[अंतरराष्ट्रीय]
१- चीनमध्ये भर रस्त्यात बसला भीषण आग, 35 जणांचा मृत्यू, 20 जखमी
२- बगदाद; इराकी लष्कराने पुन्हा फालुजा शहर जिंकले
३- लंडन; ‘ब्रेक्झिट’वरून लेबर पक्षात बंडाळी!
४- सिंगापूर; प्रवासादरम्यान बोईंग विमानाला लागली आग
५- भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचा धक्का
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान, व्हायरल मेसेजमागील सत्य
७- जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या
८- परदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटी रुपयांचा ब्लॅकमनी
९- नगदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर टीसीएसचा फटका?
१०- भारताला मिळणार 'एमटीसीआर'चे सदस्यत्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
१२- शाहरुख-विद्यानंतर सलमानही 'चला हवा येऊ द्या'मध्ये
१४- 'सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण', सेनेचं टीकास्त्र
१५- पुणे; पेन्शनचा वाटा 'स्वच्छ भारत'ला, शिक्षकाची मोदींकडून दखल
१६- मुंबई रेल्वेमार्गावर आठवड्याभरात 66 प्रवाशांचे बळी
१७- भागीदार असलेल्या कंपनीला SRAचं कंत्राट, वायकरांवर काँग्रेसचा नवा आरोप
१८- आमदार-खासदारांसाठी कोटा नको
१९- अठरा परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या
२०- उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्ण घोषित
२१- रोख व्यवहारांवर ब्लॉकचेनचा उपाय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- अहमदनगर; 'सैराट'ने तरुण पीढीचं वाटोळं केलं - विजय शिवतारे
२३- सोलापूर; रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र बार्शीकन्या प्रार्थना ठोंबरेचा सत्कार
२४- कल्याण; माथेरानला ट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
२५- एक्स्प्रेसमधून ‘लोकल’ प्रवास बंद
२६- वेश्याव्यवसाय मालवणीच्या बबली शॉ यांच्यासह त्यांच्या दोन नातवंडाच्या जिवावर बेतला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- लायनल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
२८- मेस्सीचा पुन्हा स्वप्नभंग, चिलीला कोपा अमेरिकाचं जेतेपद
२९- अॅक्शन सीनदरम्यान गोळी लागून सैफ अली खान जखमी
३०- LeEcoच्या सुपरफोननं घातली ग्राहकांना भुरळ!
३१- सेन्सॉर बोर्डाच्या जाचामुळे अनेक सिनेमांचे नुकसान: सुनील शेट्टी
३२- आर. डी. बर्मन यांना गुगलकडून श्रद्धांजली
३३- ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेचे विजेतेपद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==========================================

प्रार्थनाचं मुंबईहून रविवारी रात्री बार्शीत उशिरा आगमन झालं आहे. त्यानंतर सोमवारी तिच्या सुभाषनगरमधल्या राहत्या निवासस्थानातून प्रार्थनाची शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील विविध संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी प्रार्थनाच्या ऑलिम्पिक निवडीनिमित्त शुभेच्छांचे फलकही शहरात लावले आहेत.
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या आयटीएफ महिलांच्या खुल्या स्पर्धेत तिने 25 हजार डॉलर्सचे विजेतेपदही पटकावलं आहे. दुहेरीतील वर्ल्ड रँकिंगमध्येही ती 186 व्या स्थानावर आहे. प्रार्थना सध्या हैदराबाद येथील सानिया मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षक आणि सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली ती टेनिसचा कसून सराव करत आहे.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली आहे. त्यानंतर सलमान खान आणि अनुष्का शर्माही सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची माहिती आहे.
येत्या बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये कार्यक्रमाचं शूटिंग होणार असून दोघांवर दोन एपिसोड शूट होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये ‘सैराट’ चित्रपटाची टीम हजर राहिली होती. त्यामुळे मराठी चित्रपट आणि बॉलिवूडचा हा आदानप्रदान सोहळा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.

पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वच्छ भारत अभियानाला केलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळे मोदींनी त्यांचं कौतुक केलं. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात रमलेल्या 67 वर्षीय चंद्रकांत कुलकर्णींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 15 ऑगस्ट रोजी झालेलं भाषण ऐकलं. त्यात पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची गरज बोलून दाखवली. कुलकर्णी यांना ती खूपच भावली आणि 15 हजार निवृत्ती वेतनातील प्रत्येक महिन्याचे पाच हजार या प्रमाणे 52 महिन्यांचे तब्बल दोन लाख 60 हजार रुपयांचे आगाऊ धनादेश त्यांनी या अभियानासाठी दिले.
पेन्शनमधील जवळपास एक तृतीयांश रक्कम देणाऱ्या या निवृत्त शिक्षकाची दखल मोदींनी घेतली. पुण्यात झालेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात त्यांना आवर्जून आमंत्रित केलं. त्याची ‘मन की बात’मध्ये दखलही घेतली आणि फेसबुकवर कुटुंबीयांच्या भेटीचा फोटोही उपलोड केला. मोदींची ही भेट सुखद धक्का असल्याचं कुलकर्णी सांगतात.

न्यू जर्सीच्या मेटलाईफ स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना आधी निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोल करण्यात अपयश आलं. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीच्या आर्थुरो विदाल आणि अर्जेन्टिनाच्या लायनेल मेसीला गोल करण्यात अपयश आलं. त्यानंतर चिलीसाठी निकोलस कॅस्टिलो, चार्ल्स अरांग्वेझ आणि जीन ब्युसाजोरनं गोल केले. तर अर्जेन्टिनासाठी जेव्हियर माशेरानो आणि सर्जियो अॅग्वेरोनं गोल डागले.
