[अंतरराष्ट्रीय]
१- न्यूयॉर्क; 'ऍपल' परिषदेसाठी भारतीय वंशाच्या अन्विताची निवड
२- पाकिस्तान आता जॉर्डनकडून एफ-16 घेणार
३- ओबामांचा ब्लॅकबेरीला रामराम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्या अखेर फरार घोषित
५- ईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ
६- तमिळनाडू वगळता इतरांचा 'जीएसटी'ला पाठिंबा'
७- महिलांच्या मदतीसाठी 'उषा किरण केंद्रा'ची स्थापना
८- अमेरिकी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मुख्यमंत्री कार्यालयासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
१०- दिघावासियांना हायकोर्टाचा दिलासा नाही, ठरल्यानुसारच कारवाई
११- कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानपात्र शाळांना अनुदान
१२- महाबीजच्या दरवाढीला स्थगिती, खरेदी केलेल्या बियाण्यांचं काय?
१३- राज ठाकरेंनी ओवेसींचा चेहरा असलेला केक कापला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपुरात दोन एटीएम मशिन जळून खाक, नुकसानीबाबत अस्पष्टता
१५- कळंबा जेलच्या कैद्यांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद
१६- तरुणाची अजब विनंती आणि सुषमा स्वराज यांचं उत्तर
१७- जळगाव; कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक पेटविला, २९ मृत ११ जिवंत गुरांना काढले बाहेर
१८- मरीन ड्राईव्हवरील तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे पालिकेचे आदेश
१९- जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जवान जखमी
२०- सोलापूर - मंगळवेढा येथे मटका अड्ड्यांवर पोलिसांची धाड, 9 बुकींना अटक.
२१- छत्तीसगडमध्ये ४७ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, १५ महिला नक्षलवाद्यांचा समावेश.
२२- यवतमाळ : पुसद येथे धडसी चोरी, घरातून सोने आणि घरासमोरून ५ लाखांची कार लंपास.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- एअर एशियाची ग्राहकांना खास भेट
२४- करिश्मा-संजयचा अखेर घटस्फोट, मुलांना 10 कोटी, डुप्लेक्स बंगला
२५- सेक्स सीनवरुन चित्रांगदा भांडली, चित्रपट सोडला
२६- 'डिअर' म्हटल्याने भडकल्या स्मृती इराणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

या इमारती रिकाम्या करुन ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं एमआयडीसीला आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर दिघावासियांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास थोडा वेळ द्यावा अशी मागणी करत एमआयडीसीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टानं दिघावासियांना दिलासा देण्यास नकार दिला. आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कमलाकर आणि पांडूरंग इमारती रिकाम्या कराव्या लागणार आहेत.
एमआयडीसीची भूमिका काय?

दुसरीकडे, मुलुंडमध्ये राहणारे दिनेश पडाया यांनी मंत्रालयात येण्याच्या अर्धा तास अगोदर गोळ्या खाल्ल्याचा दावा केला. पडायांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांनाही सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिनेश यांना एसआरए संदर्भात काही समस्या होत्या.
सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दिलीप मोरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या निर्णयाचा फायदा राज्यातल्या 90 टक्के कायम विनाअनुदानित शाळांना होणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 1628 पात्र शाळांमधील 19 हजार 247 शिक्षकांना होणार आहे. त्यामध्ये 2 हजार 452 तुकडयांचा समावेश आहे. या अनुदानामुळे 163.21 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकाचे हित जपले जाईल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी राज्यभरातल्या शाळांमधील शिक्षक गेली अनेक वर्ष
आंदोलनं, उपोषण करत आहेत. आताही राज्यातल्या कोल्हापूर, लातूर, बीडमधील शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान गेल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता.

ज्या हॉलमध्ये लाडू तयार करण्याची यंत्रणा सुरु केली, त्या हॉलचं उद्घाटन पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आलं. कैद्यांनी बनवलेल्या या प्रसादाची आज विधीवत पूजा करुन तो भाविकांना वाटण्यात आला.
कारागृहातून दररोज 3 हजार प्रसादाचे लाडू तयार केले जाणार आहेत. कैद्यांकडून लाडू तयार करुन घेण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून कैद्यांकडूनच प्रसाद तयार करुन घेण्यास सुरुवात झाली आहे.

दिघावासियांना हायकोर्टाचा दिलासा नाही, ठरल्यानुसारच कारवाई
मुंबई : अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघावासियांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे दिघ्यातल्या कमलाकर आणि पांडुरंग नावाच्या दोन इमारती उद्याच्या उद्या रिकाम्या कराव्या लागणार आहेत.
या इमारती रिकाम्या करुन ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं एमआयडीसीला आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर दिघावासियांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास थोडा वेळ द्यावा अशी मागणी करत एमआयडीसीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टानं दिघावासियांना दिलासा देण्यास नकार दिला. आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कमलाकर आणि पांडूरंग इमारती रिकाम्या कराव्या लागणार आहेत.
एमआयडीसीची भूमिका काय?
पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर बांधाकामांवर हातोडा चालवू नये, रहिवाशांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारचा अध्यादेश अगोदरपासूनच अस्तित्त्वात आहे. त्यामुळे सध्या दिघ्यातील बेकायदेशीर बांधाकाम जमिनदोस्त करण्यात अडचण आहे, अशी भूमिका एमआयडीसीनं हायकोर्टात मांडली.
======================================
मुख्यमंत्री कार्यालयासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादेतील शेतकरी दिलीप मोरे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबादेतून आलेल्या दिलीप मोरेंना मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदत हवी होती. आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर पोहचाव्यात यासाठी त्यांनी कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुसरीकडे, मुलुंडमध्ये राहणारे दिनेश पडाया यांनी मंत्रालयात येण्याच्या अर्धा तास अगोदर गोळ्या खाल्ल्याचा दावा केला. पडायांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांनाही सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिनेश यांना एसआरए संदर्भात काही समस्या होत्या.
सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दिलीप मोरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
======================================
कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानपात्र शाळांना अनुदान
मुंबई : राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कायम विनाअनुदानित शाळांमधील अनुदानास पात्र घोषित झालेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा राज्यातल्या 90 टक्के कायम विनाअनुदानित शाळांना होणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 1628 पात्र शाळांमधील 19 हजार 247 शिक्षकांना होणार आहे. त्यामध्ये 2 हजार 452 तुकडयांचा समावेश आहे. या अनुदानामुळे 163.21 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकाचे हित जपले जाईल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी राज्यभरातल्या शाळांमधील शिक्षक गेली अनेक वर्ष
आंदोलनं, उपोषण करत आहेत. आताही राज्यातल्या कोल्हापूर, लातूर, बीडमधील शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान गेल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता.
======================================
नागपुरात दोन एटीएम मशिन जळून खाक, नुकसानीबाबत अस्पष्टता
नागपूर : नागपूरच्या प्रगती सभागृहाजवळील एटीएम मशिन्सला काल मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत दोन्ही एटीएम मशिन्स जळून खाक झाल्या आहेत.
सोमवारी रात्री नागपूरच्या प्रगती सभागृह परिसरात एचडीएफसी बँकेच्या मशिन्समधून अचानक धूर यायला लागला आणि बघता बघता या दोन्ही मशिन्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.
दरम्यान या एटीएम मशिन्सच्या देखभालीसाठी तैनात करण्यात आलेला सुरक्षारक्षक यावेळी जागेवर हजर नसल्याचं उघड झालं आहे. या आगीत नेमकं आर्थिक नुकसान किती झालं याची माहिती कळू शकलेली नाहीये. त्याचप्रमाणे आग नेमकी कशी लागली याचा सध्या तपास घेतला जात आहे.
======================================
कळंबा जेलच्या कैद्यांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद
कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मीचा प्रसाद कळंबा जेलमधील कैद्यांकडून करुन घेण्याचं काम सुरु झालं आहे. कैद्यांकडून अशाप्रकारे प्रसाद तयार करुन घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.
ज्या हॉलमध्ये लाडू तयार करण्याची यंत्रणा सुरु केली, त्या हॉलचं उद्घाटन पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आलं. कैद्यांनी बनवलेल्या या प्रसादाची आज विधीवत पूजा करुन तो भाविकांना वाटण्यात आला.
कारागृहातून दररोज 3 हजार प्रसादाचे लाडू तयार केले जाणार आहेत. कैद्यांकडून लाडू तयार करुन घेण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून कैद्यांकडूनच प्रसाद तयार करुन घेण्यास सुरुवात झाली आहे.
