[अंतरराष्ट्रीय]
१- भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन
२- लास वेगास; डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न
३- आॅस्ट्रेलियाचा महिला वॉटरपोलो संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
४- ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
५- काठमांडू; ६८ वर्षांचे आजोबा चालले शाळेला!
६- टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ
७- प्योंगयांग; उत्तर कोरियाकडून संवेदनशील क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली बाईक वीरेंद्र तावडेची, CBI सुत्रांची माहिती
९- पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्'सह 20 उपग्रहांचं इस्रोतर्फे प्रक्षेपण
१०- 'सत्यमेव जयते'प्रकरणी आमीर विरोधातील याचिका फेटाळली
११- रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची निती आयोगाची शिफारस
१२- पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लगार आता स्वामींचे नवे लक्ष्य
१३- मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा
१४- रेल्वेच्या मालमत्तांवर ४९१ चोरांचा डल्ला
१५- बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच
१६- आसाराम बापूकडे 2300 कोटींची अघोषित मालमत्ता
१७- प्राप्तिकर बुडव्यांना आता अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- मुंबईत म्हाडाच्या 972 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध
१९- सातारा; प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे: उदयनराजे भोसले
२०- वैद्यनाथ बँक निवडणूकः बहिण-भावाच्या लढतीत बहिणीचा दणदणीत विजय
२१- तब्बल ५०० कोटी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याने सोडली नोकरी
२२- शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
२३- २२ रु.ची वही ६.६६ रुपयांत!
२४- मुंबईसह कोकणात दमदार पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- पिंपरी- चिंचवड भावकीच्या वादातून विहिरीत फेकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
२६- अहमदाबाद; विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 66 वर्षीय संचालकाला बेड्या
२७- भोपाळ; डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडात केली शस्त्रक्रिया
२८- कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी ५८ कोटी
२९- वीज कोसळल्याने बिहारमध्ये 38 मृत्युमुखी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- गर्लफ्रेण्डला रेस्टॉरंटमध्ये एकटं सोडून टायगर पळाला!
३१- ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४
३२- इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
३३- बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’- मंगेश देसाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन पीएसएलव्ही सी 34 हे यान एकूण 20 उपग्रहांसह बुधवारी अंतराळात झेपावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 20 उपग्रहांचं अवकाशात एकत्र प्रक्षेपण केलं जाणार आहे. पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘कार्टोसॅट 2’ सोबत 19 उपग्रहांचं सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.


चाकणच्या खालूब्रे गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. चाकण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपी शिवाजी नामदेव बोत्रे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
दर्शन अजित बोत्रे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव होतं. जमिनीच्या वादातून दर्शनचे पिता अजित आणि शिवाजी या चुलत भावांमध्ये वाद सुरु होता. त्याच रागातून शिवाजीने दर्शनला आईच्या हातातून हिसकावून घेतलं आणि काल पावणे पाच वाजता विहिरीत फेकलं होतं.

बडोद्याच्या पारुल विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन दिवसांपूर्वी पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर रेप झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.
‘विद्यापीठातील महिला रेक्टरच्या मदतीने पटेलने आपल्याला तीनवेळा बोलवून घेतलं. पहिल्या वेळी 15 जून रोजी त्याने मला चार तास बसवून ठेवलं. एकीकडे मला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली, तर त्याचवेळी फी माफ करण्याचं आमिषही दाखवलं.’ अशी माहिती पीडितेने दिली आहे.








१- भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन
२- लास वेगास; डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न
३- आॅस्ट्रेलियाचा महिला वॉटरपोलो संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
४- ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
५- काठमांडू; ६८ वर्षांचे आजोबा चालले शाळेला!
६- टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ
७- प्योंगयांग; उत्तर कोरियाकडून संवेदनशील क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली बाईक वीरेंद्र तावडेची, CBI सुत्रांची माहिती
९- पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्'सह 20 उपग्रहांचं इस्रोतर्फे प्रक्षेपण
१०- 'सत्यमेव जयते'प्रकरणी आमीर विरोधातील याचिका फेटाळली
११- रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची निती आयोगाची शिफारस
१२- पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लगार आता स्वामींचे नवे लक्ष्य
१३- मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा
१४- रेल्वेच्या मालमत्तांवर ४९१ चोरांचा डल्ला
१५- बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच
१६- आसाराम बापूकडे 2300 कोटींची अघोषित मालमत्ता
१७- प्राप्तिकर बुडव्यांना आता अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- मुंबईत म्हाडाच्या 972 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध
१९- सातारा; प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे: उदयनराजे भोसले
२०- वैद्यनाथ बँक निवडणूकः बहिण-भावाच्या लढतीत बहिणीचा दणदणीत विजय
२१- तब्बल ५०० कोटी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याने सोडली नोकरी
२२- शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
२३- २२ रु.ची वही ६.६६ रुपयांत!
२४- मुंबईसह कोकणात दमदार पाऊस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- पिंपरी- चिंचवड भावकीच्या वादातून विहिरीत फेकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
२६- अहमदाबाद; विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 66 वर्षीय संचालकाला बेड्या
२७- भोपाळ; डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडात केली शस्त्रक्रिया
२८- कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी ५८ कोटी
२९- वीज कोसळल्याने बिहारमध्ये 38 मृत्युमुखी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- गर्लफ्रेण्डला रेस्टॉरंटमध्ये एकटं सोडून टायगर पळाला!
