[अंतरराष्ट्रीय]
१- दहशतवाद्यांकडून ‘कॅलक्युलेटर’ अॅपचा वापर
२- कतारमधील भारतीय कामगारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
३- भारतात गुंतवणुकीला मोदींच्या कतारमधल्या गुंतवणूकदारांना सूचना
४- स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !
५- जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- चार राज्यांत आदिवासींचे ‘समांतर भारत सरकार’!
७- युवकांनी भ्रामक प्रचाराला बळी पडू नये - शहा
८- ई-इन्कमटॅक्स रिटर्न भरणे पूर्वीपेक्षाही सुलभ
९- २ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक
१०- कन्हैयाच्या हल्लेखोराचा अमित शहांसोबत सेल्फी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.56 %
१२- अवघा रायगड शिवमय झाला, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
१३- शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता हे बुडबुडेच, खडसेंवर 'सामना'तून वार
१४- फटाक्यात दारु कधी ठासली कळलेच नाही-सेना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ठाणे विधानपरिषदेवर युतीचा झेंडा, सेनेचे रवींद्र फाटक विजयी
१६- सोलापूर; सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान 'आई' म्हणत तरुणाने प्राण सोडले
१७- मालकाला पेरु देऊन माकडाचा दुकानातील गल्ल्यासह पोबारा
१८- जबलपूर; भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्तीत भागीदार 5 वर्षांच्या नातवालाही जेल
१९- शहाजहानपूर; मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने वाघाशी दिला लढा
२०- पुदुच्चेरीत व्हीआयपी वाहनांच्या सायरनवर बंदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
२२- VIDEO : धोनीचं गाणं, विराट-युवी-हार्दिकचे ठुमके
२३- भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स मनोहर एच कालवश
२४- फ्रेंच ओपन: अखेर नोवाक जोकोविचनं पॅरिस जिंकलं!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शंकर हळदेकर, अनिल शिंदे, संघदीप गायकवाड, कैलास नरहरी, सचिन चव्हाण, मुरारी तिवारी, नरेश कश्यप, मनोज सावळकर, सय्यद असिफ, भगवान कदम, संदीप गाढवे, मुमान सोनी, रमेश साळवे, सुनील देशमुख, राहुल पत्रे, अविनाश झामकडे, किरण पाटील, श्रीनिवास दमकोंडवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
श्री ललिता ज्वेलर्स नावाच्या दुकानात ही घटना घडली आहे. माकडानं दुकानात आल्यानंतर मालकाला पेरु देऊ केला. मात्र मालकानं पेरु न घेतल्यामुळे माकडानं तो पेरु फेकून मारला आणि दुकानात प्रवेश मिळवला.
त्यानंतर ते माकड थेट दुकानाच्या गल्ल्यावर जाऊन बसलं. गल्ल्यातील 10 हजाराचं बंडल घेऊन माकडानं पळ काढला. या मर्कटलीलांमुळे स्थानिक व्यापारी चांगलेच चक्रावून गेले आहेत.
सरकारी सेवेत लेखापाल (अकाऊंटंट) असलेल्या हा अधिकारी उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त कमाई असल्याच्या गुन्ह्यात अडकला होता. त्याच्या खटल्याची सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तो भ्रष्ट अधिकारी, त्याची पत्नी, मुलगा आणि सून यांना प्रत्येकी पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मुंबईत स्माईल फाऊण्डेशनच्या एका चॅरिटी गाला डिनरला चौघा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील टुकूर टुकूर या गाण्यावर विराट कोहली, युवराज सिंह, हार्दिक पांड्या यांनी डान्स केला. तिघांसोबतच स्माईल फाऊण्डेशनशी संबंधित लहानग्यांनाही नृत्याचा आनंद लुटला.
शनिवारी अभिषेक बच्चनच्या ‘प्लेइंग फॉर ह्युमॅनिटी’ संस्थेसोबत विराटच्या नेतृत्वात टीम इंडियातील क्रिकेटपटूंचा फुटबॉल सामना रंगला होता.
शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवल्याचा अभिमान खडसेंच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले असं म्हणत शिवसेनेने खडसेंवर टीकेचे बाण सोडले.
‘या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही.’ अशा कानपिचक्याही सामनातून देण्यात आल्या आहेत.
१- दहशतवाद्यांकडून ‘कॅलक्युलेटर’ अॅपचा वापर
२- कतारमधील भारतीय कामगारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
३- भारतात गुंतवणुकीला मोदींच्या कतारमधल्या गुंतवणूकदारांना सूचना
४- स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !
५- जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- चार राज्यांत आदिवासींचे ‘समांतर भारत सरकार’!
७- युवकांनी भ्रामक प्रचाराला बळी पडू नये - शहा
८- ई-इन्कमटॅक्स रिटर्न भरणे पूर्वीपेक्षाही सुलभ
९- २ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक
१०- कन्हैयाच्या हल्लेखोराचा अमित शहांसोबत सेल्फी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.56 %
१२- अवघा रायगड शिवमय झाला, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
१३- शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता हे बुडबुडेच, खडसेंवर 'सामना'तून वार
१४- फटाक्यात दारु कधी ठासली कळलेच नाही-सेना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- ठाणे विधानपरिषदेवर युतीचा झेंडा, सेनेचे रवींद्र फाटक विजयी
१६- सोलापूर; सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान 'आई' म्हणत तरुणाने प्राण सोडले
१७- मालकाला पेरु देऊन माकडाचा दुकानातील गल्ल्यासह पोबारा
१८- जबलपूर; भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्तीत भागीदार 5 वर्षांच्या नातवालाही जेल
१९- शहाजहानपूर; मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने वाघाशी दिला लढा
२०- पुदुच्चेरीत व्हीआयपी वाहनांच्या सायरनवर बंदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
२२- VIDEO : धोनीचं गाणं, विराट-युवी-हार्दिकचे ठुमके
२३- भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स मनोहर एच कालवश
२४- फ्रेंच ओपन: अखेर नोवाक जोकोविचनं पॅरिस जिंकलं!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शंकर हळदेकर, अनिल शिंदे, संघदीप गायकवाड, कैलास नरहरी, सचिन चव्हाण, मुरारी तिवारी, नरेश कश्यप, मनोज सावळकर, सय्यद असिफ, भगवान कदम, संदीप गाढवे, मुमान सोनी, रमेश साळवे, सुनील देशमुख, राहुल पत्रे, अविनाश झामकडे, किरण पाटील, श्रीनिवास दमकोंडवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.56 %
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरी संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.56 टक्के लागला आहे.
नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही 91.41 टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. तर मुलांचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे 51,281 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
तर विभागनिहाय निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.56 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत मिळतील.
तसंच 18 जुलै रोजी दहावीची फेरपरीक्षा होईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
======================================
ठाणे विधानपरिषदेवर युतीचा झेंडा, सेनेचे रवींद्र फाटक विजयी
ठाणे : ठाणे विधानपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीची सद्दी शिवसेनेने संपवली आहे. कारण शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे.
एकूण 1057 मतांपैकी विजय रवींद्र फाटक यांना 601 मतं मिळाली, तर डावखरेंच्या खात्यात 450 मतं जमा झाली. त्यामुळे रवींद्र फाटकांनी 151 मतांनी विजय मिळवत भगवा फडकवला. 6 मतं बाद ठरली.
वसंत डावखरे हे गेल्या तीन टर्म या मतदार संघांतून निवडून येत होते. मात्र यंदा त्यांना गड राखण्यात अपयश आलं.
ठाणे विधानपरिषद निवडणूक : र500 मतांच्या पहिल्या फेरीत- डावखरे 189, रवींद्र फाटक 311 (अंतिम निकाल येणं बाकी)
राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसमोर यंदा शिवसेना-भाजपने रवींद्र फाटकांना रिंगणात उतरवलं होतं. संख्याबळानुसार शिवसेना-भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरीही दोन्ही उमेदवारांचं भवितव्य हे अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. त्यातच हितेंद्र ठाकूरांनी आपल्या बहुजन विकास आघाडीची मतं डावखरेंच्या पारड्यात टाकल्याने रवींद्र फाटकांसमोर आव्हान वाढताना दिसतं होतं.
======================================
सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान 'आई' म्हणत तरुणाने प्राण सोडले
पंढरपूर : चित्रपटात हिरो होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ऑडिशनला आलेल्या एका तरुणाला, हे स्वप्न चांगलंच महागात पडलं आहे. पंढरपुरात ऑडिशन देताना खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये ‘गाजर’ चित्रपटाची ऑडिशन सुरु होती. यावेळी बीडचा प्रफुल्ल बोखारे हा तरुणही आला होता. त्याला दिलेल्या डायलॉगनुसार ‘आई…’ अशी आरोळी त्याने दिली आणि तो खाली पडला, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.
तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
======================================
अवघा रायगड शिवमय झाला, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
रायगड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 342वा शिवराज्याभिषेक दिन आहे. यानिमित्त किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहं. शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहाळ्यासाठी हजारो शिवभक्त गेल्या दोन दिवसांपासून रायगडावर दाखल झाले आहेत.
कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचा सोहाळा साजरा होणार असून यासाठी शुक्रवारीच कोल्हापूर हायकर्सची एक तुकडी जलकुंभासह गडावर दाखल झाली. तर शिवधनुष्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरीहून पालखी घेऊन गडावर दाखल झाले आहेत.
शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सोहळ्यानिमित्त मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा, होळीच्या माळावरील शिर्काई मंदिराबरोबरच गडाची स्वच्छता करण्यात आली आहे.
======================================
मालकाला पेरु देऊन माकडाचा दुकानातील गल्ल्यासह पोबारा
हैदराबाद : हैदराबादच्या गुंटूरमध्ये चक्क एका माकडाने चोरी केल्याची आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. एका माकडानं ज्वेलर्सच्या दुकानातून चक्क नोटांचं बंडल लंपास केलं आहे.
श्री ललिता ज्वेलर्स नावाच्या दुकानात ही घटना घडली आहे. माकडानं दुकानात आल्यानंतर मालकाला पेरु देऊ केला. मात्र मालकानं पेरु न घेतल्यामुळे माकडानं तो पेरु फेकून मारला आणि दुकानात प्रवेश मिळवला.
त्यानंतर ते माकड थेट दुकानाच्या गल्ल्यावर जाऊन बसलं. गल्ल्यातील 10 हजाराचं बंडल घेऊन माकडानं पळ काढला. या मर्कटलीलांमुळे स्थानिक व्यापारी चांगलेच चक्रावून गेले आहेत.
======================================
भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्तीत भागीदार 5 वर्षांच्या नातवालाही जेल
जबलपूर : तुम्हाला शाळेत वाचलेली वाल्या कोळ्याची गोष्ट आठवतेय का? वाल्या कोळी हा जंगलात दरोडेखोर असतो.. तो येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्याही करत असे. प्रत्येक लूट किंवा हत्या केल्यावर त्याच्या घरातील रांजणात तो एक खडा टाकायचा. असे अनेक रांजण त्याने भरले. एक दिवस एक सत्पुरूष जंगलातून जाताना त्यांनाही लुटण्याचा त्याने प्रयत्न केला. मग त्यांनी विचारलं की तुझ्या पापात तुझे कुटुंबीय सहभागी आहेत का? वाल्या कोळ्याचं उत्तर अर्थातच होय असं होतं. त्यावर त्या सत्पुरूषांनी त्याला खरोखरच त्याच्या कुटुंबीयांना एकदा विचारण्याचा सल्ला दिला. वाल्या कोळ्याने जेव्हा घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना विचारलं तेव्हा त्याच्या पापात सहभागी होण्यास कुणीही तयार नव्हतं.
तुम्हाला माहिती असलेली ही गोष्ट पुन्हा सांगायचं कारण म्हणजे, जबलपूरमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने दिलेला एक महत्वपूर्ण निकाल. जबलपूर न्यायालयाने भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांला शिक्षा सुनावताना त्याचे कुटुंबीय म्हणजे पत्नी, मुलगा आणि सुनेलाही शिक्षा सुनावलीय. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कमाईवर त्याचे कुटुंबीय मजा करत होते, म्हणून त्याच्या गुन्ह्यात त्याचे कुटुंबीय समान भागीदार आहेत, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
सरकारी सेवेत लेखापाल (अकाऊंटंट) असलेल्या हा अधिकारी उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त कमाई असल्याच्या गुन्ह्यात अडकला होता. त्याच्या खटल्याची सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तो भ्रष्ट अधिकारी, त्याची पत्नी, मुलगा आणि सून यांना प्रत्येकी पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
======================================
कपिलही 'सैराट', 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
मुंबई : नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाने ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मालाही याड लावलं आहे. नुकतचं ‘सैराट’च्या संपूर्ण टीमला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित केलं होतं. या खास भागाचं शूटिंग काल (रविवार) पार पडलं.
आतापर्यंत कपिलच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी असायची. शोमध्ये हिंदी सिनेमांचं प्रमोशन व्हायचं. मात्र ‘सैराट’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या टीमने हिंदीतील सर्वात लोकप्रिय शोमध्ये आपली हजेरी लावली आहे.
======================================
VIDEO : धोनीचं गाणं, विराट-युवी-हार्दिकचे ठुमके
मुंबई : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे टीम इंडियाचे शिलेदार सध्या मोकळ्या वेळाचा आनंद लुटत आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यापू्र्वी धोनी, विराट, युवराज या क्रिकेटपटूंनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थितांना धोनीचा गाता गळा अनुभवता आला, तर विराट-युवी आणि हार्दिक पांड्या यांना ठुमके लगावतानाही पाहता आलं.
मुंबईत स्माईल फाऊण्डेशनच्या एका चॅरिटी गाला डिनरला चौघा क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील टुकूर टुकूर या गाण्यावर विराट कोहली, युवराज सिंह, हार्दिक पांड्या यांनी डान्स केला. तिघांसोबतच स्माईल फाऊण्डेशनशी संबंधित लहानग्यांनाही नृत्याचा आनंद लुटला.
पाहा व्हिडिओ :
शनिवारी अभिषेक बच्चनच्या ‘प्लेइंग फॉर ह्युमॅनिटी’ संस्थेसोबत विराटच्या नेतृत्वात टीम इंडियातील क्रिकेटपटूंचा फुटबॉल सामना रंगला होता.
======================================
शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता हे बुडबुडेच, खडसेंवर 'सामना'स्त्र
मुंबई : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे आपल्याला आनंद झालेला नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेने आज मात्र ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून खडसेंवर ताशेरे ओढले आहेत. शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात. बुडबुडे फुटू लागले आहेत, अशा बोचरी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवल्याचा अभिमान खडसेंच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले असं म्हणत शिवसेनेने खडसेंवर टीकेचे बाण सोडले.
‘या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही.’ अशा कानपिचक्याही सामनातून देण्यात आल्या आहेत.
कर्म नासलं की फळही नासतं अशा बोचऱ्या शब्दात खडसेंवर टीका करत शिवसेनेने आगामी काळात हा संघर्ष वाढणार असल्याचेच संकेत दिले आहेत.
======================================
भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स मनोहर एच कालवश
कोलकाता : भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स आणि प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मनोहर एच यांचं कोलकातामधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली असं कुटुंब आहे.
1952 मध्ये भारताचे पहिले मिस्टर युनिव्हर्स बनण्याचा मान मनोहर एच यांना मिळाला. मिस्टर युनिव्हर्स बनल्यानंतर पश्चिम बंगालच नव्हे तर देशभरात त्यांची ओळख निर्माण झाली.
मनोहर मागील काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केला होता. अखेर रविवारी सकाळी मनोहर यांनी 3 वाजून 50 मिनिटांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती मनोहर यांचे पुत्र खोकन एच यांनी दिली.
मनोहर यांचा एक मुलगा तरुणांना बॉडीबिल्डिंगचे धडे देण्यासाठी फिटनेस जीम चालवतो. उत्तम जेवण आणि दररोज व्यायाम हा मनोहर एच यांच्या आरोग्यदायी जीवनाचा मंत्र होता, असंही खोकन यांनी सांगितलं.
======================================
फ्रेंच ओपन: अखेर नोवाक जोकोविचनं पॅरिस जिंकलं!
पॅरिस : सर्बियाचा वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचचं फ्रेन्च ओपन जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. जोकोविचनं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अँडी मरेला 3-6, 6-1, 6-2, 6-4 असं हरवून पहिल्यांदाच फ्रेन्च ओपनचं विजेतेपद साजरं केलं.
या विजयाबरोबरच जोकोविचनं आपलं करियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. करियर ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेन्च ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चार मानाच्या स्पर्धांमध्ये किमान एकदा विजेतेपद मिळवणारा जोकोविच आजवरचा आठवा आणि ओपन इरामधला चौथाच टेनिसपटू ठरला आहे.
इतकंच नाही, तर जोकोविचनं सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवण्याचा पराक्रमही गाजवला आहे. अशी कामगिरी बजावणारा जोकोविच ओपन इरामधला पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
ओपन इरामध्ये केवळ मार्टिना नावरातिलोव्हा आणि स्टेफी ग्राफनं एकेकदा तर सेरेना विल्यम्सन दोनदा सलग चार विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर जोकोविचनं ही कामगिरी बजावली आहे.
======================================
मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने वाघाशी दिला लढा
- ऑनलाइन लोकमतशहाजहानपूर, दि. ६ - सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा सर्वात इमानी प्राणी आहे. मालकाप्रती त्याच्या निष्ठा अत्यंत प्रामाणिक असतात. वेळ पडल्यास तो मालकासाठी प्राणही देऊ शकतो. उत्तरप्रदेशातील शहाजहानपूरमध्ये एका चारवर्षांच्या कुत्र्याने मालकाला वाघाच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान केल्याची घटना समोर आली आहे.दुधवा नॅशनल पार्कजवळील बरबातपूर गावामध्ये शुक्रवारी रात्री गुरदेव सिंह हा शेतकरी त्याच्या घराबाहेर झोपला होता. त्यावेळी चार वर्षाचा जॅकी कुत्राही त्याच्या बाजूला झोपला होता. गुरुदेवच्या घराजवळ दक्षिण खेरीचे जंगल आहे. जंगलातून वाघ आपल्या मालकाच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच जॅकीने झोपेत असलेल्या मालकाला जागे केले.गुरुदेव झोपेतून उठत नाही तोच वाघाने त्याच्या दिशेने झडप घातली. जॅकीने लगेच वाघाच्या दिशेने झेप घेत त्याच्याशी दोन हात करण्यास सुरुवात केली. तेवढयावेळात गुरुदेवला काठी घेऊन बचावासाठी सज्ज होता आले. गुरुदेवचे कुटुंबिय मदतीसाठी येईपर्यंत वाघ जॅकीला खेचून जंगलात घेऊन गेला.
======================================
चार राज्यांत आदिवासींचे ‘समांतर भारत सरकार’!
- श्याम बागुल, नाशिक‘आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही’ या संघटनेने केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर केंद्र सरकारसमोरही एकप्रकारे आव्हान उभे केल्याचे चित्र मथुरेतील ताज्या घटनांनी समोर आले, पण ‘ए.सी. सरकार’ या संघटनेच्या निमित्ताने त्याहूनही कडवे आव्हान गेली अनेक दशके महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उभे करून ठेवले आहे. या समांतर ‘सरकार’च्या समोर लोकनियुक्त सरकार हतबल झाल्याचे चित्र कायम आहे.‘आम्हाला तुमचं रेशनकार्ड नको, शेषनकार्ड नको, मतदार यादी नको, आम्ही आमचे मालक आणि सरकारही आम्हीच, तुम्ही कोण? मध्यस्थ, दलाल...’ असा रोकडा सवाल करणारी या सरकारची प्रजा तुमच्या आमच्या सरकारचा कर भरीत नाही.नव्वदच्या दशकात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन स्वत:ला देशाचे मालक म्हणविणाऱ्या ‘ए.सी. भारत सरकार’च्या सदस्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण ‘ए.सी.सरकारच्या’ प्रजेने त्यांना हुसकावून लावले. त्याचबरोबर, त्यांनी आपल्या सदस्यांची नावे असलेली मतदार यादी तहसीलदारास सादर करून, आमची नावे वगळा, अशी मागणी केली.
======================================
युवकांनी भ्रामक प्रचाराला बळी पडू नये
- पुणे : यापूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. त्याविरुद्धच्या भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या प्रसारासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.शहा म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांच्या हातांना काम देण्याची रणनिती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. रोजगार निर्माण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती फायद्यात येऊ शकत नाही. शेतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी युवकांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याचे मोदींचे नियोजन आहे.
======================================
दहशतवाद्यांकडून ‘कॅलक्युलेटर’ अॅपचा वापर
- श्रीनगर/नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणारे पाक प्रशिक्षित दहशतवादी भारतीय लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीला चकमा देण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर खास प्रकारचे कॅलक्युलेटर अॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हे घुसखोर पाकिस्तानातील त्यांच्या ‘हॅण्डलर’शी कायम संपर्कात राहू शकतात.जम्मू-काश्मिरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या स्मार्ट फोनमध्ये नवा ‘कॅलक्युलेटर’ हा अॅप आढळला आहे. या अॅपमुळे दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरात बसलेल्या आपल्या प्रमुखांशी संपर्क साधण्यात आणि भारतीय लष्कराकडून केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीतून वाचण्यास मदत मिळते, असे दिसून आले आहे. या वर्षी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर हे दहशतवादी स्मार्ट फोन सोबत घेऊन आले होते, ज्यात कोणताही संदेश नव्हता, असे आढळले आहे.
======================================
कतारमधील भारतीय कामगारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
- कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आहेत. त्यांच्या अनेक समस्या ऐकून घेण्यासाठी मोदी यांनी या कामगारांची खास भेट घेतली. काही काळ ते त्यांच्यात रमलेही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काही ठिकाणी वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या.कतारच्या अमीरशी भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तामित बिन हमाद अल थानी यांनी रविवारी येथे विविध विषयांवर चर्चा केली. अमीर यांचा दोन दिवसांपूर्वीच ३६ वा वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांचे येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी फोटोसह टिष्ट्वट केले आहे की, 'अरबी पद्धतीने शानदार स्वागत. पंतप्रधानांचे दोहाच्या अमिरी दिवानमध्ये पारंपरिक स्वागत. 'दोन्ही नेत्यांत चर्चेत ऊर्जा क्षेत्रात सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.सात करारांवर स्वाक्षऱ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार दौऱ्यात उभय देशात सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आर्थिक गुप्त माहितीचे आदान प्रदान करणे, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखणे आणि गॅसने समृद्ध असलेल्या खाडीच्या देशातून विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे यासह सात महत्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कौशल्य विकास आणि शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि खेळ या क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूक या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
======================================
भारतात गुंतवणुकीला मोठी संधी, मोदींच्या कतारमधल्या गुंतवणूकदारांना सूचना
- ऑनलाइन लोकमतदोहा, दि. 5- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कतार देशाच्या दौ-यावर आहेत. कतारमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे राज्यकर्ता शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यात 7 सामंजस्य करार झाले आहेत. पर्यटन, आरोग्य, अर्थ आणि गुंतवणुकीसंदर्भात हे करार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारमधल्या व्यावसायिकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा फंडमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या सामंजस्य करारामुळे पर्यटन, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राला सहकार्य मिळणार आहे. यावेळी दोहामध्ये आमिरी दिवान या पुरस्कारानं मोदींचा सन्मानही करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे प्रतिनिधी या नात्यानं कतारचे राज्यकर्ता शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छापत्र दिलं.भारतात गुंतवणुकीला मोठी संधी आहे. या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा, असा सल्ला यावेळी मोदींनी कतारमधल्या उद्योगपतींना दिला. तुम्ही सर्वच भारताच्या क्षमतेला योग्यरीत्या जाणून आहात. गुंतवणुकीतले अडथळे दूर करण्याचा मी प्रयत्न करेन, असंही आश्वासनही मोदींनी कतारमधल्या उद्योगपतींना दिलं. यावेळी कृषी, सौरऊर्जा आणि रेल्वे आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहनही मोदींनी उद्योगपतींना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोहातल्या मेडिकल कॅम्पमध्ये जाऊन भारतीय नोकरदारांची भेट घेतली. तेव्हा भारतीय नोकरदार हे प्रवासी असल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.
======================================
स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !
- ऑनलाइन लोकमतझ्युरिच, दि. 5- देशात राहणा-या नागरिकांना कोणतीही पूर्वअट न घालता दरमहा किमान उत्पन्न म्हणून 2500 स्वीस फ्रँकएवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी धुडकावला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. अशा प्रकारची कल्पना मांडून त्यावर सार्वमत घेतले जाण्याची जगातील ही पहिलीच वेळ होती.या जनमतासाठी कौल देणारा व्यक्ती हा या देशाचा किमान पाच वर्षांपासूनचा रहिवासी असावा, अशी अट घालण्यात आली होती. विषमता आणि गरिबी याविरुद्ध लढण्यासाठी या माध्यमातून मदत मिळेल, असा उद्देश असल्याचं कारण स्वित्झर्लंड सरकारनं दिलं होतं. प्रत्येक व्यक्तीला दरमहा किमान उत्पन्न म्हणून 2500 स्वीस फ्रँक तर मुलांसाठी 625 फ्रँक एवढी रक्कम देण्याचा हा प्रस्ताव होता.देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी प्रस्तावाविरुद्ध मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनालाही नागरिकांनी यावेळी योग्य प्रतिसाद दिला आहे. चार्ल्स या अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, जर तुम्ही काहीच न करता नागरिकांना रक्कम देणार असाल तर ते काहीच करणार नाहीत.
======================================
जगातली सर्वात पहिली वेबसाईट अद्यापही सुरू
- ऑनलाइन लोकमतइंग्लंड, दि. 5- जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली.ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे.विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही www.line-mode.cern.ch लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.
======================================
ई-इन्कमटॅक्स रिटर्न भरणे पूर्वीपेक्षाही सुलभ
- नवी दिल्ली : इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्याच्या आॅनलाइन प्रणालीला अधिक उत्तेजन देण्याच्या हेतूने आयकर विभागाने शुक्रवारपासून नव्या योजनेचा प्रारंभ केला आहे. इंटरनेट सुविधा ज्यांना सहज उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी ई-आयकर रिटर्न एटीएम आधारित वैधता प्रणाली सुरू करण्यात आली. आॅनलाइन आयकर विवरणपत्रे (इन्कमटॅक्स रिटर्न्स) भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.आयकर विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी सुविधा आयकर विभागाचे ई -फायलिंग पोर्टल ्रल्लूङ्मेी३ं७्रल्ल्िरंीा्र’्रल्लॅ.ॅङ्म५.्रल्ल वर उपलब्ध आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने ही सुविधा शुक्रवारपासून सुरू केली असून, अन्य बँकांमध्येही ही सोय लवकरच उपलब्ध होणार आहे.या सुविधेचा वापर करू इच्छिणाऱ्या करदात्याला त्याचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या एटीएम कार्डच्या पूर्व वैधतेनुसार इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) मिळेल.गतवर्षी आयकर विभागाने जो प्रयोग आधार कार्ड क्रमांकाच्या माध्यमातून सुरू केला होता, त्याच धर्तीवर करदात्याची ओळख पटवण्यासाठी हा वन टाइम पासवर्ड (डळढ) काम करील.
======================================
२ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक
- कर नीती भाग १३२ - सी. ए. उमेश शर्माकोणकोणत्या व्यक्तीला पॅन काढणे अनिवार्य आहे? : आयकरातील कलम १३९ अ अनुसार जर व्यक्तीचे उत्पन्न बेसिक एक्झेम्पशन मर्यादेपेक्षा जास्त असेल, किंवा त्याची वार्षिक उलाढाल रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्याची कर कपात होत (टीडीएस) असेल तर पॅन काढणे अनिवार्य आहे.पॅन नसेल तर त्याने काय करावे?: जर कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार वर दिलेल्या यादीमध्ये मोडत असेल व त्याच्याकडे पॅन नसेल तर त्याने आयकराचा फॉर्म ६0मध्ये डिक्लेरेशनन द्यावे. तसेच ज्या व्यक्तीला शेतीचे उत्पन्न मिळते व त्याचे इतर कोणतेही उत्पन्न नाही त्याने फॉर्म ६१ दाखल केला तर त्याला पॅन नमूद करण्याची गरज नाही. तसेच विशिष्ट अनिवासी व्यक्तीला पॅन नमूद करण्याची गरज नाही.अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ जानेवारी २0१६पासून कोणत्याही व्यक्तीने दोन लाखांच्या वर खरेदी किंवा विक्री करताना पॅन द्यावा लागणार आहे म्हणे. ही आयकरातील कोणती तरतूद आहे.
======================================
पुदुच्चेरीत व्हीआयपी वाहनांच्या सायरनवर बंदी
| |
-
| |
पुदुच्चेरी - पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रविवारी व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील सायरनच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजभवनातील सुरक्षा रक्षक वाहनांचा व पायलट वाहनांचा देखील सामावेश आहे.
किरण बेदी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रुग्णवाहिकांना आणि अग्निशमन दलाच्या वाहनाना मात्र सायरनचा वापर करता येणार आहे. मात्र, व्हीआयपी वाहनांचे विशेषाधिकार देखील रद्द करण्यात आले आहेत. व्हीआयपी वाहनांसाठी आता वाहतूक थांबविली जाणार नसून, सामान्य लोकांची या वाहनांमुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक नियमनासाठी योग्य संख्येत कर्मचारी व अधिकारी नेमण्याचे आदेश दिले असल्याचेही या प्रसिद्धीपात्राकामध्ये म्हटले आहे.
======================================
पुणे - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या मानस डेका याने रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसोबत सेल्फी काढला. मानस आणि भाजप नेत्यांचा हा सेल्फी सोशल मिडीयावर चर्चेत आहे.
कन्हैयाच्या हल्लेखोराचा अमित शहांसोबत सेल्फी
| |
-
| |
अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मानसने आसामच्या तरुणांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करताना त्यांची भेट घेतली. गेल्या 24 एप्रिलला कन्हैयाने जेट एयरवेज विमानाने पुण्याला येत असताना डेकाने त्याच्यावर हल्ला करून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मानस डेका पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे. या आरोपानंतर पोलीसांनी मानसवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता, मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याची मुक्तता करण्यात आली होती. कन्हैयाने डेका कट्टर भाजप समर्थक असल्याचे म्हटले होते.
======================================
फटाक्यात दारु कधी ठासली कळलेच नाही-सेना
| |
-
| |
मुंबई - मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे घरी गेले आहेत. त्यांचे जाणे ठरलेलेच होते, फक्त योग्य मुहूर्ताच्या शोधात मुख्यमंत्री फडणवीस असावेत. या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेने आज (सोमवार) सामनातून खडसेंना लक्ष्य केले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष्य राजनीतीचाही उल्लेख केला आहे. विधानसभा निवडणुकांत खडसेंनी युती तुटल्याची निर्णय जाहीर केला होता. याच मुद्द्यावरून त्यांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे.
======================================
No comments:
Post a Comment