अर्जेन्टिनाच्या लुकास बिग्लियाची पेनल्टी किक चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होनं थोपवून लावली आणि चिलीला विजयाचं दार उघडून दिलं. मग फ्रान्सिस्को सिल्वानं गोल झळकावून चिलीचा 4-2 असा विजय निश्चित केला.
या सामन्यात चिलीच्या मार्सेलो डियाझ आणि अर्जेन्टिनाच्या मार्कोस रोहोला अखिलाडूवृत्तीसाठी रेड कार्ड दाखवण्यात आलं. दरम्यान चिलीनं गेल्या वर्षी झालेल्या कोपा अमेरिकातही अर्जेन्टिनाचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवलं होतं. चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होला गोल्डन ग्लोव्हचा पुरस्कार देण्यात आला.

कंपनी 2016पर्यंत देशातील 10 शहरांमध्ये इन-हाउस कंटेंट डिलिवरी नेटवर्क्स (सीडीएन) स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
कंपनी क्लाउड सर्विस स्थापन करण्यावरही एक कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे सीडीएन कंटेंट जलद वितरणास मदत होईल.
LeEcoचा सुपरफोन Le2 आणि Max2ला देशातील पहिल्याच फ्लॅश सेलमध्ये एकलाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे.

आठवड्याभरात मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण 66 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची तर 56 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यातील ‘लोकलबळीं’चा एकूण आकडा 1473 असल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी प्रत्येक दिवशी नऊ प्रवाशांचा मृत्यू ओढावला आहे.
डोंबिवलीतील भावेश नकाते या तरुणाचा प्रचंड गर्दी असलेल्या गाडीत शिरण्याच्या प्रयत्नात हात सुटून धावत्या गाडीतून खाली पडून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या समितींची स्थापना केली.

डोंबिवलीत राहणारा 16 वर्षांचा हर्षद भोळे हा विद्यार्थी दरवर्षी पावसाळ्यात मित्रांसोबत ट्रेकला जायचा. शनिवारीही हर्षद भाऊ प्रणय आणि मित्रांसोबत माथेरानला पेबच्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यावेळी डोक्यात दगड पडून हर्षदचा मृत्यू झाला.
हर्षदचा भाऊ प्रणयही यावेळी त्याच्यासोबत होता. स्थानिकांच्या मदतीने हर्षदला नेरळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांना फोन करुनही ते दोन तास उशिरा आल्याचं प्रणयने म्हटलं आहे.
हर्षद मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांसोबत मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे अनेक महत्वाची पदं रिक्त आहेत. शिवाय अनेक मंत्र्यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे तो भार कमी करुन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागू शकतो. 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते. मात्र, त्याआधी नवीन मंत्र्यांना कारभार समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि मित्रपक्षांच्या वाट्याला कुठली आणि किती खाती येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सत्तेत येण्यापूर्वीच भाजपनं मित्रपक्षांना सत्तेचा वाटा देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता ते पाळलं जातं की नाही? हे या मंत्रिमंडळ विस्तारात कळू शकेल.
==========================================
'सैराट'ने तरुण पीढीचं वाटोळं केलं : विजय शिवतारे
अहमदनगर : नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असतानाच, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलं आहे. सैराट सिनेमाने तरुण पीढीचं वाटोळं केलं, असं शिवतारे म्हणाले. ते हिवरेबाजार इथं बोलत होते.
शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभं राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी दिला. इतकंच नाही तर अल्पावधित जास्त पैसा कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक सैराटसारखे चित्रपट काढतात, असंही अजब वक्तव्य शिवतारे यांनी केलं.
युवकांनी अभ्यास करुन, स्वत:च्या पायावर उभं राहावं, मग सैराट व्हावं, असं शिवतारे म्हणाले.
जलसंधारणाची पाहणी
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी परीसरातल्या जलसंधारणाची पाहणी करुन समाधान व्यक्त केलं. भोयरे खुर्द आणि भोयरे पठार या आदर्श गावांनाही भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिवतारे यांनी पोपटराव पवार आणि ग्रामस्थांची कौतुक केलं.
==========================================
लायनल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
न्यू जर्सी : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायनल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीने सांगितलं.
लायनल मेस्सीच्यानावे अनेक विक्रम आहेत. 2008 मध्ये ऑलिम्पिकमध्ये त्याने अर्जेंटिनासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय बार्सिलोना क्बलला विक्रमी आठ वेळा स्पेनच्या ला लीगा या प्रतिष्ठित स्पर्धेचं विजेतेपद जिंकून दिलं आहे. मात्र अर्जेंटिनासाठी त्याला एकही विजेतेपद मिळवता आलं नाही.
कोपा अमेरिका चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चिलीने अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असं पराभूत केलं. महत्त्वाचं म्हणजे या पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीला गोल करता आला नाही. परिणामी अर्जेंटिनाचा पराभव झाला.
हा पराभव जिव्हारी लागल्याने लायनल मेस्सीने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
==========================================
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र बार्शीकन्या प्रार्थना ठोंबरेचा सत्कार
सोलापूर : रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघात निवड झालेली बार्शीची कन्या प्रार्थना ठोंबरेचा सोमवारी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात बार्शी नगरपरिषदेच्या वतीने आमदार दिलीप सोपल आणि जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या हस्ते प्रार्थनाचा सत्कार करुन तिला मानपत्र प्रदान करण्यात येईल.
प्रार्थनाचं मुंबईहून रविवारी रात्री बार्शीत उशिरा आगमन झालं आहे. त्यानंतर सोमवारी तिच्या सुभाषनगरमधल्या राहत्या निवासस्थानातून प्रार्थनाची शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील विविध संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी प्रार्थनाच्या ऑलिम्पिक निवडीनिमित्त शुभेच्छांचे फलकही शहरात लावले आहेत.