३१- ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४
३२- इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
३३- बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’- मंगेश देसाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्'सह 20 उपग्रहांचं इस्रोतर्फे प्रक्षेपण
श्रीहरिकोटा : एकाच अंतराळयानातून 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात ‘इस्रो’ सज्ज झालं आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह ‘कॉर्टोसॅट टू’ या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे.
श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन पीएसएलव्ही सी 34 हे यान एकूण 20 उपग्रहांसह बुधवारी अंतराळात झेपावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 20 उपग्रहांचं अवकाशात एकत्र प्रक्षेपण केलं जाणार आहे. पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘कार्टोसॅट 2’ सोबत 19 उपग्रहांचं सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.
पुण्यातल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह ‘कॉर्टोसॅट टू’ या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे. ‘पीएसएलवी 34’ कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी आणि अमेरिकेच्याही काही उपग्रहांना सोबत घेऊन जाणार आहे. या उपग्रहातील 727.5 किलोग्रॅम वजनाचे ‘कार्टो सॅट 2’ हे मुख्य यान आहे.
======================================
मुंबईत म्हाडाच्या 972 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध
मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. ‘म्हाडा’तर्फे मुंबईत 972 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 23 जूनपासून म्हाडाचे अर्ज मिळणार आहेत, तर 10 ऑगस्टला घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.
अर्ज मिळण्याची तारीख :
23 जून ते 23 जुलै 2016
ऑनलाइन अर्ज :
ऑनलाइन अर्ज :
24 जून ते 25 जुलै 2016 (दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार)
बँकमध्ये डी डी भरण्याची कालावधी :
24 जून ते 27 जुलै 2016
घरांच्या लॉटरीचा निकाल :
10 ऑगस्ट 2016
सर्वात स्वस्त घरं :
अत्यल्प उत्त्पन्न गट
मालवणी (मालाड) : 8 लाख 17 हजार
कार्पेट एरिया : 16.72 चौरस मीटर
सर्वात महाग घरं :
उच्च उत्त्पन्न गट
शैलेंद्र नगर (दहिसर) : 83 लाख 86 हजार
कार्पेट एरिया : 78.47 चौरस मीटर
======================================
भावकीच्या वादातून विहिरीत फेकल्याने चिमुरड्याचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
पिंपरी- चिंचवड : चाकणमध्ये भावकीतला वाद एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. एका इसमाने चुलत भावाच्या दीड महिन्यांच्या मुलाला विहिरीत फेकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
चाकणच्या खालूब्रे गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. चाकण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपी शिवाजी नामदेव बोत्रे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
दर्शन अजित बोत्रे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव होतं. जमिनीच्या वादातून दर्शनचे पिता अजित आणि शिवाजी या चुलत भावांमध्ये वाद सुरु होता. त्याच रागातून शिवाजीने दर्शनला आईच्या हातातून हिसकावून घेतलं आणि काल पावणे पाच वाजता विहिरीत फेकलं होतं.
======================================
विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी 66 वर्षीय संचालकाला बेड्या
अहमदाबाद : स्वतः स्थापना केलेल्या विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी जयेश पटेलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बडोदा पोलिसांनी पारुल विद्यापीठाचा संचालक असलेल्या पटेलला मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या.
बडोद्याच्या पारुल विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन दिवसांपूर्वी पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर रेप झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.
‘विद्यापीठातील महिला रेक्टरच्या मदतीने पटेलने आपल्याला तीनवेळा बोलवून घेतलं. पहिल्या वेळी 15 जून रोजी त्याने मला चार तास बसवून ठेवलं. एकीकडे मला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली, तर त्याचवेळी फी माफ करण्याचं आमिषही दाखवलं.’ अशी माहिती पीडितेने दिली आहे.
त्यानंतर दुसऱ्या वेळी म्हणजे 16 जून रोजी पटेलने रात्री बोलावून घेत आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा 17 तारखेला त्याने पुन्हा बोलावलं, तेव्हा हिमतीने मित्राच्या सहाय्याने बडोदा पोलिसांच्या हेल्पलाईनवर आपण तक्रार नोंदवली, असंही तिने सांगितलं.
======================================
सलमानच्या वादग्रस्त विधानावर बलात्कार पीडितेचं सडेतोड उत्तर
जयपूर : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या शारीरिक थकव्याची तुलना बलात्कार पीडितेच्या वेदनेशी केल्याने देशभरात वादंग उठलं. सलमानच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफीही मागितली. मात्र राजस्थानमधील जयपूरच्या एका बलात्कार पीडितेने सलमानला सडेतोड उत्तर दिलं आहे.
एकेकाळी सलमान खानला सुपरहीरो मानणाऱ्या या महिलेने त्याच्या वादग्रस्त विधानानंतर म्हणाली की, ‘तू (सलमान) तर माणूसही नाही…’.
======================================
गर्लफ्रेण्डला रेस्टॉरंटमध्ये एकटं सोडून टायगर पळाला!
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सिल्व्हर स्क्रीनवर भलेही त्याच्या स्टंट्सने अनेकांना आवाक् करत असेल. पण खऱ्या आयुष्यात टायगर अगदी विरुद्ध आहे. टायगर आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा पटानी यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे. पण काही दिवसांपूर्वी टायगर गर्लफ्रेण्डला हॉटेलमध्ये एकटं सोडून पळून गेला होता.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी शुक्रवारी डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर वांद्र्याच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये दोघे पोहोचले. पण टायगर आल्याचं समजल्यानंतर चाहते या रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. यानंतर मीडियाचे प्रतिनिधीही तिथे दाखल झाले. हे सगळं पाहिल्यानंतर टायगर भांबावला आणि गाडीत बसून त्याने तिथून पळ काढला.
