Saturday, 11 June 2016

नमस्कार लाईव्ह ११-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी 
३- हिंदू मुलीशी लग्न केल्यास मिळतात 7 लाख रुपये! - साध्वी 
४- सनातनची प्रतिमा मलीन करण्याचं षडयंत्र - अभय वर्तक 
५- विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती केली जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- दिघावासियांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, विचारेंचं आश्वासन 
७- ...तर मुख्यमंत्री होईन : पंकजा मुंडे 
८- ठाणे - खडवलीत पश्चिम येथे 20 जणांना गॅस्ट्रोची लागण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
९- महिलेला 6.5 लाखाला गंडा, मुंबईतील 24 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या! 
१०- केरळमध्ये स्काईपवर शाळा, अमेरिकन शिक्षकांचे धडे 
११- नागपूरमध्ये जन्माला आले 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेले बाळ 
१२- शिक्षकांनो जीन्स घालू नका; हरियानात आदेश 
१३- हिमाचल प्रदेश; खासगी बसच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू ; 18 जखमी. 
१४- हैदराबाद; शाळेचे छत कोसळून २ मजूर ठार, ४ जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- सोलापूर; बार्शीच्या प्रार्थनाला सानियाची पसंती, रिओमध्ये वर्णी 
१६- गुगलवरही चालली युरो कपची जादू 
१७- बुमराहची भेदक गोलंदाजी; झिंबाब्वे सर्वबाद 168 
१८- सेन्सॉरच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको - महेश मांजरेकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात थोड्याच वेळापूर्वी तावडेला हजर करण्यात आलं. यावेळी तावडेनं अटकेनंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार न्यायाधीशांकडे केली. 20 ऑगस्ट 2013ला डॉ. सकाळी सात वाजता डॉ. दाभोलकर यांची पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या हत्येनंतर तब्बल पावणेतीन वर्षांनी काल पहिल्यांदा पोलिसांनी पहिली अटक केली. डॉ. वीरेंद्र तावडे हा सनातन संस्थेचा साधक आहे. गेल्याच आठवड्यात सीबीआयनं त्याच्या पनवेलमधील घरीही धाड टाकली होती. तसंच त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावलं होतं. काल पोलिसांनी वीरेंद्र तावडे याला नवी मुंबईतून अटक केली.

=====================================

दिघावासियांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, विचारेंचं आश्वासन

दिघावासियांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, विचारेंचं आश्वासन
नवी मुंबई : दिघावासियांच्या घरांसाठी राज्य सरकार येत्या सोमवारी सुप्रीम कोर्टात जाईल, असं आश्वासन शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे. त्यामुळे दिघावासियांना तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर दिघ्यातल्या घरांसाठी अध्यादेश काढू, असंही राजन विचारे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सांगितलं आहे.

हायकोर्टानं नवी मुंबईतल्या घरांना अनधिकृत ठरवत लोकांना घरं सोडण्याचे आदेश दिले आहेत. कँपाकोलासाठी सर्व कायदेविषयक बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या सरकारनं दिघ्यासाठी मात्र दुजाभाव केल्याचा आरोप आहे. याशिवाय आश्वासन मिळाल्यानंतरही आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार दिघावासियांनी केला आहे.

दुसरीकडे दिघ्यात मात्र राजकीय स्टंटबाजीचा खेळ रंगताना दिसत आहे. मूळ प्रश्नाला बाजूला ठेवत दिघ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं परस्परविरोधी घोषणा देण्यातच स्वारस्य मानल्याचं चित्र आहे.

दोन दिवसात घरं रिकामी करण्याचे आदेश मिळाल्यानं दिघावासियांनी आज ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मात्र, त्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी येऊन एकनाथ शिंदेंविरोधात घोषणा दिल्या. यानंतर शिवसेनेनंही राष्ट्रवादीच्या गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली.
=====================================

...तर मुख्यमंत्री होईन : पंकजा मुंडे

...तर मुख्यमंत्री होईन : पंकजा मुंडे
मुंबई : मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही. मात्र, पक्षाकडून कधी मुख्यमंत्रिपदासाठी विचारणा झाल्या, पक्षाचा आदेश डावलणार नाही, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. 
“वादांपेक्षा मी कामाला अधिक महत्त्व देते. माझ्यावरील चिक्की घोटाळ्याचा आरोपही खेटा ठरला. एकनाथ खडसेंवरील आरोपांमध्ये तथ्य नाही. ते निर्दोष सिद्ध होऊन पुन्हा काम सुरु करतील.” असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
=====================================

महिलेला 6.5 लाखाला गंडा, मुंबईतील 24 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या!

महिलेला 6.5 लाखाला गंडा, मुंबईतील 24 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या!
मुंबई: मुंबईत भोंदू बाबाच्या अवतारात जाऊन फसवणूक करणाऱ्या चोवीस वर्षीय सागर जोशी या भोंदू बाबाला चारकोप पोलीसांनी अटक केली आहे.

हा भोंदू बाबा महिला एकट्या असताना गणपतीची पूजा करण्याच्या बहाण्याने घरात घुसायचा त्यानंतर काळ्या जादूची भीती दाखवून त्यांच्या कडून लाखोंचे दागिने आणि रोकड उकळायचा.

एका महिलेच्या घरात जाऊन अशाच प्रकारे फसवणूक करून लाखो रुपयांचे दागिने त्याने उकळले. तरीही तिच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिला याबाबत संशय आल्याने तिने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

या भोंदूबाबाला आजवर तब्बल 6.5 लाख दिले असल्याचा महिलेचा आरोप आहे. मात्र, काही दिवसांनी या भोंदूबाबानं त्या महिलेचा फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर तिने याबाबत पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदूबाबाला तात्काळ अटक केली.
=====================================

बार्शीच्या प्रार्थनाला सानियाची पसंती, रिओमध्ये वर्णी

बार्शीच्या प्रार्थनाला सानियाची पसंती, रिओमध्ये वर्णी
सोलापूर : सोलापूरच्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. भारताची वर्ल्ड नंबर वन टेनिसस्टार सानिया मिर्झाच्या पसंतीनंतरच प्रार्थनाला हा मान मिळाला आहे.

सानिया मिर्झानं रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा असल्याचं अखिल भारतीय टेनिस संघटना अर्थात आयटालाला कळवलं होतं. तर मिश्र दुहेरीसाठी तिनं रोहन बोपण्णाला पसंती दिली होती. सानियाच्या पसंतीनुसारच आयटाच्या निवड समितीनं मिश्र दुहेरीसाठी सानिया आणि बोपण्णा तर महिला दुहेरीसाठी सानिया आणि प्रार्थना ठोंबरे असा संघ निवडला आहे.


21 वर्षीय प्रार्थनानं आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदं मिळवली आहेत. 2014 साली इन्चिऑन इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीनं कांस्यपदक मिळवलं होतं.
=====================================

26/11 च्या वेळी गृहमंत्रालय अधिकारी पाकमध्ये पिकनिकला?

26/11 च्या वेळी गृहमंत्रालय अधिकारी पाकमध्ये पिकनिकला?
नवी दिल्लीः मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी भारताचे गृह सचिव आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानातील हिल स्टेशनचा आनंद घेत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या समोर आलेल्या माहितीमुळे 26/11 प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला हल्ला
भारताचे तत्कालीन गृह सचिव मधुकर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर 2008 साली इस्लामाबाद येथे भारताची एक समिती चर्चेसाठी गेली होती. या समितीमध्ये आयबीसह परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव दर्जाचे अनेक अधिकारी होते.

गृह सचिव स्तरावरील ही चर्चा 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर ही समिती पाकिस्तानमध्ये थांबली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी ही समिती पाकिस्तानातील मरी या हिल स्टेशनवर पाहुणचार घेत होती, अशी माहिती समोर आली आहे.
=====================================

केरळमध्ये स्काईपवर शाळा, अमेरिकन शिक्षकांचे धडे

केरळमध्ये स्काईपवर शाळा, अमेरिकन शिक्षकांचे धडे
विशाखापट्टणमः केरळच्या गोदावरी जिल्ह्यातील चिंतलापुडी येथे एक अनोखी शाळा भरली आहे. या शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ चाटींगद्वारे अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीय मेंटर्सकडून शिक्षण घेत आहेत.

एपी सोशल वेलफेअर स्कूल असं या शाळेचं नाव आहे. या शाळेत एकूण 320 विद्यार्थी असून ही शाळा अनुसुचित जाती जमाती कल्याण विभागामार्फत चालविली जाते, अशी बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे. सरकारी शाळांसह खाजगी शाळांसाठी ही शाळा आदर्श उदाहरण बनलं आहे.

अशी चालते शाळा
या शाळेमध्ये नियमित वर्ग भरवण्यात येतात. दर रविवारी दोन तास स्काईपद्वारे अमेरिका आणि कॅनडा येथील इंजीनिअर्स, डॉक्टर आणि पीएचडी धारक मेंटर्ससोबत विद्यार्थी संवाद साधतात. मेंटर्स विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं आवडीने निरसन करतात. तसंच विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम करतात. आतापर्यंत स्काईपद्वारे 12 वर्ग भरवण्यात आले आहेत, असं शाळेचे मुख्याध्यापक राजा राव यांनी सांगितलं.
=====================================

सनातनची प्रतिमा मलीन करण्याचं षडयंत्र - अभय वर्तक


  • ऑनलाइन लोकमत -  
    मुंबई, दि. 11 -  अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.  नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला अटक करण्यामागे सनातनची प्रतिमा मलीन करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक असून हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता असलेल्या तावडे याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा संशय आहे.
    सनातन संस्थेने शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडली. 'सीबीआयकडे कोणतेही ठोस पुरावे नसून सनातनची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेसच्या काळात जे झालं ते आताही होतं आहे. काँग्रेसच्या काळात जो छळ होत होता, जो षडयंत्राचा अनुभव येत होता, तोच अनुभव आता सत्ता बदलानंतरही येत आहे', असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी यावेळी केला आहे. 'गरीब घराण्यातल्या तावडेला सडवलं जात आहे', असंही अभय वर्तक बोलले आहेत.
=====================================

नागपूरमध्ये जन्माला आले 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेले बाळ


  • ऑनलाइन लोकमत
    नागपूर, दि. ११ - शहरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला आहे.  ८ महिने वाढ झालेले हे बाळ असून डॉक्टर यश बानाइत आणि चमु त्याच्यावर उपचार करताहेत
    'हर्लेक्विन' हा एक गंभीर जेनेटिक डिसऑर्डर असून ३ लाखांमध्ये असे एखादेच बाळ जन्माला येते. या डिसऑर्डरमुळे व्यक्तीच्या त्वचेवर परिणाम होतो. असा डिसऑर्डर असलेल्या नवजात बालकांच्या शरीरावर अतिशय कडक त्वचेचे आवरण असते. अशा मुलांच्या त्वचेची सातत्याने खूप काळजी घेणे गरजेचे असते. दरम्यान हे बाळ किती दिवस, किती महीने वा आणखी किती काळ जगेल हे सांगता येणार नाही. यापूर्वी पाकिस्तान मधे अशा प्रकारचे बाळ जन्माला आले होते.
    तीन लाख जन्माला आलेल्या बाळांमधून असे बाळ जन्माला येते, वैद्यकीय भाषेत याला Harlequin म्हणतात. जन्मजात अश्या बाळाला त्वचा राहत नाही, म्हणून बाळ विचीञ दिसते. - डॉ. यश बाणाईत
=====================================

गुगलवरही चालली युरो कपची जादू


  • पॅरिस : फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे. गुगलने शुक्रवारी सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ साठी विशेष डुडल बनवले आहे.
    गुगल नेहमीच विशेषप्रसंगी डुडल बनवते आणि युरो कपप्रती लोकांमध्ये असलेली आवड पाहता त्यावरही एक खास डुडल बनविण्यात आले आहे. त्यामुळे तेदेखील फुटबॉल चाहत्यांशी जोडले गेले आहेत. युरो कपचा उद्घाटनीय सामना यजमान फ्रान्स आणि रोमानिया यांच्यादरम्यान डी’ फ्रान्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
    डुडलमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगात गुगल लिहिण्यात आले आहे. गुगलच्या ‘एल’ला फ्रान्सची ओळख एफिल टॉवरचा आकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विशेष डुडलमध्ये युरो कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच संघांच्या ध्वजांचा समावेश करण्यात आला आहे.
    युरो कपसाठी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आणि त्यासाठी जवळपास ९0 हजार पोलीस कर्मचारी व सेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. डी’ फ्रान्स या स्टेडियमवर गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात जवळपास १३0 लोकांचा मृत्यू झाला होता. स्पर्धेत एकूण १0 शहरांत सामने खेळवले जातील आणि त्यात २४ संघ सहभागी होत आहेत. त्याआधी इतक्या संघांनी सहभाग घेतला नव्हता. ही स्पर्धा १0 जुलैपर्यंत रंगणार आहे.
=====================================
बुमराहची भेदक गोलंदाजी; झिंबाब्वे सर्वबाद 168

हरारे : जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज (शनिवार) झिंबाब्वेचा डाव अवघ्या 168 धावांत संपुष्टात आला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील नवोदित भारतीय संघासमोर 49.5 षटके तग धरला, हीच झिंबाब्वेसाठी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ठरली. बुमराहने चार गडी बाद केले.

झिंबाब्वेचा संघ तब्बल सहा महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. यंदाच्या जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध झिंबाब्वेचा शेवटचा सामना झाला होता. झिंबाब्वे दौऱ्यासाठी धोनी वगळता भारतीय संघातील इतर प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा धवल कुलकर्णी, बरिंदर स्रान आणि युझवेंद्र चहल यांना भारताने या सामन्यात संधी दिली. या सर्वांनीच झिंबाब्वेच्या अननुभवी फलंदाजांवर वर्चस्व राखले. 
=====================================
हिंदू मुलीशी लग्न केल्यास मिळतात 7 लाख रुपये!

नवी दिल्ली - मुस्लिमांनी जर हिंदू मुलीशी लग्न केला तर त्यांना सात लाख रुपये मिळत असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्राची यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. भारतातील "लव जिहाद‘ ची कट हा अरब देशात रचण्यात येत असल्याचे सांगत साध्वी प्राची यांनी विविध जातीतील मुलींशी मुस्लिमांनी विवाह केला तर वेगवेगळा दर असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "आकर्षक दुचाकींवरून मुलींच्या महाविद्यालयाबाहेर मुस्लिम तरुण गर्दी करतात. तसेच हिंदू मुलींना पटवण्यासाठी हिंदू नाव सांगतात. मुस्लिम युवकांना ब्राह्मण मुलीसोबत विवाह केल्यास 8 लाख रुपये, ठाकुर समाजातील मुलीशी विवाह केल्यास 3 लाख तर मागासवर्गीय मुलीशी विवाह केला तर दोन लाख रुपये मिळतात.‘ तसेच या प्रकारापासून दूर राहण्यासाठी हिंदू समुदायाला संकल्प करावा लागेल असेही त्या म्हणाल्या. "भारत माता की जय‘ ही घोषणा न देणारे भारतविरोधी असून त्यांना भारतात राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही साध्वी म्हणाल्या.

=====================================
शिक्षकांनो जीन्स घालू नका; हरियानात आदेश

चंदिगढ - हरियानाच्या शिक्षण खात्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या (शिक्षक व शिक्षिका) नोकरीवर असताना जीन्स घालण्यावर बंदी घातली आहे. या आदेशामध्ये या बंदीमागचे कारण स्पष्ट केले नसून शिक्षकांनी योग्य पेहराव स्वीकारून नोकरीवर औपचारिक पोशाख वापरावा, असे म्हटले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिक्षण अधिकारी म्हणाले की, जर शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य गणवेश घालून शिस्त राखण्याचे सांगत असतील, तर तो नियम शिक्षकांना देखील लागू होतो. 

शालेय शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पी के दास म्हणाले की, "जीन्सवर बंदी घालण्याव्यतिरिक्त शिक्षकांचा एकूण पेहराव औपचारिक राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. कामावर असताना भडक रंगाचे शर्ट घालायला परवानगी नसणार आहे व शर्टाच्या सर्व गुंड्या बंद करण्याची सक्तीही करण्यात येणार आहे. 

राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे महासचिव दीपक गोस्वामी यांनी हा निर्णय शिक्षक संघटनेशी चर्चा करून घ्यायला हवा होता, असे म्हटले आहे. मात्र, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सरकारने असा कुठलाही आदेश काढला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

=====================================

अमेरिकेत दोन भारतीयांना शिक्षा


  • न्यूयॉर्क : अमेरिकेत दोन वेगवेगळ्या घटनांत भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तर भारतीय वंशाच्याच एका मुलावर पोलिसांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
    पहिल्या प्रकरणात रुग्णांना डायग्नोस्टिक कंपनीकडे पाठविण्याच्या प्रकरणात १,७४,००० डॉलरपेक्षा अधिक लाच घेतल्याच्या आरोपात येथील एका न्यायालयाने भारतीय वंशाचे फिजिशियन न्यूजर्सीचे परेश पटेल (५५) यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. परेश पटेल यांनी सप्टेबर २००९ ते डिसेंबर २०१३ या काळात नीता पटेल आणि कीर्तिश पटेल यांच्या एका डायग्नोस्टिक कंपनीत रुग्णांना पाठविण्यासाठी १,७४,००० डॉलरची रक्कम लाच म्हणून घेतल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कमही आता जप्त करण्यात आली आहे.
    पोलिसांच्या हत्येचा कट
    बनावट ओळखपत्राच्या आधारे बंदूक खरेदी करून न्यूयॉर्कच्या
    पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप येथील भारतीय वंशाच्या किशोरवयीन रणबीर सिंंग शेरगिल (१८) याच्यावर ठेवण्यात आला आहे.
    रणबीर याने गत महिन्यात आपल्या घरातील सदस्यांनाही मारण्याची धमकी दिली होती.
    त्याच्या बेडरूममधून एक हँडगन, गोळ्यांचा बॉक्स, सात मासिके सापडली. ओहियो येथे आपण
    बंदूक खरेदी करण्यासाठी गेलो
    होतो, अशी कबुली रणबीरने दिली आहे. पोलिसांना मारण्याच्या एका कटाची माहिती रणबीरच्या फोनमध्ये सापडली. या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आली आहे. गत आठवड्यातच कॅलिफोर्नियात मानेक सरकार या भारतीय विद्यार्थ्याने प्रोफेसरची हत्या करून आत्महत्या केली होती. (वृत्तसंस्था)
    >पंधरा महिन्यांची शिक्षा
    विना परवाना हत्यारांचा व्यापार केल्याप्रकरणी येथील एका न्यायालयाने भारतीय व्यक्तीच्या २१ वर्षीय तरुणास १५ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. शर्मा सुखदेव असे या तरुणाचे नाव आहे.
    डिसेंबरमध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. जिल्हा न्यायाधीशांनी सुखदेव याला तीन हजार डॉलरचा दंडही लावला आहे.
    सुखदेव याने एका व्यक्तीला २०१४ मध्ये तीन हत्यारे आणि दारूगोळा विकला होता.

No comments: