[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; केर्न्सविरुद्ध फिक्सिंगचे पुरावे खरेच : मॅक्युलम
२- पॅरिस; फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण
३- दोहा; कतारकडून २३ भारतीयांची सुटका
४- लंडन; इसिसकडून युरोपात आण्विक हल्ल्याची भीती
५- वॉशिंग्टन; अॅमेझॉनची भारतात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- अमेरिकेचा पाठिंबा, भारताचा MTCR सदस्यत्वाचा मार्ग मोकळा
७- मेडिकल पाठोपाठ इंजिनीयरिंगसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा
८- जागतिक विकासाचे इंजिन बनायला भारत सज्ज - पंतप्रधान मोदी
९- भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ-साध्वी
१०- भाजपने देशाला बोलणारा पंतप्रधान दिला - शहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- वाहन नियम मोडल्यास चालक, मालक दोघांवरही गुन्हा- दिवाकर रावते
१२- मुख्यमंत्र्यांनीच घेतली खडसेंची विकेट - राणे
१३- कामत समर्थनार्थ 25 काँग्रेस नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
१४- मुंबई मेट्रो-3 वरुन शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस कायम
१५- 'मुंबईतील 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत', नितेश राणेंचा गौप्यस्फोट
१६- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम'
१७- ‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- ग्वालियर; गोविंदाच्या गाण्यावर योग डान्स, अश्लीलतेचा आरोप
१९- मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू
२०- सांगली; डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईक चोरी, तरुण अटकेत
२१- दापोली; अवघ्या 5 टक्क्यांसाठी तिनं आयुष्य संपवलं
२२- मेवाट; रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार
२३- अहमदाबाद; भगवान स्वामीनारायणांच्या मूर्तीला संघाचा गणवेश
२४- लखनऊ; जवाहर बागेत सापडले रॉकेट लॉन्चर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- विराटचा आवाज, रहमानचं संगीत, गाण्याचं रेकॉर्डिंग
२६- ख्रिस केर्न्सवरील फिक्सिंगच्या आरोपावर मॅक्युलम ठाम
२७- माझा निर्णय बीसीसीआय घेईल : धोनी
२८- सचिन, रहमानच्या निवडीवर वादंग का नाही? सलमानचा सवाल
२९- धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना
३०- 32 वेळा 'सैराट' पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची 'झिंगाट' बाईक!
३१- 'मी 12वीत नापास, पण अपयशाने खचली नाही,' 'सैराट'मधील अभिनेत्रीचा विद्यार्थ्यांना सल्ला
३२- 'मोहेंजोदारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
बालाजी जाधव, गजानन पोटपिल्लीवार, उत्तम टेकाळे, प्रभाकर तामशेट्टे, संघदीप गायकवाड, सतीश देशमुख, बलराज सिंघ, संजीवनी देशमुख, पांडुरंग मुसळे, राज मांजरमकर, निखील झोम्पलवाड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
====================================

मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. यातील कामत गटाच्या 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. कामतांच्या राजकीय संन्यासाला विरोध दर्शवण्यासाठी असंतुष्ट काँग्रेस नगरसेवक धरणं आंदोलन करत आहेत.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मंगळवारीच पक्षनेतृत्वाला पत्र लिहून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत.
पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
.
.====================================

.
.====================================

जो देश अण्वस्त्र अपप्रसार समूहात समाविष्ट नाही, त्याला एनएसजीमध्ये सहभागी करुन घेण्यास इतर सदस्य देशांमध्ये मतभेद असल्याचं चीनने लिखित स्वरुपात स्पष्ट केलं आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सहभागाबाबत सर्वसमावेशक चर्चा केल्यानंतर, ज्या निर्णयावर सहमती होईल त्याला आपला पाठिंबा असेल, असं चीनने सांगितलं आहे.
एनएसजीमध्ये 34 सदस्य देश असून भारताच्या सहभागाबद्दल अमेरिकेचा पाठिंबा आहे. दुसरीकडे चीन मात्र पाकिस्तानचं समर्थन करत असल्याचं म्हटलं जातं. विएन्नामध्ये 9 जून रोजी होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णयाची अपेक्षा आहे.
.
.====================================

देशातील सर्व इंजिनीयरिंग कॉलेजांचं नियंत्रण करणाऱ्या एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याबाबत चाचपणी सुरु केलीय. मेडिकल काऊन्सिल आणि सीबीएसईने ज्याप्रमाणे एआयपीएमटी या परीक्षेला नीटमध्ये परावर्तीत केलं तसंच इंजिनीयरिंगच्या जेईई मेन या प्रवेश परीक्षेला देशभरात लागू करण्याचा विचार आहे. जेईई ही परीक्षाही सीबीएसईमार्फतच आयोजित केली जाते. सध्या जेईई मुख्य या परीक्षेच्या गुणांवर आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजांचे प्रवेश निश्चित केले जातात.
सध्या देशातील काही राज्यांच्या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी केंद्राच्या म्हणजेच सीबीएसईच्या जेईई मेन या प्रवेश परिक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. ही राज्ये त्यांच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतच नाहीत. महाराष्ट्रात मात्र एमच सीईटी ही वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यातील एमएच सीईटीच्या परीक्षेत एसएससी बोर्डाचा बारावीचा अभ्यासक्रम आहे.
.
.====================================

विराटने रोहित शर्माच्या लग्नात लगावलेले ठुमके, किंवा अनेक इव्हेंट्समध्ये केलेला डान्स सर्वांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळा अनेकांनी अनुभवला आहे. मात्र आता प्रोफेशनल स्टुडिओत रेकॉर्ड झालेलं गाणं चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.
प्रिमिअर फुत्सल लीगच्या अधिकृत अँथमचा काही भाग विराटच्या आवाज स्वरबद्ध करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोची, हैदराबाद आणि बंगळुरु या आठ टीम्स प्रिमिअर फुत्सल लीगमध्ये भिडणार आहेत. 15 ते 24 जुलै दरम्यान हे सामने खेळवले जातील. फुत्सल हे फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन आहे. हा प्रकार युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध असून इंडोर खेळला जातो.
‘नाम है फुत्सल..’ असे गाण्याचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या दोन आठवड्यात लाँच होणार आहे. आठवड्याभरापासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट दिल्याचं रहमान यांनी सांगितलं. गाण्याचे बोल इंग्रजीत असून विराटला सोपं जावं म्हणून रॅपसह वेगळ्या पद्धतीचं मिक्सिंग केल्याचंही ते सांगतात.
विराटने मात्र ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करताना नर्व्हस असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी या व्यक्तीशी निगडीत आहेत. क्रिकेटची तयारी कशी करायची, हे मला माहित आहे, मात्र गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे.
.
.====================================

