात्री 12.30 ला सुरू होणार असल्याने तांत्रिकदृष्ट्या पुढची तारीख नमूद केली आहे.
---
अ गट :
अल्बेनिया
फ्रान्स
रुमानिया
स्वित्झर्लंड
ब गट :
इंग्लंड
रशिया
स्लोव्हाकिया
वेल्स
क गट :
जर्मनी
उत्तर आयर्लंड
पोलंड
युक्रेन
ड गट :
क्रोएशिया
चेक प्रजासत्ताक
स्पेन
तुर्कस्तान
ई गट :
बेल्जियम
इटली
आयर्लंड
स्वीडन
फ गट :
ऑस्ट्रिया
हंगेरी
आईसलॅंड
पोर्तुगाल
==================================
नवी दिल्ली - वन्य प्राण्यांच्या ठार मारण्याच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण विकासमंत्री मेनका गांधी यांच्यासोबत चहा प्यावा आणि चर्चा करून यावर तोडगा शोधावा असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
मानवाला धोकादायक ठरणाऱ्या प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी जावडेकर यांनी दिली आहे. त्यानंतर 53 रानडुकरांना ठार मारण्यात आले असून आणखी 50 रानडुकरांना मारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मेनका गांधी यांचे पर्यावरणप्रेम जागृत झाले असून या प्राण्यांना कायद्यानुसारच मारले आहे का याचे स्पष्टीकरण त्यांनी मागितले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाल्याने स्वामी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘मेनका यांना प्रदीर्घ काळापासून याबाबतची चिंता आहे. मला वाटते की जावडेकरांनी सार्वजनिक ठिकाणी उत्तर न देता त्यांनी दूरध्वनी करून चहा घेऊ म्हणत या विषयावर चर्चा करून तोडगा शोधायला हवा‘ असा सल्ला स्वामी यांनी जावडेकरांना दिला आहे.
मेनकासोबत चहा प्या; जावडेकरांना सल्ला

हिमायतनगर; धानोरा येथे युवतीच्या खुनाला वाचा फुटली...सखे भाऊच निघाले पक्के वैरी
हिमायतनगर; धानोरा येथे युवतीच्या खुनाला वाचा फुटली...सखे भाऊच निघाले पक्के वैरी
हिमायतनगर; तालुक्यातील मौजे धानोरा ज.येथील २२ वर्षीय युवतीच्या खुनाचा उलगडा झाला असून, चारित्र्याच्या संशयावरून सख्या दोन भवानीच बहिणीचा काटा काढला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे धानोरा ज.येथील आम्रपाली खिल्लारे वय २२ वर्ष हिचा मृतदेह भोकर - हिमायतनगर रस्त्यावरील करंजी शिवारातील पुलाखाली दि.२५ में आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसानी या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सुरुवाती पासूनच मयत मुलीचे दोन भाऊ संशयाच्या भोवर्यात असल्याने पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली. दरम्यान पोलिसांना तिच्या दोन भावांच्या बोलण्यावरून दाट संशय आला होता. परंतु विश्वसनीय नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नव्हते. सदरील मयत युवतीचा भावानीच काटा काढल्याची विश्वसनीय गुप्त माहिती काही दिवसांनी पोलिसांना मिळाली. आम्रपाली हिचा सखा भाऊ माधव किशन खिल्लारे वय २४ व विशाल उर्फ राजू किशन खिल्लारे वय २० वर्ष यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विचारपूस करून दोघानाही पोलिस खाक्या दाखविताच या दोघांनी मयत आम्रपाली हिचा चारित्र्याचा संशयावरून काटा काढल्याची कबुली पोलिसांना दिली. यावरून भाऊ हवा पाठी राखा... या वाक्याला काळिमा फासला असून, सखे भाऊच पक्के वैरी निघाले आहे.

No comments:
Post a Comment