======================================
कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्या अखेर फरार घोषित
मुंबई : देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. ईडीच्या मागणीनंतर विशेष न्यायालयानं विजय हा निर्णय दिला.
ईडीच्या कोणत्याही नोटीशीला भीक न घालणाऱ्या विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याची मागणी ईडीनं विशेष न्यायालयात केली होती. प्रसारमाध्यमातून आपली बाजू मांडणारा विजय मल्ल्या तपास यंत्रणेपासून पळ काढत असल्याचं ईडीनं न्यायालयाला सांगितलं.
ईडीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याचा निर्णय दिला. धक्कादायक बाब म्हणजे तपास यंत्रणेच्या रडारवर असणाऱ्या विजय मल्ल्यानं चोरीछुपे कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकल्याचं समजतंय.
======================================
महाबीजच्या दरवाढीला स्थगिती, खरेदी केलेल्या बियाण्यांचं काय?
मुंबई : राज्यात महाबीजने बियाणांच्या किमतीत केलेल्या वाढीला राज्य सरकारने स्थिगिती दिली आहे. आता शेतकऱ्यांना जुन्या दरातचं बियाणं उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने दरवाढ स्थगित केली असली तरी आतापर्यंत महाबीजचे जवळपास 70 ते 80 टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे, त्यामुळे खरेदी केलेल्या बियाण्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एबीपी माझाच्या वेबसाईटने महाबीजच्या दरवाढीची बातमी सर्वात आधी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बातमीची दखल घेत, तत्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाबीजच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत दरवाढीला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
महाबीजने कडधान्य आणि इतर वाणांच्या किमतींमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे.
======================================
राज ठाकरेंनी ओवेसींचा चेहरा असलेला केक कापला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. मात्र राज ठाकरेंनी वाढदिवसाचा केक वेगळ्या पद्धतीने कापला. राज यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचा चेहरा असलेला केक कापला.
सुरुवातीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या चेहऱ्याचा केक राज ठाकरेंसमोर आणला. राज यांनी या केकचं कटिंगही केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या केकचे तुकडे केले.
याआधी राज्याचे माजी महाधिवक्ते आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातून विदर्भाचा तुकडा कापला होता. त्यावरुन राज ठाकरेंनी श्रीहरी अणेंवर जोरदार टीकाही केली होती.
आता स्वत: राज ठाकरेंनी असदुद्दीन ओवेसी यांचा चेहरा असलेला केक कापल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
======================================
ओबामांचा ब्लॅकबेरीला रामराम
मुंबई : स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे सुरक्षेचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महत्त्वाच्या ब्लॅकबेरी स्मार्टफोनला रामराम करावा लागत आहे.
‘टूनाइट शो’ या एका खासगी वाहिनीच्या टिव्ही शोमध्ये सहभागी होताना ओबामा यांनी जिमी फेलॉन यांना यासंदर्भात माहिती दिली. यानुसार, त्यांना एक नवीन यंत्र देण्यात आले आहे. सुरक्षेच्या काराणांमुळे हे यंत्र कोणाचेही फोटो काढू शकत नाही, शिवाय यावरून फोन किंवा मॅसेजही पाठवता येत नाहीत.
लहान मुलांना देण्यात येणाऱ्या प्ले फोनसारखेच हे यंत्र असल्याचे ओबामांनी या टिव्ही शोदरम्यान सांगितले.
अॅन्ड्राइड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीमच्या स्मार्टफोनने गेल्या काही दिवसात ब्लॉकबेरीला पूर्णपणे हद्दपार केले आहे. अॅन्ड्राइड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीममार्फत कूटनीतीचे संदेश सुरक्षितपणे पाठवले जात असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांना जाणवत आहे.
======================================
तरुणाची अजब विनंती आणि सुषमा स्वराज यांचं उत्तर
नवी दिल्ली : मोदी सरकारचे बरेच मंत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. इतकंच नाही तर ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून ते सामान्य नागरिकांच्या अडचणीही दूर करतात. रेल्वेमंत्री सुरेश आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ओळखले जातात. पण सुषमा स्वराज यांच्याकडे एका व्यक्तीने अशी विनंती केली की, जी वाचून स्वराज यांना हात जोडावे लागले.
