[अंतरराष्ट्रीय]
१- फेसबुकने केले अंतराळवीरांशी 'लाइव्ह चॅट'
2- पाकमधील एका पित्याचे 100 मुलांचे स्वप्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन
४- पंतप्रधान मोदी ट्विटरवरुन देत आहेत योगाचे धडे!
५- मथुरेत हिंसाचार, खा. हेमामालिनी स्वतःचे फोटो टाकण्यात व्यस्त
६- काश्मीरवरूनच भारत-पाकिस्तानमध्ये वाद- अब्दुल बासित
७- गांधीजींनाही फाळणी मंजूर नव्हती- शेषाद्री चारी
८- भारत-पाक संबंध चर्चेतून सुधारू शकतात- देवेंद्र दर्डा
९- देश कार्पोरेट कुटुंब कंपन्यांच्या ताब्यात-वृंदा करात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
११- वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन
१२- एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, तरीही हार न मानणाऱ्या राणेंचा विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- कोल्हापूर; व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे?
१४- जम्मू-काश्मीरमधल्या बिजबेहरा इथं दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर हल्ला, हल्ल्यात 3 जवान शहीद, 7 जखमी
१५- मुंबई-ठाणे प्रवास होणार सुकर. २०२१ पर्यंत ठाण्यात धावणार मेट्रो.
१६- आंध्रप्रदेश; सापाने चावा घेतलेल्या आईचे दूध पिल्याने मृत्यू
१७- कोल्हापूर; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; दोन ठार
१८- दगावलेल्या मातेचे बाळ जगविले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
२०- शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त
२१- शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===================================

शिल्पा शेट्टी आणि राज यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बिनसल्याचं बोललं जात आहे. लवकरच दोघं घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे. शिल्पा-राज हे बॉलिवूडमधल्या परफेक्ट कपल मानलं जातं. त्यामुळे दोघं विभक्त होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज कुंद्राने मात्र या चर्चा उडवून लावल्या आहेत. शिल्पाने राज तिला वेळ देत नसल्याची गोड तक्रार तिच्या मैत्रिणीकडे केली होती. मात्र ही तक्रार चुकीच्या पद्धतीने बाहेर पसरली, असं राज म्हणतो. ‘मी 20-20 तास ऑफिसमध्ये काम करायचो. मला अक्षरशः श्वास घ्यायला आणि झोपायलाही वेळ नसायचा. मी फक्त फ्रेश व्हायला घरी जायचो.’ असं स्पष्टीकरण राजने दिलं आहे.
8 जून रोजी शिल्पाच्या बर्थडे साठी आपण सरप्राईझ प्लान केल्याचंही राजने सांगितलं. काही वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शिल्पा आणि राज 2009 मध्ये विवाहबंधनात अडकले. नुकताच त्यांनी मुलगा विआनचा वाढदिवस साजरा केला.

मुंबईतल्या मढ परिसरात सुरु असलेल्या या शूटिंगचे फोटोही त्यांनी ट्विटरवर अपलोड केले. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी आपल्या शूटिंगचे फोटो ट्विटरवर अपलोड करण्यास सुरुवात केली होती. मात्र भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या कानउघडणीनंतर त्यांनी हे फोटो ट्विटरवरुन डिलीट केले.

वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन
मुंबईः मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. कारण वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. हा 32 किलोमीटर आणि 32 स्टेशनचा मेट्रो मार्ग असून यासाठी 14 हजार 549 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी प्रकल्पाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
32 स्थानकांचा समावेश
वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो मार्गावर एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे.
===================================
खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन
नवी दिल्ली : राज्याचे महसूलंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत दिल्लीमध्ये खलबतं सुरु आहे. पक्षाची भूमिका एकनाथ खडसेंना कळवा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिला. त्यानंतर गडकरी आणि खडसे यांच्यात फोनवर बातचीत झाली.
मात्र गडकरी आणि खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
खरतंर खडसेंच्या प्रकरणात अजूनपर्यंत नितीन गडकरींचं नाव कुठेच नव्हतं. गडकरी यांचं दिल्लीत वजन तर आहेच, शिवाय ते भाजपचे माजी अध्यक्षही आहेत. त्यामुळे खडसे प्रकरणाचा निर्णय गडकरींच्या मताशिवाय घेतला जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आज पक्षाध्यक्षांनी गडकरींना खडसेंशी चर्चा करण्याचे आदेश दिले.
कथित पीएची लाचखोरी, दाऊदच्या कॉललिस्टमधील खडसेंचा कथित नंबर, तसंच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण या आरोपांमुळे खडसेंना विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेने घेरलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून पक्षनेतृत्त्वाने यात हस्तक्षेप केला आहे.
===================================
एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, तरीही हार न मानणाऱ्या राणेंचा विजय
मुंबई : एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, पण तरीही हार न मारता पुन्हा भरारी घेण्याचं ध्येय ठेवलेला नेता म्हणून नारायण राणेंचा उल्लेख करता येईल. कारण नारायण राणे यांनी पुन्हा एकदा त्याच जोषात महाराष्ट्राच्या विधीमंडळात एण्ट्री केली आहे, त्याबाबतची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे.
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने, आता राणेंच्या नावापुढे ‘आमदार’ नारायण राणे लागणं एक औपचारिकता राहिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या घरी पहिला पराभव आला. या निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पराभव केला. या पराभवापासून जणू राणेंना ग्रहणच लागलं.
===================================
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
मुंबई : दावे-प्रतिदावे आणि कुरघोडीच्या राजकारणानंतर अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. कारण भाजपचे प्रसाद लाड आणि अपक्ष अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी दहाच उमेदवार राहिले.
यामध्ये भाजपचे 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार आहे. हे उमेदवार आता आमदार म्हणून विधानपरिषदेत जातील.
भाजपचे आमदार
यामध्ये भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्राम नेते विनायक मेटे, प्रवीण दरेकर, आर एन सिंह आणि सुजीतसिंह ठाकूर यांचा समावेश होता.
शिवसेनेचे आमदार
विधानपरिषदत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते आता बिनविरोध निवडून जातील.
===================================
मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
मुंबई : मान्सून आणि पूर्व मान्सून पाऊस यांतील फरक काय आहे हे ओळखण्यात अनेकदा गोंधळ उडतो. जून महिन्यात साधारणतः पूर्व मान्सून पाऊस पडतो. मात्र त्यापूर्वी दक्षिण भारतात जेव्हा पाऊस सुरु होतो, तेव्हा भारतात पूर्व मान्सून पाऊस पडतो.
केरळात 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. त्याचवेळी ईशान्य भारतात देखील मान्सूनचा पाऊस पडण्यास सुरुवात होते. मात्र यापैकी मान्सून आणि पूर्व मान्सूनचा पाऊस कोणता हे ओळखण्यात गोंधळ होतो. यातील फरक ओळखण्यासाठी काही भौगोलिक बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.
तापमान:
मान्सून आणि पूर्व मान्सून पाऊस यांतील फरक तापमानातील बदलावरुन ओळखता येतो. जूनमधील आर्द्रता आणि वाढती उष्णता हे पूर्व मान्सून पावसाचे संकेत असतात. मात्र जोरात वाहणारे वारे आणि अचानक वातावरणात होणारे बदल हे मान्सून भारतात दाखल झाल्याचं दर्शवतात.
===================================
शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त
कोल्हापूर : सध्या मिरचीच्या दरानं ग्राहकाला जरी ठसका लागत असला, तरी याच तिखट मिरचीनं कोल्हापूरच्या सचिन पाटोळे या शेतकऱ्याच्या जीवनात मात्र गोडवा आणला आहे. यंदा त्यांना या मिरचीतून रेकॉर्डतोड उत्पन्न मिळालं आहे. त्यांनी मिरची शेतीतून तब्बल 20 लाखाचं उत्पन्न मिळवलं आहे.
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शेतकरी सचिन पाटोळे हे मिरचीची शेती करतात. दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सचिन यांनी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. १० एकरापैकी ८ एकरात ऊसाचं पीक घेतलं जात होतं. त्यांनी ऊसाला फाटा देत भाजीपाला पिकाकडं वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षापासून सचिन या जमिनीत आलटून पालटून टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर, कोबी अशी पिकं घेत आहेत. यंदाही त्यांनी इथल्या ७० गुंठे जमिनीत मिरचीची लागवड केली आहे.
===================================
पंतप्रधान मोदी ट्विटरवरुन देत आहेत योगाचे धडे!
मुंबई: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षीपासून याच दिवशी केंद्र सरकारनं योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राजपथावर 35 हजार लोकांसोबत योगासन केलं होतं. यंदाही 21 जूनला योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
योगाचं महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदी देखील याचा प्रचार करीत आहेत. आता मोदींनी याच्या प्रचारासाठी थेट सोशल मीडियाचा वापर सुरु केला आहे. जेणेकरुन योग आणि त्यामुळे होणारे फायदे हे अनेक लोकांपर्यंत पोहचवता येणार आहे.
मोदींनी ट्विटरवरुन योगचा प्रसार आणि प्रचार सुरु केला आहे. दररोज एक योगासनाचा व्हिडिओ ते अपलोड करीत आहे. वेगवेगळी योगासनं ते अपलोड करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन आसनांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.
1 जूनला मोदींनी योगाचा पहिला व्हिडिओ शेअर केला. यामध्ये वृक्षासन या आसनाचं प्रात्यक्षित दाखविण्यात आलं आहे.
===================================
व्हायरल सत्य : मृत्यूचं कारण - वीज पडून की मोबाईलमुळे?
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या भुदरगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या एकाचा मृत्यू झाला आणि मोबाईलवर बोलल्यानेच वीज पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. पण एबीपी माझानं या बातमीची पडताळणी केली, तेव्हा मोबाईलचा आणि वीज कोसळण्याचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. प्रकाश पाटील यांच्याकडे अॅपलसारखा स्मार्ट फोन होता. केवळ जुने फोन आणि लँडलाईन फोनला वीज कोसळण्याचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु होता. प्रकाश पाटील आपल्या परिवारासह गडावर फिरायला पोहोचले. पण तितक्यात कडाडणाऱ्या विजेनं घात केला.
प्रकाश पाटील हे फोनवर बोलत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. जखमी झालेल्या प्रकाश पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
===================================
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक ब्रेक अप आणि घटस्फोटांच्या बातम्या येत आहेत. त्यातच बॉलिवूडची ब्यूटी शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राही विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बिनसल्याचं बोललं जात आहे. लवकरच दोघं घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे. शिल्पा-राज हे बॉलिवूडमधल्या परफेक्ट कपल मानलं जातं. त्यामुळे दोघं विभक्त होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज कुंद्राने मात्र या चर्चा उडवून लावल्या आहेत. शिल्पाने राज तिला वेळ देत नसल्याची गोड तक्रार तिच्या मैत्रिणीकडे केली होती. मात्र ही तक्रार चुकीच्या पद्धतीने बाहेर पसरली, असं राज म्हणतो. ‘मी 20-20 तास ऑफिसमध्ये काम करायचो. मला अक्षरशः श्वास घ्यायला आणि झोपायलाही वेळ नसायचा. मी फक्त फ्रेश व्हायला घरी जायचो.’ असं स्पष्टीकरण राजने दिलं आहे.
8 जून रोजी शिल्पाच्या बर्थडे साठी आपण सरप्राईझ प्लान केल्याचंही राजने सांगितलं. काही वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शिल्पा आणि राज 2009 मध्ये विवाहबंधनात अडकले. नुकताच त्यांनी मुलगा विआनचा वाढदिवस साजरा केला.
===================================
मथुरेत हिंसाचार, खा. हेमामालिनी स्वतःचे फोटो टाकण्यात व्यस्त
नवी दिल्ली : मथुरेत सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या जमावाला पांगवताना जमावाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांसह 22 जणांचा मृत्यू झाला असतानाच मथुरेच्या खासदार हेमामालिनी मात्र मुंबईत शूटिंग करण्यात बिझी आहेत.
मुंबईतल्या मढ परिसरात सुरु असलेल्या या शूटिंगचे फोटोही त्यांनी ट्विटरवर अपलोड केले. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांनी आपल्या शूटिंगचे फोटो ट्विटरवर अपलोड करण्यास सुरुवात केली होती. मात्र भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या कानउघडणीनंतर त्यांनी हे फोटो ट्विटरवरुन डिलीट केले.
===================================
काश्मीरवरूनच भारत-पाकिस्तानमध्ये वाद- अब्दुल बासित
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 03 - ' भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाचे मूळ कारण दहशतवाद नसून काश्मीरचा न सुटलेला प्रश्न हेच या समस्येचे मूळ आहे' असे मत भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. दोन्ही देशांदरम्यान असलेला हा तणाव खरंच दहशतवादामुळे आहे का? याचा विचार व्हावा असेही बासित म्हणाले. ' चर्चेने शांतता प्रस्थापित होऊ शकते, पण चर्चा झाली की काश्मीरप्रश्न, दहशतवाद दूर होईल असे कुणी म्हणत नाही' असे मतही त्यांनी व्यक्त केले.दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधारत असताना राजदूतांनी मौलिक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही अब्दुल बासित यांनी केलं. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांना 5 पावले पुढे टाकणं आणि 10 पावलं मागे जाणं सोडून चर्चेला सामोरं जाण्याची गरज आहे. पाक स्वतंत्र झाला तेव्हा काही काळाने दोन्ही देश एकत्र येतील, असे अनेकांना वाटायचे.
===================================
गांधीजींनाही फाळणी मंजूर नव्हती- शेषाद्री चारी
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - महात्मा गांधी यांनाही फाळणीचा निर्णय मंजूर नव्हता, तसेच नेहरू,पटेल यांनीसुद्धा फाळणीस विरोध केला होता, असे वक्तव्य भाजपच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी केले. लोकमतच्या 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' चर्चासत्रात ते बोलत होते.' नागपुरात येणं हे माझं सौभाग्य आहे. भारत आणि पाकमध्ये कोणतीही भिंत नाही, ती मनुष्यनिर्मित आहे' , असंही ते म्हणाले आहेत. माणसांना असले तरी प्राण्यांना सीमेचे बंधन नसते. 1947मध्ये आजचे 70 टक्के लोक नसल्याचं प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केलं आहे.
===================================
भारत-पाक संबंध चर्चेतून सुधारू शकतात- देवेंद्र दर्डा
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 03 - ' भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा.लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा म्हणाले. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'नॉलेज सीरिज' अंतर्गत 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' या चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित या चर्चासत्रातील प्रमुख वक्ता आहेत.नागपूरमधील रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथील या चर्चासत्राचे उद्घाटन अब्दुल बासित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रियांका चतुर्वेदी, शेषाद्री चारी, विवेक काटजू, जतीन देसाई सहभागी झाले असून दोन्ही देशांतील संबंधाबाबत जाणून घेण्यास उत्सुक असलेले शेकडो नागरिकही चर्चासत्रात उपस्थि आहेत.
===================================
भारत-पाक शांतीचर्चा पुन्हा सुरू व्हावी- जतीन देसाई
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3- लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित 'नॉलेज सीरिज अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' या चर्चासत्रात जतीन देसाईंनी या कार्यक्रमाला संबोधित केलं आहे.ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाईंनी व्यासपीठावर स्वतःचे विचार मांडले आहेत. भारत-पाकमध्ये एकमेकांचे पत्रकार पाहिजेत. त्यामुळे दोन्ही देशांतील माहिती एकमेकांना समजू शकेल. दोन्ही देशांनी लोकांना व्हिसा देण्यासंदर्भातही विचार करायला हवा. यासाठी जनतेनंही दबाव आणण्याची गरज असल्याचं वक्तव्य जतीन देसाई यांनी केलं आहे.तरुणालाही इतिहासात नसून वर्तमानात रस असल्याचं मत यावेळी जतीन देसाई यांनी मांडलं आहे. पठाणकोटमुळे थांबलेली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी, असं ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी मांडलं आहे.
===================================
अनंतपूर (आंध्र प्रदेश)- एका मातेला साप चावल्यानंतर तिच्या बाळाने दूध पिल्यानंतर दोघांचाही काही वेळातच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतछानपल्ली या गावामध्ये चंद्रकला (वय 28) या पती व अठरा महिन्यांच्या चिमुकल्यासोबत घरामध्ये झोपल्या होत्या. रात्री झोपेमध्ये त्यांना काहीतरी चावल्याचे जाणवले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी गेल्या. पहाटे मुलाला भूक लागल्याने तो उठला होता. यामुळे त्यांनी झोपेतच त्याला दूध पाजले. सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - पृथ्वीवरील व्यक्तींशी संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या "फेसबुक‘ने बुधवारी अनोखा प्रयोग करत अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांशी संवाद साधण्याची संधी युजर्सना प्राप्त करून दिली होती.
स्पर्धेच्या युगात लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी "फेसबुक‘च्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. अलिकडेच "थ्रीडी व्हिडिओ‘ सारख्या काही कल्पनाही फेसबुकने सादर केल्या आहेत. अशाच नाविन्यपूूर्ण कल्पनेचा एक भाग म्हणून बुधवारी "नासा‘ने अंतराळात पाठवलेल्या अंतराळवीरांशी "फेसबुक‘ने युजर्सचा संवाद घडवून आणला. "सोयुझ‘ या अंतराळयानातील जेफ विल्यम्स, टिम कोप्रा, टीम पिके या तीन अंतराळवीरांशी संवाद साधण्यात आला. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या वॉलवर अंतराळातील "लाईव्ह‘ व्हिडिओ उपलब्ध करून दिला. तसेच त्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या काही मिनिटांतच हजारो प्रश्न विचारण्यात आले. अंतराळवीरांशी संवाद सुरू असताना जगभरातील 20 लाख युजर्स हा "लाईव्ह‘ व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आले आहे.
प्रसूती काळात माता दगावली, तर बाळाचे वाचणेही अशक्य मानले जाते. ससून हॉस्पिटलमध्ये एम.डी. शिक्षणाचे धडे गिरवत असताना डॉ. शेखर आमले यांना या घटनेला सामोरे जावे लागले. त्या अवघड शस्त्रक्रियेनंतर जन्माला आलेले बाळ मात्र डॉक्टर म्हणून एक दुर्मिळ अनुभव देऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.
क्वेट्टा- पाकिस्तानमधील एका 46 वर्षीय पित्याचे 100 मुलांचे स्वप्न आहे. सध्या तीन पत्नींपासून त्याला 35 मुले आहेत. आपण एक धार्मिक काम करत असल्याचे तो सांगतो.
सरदार जन मोहम्मद खिल्जी (वय 46) असे त्या पित्याचे नाव आहे. खिल्जीचे स्वप्न साकार होण्यासाठी त्याच्या तीन पत्नींसह कुटुंबीय मदत करत आहे. कुटुंबीयांनी चौथ्या विवाहासाठी तयारी सुरू केली आहे. शंभर मुलांसह आम्ही पती-पत्नी आनंदात राहू, असे त्याच्या पत्नींनी सांगितले.
‘पाकिस्तानमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करण्यास परवानगी आहे. खिल्जीच्या पत्नींची काही तक्रार नसेल तर कोणी काही बोलू शकत नाही. यामुळे तो त्याचे 100 मुलांचे स्वप्न साकार करू शकतो,‘ असे माहिला अधिकार कार्यकर्त्या राफिया झकारिया यांनी सांगितले.
सापाने चावा घेतलेल्या आईचे दूध पिल्याने मृत्यू
| |
-
| |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतछानपल्ली या गावामध्ये चंद्रकला (वय 28) या पती व अठरा महिन्यांच्या चिमुकल्यासोबत घरामध्ये झोपल्या होत्या. रात्री झोपेमध्ये त्यांना काहीतरी चावल्याचे जाणवले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी गेल्या. पहाटे मुलाला भूक लागल्याने तो उठला होता. यामुळे त्यांनी झोपेतच त्याला दूध पाजले. सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
===================================
फेसबुकने केले अंतराळवीरांशी 'लाइव्ह चॅट'(Video)
| |
-
| |
स्पर्धेच्या युगात लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी "फेसबुक‘च्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. अलिकडेच "थ्रीडी व्हिडिओ‘ सारख्या काही कल्पनाही फेसबुकने सादर केल्या आहेत. अशाच नाविन्यपूूर्ण कल्पनेचा एक भाग म्हणून बुधवारी "नासा‘ने अंतराळात पाठवलेल्या अंतराळवीरांशी "फेसबुक‘ने युजर्सचा संवाद घडवून आणला. "सोयुझ‘ या अंतराळयानातील जेफ विल्यम्स, टिम कोप्रा, टीम पिके या तीन अंतराळवीरांशी संवाद साधण्यात आला. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या वॉलवर अंतराळातील "लाईव्ह‘ व्हिडिओ उपलब्ध करून दिला. तसेच त्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या काही मिनिटांतच हजारो प्रश्न विचारण्यात आले. अंतराळवीरांशी संवाद सुरू असताना जगभरातील 20 लाख युजर्स हा "लाईव्ह‘ व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आले आहे.
===================================
दगावलेल्या मातेचे बाळ जगविले
| |
-
| |
कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना "एमबीबीएस‘चे शिक्षण पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात घेतले. प्रसूतीशास्त्र या विषयात चांगले गुण असल्याने मी या विषयाची निवड केली. शिकत असताना मी ससून हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम पाहत होतो. माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले, की झटके येणाऱ्या एका महिलेचे बाळांतपण आहे, तुझ्यासाठी ते अभ्यासाचा विषय होऊ शकते, येऊन पाहा. मी लेबर रूममध्ये गेलो. पाहिले की रुग्ण महिला दगावली होती. हृदय तपासण्याच्या मशिनमधून जाणवले की तिच्या बाळाचे हृदयाचे ठोके पडत होते. आई दगावलेली; परंतु बाळ जिवंत अशी स्थिती फारच कमी असते. हे जितके दुर्मिळ होते तितकेच जिकिरीचे होते.
===================================
चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; दोन ठार
| |
-
| |
कोल्हापूर - तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
माळशिरस येथील मगर कुटुंबिय पर्यटनासाठी रत्नागिरी येथे निघाले होते. दरम्यान बांबवडेपासून (शाहुवाडी) काही अंतरावर गोगवे गावाच्या हद्दीतील तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील विलास नामदेव मगर (वय 48) आणि इंद्रायणी अनिल मगर (वय 32) यांचा मृत्यु झाला. विलास मगर हे माळशिरस तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष होते.

पाकमधील एका पित्याचे 100 मुलांचे स्वप्न
| |
-
| |
सरदार जन मोहम्मद खिल्जी (वय 46) असे त्या पित्याचे नाव आहे. खिल्जीचे स्वप्न साकार होण्यासाठी त्याच्या तीन पत्नींसह कुटुंबीय मदत करत आहे. कुटुंबीयांनी चौथ्या विवाहासाठी तयारी सुरू केली आहे. शंभर मुलांसह आम्ही पती-पत्नी आनंदात राहू, असे त्याच्या पत्नींनी सांगितले.
‘पाकिस्तानमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करण्यास परवानगी आहे. खिल्जीच्या पत्नींची काही तक्रार नसेल तर कोणी काही बोलू शकत नाही. यामुळे तो त्याचे 100 मुलांचे स्वप्न साकार करू शकतो,‘ असे माहिला अधिकार कार्यकर्त्या राफिया झकारिया यांनी सांगितले.
===================================
===================================
===================================
===================================
===================================
No comments:
Post a Comment