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या आयटीएफ महिलांच्या खुल्या स्पर्धेत तिने 25 हजार डॉलर्सचे विजेतेपदही पटकावलं आहे. दुहेरीतील वर्ल्ड रँकिंगमध्येही ती 186 व्या स्थानावर आहे. प्रार्थना सध्या हैदराबाद येथील सानिया मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षक आणि सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली ती टेनिसचा कसून सराव करत आहे.
==========================================
अॅक्शन सीनदरम्यान गोळी लागून सैफ अली खान जखमी
मुंबई : शूटिंगच्या सेटवर गोळी लागल्याने अभिनेता सैफ अली खान जखमी झाला आहे. या घटनेत सैफच्या अंगठ्याला गोळी लागली. त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
सैफच्या होम प्रॉडक्शन असलेल्या एका सिनेमाचं पवईत शूटिंग सुरु होतं. मात्र शनिवारी शूटिंगदरम्यान सैफच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफची बहिण सोहा अली खाननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार, “सेटवर अॅक्शन सीनची शूटिंग सुरु होती. मात्र यावेळी एअरगनमधून मिसफायर झाल्याने गोळी सैफच्या अंगठ्याला लागली. यानंतर जखमी सैफला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.”
==========================================
शाहरुख-विद्यानंतर सलमानही 'चला हवा येऊ द्या'मध्ये
मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बॉलिवूडमधील ताऱ्यांनाही या शोने भुरळ घातली असून आता ‘सुलतान’ चित्रपटाच्या निमित्ताने चक्क सुपरस्टार सलमान खान उपस्थिती लावणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली आहे. त्यानंतर सलमान खान आणि अनुष्का शर्माही सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची माहिती आहे.
येत्या बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये कार्यक्रमाचं शूटिंग होणार असून दोघांवर दोन एपिसोड शूट होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये ‘सैराट’ चित्रपटाची टीम हजर राहिली होती. त्यामुळे मराठी चित्रपट आणि बॉलिवूडचा हा आदानप्रदान सोहळा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.
==========================================
'सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण', सेनेचं टीकास्त्र
मुंबई: शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. आशिष शेलारांनी सामना जाळण्याची भाषा केल्यांतर आज सामनामधून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झालं असून. सत्य सांगणाऱ्यांची मुस्कटदाबी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढत असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.
सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. सामना जाळण्याचा विचार म्हणजे हिंदुत्व जाळण्याचा विचार असल्याचंही सामनामधून म्हटलं आहे.
==========================================
नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान, व्हायरल मेसेजमागील सत्य
मुंबई : फेसबुक, ट्विटर तसंच व्हॉट्सअॅपवर यांसारख्या सोशल मीडियावर कोणती सत्यता न पडताळता चुकीचे मेसेज किंवा बातम्या व्हायरल होतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारा मेसेज.
युनेस्कोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून निवड केली आहे, असा हा मेसेज होता. यानंतर सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल झाला. नेटीझन्सनी व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुकवर या मेसेजचा अक्षरश: पाऊस पाडला. मोदींचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये बिलियर्ड आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीचाही समावेश होता.
==========================================
पेन्शनचा वाटा 'स्वच्छ भारत'ला, शिक्षकाची मोदींकडून दखल
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे त्यांच्याकडून साध्यातल्या साध्या व्यक्तीच्या कामाची घेतली जाणारी दखल. पिंपरी चिंचवड मधल्या चंद्रकांत कुलकर्णींच्या कामाचंही अशाचप्रकारे पंतप्रधानांनी कौतुक केलं.
पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वच्छ भारत अभियानाला केलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळे मोदींनी त्यांचं कौतुक केलं. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात रमलेल्या 67 वर्षीय चंद्रकांत कुलकर्णींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 15 ऑगस्ट रोजी झालेलं भाषण ऐकलं. त्यात पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची गरज बोलून दाखवली. कुलकर्णी यांना ती खूपच भावली आणि 15 हजार निवृत्ती वेतनातील प्रत्येक महिन्याचे पाच हजार या प्रमाणे 52 महिन्यांचे तब्बल दोन लाख 60 हजार रुपयांचे आगाऊ धनादेश त्यांनी या अभियानासाठी दिले.
पेन्शनमधील जवळपास एक तृतीयांश रक्कम देणाऱ्या या निवृत्त शिक्षकाची दखल मोदींनी घेतली. पुण्यात झालेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात त्यांना आवर्जून आमंत्रित केलं. त्याची ‘मन की बात’मध्ये दखलही घेतली आणि फेसबुकवर कुटुंबीयांच्या भेटीचा फोटोही उपलोड केला. मोदींची ही भेट सुखद धक्का असल्याचं कुलकर्णी सांगतात.
==========================================
मेस्सीचा पुन्हा स्वप्नभंग, चिलीला कोपा अमेरिकाचं जेतेपद
न्यू जर्सी : चिलीनं अर्जेन्टिनावर मात करत सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिकाचं विजेतेपद मिळवलं. पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीने 4-2 ने अर्जेन्टिनाचा धुव्वा उडवला. त्यामुळे अर्जेन्टिला पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.
न्यू जर्सीच्या मेटलाईफ स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना आधी निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोल करण्यात अपयश आलं. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीच्या आर्थुरो विदाल आणि अर्जेन्टिनाच्या लायनेल मेसीला गोल करण्यात अपयश आलं. त्यानंतर चिलीसाठी निकोलस कॅस्टिलो, चार्ल्स अरांग्वेझ आणि जीन ब्युसाजोरनं गोल केले. तर अर्जेन्टिनासाठी जेव्हियर माशेरानो आणि सर्जियो अॅग्वेरोनं गोल डागले.
अर्जेन्टिनाच्या लुकास बिग्लियाची पेनल्टी किक चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होनं थोपवून लावली आणि चिलीला विजयाचं दार उघडून दिलं. मग फ्रान्सिस्को सिल्वानं गोल झळकावून चिलीचा 4-2 असा विजय निश्चित केला.
या सामन्यात चिलीच्या मार्सेलो डियाझ आणि अर्जेन्टिनाच्या मार्कोस रोहोला अखिलाडूवृत्तीसाठी रेड कार्ड दाखवण्यात आलं. दरम्यान चिलीनं गेल्या वर्षी झालेल्या कोपा अमेरिकातही अर्जेन्टिनाचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवलं होतं. चिलीचा गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होला गोल्डन ग्लोव्हचा पुरस्कार देण्यात आला.
==========================================
जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या
जम्मू: जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पम्पोरमधील एका नागरिकानं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसजवळ उभा राहून दहशतवादी फायरींग करताना स्पष्ट दिसत आहे.
दोन मिनिट चाललेल्या या गोळीबाराचा आवाजही मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावरुन हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते आहे. दहशतवाद्यांच्या या गोळीबारात जवानांच्या गाडीच्या काचा फुटत असल्याचं दिसतं आहे.
हा हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले आहेत तर 17 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आपल्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र जवानांच्या गाडीच्या इतक्या जवळ येऊन केलेल्या हल्ल्याचं मोबाईल शुटिंग आता समोर आलं आहे.
==========================================
LeEco च्या सुपरफोननं घातली ग्राहकांना भुरळ!
मुंबई: चीनमधील टेक कंपनी LeEco ने सुपरफोन आणि सुपरटेनमेंट मिळून एक खास मॉडेल तयार केलं आहे. “LeEco देशातील एकमेव कंपनी आहे, ज्यांनी सुपरफोन कंटेट मॉडेल क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे आणि स्मार्टफोन उद्योगातील स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.” असं या कंपनीचं म्हणणं आहे.
LeEco चं चॅनेल हे एक विशिष्ट मॉडेल आहे. जिथें कंटेटला मोबाइल, टॅबलेट, कंम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, सिनेमागृहमध्येही पाहता आणि सिंक्रोनाइज्ड तसेच शेअरही करता येईल.
कंपनी 2016पर्यंत देशातील 10 शहरांमध्ये इन-हाउस कंटेंट डिलिवरी नेटवर्क्स (सीडीएन) स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
कंपनी क्लाउड सर्विस स्थापन करण्यावरही एक कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे सीडीएन कंटेंट जलद वितरणास मदत होईल.
LeEcoचा सुपरफोन Le2 आणि Max2ला देशातील पहिल्याच फ्लॅश सेलमध्ये एकलाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे.
==========================================
मुंबई रेल्वेमार्गावर आठवड्याभरात 66 प्रवाशांचे बळी
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : लोकल अपघातासाठी नियुक्त झालेल्या खासदार समितीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवलाय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे मुंबईत लोकल प्रवासात शनिवारी एकाच दिवशी 15 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तसंच गुरुवारी 14 जणांचा मृत्यू झाला होता.
आठवड्याभरात मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण 66 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याची तर 56 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यातील ‘लोकलबळीं’चा एकूण आकडा 1473 असल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी प्रत्येक दिवशी नऊ प्रवाशांचा मृत्यू ओढावला आहे.
डोंबिवलीतील भावेश नकाते या तरुणाचा प्रचंड गर्दी असलेल्या गाडीत शिरण्याच्या प्रयत्नात हात सुटून धावत्या गाडीतून खाली पडून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या समितींची स्थापना केली.
==========================================
माथेरानला ट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
कल्याण : पावसाळ्यात माथेरानला ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील हर्षद भोळेचा अपघाती मृत्यू झाला.
डोंबिवलीत राहणारा 16 वर्षांचा हर्षद भोळे हा विद्यार्थी दरवर्षी पावसाळ्यात मित्रांसोबत ट्रेकला जायचा. शनिवारीही हर्षद भाऊ प्रणय आणि मित्रांसोबत माथेरानला पेबच्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यावेळी डोक्यात दगड पडून हर्षदचा मृत्यू झाला.
हर्षदचा भाऊ प्रणयही यावेळी त्याच्यासोबत होता. स्थानिकांच्या मदतीने हर्षदला नेरळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांना फोन करुनही ते दोन तास उशिरा आल्याचं प्रणयने म्हटलं आहे.
हर्षद मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांसोबत मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे.
==========================================
भागीदार असलेल्या कंपनीला SRAचं कंत्राट, वायकरांवर काँग्रेसचा नवा आरोप
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर काँग्रेसनं आणखी एका नव्या आरोपाची तोफ डागली आहे. वायकरांशी संबंधित असलेल्या कंपनीला जोगेश्वरी गुंफा परिसरात एसआरएचं कंत्राट मिळून देण्यासाठी वायकरांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतो आहे.
जोगेश्वऱीच्या गुंफा राष्ट्रीय स्मारक परिक्षेत्रात मोडत असल्यामुळं लगतचा परिसर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, असं असतानाही, या परिसरात ऐश्वर्या अवंत बिल्डरला एसआरएस प्रकल्पाची मंजुरी मिळवून देण्यासाठी वायकरांनी मदत केल्याचा आरोप संजय निरुपमांनी केला आहे.
रवींद्र वायकर हे ऐश्वर्या अवंत बिल्डरचे भागीदार होते, अशी माहिती देखील समोर येते आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसनं रवींद्र वायकरांवर घोटाळ्यांच्या आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. याआधी काँग्रेसनं वायकरांवर आरे कॉलनीतील जागा हडपून जिम उभारल्याचा आरोपही केला आहे.
==========================================
सेन्सॉर बोर्डाच्या जाचामुळे अनेक सिनेमांचे नुकसान: सुनील शेट्टी
नागपूर : सेन्सॉर बोर्डाच्या जाचामुळे अनेक चित्रपटांचे नुकसान होत असून, त्याचा परिणाम हा त्या चित्रपटावर व त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांवर होत असल्याचे मत अभिनेते सुनील शेट्टी याने व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमासाठी अभिनेते सुनील शेट्टी नागपुरात आले होते.
