[अंतरराष्ट्रीय]
१- पाकः प्रेमविवाह केल्याने युवतीला जिवंत जाळले
२- कैरो; बॉम्बमुळे 'इजिप्त एअर'चे विमान उतरविले
३- वॉशिंग्टन; अमेरिकेतून भारतात 45 अब्ज डॉलर गुंतवणूक
४- माकडामुळे केनियातील वीजपुरवठा कोलमडला!
५- हिंदुंच्या स्वतंत्र वसाहतींवर हल्ला करु: हिझबुल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- घटनानिर्मितीत आंबेडकरांची भूमिका केवळ मिथक : राय
७- भाजप सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य : राऊत
८- रेल्वेमध्ये चिमुकल्यांच्या खाण्या-पिण्यासाठी खास योजना
९- हृदयाला छिद्र असलेल्या चिमुकलीची 'मन की बात' मोदींनी ऐकली
१०- भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : महेश भट्ट
११- गरीबीमुक्त भारतासाठी हवं 6,000 डॉलर्स दरडोई वार्षिक उत्पन्न - रघुराम राजन
१२- आता सगळे काही मोदीच ठरवणार- केजरीवाल
१३- सोनिया गांधींविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पोलीसांना बदलावे लागेल - मुख्यमंत्री
१५- राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
१६- 'रेल्वेच्या कार्यक्रमाचं वेळेत निमंत्रण मिळत नाही', सेना खासदार आक्रमक
१७- कामतांचा 'संन्यास', आणि संजय निरुपमांचा 'इतिहास'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- औरंगाबाद; एव्हरेस्टवीर रफिकचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत
१९- बीडच्या शेतकऱ्याची मुलगी ठरली बेस्ट कॅडेट
२०- गोव्यात निवडणुकीसाठी 'आप' केव्हाही तयार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- TE3N...अमिताभ व नवाजुद्दीनचा अभिऩय सोडला, तर तिनपाट सिनेमा
२२- तब्बल 17 वर्षांनी गांगुली-द्रविडचा विक्रम मोडीत!
२३- उडता पंजाबला 'आप'चं फंडिंग, सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांचा आरोप
२४- टीव्ही ऑन करा आणि घरातील डास बाहेर घालवा..!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
====================================

.

भाजप सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य : राऊत
औरंगाबाद : भाजप सरकार म्हणजे निजामांचा बाप आहे, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद इथे आयोजित मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात निजामांच्या बापाचं राज्य सुरु आहे. ‘अच्छे दिन कुठे गेले?, अच्छे दिन आले असतील तर ते खडसे आणि इतर दोन पाच लोकांनाच आले असतील, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
याशिवाय द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या सेलिब्रेशनवरही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही सेलिब्रेशन कसलं करताय, असा सवालही त्यांनी विचारला.
====================================

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी, तर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य पोलीस सेवेतील, तसेच भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिक, पोलीस उपआयुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी, तर साताऱ्याचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
====================================

.
रेल्वेमध्ये चिमुकल्यांच्या खाण्या-पिण्यासाठी खास योजना
नवी दिल्ली : आपल्या कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून एक उत्तम योजना सुरु केली आहे. आता ट्रेनमध्ये 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी खाण्या-पिण्याची खास व्यवस्था केली जाणार आहे. ‘जननी योजना’ असं या नव्या योजनेचं नाव आहे.
चिमुकल्यांना रेल्वेत कोणोकोणते पदार्थ मिळणार?
रेल्वेमधअये 5 ते 12 वर्षांच्या मुलांना दूध, गरम पाणी, चॉकलेट, बर्गर आणि पिझ्झा या पदार्थांसह अन्य वस्तूही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. देशातील 25 रेल्वे स्थानकांवर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
कोणत्या रेल्वेस्थानकांवर योजनेचा शुभारंभ?
मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, चेन्नई, हावडा, सुरत, लखनऊ, मोरादाबाद या स्थानकांसह 25 स्थानकांवर योजना सुरु करण्यात आली असून, लवकरच रेल्वेस्थानकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
====================================

.
हृदयाला छिद्र असलेल्या चिमुकलीची 'मन की बात' मोदींनी ऐकली !
पुणे : हृदयरोगाने त्रस्त असलेल्या पुण्याच्या सहा वर्षीय चिमुकलीची ‘मन की बात’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकली. वैशाली यादव या चिमुकलीने मदतीसाठी थेट मोदींना पत्र लिहून साद घातली. त्यानंतर मोदींनीही त्याला प्रतिसाद देत सर्वोतपरी मदत दिली.
काय आहे प्रकरण?
हृदयाला छिद्र असल्यामुळे सहा वर्षाची वैशाली जीवन-मृत्यूच्या सीमेवर उभी होती. व्यवसायाने पेंटर असलेले वडील त्यांच्यापरीने वैशालीला वाचवण्यासाठी जीवापाड धडपडत होते. मात्र चिमुकल्या वैशालीच्या हृदयावर भली मोठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. वैशालीची खेळणी, सायकल विकून, त्यावर औषधोपचार करणाऱ्या वडिलांची इतकी मोठी शस्त्रक्रिया करण्याची ऐपत नव्हती.
मोदींना टीव्हीवर पाहून वैशालीचं पत्र
खेळण्याच्या वयात आर्थिक परिस्थिती म्हणजे काय हे न कळणाऱ्या वैशालीचा समजूतदारपणा वाखाणण्याजोगा होता. एकेदिवशी टीव्हीवर मोदींना पाहून, वैशालीनेही त्यांना पत्र लिहिण्याचं ठरवलं. स्वत:च्या वडिलांची स्थिती पाहून, वैशालीने कागद-पेन हाती घेतला आणि स्वत:ची ‘मन की बात’ थेट मोदींना लिहिली.
====================================

.
'रेल्वेच्या कार्यक्रमाचं वेळेत निमंत्रण मिळत नाही', सेना खासदार आक्रमक
मुंबई: मुंबईमध्ये आज शिवसेना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या खासदारांना कार्यक्रमाला कायम डावललं जातं. असा आरोप करत सेना खासदारांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला.
वांद्रे स्टेशनवर आज वेगवेगळ्या स्टेशनवरील स्वंयचलित जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन झालं. मात्र, या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिवसेनचे खासदार व्यासपीठावर बसले नाहीत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
‘मानपमानपेक्षा लोकांची कामं होणं महत्वाची आहेत.’ असं म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सेनेलाही टोमणा लगावला आहे.
====================================

लबनं 150 चेंडूत 184 धावा केल्या. त्यानं 21 चौकार आणि 6 षटकार ठोकले. लब आणि वेसल्स यांनी भारताच्या राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीचा विक्रम विक्रम मोडीत काढला. सौरभ आणि द्रविडनं 1999मध्ये विश्वचषकातील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 318 धावांची भागीदारी केली होती.
.
तब्बल 17 वर्षांनी गांगुली-द्रविडचा विक्रम मोडीत!
ट्रेंटब्रिज (इंग्लंड): इंग्लंडच्या मायकल लब आणि रिकी वेसल्स यांनी ‘अ’ श्रेणीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रेकॉर्ड ब्रेक भागीदारी रचण्याचा पराक्रम करीत द्रविड-गांगुलीचा तब्बल 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.
लब आणि वेसल्स यांनी नॉटिंगहॅमशाअर संघासाठी 39.2 षटकात तब्बल 342 धावांची भागीदारी केली. वेसल्सनं 97 चेंडूत 146 धावा केल्या. त्यानं आपल्या या खेळीत 14 चौकार आणि 8 षटकार ठोकले.
लबनं 150 चेंडूत 184 धावा केल्या. त्यानं 21 चौकार आणि 6 षटकार ठोकले. लब आणि वेसल्स यांनी भारताच्या राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीचा विक्रम विक्रम मोडीत काढला. सौरभ आणि द्रविडनं 1999मध्ये विश्वचषकातील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 318 धावांची भागीदारी केली होती.
====================================

.
उडता पंजाबला 'आप'चं फंडिंग, सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांचा आरोप
नवी दिल्लीः उडता पंजाब या चित्रपटातील 89 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याची अट घातल्यानंतर निर्माता अनुराग कश्यप यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे उडता पंजाब हा सिनेमा बनवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुरवले आहेत, असा गंभीर आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाज निहलानी यांनी केला आहे.
उडता पंजाब चित्रपटावर सरकार जाणीवपूर्क कात्री लावत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणुक होणार आहे. त्या दृष्टीने आप पक्षाने या वादात उडी घेतल्याचं बोललं जात आहे. केजरीवाल यांनी नुकतंच अनुराग कश्यप यांचं सिनेमासाठी समर्थन देखील केलं आहे. आप पक्ष पंजाबमधील ड्रग्जच्या समस्येवर निवडणूक लढवणार आहे, आणि हा सिनेमा देखील ड्रग्जच्या समस्येवर आधारित आहे.
सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब सिनेमात 89 कट सुचवले आहेत. पण निर्मात अनुराग कश्यप यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सेन्सॉर बोर्डाने मात्र सांगितलेले दृश्य हटवल्याशिवाय सिनेमाला सेन्सॉर मान्यता मान्यता नसल्याचं सांगितलं आहे.
====================================

.
बीडच्या शेतकऱ्याची मुलगी ठरली बेस्ट कॅडेट
नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलात पहिल्यांदाच महिला पोलीसाला सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीचा मान मिळाला. मीना तुपे या बीडमधील शेतकरी कुटुंबातील प्रशिक्षणार्थीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशकात आज महाराष्ट्र पोलिसांचा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
पोलीस उपनिरिक्षकांचा हा ११३ वा दीक्षांत समारंभ होता..नाशकातील पोलीस अकादमीच्या मैदानावर ७४९ प्रशिक्षित पोलीस निरीक्षकांचा दीक्षांत सोहळा पार पडला.
दरम्यान ८ प्लाटून्सच्या २८३ अधिकाऱ्यांनी दिमाखदार संचलन केलं. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================================

.
घटनानिर्मितीत आंबेडकरांची भूमिका केवळ मिथक : राय
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशाच्या संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका होती, हे केवळ मिथक आहे, असं वक्तव्य राम बहादूर राय यांनी केलं आहे. राय यांची नुकतीच ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स’च्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
राय हे माजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपीचे नेते आणि पत्रकार आहेत.
‘आंबेडकरांनी केवळ भाषा आणि स्पेलिंग सुधारलं’
राय यांच्या मते, घटनानिर्मितीत आंबेडकरांचा मर्यादित वाटा होता.
“संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांची मोलाची अशी भूमिका नव्हती. संविधान निर्मितीसाठी त्यावेळी सरकारी कर्मचारी असलेले बी एन राव यांनी जे जे साहित्य पुरवलं, त्यामध्ये बाबासाहेबांनी करेक्शन करत, चुका आणि भाषा सुधारल्या. त्यामुळे त्यांनी घटना लिहिली असं म्हणणं चुकीचं आहे “, असं राम बहादूर राय यांनी म्हटलं आहे.
राय यांच्या या दाव्यानंतर घटनानिर्मितीत बाबासाहेबांची भूमिका हे केवळ मिथक आहे असं तुमचं म्हणणं आहे का? असं विचारण्यात आलं. त्यावर राय म्हणाले, “होय ते एक मिथकच आहे. मिथ है, मिथ है, मिथ है.”
इतंकच नाही तर तो एक राजकारणाचा भाग होता, असा दावाही त्यांनी केला.
राय यांची भूमिका भाजपला अमान्य
राय यांनी हा दावा केला असतानाच, भाजपने मात्र राय यांची भूमिका अमान्य केली आहे.
यापूर्वी संघप्रमुख मोहन भागवत यांनी जातीवर आधारित आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचा फटका भाजपला बिहार निवडणुकीत बसला होता.
भाजपकडूनच राय यांच्यावर टीकास्त्र
राय यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपमधून टीकास्त्र सोडण्यात आलं. भाजपच्या अनुसुचित जाती शाखाप्रमुख दुश्यंत कुमार गौतम यांनी राय यांना धारेवर धरलं. तसंच राय यांचं हे वक्तव्य म्हणजे आंबेडकरांचा अपमान आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
====================================
TE3N...अमिताभ व नवाजुद्दीनचा अभिऩय सोडला, तर तिनपाट सिनेमा
- TE3N हा अमिताभ, नवाजुद्दीन व खास करून विद्या बालनच्या अभिनयाच्या दृष्टीने चांगला असेल अशी अपेक्षा होती, पण विद्या बालनला घेतलं नसतं तरी चाललं असतं इतका दुय्यम रोल तिचा आहे. काय आहे हा सिनेमा, कशासाठी बघावा आणि का बघू नये हे सांगितलंय या व्हिडीयो रिव्ह्यूमध्ये सीएनएक्सच्या जान्हवी सामंत आणि लोकमतच्या मिनाक्षी कुलकर्णी यांनी...त्यांनी या चित्रपटाला 5 पैकी 2.5 स्टार दिले आहेत.एका आजोबांनी( अमिताभ बच्चन) त्यांच्या नातीच्या शोधासाठी केलेला आटापिटा आपल्याला यातून दिसतो... यात त्यांना साथ लाभते ते पुरावश्रमीचे पोलीस व आता (चर्च मधील) फादरची. ( नवाजुद्दीन सिद्दीकी) आणि पोलीस सरिता सरकारची (विद्या बालन)...सस्पेन्स असला तरी चित्रपट थोडा संथ असल्याने रसभंग होऊ शकतो, ईंटरव्हल आधी थोडी कात्री चालवत आली असती.अभिनयाबाबत बच्चन सर व नवाझ बेस्टच आहेत, विद्याला घेतलं नसता तरी चाललं असतं. अगदी बघायचाच असेल तर, एकदा बघायला हरकत नाही.
====================================
.
टीव्ही ऑन करा आणि घरातील डास बाहेर घालवा..!
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८ - तुमच्या घरातील टीव्ही जर तुम्हाला मनोरंजनासोबतच घरातील डास बाहेर घालवण्यास मदत करायला लागला तर ? हो... आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण तसा टीव्ही बाजारात आलाय.दक्षिण कोरियास्थित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीने अशा प्रकारचा एक टीव्ही बाजारात आणलाय. हा टीव्ही मनोरंजनासोबतच आपल्या घरातील डासांना बाहेर घालवण्यास मदत होणार आहे. एलजीच्या या टीव्हीचे नाव 'मॉस्किटो अवे टीव्ही' असे आहे.भारतातील ग्राहकांना नजरेसमोर ठेवून हा 'मॉस्किटो अवे टीव्ही' विकसित करण्यात आला आहे. यामध्ये अल्ट्रा सॉनिक डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे टीव्ही ऑन केल्यास कोणत्याही प्रकारची प्राणघातक हाणी न होता घरात असलेले डास बाहेर काढण्यास मदत होते.सुरुवातीला भारतीय बाजारात 'मॉस्किटो अवे टीव्ही'ची किंमत १६,९०० रुपयांपासून ते ४७,५०० रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच, एलजीच्या ठराविक स्टोअरमध्ये या टीव्हीची विक्री करण्यात येणार आहे.
.
====================================
भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : महेश भट्ट
- ऑनलाइन लोमकतमुंबई, दि. ८ : 'उडता पंजाब' या चित्रपटातील सेन्सॉर बोर्डाने ८९ कट्स सुचवल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील वाद चिघळला गेला. शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाकण्याचीही सूचना केली आहे. तसेच राजकारण व निवडणुकीचेही संदर्भ काढण्यास सांगितले आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेमुळे चित्रपट दिगदर्शक भलतेच संतापले असून आज मुंबईमध्ये एकत्र येवून त्यांनी पत्रकार परिषेदेद्वारे आपली नारी व्याकत केली. त्यावेळी बोलताना महेश भट्ट यांनी सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी यांच्यावर असा आरोप केला ते म्हणाले भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डातून ( सीबीएफसी) काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली.दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही या मुद्यावर नाराजी व्यक्त करताना, "मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील. पण मला आता विमान पकडायची गरज नाही. कारण इथे तेच अनुभवयास मिळत आहे," अशा संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
====================================
एव्हरेस्टवीर रफिकचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत
- ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ८ - जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकचे बुधवारी रंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाने चिकलठाणा विमानतळापासून अधीक्षक कार्यालयापर्यंत भलीमोठ्ठी रॅली काढून शहराला या एव्हरेस्टवीराची ओळख करून दिली.'जयोस्तुते'च्या गजरात अधीक्षक कार्यालयात पोलिस बँडने सलामी दिली. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या रफिक शेखने १९ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्याचे हे यश अनेकांना प्रेरणादेणारे आहे.मराठवाड्यासाठी तो पहिला एव्हरेस्टवीर ठरला आहे. १९ मे च्या सकाळी ९.०२ मिनिटांनी रफिक जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. एव्हरेस्ट शिखरापासून १०० मीटर अंतरावर असताना रफिकला भरुन आले होते. पुढची दहा मिनिटे तो रडत होता असे त्याने सांगितले.
====================================
बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पोलीसांना बदलावे लागेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ८ - पोलीस हा डिसिजन फोर्स असून, बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पोलीसांना बदलावे लागेल. देशांतर्गत बाह्यशक्तीचे आक्रमण वाढले असून, स्ट्रीट गुन्हेगारीबरोबरच सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११३ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळयात बोलताना म्हणाले.सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करा. पोलिसांसाठी सुविधा कमी असल्या तरी आहे त्या परिस्थितीत पोलीसाना कायदा सुवयास्थेचे पालन करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. मीना भीमसिंग तुपे या महिला पोलिसाला बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० पैकी सात महिला उपनिरीक्षकाना सुवर्णपदक मिळाले.महाराष्ट्र पोलिस अकादमीतील ११३ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळयासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये आले आहेत. ११३ व्या तुकड़ीत ७४९ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक असून, ५०३ पुरुष तर २४६ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
====================================
कामतांचा 'संन्यास', आणि संजय निरुपमांचा 'इतिहास'
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 08 - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसगुरुदास कामत यांनी राजकीय संन्यास घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रस नेते गुरुदास कामत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असली तरी यामुळे काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. गुरुदास कामत यांच्या समर्थनार्थ 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. अगोदरच अडचणीत असलेली काँग्रेस संजय निरुपम यांना हटवणार का ? याचं उत्तर येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही समोर आले आहेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.
====================================
गरीबीमुक्त भारतासाठी हवं 6,000 डॉलर्स दरडोई वार्षिक उत्पन्न - रघुराम राजन
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - जर भारताला गरीबीपासून मुक्ती मिळवायची असेल तर देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न सहा ते सात हजार डॉलर इतके व्हावे लागेल असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडले आहे. सध्या भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न 1,500 डॉलर्स आहे आणि ते ही समप्रमाणात विभागलेले नसून श्रीमंत व गरीब अशी प्रचंड दरी आहे. विशेष म्हणजे सिंगापूरसारख्या देशाचे दरडोई वार्षिक दरडोई उत्पन्न तब्बल 50,000 डॉलर्स आहे. तिथपर्यंत मजल गाठण्यासाठी खूप काळ लागणार असला तरी किमान सरासरी 6 ते 7 हजार डॉलर्स इतके तरी दरडोई उत्पन्न भारताचे असायला हवे अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली आहे.
====================================
.
पाकः प्रेमविवाह केल्याने युवतीला जिवंत जाळले
| |
-
| |
मोबाईलमध्ये
झीनतचे छायाचित्र दाखविताना तिचा पती रफिक.
लाहोर- प्रेमविवाह केल्यामुळे युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना आज (बुधवार) घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झीनत (वय 18) या युवतीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. झिनतच्या आईने व भावाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत तिचा जागीच जळून मृत्यू झाला. याप्रकरणी झिनतच्या आई व भावाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पंजाब प्रांतात राहणाऱया झीनतचे गावातच राहणाऱ्या रफिकबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. दोघांनी न्यायालयात जाऊन विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

कैरो- विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यामुळे इजिप्त एअरचे विमान उझबेकिस्तानात तातडीने उतरविण्यात आले. मात्र, विमानाची बॉंबशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर या विमानाने पुन्हा बीजिंगच्या दिशेने उड्डाण केले.
इजिप्तच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून बीजिंगला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदपासून 840 किलोमीटर अंतरावरील उर्गेंच शहरातील विमानतळावर उतरविण्यात आले होते. त्यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. सुमारे चार तासांनंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. या विमानात 135 प्रवासी होते.‘
.
बॉम्बमुळे 'इजिप्त एअर'चे विमान उतरविले

नवी दिल्ली - "तुम्ही काय खायचे, काय घालायचे, काय बोलायचे, काय पाहायचे, काय शिकायचे आता हे सारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील‘, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या "उडता पंजाब‘ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कश्यप यांच्या चित्रपटातील अनेक दृश्ये काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे. त्यानंतर "उत्तर कोरियातील हुकुमशाही राजवटीत राहात आहोत की काय?‘ असा प्रश्न कश्यप यांनी उपस्थित केला. त्यावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी कश्यम यांच्यावर आम आदमी पक्षाकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावरून बॉलिवूडने एकत्र येऊन पहलानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे. "मोदी यांच्या राज्यात आणखी काय अपेक्षित आहे.‘ तसेच "उडता पंजाब‘ला पाठिंबा दर्शवित "पंजाबचा युवक नशेमध्ये उध्वस्त झाला आहे. पंजाबचे सत्य समोर आलेच पाहिजे.‘ असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
.
आता सगळे काही मोदीच ठरवणार- केजरीवाल

'गोव्यात निवडणुकीसाठी 'आप' केव्हाही तयार'
| |
-
| |
पणजी- गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप) केव्हाही तयार आहे, असे पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.
खेतान म्हणाले, ‘गोव्यामध्ये निवडणुकीसाठी आम्ही केव्हाही तयार आहोत. पक्षाने 40 उमेदवारही जाहीर केले आहेत. राज्यात निवडणुकीनंतर आपचे सरकार स्थापन होईल.‘
कॉंग्रेस, भाजपकालीन भ्रष्टाचाराचा समाचार घेत गोवा भ्रष्टाचारमुक्त करू, असे सांगत दिल्लीप्रमाणे गोव्यात आम आदमी पार्टीचे इमानदार सरकार आणण्यासाठी सर्वधर्मियांनी एकजूट बांधावी असे आवाहन आम आदमी पार्टीचे निमंत्रक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच येथे केले आहे. दरम्यान, गोव्यात पुढील वर्षी मार्च महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.

वॉशिंग्टन: भारतात अमेरिकेतील कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात 28 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे व आगामी काळात 45 अब्ज डॉलरची गुंतवणूक नियोजित आहे, अशी माहिती अमेरिका-भारत उद्योग परिषदेचे(युएसआयबीसी) अध्यक्ष जॉन चेम्बर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. युएसआयबीसीच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
"सप्टेंबर 2014 मध्ये युएसआयबीसीच्या सदस्यांनी पुढील 2-3 वर्षांच्या कालावधीत 41 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की दोन वर्षांच्या आतच परिषदेच्या 20 टक्के सदस्यांनी तब्बल 28 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे",असे चेम्बर्स म्हणाले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, येत्या दोन तीन वर्षात हे प्रमाण आणखी वाढताना दिसेल. पुन्हा एकदा आमचे 20 टक्के सदस्यांमार्फत अतिरिक्त 45 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
.
अमेरिकेतून भारतात 45 अब्ज डॉलर गुंतवणूक

नैरोबी - केनिया देशामधील वीजपुरवठा नुकताच तब्बल तीन तास कोलमडलेल्या अवस्थेत होता. संपूर्ण देशाचा वीजपुरवठा एका माकडामुळे खंडित झाल्याचे येथील "केनिया इलेक्ट्रिसिटी जनरेशन कंपनी‘ने म्हटले आहे.
मध्य केनियामधील जितारु वीज प्रकल्पाच्या छतावर एक माकड चढले होते. हे माकड येथील ट्रान्सफॉर्मरवर पडल्याने कंपनीतील इतर यंत्रांवरही परिणाम झाला. यामुळे प्रकल्पामधील तब्बल 180 मेगावॅट वीज नष्ट झाल्याने देशभरातील वीजपुरवठा कोलमडला. दरम्यान, या अपघातामधून हे माकड आश्चर्यकारकरित्या बचावले असल्याचा उल्लेख कंपनीच्या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. कंपनीभोवती भक्कम इलेक्ट्रिक कुंपण उभारण्यात आले आहे; यामुळे ही घटना केवळ अपवादात्मक असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
.
माकडामुळे केनियातील वीजपुरवठा कोलमडला!

तिरुअनंतपुरम - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह केरळमधील काँग्रेस नेत्यांविरोधात एका कन्स्ट्रक्शन कंपनीने तिरुअनंतपुरममध्ये गुन्हा दाखल केला आहे. पैसे थकविल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
सोनिया गांधींविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल
| |
-
| |
हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर राजीव यांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांनी इमारतीच्या बांधकामाचे पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या इमारतीच्या बांधकामाचे कॉन्टॅक्ट हिथर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले होते. कंपनीने हे बांधकाम पूर्ण केले. मात्र, अद्याप या कंपनीला पैसे देण्यात आलेले नाहीत.
====================================
श्रीनगर - जम्मु काश्मीर राज्यामधील सुरक्षा दले, सैनिकांच्या वसाहती आणि काश्मिरी पंडितांसाठीच्या स्वतंत्र वसाहतींना लक्ष्य करण्याचा इशारा हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुऱ्हान वानी याने दिला आहे. मात्र याचवेळी राज्यात लवकरच होणाऱ्या अमरनाथ यात्रेस लक्ष्य करणार नसल्याचा दावाही त्याने केला.
"तुम्हालाच माहिती आहे की, गेल्या महिन्यामध्ये आम्ही अनेक लष्करी जवान व पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले आहे. पोलिस हे आमच्यापैकीच आहेत; मात्र तरीही त्यांना लक्ष्य करण्यास ते भाग पाडत आहेत. आमच्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचा इशारा त्यांना आम्ही गेल्या वर्षी दिला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आमच्याविरोधातील कारवाईबरोबरच आमच्या तरुणांनाही त्रास द्यावयास सुरुवात केली. यामुळे आता गणवेशामधील प्रत्येकास लक्ष्य केले जाईल. यामुळे आता पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचा जीव प्यारा असेल; तर त्यांनी पोलिस कॅंपच्या मर्यादेमध्येच त्यांचे काम करावे. आमच्याविरोधात कारवाई करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्या मृत्युस तो स्वत: जबाबदार असेल,‘‘ असे वानी म्हणाला.
.
हिंदुंच्या स्वतंत्र वसाहतींवर हल्ला करु: हिझबुल

No comments:
Post a Comment