[अंतरराष्ट्रीय]
१- भारताने दहशतवादाला खतपाणी घालू नये-शरीफ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खराः सीबीआय
३- चांगल्या लोकांचा सन्मान नाही आणि वाईट लोकांना शिक्षा नाही - नितीन गडकरी
४- दिल्लीत अपहरण करुन चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप
५- कोल्हापूरचे संभाजीराजे राज्यसभेवर, राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती
६- प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा
६- सहा वर्षांत तीन हजार बालमजुरांची सुटका
७- वीरेंद्र तावडेची कोठडीत रवानगी; आणखी सहा संशयितांचे नावे पोलिसांच्या हाती
८- भाजप कार्यकारिणीत कॉंग्रेसमधून आलेल्यांना संधी
९- हिंदूंनी लोकसंख्या वाढवा - तोगडिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- नाशिक; एकनाथ खडसे भाजपच्या होर्डिंग्सवरुनही गायब
११- उत्तर प्रदेशचं मैदान जिंकण्यासाठी भाजप आज रणशिंग फुंकणार?
१२- येत्या काही तासातच मान्सून महाराष्ट्रात
१३- वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- जळगाव; पाचोरा-जामनेर दरम्यान नदी पुलावर रेल्वेचे 3 डबे घसरले
१५- हिमाचल प्रदेश; १५० फूट दरीत बस कोसळून ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
१६- सोळा हजार लातूरकर करणार देहदान!
१७- सलामीच्या पावसाने मुंबईकर आनंदले
१८- पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी तस्कर गोळीबारात ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'सैराट' आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक
२०- 'सैराट'ची १०० कोटींकडे वाटचाल, आता या तीन भाषेत येणार फिल्म
२१- युरो चषक : इंग्लंड-रशिया सामन्यांनतर समर्थकांमध्ये हाणामारी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- शिक्षण क्षेत्रातील व्यभिचार थांबल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य - आ. कवाडे
२३- सोनारी येथे वीज पडून दोन ठार; सहा जखमी
२४- भाववाढ रद्द करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या - जि.प.उपाध्यक्ष धोंडगे
२५- दलित विद्यार्थ्याकडून व्याजासह वस्तीगृह शुल्काची सक्तीने वसुली; स्वरातीमचा प्रताप
२६- किनवट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जिर्नोद्वार करण्याची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
ज्ञानेश्वर डोंगरे, रवी देशमुख, संभाजी बाराटे, विक्रम कोले, संजय पांचाळ, अशोक वाघमारे, प्रमोद जोंधळे, दत्ता गायकवाड, गगन यादव, रोषण राठोड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
====================================

नितीन गडकरी म्हणतात, ‘सरकार’ म्हणजे.....
सोलापूर : “चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होत नाही आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, यालाच सरकार म्हणतात.” अशी कोटी नितीन गडकरी यांनी केली. पण हे आपल्या सरकारमध्ये नाही, अशी पुष्टी जोडायला ते विसरले नाही. ते सोलापुरात बोलत होते.
जनता बँक सुवर्ण महोत्सवी वर्षापूर्ती कार्यक्रमासाठी ते सोलापुरात उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी सरकार नावाच्या यंत्रणेवर उपहासात्मक विधान केलं.
“उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च कमी झाला, तर औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल. त्यासाठी वाहतुकीच्या प्रचलित मार्गाऐवजी जलमार्गाचा अवलंब फायदेशीर ठरेल. देशात जलमार्ग विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ग्राहकांना वाजवी दरात उत्पादित माल मिळण्यासाठी जलमार्ग वाहतुकीचा पर्याय योग्य आहे.”, अस मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
====================================
एकनाथ खडसे भाजपच्या होर्डिंग्सवरुनही गायब
नाशिक : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा देऊन आठवडा उलटला नाही, तोच भाजपाच्या होर्डिंग्सवरुनही खडसे गायब झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिकच्या वसंत स्मृती या भाजपाच्या कार्यालयात अनुसूचित जमात मोर्चा विस्तार व पदग्रहण समारंभ सोहळ्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले होते, त्यानिमित्त भाजपाच्या कार्यालयाबाहेर अनेक होर्डिंग्स लावण्यात आले होते. त्यावर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, होर्डिंग्सवरील नेत्यांच्या फोटोंच्या रांगेत खडसे गायब होते.
याबद्दल सावरांशी विचारणा केली असता, चूक झाली असेल तर दुरुस्ती करू, असे त्यांनी सांगितले.
“एकनाथ खडसे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ते 40 वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याबद्दल आकस नसून प्रोटोकॉलनुसार त्या त्या वेळी वागावं लागतं”, असेही त्यांनी सांगितलं
====================================
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा 'तो' व्हिडिओ खराः सीबीआय
नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजेच जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा प्रकरणात कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे.
देशविरोधी घोषणांचा व्हिडीओ हा खरा असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही, असा दावा सीबीआयच्या फॉरेन्सिक लायब्ररीने केला आहे. सीबीआयच्या प्रयोगशाळेने दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या अहवालात हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगितलं आहे.
सीबीआयने हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. या आधारावर दिल्ली पोलिस जेएनयू प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. कन्हैया, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह 19 विद्यार्थ्यांची सीबीआयने ओळख पटवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
====================================
उत्तर प्रदेशचं मैदान जिंकण्यासाठी भाजप आज रणशिंग फुंकणार?
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या दोन दिवसीय बैठकीला आज अलाहबादमध्ये सुरुवात होत असून उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्याता आहे. या बैठकीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होत असून पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशमधील प्रमुख नेते तसेच सर्व भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
अलहाबादच्या केपी कॉलेज मैदानावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणाने होणार आहे. तर उद्या दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप होणार आहे.
या बैठकी दरम्यान आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. तसेच यासोबत पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.
====================================
येत्या काही तासातच मान्सून महाराष्ट्रात
मुंबईः मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात काही तासातच दाखल होणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यात होत असलेला पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई आणि लगतच्या उपनगरात काल मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाच्या सरीनं मुंबईकरांना चांगलच ओलंचिंब केलं. मुंबईप्रमाणे ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही वरूणराजा बरसला.
पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले होते. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्यांना पावसाच्या आगमनामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांचे डोळे आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत.
====================================
दिल्लीत अपहरण करुन चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप
नवी दिल्ली : दिल्लीतील सनलाईट परिसरातून एका तरूणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण घेण्यासाठी आलेल्या पीडित तरूणीचं स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन तरूणांनी अपहरण केलं. तिच्यावर गाडीतच अतिप्रसंग करून आईटीओ परिसरात तिला रस्त्यावरच फेकून दिलं आणि फरार झाले.
शनिवारी सकाळी साधारण साडेतीन वाजताच्या पीडितेनं पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पीडित तरूणीनं पोलिसांना स्वीफ्ट कारचा नंबर सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दोघेही आरोपी तरूण एमबीएचं शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यातला एक जण ऑस्ट्रेलियाहून भारतात परतला आहे. या दोघांवरही अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.
====================================
'सैराट' आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक
मुंबई: मराठीत दमदार कामगिरी करणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमा ‘सैराट’ आता लवकरच तेलुगूमध्येही येणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. सैराटनं आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे.
या सिनेमाचं नागराज मंजुळे हे स्वत: दिग्दर्शन करणार आहेत. अवघ्या महाराष्ट्राला ‘झिंगाट’ करुन सोडणारा हा सिनेमा दक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. मराठीत या सिनेमानं आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली असून अजूनही मोजणी सुरुच आहे. हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
सैराट हा सिनेमा 29 एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे.
29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.
====================================
कोल्हापूरचे संभाजीराजे राज्यसभेवर, राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती
नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींची निवड करण्यात आली आहे. संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकप्रकारे शह दिल्याचं मानलं जातं आहे.
संभाजीराजांच्या मदतीमुळं कोल्हापुरातली राजकीय ताकद वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. याआधी भाजपनं धनगर आरक्षणासाठी झगडणारे डॉक्टर विकास महात्मे आणि दलितांचं प्रतिनिधीत्व करणारे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. आता मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींची खासदार म्हणून नियुक्ती करून भाजपनं सोशल इंजीनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचं बोललं जातं आहे.
राष्ट्रपती कोट्यातून नियुक्त केलेले गायत्री परिवाराचे प्रणव पंड्या यांनी खासदारकी नाकारल्यानं एक जागा रिक्त होती. त्याच जागेवर संभाजीराजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपनं गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राचे पाच खासदार राज्यसभेवर पाठवले आहेत.
====================================
पाचोरा-जामनेर दरम्यान नदी पुलावर रेल्वेचे 3 डबे घसरले
जळगाव: जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले. बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे.
पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.
====================================
प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; दिशा देण्यासाठी राजकारणात - अमित शहा
- ऑनलाइन लोकमतअलाहाबाद, दि. १२ : प्रवाहासोबत वाहत जाण्यासाठी नव्हे; तर प्रवाहाला दिशा देण्यासाठी आपण राजकारणात आहोत असे मत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत मार्गदर्शन करताना मांडले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये मार्गदर्शन करताना शहा बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत २७ तास मंथन होणार आहे.त्या अनुषंगाने शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य सहभागी झाले आहेत. दोन दिवसाच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज कुठलाही प्रस्ताव मंजूर होणार नसल्याची माहीती सुत्राकडून मिळाली आहे.
====================================
१५० फूट दरीत बस कोसळून ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
- ऑनलाइन लोकमतहिमाचल प्रदेश, दि. १२ : खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलन येथून ५० किमी दूर असलेल्या डोलारघाट येथील ही बस आहे.अधिक माहितीनुसार, चिरगाव ते मंडी ही खासगी बसमध्ये ४० प्रवाशी होते. डोलारघाटात ती सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली आहे. चालकाला वळणाचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतातील चार लोकांची ओळख पटली असल्याचे डीएसपी नरवीर राठोड यांनी सांगितले. तर जखमीपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी माहिती दिली.या घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि वाहतूक मंत्री जी.एस. बाली यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
====================================
'सैराट'ची १०० कोटींकडे वाटचाल, आता या तीन भाषेत येणार फिल्म
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत सैराट या चित्रपटाने ८५ कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. पाच आठवड्यांत ८५ कोटींची कमाई करत १०० कोटीं कमाई करण्याचा पहिला मान मिळवण्यासाठी वाटचाल सुरु झाली आहे. तिकिटबारीवर सुसाट सुटलेला सैराट आता मराठी व्यतिरिक्त अन्य ३ भाषेतही तयार होणार आहे. सैराटची निर्मीती झी टॉकिजने केली होती. झीने काल रात्री सैराट चित्रपट अन्य ३ प्रादेशिक भाषेत तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.कमाईत विक्रम करत असताना आता हा सिनेमा दक्षिणेकडील तीन प्रादेशिक भाषेत सिनेमा काढण्यात येणार आहे. तमीळ, मल्यालम, तेलगू या भाषेत झी टॉकीज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेय. त्यामुळे मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच तीन प्रादेशिक भाषेत मराठी सिनेमा दुसऱ्या भाषेत डबींग होत आहे.सैराट हा सिनेमा २९ एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे. २९ एप्रिल रोजी सैराट राज्यभरातील ४०० थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो ८५०० ते १४००० पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री १२ आणि पहाटे ३ चा शोही सुरु होता. सैराटचं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.
====================================
युरो चषक : इंग्लंड-रशिया सामन्यांनतर समर्थकांमध्ये हाणामारी
- ऑनलाइन लोमकतपॅरिस, दि. १२ : यूरो चषकामधील इंग्लंड आणि रशिया यांच्यामधील सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. फुटबॉल वर्ल्डकपनंतर सर्वात लोकप्रिय स्पर्धा अर्थात यूरो कपला सुरूवात झाली असुन चांगलीच रंगत पहायला मिळत आहे. प्रेषकांचा उस्ताह शिगेला पोहचला आहे. युरो चषकातील ग्रुप बी मधील इंग्लंड आणि रशिया यांच्यातील सामना रंगतदार होणार याची सर्वांनाच अपेक्षा होती. त्याचप्रमाणे हा सामना रंगतदार झाला आणि सामन्यात दोन्ही संघाने १-१ गोल केला त्यामुळे सामना अनिर्णीत सुटला.मिळालेल्या माहितीनुसार, मॅचनंतर काही रशियन समर्थक आणि इंग्लंड समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर मारहाण आणि तोडफोडही झाली आहे. या घटनेत सुमारे १९ जण जखमी झाले आहेत तर एकाची परिस्थिती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा वापर केला.
====================================
सोळा हजार लातूरकर करणार देहदान!
- - राजकुमार जोंधळे, लातूरलातूर जिल्ह्यातील श्री सांप्रदाय सेवा समितीच्या १६ हजार सदस्यांनी मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला असून आतापर्यंत तीन हजार लोकांनी अर्ज भरुन दिले आहेत. गुरुपोर्णिमेदिनी संपूर्ण १६ हजार भरलेले अर्ज वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांचा हा ‘श्री सांप्रदाय’ जिल्ह्यातील बहुतांश गावात पोहोचला आहे. या सांप्रदायाचे जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक भक्त आहेत. यासांप्रदायाने धर्माला विज्ञानाची जोड देऊन एक नवा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी या सांप्रदायाने गावा-गावात शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान, आरोग्य शिबीर, विधवा, परितक्ता महिलांना शिलाई मशिनचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत केली होती.यावेळी सांप्रदायाने आपल्या १६ हजार सदस्यांनी देहदानाविषयी माहिती देऊन नोंदणीचे आवाहन केले. आतापर्यंत तीन हजार लोकांनी आपले अर्ज भरुन दिले आहेत.
====================================
‘वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- मुंबई : अनुदानासाठी शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी काँग्रेसनेही पांठिबा जाहीर केला. दुसरीकडे वित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने केली. त्यामुळे शिक्षकांचे हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.अनुदानासाठी शिक्षकांनी राज्यभर १ जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाने पेट घेतला आहे. या आंदोलनात गजानन खरात या शिक्षकाचा नाहक बळी गेल्याने सर्व शिक्षक संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी शिक्षकांच्या कृती समितीला पाठिंबा घोषित केला, अशी माहिती शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी दिली. सुळे म्हणाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी विनाअनुदानित पात्र शाळांना १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अमंलबजावणी अद्याप झाली नाही. विद्यमान मुख्यत्र्यांनी अनुदान देण्याचा शासन निर्णय तत्काळ जाहीर करावा.बारा आमदारांनी मुख्यमंत्र्याना घेराव घातला तेव्हा मुख्यमंत्र्यानी वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांना अनुदानाचे आदेश जारी करावे, असे निर्देश दिले होते. मात्र याची पूर्तता झाली नाही. परिणामी एका शिक्षकाचा नाहक बळी गेला, असा आरोप प्रशांत रेडीज यांनी केला आहे.
====================================
सलामीच्या पावसाने मुंबईकर आनंदले
- मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून ऊकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर शनिवारी सकाळी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. ऐनसकाळी दाटून आलेल्या ढगांनी शहरावर काळोख केल्यानंतर पावसाने वर्दी दिली. शहर व उपनगरात काही काळ पावसाच्या सरी कोसळल्या. त्याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर दिसून आला. बेस्ट आणि लोकल ‘वेग’ मंदावला. तर रस्त्यावर काही ठिकाणी आणि घरगल्ल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले.दक्षिण भारतात दाखल झालेल्या मान्सूनचे अद्यापही राज्यासह मुंबईत आगमन झालेले नाही. तरीही शनिवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकर आनंदले होते. दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची चाहूल प्रकर्षाने जाणवत राहिली. पहिल्याच पावसाचा फटका बसल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक सेवेचा वेग काहीसा मंदावला होता. सुरुवातीला काहीकाळ पावसाचा वेग जास्त असल्याने शहर आणि उपनगरातील रस्त्यालगतच्या सखल भागात पाणी साचले होते. परंतू त्याचे प्रमाण कमी होती. महत्त्वाची बाब म्हणजे भल्या पहाटेच पावसाची चाहूल लागल्यानंतर मुंबई महापालिकेने पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी तैनात केले होते. शिवाय पाणी उपसण्यासाठी आवश्यक असणारे साहित्यही सज्ज ठेवले होते. यात प्रामुख्याने दादर, वांद्रे आणि हिंदमाता या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. परिणामी ऐनवेळेला मनुष्यबळ सज्ज ठेवल्याने पाणी साचण्याचा घटना घडल्या नाहीत, असा दावा यावर महापालिकेने केला. वॉचडॉग फाऊंडेशनने मात्र महापालिकेचा दावा खोटा ठरवला. शिवाय विजय नगर, मरोळ, अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल रुग्णालयाजवळील सखोल ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारीही केल्या.
====================================
सहा वर्षांत तीन हजार बालमजुरांची सुटका
- - मनीषा म्हात्रे, मुंबईअत्यल्प मजुरी देत मुलांना राबवून घेणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची योजना मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. गेल्या साडेसहा वर्षात तब्बल तीन हजार बालमजुरांची सुटका करण्यास समाजसेवा शाखेला यश आले आहे तर बाल मजुरांना राबविणाऱ्या तब्बल दीड हजार मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जागतिक बाल मजुर दिनानिमित्त मुंबईतून बाल मजुरी हद्दपार करण्याचा विडा मुंबई पोलिसांनी उचलला आहे.बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाऱ्या बालमजुरांची संख्या अधिक असून महिन्याकाठी अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ते मुंबईत काम करतात. कमी वेतनात त्यांच्याकडून १२ - १२ तास मजुरी करुन घेतली जाते. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले तब्बल चार हजार बालमजुर मुंबईच्या विविध भागांमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. आले होते. २०१० पासून ते ५ जून २०१६ पर्यंत समाजसेवा शाखेने तब्बल ३ हजार ११७ बालमजुरांची सुटका केली आहे. तर १ हजार ५०६ जणांवर कारवाई केली.
====================================
पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी तस्कर गोळीबारात ठार
| |
-
| |
फाजिल्का - पंजाबमधील फाजिल्का येथे आज (रविवार) सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना गोळीबारात ठार मारले आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून, सीमेपलिकडून भारतीय हद्दीत येऊन हे अमली पदार्थ विकायचे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याजवळून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या तिघांकडून 15 पॅकेट हेरॉईनची जप्त करण्यात आली आहेत.
पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे याठिकाणी सीमेपलिकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात आणले जातात.
====================================
वीरेंद्र तावडेची कोठडीत रवानगी
| |
-
| |
डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्येत साम्य; ‘सीबीआय’ची न्यायालयात माहितीपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीसारखीच दुचाकी डॉ. तावडे याच्याकडे आहे. त्याने डॉ. दाभोलकर यांच्याविरोधात विधान केले होते. ‘सनातन’च्या साधकाशी आरोपीचा ‘ई-मेल’द्वारे संपर्क झाला होता, अशी माहिती ‘सीबीआय’ने न्यायालयात दिली.

====================================
आणखी सहा संशयितांचे नावे पोलिसांच्या हाती
| |
-
| |
डॉ. रवींद्र तावडेचे कॉल डिटेल्सचीही तपासणी
कोल्हापूर - डॉ. वीरेंद्र तावडेचे कोल्हापुरातील सहा ते सात वर्षांच्या वास्तव्याचा धागा पकडून त्याचे "कॉल डिटेल्स्‘ आणि पानसरे हत्येवेळी त्याचे "लोकेशन‘ तपासण्याचे काम पोलिस यंत्रणेने सुरू केले आहे. तसेच डॉ. दाभोलकर व पानसरे हत्येच्या कटातील सहा संशयितांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यांचा शोध विशेष पथकाद्वारे सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत पोलिस दलाने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी काल (शुक्रवारी) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित डॉ. तावडे याला अटक केली. त्याचे 2002 ते 2008 अखेर कोल्हापुरात वास्तव्य होते. कान, नाक, घसा तज्ज्ञ (इएनटी) म्हणून तो काम करत होता. त्याची पत्नीही डॉक्टर आहे. सानेगुरुजी वसाहत येथे काही काळ तो भाडेकरू म्हणून राहत होता. त्यानंतर साईक्स एक्स्टेशन येथे त्याने घर घेतले. गंगावेश येथील क्षत्रीय बिल्डिंग येथे त्याचा दवाखाना होता. तो सनातन संस्थेचा संघटक म्हणूनही काम करत होता. स्थानिकांशी त्याचे चांगले संबंध होते. 2008 मध्ये घर विकून तो दीड वर्ष सातारा येथे राहत होता. त्यानंतर तो पनवेलला स्थायिक झाला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी दोन महिने तो कोल्हापुरात येऊन गेला असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याआधारे कोल्हापुरातील वास्तव्यातील सहा त सात वर्षांचे त्याचे कॉल डिटेल्स् तपासण्यात येत आहेत. त्याचबरोबर पानसरे हत्येच्यावेळी त्यांचे नेमके लोकेशन कोठे होते, याचीही माहिती घेतली असून, गोपनीयरित्या घेतली जात असल्याचे समजते.

भाजपच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
कोल्हापूर - युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. भाजपने त्यांच्या नावाची शिफारस राज्यसभेसाठी केली होती. ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काही दिवसांपासून त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आजअखेर शिक्कामोर्तब झाले.
लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये अपक्ष उमेदवार (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी राजकीय पक्षांपासून अलिप्त राहत तरुणांच्या संघटनाचे काम सुरू केले. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागांत त्यांनी तरुणांचे मोठ्या प्रमाणात संघटन करण्याचे काम सुरू केले. रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही भव्यदिव्य करत लाखो तरुणांना दिशा देण्याचे काम सुरू केले. या सर्व कामाची दखल घेत भाजपने संभाजीराजे यांना खासदार करण्यासाठी प्रयत्न सुरूच केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा झाली. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या संभाजीराजे यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यापेक्षा राजर्षी शाहूंच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी थेट राष्ट्रपतींकडून नेमणूक करण्याचे ठरले. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.
युवराज संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती

भाजप कार्यकारिणीत कॉंग्रेसमधून आलेल्यांना संधी
| |
-
| |
नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे हिमंत बिस्वा शर्मा, तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. अलाहाबाद येथे उद्यापासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रीय कार्यकारिणीत कॉंग्रेसमधून पक्षात आलेल्या नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.
शर्माही कॉंग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेले आहेत. कार्यकारिणीत स्थान मिळालेल्या अन्य नेत्यांमध्ये ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरिधर गमांग, तसेच माजी केंद्रीय मंत्री के. पी. सिंग देव यांचा समावेश आहे. भाजपने पाच राज्यांच्या माजी प्रदेशाध्यक्षांनाही कार्यकरिणीत स्थान दिले आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातून लक्ष्मीकांत वाजपेयी, कर्नाटकचे प्रल्हाद जोशी, केरळेच व्ही. मुरलीधरन, मणिपूरचे छोबा सिंह, पंजाबचे कमल शर्मा यांचा समावेश आहे.
संबंधित राज्यांत त्या नेत्यांचा करिष्मा लक्षात घेऊन पक्षाने त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. ओडिशात पक्षाच्या विस्तारवाढीच्या दृष्टीने कॉंग्रेसमधून आलेल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे सर्व माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य आहेत. ते लक्षात घेऊनच पक्षाने कॉंग्रेसमधून आलेले माजी मुख्यमंत्री बहुगुणा व गमांग यांना संधी दिली आहे.

भारताने दहशतवादाला खतपाणी घालू नये-शरीफ
| |
-
| |
इस्लामाबाद - तेहरिके-तालिबान-पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या अफगाणिस्तानातील ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले करावेत, अशी मागणी पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी केली आहे. तसेच, भारत आणि अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थांचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न पाकिस्तान कदापि खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. दहशतवादाला पोसण्याचा आरोप वारंवार होत असलेल्या पाकिस्तानच्या सैन्यदल प्रमुखांनीच अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रकार आहे.
अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि अफगाणिस्तान व पाकिस्तानसाठीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड ऑल्सन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शरीफ बोलत होते. सीमांचे प्रभावी व्यवस्थापन आणि दहशतवादाच्या विरोधात लढाण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असून, त्याद्वारे उपखंडात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शरीफ यांनी सांगितले. ते म्हणाले, की अमेरिकेने अफगाणिस्तानातील "टीटीपी‘ आणि या संघटनेचा प्रमुख मुल्ला फझलुल्ला याच्या ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले करावेत.
पाकिस्तानातील बलुचिस्तानात 21 मे रोजी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये अफगाण-तालिबानचा प्रमुख मुल्ला मन्सूर हा ठार झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया जनरल शरीफ यांनी व्यक्त केली. अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या संबंधांवर ड्रोन हल्ल्यांमुळे नकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत त्यांनी मांडले.

जंबूसर, (गुजरात) - मुस्लिम समुदायाच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत हिंदू पुरुषांनी आपली लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. तसेच हिंदूंनो घरी जा आणि आपल्या पौरुषत्वाची उपासना करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शुक्रवारी गुजरातमधील बरुच जिल्ह्यातील जंबूसर येथे सभेत बोलताना तोगडिया म्हणाले, "आता हिंदू कमी होणार नाहीत, तर वाढतील आणि धर्मांतर होणार नाही घरवापसी होईल. बांगलादेशी मुस्लिम नव्हे, तर हिंदू घरातील लोकसंख्या वाढेल. केंद्र सरकारला लक्ष्य करत तोगडिया म्हणाले, "तुम्ही बुलेट ट्रेन आणत आहात, स्मार्ट सिटीज उभ्या करत आहात. मात्र, जर हिंदू उरलेच नाहीत, तर त्यामधून कोण प्रवास करणार? तसेच सरकार हिंदूंना सुरक्षा न पुरवता विकास करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.‘
हिंदूंनी लोकसंख्या वाढवा - तोगडिया
| |
-
| |
====================================
No comments:
Post a Comment