परंतु दिशा पटानी रेस्टॉरंटमध्ये एकटीच राहिली. ती आत टायगरची वाट पाहत होती. पण बराच वेळ टायगर न आल्याने तिनेही रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. यानंतर दिशानेही ऑटोरिक्षामधून घर गाठलं.
======================================
दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेली बाईक वीरेंद्र तावडेची, CBI सुत्रांची माहिती
मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल वीरेंद्र तावडेची होती, एवढंच नव्हे तर मोटरसायकल घेऊन तो स्वतः पुण्याला गेला होता, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे.
तावडेच्या मोटरसायकलचा वापर आरोपी सारंग अकोलकरनं दाभोलकरांच्या हत्येसाठी केल्याचं सीबीआय सुत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान,सीबीआयनं आरोपी वीरेंद्र तावडेची पत्नी डॉ निधी यांची कसून चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत.
दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक जतमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान ठाण्यात आणि गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे हिंदू जनजागरण आणि सनातनच्या साधकांचा हात असल्याचा दावा सीबीआयच्या सुत्रांनी केला आहे.
======================================
प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे: उदयनराजे भोसले
सातारा: वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचा चंग बांधला असताना, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. याचबरोबर प्रत्येक नविन गाडीचे पासिंग करतान वाहनधारकाकडून पर्यावरणासाठी आणि झाडे लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले पाहिजे. अस मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.
ग्लोबल वॉर्मिंगचा आपण आता गांभीर्यानं विचार करायला हवा. जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर या पृथ्वीतलावर एकही जीव आपल्याला दिसणार नाही. अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली.
पृथ्वीवरील समतोल सध्या बिघडलेलाच आहे. त्यामुळे हा समतोल पुन्हा साधणं महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनानं दोन कोटी झाडं लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. पण आतापर्यंत याकडे का लक्ष दिलं गेलं नाही? असाही सवाल उदयनराजेंनी विचारला.
======================================
वैद्यनाथ बँक निवडणूकः बहिण-भावाच्या लढतीत बहिणीचा दणदणीत विजय
बीडः राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना हाबाडा देत पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेवर झेंडा फडकवला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पॅनलमधील उमेदवारांना फक्त 30 टक्के मतदान झालं आहे. तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनलाला 70 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात बहिणीने चितपट केलं आहे.
======================================
'सत्यमेव जयते'प्रकरणी आमीर विरोधातील याचिका फेटाळली
मुंबई: केवळ सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य वापरणं गुन्हा ठरत नसल्याचं म्हणतं हायकोर्टानं अभिनेता आमीर खानविरोधातील याचिका फेटाळली आहे. ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये आमीर खाननं राजमुद्रेचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी केला होता.
याप्रकरणी आमीर खानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राय यांनी याचिकेद्वारे केली होती. मात्र, उच्च न्यालयानं ही याचिका फेटाळून लावली. राजमुद्रेत अशोक स्तंभ, घोडा, बैल, अशोक चक्र आणि सत्यमेव जयते या शब्दाचा वापर केला जातो.
संविधान आणि कायद्याप्रमाणं केवळ ‘सत्यमेव जयते’ ब्रीद वाक्य म्हणजे राजमुद्रेचा वापर करणं होत नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं हा गुन्हा सिद्ध होत नसल्याचं म्हणतं हायकोर्टानं याचिका फेटाळली.
======================================
तब्बल ५०० कोटी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्याने सोडली नोकरी
मुंबई : जगात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनचे अध्यक्ष निकेश आरोडा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बुधवारी होणाऱ्या ३६ व्या वार्षिक बैठकीनंतर आरोडा अधिकृतरित्या आपल्या पदाची सुत्रे परत करतील. वारंवार सीइओपदाने हुलकावणी दिल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली.
सॉफ्टबँकच्या म्हणण्यानुसार, संचालक आणि सीइओ मासायोशी यांना बँकेला निश्चित कालावधीमध्ये सर्वच क्षेत्रात बँकेला आघाडीवर न्यायचे होते. मात्र, यासाठी आरोडा यांना अजून कालावधी हवा होता.
दरम्यान, गूगलचे पूर्व एक्झिक्यूटिव्ह राहिलेले आरोडा यांच्यावर संशयित व्यवहार आणि खराब परफॉमन्सचे आरोप होते. आरोडा यांचा राजीनामा हा त्यांना विशेष तपास समितीने क्लीन चीट दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिला आहे.
आरोडा यांना २०१५-१६ या आर्थिक वर्षात बँकेने ७.३ कोटी डॉलर म्हणजे एकूण ५०० कोटी पगार दिला होता
======================================
शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
मुंबईः राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागात 26 जूननंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट उद्भवू शकते. म्हणून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. सध्या पडत असलेला पाऊस आणि अपेक्षित समाधानकारक पाऊसमानामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे. मात्र, खरीप पेरणीसाठी अजून काही कालावधी शिल्लक आहे. तसेच येत्या काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
विशेषत: नाशिक आणि विदर्भाच्या काही भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील एक-दोन जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. या सर्व भागात 26 जूननंतर समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
======================================
रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची निती आयोगाची शिफारस
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 22 - ब्रिटीश राजवटीपासून वेगळा रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची सुरु झालेली पद्धत नरेंद्र मोदी सरकार रद्द करण्याची शक्यता आहे. सरकारकडून नेमण्यात आलेल्या निती आयोगाने रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची शिफारसच केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा कदाचित शेवटचा अर्थसंकल्प ठरु शकतो.निती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय आणि विशेष अधिकारी किशोर देसाई यांनी एकत्रितपणे हा अहवाल बनवला आहे. निती आयोगाने यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला निवेदन केले आहे. या निवेदनात रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात यावा असं म्हणण्यात आलं आहे. केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून याप्रकरणी त्यांचं मत मागवलं आहे.ब्रिटिश राजवटीत सर्वप्रथम १९२१ साली मुख्य अर्थसंकल्पातून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा काढण्यात आला होता. मात्र अजूनही रेलेच्या समस्या सोडवण्यात यश आलं नसल्याचं अहलावात म्हटलं गेलं आहे. बिबेक देबरॉय यांनी रेल्वेची पुनर्रचना करण्याच्या अहवालातही काही शिफारसी केल्या होत्या. मात्र त्यातील मोजक्या प्रस्तावांवर अंमलबजावणी करण्यात आली.
======================================
पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लगार आता स्वामींचे नवे लक्ष्य
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवणारे भाजप खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.बौद्धिक संपदा हक्काविषयी अरविंद सुब्रमण्यम यांच्या भूमिकेवर स्वामी यांनी आक्षेप नोंदवला आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्ताचा हवाला देऊन स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांनी औषधनिर्माण नियमातंर्गत अमेरिकेला भारतावर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता असा आरोप केला आहे.नरेंद्र मोदींनी मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकन काँग्रेसला कारवाईची लिखित शिफारस केली होती असे स्वामी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. भारताने पेंटट कायद्यामध्ये बदल करावा अशी त्यांची मागणी होती. स्वामी यांनी यापूर्वी अर्थतज्ञ आणि आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळेच राजन यांनी आरबीआय गर्व्हनरपदाची दुसरी टर्म नको अशी भूमिका घेतली.
======================================
डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडात केली शस्त्रक्रिया
- ऑनलाइन लोकमत -भोपाळ, दि. 22 - वीजपुरवठा खंडित झाल्याने डॉक्टरांना चक्क बॅटरीच्या उजेडात शस्त्रक्रिया करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्वालियरच्या कमलराजा रुग्णालयात ही घटना घडली आहे. मंगळवारी डॉक्टरांना दोन महत्वाच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या, पण ऐनवेळी वीज गेल्याने त्यांना बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागला.कमलराजा रुग्णालयात सकाळी 10 वाजता दोन महिलांवर वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रिया सुरु होती. मात्र अचानक वीज गेल्याने दोन्ही ऑपरेशन थिएटर्समध्ये पुर्ण अंधार झाला. जनरेटर सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर बॅटरीच्या उजेडाचा आधार घेत सर्जरी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांकडून मिळाली आहे. 15 मिनिटानंतर वीजपुरवठा पुर्ववत झाला.गायनाकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ ज्योती बिंदाल यांनी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ जे एस सिकरवर यांना तात्काळ फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
======================================
ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४
- ठाणे : सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणात एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची ठाणे पोलिसांनी आरोपी क्रमांक १४ अशी नोंद केली आहे. केनियात झालेल्या इफे ड्रीनच्या तस्करीत तिने चांगली ‘भूमिका’ बजावल्यामुळे तिला एव्हॉनचे संचालक किंवा व्यवस्थापकपदही बहाल केले जाणार होते, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली.ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ दोन महिन्यांपूर्वी सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना इफे ड्रीनच्या तस्करी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडील माहितीतूनच एव्हॉनचा संचालक मनोज जैन, व्यवस्थापक पुनित श्रींगी, नरेंद्र कांचा आदी दहा जणांना पोलिसांनी वेगवेगळया भागातून अटक केली. तर एव्हॉनमधून अडीच हजार कोटींचा सुमारे २३ टन इफे ड्रीन आणि सुडोइफे ड्रीनचा साठाही पोलिसांनी हस्तगत केला. याच प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री कुलकर्णी यांचीही नावे तपासात उघड झाली. यात सध्या ममता, विकी, सुशिल सुब्रमण्यम आणि तांजानियातील रहिवाशी डॉ. अब्दुल्ला या चौघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)एव्हॉनमधील इफे ड्रीनची केनियासह इतर देशांमध्येही तस्करी करण्यासाठी ममता, मनोज जैन, जयमुखी किशोर राठोड आणि विकी गोस्वामी यांच्यात वारंवार केनियामध्ये बैठका झाल्या. या बैठकांचे सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. ममताच्या ओशिवारा येथील दोन्ही सदनिकांच्या मेन्टनन्सचे पैसेही विकीकडून दिले जात होते. ८ जानेवारी २०१६ मध्ये केनियात झालेल्या बैठकीतही ममता होती. इफे ड्रीनच्या तस्करीपोटी हवालाद्वारे ममता, विकी, जयमुखी आणि जैन यांना करोडो रुपये मिळाल्याचे सबळ पुरावेही हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ममता आणि तिचा कथित पती विकी हे केनियात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केनिया आणि भारत यांच्यात आरोपी प्रत्यार्पणाचा करार नाही. मात्र, रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर त्यांना कोणत्याही देशातून इतरत्र पळ काढता येणार नाही. २कोणत्याही देशाच्या विमानतळावर ते आले तर इंटरपोलमार्फत त्यांची माहिती ठाणे आणिअमेरिकेच्या पोलिसांना मिळू शकणार आहे. त्यादृष्टीने आता ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बी. के. शेळके दिली.
======================================
२२ रु.ची वही ६.६६ रुपयांत!
- यदु जोशी, मुंबईआदिवासी विकास खात्यात चढ्या दराने करण्यात आलेल्या खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावताच ज्या फर्मने आधी २२ रुपयांनी वह्यांचा पुरवठा केला, त्याच फर्मने आता ६.६६ रुपयात वह्या पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे.भाजपाचे सरकार आल्यानंतर गेल्यावर्षी मंत्री, कंत्राटदार, सचिव आणि अधिकाऱ्यांच्या घोळात आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप होऊ शकले नव्हते. मनमाननी दराने काढण्यात आलेल्या निविदांचे बिंग ‘लोकमत’ने फोडताच मुख्यमंत्र्यांनी निविदा प्रक्रियाच स्थगित केली होती.२०१६-१७ मध्ये आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यासाठीची निविदा रद्द करण्यात आल्यानंतर आता ११ कोटी रुपयांची ही खरेदी आता ६.५० कोटी रुपयांवर आली आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत १९२ पानी वही ३४.२० रुपयांत पुरविण्यात आली होती. यंदा १७६ पानी वहीचा दर आहे १३.२३ रु. आहे, तर ९६ पानी वही आधी २१.७८ रुपयांना खरेदी करण्यात आली. आता ७६ पानी वहीचादर आहे ६.८४ रुपयांवर आला आहे. दोन क्वायरचे रजिष्टर आधी ७० रुपयांत दिले जायचे. आता ते मिळणार आहे २४.२१ रुपयांत. रेघोटी कागदाच्या (फुुल शिट) रिमचा दर आधी ५२२ रुपयांपर्यंत जायचा आता तो २५५ रुपयांवर आला आहे. उत्तर पत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, कोरे कागद, ड्रॉर्इंग वही आदींच्या दराबाबतदेखील असाच अनुभव आला आहे. आदिवासी विकास विभागातील खरेदीवर मुख्यमंत्र्यांचीच नजर आहे म्हटल्यानंतर धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी हातमिळवणी करण्याचे थांबवले.
======================================
मुंबईसह कोकणात दमदार पाऊस
- पुणे : मान्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला असून मंगळवारी दिवसभरात मुंबईसह कोकणात दमदार पाऊस झाला. गोव्यात तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खान्देशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून वीज पडून सहाजणांचा मृत्यू झाला आहे. येत्या२४ तासांत कोकणात जोरदारपाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे़मंगळवारी राज्यात सर्वाधिक पाऊस डहाणू (जि. पालघर) येथे ११६ मिमी झाला़ ठाणे ११३, मुंबई, काणकोण ११० मिमी, भांडुप, मार्मागोवा, मुरगाव येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली़ नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, शेवगाव आदी परिसरात दमदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगलीत चांगला पाऊस झाला. पुणेकरांनाही पाऊस सुखावून गेला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़
======================================
मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा
- पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर देशातील ९८ स्मार्ट सिटींच्या प्रोजेक्टची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.मोदी यांचे २५ जून रोजी दुपारी साडे तीन वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ४ वाजता ते बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतील. तिथे लावण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रदर्शनातील स्टॉलला ते भेट देतील. ‘मेक युवर सिटी क्लीन’ या महत्वाकांक्षी स्पर्धेची घोषणा मोदी यावेळी करतील. यामध्ये एखादा रस्ता किंवा एखादा एरिया कशा पद्धतीने विकसित करता येईल, याचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व तज्ज्ञ अशा दोन पातळ्यांवर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. देशभरातील स्मार्ट सिटीच्या प्रस्तावांची एकत्रित माहिती असलेल्या संकेतस्थळाचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. त्याचबरोबर दोन ते तीन स्मार्ट सिटीच्या महापालिकेतील अधिकारी , पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मोदी संवाद साधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भाषणानंतर मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
======================================
रेल्वेच्या मालमत्तांवर ४९१ चोरांचा डल्ला
- मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम स्थानकाजवळील विद्युत उप केंद्रातून चोरांनी १८ बॅटरी चोरील्या गेल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण लोकल सेवा कोलमडली. यामुळे रेल्वे मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. रेल्वेच्या मालत्तांवर चोरांकडून ‘डल्ला’ मारण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वे मालमत्तांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. २0१५ पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर १८ लाख किंमतीच्या मालमत्तांवर ४९१ चोरांनी डल्ला मारला आहे.माहिम येथील वीज उपकेंद्रातून दोन महिन्यापूर्वीही ५७ बॅटरींची चोरी करण्यात आली होती. त्यानंतर या वीज उपक्रेंदाला सुरक्षा न पुरवण्याचा बेजबाबदारपणा पश्चिम रेल्वेने दाखवला आणि पुन्हा एकदा चोरी झाल्याचे समोर आले. रेल्वे मालमत्तांवर चोरांकडून गेल्या काही वर्षात चांगलाच डल्ला मारण्यात आला आहे. २0१५ पासून मध्य रेल्वेवर ११ लाख ८0 हजार ३४ रुपये किंमतीच्या मालमत्तेची चोरी झाली असून जवळपास ३१८ चोरांना अटक करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. जवळपास ११ लाख ४५ हजार ४७२ रुपये मालमत्ता परत मिळविली आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरीलही रेल्वे मालमत्तांवर चोरांनी चांगलाच डल्ला मारला आहे. ८ लाख १७ हजार ६५0 किंमतीच्या मालमत्ता चोरीला गेल्या असून ६ लाख ७९ हजार १५0 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळविण्यात यश आले. सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवासी आणि मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अवघे ९५९ आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आहेत. या सर्वांना तीन पाळ्यात काम करावे लागते. अपुरे मनुष्यबळ असल्याने ४00 होमगार्ड मदतीला देण्यात यावेत, अशी मागणी आरपीएफकडून पश्चिम रेल्वेकडे करण्यात आली आहे. तीच परिस्थीती मध्य रेल्वे आरपीएफचीही असून उपनगरीय मार्गांवर जवळपास २ हजार ४00 आरपीएफ प्रवासी आणि मालमत्ता सुरक्षेसाठी तैनात असतात.
======================================
बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच
- एस. पी. सिन्हा, पाटणासंपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना बिहार सरकारतर्फे मात्र एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. पाटण्याच्या गांधी मैदानात पतंजली योगपीठातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. त्यात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यापासून भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र बिहार सरकारचा प्रतिनिधी त्यात नव्हता.केवळ योग दिन साजरा करून चालणार नाही. तो साजरा करण्याआधी देशभर दारूबंदी लागू करणे करजेचे आहे, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गेले काही दिवस सातत्याने करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी तशी विनंती केली होती. सुदृढ राहायचे असेल, तर आधी दारू बंद करणे गरजेचे असून, त्यानंतरच योगाचा उपयोग आहे, असे त्यांचे म्हणणे असून, त्यांनी ते अनेक ठिकाणी बोलूनही दाखवले आहे. मात्र त्यांच्या दारूबंदीच्या विनंतीचा केंद्र सरकारने विचारही न केल्यामुळे त्यांनी सरकारतर्फे बिहारतर्फे योग दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
======================================
कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी ५८ कोटी
- नवी दिल्ली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-१७) रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जाणाऱ्या भागाच्या रुंदीकरणामुळे तेथील वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर होणारा दुष्प्रभाव कमी करण्याचे विविध उपाय योजण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५८ कोटी १६ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये हा माहिती दिली. यात वन्यजीवांना रस्ता न ओलांडता पलीकडे जाता यावे यासाठी प्रत्येकी तीन मीटर रुंद व ३.५ मीटर उंचीचे चार ‘पॅसेजेस’ व तीन मीटर रुंद व तीन मीटर उंचीचे सात ‘बॉक्स कल्व्हर्ट) बांधल्या जातील. अशा सोयींसाठी एकूण २७ बांधकामे केली
======================================
भारत व पाकला एनएसजीत प्रवेश द्यावा - चीन
- बीजिंग : आण्विक इंधन पुरवठादार गटात अर्थात एनएसजीमध्ये प्रवेशासाठी भारताला जी सवलत देण्यात येईल तीच पाकिस्तानलाही दिली जावी, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे.अण्वस्त्र प्रसारबंदी करार आणि एनएसजी भारताला सवलत देत असतील, तर ही सवलत पाकलाही मिळायला हवी, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.चीनच्या सरकारी माध्यमाने पाकला एनएसजीत प्रवेश देण्याला उघड पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ असावी. ‘भारताच्या एनएसजी प्रवेशात चीनचा अडथळा नाही,’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या लेखात म्हटले आहे की, भारताला प्रवेश देऊन पाकला बाहेर ठेवण्यास चीनसह इतर देशांचा विरोध आहे. कारण आम्हाला भारताच्या समस्येचे निराकारण करण्याच्या बदल्यात दुसरी मोठी समस्या निर्माण करायची नाही.
======================================
डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करण्याचा प्रयत्न
- लास वेगास : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिश युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मायकेल सँडफोर्ड असे त्याचे नाव असून, नेवाडा येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रम्प यांच्या मायस्टर थिएटरमधील सभेदरम्यान मायकेलने पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचे हे प्रयत्न पोलिसांनी उधळून लावले. ट्रम्प यांना ठार करण्यासाठी आपण कॅलिफोर्नियाहून येथे आलो असल्याचे त्याने सांगितले.मायकेल गेल्या दीड वर्षापासून ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्याने बंदूक चालविलेली नाही. ऐनवेळी गोळी चालविताना गफलत होऊ नये म्हणून घटनेच्या एक दिवस आधी त्याने येथील फायरिंग रेंजवर जाऊन सराव केल्याचेही तपासात समोर आले. लास वेगास येथील प्रयत्न अयशस्वी झाल्यास नंतरच्या सभेत ट्रम्प यांना मारण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने ट्रम्प यांच्या फिनिक्स येथील सभेची तिकिटे खरेदी केली होती. मायकेल दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षांचा कारावास होऊ शकतो.आपण एक किंवा दोन फेरी झाडू शकलो असतो आणि असा प्रयत्न करताच पोलिसांच्या हातून आपण मारलो गेलो असतो याची आपणास पूर्ण कल्पना असल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
======================================
आॅस्ट्रेलियाचा महिला वॉटरपोलो संघ आॅलिम्पिकसाठी पात्र
- सिडनी, दि. २१ - कर्णधार ब्रोनवन नॉक्स हिच्या नेतृत्वातील आॅस्ट्रेलियाचा महिलांचा वॉटरपोलो संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. संघाकडून खेळताना ब्रोनवन आणि गेमा ब्रेड्सवर्थ यांची ही तिसरी आॅलिम्पिक वारी ठरणार आहे. यापूर्वीच्या बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये या खेळाडूंनी आॅस्ट्रेलियाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. याशिवाय १३ सदस्यांच्या या संघातील पाच खेळाडूंची ही दुसरी आॅलिम्पिक स्पर्धा असणार आहे. सहा खेळाडू पहिल्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या संघाने शांघाय येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत इटली, रशिया आणि ब्राझील संघाचा पराभव केला आहे. संघाकडे यापेक्षा अधिक दमदार कामगिरीची क्षमता आहे. शिवाय संघातील खेळाडूंना ८०० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक ग्रेग मॅकफेडल यांनी दिली.
======================================
ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
- ऑनलाइन लोकमतब्रसेल्स, दि. २१ - मध्य ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे स्फोटके असण्याची शक्यता आहे. शॉपिंग सेंटरच्या परिसरात व्यावसायिक केंद्र असून, हा भाग सध्या बंद करण्यात आला आहे.ब्रसेल्स बेल्जियमची राजधानी आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी पथक दाखल झाले आहे, बेल्जियमच्या आपत्ती निवारण केंद्राची पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्याबरोबर चर्चा सुरु आहे.तीन महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ब्रसेल्स विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी विमानतळावर झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी युरोप हादरले होते.
======================================
६८ वर्षांचे आजोबा चालले शाळेला!
- काठमांडू : नेपाळच्या सिंगजा येथील एका शाळेत १२-१३ वर्षांच्या मुलांसोबत पांढरी दाढी असलेले ६८ वर्षीय आजोबादेखील शाळेचा गणवेश परिधान करून मनोभावे शिक्षण घेत आहेत. हाती काठी घेऊन शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या या आजोबांना मुले ‘बाबा’ म्हणून हाक मारतात, त्यांच्यासोबत खेळतात आणि शाळेला सुट्टी झाल्यावर दप्तर घेऊन त्यांच्यासोबतच गप्पागोष्टी करीत आपापल्या घरी परततात.काठमांडूपासून २५० कि.मी. अंतरावरील सिंगजा या लहानशा गावात राहणारे दुर्गा कामी गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. जीवनातील धावपळ, कुटुंबाचे पोट भरण्यासाठी चालविलेली धडपड आणि आर्थिक चणचण, यामुळे शिक्षण घेता आले नाही.शिकण्याची जिद्द आणि स्वप्न मात्र जिवंत राहिले. अशातच सहा अपत्ये झाली आणि आठ नातवंडेही अंगणात खेळू लागली, पण पत्नीचा मृत्यू झाला आणि जीवनात रितेपणा आला. मग अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा झाली.
======================================
टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ
- ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. २२ - सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये महत्वाचा दुवा ठरलेल्या टि्वटरवर शब्दमर्यादा १४० शब्दांपर्यंत वाढवल्यानंतर आता टि्वटरवर व्हिडीओची लांबीही वाढवण्यात आली आहे. टि्वटर युझर्सना आता १४० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.फेसबुक आणि गुगलच्या यूटयुबच्या तुलनेत टि्वटर मागे पडत असल्यामुळे हा नवीन बदल करण्यात आला आहे. युझर्स टिकवणे आणि वाढवणे हे दोन त्यामागे मुख्य उद्देश आहेत. टि्वटरवर आता १४० सेंकंदाचे व्हिडीओ तुम्ही अपलोड करु शकता.टि्वटरवर व्हिडीओ प्रसिद्ध करणा-याला त्यातून पैसे कमावण्याची सुविधाही टि्वटर उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वी टिवटरवर फक्त ३० सेंकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होता. त्याशिवाय टि्वटरने टिवटर एंगेज हे नवे मोबाईल अॅपही विकसित केले आहे.
======================================
इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
- आजच्या इंटरनेटयुगात सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टींवर कॉमेंट केले जाते. नेट भाषेत सांगायचे तर ‘ट्रोलिंग’ केली जाते. अशीच ट्रोलिंग बिचाऱ्या ‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाला सहन करावी लागत आहेत. क्वांटिको मालिकेत काम केल्यावर ती आंतरराष्ट्रीय सेलीब्रेटी म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘मॅक्झिम’ नावाच्या एका नावाजलेल्या इंग्लिश मॅगझिनने तिला तर ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ घोषित केले. याच मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील तिच्या फोटोची सध्या इंटरनेटवर खिल्ली उडविली जात आहे. या कव्हर फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलवून दाखविण्यासाठी फोटोशॉप इफेक्ट्सचा भरपूर प्रमाणात वापर करण्यात आल्याने सोशल मीडियावर ‘ट्रोलिंग’ला ऊत आला आहे. खासकरून तिचे आर्मपिट्स एवढे स्मूद कसे काय, असा सवाल ट्विटरवर विचारला जात आहे. एकाने ट्विट केले की, फोटोशॉप करून तर कोणीही हॉट दिसू शकते. प्रियंकाने याबाबत अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.
======================================
बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’
- भगवानदादांची ती स्टाईल, ते एक्स्प्रेशन, त्यांची ती नृत्याची शैली आत्मसात करण्यासाठी अलबेला हा चित्रपट मी एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वेळा पाहिला असल्याचे अभिनेता मंगेश देसाई यांनी ‘लोकमत’ आॅफिस भेटीदरम्यान सांगितले.मंगेश म्हणाला, मी खूप लहान असताना शनिवार, रविवारी ब्लॅक व्हाइट टीव्हीवर भर गर्दीत बसून भगवानदादांचा अलबेला हा चित्रपट पाहिला होता. लग्नसोहळे वगैरे असेल तर भगवानदादांच्या भोली सुरत दिल के खोटे या गाण्यांवरदेखील भरपूर डान्स केला आहे. पण आज प्रत्यक्षात त्यांची भूमिका करायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच भगवानदादांसारखे हुबेहुब दिसण्याची लकब ही दिग्दर्शक शेखर सरतांडेल, मेकअपमन विद्याधर भट्टे व कॅमेरामन यांच्या प्रयत्नांमुळे झाली असल्याचेदेखील या वेळी मंगेश देसाई यांनी सांगितले.२४ जूनला प्रदर्शित होणारा भगवानदादांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला या चित्रपटात भगवानदादांची भूमिका मंगेश देसाई यांनी साकारली आहे. तर गीता बालीच्या भूमिकेत विद्या बालन पाहायला मिळणार आहे.
======================================
पटणा - बिहारमध्ये मॉन्सून दाखल झाला असला; तरी गेल्या एक-दोन दिवसांत राज्यांत विविध ठिकाणी वीज कोसळल्यामुळे किमान 38 नागरिक मृत्युमुखी पडले; तर इतर 25 जण जखमी झाले.
मृतांचा हा आकडा सर्वाधिक येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घोषित करण्यात आला आहे. मृत झालेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
बिहारशेजारील झारखंड राज्यामध्येही वीज कोसळल्यामुळे काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
वीज कोसळल्याने बिहारमध्ये 38 मृत्युमुखी
| |
-
| |
मृतांचा हा आकडा सर्वाधिक येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घोषित करण्यात आला आहे. मृत झालेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
बिहारशेजारील झारखंड राज्यामध्येही वीज कोसळल्यामुळे काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
======================================
नवी दिल्ली - स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल 2300 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.
आसाराम बापूकडे 2300 कोटींची अघोषित मालमत्ता
| |
-
| |
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाने आसाराम आणि त्याच्या अनुयायांकडे असलेली अघोषित संपत्ती उघड केली आहे. स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड्स, किसान विकास पत्र आणि फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करुन आसाराम आणि अनुयायांनी हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. त्यापैकी बहुतांश गुंतवणूक आसारामने अधिग्रहण केलेल्या कोलकातामधील सात कंपन्यांमार्फत झाली आहे. त्याचे भक्त या कंपन्या चालवतात.
======================================
प्योंगयांग - उत्तर कोरियाने आज (बुधवार) या देशाच्या पूर्व सागरी तटाजवळील भागामध्ये दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
यांपैकी पहिली चाचणी अपयशी ठरली. या चाचणींतर्गत डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सुमारे 150 किमी अंतर कापल्यानंतर समुद्रामध्ये कोसळले. मात्र यानंतर काही तासांनी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने 400 किमी अंतर पार केले. ही दोन्ही क्षेपणास्त्रे "मुसुदान क्षेपणास्त्रे‘ असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे निश्चित झाल्यास उत्तर कोरियासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत उत्तर कोरियाकडून चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण कोरिया व अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा "सखोल अभ्यास‘ करण्यात येत असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे; अथावा नाही, याबाबत मत व्यक्त करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात आला. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.
उत्तर कोरियाकडून संवेदनशील क्षेपणास्त्र चाचणी
| |
-
| |
यांपैकी पहिली चाचणी अपयशी ठरली. या चाचणींतर्गत डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सुमारे 150 किमी अंतर कापल्यानंतर समुद्रामध्ये कोसळले. मात्र यानंतर काही तासांनी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने 400 किमी अंतर पार केले. ही दोन्ही क्षेपणास्त्रे "मुसुदान क्षेपणास्त्रे‘ असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे निश्चित झाल्यास उत्तर कोरियासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत उत्तर कोरियाकडून चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण कोरिया व अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा "सखोल अभ्यास‘ करण्यात येत असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे; अथावा नाही, याबाबत मत व्यक्त करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात आला. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.
======================================
प्राप्तिकर बुडव्यांना आता अटक
| |
-
| |
नवी दिल्ली - प्राप्तिकर बुडविणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हे रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत कर बुडविणाऱ्यांना अटक करणे, ताब्यात घेणे यासह मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल.
यासंबंधी चालू आर्थिक वर्षासाठी कारवाईचा आराखडा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) तयार केला आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकर कायदा कलम 276 उपकलम क (2) नुसार तीन महिने ते तीन वर्षे कारावासाची शिक्षा व दंड करता येतो. विभागाकडून अगदी अपवादाने ही कारवाई करण्यात येते. आता मात्र, अधिकाऱ्यांनी जास्तीतजास्त प्रमाणात कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी कर वसुली अधिकारी (टीआरओ) नेमण्यात आले असून, ते ही कारवाई करतील.
तसेच, "टीआरओ‘ना पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबत त्यांना कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोटीस बजावूनही कर बुडविणाऱ्या व्यक्तीला अटक, तसेच ताब्यात घेण्याची कायदेशीर तरतूद परिशिष्ट 2 मधील नियम 73 ते 81 मध्ये आहे. कर लवादासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या 2.32 लाखांवरून 2.58 लाखांवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1.33 लाख प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
======================================
No comments:
Post a Comment