उडता पंजाब चित्रपटाला यांचा चांगलाच फटका बसला असून त्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिला असून न्यायालयापुढे कुणी मोठा नाही. अश्यात प्रत्येकाच्या हातात रिमोट आहे ज्याला जे बघायचे आहे तो ते पाहू शकतो. आणि न्यायालयाच्या निर्णया मुळे आपण खुश असल्याचे देखील त्याने सांगितले.
दरम्यान, सलमान खानला आपण चांगल्याने ओळखत असून, सलमान खान अनेक चांगले काम करत असून त्याच्या चांगल्या कामाची दखल घेतल्या जात नसल्याचे त्याने म्हटले आहे.
सलमानला बोलायचे वेगळे होते. मात्र मीडियाने स्वतःच्या टीआरपीसाठी त्याच्या व्यक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत या गोष्टीचे खापर प्रसिद्धी माध्यमांवर फोडले आहे. बोलण्यात चुकी झाली असेल शेवटी सलमान देखील माणूस आहे आणि चुका माणसाकडूनच होतात असे सांगत या विषयी सुनील शेट्टीने सलमानची पाठराखण केली.
==========================================
चीनमध्ये भर रस्त्यात बसला भीषण आग, 35 जणांचा मृत्यू, 20 जखमी
बीजिंग : मध्य चीनमध्ये पर्यटकांची एक बस रेलिंगला धडकल्याने मोठा अपघात झाला. या अपघातानंतर बसला भीषण आग लागली आणि या आगीत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत.
हुनान प्रांतात ही दुर्घटना घडली असून, बसमध्ये एकूण 56 प्रवाशी होते. बस महामार्गावरील रेलिंगला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.
या अपघातातील 20 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
अपघात ठिकाणाजवळील सीसीटीव्ही पाहिल्यानंतर असे दिसून आले आहे की, बसच्या अपघातानंतर बसमधून धूर निघू लागला. त्यानंतर बसमधील प्रवाशी बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दरवर्षी 2.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.
==========================================
लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा
- ऑनलाइन लोकमतकॅलिफोर्निया, दि. २७ - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.त्याने तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सोमवारी चिली विरुद्धच्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा ४-२ ने पराभव झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या या सामन्यात मेस्सीने आपली पहिलीच पेनल्टी मिस केली.न्यूजर्सी येथे झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोन तासांच्या आतच मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली. सलग दुस-यांदा कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा चिलीकडून पराभव झाला. राष्ट्रीय संघाबरोबरचा माझा प्रवास संपला. हा माझा निर्णय आहे असे निराश झालेल्या मेस्सीने सांगितले.
==========================================
'सामना' जाळू म्हणणारे मनोरुग्ण - उद्धव ठाकरे
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार उत्तर दिलं आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात कोणाचेही नाव न घेता सामना जाळू म्हणणा-यांना मनोरुग्ण ठरवले आहे.आतापर्यंत पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
==========================================
परदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटी रुपयांचा ब्लॅकमनी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २७ - अघोषित उत्पन्न परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवणा-यांविरोधात केंद्र सरकारने मोहीम उघडल्यानंतर महत्वपूर्ण माहिती आयकर खात्याच्या हाती लागली आहे. २०११ आणि २०१३ मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर केलेल्या तपासातून आयकर खात्याने १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा काळा पैसा शोधून काढला आहे.भारत सरकारला २०११ मध्ये फ्रेंच सरकारकडून जीनेव्हा येथील एचएसबीसी बँकेमध्ये असणा-या भारतीयांच्या खात्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आयकर खात्याने केलेल्या तपासात भारतीयांचे ८,१८६ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले. परदेशी बँकांमधील उघड झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम होती.या प्रकरणात ज्या भारतीयांची खाती होती त्यांच्यावर ३१ मार्च २०१६ पर्यंत ५३७७ कोटी रुपयांचा कर आकारणी करण्यात आली. आयकर खात्याच्या करनिर्धारण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. एचएसबीसीच्या प्रकरणात ६२८ बँक खात्याची सरकारला माहिती मिळाली.
==========================================
एक्स्प्रेसमधून ‘लोकल’ प्रवास बंद
- मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आणि ही सेवा अखेर बंद करण्यात आली. या सेवेमुळे मध्य रेल्वेला नुकसानीलाही सामोरे जावे लागले.२६ जानेवारी २0१६ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची मुभा देत, या सेवेला सुरुवात करण्यात आली. ठाणे आणि कल्याण स्थानकातून प्रवासाची मुभा देतानाच सेकंड क्लासच्या पासधारकांसाठी कल्याणमधून ३0 तर ठाण्यातून २0 रुपये आकारणी, तर फर्स्ट क्लास पासधारकांना कल्याणमधून २0 तर ठाण्यातून दहा रुपये मोजावे लागत होते. १0 आणि २५ च्या कुपन्सची पुस्तिका देताना प्रथम महिला प्रवाशांना प्राधान्य होते. महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्यास, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर सर्व प्रवाशांसाठी ते कुपन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याला अपेक्षेपेक्षा प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एकूण ९00 पुस्तिकांपैकी अवघ्या आठ पुस्तिकांची विक्री झाली होती. मार्च आणि एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती होती. सुरुवातीच्या दोन महिन्यांत रेल्वेची फक्त १,६00 रुपये कमाई झाली. एकूणच होणारा खर्च आणि मिळत नसलेला प्रतिसाद पाहता, मध्य रेल्वेने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही सुविधा तीन महिन्यांसाठीच होती. प्रतिसादानंतर सुविधा सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार होता.
==========================================
आमदार-खासदारांसाठी कोटा नको
- मुंबई : म्हाडाच्या घरासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये आमदार-खासदारांसाठी राखीव असलेला कोटा त्वरित रद्द करून तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष व आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी या आरक्षणाला विरोध दर्शवला आहे.म्हाडातर्फे यंदा मुंबईतील ९७२ सदनिकांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात आजी-माजी आमदार व खासदारांना मिळत असलेले वेतन व भत्ते हे दरमहा ४० हजारांहून अधिक असतानाही पूर्वीप्रमाणेच यंदाच्या लॉटरीतही अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील विविध ठिकाणची घरे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यातआली आहेत. एकीकडे सर्वसाधारण गटात एका फ्लॅटसाठी दोन, अडीच हजार नागरिक इच्छुक असताना, वरील तीन उत्पन्न गटात एकही आजी-माजी आमदार अर्ज करू शकत नसल्याने, त्यांच्या कोट्यातील सदनिका सोडतीविना पडून राहणार आहेत. कपिल पाटील यांना वर्सोवा येथील राजयोग सोसायटीत आमदारांच्या कोट्यातून सदनिका वितरित करण्यात आली होती.मात्र, त्यांनी २३ मे २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून ती रद्द केली होती.
==========================================
वेश्याव्यवसाय जिवावर बेतला
- मुंबई : घरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायातून मिळणारे पैसे मालवणीच्या बबली शॉ यांच्यासह त्यांच्या दोन नातवंडाच्या जिवावर बेतल्याचे समोर आले. त्यांच्या तिजोरीतील पैसे लुटण्यासाठी त्यांच्याकडे वेश्याव्यसायासाठी येणाऱ्या महिलेने हा डाव रचला होता. गुन्हे शाखा ११ च्या तपास पथकाने या प्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटाच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली.शबिना सलमान शेख (२५), पती मोफिद उर्फ सलमान शेख (२२), सलमान अकबर शेख (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघांनाही वलसाड येथून शनिवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली या स्वत: वेश्याव्यवसाय करत होत्या. त्यानंतर, त्यांनी घरातील पोटमाळा वेश्याव्यवसायासाठी भाड्याने देण्याचा धंदा सुरू केला. या धंद्यादरम्यान ग्राहक, तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडून ती भाडे घेत होती, तसेच शबिना ग्राहकांना दारूही पुरवित असे. गेल्या आठ महिन्यांपासून शबिनाही त्यांच्याकडे वेश्याव्यवसायासाठी येत होती. त्यानंतर, बबली यांना भाडे देत असताना, शबिनाची नजर त्यांच्या तिजोरीवर पडली. त्यामुळे शबिनाने त्यांच्या तिजोरीवर हात साफ करण्याचे ठरविले होते. त्यात हावडा येथील मालमत्ता विकल्यानंतर त्याचेही पैसे त्यांच्या तिजोरीत जमा होते, याचीही माहिती शबिनाला मिळाली.
==========================================
१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या
- मुंबई : राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत. एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी त्यांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृहविभागाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत.१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गेल्या वर्षभरापासून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण सुरू होते. २८ जूनला त्याचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानंतर, वर्षभर त्यांना पोलीस कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. ते पूर्ण केल्यानंतर त्यांची पूर्ण वेळ नियुक्ती केली जाणार आहे. अधिकाऱ्यांची नावे व नियुक्तीचे ठिकाण असे: प्रिया पाटील (अकोला), पौर्णिमा तावरे (धुळे), सोहेल शेख (जालना), विलास यामावार (पुणे ग्रामीण), बसवराज शिवपुजे (कोल्हापूर), शशिकांत भोसले (सातारा), रंजित पाटील (गडचिरोली), संतोष गायकवाड (जळगांव), किरणकुमार सूर्यवंशी (अमरावती ग्रामीण), प्रदीप मेराळे (औरंगाबाद ग्रामीण), सुनील जायभाये (रायगड), शैलेश काळे (पालघर), राजीव नवले (गोंदिया), तानाजी बरडे (अहमदनगर),अर्जुन भोसले, विक्रम कदम (नाशिक ग्रामीण), श्रीकांत डिसले (परभणी) व समीरसिंह साळवे (सोलापूर ग्रामीण).
==========================================
उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्ण घोषित
- मुंबई : अवयवदानाचा टक्का वाढत असताना महापालिका रुग्णालयेही सक्रिय होत आहेत. उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच राजावाडी रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर, या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले. या मुलाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृतदान केल्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे.१६ वर्षीय मुलाचा अपघात झाल्यावर त्याला राजावाडी रुग्णालयात २१ जून रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी निदान केले. २४ जूनला या मुलाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान झाल्यावर २५ जून रोजी त्याला गोदरेज रुग्णालयात हलवण्यात आले. २५ जूनला रात्री पावणेदोनच्या सुमारास या मुलाचे अवयवदान करण्यात आले. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी या मुलाचे हृदय काढण्यात आले आणि अवघ्या २३ मिनिटांत २३ किमीचे अंतर कापून हृदय कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
==========================================
इराकी लष्कराने पुन्हा फालुजा शहर जिंकले
- बगदाद : इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील फालुजा या महत्त्वाच्या शहरावर इराकी लष्कराने नियंत्रण मिळविले आहे. फालुजा हे शहर इसिसचा गढ मानला जात होता. या शहरातील युद्ध समाप्त झाल्याची घोषणा इराकने केली आहे.दहशतवादविरोधी मोहिमेत इराकी लष्कराचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल अब्दुल वहीद अली सादी यांनी सांगितले की, शहराच्या काही भागावर इसिसचे नियंत्रण होते. आता संपूर्ण शहरच आमच्या ताब्यात आले आहे. फालुजा इसिसच्या ताब्यातून पूर्ण स्वतंत्र करण्यात आले आहे. जानेवारी २०१४ मध्ये इसिसने या शहरावर ताबा मिळविला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला इराकी लष्कराने शहरावर कारवाई करण्यास प्रारंभ केला होता आणि स्थानिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगितले होते. फालुजा ताब्यात घेताना करण्यात आलेल्या कारवाईत इसिसचे किमान १,८०० दहशतवादी ठार झाले, असे सादी यांनी सांगितले.
==========================================
‘ब्रेक्झिट’वरून लेबर पक्षात बंडाळी!
- लंडन : युरोपीय महासंघात ब्रिटनने राहावे की नाही, या मुद्यावर घेण्यात आलेले सार्वमत हाताळण्यावरून येथील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्याविरुद्ध बंड झाले आहे. त्यांनी शॅडो कॅबिनेटमधील परराष्ट्रमंत्र्यांना काढून टाकले असून, अन्य तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे.कॉर्बिन यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य शॅडो परराष्ट्रमंत्री हिलरी बेन यांनी केले होते. त्यांनी तसे विधान करताच कॉर्बिन यांनी त्यांना काढून टाकले. त्यानंतर थोडक्याच वेळात आरोग्यमंत्री हैदी अलेक्झांडर यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर ग्लोरिया डे पियरो आणि अलन मरे यांनीही राजीनाम्याची घोषणा केली.आता शॅडो कॅबिनेटमधील अन्य मंत्रीही राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. हे सर्व जण कॉर्बिन यांच्यावर नाराज असून, ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. यापुढेही कॉर्बिन नेतेपदी राहिल्यास सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला विजय मिळण्याची आपल्याला खात्री नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कॉर्बिन यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाला असला तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बेन अन्य शॅडो मंत्र्यांना राजीनामे देण्यासाठी चिथावणी देत आहेत. लेबर खा. डेम मार्गारेट आणि अॅन कॉफी यांनी कॉर्बिन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. या प्रस्तावाला घटनात्मक पाठबळ नसले, तरीही त्यातून कॉर्बिन यांच्याविरुद्ध असलेला असंतोष जाहीर झाला आहे.
==========================================
रोख व्यवहारांवर ब्लॉकचेनचा उपाय
- मुंबई : चलनातील नोटांची स्थिती चांगली राखणे, खराब झालेल्या नोटा बाद करून त्या ऐवजी नव्या नोटा बाजारात आणून स्थैर्य राखणे आणि एकूणच नव्या नोटा छापणे व त्याचे वितरण यावरली वार्षिक खर्चाने तब्बल १,८०० कोटी रुपयांचे प्रमाण गाठल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिक कडक पवित्रा घेत कॅशलेस व्यवहारांसाठी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या कॅशलेस व्यवहारांच्या प्रचलित मार्गांसोबतच ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या वापराचीही चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन करण्याचे संकेत दिले असून या समितीच्या निष्कर्षानंतर आर्थिक व्यवहारात नवी साधने किंवा नव्या पद्धती विकसित करण्यात येणार आहेत.ब्लॉकचेनच्या या तंत्रज्ञानाची संकल्पना ही बिटकॉईनवर आधारीत असून, काही देशांतल्या मध्यवर्ती बँकांनी चलनी व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी या डिजिलट चलनाचा वापर प्रायोगित तत्वावर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर आता भारतातही या तंत्राचा वापर करता येईल का, याची चाचपणी या समितीद्वारे केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे, हे चलन फक्त आणि फक्त आॅनलाईन आणि डिजिटल तंत्राद्वारे वापरले जात असल्यामुळे कागदी अथवा प्रत्यक्ष चलनाचा वापर होत नाही. परिणामी, कागदी चलनाच्या निर्मितीपासून जोपासनेपर्यंतच्या खर्चात मोठी बचत होते.
==========================================
नगदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर टीसीएसचा फटका?
- अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, शासनाने आयकरात सर्व वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर टीसीएसची तरतूद आणली व त्यानंतर यावर अनेक वादविवाद, चर्चा सर्वत्र दिसून आली. तर या टीसीएसच्या तरतुदीमध्ये नेमके काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे व करदाते फक्त ५ कोटी आहेत. परंतु मोटार खरेदी व सोने खरेदी करणारे कोट्यवधी लोक आहेत. या सर्व लोकांकडे पैसा येतो कोठून? यासाठी शासनाने ही नवीन टीसीएसची तरतूद आणली आहे. टीसीएसची तरतूद आधीपासून काही विशिष्ट वस्तूंसाठी आहे. परंतु १ जून २0१६पासून टीसीएसचा आवाका वाढला आहे. सर्व वस्तूंच्या रोखीने खरेदी व विक्रीवर टीसीएस लागू केला आहे व काही मर्यादा नमूद केल्या आहेत. ज्यामुळे नगदीने होणाऱ्या मोठ्या व्यवहारांची शासनाला माहिती मिळेल व काळ्या पैशावर निर्बंध लागेल. ही तरतूद स्पष्ट होण्यासाठी शासनाने यावर प्रश्न - उत्तराचे सर्क्युलर काढले आहे.
==========================================
सिंगापूर - इटलीमधील मिलान येथे जाणाऱ्या सिंगापूरच्या एका विमानास प्रवासादरम्यान आग लागल्याने ते आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवावे लागले.
उड्डाण झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आल्यानंतर वैमानिकाने यासंदर्भातील घोषणा केली. यामुळे विमान तातडीने परत फिरविण्यात येऊन धावपट्टीवर उतरविण्यात आले. यानंतर या बोईंग 777 च्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे आढळून आले. विमानामधील 222 प्रवासी आणि 19 कर्मचाऱ्यांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले.
या विमानास लागलेली आग विझविण्याकरिता अग्निशमन दलास सुमारे 10 मिनिटे लागली. आता या प्रवाशांना मिलान येथे जाण्यासाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यात आली असल्याची माहिती सिंगापूर एअरलाईन्सने एका निवेदनाद्वारे दिली.
प्रवासादरम्यान बोईंग विमानाला लागली आग
| |
-

भारतीयांचा परदेशात 13 हजार कोटींचा काळा पैसा
| |
-
| |
नवी दिल्ली - परदेशातील बॅंक खात्यात भारतीय नागरिकांनी ठेवलेल्या सुमारे 13 हजार कोटींच्या काळ्या पैशाची माहिती मिळविण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. प्राप्तिकर विभागाला 2011 मध्ये 400 तर 2013 मध्ये 700 बॅंक खात्यांची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्स सरकारने जिनिव्हा येथील एचएसबीसी बॅंकेत भारतीय नागरिकांकडून जमा करण्यात आलेल्या 400 बॅंक खात्यांची माहिती भारत सरकारला दिली होती. प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केल्यानंतर या बॅंक खात्यांमध्ये 8,186 कोटींचा काळा पैसा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ‘इंटरनेशनल कंजोर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स‘ (आयसीआयजे) या संकेतस्थळावर 2013 मध्ये भारतीय नागरिकांद्वारे उघडण्यात आलेल्या 700 बॅंक खात्यांचा तपशिल खुला करण्यात आला होता. त्यातही 5000 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली होती. या दोन्ही मिळून 1100 खात्यांमध्ये भारतीयांच्या 13000 हजार कोटींच्या काळ्या पैशाची माहिती मिळाली आहे.
प्राप्तिकर विभागाकडून यावर 5,377 कोटींचा कर आकारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या मन की बात मधून बेकायदेशीररित्या संपत्ता बाळगणाऱ्यांना संपत्ती जाहीर करण्यास सांगितले आहे. बेकायदेशीररित्या संपत्ती असणाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत संपत्ती जाहीर करण्याची मुदत देण्यात आली आहे. सप्टेंबर 2015 पर्यंत 1100 खात्यांपैकी फक्त 638 खातेधारकांनी 3770 कोटींच्या काळ्या पैशाचा खुलासा केला आहे.
==========================================
भारताला मिळणार 'एमटीसीआर'चे सदस्यत्व
| |
-
| |
लवकरच करार होण्याची शक्यता; उच्च क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार
नवी दिल्ली - अणू पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळाले नसले, तरी भारत मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचा (एमटीसीआर) सदस्य होण्यास सिद्ध झाला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर येत्या एक ते दोन दिवसांत याबाबतच्या करारावर सही करतील, असा सूत्रांचा अंदाज आहे.
"एमटीसीआर‘ हा अत्यंत महत्त्वाचा गट असून "एनएसजी‘बरोबरच या गटाचेही सदस्यत्व मिळण्याचा भारताचा प्रयत्न होता. आज (ता. 27) होणाऱ्या एका कार्यक्रमात या गटाचे फ्रान्स, नेदरलॅंड आणि लक्झेंबर्ग हे तीनही अध्यक्षीय मंडळातील देश (अनुक्रमे माजी, आजी आणि भावी) एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. "या गटाचे सदस्यत्व मिळाल्यास एनएसजी, ऑस्ट्रेलिया गट आणि वेसनार ऍरेंजमेंट या इतरही गटांचे सदस्यत्व मिळण्यास अडचण येणार नाही, कारण अणुऊर्जेच्या वापराचा भारताचा इतिहास चांगला आहे,‘ असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.

भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचा धक्का
| |
-
| |
ढाका - भारत-बांगलादेश सीमेवर आज (सोमवार) सकाळी भूकंपाचा सौम्या धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी मोजण्यात आली आहे.
भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. बांगलादेशमधील माणिकचारी शहरापासून दक्षिणेकडे 21 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचा धक्का जाणवू लागल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या भूकंपाचे धक्का भारताच्या ईशान्येकडील आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांनाही बसले आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये याच भागाला 6.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये सुमारे 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
==========================================
नवी दिल्ली - पंचम दा नावाने प्रसिद्ध असलेले महान संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त आज (सोमवार) गुगलने विशेष डुडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आर. डी. बर्मन यांना गुगलकडून श्रद्धांजली
| |
-
| |
गुगल इंडियाच्या होम पेजवर बर्मन यांचे छायाचित्र दाखविण्यात आले आहे. या छायाचित्रात बर्मन गळ्यात मफलर घेतलेल्या स्थितीत दिसत आहेत. आर डी बर्मन यांना चित्रपट क्षेत्रात पंचम दा नावाने ओळखले जाते. आर. डी. लहानपणापासून जेव्हा गुणगुणत असे तेव्हा ते शब्दाची सुरवात प अक्षरापासून करत असे. त्यांची ही गोष्ट अभिनेते अशोक कुमार यांच्या लक्षात आली. सारेगामापामध्ये प हे पाचव्या स्थानावर येत असल्याने, त्यांनी बर्मन यांना पंचम या नावाने हाक मारण्यास सुरवात केली. तेव्हापासून त्यांचे पंचम दा हे नाव प्रसिद्ध झाले.
==========================================
ब्रिजटाऊन - विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडीजचा 59 धावांनी सहज पराभव करत तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळविले आहे.
ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेचे विजेतेपद
| |
-
| |
वेस्टइंडीजमध्ये खेळविण्यात आलेल्या या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश होता. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्टइंडीजचा संघ निष्प्रभ ठरला. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने निर्णायक क्षणी केलेल्या 57 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 270 धावांपर्यंत मजल मारली होती. एकक्षणी ऑस्ट्रेलियाची 6 बाद 173 अशी अवस्था होती. पण, वेडने केलेल्या खेळीने ऑस्ट्रेलियाला 250 धावांचा टप्पा पार करता आला. त्यापूर्वी ऍरॉन फिंच (47) आणि स्टिव्ह स्मिथ (46) यांनी अर्धशतकी भागीदारी नोंदविली होती.
==========================================
No comments:
Post a Comment