.
.====================================

.
.====================================

रिओ ऑलिम्पिकचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नाव जाहीर झाल्यावर सोशल मीडियातून सलमान खानवर मोठी टीका झाली. सोशल मीडियातील ही टीका पुढे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्येही दिसली. एक बॉलीवूड अभिनेता क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटचा ब्रँड अॅम्बेसिडर कसा होईल, असा प्रश्न सर्वांना पडला, तोच प्रश्न सचिन तेंडुलकर किंवा ए. आर. रहमान यांच्याबाबतीत पडला नाही.
.
.====================================

.
.====================================

ग्वाल्हेरमध्ये आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या एका योग शिबिरात हिंदी गाण्यांवर अनोखा डान्स सुरु होता. मुळात या डान्सला योग म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. गोविंदा आणि करिष्मा कपूरच्या ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु’ या गाण्यावर शेकडो स्त्री पुरुष अक्षरशः थिरकत होते.
विशेष म्हणजे या शिबिरात योगगुरु देखील जीन्स आणि शर्ट घालून भक्तांसोबत डान्स करत होते. पुरुषांनी तर शर्ट उतरवून या डान्समध्ये सहभाग घेतला.
शिबिरात अश्लीलता पसवल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिबिरावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार केल्यानंतर शिबिर बंद पाडलं.
.
.====================================