ट्विटरवर वेंकट नावाच्या एका व्यक्तीने सुषमा स्वराज आणि रामविलास पासवान यांना मेंशन करुन रेफ्रिजरेटरशी संबंधित अडचण सोडवावी, अशी विनंती करत मदत मागितली.
======================================
एअर एशियाची ग्राहकांना खास भेट
मुंबई: एअर एशियाने आपल्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना खास भेट दिली आहे. एअर एशियाने आपल्या विमान तिकीटांच्या दरांमध्ये 799 रुपयांची खास सवलत दिली आहे.
दिनांक 4 जानेवारी 2017 ते 21 ऑगस्ट 2017 दरम्यान कंपनीने बिग सेल स्किम राबविली आहे. या योजनतंर्गतच कंपनीने तिकीट दरात सवलत ही सवलत दिली आहे. यासाठी कंपनीने तिकीट बुकींगचा कालावधी 19 जून 2016 पर्यंत मर्यादित ठेवला आहे.
या स्किमनुसार डेमेस्टीक प्रवासासाठी, गोवाहटी ते इंफाळदरम्यानचा तिकीट दर 799 रुपये ठेवण्यात आला आहे. तर बंगळूरू ते कोची दरम्यान 899 रुपये, बंगळूरू ते पुणे दरम्यान 1099 रु., दिल्ली ते बंगळूरू 2699 आणि विशाखापट्टणम ते बंगळूरू दरम्यान 1199 रुपये तिकीट दर ठेवण्यात आला असल्याची माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.
======================================
करिश्मा-संजयचा अखेर घटस्फोट, मुलांना 10 कोटी, डुप्लेक्स बंगला
मुंबई : करिश्मा कपूर आणि संजय कपूर आता कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. या दोघांनी 2014 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यादरम्यान या प्रकरणात अनेक चढउतार पाहायला मिळाले. मुलांच्या ताब्याबाबत प्रकरणात गुंता निर्माण झाला होता. मात्र परस्पर सहमतीने याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात तोडगा निघाला. दोन्ही मुलांचा ताबा आता करिश्माकडे राहणार आहे.
मुलांना 10 कोटी रुपये तर करिश्माकडे बंगला
– घटस्फोटानंतर संजय कपूरने मुलांच्या नावे दहा कोटी रुपये ठेवले आहेत. तर करिश्मा ज्या डुप्लेक्स बंगल्यात राहते तो तिच्याच नावे राहिल.
– याशिवाय संजयला मुलांच्या शिक्षणाचा तसंच इतर खर्च उचलावा लागेल.
– याशिवाय संजयला मुलांच्या शिक्षणाचा तसंच इतर खर्च उचलावा लागेल.
– करिश्मा केवळ तिचे दागिनेच नाही, तर लग्नावेळी संजयच्या कुटुंबीयांकडून मिळालेले दागिनेही स्वत:कडे ठेवू शकते.
======================================
विजय माल्या फरार म्हणून घोषित
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ : बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय माल्याला आज मुंबईच्या विशेष न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने आज निर्णय दिला. यापुर्वी माल्याचा पासपोर्ट जप्त केला आहे.बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. विशेष म्हणजे ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर 17 बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास सुरु आहे.
======================================
ईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ : सक्तवसुली संचालनालयनं दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत, त्यांच्या माहितीत विसंगती आहेत. असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात केला आहे. त्यांच्या जामिनावर हायकोर्टात आज सुनावणी सुरू आहे. ईडी छगन भुजबळांच्या या आरोपाचे उत्तर शुक्रवारी देणार आहे.महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सरकारमधील त्यांच्या ताकदीच्या जोरावर २०३.२४ कोटी रुपये कमविले असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ही रक्कम ७,१५२.५० टक्के अधिक आहे. हे सर्व पैसे त्यांनी स्वत:चे नियंत्रण असलेल्या कंपन्यांत शेअरच्या माध्यमातून गुंतविले, असा एसीबीचा दावा आहे.या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह त्यांची पत्नी मीना, मुलगा पंकज, पुतण्या समीर, सून विशाखा, चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक, हवाला ऑपरेटर सुरेश जजोदिया, प्रवीण जैन, संजीव जैन, चार्टर्ड अकाउंटंट चंद्रशेखर सारडा आणि कपिल पुरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ (१) ई आणि १३ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
======================================
सेक्स सीनवरुन चित्रांगदा भांडली, चित्रपट सोडला
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १४ - अभिनेत्री चित्रांगदा सिंहने कुशन नंदीचा 'बाबूमोशाय बंदूकबाज' चित्रपट सोडून दिला आहे. सेक्सदृश्य चित्रीत होत असताना चित्रांगदाचे दिग्दर्शक कुशनबरोबर भांडण झाले त्यामुळे तिने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.चित्रांगदा आणि नवाझुद्दीन सिद्दीकीवर सेक्स सीनचा पहिला टेक चित्रीत झाला. पण तो टेक दिग्दर्शकाला आवडला नाही. नवाझ जोराने चित्रांगदाला बेडवर खेचतो आणि आपल्याला कोणीतरी पाहतेय असे दोघांच्या लक्षात येते असा तो सीन होता. कुशानला तो सीन पसंत पडली नाही.म्हणून तो चित्रांगदावर ओरडला असे स्पॉटबॉय वेबसाईटने म्हटले आहे. चित्रांगदा आणि कुशनमध्ये जोरदार वादावादी झाली. संपूर्ण युनिटसमोर कुशनचे अशा पद्धतीने बोलणे चित्रांगदाला अजिबात आवडले नाही. भडकलेल्या चित्रांगदाची समजूत घालण्यासाठी कुशनने आपण बाहेर जाऊन बोलूया असे सांगितले. पण संतापलेल्या चित्रांगदाने नकार दिला आणि चित्रीकरण सोडून तिथून निघून गेली.
======================================
कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक पेटविला, २९ मृत ११ जिवंत गुरांना काढले बाहेर
- ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ : गुरे घेऊन जाणारा ट्रक जमावाने अडवून त्याची तोडफोड केली तसेच त्यास जाळल्याची घटना चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत चार पोलीस अधिकारी जखमी झाले.सोमवारी सकाळी ११.३० वाजेनंतर तब्बल पाच तास हा प्रकार सुरू होता. दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक आर. एन. पवार, अडावदचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चोपडा शहराचे सहायक फौजदार वसंत चव्हाण, किरण पाटील हे जखमी झाले आहेत.धरणगावहून यावलकडे जाणाऱ्या ट्रकमधून गुरांची वाहतूक केली जात होती.ट्रकचे टायर फुटल्यानंतरही बिंग फुटेल म्हणून चालकाने ट्रक तसाच चालविला. मात्र चोपड्यातील हतनूर पाटचारीजवळ काही महाविद्यालयीन तरूणांना संशय आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून तो यावल रस्त्यावर अडविला. तेथून ट्रक बाजार समितीच्या आवारात नेण्यात आला. संतप्त जमावाने ट्रक चालक, क्लिनरला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली.
======================================
मरीन ड्राईव्हवरील तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे पालिकेचे आदेश
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 14 - मरीन ड्राईव्हवर बसवण्यात आलेलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. आरपीजी आर्ट फाउंडेशनने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ मरिन ड्राईव्हवर मेटल आर्ट पीस उभारले होते. मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असून 24 तासांत ही वास्तू हटवण्यास सांगितलं आहे.आरपीजी आर्ट फाउंडेशनने 24 तासांत ही वास्तू हटवली नाही तर कारवाई करण्याचा इशारादेखील महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने यापुर्वीही आरपीजी फाऊंडेशनला नोटीस बजावली होती. मात्र नोटीशाचं पालन न केल्याने महापालिकेकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.
======================================
कोलकाता : तमिळनाडूचा अपवाद वगळता देशातील इतर सर्व राज्यांनी वस्तू आणि सेवा कर विधेयकास (जीएसटी) पाठिंबा दिला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (मंगळवार) सांगितले. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज झाली. त्यानंतर जेटली यांनी ही माहिती दिली. ‘जीएसटी‘तील काही तरतुदींविषयी तमिळनाडूचा विरोध आहे, असे जेटली यांनी सांगितले.
