Sunday, 5 June 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मला उमेदवारी मिळेल! - हिलरी क्लिंटन 
2- अफगाणिस्तानला प्रत्येक संकटात भारताची साथ - मोदी  
३- वॉशिंग्टन; शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह 
४- युद्धपातळीवर बांगलादेश सीमा बंद करा-सोनोवाल  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- भ्रष्ट अधिका-याबरोबर त्याचे कुटुंबियही तितकेच दोषी - सीबीआय न्यायालय 
६- रामटेक बंगल्यावर एकनाथ खडसेंच्या समर्थकांची मोठी गर्दी 
७- मोदींनी देश ताब्यात घेतला आहे, जाहीरातबाजीवरील पैसे कोणाचे ? - अजित पवार. 
८- जाट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणातील संवेदनशील भागांमध्ये कलम १४४ लागू. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- खडसेंच्या समर्थनार्थ जळगावात 14 नगरसेवकांचा राजीनामा 
१०- पुण्यात भाजप अध्यक्षांच्या कार्यक्रमात काँग्रेसची निदर्शने 
११- खडसेंना देशद्रोहाखाली अटक करा - केजरीवाल 
१२- चंडीगड; जाट आंदोलनामुळे सोनीपतमध्ये इंटरनेटवर बंदी
१३- खडसेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू 
१५- उस्मानाबाद, साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, 7 जणांचा मृत्यू 
१६- दिल्ली; पत्नीची हत्या करुन रात्रभर तिच्या शेजारी झोपणारा क्रूर पती 
१७- वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा 
१८- औरंगाबाद; अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या 
१९- पुणे: दोन गटातील भांडणात वाहनांची तोडफोड 
२०- कात्रज; वाया जाणारे पाणी अडवून गाव टॅंकरमुक्त 
२१- कोल्हापूरात पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांचा घेतला चावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- जाहिरात विश्वालाही रिंकू राजगुरुने 'याड लावलं'... 
२३- स्पेनची गार्बिनी मुगुरुझा फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन 
२४- ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन 
२५- 'रामटेक' बंगल्याचा वादळी आणि थरारक इतिहास 
२६- व्हायरल सत्यः दहावीत 75 % मिळवणाऱ्यांना 25 हजारांची शिष्यवृत्ती? 
२७- व्हायरल सत्य : मोदींनी संन्यास घेतला होता? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
निशा वाचेवाड, भास्कर पवार, गजानन कदम, उमेश जाधव, अयुब शेख, शिवनंद देवके, बालासाहेब पाटील, नितीन राचलवाड, रामेश्वर बोरकर, अरविंद जाधव, हनुमान मालवटकर, सखाराम क्षीरसागर, दत्ता कमळे, प्रशांत कऱ्हाळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

========================================

खडसेंच्या समर्थनार्थ जळगावात 14 नगरसेवकांचा राजीनामा

खडसेंच्या समर्थनार्थ जळगावात 14 नगरसेवकांचा राजीनामा
जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या 14 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
 
एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही काळापासून खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचं म्हटलं जातं. इतक्या मोठ्या नेत्यावर राजीनाम्याची वेळ आल्याने समर्थक नाराज होते आणि त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे.
 
सामूहिक राजीनाम्याने नगरसेवकांनी एकप्रकारे निषेध व्यक्त केला आहे. जळगाव महानगरपालिकेत सुरेश जैन यांच्या खान्देश आघाडीची सत्ता आहे. यानंतर जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता आहे.
========================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू
एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली.
UPDATE : अपघातातील मृतांचा आकडा 17 वर

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रायगडच्या शेडुंगजवळ बस आणि स्विफ्ट-इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत.
 
एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली. अपघातानंतर बससह दोन्ही कार रस्त्याशेजारील शिवारात कोसळल्या.
 
ही धडक इतकी भीषण होती की त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला, तीन पुरुष आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे, तर अपघातातील जखमींवर पनवेलमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

========================================

उस्मानाबाद, साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, 7 जणांचा मृत्यू

उस्मानाबाद, साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, 7 जणांचा मृत्यू
ळवाच्या पावसानं शनिवारी मराठवाड्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. वीज पडून मराठवाड्यात 7 जणांचा बळी गेला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे 10 जनावरंही दगावली आहेत.
उस्मानाबाद/सातारा : वळवाच्या पावसानं शनिवारी मराठवाड्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. वीज पडून मराठवाड्यात 7 जणांचा बळी गेला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे 10 जनावरंही दगावली आहेत.
 
दरम्यान वादळी पावसामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोहनेर, केकस्कळवाडीतल्या तब्बल 42 घरांवरचे पत्रे उडून गेलेत, तर 50 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे गावातील विद्युत डेपो जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले होते. त्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला.
 
ग्रामस्थांनी या वळवाच्या पावसापासून वाचण्यासाठी पलंग, टेबल आणि चौकटीचा आधार घेतला. याशिवाय जालना आणि नांदेडलाही पावसानं झोडपलं.

दुसरीकडे सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सातारा लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली.
========================================

जाहिरात विश्वालाही रिंकू राजगुरुने 'याड लावलं'...

जाहिरात विश्वालाही रिंकू राजगुरुने 'याड लावलं'....
मुंबई : सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने जाहिरात विश्वालाही ‘याड लावलं’ आहे. रिंकूने नुकतंच ‘गो’ एडिबल ऑईल अर्थात खाद्यतेलाचं प्रॉडक्ट लाँच केलं.
 
गजानन ग्रुपच्या ‘गो’ या तेलाच्या ब्रँडचं उद्घाटन रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला सुप्रसिद्ध संगीतकार जतिनही उपस्थित होते. त्यामुळे पुढे-मागे रिंकू जाहिरातीत दिसणार का असा सवालही विचारला जात आहे.
========================================

स्पेनची गार्बिनी मुगुरुझा फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन

स्पेनची गार्बिनी मुगुरुझा फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन
पॅरिस : स्पेनची गार्बिनी मुगुरुझा फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन ठरली आहे. चौथ्या मानांकित मुगुरुझाने अंतिम फेरीत वर्ल्ड नंबर वन आणि गतवेळची विजेती सेरेना विल्यम्सचं आव्हान मोडून काढलं. मुगुरुझाने सेरेनाला 7-5, 6-4 असं हरवलं.


गेल्या वर्षी गार्बिनीला विम्बल्डनच्या उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. पण वर्षभरातच तिने पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं आहे.


22 वर्षीय मुगुरुझा ही फ्रेन्च ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद मिळवणारी दुसरीच स्पॅनिश खेळाडू ठरली आहे. याआधी अरान्ता सँचेझ व्हिकारियोने तीनवेळा ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गार्बिनीने हा पराक्रम गाजवला आहे.


दुसरीकडे सेरेना विल्यम्सला आपलं 22वं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवून स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
========================================

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं आज निधन झालं. वृद्धापकाळाने सुलभा देशपांडे यांनी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 80 वर्षांच्या होत्या.

मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मागील एक-दोन वर्षात आलेल्या  विहीर, हापूस या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.

मराठीच नाही तर आदमी खिलौना है, गुलाम-ए-मुस्तफा, विरासत या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या.

सुलभा देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुलभा देशपांडे एक चांगल्या कलाकार तर होत्याच, शिवाय एक अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व होतं, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने श्रद्धांजली.
========================================

'रामटेक' बंगल्याचा वादळी आणि थरारक इतिहास

'रामटेक' बंगल्याचा वादळी आणि थरारक इतिहास
मुंबई : मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि खडसेंचं मंत्रिपद गेल्याने आता ‘रामटेक’ म्हटलं की मंत्री कानावर हात ठेवू लागले आहेत.

ramtek 1
पण रामटेकचा इतिहास मोठा वादळी आणि थरारक आहे.

ramtek 3
1975 च्या आणीबाणीनंतर ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते. या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होतं. दलवाईंनी मृत्यूनंतर आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पण इस्लाममध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे. त्यामुळे शरद पवारांना हमीद दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला. त्या काळातही पवारांचं वास्तव्य रामटेकमध्येच होतं..

ramtek 5
1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदची स्थापना केली. दादांचं सरकार पाडणार नाही, म्हणता म्हणता पवारांनी याच रामटेक बंगल्यातून सरकारला धक्क्याला लावलं आणि त्यावेळीही रामटेक बंगला चर्चेत होता.


त्यामुळेच रामटेक बंगला लाभतो, अशी धारणा तयार झाली. 1995 साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला. पण मुंडेंना बंगला किती लाभला हा संशोधनाचा विषय आहे. कारण याच काळात मुंडेंचे एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला. ज्यावरुन आख्ख्या राज्यात राळ उडाली आणि मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांसोबतचं शीतयुद्ध मुंडेंना चार वर्ष पुरलं.

ramtek 4
रामटेक लाभतो म्हणता म्हणता 1999 ला मुंडेंना सत्ता सोडावी लागली. आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ रामटेक बंगल्यात आले उपमुख्यमंत्री म्हणून. पण तेलगी प्रकरणाने डोकं वर काढलं आणि भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. अर्थात त्यातून भुजबळ सहीसलामत सुटले खरे, पण तोवर त्यांना बराच त्रास सहन करावा लागला.

Chhagan_Bhujbal
सत्ता गेल्यानंतर भुजबळांची जागा एकनाथ खडसेंनी घेतली. मुख्यमंत्र्यांनंतर खडसेच सरकारमधील वजनदार मंत्री होते. पण दीड वर्षातच खडसेंच्या मागेही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं भूत लागलं. खडसेंनी यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण रामटेक खडसेंचं मंत्रिपद खाऊनच शांत झाला. सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंनी अगदी काहीच दिवसांपूर्वी रामटेकवर वास्तूशास्त्राची पूजाही घातली होती, पण त्याचा फायदा काही झाला नाही.

Eknath khadse pc

खरंतर शरद पवारांनंतर रामटेक कुणाला लाभला? हा संशोधनाचाच विषय आहे. तरीही रामटेकसाठी मंत्र्यांचा आग्रह मात्र कायम आहे. पण खडसेंचं मंत्रिपद गेल्यानंतर भाजपमधील मंत्री रामटेकच्या रेसमध्ये आमचं नाव चालवू नका, म्हणून आग्रह करु लागले आहेत. अर्थात अशा शुभ-अशुभावर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
========================================

व्हायरल सत्यः दहावीत 75 % मिळवणाऱ्यांना 25 हजारांची शिष्यवृत्ती?

व्हायरल सत्यः दहावीत 75 % मिळवणाऱ्यांना 25 हजारांची शिष्यवृत्ती?
 नवी दिल्लीः दहावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, असा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहचलं आहे.

मात्र एबीपीने केलेल्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहं. सरकारने अशी कोणतीही योजना आणली नसून कोणतीही शिष्यवृत्ती उपलब्ध नाही, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


काय आहे मॅसेज?
दहावी आणि बारावीच्या निकालाची जून महिन्यात सर्वात जास्त चर्चा होती. एकदाचा निकाल लागला आणि पुन्हा एका नवीनच मेसेजची चर्चा सुरु झाली. हा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सध्या व्हायरल होत आहे.


सर्व पालकांसाठी सुचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला दहा हजार रुपये आणि बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असं या मेसेजमध्ये लिहीलं आहे.
========================================

व्हायरल सत्य : मोदींनी संन्यास घेतला होता?

व्हायरल सत्य : मोदींनी संन्यास घेतला होता?
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने मोदी यांनी स्वतः घर सोडलं नव्हतं, तर त्यांना घरातून हाकललं होतं, असं सांगितलं आहे.


मात्र ‘एबीपी’च्या पडताळणीत ही बातमी चुकीची असल्याचं निष्पन्न झालं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत सगळ्यांनाच माहित आहे की, त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी अध्यात्माच्या शोधात घर सोडलं होतं. ही गोष्ट मोदी यांनी स्वतःही सांगितलेली आहे.


काय आहे प्रकरण?
सोशल मीडियात पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हवाल्याने दिलेली एक बातमी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडत आहे. मोदी यांनी संन्यास घेतला होता, अशी बातमी ‘अमर उजाला’ नावाच्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली व्हायरल होत आहे.


‘एबीपी’ने या सर्व प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी प्रल्हाद मोदी यांच्याशी संपर्क साधला. मात्र कोणत्याही वृत्तपत्राला आपण अशा प्रकारची मुलाखत दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित वृत्तपत्राला या प्रकरणाचा जाब विचारला असून वृत्तपत्राने चौकशीसाठी वेळ मागितला आहे, असं प्रल्हाद मोदी यांनी सागितलं.


‘अमर उजाला’ वृत्तपत्राचा या बातमीशी कोणताही संबंध नसून आमच्या नावाने ही खोटी बातमी व्हायरल केली जात आहे. आम्ही देखील या बातमीची निंदा करते, असं ‘अमर उजला’ या वृत्तपत्राकडून सांगण्यात आलं आहे.


त्यामुळे मोदींनी संन्यास घेतल्याची बातमी खोटी असल्याचं एबीपीच्या पडताळणीत निष्पन्न झालं आहे.
========================================

आता इंटरनेट कनेक्शन शिवायही गुगल मॅप वापरा

आता इंटरनेट कनेक्शन शिवायही गुगल मॅप वापरा
मुंबई : जर तुम्ही प्रवासात आहात आणि तुमचं नेट पॅक संपलं, आणि गुगल मॅप वापरताना प्रॉब्लेम येत असेल, तर टेन्शन घेऊ नका. अशावेळी गुगल मॅपचं ऑफलाईन अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे तुम्ही तुमच्या इच्छीत स्थळी पोहचू शकता.
मात्र, जर तुम्ही पायी किंवा सायकलिंग करून जात असाल तर तुम्हाला ऑफलाईन गुगल मॅप अॅप दिशा दाखवणार नाही. फक्त तुम्हाला तुमचे जवळचे ठिकाण दाखवू शकेल.
हे डाऊनलोड करताना सुरूवातीला तुमच्या अॅन्ड्राईड मोबाईलवरील गुगल मॅपवर ऑफलाईन गुगल मॅप ऑन करा. त्यातून तुम्ही जिथे जाणार आहात त्या शहराचा मॅप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑफलाईन गुगल मॅप तुमची दिशा दाखवेल, त्यानंतर तुमचे अॅप डाऊनलोड करण्यासंदर्भात विचारेल. त्याला डाऊनलोड करा म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छीत स्थळी पोहचू शकता.
========================================

भ्रष्ट अधिका-याबरोबर त्याचे कुटुंबियही तितकेच दोषी - सीबीआय न्यायालय


  • ऑनलाइन लोकमत 
    जबलपूर, दि. ५ - भ्रष्ट अधिका-याने गैरमार्गाने कमावलेला पैसा त्याचे कुटुंबिय वापरत असतील तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत असा निकाल जबलपूरच्या सीबीआय न्यायालयाने दिला आहे. ९४ लाख रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी सूर्यकांत गौर यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि सूनेला पाचवर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 
     
    त्याशिवाय न्यायालयाने प्रत्येक दोषीला अडीच लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे. दोषी सुर्यकांत डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये अकाऊंटट होता. सुर्यकांतवर ९४ लाखांचा निधी पत्नी विनिता, मुलगा शिशिर आणि सून सुनिता गौर यांच्या बँकखात्यावर जमा केल्याचा आरोप होता. 
========================================

पुण्यात भाजप अध्यक्षांच्या कार्यक्रमात काँग्रेसची निदर्शने


  • ऑनलाइन लोकमत 
    पुणे, दि. ५ - पुण्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने सुरु आहेत. पुण्यात बालगंर्धव चौक येथे भाजपने उद्योजकता विकास मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा आले आहेत.
     
    अमित शहा 'हाय हाय' अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळीच रोखल्याने काँग्रेस नेते आणि पोलिसांमध्ये काही वेळ वादावादी झाली. पुणे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे आंदोलनकर्त्यांसोबत आहेत. 
========================================

पत्नीची हत्या करुन रात्रभर तिच्या शेजारी झोपणारा क्रूर पती


  • ऑनलाइन लोकमत 
     
    नवी दिल्ली, दि. ५ - पत्नीची अत्यंत निदर्यतेने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाशी  लैंगिक चाळे करणा-या विकृत पतीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शर्मा असे आरोपीचे नाव आहे. मागच्यावर्षी भावाच्या लग्नामध्ये प्रदीपची मोनिकाबरोबर ओळख झाली होती. 
     
    पाहताक्षणी तो मोनिकाच्या (२३) प्रेमात पडला होता. प्रदीप प्रेमात पडला तेव्हा तो बरोजगार होता व उड्डाणटप्पू मुलगा अशी त्याची ओळख होती. पण मोनिकाला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर त्याने सुधरण्याचे आश्वासन दिले होते. लग्न केल्यानंतर दोघे उत्तरप्रदेशमध्ये रहात होते. सहा महिन्यापूर्वी दोघे पती-पत्नी दिल्ली निहार विहार येथे रहायला आले होते. 
     
    प्रदीपने दिल्लीत आल्यानंतर ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली होती. मात्र मिळणा-या उत्पनातून खर्च भागत नसल्याने दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. २९ मे ला ही दोघांमध्ये वाद झाले. संतापलेला प्रदीप बाहेर जाऊन दारुची बाटली घेऊन आला. त्याने मोनिकाला स्वत:सोबत दारु प्यायला सांगितले. पण मोनिका त्याच्याशी वाद घालत होती. 
========================================

वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा


  • नवी मुंबई : जन्मदिनाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून झालेल्या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकारात मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनादेखील मारहाण केली. यानुसार पाच तरुणी व त्यांचा एक मित्र अशा सहा जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
    वाशीतील इनॉर्बिट मॉलच्या बेसमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या ठिकाणी काही तरुणींमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर प्रकार उघडकीस आला. खारघरमधील एक तरुणी मित्र व मैत्रिणीसोबत मॉलमधील पबमध्ये जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी या सर्वांनी मद्यपान केल्यानंतर रात्री १ च्या सुमारास त्याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या ग्रुपमधील एका मुलीने तिला टोमणा मारला. यावरुन दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून मॉलच्या बेसमेंटमध्ये त्यांच्यात हाणामारी झाली. अखेर काही प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्व मुली मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. याचा राग आल्यामुळे सदर तरुणींनी पोलीस ठाण्यातच महिला पोलिसांना मारहाण केली. या प्रकारात तीन महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.
========================================

अफगाणिस्तानला प्रत्येक संकटात भारताची साथ - मोदी 


  • हेरात : राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हेरात प्रांतातील अफगाण-भारत मैत्री धरणाचे पंतप्रधान मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर मोदी बोलत होते.
    दहशतवाद धुडकावल्याबद्दल अफगाण जनतेची प्रशंसा करून मोदी म्हणाले की, तुमच्यातील दुफळीचा केवळ या राष्ट्रावर बाहेरून वर्चस्व गाजवू पहाणाऱ्यांनाच लाभ होईल. अफगाणिस्तानातील युद्ध राष्ट्र निर्मितीचे नव्हते, तर त्याने येथील एका पिढीचे भविष्य हिसकावून घेतले. शूर अफगाण जनता विध्वंस व मृत्यूच्या दूतांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश देत आहे. दहशतवादाचा पराभव करण्यात अफगाणिस्तानला जेव्हा यश येईल तेव्हा जग अधिक सुरक्षित आणि सुंदर होईल, असेही ते म्हणाले.
========================================

शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह


  • ऑनलाइन लोकमत - 
    वॉशिंग्टन, दि. 04 - अमेरिकेत शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्थ कॅरोलिना येथे राहणा-या एका महिलेने आपल्या शेजा-याकडून 2000 रुपयांमध्ये हा फ्रिजर विकत घेतला होता. घरी आल्यानंतर फ्रिजर उघडून पाहिलं असता धक्काच बसला, कारण त्यामध्ये मृतदेहाचे तुकडे होते. महिलेने तात्काळ 911 क्रमांवर फोन करुन पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. 
     
    'मी जेव्हा मृतदेहाचे तुकडे पाहिले मला धक्काच बसला, मी घरातून पळत बाहेर आले आणि पोलिसांना फोन केला', असं महिलेने सांगितलं आहे. मी फ्रिजर विकत घेतल्यानंतर घरी आणला होता. मात्र शेजा-यांनी तो लगेच उघडू नका असं सांगितलं होतं. आपल्या प्रोजेक्टचा हा भाग असल्याचं ते बोलले होते. फ्रिजरमधील सामान घेऊन जाण्यासाठी कोणीच आलं नाही त्यामुळे मी तो उघडून पाहिल्याची माहिती महिलेने दिली आहे. 
     
    फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. हा मृतदेह शेजा-याच्या वृद्ध आईचा असावा अशी शंका फ्रिजर विकत घेतलेल्या महिलेने व्यक्त केली आहे. मी 2000 रुपयांमध्ये हा फ्रिजर विकत घेतला, कोणी असं कसं काय करु शकत ? आपल्या आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये कसा काय ठेवला जाऊ शकतो ? अस सांगताना महिला आश्चर्य व्यक्त करत आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. 
========================================
युद्धपातळीवर बांगलादेश सीमा बंद करा-सोनोवाल

गुवाहाटी - आसामला लागून असलेली भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा युद्धपातळीवर बंद करण्यास आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा सुरक्षा दलास (बीएसएफ) सांगितले आहे.

बांगलादेश सीमेवरून होत असलेल्या घुसखोरीबद्दल विरोधी पक्षांकडून सोनोवाल यांच्या सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच हा निर्णय घेतला आहे. भारत आणि बांगलादेश या सीमेवरून होत असलेली घुसखोरी रोखण्याच्या आश्वासनावर भाजपने याठिकाणी सत्ता मिळविली होती. आता विरोधकांकडून याच मुद्द्याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बीएसएफला सीमा बंद करण्यास सांगितले आहे.

गुवाहाटी येथे बीएसएफचे अधिकारी के. के. शर्मा आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. आपल्या सीमेवर जवान तैनात आहेत. नागरिकांना सुरक्षितता वाटेल, असे वातावरण तयार करण्यात येईल, असे सोनोवाल यांनी सांगितले. तसेच बीएसएफला त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने लेझर वॉलसारखे काही तांत्रिक पर्यायही सुचविले आहेत. सीमा बंद करण्यासाठी बीएसएफला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येईल.
========================================
अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

औरंगाबाद - आंबेडकरनगरातील पोषण आहारामध्ये अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. संतप्त पालकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिला व बालविकास विभागामार्फत गोरगरिबांना व झोपडपट्टी वसाहतीमधील बालकांना आणि गरोदर महिलांना पोषण आहार दिला जातो. आंबेडकरनगर येथे नऊ अंगणवाड्यांमध्ये दोनशे ते तीनशे लहान मुलांना पोषण आहार दिला जातो. गल्ली नं. 11 मध्ये असलेल्या अंगणवाडी क्र. 44 मध्ये शनिवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता पोहे आणि हरभऱ्याची उसळ आणण्यात आली. वाटप झाल्यावर बऱ्याच मुलांनी अंगणवाडीमध्येच पोहे खाल्ले; मात्र एका मुलीने पोहे घरी आणले. त्यात मोठ्या अळ्या मुलीच्या बहिणीला दिसल्या. आई सर्व पोहे घेऊन अंगणवाडीत गेल्यानंतर तेथे गर्दी झाली.

अंगणवाडी सेविकेला विचारल्यानंतर सुरवातीलाच उद्धट उत्तरे त्यांनी दिल्याचा आरोप पालकांनी केला. संतप्त पालकांनी पर्यवेक्षिकेला बोलावले. त्यानंतर महिला बालविकास अधिकारी कमल इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोह्यांचे नमुने घेतले. आहाराचे नमुने प्रयोगशाळेला पाठवून योग्य कारवाई करण्यात येईल; मात्र तुम्ही हे प्रकरण मिटवून घ्या, माध्यम प्रतिनिधींना बोलावू नका अशी भूमिका घेतल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. 
========================================
खडसेंना देशद्रोहाखाली अटक करा - केजरीवाल
-

नवी दिल्ली - गैरव्यवहारांचा आरोप झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 



गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे राज्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांना अखेर शनिवारी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमधील पटेल समुदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलचाही केजरीवाल यांनी संदर्भ दिला आहे. "गुजरात सरकारने हार्दिक पटेलविरुद्धचा देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्यावा. त्याने देशद्रोह केलेला नाही. खडसेंनी केला आहे. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा‘, असे केजरीवाल यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

खडसे यांनी शनिवारी सकाळी राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंजुरीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविला आणि रात्री उशिरा तो स्वीकारण्यात आला. खडसेंवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार आहे.
========================================
पुणे: दोन गटातील भांडणात वाहनांची तोडफोड 

पुणे - वारजे माळवाडी येथे दोन गुन्हेगारांच्या टोळीत झालेल्या वादावादित एक गटाने दहशत पसरविण्यासाठी विठ्ठलनगर परिसरात सामान्य नागरिकांच्या 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

वारजे माळवाडी परिसरात सुरज पिंप्रे व रोहित उर्फ रोह्या पासलकर या दोन गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. पिंप्रे याने शनिवारी रात्री साडे आठ वाजता पासलकर याच्या महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील घरावर हल्ला केला. ती माहिती पासलकर यास कळली. पासलकर हा दोन वर्षांसाठी तडीपार आहे. तो वारज्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यापूर्वी पासलकर याने पिंप्रे याच्या चैतन्य चौकातील घरावर जाऊन हल्ला केला. त्यानंतर विठ्ठलनगर परिसरातील त्याचा घराशेजारील सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडल्या. पिंप्रेचे साथीदार आणि रोहित पासलकर व त्याच्या साथीदार यांचा शोध घेत आहे.
यानंतर, विठ्ठलनगर परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

========================================
जाट आंदोलनामुळे सोनीपतमध्ये इंटरनेटवर बंदी

चंडीगड - आरक्षण कोट्यासाठी जाट समुदाय आजपासून (रविवार) पुन्हा आंदोलन करणार असून, हरियानातील आठ जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर, दिल्लीला लागून असलेल्या सोनीपत जिल्ह्यात मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

आरक्षणासाठी जाट समुदाय आजपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हरियानात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाचे चार हजार 800 जवान तैनात करण्यात आले असून, प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली आहे. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह निमलष्करी दलाच्या 48 तुकड्या राज्यांत विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. अजून 15 तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे, असे हरियानाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) रामनिवास यांनी सांगितले. 

जाट समाजातील केवळ एक गट धरणे आंदोलन करणार असला, तरी प्रशासनाकडून कोणताही धोका पत्करणार येत नाही. जाट समुदायाने यापूर्वी आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी 30 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300 हुन अधिक नागरिक जखमी झाले होते. कोट्यवधीं संपत्तीचे नुकसान झाले होते. 
========================================
वाया जाणारे पाणी अडवून गाव टॅंकरमुक्त

कात्रज - सुमारे दोनशे फूट उंचावरील कात्रज घाटातील पाझर तलावाच्या बंधाऱ्यातून पाझरून वाया जाणारे पाणी गावकऱ्यांनी कौशल्याने गावातील विहिरीत आणले आणि गुजर- निंबाळकरवाडीचे पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे संपुष्टात आणले. यापूर्वी एप्रिल-मेमध्ये तळ गाठणारी गावाची एकमेव विहीर नव्या संकल्पनेमुळे काठोकाठ भरत आहे. पर्यायाने गाव आता पूर्णपणे टॅंकरमुक्त झाले आहे.

गेली पंधरा वर्षे गावाने पाण्याचे प्रचंड हाल सोसले आहेत. पाझर तलावाचा गाळ काढल्यानंतर गेली तीन वर्षे गावाला पाण्याची समस्या कमी झाली. मात्र या योजनेमुळे गाव पूर्णपणे जलयुक्त झाला आहे.
- दीपक गुजर, माजी सरपंच
तब्बल पंधरा वर्षे पावसाळ्यापर्यंत गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. लोकसहभागातून गावतळ्यातील गाळ काढण्याची मोहीम तत्कालीन राज्य सरकारने सुरू केली. एप्रिल २०१३ ला त्या मोहिमेचा प्रारंभ याच भागातून झाला. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ गाळच नव्हे तर तळ्याचे खोलीकरण व विस्तारीकरणाचे काम गावाने हाती घेतले. कात्रजच्या प्रगती फाउंडेशनसह उद्योजकांनी यंत्रणा दिली तर गावाने लोकवर्गणी उभारली. यातून पूर्वीपेक्षा चौपट पाणीसाठा झाला. गेल्या तीन वर्षांत गावातील विहिरींसह कूपनलिका पाण्याने समृद्ध झाल्या. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे पाणीसाठा पुरणार नाही, अशी भीती गावकऱ्यांना सतावू लागली होती. त्या वेळी माजी सरपंच दीपक गुजर यांनी पाझर तलावाची पाहणी केली. त्यांना पाणी पाझरून वाया जात असल्याचे आढळले. हे पाणी साठवण्याची आणि ते पाणी गावातील विहिरीपर्यंत नेण्याची कल्पना सुचली. गाव पुन्हा एकवटला. ग्रामसेवक व्ही. एम. निकम, सरपंच कविता शिंदे, उपसरपंच वर्षा गुजर आणि सदस्यांनी वाया जाणारे पाणी पाइपलाइन टाकून विहिरीत आणण्याचा विडा उचलला.

ग्रामपंचायतीने संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली. प्रगती फाउंडेशनचे प्रकाश कदम यांनी आर्थिक मदत दिली. पाझरून वाया जाणारे पाणी डबक्‍यात आणले. ते पाणी साठवण्यासाठी शेजारीच सिमेंटची टाकी बांधली. तब्बल अडीच किलोमीटर लांबीची तीन इंच व्यासाची पाइपलाइन टाकली. भगीरथ प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. आपली कामे बाजूला ठेवून निवृत्ती निंबाळकर, रघुनाथ पवार, काशिनाथ गुजर, बबन काळे, विठ्ठल काळे, भिवा गुजर, रामभाऊ सणस यांच्यासह अनेकांनी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दिवसभर हजेरी लावली अन्‌ प्रकल्प पूर्ण केला. महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथ काळभोर, नगरसेविका भारती कदम, वसंत मोरे, प्रकाश कदम, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विहिरीत कोसळणाऱ्या संततधारेचे जलपूजन झाले. 

========================================
खडसेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

रिपाइं सत्तेपासून दूरच; जानकर आणि खोत यांची वर्णी लागण्याची शक्‍यता 
मुंबई - ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यमंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. या विस्तारात घटकपक्षांचा समावेश करण्यात येणार असून खडसे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात येणार आहे. मात्र मित्रपक्ष म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी अद्यापही सत्ता दूरच राहणार असल्याचे चित्र आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा 31 ऑक्‍टोबर 2014 पासून अनेकदा झाल्या. मात्र, त्यासाठी अद्यापपर्यंत मुहूर्त सापडला नव्हता. राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि "रिपाइं‘ या पक्षांचा कुणीही नेता विधानसभेवर निवडून आला नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. दरम्यान, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि "रासप‘चे महादेव जानकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. सध्या विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली. "रिपाइं‘ला देखील यामध्ये वाटा मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केंद्रात मंत्रिपद मिळेपर्यंत राज्यातील सत्ता स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याने विधान परिषदेवरील पक्षाची संधी हुकली. 
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================

No comments: