[अंतरराष्ट्रीय]
१- 8 स्टँडिंग ओव्हेशन, 66 वेळा टाळ्यांच्या गजरात दाद, मोदींनी अमेरिकन संसद गाजवली
२- इंडोनेशियास पुन्हा शक्तिशाली भूकंपाचा धक्का
३- जेरुसलेम; तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला; 4 ठार
४- 'एनएसजी'साठी मेक्सिकोचा भारताला पाठिंबा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- मोदींसाठी मेक्सिकोच्या अध्यक्षांचं ड्रायव्हिंग, NSG साठीही पाठिंबा
६- भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
७- रेल्वेत आता चिमुकल्यांसाठी मिळणार 'खास' मेन्यू
८- मोदींचा चमचा असल्याचा अभिमान - पहलाज निहलानी
९- मान्सूनच्या आगमनाने शेअर बाजारात बहार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ: रावसाहेब दानवे
११- राज ठाकरे - मुख्यमंत्र्यांची भेट, मुद्दा 'नीट'चा, चर्चा राजकीय?
१२- गोंदिया; बारावीचा 'सेम-टू-सेम' पेपर लिहिणारा अख्खा वर्ग नापास
१३- सेना स्टाईलने काँग्रेस चालवू नका; पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन
१४- केवळ अर्धा टक्का व्याजदर कपातीवर ग्राहकांची बोळवण
१५- ‘यिन’चे मंत्रिमंडळ रंगले अधिवेशनात
१६- एकनाथ खडसेंची चौकशी सहा महिन्यात
१७- हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
१८- देवनार डंपिंग ग्राऊंडला पुन्हा लागली आग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- कल्याण; जप्त वाहन सोडवण्यासाठी पाठलाग करताना एकाचा मृत्यू
२०- यवतमाळमध्ये मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोपलं
२१- घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटली, वाहनं वाहून गेली
२२- ठाणे; दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान
२३- अमरावती; लग्नमंडपातच प्रियकराला पेटविण्याचा प्रयत्न
२४- पश्चिम बंगाल; पत्नीचा रंग काळा असल्याने जिवंत जाळले
२५- रायपुर; छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर नक्षली हल्ला
२६- पुर्व बगदादमध्ये कार स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 30 जखमी
२७- नंदूरबारमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांना झाली विषबाधा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- राजपाल यादव पुन्हा जेलमध्ये जाणार
२९- युवराजचा नवा लूक सोशल मीडियावर
३०- पाकिस्तानचा नामांकित वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या संघात
३१- डोपिंगप्रकरणी टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी
३२- लडता पहलाज..! 'उडता पंजाब'च्या वादावर 'अमुल'ची मार्मिक टिप्पणी
३३- 'जिनियस' सचिनशी माझी तुलना नको - कूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अनिरुद्ध सवराते, प्रणय गंभिरे, शिवराज शिंदे, आर्यन मानेवाड, अविनाश बुरपुटे, नितीन पाटील, कल्याण रोडगे, गणेश कापसिकर, कृष्णा तिवारी, अमोल जैन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================
.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================

.
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.==================================
.
.==================================
बिरभूम (पश्चिम बंगाल)- पत्नीचा रंग काळा असल्याने तिला जिवंत जाळण्यात आल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.
सोमेरा बिबी (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सोमेरा यांनी मृत्युपुर्व दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ‘माझा रंग काळा असल्यामुळे कुटुंबीयांकडून त्रास दिला जात होता. पतीला गोऱ्या रंगाची पत्नी हवी होती. तीन जून रोजी पती, तीन दीर व सासूने एका खोलीमध्ये कोंडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी शेजाऱ्यांनी माझ्या दोन वर्षाच्या मुलाला पळविल्याने तो बचावला.‘
‘सोमेरा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.
.
.==================================
लंडन - कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेल्या इंग्लंड कर्णधार ऍलिस्टर कूकने माझी ‘जिनियस‘ सचिन तेंडुलकरसोबत तुलना नको, असे म्हटले आहे.
.
.==================================
वरईपासून भगर तयार केली जाते, हे माहीत असले, तरी ती ग्राहकांपर्यंत चांगल्या दर्जाची पाठविणे सोपे नाही. त्यातच प्रस्थापितांपेक्षा वेगळे करण्यासाठी त्यात खूप मेहनत लागणार होती, त्यासाठी देशात प्रथमच मशिन खरेदी केले आणि त्यामुळे यश फूडची भगर, असा देशभरात ब्रॅन्ड तयार झाला, याविषयी सांगताहेत कंपनीचे संचालक महेंद्र छोरिया...
वडील सीए असल्याने त्यांनाही मी त्याच क्षेत्रात काम करावे आणि नावलौकिक मिळावा, अशी अपेक्षा होती. त्यात मला अजिबात रस नव्हता. उलट व्यवसाय करण्याकडे माझा कल होता. अर्थात, लहानपणापासून एका व्यवसायाकडे माझे लक्ष होते. घोटीला मामा होते, धूलचंद पूनमचंद चोरडिया. त्यांचा भगर तयार करण्याचा कारखाना होता. ते पारंपरिक पद्धतीने भगर तयार करायचे. यामुळे वरईपासून भगर तयार व्हायची. मात्र, म्हणावा तसा दर्जा नव्हता. परिणामी, बाजारातही भगरीकडे ग्राहकांचा फारसा कल नव्हता. या साऱ्या बाबी माझ्या निरीक्षणात आल्या. व्यवसाय करावा, असे मनाशी पक्के झाले. तेव्हा भगरसंदर्भात कंपनी सुरू करण्याचा विचार डोकावला. त्यासाठी प्रस्थापित कंपन्यांशी दोन हात करावे लागणार, हे ठाऊक होते. काहीतरी वेगळे करावे लागणार होते, हेही तितकेच खरे. सातपूर औद्योगिक वसाहतीत 2001 मध्ये जागा घेतली आणि "यश फूड प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. त्यासाठी वडील आणि मामांचे पाठबळ मिळाले. कच्चा माल असलेल्या वरईवर प्रक्रिया करून ती अधिक स्वच्छ व दर्जेदार व्हावी, यासाठी नवीन मशिन खरेदी केली. ते मशिन देशात पहिल्यांदा आम्ही खरेदी केले आणि कंपनीत बसविले. त्याचा परिणाम असा झाला, की ग्राहकांना स्वच्छ भगर उपलब्ध झाली. शिवाय भगरीचा दर्जा सुधारल्याने मार्केटमध्ये तिची मागणीही वाढली. वर्षभरातील एखादं-दोन महिन्यांचा कालावधी सोडला, तर महाशिवरात्र, नवरात्र, एकादशीसाठी भगरीला मागणी वाढली. पचनाला हलकी असल्याने डॉक्टरांकडूनही प्राधान्याने ते रुग्णांना सांगितले जाऊ लागल्याने भगरीला वेगळी ओळख निर्माण झाली. आज यश फूडची भगर देशभरासह अमेरिका व इंग्लंडसह युरोपातही जाऊन पोचली आहे, त्यासाठी सुरवातीच्या काळात जे कष्ट करावे लागले ते महत्त्वाचे होते.
.
.==================================
.
.==================================
.
.==================================
मेक्सिको सिटी - आण्विक पुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी मेक्सिकोने भारताला पाठिंबा दिला आहे. मेक्सिकोने भारताला पाठिंबा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
.
. .==================================
ना घोषणाबाजी, ना गदारोळ; प्रत्येकालाच बोलण्याची संधी
मुंबई - दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण आणि शिक्षण पद्धतीतील बदल अशा मुद्द्यांवरून ‘यिन’च्या (यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्क) अधिवेशनाचा पहिला दिवस बुधवारी (ता. ८) गाजला. प्रतिरूप विधिमंडळात ना घोषणाबाजी, ना गदारोळ; प्रत्येकालाच बोलण्याची संधी, असे चित्र दिसले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरवात जोरदार झाली. सभागृहात फक्त विरोधी पक्षनेता नव्हता, असे मिश्कील भाष्य करत सभापती अरुण गुजराथी यांनी, विरोधी पक्षनेत्याची निवड गुरुवारी (ता. ९) केली जाईल, असे जाहीर केले.
मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज सकाळी ‘यिन’च्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली. या अधिवेशनाला तब्बल अडीच हजार महाविद्यालयांतून निवडलेले ३६ पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील २३ सदस्य उपस्थित आहेत. पहिल्या अधिवेशनाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील उत्सुकता जाणवत होती. विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले संदीप पालवे आणि उपमुख्यमंत्रिपदी रितेश घुगे यांच्यावर तणाव दिसत होता. पहिल्या सत्रात प्रतिराज्यपाल माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि सभापती अरुण गुजराथी यांच्या भाषणांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना मानसिक पाठबळ दिले; तसेच दिवसभरातील कामकाजाची दिशा ठरवली. स्वदेशी वस्तूंचा वापर, लग्नात हुंडा देणार-घेणार नाही, हा पहिला संकल्प विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे न्या. धर्माधिकारी म्हणाले.
.
. .==================================
.
. .==================================
१- 8 स्टँडिंग ओव्हेशन, 66 वेळा टाळ्यांच्या गजरात दाद, मोदींनी अमेरिकन संसद गाजवली
२- इंडोनेशियास पुन्हा शक्तिशाली भूकंपाचा धक्का
३- जेरुसलेम; तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला; 4 ठार
४- 'एनएसजी'साठी मेक्सिकोचा भारताला पाठिंबा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- मोदींसाठी मेक्सिकोच्या अध्यक्षांचं ड्रायव्हिंग, NSG साठीही पाठिंबा
६- भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
७- रेल्वेत आता चिमुकल्यांसाठी मिळणार 'खास' मेन्यू
८- मोदींचा चमचा असल्याचा अभिमान - पहलाज निहलानी
९- मान्सूनच्या आगमनाने शेअर बाजारात बहार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ: रावसाहेब दानवे
११- राज ठाकरे - मुख्यमंत्र्यांची भेट, मुद्दा 'नीट'चा, चर्चा राजकीय?
१२- गोंदिया; बारावीचा 'सेम-टू-सेम' पेपर लिहिणारा अख्खा वर्ग नापास
१३- सेना स्टाईलने काँग्रेस चालवू नका; पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन
१४- केवळ अर्धा टक्का व्याजदर कपातीवर ग्राहकांची बोळवण
१५- ‘यिन’चे मंत्रिमंडळ रंगले अधिवेशनात
१६- एकनाथ खडसेंची चौकशी सहा महिन्यात
१७- हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
१८- देवनार डंपिंग ग्राऊंडला पुन्हा लागली आग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- कल्याण; जप्त वाहन सोडवण्यासाठी पाठलाग करताना एकाचा मृत्यू
२०- यवतमाळमध्ये मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोपलं
२१- घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटली, वाहनं वाहून गेली
२२- ठाणे; दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान
२३- अमरावती; लग्नमंडपातच प्रियकराला पेटविण्याचा प्रयत्न
२४- पश्चिम बंगाल; पत्नीचा रंग काळा असल्याने जिवंत जाळले
२५- रायपुर; छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर नक्षली हल्ला
२६- पुर्व बगदादमध्ये कार स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 30 जखमी
२७- नंदूरबारमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांना झाली विषबाधा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- राजपाल यादव पुन्हा जेलमध्ये जाणार
२९- युवराजचा नवा लूक सोशल मीडियावर
३०- पाकिस्तानचा नामांकित वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या संघात
३१- डोपिंगप्रकरणी टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी
३२- लडता पहलाज..! 'उडता पंजाब'च्या वादावर 'अमुल'ची मार्मिक टिप्पणी
३३- 'जिनियस' सचिनशी माझी तुलना नको - कूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अनिरुद्ध सवराते, प्रणय गंभिरे, शिवराज शिंदे, आर्यन मानेवाड, अविनाश बुरपुटे, नितीन पाटील, कल्याण रोडगे, गणेश कापसिकर, कृष्णा तिवारी, अमोल जैन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==================================
राज ठाकरे - मुख्यमंत्र्यांची भेट, मुद्दा 'नीट'चा, चर्चा राजकीय?
मुंबई: मेडिकल प्रवेशाच्या नीट परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत पालकही होते.
मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे आणि पालक यांच्यातील ही भेट 20 मिनिटे झाली. त्यानंतर मात्र फक्त राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात खासगीत बैठक झाली.
ही बैठक राजकीय असल्याची चर्चा आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात गुप्त चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे नीटच्या पडद्याआड राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीट तर झाली नाही ना? अशी चर्चा आहे.
.==================================
मोदींसाठी मेक्सिकोच्या अध्यक्षांचं ड्रायव्हिंग, NSG साठीही पाठिंबा
मेक्सिको सिटी : स्वित्झर्लंड पाठोपाठ मेक्सिकोनेही अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यातील अंतिम टप्पा मेक्सिकोमध्ये होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नीटो यांची भेट घेतली.
यावेळी नीटो यांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला पाठिंबा दिल्यामुळे, मोदींनी त्यांचे आभार मानले.
यानंतर मोदी – नीटो यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मोदींनी मेक्सिकोसोबत माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये व्यापार आणि गुतंवणुकीवर भर दिला. त्याशिवाय त्यांनी अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणुकीची आशा व्यक्त केली.
मोदींनी आपल्या भाषणाचा शेवट मेक्सिकोचे प्रसिद्ध कवी ऑक्टोवियो पाज यांच्या वाक्याने केलं. “मी समझू शकतो की भारतीय होण्याचा काय अर्थ आहे, कारण मी एक मेक्सिकन आहे”.
.
.==================================
8 स्टँडिंग ओव्हेशन, 66 वेळा टाळ्यांच्या गजरात दाद, मोदींनी अमेरिकन संसद गाजवली
वाशिंग्टन: प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना अमेरिकन संसदेत घडली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान आख्ख्या संसदेने आठ वेळा उभं राहून त्यांना अभिवादन केलं. तसंच अमेरिकन सिनेटर्सनी तब्बल 66 वेळा टाळ्यांच्या गजरात मोदींना दाद दिली.
अमेरिकन संसदेचे अध्यक्ष पॉल रायन यांनी नरेंद्र मोदींना 8 जून रोजी अमेरिकन सिनेटर्सना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. 2005 रोजी याच अमेरिकेच्या संसदेने एक प्रस्ताव मंजूर करुन मोदींना अमेरिकेचा व्हिजा नाकारला होता. त्यामुळे अमेरिकन संसदेने मोदींना दिलेलं आमंत्रण एका अर्थाने महत्त्वाचं होतं.
मोदींनीही अमेरिकन संसद चांगलीच गाजवली. मोदींचं भाषण सुरु असताना तब्बल 66 वेळा सर्व अमेरिकन सिनेटर्सनी त्यांना प्रतिसाद दिला. तर भाषण संपल्यानंतर सर्व सिनेटरनी उभारुन त्यांना अभिवादन केलं.
.==================================
राजपाल यादव पुन्हा जेलमध्ये जाणार
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 2013 साली दिल्ली उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी राजपालला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
चार वर्षांपूर्वी दिल्लीतील उद्योजक एम.जी आग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप करुन न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात राजपाल यादवला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु 2013 साली राजपालने खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांची शिक्षा ठोठावली. यानंतर त्यांनी चार दिवसांचा तुरुंगवासही भोगला. त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती करुन त्याची सहा दिवसांची शिक्षा माफ केली. पण न्यायालयाने राजपालला दिल्ली बाहेर न जाण्यास सांगितले होते.
.==================================
.
.==================================
युवराजचा नवा लूक तुम्ही पाहिला
मुंबई : झिम्बाब्वेला रवाना झालेल्या भारतीय संघात युवराज सिंहचा समावेश झालेला नाही. त्यामुळे आता रिकाम्या वेळी युवी ट्रेनिंगसोबतच त्याच्या लुक्सवरही लक्ष देत आहे. युवराजने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे.
युवीला त्याचा नवा हेअरकट अतिशय आवडला आहे. नव्या कूल लूकसाठी युवराजने त्याचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमचे आभार मानले आहेत.
आयपीएल 2016 ची चॅम्पियन टीम ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघात युवराजचा समावेश होता. आयपीएल-9 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांना मुकल्यानंतर अखेरच्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भलेही युवराज सिंहची निवड झाली नाही, परंतु स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची आशा त्याने अद्यापही सोडलेली नाही.
.==================================
पाकिस्तानचा नामांकित वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या संघात
मुंबई : पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज जुनैद खान याने इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चांगला फार्म असूनही संघात सातत्याने डावललं जात असल्याने त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानकडून खेळताना जुनैद खानने 22 कसोटी सामन्यांमध्ये 2.93 इकॉनॉमी रेटने 71 विकेटस घेतल्या आहेत. तर 52 अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5.27 च्या इकॉनॉमी रेटने 78 विकेट्स घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्येही पेशावर जल्मी संघाकडून खेळताना त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत, पहिल्याच ओव्हरमध्ये लाहोर कलंदर्सच्या ख्रिस गेलची विकेट घेतली होती.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम-उल-हक यांनी, जुनैद खानच्या फीटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावर जुनैदने निवड समितीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “पूर्णत: फिट असूनही मला सातत्याने निवड समितीकडून डावलले जात आहे. याचे कारण मला अद्याप कारण समजलेले नाही. त्यामुळे मी पाकिस्तान सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याच्या विचारात आहे. इंग्लंडच्या टीमकडून खेळण्यासाठी तिथल्या नागरिकत्वाची गरज आहे. त्यासाठी माझी पाच वर्षांसाठी इंग्लंडमध्ये राहण्याची तयारी आहे.”
.==================================
जप्त वाहन सोडवण्यासाठी पाठलाग करताना एकाचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
कल्याण : टोईंगवाल्यांच्या मनमानीमुळे कल्याणमध्ये एकाचा बळी गेला आहे. वाहतूक विभागाने जप्त केलेली बाईक सोडवण्यासाठी धावताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मधुकर शंकर कासारे असं मृत्यू व्यक्तीचं नाव असून ते निवृत्त बँक अधिकारी होते.
कल्याण पश्चिमेच्या महालक्ष्मी हॉटेल परिसरात बुधवारी संध्याकाळी टोईंग करणारे कर्मचारी अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी जप्त करत होते. तिथेच रस्त्याच्या कडेला मधुकर कासारे यांनी बाईक लावली होती. मात्र त्यांची बाईकही वाहतूक विभागाचे कर्मचारी टोईंग व्हॅनने उचलू लागले. हे पाहताच मधुकर यांनी टोईंगवाल्यांना बाईक जप्त न करण्याची विनंती केली. मात्र, ‘वाहतूक विभागाच्या शाखेत येऊन पैसे भरा आणि बाईक घेऊन जा’, असं उत्तर टोईंगवाल्यांनी मधुकर यांना दिलं.
.==================================
यवतमाळमध्ये मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोपलं
यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्राध्यापकाला बेदम चोप दिला आहे. विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप या प्राध्यापकावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन्ही बाजूने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शिबिरादरम्यान संबंधित प्राध्यापकाने छेड काढल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनीने तिच्या मित्रांना दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास 8 ते 10 विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला बेदम मारहाण केली.
.==================================
घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटली, वाहनं वाहून गेली
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमधील असल्फा परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणं लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. घाटकोपरमध्ये बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र ही पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
.==================================
भारताच्या शेजारी दहशतवाद्यांचा गड, मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन थेट अमेरिकेला सुनावलं आहे. तर आतंरराष्ट्रीय व्यासपीठावरुन पाकिस्तानलाही ठणकावलं. नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकन संसदेसमोर तब्बल पाऊण तास भाषण केलं. यामध्ये त्यांना दहशतवादाच्या मुद्द्यावर भर दिला.
.==================================
बारावीचा 'सेम-टू-सेम' पेपर लिहिणारा अख्खा वर्ग नापास
गोंदियाः जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयात चांगलाच सन्नाटा पसरला आहे. विद्यार्थी तर पुरते निराश झाले आहेत. कारण बारावीच्या परीक्षेत वर्गातील सर्वच्या सर्व 61 विद्यार्थी केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नापास झाले आहेत.
सर्व विद्यार्थी नापास होण्याचं कारणही तसंच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना मास कॉपीचा आश्रय घेतला. जे विद्यार्थ्यांच्या चांगलंच अंगाशी आलं. बोर्डाने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना नापास केलं आहे.
दोन महाविद्यालयात सारखाच प्रकार
पेपर लिहिताना विद्यार्थ्यांनी मास कॉपी केली. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर, उत्तरं लिहिण्याची पद्धत आणि क्रमही जसाच तसा होता. पेपर तपासतांना परीक्षकाला कॉपी केल्याचा संशय आला. त्यामुळे नागपूर बोर्डाने मुलांना बोलावून त्यांची तोंडी परीक्षा घेतली आणि मास कॉपीचा ठपका ठेवत सगळ्या मुलांना केमिस्ट्रीत भोपळा देऊन टाकला.
दुसरीकडे डबकी गावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातही असाच प्रकार घडला. या महाविद्यालयात 124 विद्यार्थी बारावीत होते. केमिस्ट्रीच्या पेपरमधील सगळ्यांची उत्तरं सेम टू सेम होती. बोर्डानं मुलांना नागपूरला बोलावलं आणि तोंडी परीक्षेनंतर ठरल्याप्रमाणं केमिस्ट्रीत भोपळा देण्यात आला.
.==================================
खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ: रावसाहेब दानवे
फाईल फोटो
मुंबई: ‘संजय राऊत यांच्या भाषणावर माध्यमांसमोर बोलणार नाही. चार भिंतीत नाही तर खुल्या मैदानात शिवसेनेला उत्तर देऊ.’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला थेट आव्हान दिलं आहे.
सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणं सुरुच असतं. ‘भाजप सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य आहे.’ अशी टीका आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेवर दानवेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘केंद्रात आणि राज्यात निजामांच्या बापाचं राज्य सुरु आहे. ‘अच्छे दिन कुठे गेले?, अच्छे दिन आले असतील तर ते खडसे आणि इतर दोन पाच लोकांनाच आले असतील.’ असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
याशिवाय द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या सेलिब्रेशनवरही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. ‘मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही सेलिब्रेशन कसलं करता?’ असा सवालही त्यांनी विचारला.
.==================================
डोपिंगप्रकरणी टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षाची बंदी
लंडन: रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशननं उत्तेजक सेवनप्रकरणी दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई केली आहे. 26 जानेवारी 2016 पासून ही कारवाई लागू करण्यात आली आहे. त्यामुळं शारापोव्हाला 25 जानेवारी 2018 पर्यंत कुठल्याही स्वरुपाचं स्पर्धात्मक टेनिस खेळता येणार नाही.
शारापोव्हाच्या रक्तात मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचे अंश आढळून आल्याचं मार्च महिन्यात स्पष्ट झालं होतं. शारापोव्हानं पत्रकार परिषदेत स्वतः या घटनेची कबुली दिली होती. यंदा जानेवारीपासून वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अर्थात वाडानं मेल्डोनियमवर बंदी घातली आहे. मात्र त्याविषयी माहिती देणारा ईमेल आपल्याकडून वाचायचा राहून गेला असं स्पष्टीकरण शारापोव्हानं दिलं होतं.
18 आणि 19 मे रोजी एका स्वतंत्र खंडपीठासमोर शारापोव्हाची सुनावणी झाली. शारापोव्हानं जाणूनबुजून मेल्डोनियमचं सेवन केलं नसल्याचं आयटीएफनं स्पष्ट केलं आहे. मात्र नियमांचा भंग केल्यामुळं शारापोव्हावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
शारापोव्हा या बंदीविरोधात स्वित्झर्लंडस्थित कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टसमध्ये अपील करणार आहे.
.==================================
रेल्वेत आता चिमुकल्यांसाठी मिळणार 'खास' मेन्यू
- ऑनलाइि लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - लहान मुलांसह रेल्वेतून प्रवास करणा-यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक नवी योजना आणली असून त्याअंतर्गत आता रेल्वेमध्ये ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी 'खास मेन्यू' उपलब्ध करून दिला जाणार आहे. 'जननी योजना' असे या योजनेचे नाव असून त्यामध्ये काही निवडक स्थानकांवर बेबी फूड, गरम दूध, पाणी यासह लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले बर्गर, पिझ्झा यासारखे खाद्यपदार्थही उपलब्ध असणार आहेत. दिल्ली, मुंबई सेंट्रल, नागपूर, पुणे, दिल्ली, हावडा, लखनऊसह २५ स्थानकांवर ही योजना सुरु करण्यात आली असून तेथे मुलांसाठी आवश्यक खाद्यपदार्थ उपलब्ध असतील याची काळजी रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात येणार आहे. लवकरच या स्थानकांची संख्या वाढवण्यात येईल असेही समजते.रेल्वे स्थानक परिसरात आपल्या लहान मुलासाठी बेबी फूड व दूध न मिळाल्याची तक्रार एका महिलेने केली होती, त्यानंतरच ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केले.मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये चहा मिळणारमुंबईकरांसाठी एक खुशखबर म्हणजे मुंबई व पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर आता मातीच्या भांड्यात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. दुकानदारांच्या सोयीप्रमाणे कुल्हडमधील चहाची योजना सुरु होईल, असे समजते.
.==================================
लडता पहलाज..! 'उडता पंजाब'च्या वादावर 'अमुल'ची मार्मिक टिप्पणी
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ९ - पंजाब राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे कारण देत, सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब चित्रपटाचे नाव व त्यातील दृश्यांवर आक्षेप घेत त्यावर कात्री चालवल्याच्या निर्णयावर खूप टीका होत असून सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शकांच्या पाठीमागे संपूर्ण बॉलिवूड उभे राहिले असून दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, आमिर खान यांनीही याप्रकरणी आपले विचार नोंदवत घडलेला प्रकार योग्य नसल्याचे नमूद केले आहे.समाजातील आर्थिक, क्रीडा क्षेत्र तसेच अनेक महत्वाच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणा-या ' अमूलची कार्टून्स' खूप लोकप्रिय असून त्यातून दिल्या जाणा-या संदेशांचे सर्व स्तरातूनच कौतुक होत असते. याच अमूलने उडता पंजाब वादावरही आपल्या कार्टूनच्या माध्यमातून टिप्पणी केली आहे. 'लडता पहलाज' या शीर्षकाखालील कार्टूनमध्ये अवघ्या काही रंग-रेषांच्या फटका-यांत संपूर्ण वादावर टिप्पणी करण्यात आली असून त्याला नेटक-यांचीही चांगलीच पसंती मिळाली आहे.
.==================================
मोदींचा चमचा असल्याचा अभिमान - पहलाज निहलानी
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 09 - उडता पंजाब चित्रपटावरुन सुरु असलेला वाद थांबण्याचा नाव घेत नाही आहे. ना राजीनामा, ना माफी मागण्यास तयार असलेले सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अनुराग कश्यप यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला आहे. अनुराग कश्यपच्या 'उडता पंजाब' चित्रपटाला आम आदमी पक्षाने फंडिंग केल्याचा आरोप पहलाज निहलानी यांनी केला होता. ज्यानंतर बॉलिवूडमधून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.'मी केलेले आरोप सिद्ध करु शकत नाही. मी जे ऐकलं ते बोललो, मी माफी मागणार नाही', असं पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे. 'अनुराग कश्यप यांनी मी मोदींचा चमचा असल्याचं बोलले आहेत, हो मी आहे चमचा, आणि मला याचा अभिमान आहे. मग मी काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा असायला हवं होतं का ?', असा उलटा सवाल पहलाज निहलानी यांनी विचारला आहे.
.==================================
सेना स्टाईलने काँग्रेस चालवू नका
- मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले असले तरी त्यांनी अद्याप काँग्रेस संस्कृती आत्मसात केलेली नाही. शिवसेना स्टाईलने पक्ष चालविण्याचा हट्ट त्यांनी सोडून द्यावा आणि काँग्रेसची सर्वसमावेशक शैली स्वीकारावी, असाच सूर आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयाबाहेर जमलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आळवला. गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय बदलावा आणि पक्षकार्यात सक्रीय व्हावे, यामागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन केले.काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी राजकारण निवृत्ती आणि काँग्रेसमधील पदांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुंबई काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कामत समर्थकांनी यानिमित्तने जोरदार शक्तीप्रदर्शन करत निरुपम यांच्या कारभारावर ताशेरे ओढण्याची संधी साधली. बुधवारी काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनास कामत गटातील नेत्यांसोबतच संजय निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे दुखावलेल्या नेत्यांनी हजेरी लावली.आमदार नसीम खान, जनार्दन चांदूरकर यांच्यासह माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मधू चव्हाण, कृष्णा हेगडे, अशोक जाधव, बलदेव खोसा आदी नेत्यांनी यावेळी आंदोलकांना संबोधित केले. मुंबई महापालिकेतील २७ नगरसेवकांसह मुंबई काँग्रेसमधील विविध आघाड्या आणि सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई काँग्रेसच्या वाटचालीत गरुदास कामत यांनी महत्वाची भूमिका बजावली
.==================================
ठाणे; दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान
- ठाणे : घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे. मिळाले, तर कधी दोन दिवस तर कधी दोन महिने बिगारी काम. पावसाळ््याच्या दिवसांत तर काम नसल्याने घरात नियमित चूल पेटेल तर शप्पथ. घराचे भाडे भरायलाही कधी कधी पैसेही नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि शिकण्याची आवड या जोरावर कळव्यातील जयभीमनगर येथील झोपडीत राहणाऱ्या गोविंदा राठोड या मुलाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के मिळवून यशाचे शिखर गाठले. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणाऱ्या कुटुंबीतील मुलाने मिळवलेले हे गुण पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ््यांत आनंदाश्रू तरळले. त्यांशिवाय त्यांच्याकडेही त्याला देण्याजोगे काही नाही.दहावीचा निकाल लागताच पास झालेल्या मुलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. पण पेढे सोडाच, घरी गोडधोड करुन आनंद व्यक्त करण्याची सुद्धा ऐपत नसलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांनी फक्त गोड शब्दांतच कौतुक करीत आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला. रोजंदारीवर वेठबिगारी करणाऱ्या गोविंदच्या आई-वडिलांना नाक्या-नाक्यावर उभे राहून रोज काम मिळवावे लागते. कधी १०० तर कधी २०० - २५० रूपये मिळतात. पावसाळा जवळ आल्याने आता दोघांचेही काम गेले आहे. काम नसेल तेव्हा कचरा वेचून जेमतेम पैसे जमा होतात. त्यावर त्यांचे घर चालते. पैसे नसतील तर घरी जेवणच बनतेच असेही नाही. त्याचे घरही भाड्याचे. वीज-पाण्याचे मिळून महिना दीड हजार रुपये त्यांना द्यावे लागतात. कधी कधी भाडे नाही दिले, तर मालक घराबाहेर हाकलतात. पावसाळ््यात तर वीजही नसते. जेव्हा काळाशार अंधार घर व्यापून उरलेला असतो, तेव्हा मिणमिणत्या दिव्यात गोविंदा अभ्यास करत असे. पावसाळ््यात घराचे छप्पर गळते. त्यामुळे रात्रभर झोपही सोडून घरच्यांसोबत तो पाणी उपसत बसायचा. अशा हलाखीच्या परिस्थितीत गोविंदाने दहावीचा अभ्यास केला. शाळेत अनेकदा तो उपाशी जायचा. शाळेत गेल्यावर त्याचे शिक्षक, मुख्याध्यापक त्याला जेवण देत. त्याच्या शैक्षणिक साहित्यांचाही खर्च त्यांनीच केला. गोविंदाचे आई वडिल जरी शिकले नसले तरी मुलासाठी ते मोठ्ठी स्वप्ने पाहताहेत. गोविंदाची आई त्याला अभ्यासाला पहाटे पाच वाजता उठवत असे. आर्थिक अडचणींमुळे पुढचे शिक्षण प्रश्न त्याच्यासमोर आहे. गोविंदाला आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे तो सांगतो. शाळेतर्फेत्याला पुढील आयुष्यात सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले.
.==================================
अमरावती; लग्नमंडपातच प्रियकराला पेटविण्याचा प्रयत्न
- गजानन नानोटकर,पुसला (अमरावती)- प्रेयसीला अंधारात ठेऊन दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला लग्नमंडपातच पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पुसला येथे ६ जून रोजी घडली. विशेष म्हणजे नवरदेवाला पेटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीने स्वत:ही विषप्राशन केले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मध्य प्रदेशातील एका तरूणाचा पुसला येथील तरूणीशी विवाह ठरला होता. ६ जून रोजी ठरल्याप्रमाणे नवरदेव वरातीसह मंडपात आला. त्याच्या प्रेयसीला विवाहाची कुणकुण लागल्याने तिने सोमवारी सकाळी पुसला गाठले. ती येथील बसस्थानकावरच थांबली होती. दुपारी साडेबारा वाजता नवरदेवाचे मंडपात आगमन होताच तरूणी तेथे आली. नवरदेव बोहल्यावर चढताच हातातील दोन बाटल्यांमधील पेट्रोल तिने नवरदेवाच्या अंगावर फेकले. ती नवरदेवाला पेटविणार तेवढ्यात वऱ्हाडी मंडळींनी तिला बाजूला ओढले. त्यामुळे अनर्थ टळला.
.==================================
मान्सूनच्या आगमनाने शेअर बाजारात बहार
- मुंबई : केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात बहार आली. विदेशी संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीचाही बाजाराला लाभ झाला. शेअर बाजारातील तेजीचा हा सलग दुसरा दिवस होता.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो घसरला. तथापि, नंतर त्याने ही झीज भरून काढली. सत्राच्या अखेरीस १0.0९९ अंकांची अथवा 0.0४ टक्क्याची वाढ नोंदवून तो २७,0२0.६६ अंकांवर बंद झाला. २८ आॅक्टोबर नंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६0 अंकांनी अथवा 0.0८ टक्क्याने वाढून ८,२७७.0५ अंकांवर बंद झाला.व्यापक बाजारांतही तेजीचा कल दिसून आला. बीएसई स्मालकॅप निर्देशांक 0.८९ टक्क्यांनी, तर मिडकॅप निर्देशांक 0.५२ टक्क्याने वाढला.पीएसयू, आॅटो, रिअल्टी, कंझुमर ड्युरेबल्स, आॅईल अॅण्ड गॅस, मेटल, एफएमसीजी आणि बँकिंग या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग वाढले. आयटी आणि टेक या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र घसरले.जागतिक पातळीवर आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहावयास मिळाला. जपानचा निक्केई 0.९३ टक्क्याने वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग 0.१४ टक्क्याने घसरला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.३0 टक्क्याने खाली आला. युरोपीय बाजारांत सकाळी नरमाईचा कल दिसून आला. युरो क्षेत्रात आर्थिक वाढीला गती देण्यासाठी युरोपीय केंद्रीय बँक मूलभूत प्रोत्साहन उपायांची तयारी करीत आहे.
.==================================
केवळ अर्धा टक्का व्याजदर कपातीवर ग्राहकांची बोळवण
- मुंबई : गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये दीड टक्क्याने कपात केली असली तरी यापैकी केवळ अर्धा टक्काच दरकपात बँकांनी ग्राहकापर्यंत पोहोचवली आहे. यामुळे एकीकडे ग्राहकांना अधिक दराने व्याज मोजावे लागत आहे, तर दुसरीकडे ही दरकपात ग्राहकांना न मिळाल्यामुळे गृहनिर्माण, पायाभूत क्षेत्र, वाहन आदी क्षेत्रांचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नसल्याचा नाराजीचा सूर आता उद्योगजगतानेही लावला आहे.सन २०१२पासून २०१४ पर्यंत महागाईचा भडका उडाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात तब्बल पावणेदोन वर्ष कोणतीही कपात केली नव्हती. याचा परिणाम असा झाला की, त्या वेळी आधीच मंदीच्या खाईत असलेल्या उद्योगाला आणखीनच गर्तेचे दिवस पाहावे लागले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे आयात खर्च आटोक्यात येतानाच महागाईदेखील आटोक्यात आली. परिणामी, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि उद्योगांना बळकटी देण्यासाठी व्याजदरात कपात केली. जानेवारी २०१५पासून आजवर व्याजदरामध्ये तब्बल दीड टक्का कपात करण्यात आली आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या या दीड टक्का कपातीचा पुरेपूर लाभ बँकांनी आजही ग्राहकापर्यंत पोहोचू दिलेला नाही. दीड टक्क्यापैकी अवघा अर्धा टक्क्याचा लाभ ग्राहकांना दिला आहे.
.==================================
इंडोनेशियास पुन्हा शक्तिशाली भूकंपाचा धक्का
| |
-
| |
मतराम - इंडोनेशियाच्या लोंबूक या बेटास आज (गुरुवार) भूकंपाचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसून सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही.
या शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी होती. इंडोनेशियामधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बाली बेटावरील पर्यटकांनाही या भूकंपामुळे धक्का बसला. या भूकंपाचे धक्के तीन ते चार सेकंदांपर्यंत जाणवत राहिले. भूकंपामुळे भयभीत झालेले नागरिक तातडीने घराबाहेर पडले. इंडोनेशियास कालही (बुधवार) शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता. इंडोनेशियातील उत्तर मालुकू प्रांताला काल पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला.भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती.

पत्नीचा रंग काळा असल्याने जिवंत जाळले
| |
-
| |
सोमेरा बिबी (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सोमेरा यांनी मृत्युपुर्व दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ‘माझा रंग काळा असल्यामुळे कुटुंबीयांकडून त्रास दिला जात होता. पतीला गोऱ्या रंगाची पत्नी हवी होती. तीन जून रोजी पती, तीन दीर व सासूने एका खोलीमध्ये कोंडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी शेजाऱ्यांनी माझ्या दोन वर्षाच्या मुलाला पळविल्याने तो बचावला.‘
‘सोमेरा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.
.==================================
'जिनियस' सचिनशी माझी तुलना नको - कूक
| |
-
| |
ऍलिस्टर कूकने नुकताच कसोटी कारकिर्दीमधील दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर क्रिकेट विश्वातील बारावा फलंदाज ठरला. क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा तो सर्वांत तरुण क्रिकेटपटू ठरला. त्याने सचिनचा हा विक्रम मागे टाकला. कुक 31 वर्षांचा आहे. सचिनने हा विक्रम केला तेव्हा त्याचे वय 31 वर्षे 10 महिने आणि 20 दिवस होते.
याविषयी बोलताना कूक म्हणाला की, सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमधील धावा सर्वोत्तम आहेत. सचिन हा खूप जिनियस खेळाडू होता. मी जिनियस नाही, मी त्याच्यापासून खूप लांब आहे. माझी इंग्लंडसाठी प्रदीर्घ काळ खेळण्याची इच्छा आहे. मी खेळाचा आनंद घेत आहे.
.==================================
देशात पहिल्यांदा आणले मशिन
| |
-
| |
वडील सीए असल्याने त्यांनाही मी त्याच क्षेत्रात काम करावे आणि नावलौकिक मिळावा, अशी अपेक्षा होती. त्यात मला अजिबात रस नव्हता. उलट व्यवसाय करण्याकडे माझा कल होता. अर्थात, लहानपणापासून एका व्यवसायाकडे माझे लक्ष होते. घोटीला मामा होते, धूलचंद पूनमचंद चोरडिया. त्यांचा भगर तयार करण्याचा कारखाना होता. ते पारंपरिक पद्धतीने भगर तयार करायचे. यामुळे वरईपासून भगर तयार व्हायची. मात्र, म्हणावा तसा दर्जा नव्हता. परिणामी, बाजारातही भगरीकडे ग्राहकांचा फारसा कल नव्हता. या साऱ्या बाबी माझ्या निरीक्षणात आल्या. व्यवसाय करावा, असे मनाशी पक्के झाले. तेव्हा भगरसंदर्भात कंपनी सुरू करण्याचा विचार डोकावला. त्यासाठी प्रस्थापित कंपन्यांशी दोन हात करावे लागणार, हे ठाऊक होते. काहीतरी वेगळे करावे लागणार होते, हेही तितकेच खरे. सातपूर औद्योगिक वसाहतीत 2001 मध्ये जागा घेतली आणि "यश फूड प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. त्यासाठी वडील आणि मामांचे पाठबळ मिळाले. कच्चा माल असलेल्या वरईवर प्रक्रिया करून ती अधिक स्वच्छ व दर्जेदार व्हावी, यासाठी नवीन मशिन खरेदी केली. ते मशिन देशात पहिल्यांदा आम्ही खरेदी केले आणि कंपनीत बसविले. त्याचा परिणाम असा झाला, की ग्राहकांना स्वच्छ भगर उपलब्ध झाली. शिवाय भगरीचा दर्जा सुधारल्याने मार्केटमध्ये तिची मागणीही वाढली. वर्षभरातील एखादं-दोन महिन्यांचा कालावधी सोडला, तर महाशिवरात्र, नवरात्र, एकादशीसाठी भगरीला मागणी वाढली. पचनाला हलकी असल्याने डॉक्टरांकडूनही प्राधान्याने ते रुग्णांना सांगितले जाऊ लागल्याने भगरीला वेगळी ओळख निर्माण झाली. आज यश फूडची भगर देशभरासह अमेरिका व इंग्लंडसह युरोपातही जाऊन पोचली आहे, त्यासाठी सुरवातीच्या काळात जे कष्ट करावे लागले ते महत्त्वाचे होते.
.==================================
छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर नक्षली हल्ला
| |
-
| |
रायपूर - छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे नक्षलवाद्यांनी इंडो तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) कॅम्पवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीबीपीच्या 41 व्या बटालियनवर नक्षलवाद्यांनी रॉकेट व बंदुकीच्या सहाय्याने हल्ला केला. कोंडागाव जिल्ह्यातील राणापाल भागात हा हल्ला झाला असून, सुमारे 100 नक्षलवाद्यांनी तिन्ही बाजूने कॅम्पला घेरून हल्ला केला.
मध्यरात्री साडेबारापासून पहाटे तीनपर्यंत गोळीबार सुरु होती. नक्षलवाद्यांनी कॅम्पच्या दिशेन चार रॉकेटही डागले. आयटीबीपीच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने सुमारे 600 राऊंड फायर झाले आहेत. या हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.
.==================================
तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला; 4 ठार
| |
-
| |
जेरुसलेम - इस्रायलमधील तेल अवीव शहरातील सरोना मार्केट या गजबजलेल्या भागात इस्रायली वेषातील दोन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री अचानक केलेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांसह चार जण ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत.
इस्रायली पोलिसांचे प्रवक्ते मिकी रोसेन्फिल्ड यांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या दहशतवाद्यास अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या संभाव्यतेबाबत कुठलाही सावधानतेचा इशारा दिला गेला नव्हता. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरु असल्याचे येथील इचिलोव रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. गिल फायर यांनी सांगितले. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी तेल अवीव शहराच्या मध्यवर्ती भागात दहशतवाद्यांनी भ्याडपणे केलेल्या या क्रूर हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, हल्लेखोरांना धडा शिकविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.
.==================================
'एनएसजी'साठी मेक्सिकोचा भारताला पाठिंबा
| |
-
| |
पाच देशांच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी मेक्सिकोमध्ये पोहचले आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नितो यांची त्यांनी भेट घेतली असून, त्यांच्यासोबत डिनर केला. नितो यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि मेक्सिको मिळून अंतराळ क्षेत्रात एकत्रितरित्या काम करणार आहेत. मोदींनी लॅटिन अमेरिकन भाषेतून आपले भाषण सुरु केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि मेक्सिको देशांमध्ये अनेक समानता आहेत, त्याचा फायदा दोन्ही देशांना होऊ शकणार आहे. भविष्यात निर्मिती क्षेत्रात हे दोन्ही देश एकत्र काम करताना दिसतील. मेक्सिकोने एनएसजी सदस्यत्वसाठी भारताला पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. मेक्सिकोसोबत भविष्यात आम्हाला चांगले संबंध जोडायचे आहेत. सौरउर्जेच्या क्षेत्रात दोन्ही देशांनी खूप प्रगती केली आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही तिसऱ्यांदा भेटत आहोत, हेच आमच्या मैत्रीबद्दल सर्वकाही सांगते.
. .==================================
‘यिन’चे मंत्रिमंडळ रंगले अधिवेशनात
| |
-
| |
मुंबई - दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण आणि शिक्षण पद्धतीतील बदल अशा मुद्द्यांवरून ‘यिन’च्या (यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्क) अधिवेशनाचा पहिला दिवस बुधवारी (ता. ८) गाजला. प्रतिरूप विधिमंडळात ना घोषणाबाजी, ना गदारोळ; प्रत्येकालाच बोलण्याची संधी, असे चित्र दिसले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरवात जोरदार झाली. सभागृहात फक्त विरोधी पक्षनेता नव्हता, असे मिश्कील भाष्य करत सभापती अरुण गुजराथी यांनी, विरोधी पक्षनेत्याची निवड गुरुवारी (ता. ९) केली जाईल, असे जाहीर केले.
मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज सकाळी ‘यिन’च्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली. या अधिवेशनाला तब्बल अडीच हजार महाविद्यालयांतून निवडलेले ३६ पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील २३ सदस्य उपस्थित आहेत. पहिल्या अधिवेशनाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील उत्सुकता जाणवत होती. विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले संदीप पालवे आणि उपमुख्यमंत्रिपदी रितेश घुगे यांच्यावर तणाव दिसत होता. पहिल्या सत्रात प्रतिराज्यपाल माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि सभापती अरुण गुजराथी यांच्या भाषणांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना मानसिक पाठबळ दिले; तसेच दिवसभरातील कामकाजाची दिशा ठरवली. स्वदेशी वस्तूंचा वापर, लग्नात हुंडा देणार-घेणार नाही, हा पहिला संकल्प विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे न्या. धर्माधिकारी म्हणाले.
. .==================================
एकनाथ खडसेंची चौकशी सहा महिन्यात
| |
-
| |
प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी सेवा निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संभाव्य न्यायाधीशांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. चौकशीची ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी "इन्क्वायरी ऑफ कमिशन ऍक्ट‘नुसार आयोग स्थापण्याच्या फंदात राज्य सरकार पडणार नसल्याची माहिती भाजपच्या जेष्ठ मंत्र्याने दिली.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, कल्याण येथील जमीन व्यवहारासाठी गजमल पाटील यांनी केलेली 30 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी, तसेच पुण्यातील भोसरी "एमआयडीसी‘च्या जमिनीचे हस्तांतर असे आरोप खडसे यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. भाजपतील काही मंडळी खडसे यांच्या मागे लागल्याची जोरादर चर्चा राजकीय वर्तुळात होती. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. खडसे यांची चौकशी लांबण्यासाठी "इन्क्वायरी ऑफ कमिशन ऍक्ट‘नुसार चौकशी होणार असल्याची चर्चाही होती. यामुळे चौकशीचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत ठेवून खडसे यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यात येणार असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे होते.

No comments:
Post a Comment