1 एप्रिल 2016 पासूनच देशभरात ‘जीएसटी‘ लागू करण्याची केंद्र सरकारची इच्छा होती. लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, राज्यसभेमध्ये विरोधकांनी हे विधेयक रोखून धरले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनात ‘जीएसटी‘ मंजूर करून घेत 1 एप्रिलपासून ‘जीएसटी‘ लागू करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. आता पावसाळी अधिवेशनामध्ये ‘जीएसटी‘ मंजूर होईल, अशी केंद्र सरकारला आशा आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची दोन दिवसांची बैठक येथे सुरू आजपासून सुरू झाली. एकूण 22 राज्यांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर आहेत.
'तमिळनाडू वगळता इतरांचा 'जीएसटी'ला पाठिंबा'
| |
-

नवी दिल्ली - कौटुंबिक हिंसाचार आणि तत्सम प्रकारातील पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी मध्यप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत "उषा किरण केंद्र‘ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
कौटुंबिक हिंसाचार, प्राणघातक हल्ला किंवा अन्य प्रकारणातील पीडित महिला आणि मुलींना सर्व प्रकारची सेवा उषा किरण केंद्रात उपलब्ध होणार आहे. या केंद्रात वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला, पोलिस मदत, कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन आदी प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच अशा प्रकारची केंद्रे मध्यप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत स्थापन करण्यात येतील, असेही चौहान यांनी ट्विटरद्वारे सांगितले. "उषा किरण केंद्रा‘मध्ये मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, डॉक्टर आणि दोन कायदेशीर सल्लागार तसेच दोन महिला पोलिस शिपाई उपलब्ध असतील. याशिवाय ज्या महिलांना त्यांच्या कुटुंबाने बहिष्कृत केलेले आहे अशा महिलांसाठी निवासाची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. या केंद्रांसाठी 153 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांच्या मदतीसाठी 'उषा किरण केंद्रा'ची स्थापना

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मचिल सेक्टरमध्ये दहशतवादी व जवानांमध्ये आज (मंगळवार) झालेल्या चकमकीत जवान जखमी झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मचिल सेक्टरमध्ये दहशतवादी व जवानांनमध्ये अद्याप चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबाराचा आवाज सुरू आहे. चकमकीत एक जवान जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर सोमवारी (ता. 13) दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत ठार केले होते. दहशतवाद्याकडून एक एके-47 रायफल व पिस्तूल जप्त करण्यात आली. उधमपूर जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत दोन महिला व एक मुलगा असे तिघे जण जखमी झाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जवान जखमी

मुंबई: अमेरिकी गुंतवणूकदारांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि धोरणांविषयी कमालीचा आशावाद आहे, असे प्रतिपादन सेबीचे अध्यक्ष यु.के. सिन्हा यांनी केले आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षात मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांविषयी उत्साही वातावरण आहे असे काही दिवसांपुर्वी अमेरिकेचा दौरा करुन आलेल्या सिन्हा यांनी सांगितले.
सिन्हा यांनी अमेरिकेत म्युच्युअल फंड उद्योग, पेन्शन फंड उद्योगातील गुंतवणूकदार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. दोन वर्षांपुर्वी जी परिस्थिती होती त्या तुलनेत सध्या भारतातील धोरणांविषयी आशावादी वातावरण आहे. सरकारचे सकारात्मक दिशेने सुरु असलेले कार्य आणि कायदे व दीर्घकालीन धोरणांविषयी असलेली स्पष्टता प्रशंसनीय असल्याचे म्हटले आहे.
'अमेरिकी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी'
| |
-
| |
सिन्हा यांनी अमेरिकेत म्युच्युअल फंड उद्योग, पेन्शन फंड उद्योगातील गुंतवणूकदार तसेच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची भेट घेतली. दोन वर्षांपुर्वी जी परिस्थिती होती त्या तुलनेत सध्या भारतातील धोरणांविषयी आशावादी वातावरण आहे. सरकारचे सकारात्मक दिशेने सुरु असलेले कार्य आणि कायदे व दीर्घकालीन धोरणांविषयी असलेली स्पष्टता प्रशंसनीय असल्याचे म्हटले आहे.
======================================
नवी दिल्ली- बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी ट्विटरवरून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना ‘डिअर‘ म्हटल्याने त्या आज (मंगळवार) चांगल्याच भडकल्या.
चौधरी यांनी ट्विटरवरून इराणी यांना शिक्षण धोरणाविषयी प्रश्न विचारले. 2015 चे कॅलेंडर कधी संपणार असून आम्हाला नवीन शैक्षणिक धोरण कधी मिळणार आहे. राजकारण व भाषणामधून वेळ मिळाल्यानंतर शिक्षणाकडे लक्ष द्या. या प्रश्नांच्या अगोदर ‘डिअर स्मृती इराणीजी‘ म्हटले होते.
'डिअर' म्हटल्याने भडकल्या स्मृती इराणी
| |
-
| |
चौधरी यांनी ट्विटरवरून इराणी यांना शिक्षण धोरणाविषयी प्रश्न विचारले. 2015 चे कॅलेंडर कधी संपणार असून आम्हाला नवीन शैक्षणिक धोरण कधी मिळणार आहे. राजकारण व भाषणामधून वेळ मिळाल्यानंतर शिक्षणाकडे लक्ष द्या. या प्रश्नांच्या अगोदर ‘डिअर स्मृती इराणीजी‘ म्हटले होते.
======================================
न्यूयॉर्क - बालप्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "ऍपल‘ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऍप डेव्हलपर्सच्या परिषदेसाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या अन्विता विजय या नऊ वर्षाच्या बालिकेची निवड झाली आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या ऍप परिषदेला उपस्थित राहणारी अन्विता ही सर्वांत लहान वयाची ऍप डेव्हलपर आहे. या परिषदेत अन्विता वर्षभर युट्युब आणि इंटरनेटवर "फ्री कोडिंग ट्युटोरियल्स‘चा अभ्यास करत होती. तिने आपल्या नुकतेच रांगायला सुरूवात केलेल्या बहिणीसाठी ऍप विकसित केले आहे. लहान मुलांना बोलायचे कसे, प्राणी कसे ओळखायचे याबाबत हे ऍप मार्गदर्शन करणार आहे. आयफोनसाठी विकसित केलेल्या या ऍपद्वारे रंगांची ओळख कशी करतात हे ही लहान मुलांना शिकविण्यात येणार आहे. जागतिक डेव्हलपर परिषदेचा एक भाग म्हणून अन्विताला "ऍपल‘ची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत डेव्हलपरला "ऍपल‘च्या विविध डिव्हाईसेससाठी ऍप विकसित करण्याची संधी प्राप्त होते. या परिषदेत आतापर्यंत अशियायी पुरुषांचे वर्चस्व होते. मात्र कंपनी आणि संयोजकांनी जाणीवपूर्वक हे वर्चस्व कमी करण्यासाठी अफ्रिकन-अमेरिकन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यांतून संधी दिली आहे.
'ऍपल' परिषदेसाठी भारतीय वंशाच्या अन्विताची निवड

इस्लामाबाद - अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने एफ-16 लढाऊ विमाने देण्यासंदर्भातील प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता पाकिस्तान जॉर्डनकडून वापरण्यात आलेली एफ-16 विमाने विकत घेण्याच्या प्रस्तावासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर, जॉर्डनकडून एफ-16 विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव आल्याचे पाकितानचे संरक्षण सचिव आलम खट्टक यांनी येथील संरक्षण व परराष्ट्र संबंधांसंदर्भातील समितीच्या संयुक्त बैठकीमध्ये बोलताना सांगितले.
पाकिस्तानकडे सध्या किती एफ-16 विमाने आहेत, यासंदर्भात येथील हवाई दलाच्या प्रवक्त्याने माहिती देण्याचे टाळले असले; तरी पाककडे सुमारे 70 एफ-16 असल्याचे मानले जात आहे. एफ 16 विमानांमधील ब्लॉक-30 प्रकाराची विमाने विकण्याचा प्रस्ताव जॉर्डनने पाकपुढे ठेवला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला या प्रकाराच्या तुलनेत अत्याधुनिक असलेल्या ब्लॉक-52 प्रकारची विमाने मिळणार होती. पाकिस्तानने याआधी 2014 मध्ये जॉर्डनकडून 13 एफ -16 ची खरेदी केली होती.
पाकिस्तान आता जॉर्डनकडून एफ-16 घेणार?

No comments:
Post a Comment