.
.====================================

.
.====================================

.
.====================================

.
.====================================

.
.====================================

.
.====================================

.
.====================================
.====================================
.====================================
.====================================
.====================================
.====================================
.====================================
.====================================
.====================================
लंडन - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून संहारक शस्त्रास्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन) मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये दहशतवादी आण्विक हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शीतयुद्धाच्या काळानंतर प्रथमच युरोपला हा धोका निर्माण झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
""इसिसने सीरियामध्ये अनेक रासायनिक हल्ले घडविले आहेत. आता युरोपमध्ये आण्विक हल्ला घडविण्याच्या प्रयत्नांत इसिस असल्याची आपल्याला माहिती आहे. याचबरोबर जुन्या सोव्हिएत संघराज्यामधील आण्विक संशोधन केंद्रांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या गंभीर त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम युरोपमध्ये आण्विक हल्ला होण्याची गंभीर शक्यता आहे,‘‘ असे इंटरनॅशनल लक्झेंबर्ग फोरम या थिंक टॅंकचे अध्यक्ष मोशे कंटोर यांनी म्हटले आहे. या संस्थेच्या सभासदांमध्ये रशिया व पश्चिम युरोपमधील ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी व माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
.
.====================================
अहमदाबाद - सूरतमधील स्वामीनारायण यांच्या मंदिरातील भगवान स्वामीनारायण यांच्या मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश घालण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सूरत शहरातील लास्काना परिसरात असलेल्या मंदिरातील भगवान स्वामीनारायणांच्या मूर्तीला खाकी रंगाची अर्धी पॅंट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट चढविण्यात आला आहे. त्यांच्या हातात भारताचा तिरंगा देण्यात आला आहे. असा गणवेश घातलेले मूर्तीचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे ही बाब समोर आली. मंदिरातील स्वामी विश्वप्रकाश यांनी दिलेल्या याबाबत बोलताना सांगितले, ‘मूर्तीसाठी भाविकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश भेट दिले जातात. एका स्थानिक भाविकाने संघाचा गणवेश भेट दिला होता. त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता.‘ यामुळे वाद निर्माण होतील असे आम्हाला वाटलेही नाही, असेही विश्वप्रकाश म्हणाले. मंदिर प्रशासनानेही यामागे काही हेतू असल्याचे नाकारले आहे.
.
.====================================
.
.====================================
रुरकी - विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत भारताला आता मुस्लिममुक्त करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.
.
.====================================
वॉशिंग्टन - अमेरिकेतील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणूकीमुळे भारतातील स्टार्टअप उद्योगाला चालना मिळेल, तसेच कल्पक आणि डिजिटल उद्योजकतेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल, असा विश्वास अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी व्यक्त केला.
.
.====================================
कणकवली - मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेल्या एकनाथ खडसे यांची विकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली. खडसे यांनी राजीनामा द्यावा यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप आमदार नारायण राणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
राणे म्हणाले, ""बहुजन समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी केले होते. तेव्हापासून खडसे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्याची परिणती खडसे यांचा राजीनामा घेण्यात झाली. खडसे यांच्यावर ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक आरोप होत आहेत ते पाहता यामागे नक्कीच कारस्थान आहे. एकट्या खडसे यांच्यावरच आरोप नाहीत, तर मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन, गिरीश बापट या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होते; पण बळी खडसे यांचाच घेण्यात आला.‘‘
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे एक नंबरचे थापाडे आहेत. त्यांनी 900 कोटींचा निधी कुठल्या योजनांतून आणला ते जाहीर करावे. अन्यथा येत्या अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणू, असा इशारा राणे यांनी केला. 900 कोटींचा निधी त्यांनी आणला असेल, तर तो जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सादर करावा. अन्यथा त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणल्याखेरीज राहणार नाही, असे ते म्हणाले.
.
.====================================
.
.====================================
१- लंडन; केर्न्सविरुद्ध फिक्सिंगचे पुरावे खरेच : मॅक्युलम
२- पॅरिस; फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण
३- दोहा; कतारकडून २३ भारतीयांची सुटका
४- लंडन; इसिसकडून युरोपात आण्विक हल्ल्याची भीती
५- वॉशिंग्टन; अॅमेझॉनची भारतात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- अमेरिकेचा पाठिंबा, भारताचा MTCR सदस्यत्वाचा मार्ग मोकळा
७- मेडिकल पाठोपाठ इंजिनीयरिंगसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा
८- जागतिक विकासाचे इंजिन बनायला भारत सज्ज - पंतप्रधान मोदी
९- भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ-साध्वी
१०- भाजपने देशाला बोलणारा पंतप्रधान दिला - शहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- वाहन नियम मोडल्यास चालक, मालक दोघांवरही गुन्हा- दिवाकर रावते
१२- मुख्यमंत्र्यांनीच घेतली खडसेंची विकेट - राणे
१३- कामत समर्थनार्थ 25 काँग्रेस नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
१४- मुंबई मेट्रो-3 वरुन शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस कायम
१५- 'मुंबईतील 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत', नितेश राणेंचा गौप्यस्फोट
१६- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम'
१७- ‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- ग्वालियर; गोविंदाच्या गाण्यावर योग डान्स, अश्लीलतेचा आरोप
१९- मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू
२०- सांगली; डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईक चोरी, तरुण अटकेत
२१- दापोली; अवघ्या 5 टक्क्यांसाठी तिनं आयुष्य संपवलं
२२- मेवाट; रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार
२३- अहमदाबाद; भगवान स्वामीनारायणांच्या मूर्तीला संघाचा गणवेश
२४- लखनऊ; जवाहर बागेत सापडले रॉकेट लॉन्चर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- विराटचा आवाज, रहमानचं संगीत, गाण्याचं रेकॉर्डिंग
२६- ख्रिस केर्न्सवरील फिक्सिंगच्या आरोपावर मॅक्युलम ठाम
२७- माझा निर्णय बीसीसीआय घेईल : धोनी
२८- सचिन, रहमानच्या निवडीवर वादंग का नाही? सलमानचा सवाल
२९- धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना
३०- 32 वेळा 'सैराट' पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची 'झिंगाट' बाईक!
३१- 'मी 12वीत नापास, पण अपयशाने खचली नाही,' 'सैराट'मधील अभिनेत्रीचा विद्यार्थ्यांना सल्ला
३२- 'मोहेंजोदारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
बालाजी जाधव, गजानन पोटपिल्लीवार, उत्तम टेकाळे, प्रभाकर तामशेट्टे, संघदीप गायकवाड, सतीश देशमुख, बलराज सिंघ, संजीवनी देशमुख, पांडुरंग मुसळे, राज मांजरमकर, निखील झोम्पलवाड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
====================================
कामत समर्थनार्थ 25 काँग्रेस नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. माजी खासदार गुरुदास कामत यांना समर्थन देण्यासाठी पालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. यातील कामत गटाच्या 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. कामतांच्या राजकीय संन्यासाला विरोध दर्शवण्यासाठी असंतुष्ट काँग्रेस नगरसेवक धरणं आंदोलन करत आहेत.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मंगळवारीच पक्षनेतृत्वाला पत्र लिहून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत.
पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.
.====================================
मुंबई मेट्रो-3 वरुन शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस कायम
मुंबई: मुंबई मेट्रो-3 वरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेलं कुरघोडीचं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही.
शिवसेनेनं आपला मेट्रोविरोध कायम ठेवत मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांना हाताशी धरुन भाजपला एकाकी पाडलं. तसेच मुंबई महापालिकेच्या १७ जागा मेट्रोला देण्याचा प्रस्तावही पुन्हा एकदा फेटाळून लावला.
कुलाबा ते सिप्झ दरम्यान धावणा-या मेट्रो ३ मार्गासाठी मुंबई महापालिकेचे १७ भूखंड कायमस्वरुपी देण्याचं प्रस्तावित आहे. यात आरे कॉलनीतल्या हरितपट्ट्याची जागा हा देखिल वादाचा विषय आहेच.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात सेनेनं हा प्रस्ताव विरोधकांच्या मदतीनं दुस-यांदा फेटाळून लावला.
.====================================
अमेरिकेचा पाठिंबा, भारताचा MTCR सदस्यत्वाचा मार्ग मोकळा
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या समर्थनामुळे भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला नियंत्रण करणाऱ्या संस्थेच्या (MTCR) सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप (NSG) अर्थात आण्विक पुरवठा करणाऱ्या देशांची यादीत भारताचा समावेश निश्चित मानला जात आहे.
चीनची चापलुसी :
एनएसजी सदस्यत्वासाठी भारताच्या दावेदारीला अमेरिकेने पाठिंबा दर्शवला होता. भारताला एनएसजी सदस्यांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी बहुमत घेण्यास चीनने सुचवलं होतं. भारताच्या समावेशाबाबत चीनने मौन राखलं असलं तरी सर्व देशांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्याकडे चीनचा भर होता.
जो देश अण्वस्त्र अपप्रसार समूहात समाविष्ट नाही, त्याला एनएसजीमध्ये सहभागी करुन घेण्यास इतर सदस्य देशांमध्ये मतभेद असल्याचं चीनने लिखित स्वरुपात स्पष्ट केलं आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सहभागाबाबत सर्वसमावेशक चर्चा केल्यानंतर, ज्या निर्णयावर सहमती होईल त्याला आपला पाठिंबा असेल, असं चीनने सांगितलं आहे.
एनएसजीमध्ये 34 सदस्य देश असून भारताच्या सहभागाबद्दल अमेरिकेचा पाठिंबा आहे. दुसरीकडे चीन मात्र पाकिस्तानचं समर्थन करत असल्याचं म्हटलं जातं. विएन्नामध्ये 9 जून रोजी होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णयाची अपेक्षा आहे.
.====================================
मेडिकल पाठोपाठ इंजिनीयरिंगसाठी देशभरात एकच प्रवेश परीक्षा
नवी दिल्ली : मेडिकलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ ला राज्यातील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी सूट मिळाल्याने हा विषय थंड होत नाही तोवरच इंजिनीयरिंगसाठीही एकच राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्याची चर्चा सुरु झालीय.
देशातील सर्व इंजिनीयरिंग कॉलेजांचं नियंत्रण करणाऱ्या एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याबाबत चाचपणी सुरु केलीय. मेडिकल काऊन्सिल आणि सीबीएसईने ज्याप्रमाणे एआयपीएमटी या परीक्षेला नीटमध्ये परावर्तीत केलं तसंच इंजिनीयरिंगच्या जेईई मेन या प्रवेश परीक्षेला देशभरात लागू करण्याचा विचार आहे. जेईई ही परीक्षाही सीबीएसईमार्फतच आयोजित केली जाते. सध्या जेईई मुख्य या परीक्षेच्या गुणांवर आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजांचे प्रवेश निश्चित केले जातात.
सध्या देशातील काही राज्यांच्या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी केंद्राच्या म्हणजेच सीबीएसईच्या जेईई मेन या प्रवेश परिक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. ही राज्ये त्यांच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतच नाहीत. महाराष्ट्रात मात्र एमच सीईटी ही वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यातील एमएच सीईटीच्या परीक्षेत एसएससी बोर्डाचा बारावीचा अभ्यासक्रम आहे.
.====================================
विराटचा आवाज, रहमानचं संगीत, गाण्याचं रेकॉर्डिंग
मुंबई : इंडियन मोझार्ट अशी ज्याची ख्याती आहे, तो महान संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं गाण्याची अनेक मोठमोठ्या गायकांची इच्छा असते. मात्र ही संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे.
विराटने रोहित शर्माच्या लग्नात लगावलेले ठुमके, किंवा अनेक इव्हेंट्समध्ये केलेला डान्स सर्वांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळा अनेकांनी अनुभवला आहे. मात्र आता प्रोफेशनल स्टुडिओत रेकॉर्ड झालेलं गाणं चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.
प्रिमिअर फुत्सल लीगच्या अधिकृत अँथमचा काही भाग विराटच्या आवाज स्वरबद्ध करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोची, हैदराबाद आणि बंगळुरु या आठ टीम्स प्रिमिअर फुत्सल लीगमध्ये भिडणार आहेत. 15 ते 24 जुलै दरम्यान हे सामने खेळवले जातील. फुत्सल हे फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन आहे. हा प्रकार युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध असून इंडोर खेळला जातो.
‘नाम है फुत्सल..’ असे गाण्याचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या दोन आठवड्यात लाँच होणार आहे. आठवड्याभरापासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट दिल्याचं रहमान यांनी सांगितलं. गाण्याचे बोल इंग्रजीत असून विराटला सोपं जावं म्हणून रॅपसह वेगळ्या पद्धतीचं मिक्सिंग केल्याचंही ते सांगतात.
विराटने मात्र ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करताना नर्व्हस असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी या व्यक्तीशी निगडीत आहेत. क्रिकेटची तयारी कशी करायची, हे मला माहित आहे, मात्र गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे.
.====================================
ख्रिस केर्न्सवरील फिक्सिंगच्या आरोपावर मॅक्युलम ठाम
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलमनं आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटवर ताशेरे ओढले आहेत.
मॅक्युलमनं आपला संघसहकारी ख्रिस केर्न्सवरील मॅच फिक्सिंग आरोपांच्या प्रकरणी साक्ष दिली होती. आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटनं हे प्रकरण गांभीर्यानं हाताळलं नव्हतं, त्यामुळं आपल्या या व्यवस्थेवरील विश्वासला तडा गेलाय, असं मॅक्युलमनं म्हटलंय.
एमसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट व्याख्यान देण्यासाठी मॅक्युलमला आमंत्रित करण्यात आलं होतं. या व्याख्यानादरम्यान मॅक्युलम केर्न्सवरील आरोपांवर ठाम राहिला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंग्लंडमधल्या कोर्टानं केर्न्सची मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपांतून मुक्तता केली होती. 2011 सालच्या विश्वचषकानंतर मॅक्युलमनं केर्न्सविरोधात साक्ष दिली होती. पण आपल्या जबाबाचं व्हिडियो रेकॉर्डिंग करणं अँटी करप्शन युनिटचे अधिकारी जॉन ऱ्होड्स यांना गरजेचं वाटलं नाही. त्यांनी केवळ माझं म्हणणं कागदावर नोंदवून घेतलं असं मॅक्युलमनं स्पष्ट केलं. माझं नाव गुप्त राहिल अशी खात्री देण्यात आली होती, मग मीडियापर्यंत माझ्या कबुलीजबाबाची माहिती कशी पोहचली? तपासाची कार्यप्रणाली अधिक सक्षम व्हायला हवी, तरच क्रिकेटर्स कुठल्याही घटनेची माहिती देताना पुढाकार घेतील, हे मॅक्युलमनं स्पष्ट केलं.
.====================================
माझा निर्णय बीसीसीआय घेईल : धोनी
मुंबई : टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा कुणी सांभाळायची, याचा निर्णय बीसीसीआयच घेईल असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटलं आहे. यंग धोनी ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्याला रवाना झाली, त्यापूर्वी पत्रकारांशी गप्पा मारताना धोनीने आपलं मत मांडलं.
काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी मी निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर तिन्ही फॉरमॅटसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्याचा नक्कीच विचार केला असता असं म्हटलं होतं. त्याविषयी धोनीला विचारलं असता, त्यानं ही प्रतिक्रिया दिली.
मी खेळाची मजा लुटत असून, कर्णधारपदी कोणाची निवड करावी हा बीसीसीआयचा निर्णय आहे, असं धोनी म्हणाला.
.====================================
सचिन, रहमानच्या निवडीवर वादंग का नाही? सलमानचा सवाल
मुंबई : रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सलमान खानप्रमाणेच सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचंही नाव जाहीर झालं तेव्हा सोशल मीडिया किंवा अन्य प्रसारमाध्यमे गप्प का राहिली असा सवाल सलमान खानने केला आहे.
रिओ ऑलिम्पिकचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नाव जाहीर झाल्यावर सोशल मीडियातून सलमान खानवर मोठी टीका झाली. सोशल मीडियातील ही टीका पुढे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्येही दिसली. एक बॉलीवूड अभिनेता क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटचा ब्रँड अॅम्बेसिडर कसा होईल, असा प्रश्न सर्वांना पडला, तोच प्रश्न सचिन तेंडुलकर किंवा ए. आर. रहमान यांच्याबाबतीत पडला नाही.
.====================================
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईच्या माटुंगा परिसरातील डेढिया इस्टेट नावाची तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुषांचा समावेश असून एकाचं वय 45 वर्ष तर दुसऱ्याचं वय 60 वर्ष होतं.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा हटवला. जवानांनी ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
पोलिस आणि अग्निशमन दलाचं पथक स्लॅब दुर्घटनेची चौकशी करत आहेत.
.====================================
गोविंदाच्या गाण्यावर योग डान्स, अश्लीलतेचा आरोप
ग्वाल्हेर : योग म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर येत असतील एखादे ध्यानस्थ योगगुरु किंवा आसनं शिकवणारे एखादे गुरुजी. मात्र ग्वाल्हेरच्या एका योग शिबिरात चक्क बॉलिवूडच्या गाण्यांवरच योग डान्स सुरु असल्याचं समोर आलं आहे.
ग्वाल्हेरमध्ये आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या एका योग शिबिरात हिंदी गाण्यांवर अनोखा डान्स सुरु होता. मुळात या डान्सला योग म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. गोविंदा आणि करिष्मा कपूरच्या ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु’ या गाण्यावर शेकडो स्त्री पुरुष अक्षरशः थिरकत होते.
विशेष म्हणजे या शिबिरात योगगुरु देखील जीन्स आणि शर्ट घालून भक्तांसोबत डान्स करत होते. पुरुषांनी तर शर्ट उतरवून या डान्समध्ये सहभाग घेतला.
शिबिरात अश्लीलता पसवल्याचा आरोप अभाविपने केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिबिरावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार केल्यानंतर शिबिर बंद पाडलं.
.====================================
धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची यंग ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन टीम इंडियाने पहाटे 3 च्या सुमारास झिम्बाब्वेकडे प्रस्थान केलं.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.
झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार?
या दौऱ्यात प्रामुख्याने नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. धोनी वगळता एकही अनुभवी खेळाडू या दौऱ्यात नाही.
.====================================
डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईक चोरी, तरुण अटकेत
सांगली : डान्स क्लासची फी भागवण्यासाठी बाईकची चोरी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या जतमधील कोसारी गावातील जनार्दन कांबळेने जवळपास 18 दुचाकी लंपास करुन विकल्या. त्यामधून मिळालेल्या पैशातून डान्स क्लासचा खर्च भागवत होता.
जनार्दनला बालपणीचा बूगीवूगीचं वेड जडलं. पुढे डान्स इंडिया डान्ससारख्या रिअलिटी शोचं भूत मानगुटीवर बसलं. त्याची पावलं थिरकू लागली आणि तिच पावलं मुंबईच्या दिशेने वळली.
जनार्दन मुंबईत आला. प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईसकडे डान्स शिकू लागला. पण आधीच जिथे खायची भ्रांत तिथे कसली आलीय डान्सची फी. डान्स करणंच नव्हे तर जनार्दना मुंबईत राहणंही अशक्य होऊन बसलं. जनार्दन परत आला, पण डान्सचं वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. मग शौक पूर्ण करण्यासाठी जनार्दन चोर बनला.
.====================================
वाहन नियम मोडल्यास चालक, मालक दोघांवरही गुन्हा- दिवाकर रावते
मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या अपघातानंतर अपघात रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या वाहन चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. वेळप्रसंगी त्यांचे वाहन परवाने सुद्धा निलंबित केले जातील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
राज्य रस्ता सुरक्षा परिषद समितीची बैठक मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे अन्य मंत्री देखील उपस्थित होते.
एक्स्प्रेस मार्गावर आरटीओकडून वाहन तपासाणी
राज्यातील 85 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात, तर फक्त 15 टक्के अपघात हे तांत्रिक कारणामुळे होतात. वाहनांचे अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलीस आणि आरटीओ यांच्यामार्फत वाहनचालकांची व वाहनांची संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरुन अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर ट्रक आणि बसच्या वाहनचालकांना आठ तासापेक्षा अधिक काम करु देऊ नये, यावर उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असं रावते यांनी सांगितलं.
.====================================
'मुंबईतील 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत', नितेश राणेंचा गौप्यस्फोट
मुंबई: अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी पालिकांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांचेच ठाणे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी समोर आणली आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी एक-दोन नव्हे तर तब्बल 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत असून या स्टेशन्सकडे स्वत:च्या नावे वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नसल्याचे उघडकीस झाले आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेले चार महिने राज्याच्या गृहखात्याकडून पोलिसांच्या मुलभूत सोयी-सुविधांबाबत माहिती मिळविताना आम्हाला फार अडचणी आल्या. पोलिसांबाबत गृहखात्याचा कारभार अत्यंत हलगर्जीपणे चालवला जात असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केले.
‘गृहखात्याकडून आम्हाला आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नसले तरी मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी 72 पोलीस ठाणे अनधिकृत असल्याची माहिती आम्ही मिळवली आहे. अशी अनधिकृत स्टेशन्स सरकार चालवतेच कशी हा प्रश्न मला पडला आहे. राज्यात अनेक भूखंड स्वखर्चाने घेणाऱ्या सरकारकडे पोलीस स्टेशन्ससाठी निधी कसा नाही?’ असा सवालही त्यांनी केला.
एवढेच नव्हे तर पोलीस स्टेशन्सची सर्व बिले व तसेच स्टेशन्समध्ये लागणाऱ्या अन्य गोष्टींचा खर्चही वरिष्ठ पोलीस निरीक्षक उचलत असल्याचेही त्यांनी समोर आणले.
.====================================
32 वेळा 'सैराट' पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची 'झिंगाट' बाईक!
पुणे: सैराट चित्रपटानं महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद तर गाजलेच. त्याचबरोबर आर्ची आणि परशा म्हणजे रिंकू आणि आकाशचेही चाहते वाढले आहेत. पुण्यातल्या अशाच एका फॅननं आपली दुचाकीच सैराटमय करुन टाकली आहे.
स्वप्नील भोंडवे असं त्याचं नाव असून त्यानं नव्या कोऱ्या गाडीला सैराट करुन टाकलं. त्यानं गाडीवर आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेची फोटो गाडीवर लावले आहेत. यासाठी स्वप्नीलला 8 हजार खर्च आला असून त्यानं आतापर्यंत 32 वेळा सैराट चित्रपट पाहिला आहे.
विशेष म्हणजे स्वप्नीलची ही सैराट गाडी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. एवढंच नाहीतर गाडी फिरवण्यासाठी पुणेकरांनी स्वप्नीलकडे चक्क बुकिंग करायला सुरुवात केली आहे.
.====================================
'मी 12वीत नापास, पण अपयशाने खचली नाही,' 'सैराट'मधील अभिनेत्रीचा विद्यार्थ्यांना सल्ला
मुंबई: आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचण्याचं कारण नाही. कारण आयुष्यात स्वत:ला सिध्द करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही.
होय… कारण की, दापोलीतील एका विद्यार्थिनीनं अवघ्या 5 टक्क्यांसाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. आयुष्य संपवणं हे कोणत्याही अडचणीवरील उत्तर होऊ शकत नाही.
गेले काही दिवस ‘सैराट’ सिनेमाची बरीच चर्चा आहे. पण या सिनेमात आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाणारी अभिनेत्री देखील 12वीच्या परीक्षेत नापास झाली होती. खेळाची आवड त्यातही कब्बडीमध्ये राज्यपातळीवर मैदान गाजवणाऱ्या छाया कदम यांना देखील 12वीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. पण या अपयशानं त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्यानं काही तरी करण्यास सज्ज झाल्या.
अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे. 12वीत नापास झाले म्हणून मी कधी टोकाचं पाऊल उचललं नाही. असं म्हणत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.
.====================================
अवघ्या 5 टक्क्यांसाठी तिनं आयुष्य संपवलं
दापोली: दहावीत 80 टक्के गुण मिळूनही प्राची घडवले नावाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. खरं कब्बडी, वक्तृत्व यात हुशार असणाऱ्या या मुलीनं अपेक्षेपेक्षा पाच टक्के गुण कमी मिळाल्यामुळे आपलं जीवन संपवलं. खरं तर आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचून जाऊ नका. कारण आयुष्यात स्वताला सिध्द करण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही.
सोळा वर्षाच्या प्राची घडवलेनं ऐन उमेदीच्या काळात आयुष्य संपवलं. कारण काय तर दहावीत अपेक्षेपेक्षा 5 टक्के गुण कमी मिळाले. प्राचीला दहावीत थोडे-थोडके नाही तर 80 टक्के गुण मिळाले. पण तिची अपेक्षा 85 टक्क्यांची होती.
सोबतच्या मैत्रिणींना आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची बोच प्राचीला सहन झाली नाही. त्यामुळे प्राचीनं टोकाचं पाऊल उचललं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या आपटी इथं ही घटना घडली आहे.
प्राची वर्गातील हुशार विद्यार्थिनी. आठवीपासून ती नेहमी पहिल्या तीन क्रमांकामध्ये उत्तीर्ण व्हायची. फक्त अभ्यासातच नाही तर मैदानावरही पटाईत. त्यामुळे शाळेत एक उत्कृष्ट कब्बडीपटू अशी तिची ओळख. ऐवढंच नाही तर तिला वक्तृत्वाची देखील चांगली जाण. त्यामुळे तिनं आपल्या वक्तृत्वानं अनेक बक्षिसं जिंकली.
.====================================
'मोहेंजोदारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट !
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 08 - अभिनेता ह्रतिक रोशनच्या आगामी चित्रपट 'मोहेंजोदारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. ह्रतिक रोशनच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाद्वारे पूजा हेगडेदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. पूजाने २००९ साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता.ह्रतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून हा पोस्टर शेअर केला आहे. कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्या वादामुळे हृतिकच्या या चित्रपटाला फारच उशीर होत गेला. त्याचबरोबर रोशन कुटुंबियांचा होम प्रोडक्शन ‘काबील’ चित्रपटामुळे देखील या चित्रपटाचे शूटींग खुप लांबले. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आला होता.चित्रपटाचं शूटिंग भूज आणि मुंबईत करण्यात आलेलं आहे. जबलपूर आणि ठाण्यातही काही काळ चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटासोबत मोहेंजोदारो हा चित्रपट १२ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे.
.====================================
जागतिक विकासाचे इंजिन बनायला भारत सज्ज - पंतप्रधान मोदी
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. ८ - जगाला आज विकासाच्या नव्या इंजिनाची गरज आहे. भारत जागतिक विकासाचे नवे इंजिन बनून आपले योगदान द्यायला तयार आहे. भारताची अर्थव्यवस्था जितकी वाढेल त्याचे अनेक फायदे जगाला होणार आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकन उद्योगपतींना संबोधित करताना सांगितले.यावेळी जगाला विकासाच्या नव्या इंजिनाची गरज आहे. नवे इंजिन लोकशाहीचे असेल तर फार चांगले आहे. जागतिक विकासाचे नवे इंजिन बनून आपले योगदान द्यायला भारत सज्ज आहे असे मोदींनी सांगितले. आपल्या सरकारची उद्योगअनुकूल धोरणे आणि राबवलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.आपल्या सरकारच्या धोरणांमुळे भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यांनी अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करुन उत्पादन कारखाने सुरु करण्याचे आवाहन केले.
.====================================
रुग्णालयात महिला रुग्णावर वॉचमन आणि वॉर्डबॉयने केला बलात्कार
- ऑनलाइन लोकमतमेवाट, दि. ८ - नैराश्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २२ वर्षीय महिलेवर रुग्णालयातील दोन पुरुष कर्मचा-यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील मेवाट जिल्ह्यातील एसएचकेएम रुग्णालयात सोमवारी रात्री ही घटना घडली.पिडित महिलेला जबरदस्तीने रिकाम्या खोलीत नेण्यात आले तिथे ती महिला मदतीसाठी आरडाओरडा करणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. वॉर्ड बॉय आणि सुरक्षारक्षक दोघांनी मिळून बलात्कार केला. दोघे फरार असल्यामुळे अद्याप अटक झालेली नाही.रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्ड नंबर १७ मध्ये ही महिला दाखल होती. रात्री साडेअकराच्या सुमारास वॉर्डबॉयने तिला बाहेर बोलवले. बाहेर आल्यानंतर महिला तिचे नातेवाईक थांबलेल्या प्रतिक्षालयाच्या दिशेने जात असताना वॉर्ड बॉयने तिला मागून पकडले व जबरदस्तीने रिकाम्या खोलीत नेले.
.====================================
अपघात रोखण्यासाठी यंत्रणा
- मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर ब्रिफेन वायरही उभारण्यात येणार आहेत. रविवारी पहाटे पनवेलजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम अंतर्गत कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभे केले जाणार आहे. शिवाय ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांबरोबरच डेल्टा फोर्सच्या १०० जणांचे कृती दल उभारले जाणार आहे. त्यांना विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. महामार्गाच्या सुरक्षिततेवरही भर दिला जाईल. यात इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी यांचा समावेश आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामार्ग पोलीस आणि परिवहन या विभागांनी ३६५ दिवस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
.====================================
‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव
- मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले असून, आता ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाने राबविण्यात येणार आहे. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचे नाव देण्याचे विचाराधीन होते. तसे सूतोवाच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले होते. मात्र, राजीव गांधींचे नाव बदलून बाळासाहेबांचे नाव दिले, तर राजकीय गदारोळ होईल म्हणून महात्मा फुलेंचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे. या योजनेची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीचे यंदाचे वर्ष असून त्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. विमा संरक्षण रकमेत वाढ केली असून दरवर्षी प्रतिकुटुंब दीड लाख रु पयांऐवजी आता नव्या योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा करण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात येणार आहे. समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या ९७१ वरून ११०० एवढी करण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू वरील उपचाराचा खर्च तसेच सिकलसेल, अॅनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्धक्याचे आजार यांचा समावेश करण्यात आला आहे.
.====================================
केर्न्सविरुद्ध फिक्सिंगचे पुरावे खरेच : मॅक्युलम
- लंडन : ख्रिस केर्न्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आपण दिलेले स्पॉट फिक्सिंगचे पुरावे अगदी खरे आहेत. मी आपल्या भूमिकेवर ठाम असून अशा खेळाडूवर आजीवन बंदी लावली जावी, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने व्यक्त केले आहे.लॉर्डस् मैदानावर ‘एमसीसी स्पिरीट आॅफ क्रिकेट काऊड्री’ व्याख्यानमालेत बोलताना मॅक्युलम म्हणाला, ‘‘माझा एकेकाळचा सहकारी केर्न्सविरुद्ध मी दिलेले स्पॉट फिक्सिंगचे पुरावे अगदी खरे असून मी माझ्या मतावर ठाम आहे. केर्न्सवर आयसीसीने आजीवन बंदी लावायला हवी.’’ माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनीदेखील २०१२ मध्ये केर्न्सवर मॅचफिक्सिंगचा आरोप केला होता. नंतर ब्रिटनच्या कोर्टात हे प्रकरण सिद्ध होऊ शकले नाही. तो खटला केर्न्सने जिंकला होता. नंतर मॅक्युलमनेदेखील केर्न्सवर फिक्सिंगचे आरोप करीत सबळ पुरावे दिले होते.आपल्या भाषणात मॅक्युलम म्हणाला, ‘‘माझ्याशी कुणी फिक्सिंगबद्दल संपर्क केला असेल आणि ही माहिती मी व्यवस्थापनाला देणार नसेल तर मीदेखील दोषी आहे. मी ज्या सहकाऱ्यांना केर्न्सविषयी माहिती दिली त्यात माजी कर्णधार आणि माझा मित्र डॅनियल व्हेट्टोरीचा समावेश आहे. आयसीसी अधिकारी जॉन ऱ्होडस् यांना मी आणि व्हेट्टोरीने ही माहिती दिली. ते आम्हा दोघांना हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले. त्यांनी आमची तक्रार नोट केली, पण रेकॉर्डिंग केली नाही. ते कागदावर लिहित होते. त्याचवेळी मला पटले, की ऱ्होडस् यांची वृत्ती किती बेपर्वाईची आहे. मी त्यांना केर्न्सने दोनदा फिक्सिंगची आॅफर दिली होती, असे सांगूनही त्यांनी ही बाब तपशीलवारपणे सांगा, असे कधीही म्हटले नाही.
.====================================
फ्रान्समध्ये भीतीचे वातावरण
- पॅरिस : फ्रान्समध्ये आयोजित युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तरी यजमान देशाला दहशतवादी हल्ल्याची भीती सतावत आहे.१० जून ते १० जुलै या कालावधीत होणाऱ्या युरो कप स्पर्धेच्या निमित्ताने लाखो पर्यटक आणि जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी राहणार आहे. अशा स्थितीत फ्रान्सवर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याव्यतिरिक्त पर्यटक आणि मीडियाच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे.फ्रान्सच्या दहशतवादविरोधी शाखेचे एक अधिकारी म्हणाले,‘तयारीचा विचार करता आम्ही आमच्या पातळीवर योग्य खबरदारी घेतली आहे. पोलीस, अर्धसैनिक दल आणि मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहेत. पण, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला चिंता भेडसावत आहे. यापूर्वी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी रविवारी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.’राष्ट्रपतींनी फ्रान्स रेडिओवर म्हटले की,‘सुरक्षेच्या मुद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत आम्हाला भीती सतावत राहणार आहे, असे दुर्भाग्याने म्हणावे लागते. त्यामुळे युरो कपचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते पाऊल उचलावेलागणार आहे.
.====================================
कतारकडून २३ भारतीयांची सुटका
- दोहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर कतारने सद्भावनेचे पाऊल उचलत मंगळवारी २३ भारतीय कैद्यांची सुटका केली.मोदींनी कतारच्या नेतृत्वासमोर भारतीयांच्या कल्याणाचा मुद्दा उपस्थित केला होता. रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभी सद्भावनेचे पाऊल उचलत भारतीय कैद्यांची सुटका केल्याबद्दल मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी टिष्ट्वट केले की, ‘विशेष महिन्याच्या प्रारंभी सद्भावनेच्या भूमिकेतून विशेष पाऊल उचलण्यात आले. कतार सरकारने २३ भारतीय कैद्यांची सुटका केली. हे कैदी मायदेशी परतणार आहेत.’
.====================================
इसिसकडून युरोपात आण्विक हल्ल्याची भीती
| |
-
| |
""इसिसने सीरियामध्ये अनेक रासायनिक हल्ले घडविले आहेत. आता युरोपमध्ये आण्विक हल्ला घडविण्याच्या प्रयत्नांत इसिस असल्याची आपल्याला माहिती आहे. याचबरोबर जुन्या सोव्हिएत संघराज्यामधील आण्विक संशोधन केंद्रांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या गंभीर त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम युरोपमध्ये आण्विक हल्ला होण्याची गंभीर शक्यता आहे,‘‘ असे इंटरनॅशनल लक्झेंबर्ग फोरम या थिंक टॅंकचे अध्यक्ष मोशे कंटोर यांनी म्हटले आहे. या संस्थेच्या सभासदांमध्ये रशिया व पश्चिम युरोपमधील ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी व माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
.====================================
भगवान स्वामीनारायणांच्या मूर्तीला संघाचा गणवेश
| |
-
| |
सूरत शहरातील लास्काना परिसरात असलेल्या मंदिरातील भगवान स्वामीनारायणांच्या मूर्तीला खाकी रंगाची अर्धी पॅंट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट चढविण्यात आला आहे. त्यांच्या हातात भारताचा तिरंगा देण्यात आला आहे. असा गणवेश घातलेले मूर्तीचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे ही बाब समोर आली. मंदिरातील स्वामी विश्वप्रकाश यांनी दिलेल्या याबाबत बोलताना सांगितले, ‘मूर्तीसाठी भाविकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश भेट दिले जातात. एका स्थानिक भाविकाने संघाचा गणवेश भेट दिला होता. त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता.‘ यामुळे वाद निर्माण होतील असे आम्हाला वाटलेही नाही, असेही विश्वप्रकाश म्हणाले. मंदिर प्रशासनानेही यामागे काही हेतू असल्याचे नाकारले आहे.
.====================================
जवाहर बागेत सापडले रॉकेट लॉन्चर
| |
-
| |
लखनौ - मथुरेतील जवाहर बागेत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असून, याठिकाणी अमेरिकन बनावटीचे रॉकेट लॉन्चर सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जवाहर बाग येथे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवताना पोलिस आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या संघर्षात सुमारे 29 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. जवाहर बागेत अतिक्रमण केलेल्यांनी स्वतःच समांतर सरकार स्थापन केले आहे. प्रशासनाची सूत्रे हाती घेऊन न्यायालय व पोलिस कोठडीची उभारणी केली होती. 260 एकर परिसरातील जवाहर बागेत त्यांनी वसाहत निर्माण केली होती. शस्त्रधारी तीन-चार गट तयार करण्यात आले होते.
जवाहर बागेत अतिक्रमण केलेल्यांपैकी काही जण नक्षलवादी भागातून आले आहेत काय? या प्रश्नाला पोलिस महानिरीक्षक दुर्गाचरण मिश्रा यांनी हो असे उत्तर दिले. आता याठिकाणी रॉकेट लॉन्चर सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबरोबरच पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
.====================================
आता भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ-साध्वी
| |
-
| |
साध्वी प्राची यांनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता त्यांनी थेट भारताला मुस्लिम नागरिकांपासून मुक्त करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. साध्वी प्राची यांनी आपल्या या भाषणात बॉलिवूडमधील खान मंडळींवरही जोरदार टीका केली आहे.
साध्वी प्राची म्हणाल्या की, भारताला आपण काँग्रेसमुक्त बनविण्यात यशस्वी होत आहोत. आता भारत मुस्लिममुक्त करण्याची वेळ आहे. शाहरुख खानचे दोन चित्रपट फ्लॉप झाला की, हिंदू नागरिकांची आठवण होते. आमीर खानला त्याच्या आगामी दंगल चित्रपटातून परिणाम भोगावे लागतील. आमीरच्या चित्रपटात उंदीर दंगल करताना दिसतील. ही खान मंडळी खातात हिंदुस्तानात आणि गुणगान गातात पाकिस्तानाचे. पुढीलवर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविले पाहिजे. तसे झाल्यास भाजपला 300 जागा मिळतील आणि उत्तर प्रदेश मुस्लिममुक्त होईल.
.====================================
अॅमेझॉनची भारतात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक
| |
-
| |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बेझोस यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अॅमेझॉनकडून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीचा आकडा आता पाच अब्ज डॉलरवर पोचला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जेफ बेझोस यांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अॅमेझॉन भारतात यावर्षी ‘वेब सर्व्हिसेस क्लाऊड रिझन‘ स्थापन करणार आहे. त्यामुळे भारतातील हैदराबाद येथे तयार होणाऱ्या अॅमेझॉनच्या अमेरिकेबाहेरील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग अँड डेव्हलपमेंट केंद्रात हजारोंची रोजगारनिर्मिती होणार आहे. अॅमेझॉनचा भारतातील विस्तार वाढला आहे. विशेषतः टपाल खात्याशी भागीदारी केल्यानंतर कंपनीला देशातील सर्वच शहरांमध्ये पोचण्याची संधी मिळाली, असेही बेझोस यांनी नमूद केले.
.====================================
मुख्यमंत्र्यांनीच घेतली खडसेंची विकेट - राणे
| |
-
| |
राणे म्हणाले, ""बहुजन समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी केले होते. तेव्हापासून खडसे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्याची परिणती खडसे यांचा राजीनामा घेण्यात झाली. खडसे यांच्यावर ज्या पद्धतीने एकापाठोपाठ एक आरोप होत आहेत ते पाहता यामागे नक्कीच कारस्थान आहे. एकट्या खडसे यांच्यावरच आरोप नाहीत, तर मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन, गिरीश बापट या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होते; पण बळी खडसे यांचाच घेण्यात आला.‘‘
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे एक नंबरचे थापाडे आहेत. त्यांनी 900 कोटींचा निधी कुठल्या योजनांतून आणला ते जाहीर करावे. अन्यथा येत्या अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणू, असा इशारा राणे यांनी केला. 900 कोटींचा निधी त्यांनी आणला असेल, तर तो जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सादर करावा. अन्यथा त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणल्याखेरीज राहणार नाही, असे ते म्हणाले.
.====================================
भाजपने देशाला बोलणारा पंतप्रधान दिला - शहा
| |
-
| |
इटाह (उत्तर प्रदेश) - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सातत्याने प्रश्न करीत आहेत की गेल्या दोन वर्षांत भाजपने काय केले? या प्रश्नाचा समाचार घेताना पक्षाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, आम्ही देशाला बोलणारा पंतप्रधान दिला आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर व्यक्तींनी त्यांच्या पंतप्रधानांचा आवाज ऐकला नाही. जे त्यांना दहा वर्षांत जमले नाही ते आमच्या सरकारने दोन वर्षांत करून दाखविले, असा दावाही शहा यांनी केला.
उत्तर प्रदेश सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले की, "एनडीए‘ सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जनतेला सादर केले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशातील जनतेसाठी काय केले हे सांगितले पाहिजे.
उत्तर प्रदेशातील जनतेने आगामी निवडणुकीत भाजपला सत्ता दिल्यास राज्यात चोवीस तास वीजपुरवठा करण्यात येईल. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत देशातील नऊ हजार खेड्यांत वीजपुरवठा केला.
- अमित शहा, अध्यक्ष, भाजप

No comments:
Post a Comment