[अंतरराष्ट्रीय]
१- काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण
२- भारत-अमेरिका संबंधाने पाक अस्वस्थ
३- लंडन; भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार
४- पॅरीस; युरो चषकात मध्ये ‘स्टार्स’ची गैरहजेरी
५- सिंगापूर; कच्चे तेल आणखी महागले
६- अमरावतीत आण्विक प्रकल्प?; पाकमध्ये चर्चा
७- टोकियो; 'टोयोटा'तील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची संधी
८- अमेरिकेसाठी पाकिस्तान केवळ 'कामापुरता मामा' - पाक परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अझीझ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- छोटा राजनचा 'गेम' करण्यासाठी आलेले डी कंपनीचे 4 जण अटकेत
१०- महाबीज बियाणांची दरवाढ तात्काळ मागे घ्या : विखे पाटील
११- खडसेंची धडपड व्यर्थ, एकही वरिष्ठ भेटला नाही, दिल्लीहून मुंबईला माघारी
१२- ८९ दृश्यांना कात्री कशासाठी? - उच्च न्यायालय
१३- अगुस्ता-मल्ल्या चौकशीसाठी एसआयटी !
१४- संघसेवकांना केंद्रीय नोकऱ्या?
१५- रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू
१६- आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त
१७- सोन्यात तेजी कायम, चांदीही उसळली
१८- तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध
१९- शाळा आवश्यक की भाजप कार्यालये- केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२०- पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर
२१- अंजू बॉबी जॉर्जचा केरळच्या क्रीडामंत्र्यांवर आरोप
२२- 'जोरदार मोदी'; शिवसेनेकडून मोदींचे कौतुक!
२३- मान्सून 24 तासात कोकणात, बांदा, सावंतवाडीत संततधार
२४- मुंबईतील जागांच्या आरक्षणाची माहिती आता आॅनलाइन
२५- खडसेंच्या ‘बदल्या’ रोखल्या!
२६- भटक्या कुत्र्यांना कसे आवरणार? - हायकोर्ट
२७- सेनेच्या मेट्रोविरोधामागे ‘बिल्डरप्रेम’
२८- तेरावी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया १४ जूनपासून
२९- ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात
३०- तेराशे कोटींच्या कंत्राटांची चौकशी
३१- मुख्यमंत्री कार्यालयात ‘यिन’ सदस्यांनी करावी इंटर्नशिप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३२- औरंगाबाद; उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू
३३- मुंबई; 9 वर्षांचा चिमुकला, कुत्र्याशी मैत्री आणि सीसीटीव्ही व्हिडीओ
३४- ट्रान्स हार्बरवर लोकल रखडली, गर्दीच्या वेळीच प्रवाशांना मनस्ताप
३५- डॉ. तात्याराव लहाने यांना बढती, मात्र जेजेमधून बदली
३६- मुंबई; वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या
३७- त्रिवेंद्रम; केरळच्या क्रीडामंत्र्यांकडून अंजूचा अपमान
३८- कर्वेनगर : घटस्फोटित प्रेयसीचा गळा चिरून खून
३०- चंडीगड; 'त्या'ने केली 'सेल्फी वुइथ डॉटर'साठी वेबसाईट
४०- नाशिक; लष्करात लेफ्टनंट पदावरून ओंकार करणार देशसेवा
४१- 'आयपीएल'प्रमाणेच तमिळनाडूमध्ये 'टीएनपीएल'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
४२- #sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड
४३- रोहित शर्माचा नवा अवतार
४४- एक चषक, 24 संघ, कसा असेल युरो चषक
४५- दुखापतीमुळे राफेल नदालची 'विम्बल्डन'मधूनही माघार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दीपक पावडे, दशरथ पाटील, सुभाष नाईक, नामदेव एलकटवार, परमेश्वर कांडले, मधुकर जाधव, संजय चाभरेकर, रामेश्वर काळे, लंगडे गोविंद, सारंग रुद्रकंठवार, गणेश मोरे, विलास गजभारे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

.

उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू
औरंगाबाद : गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जाफराबादचे गजानन खरात या 36 वर्षीय शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होतं. मात्र आज गजानन खरात यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने, त्यांचा मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यातील वरखडा इथे राहणारे गजानन खरात हे, जालन्यातीलच जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात कार्यरत होते.
या दुर्दैवी निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
.
======================================

.
.
खडसेंची धडपड व्यर्थ, एकही वरिष्ठ भेटला नाही, दिल्लीहून मुंबईला माघारी
नवी दिल्ली : वरिष्ठांच्या भेटीसाठी गेलेल्या एकनाथ खडसे यांचं दिल्लीत अजिबात वजन नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण गुरुवारी दिल्लीत दाखल झालेल्या खडसेंना एकाही वरिष्ठ नेत्याने भेटही दिली नाही. त्याला अपवाद केवळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ठरला.
महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, खडसे यांनी आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी दिल्ली गाठल्याची चर्चा होती. मात्र खडसेंची वरिष्ठ नेत्यांशी भेटण्याची धडपड व्यर्थ ठरली असून, खडसे पुन्हा माघारी मुंबईला परतले आहेत.
दिल्लीत खडसेंना एकटे नितीन गडकरीच भेटले. खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता होती. मोदी कालच पाच देशांच्या दौरा आटोपून दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र ना मोदी, ना अमित शाह ना अन्य कोणताही बडा नेता खडसेंना भेटला नाही.
.
======================================

सिमन्सने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात 51 चेंडूत 82 धावांची खेळी रचून, कॅरेबियन संघाला बिकट परिस्थितीतून विजयपथावर नेलं. पहिल्यांदा खेळताना भारताने 20 षटकात 192 धावा केल्या होत्या. कोहलीने 47 चेंडूत 89 धावा ठोकल्या होत्या. मात्र सिमन्सच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने हा सामना 7 विकेट्स जिंकला होता.
कोहलीने डिवचलं
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सिमन्सने सांगितलं की, “क्षेत्ररक्षण करताना विराट मला काहीतरी बोलला होता. त्यावेळी मी मनाशी निर्धार केला की, विराटला दाखवून द्यायचं की तोच एकमेव चांगला फलंदाज नाही.”
‘कोहली आक्रमक व्यक्ती आहे’
लेंडल म्हणाला की, “कोहली असाच आहे. तो प्रचंड घमेंडी आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना तो आक्रमक असतो. तो अतिशय आक्रमक व्यक्ती आहे.”
.
.
माझी खेळी घमेंडी कोहलीला चोख उत्तर होतं : सिमन्स
मुंबई : घमेंडी विराट कोहलीने मला ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये मॅचविनिंग खेळीसाठी डिवचलं, असा खुलासा वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्सने केला आहे.
सिमन्सने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात 51 चेंडूत 82 धावांची खेळी रचून, कॅरेबियन संघाला बिकट परिस्थितीतून विजयपथावर नेलं. पहिल्यांदा खेळताना भारताने 20 षटकात 192 धावा केल्या होत्या. कोहलीने 47 चेंडूत 89 धावा ठोकल्या होत्या. मात्र सिमन्सच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने हा सामना 7 विकेट्स जिंकला होता.
कोहलीने डिवचलं
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सिमन्सने सांगितलं की, “क्षेत्ररक्षण करताना विराट मला काहीतरी बोलला होता. त्यावेळी मी मनाशी निर्धार केला की, विराटला दाखवून द्यायचं की तोच एकमेव चांगला फलंदाज नाही.”
‘कोहली आक्रमक व्यक्ती आहे’
लेंडल म्हणाला की, “कोहली असाच आहे. तो प्रचंड घमेंडी आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना तो आक्रमक असतो. तो अतिशय आक्रमक व्यक्ती आहे.”
.
======================================

.
.
पोस्टरवॉर : भाजपचं शिवसेनेला पोस्टरमधून उत्तर
मुंबई : निजामाचं राज्य असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. भाजपने पोस्टर्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय, उद्धव ठाकरे यांची तुलना बेडकाशी केली आहे.
.
======================================

.
.
छोटा राजनचा 'गेम' करण्यासाठी आलेले डी कंपनीचे 4 जण अटकेत
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची हत्या करण्याच्या प्रयत्नात आलेल्या 4 हल्लेखोरांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही हल्लेखोर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात छोटा शकील टोळीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
हल्लेखोरांकडून पोलिसांनी 9 एमएमच्या बंदुका आणि रोक रक्कम जप्त केली आहे.
इंडोनेशियातून राजनला अटक केल्यानंतर सध्या त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलंय. यानंतर डी कंपनीकडून राजनला संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं कळतंय.
.
======================================

.
.
स्पेशल रिपोर्ट : एक चषक, 24 संघ, कसा असेल युरो चषक ?
फुटबॉलच्या दुनियेतली विश्वचषकानंतरची सर्वात लोकप्रिय स्पर्धा अर्थात युरो चषकाला आजपासून सुरूवात होते आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप फुटबॉलमय झालं आहे. जगभरातील फुटबॉल चाहतेही युरो चषकाची लढाई पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
एक चषक आणि 24 टीम्स…. युरो कप म्हणजे युरोपातली सर्वात प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा
फुटबॉलच्या दुनियेत युरो कपचं स्थान विश्वचषकाखालोखालचं मानलं जातं. कारण युरोपातले दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतात.
यंदा 10 जून ते दहा जुलै या महिनाभराच्या कालावधीत फ्रान्सच्या दहा शहरांतील दहा स्टेडियम्समध्ये युरो चषकाचं आयोजन केलं जाणार आहे. पॅरिस, सेन्ट डेनिस, लिल, लान्स, लिऑन, बोर्डो, मार्सेई, नीस, सेन्ट एतिएन आणि ट्यूलूजमध्ये युरो चषकाचे एकूण 51 सामने खेळवले जातील.
.
======================================

.
.
9 वर्षांचा चिमुकला, कुत्र्याशी मैत्री आणि सीसीटीव्ही व्हिडीओ
फोटो सौजन्य : एबीसी न्यूज डॉट कॉम
मुंबई: आपल्यातील अनेकजण २४ तास सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. फेसबुक तर सोशल नेटवर्किग साईटवरील सर्वात जास्त अभिव्यक्त होणारे प्रभावी साधन आहे. यावर अनेकजण आपले फोटो, व्हिडीओ रोजच्या रोज अपलोड करत असतात. अन तुमचे मित्र हा फोटो लाईक, किंवा शेअर करून अधिकाधिक प्रसारित करतात. अशाच एका व्हिडीओने सध्या फेसबुक युजर्सना भुरळ पाडलेली आहे.
या व्हिडीओत एक मुलगा कुत्र्याशी खेळताना पाहायला मिळत आहे. हॉली ब्रियॉक्स मालेट या अमेरिकेतील फेसबुक युजरने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक प्रोफाईलवर अपडेट केला, आणि पाहता पाहता या व्हिडीओवर अक्षरश: लाईक्स, कमेंटसचा पाऊस पडला.
या व्हिडीओमागची कथा मालेट यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर सांगितली आहे. एक नऊ वर्षांचा मुलगा रोज त्या घरी नसताना सायकलवरून येऊन त्यांचा कुत्रा बेलाला रोज प्रेमाने मीठी मारून जायचा. गेले अनेक दिवसांपासून सुरु असलेला हा प्रकार त्यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यामुळे हा मुलगा कोण आणि तो रोज बेलाला का मीठी मारुन जातो ? हा प्रश्न त्यांना पडला होता.
.
======================================

.
.
ट्रान्स हार्बरवर लोकल रखडली, गर्दीच्या वेळीच प्रवाशांना मनस्ताप
मुंबई: ऐन गर्दीच्या वेळीच ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ठाणे – वाशी लोकलसेवा उशिराने सुरु आहे.
या मार्गावर एक रेल्वे बंद पडल्याने लोकल्सच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पुढे कोणतीही लोकल जात नाही. परिणामी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी वाढत आहे.
कार्यालयाला जाण्याच्या वेळीच लोकल रखडल्याने प्रवाशांन मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
.
======================================

.
.
डॉ. तात्याराव लहाने यांना बढती, मात्र जेजेमधून बदली
मुंबई : अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची अखेर बदली करण्यात आली आहे. डॉ. लहाने यांना पदोन्नती देऊन वैद्यकीय शिक्षण संचलनालयात हंगामी सहसंचालक म्हणून नेमणूक केली आहे.
मात्र वैद्यकीय शिक्षण संचलनालयात रुजू होण्यास डॉ. तात्याराव लहाने यांनी नकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात वैद्यकीयचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.लहानेंविरोधात तक्रार केली होती. आमच्याकडून कारकूनी स्वरुपाचं काम करुन घेतलं जातं. तसंच लहानेंकडून वारंवार मानसिक छळ होतो, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
.
======================================

.
.
रोहित शर्माचा नवा अवतार
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा ‘ हायपर टायगर्स ‘ या डिजिटल कॉमिक बुकमध्ये एका नव्या अवतारात दिसणार आहे. क्रिकेट जगतापासून काहीकाळ वेळ काढून, आपला छंद जोपासला असल्याचे रोहितने या मालिकेतील कॉमिक बुकच्या प्रकाशनावेळी बोलताना सांगितले.
या कॉमिक बुकच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पणाची कोणती इच्छा नसल्याचेही, त्याने यावेळी बोलताना स्पष्ट केले. ग्राफिक इंडिया, ब्रिटेनची आयएसएम कॉमिक्स आणि कोर्नोस्टोन स्पोर्टस यांच्या सहयोगाने या कॉमिक बुकची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही तो यावेळी म्हणाला.
हायपर टायगर्समध्ये जे संघ आपले गाव आणि पर्यावरण रक्षणासाठी खेळतात अशा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट संघांचा समावेश करण्यात आला आहे. “जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी असेल, तर पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्याने यावेळी केले.
हायपर टायगर्स इ-कॉमिक बुक गुरूवारपासून डेलीहंटवर उपलब्ध असून, पहिल्या दोन आठवड्यांसाठी ते वाचकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानंतर वाचकांना या पुस्तकाच्या प्रत्येक पेजसाठी 10 रू खर्च करावे लागणार आहेत.
.
======================================

.
.
अंजू बॉबी जॉर्जचा केरळच्या क्रीडामंत्र्यांवर आरोप
तिरुअनंतपूरम: भारताची ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेती अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जनं केरळचे क्रीडा मंत्री ईपी जयराजन यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.
जयराजन यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवल्याचं अंजूनं म्हटलंय. अंजूनं याविषयी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे तक्रारही केली आहे.
2003 साली जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करून अंजूनं इतिहास घडवला होता. मूळची केरळची अंजू सध्या बंगळुरूत वास्तव्यास असून, केरळ स्पोर्टस कौंसिलच्या अध्यक्षपदी आहे.
जयराजन यांनी अंजूसह स्पोर्टस कौंसिलच्या सदस्यांना भेटीस बोलावलं होतं आणि आधीच्या सरकारनं तुमची नेमणूक केली असून तुम्ही त्यांच्याच पक्षाचे सदस्य आहात, तुम्ही बेकायदेशीरपणे काम करत आहात आणि पैशांचा गैरवापर करत आहात असा आऱोप जयराजन यांनी केला.
.
======================================

.
.
महाबीज बियाणांची दरवाढ तात्काळ मागे घ्या : विखे पाटील
मुंबई : दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, महाबीजने केलेली बियाणांची दरवाढ अन्यायकारक आणि जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय वर्तुळाने याची तातडीने दखल घेतली आहे.
.
======================================

.
.
मान्सून 24 तासात कोकणात, बांदा, सावंतवाडीत संततधार
मुंबई: पुढील 24 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याची चिन्हं आहेत. कर्नाटक किनारा, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र पदेशच्या काही भागात मान्सून वारे दाखल झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
शिवाय कोकणात मान्सून येण्यास अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, सावंतवाडी, आंबोलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
तळकोकणात पडणारा पाऊस ही मान्सूनचा चिन्हं असल्याचं समजतंय.
दरम्यान पुढच्या 24 तासात मान्सूनचे वारे महाराष्ट्रात दाखल होतील. मान्सूनच्या वाऱ्यांची हालचाल वेगानं असल्यानं आता राज्यातील बळीराजा सुखावला आहे.
.
======================================
.
दुखापतीमुळे राफेल नदालची 'विम्बल्डन'मधूनही माघार
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १० - टेनिस विश्वातील एकेकाळचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल सध्या दुखापतींमुळे त्रस्त असल्यामुळे त्याने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पेनच्या या खेळाडूची दुखापत गेल्या महिन्यात बळावल्याने त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही माघार घेतली होती. गेल्या महिन्यात नदालने फ्रेंच ओपनच्या दुस-या फेरीनंतर स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. ' ‘माझा हात मोडला नसला तरी मी जर खेळणे कायम ठेवले तर आगामी काही दिवसांमध्ये नक्की मोडेल. माझी परिस्थिती चांगली, पण अखेर हे जीवन आहे. रोला गॅरो नसते तर कदाचित मी सुरुवातीचे दोन दिवस खेळण्याची जोखीमही पत्करली नसती.' असे त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान म्हटले होते. त्याचे हे दुखणे अजून बरे झाले नसून त्याने आता विम्बल्डन स्पर्धेतही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून 'फेसबूक'वरून ही घोषणा केली.
.
======================================
.
काबूलमध्ये भारतीय महिलेचं अपहरण
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - एनजीओमध्ये काम करणा-या भारतीय महिलेचं काबूलमध्ये अपहरण करण्यात आलं आहे. जुडिथ डिसुजा असं या महिलेचं नाव असून गुरुवारी रात्री तिचं अपहरण करण्यात आलं. जुडिथ डिसुजा कोलकातामधील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची कर्मचारी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील प्रशासन जुडिथ डिसुजाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.भारतीय दुतावास अफगाणिस्तानमधील अधिका-यांच्या संपर्कात आहे. जुडिथ डिसुजा यांचे कुटुंबिय कोलकातामध्ये राहत असून सरकार त्यांच्यादेखील संपर्कात आहे.जुडिथ डिसुजा आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची पुर्णवेळ कर्मचारी आहे. इतर कर्मचा-यांसोबत कार्यालयाबाहेर उभे असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तालिबानने हे अपहरण केलं असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही संपर्कात असून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती आगा खान संस्थेने दिली आहे,.
.
======================================
.
#sixwordstories : सोशल मीडियावरील नवा ट्रेंड
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १० - सोशल मीडियावर सध्या ' sixwordstories' ( सहा शब्दांत गोष्ट) हा नवा ट्रेंड आला असून त्यामध्ये तुमच्या मनातील भावना, विचार व एखादी गोष्ट अवघ्या ६ शब्दांत मांडावी लागते. सध्याच्या तरूणाईसह लहान -मोठे, थोर सर्वजण या ट्रेंडमध्ये गुंतलेले दिसत असून अवघ्या ६ शब्दांत कल्पक रितीने आपले विचार मांडण्याची व अर्थपूर्ण गोष्ट सांगण्याची चढाओढ नेटक-यांमध्ये लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा ट्रेंड सुरू असून फेसबूक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #sixwordstories या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत. मात्र ब-याच जणांना हे 'sixwordstories' प्रकरण नेमके काय आहे हेच माहीत नाही. हा ट्रेंड का, कधी, कसा सुरू झाला हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
- काय आहे MySixwordStory?१९९० साली हा लेखनप्रकार प्रकाशझोतात आला. अमेरिकेतील एक प्रसिद्ध लेखक व पत्रकार अर्नेस्ट हेंमिग्वे यांच्याकडून या 'SixwordStory'ची सुरूवात झाली. ' एखादी व्यक्ती कितीही मोठी लेखक बनली तरी लोक त्याला मोठं समजत नाही' असे हेंमिग्वे यांनी आपल्या इतर लेखक मित्रांना सांगितले. त्याच्या सहका-यांना मात्र हेमिंग्वेचे हे वक्तव्य पटले नाही आणि त्यांनी त्याची खिल्ली उडवत त्याला ' अवघ्या ६ शब्दांध्ये एखादी कहाणी (गोष्ट) लिहून दाखवण्याचे आव्हान दिले. हेमिंग्वे यांनी ते आव्हान स्वीकारले आणि ६ शब्दांत एक गोष्ट लिहीली. ती होती, 'For sale: baby shoes, never worn. (अर्थ - विक्रीस उपलब्ध :बाळाचे बुट, कधीच न घातलेले.)' अवघ्या ६ शब्दांत हेमिंग्वेने लिहीलेली ही गोष्ट सर्वांना खूप भावली आणि हेमिंग्वेनी अट जिंकली. तेव्हापासूनच 'siwordstories'चा हा ट्रेंड, नवी कला सुरू झाली आणि ९०च्या दशकात अनेक जण आपल्या भावना ६ शब्दांच्या गोष्टीच्या माध्यमातून व्यक्त करू लागले.आता पुन्हा MySixwordStoryचा ट्रेंड का?हे एवढं सगळं वाचल्यावर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ९०च्या दशकातील हा प्रकार आत्ता पुन्हा ट्रेंडमध्ये येण्याचं कारण काय? तर त्याचं खरं कारण म्हणजे २ जुलै रोजी हेमिंग्वे यांची पुण्यतिथी असते आणि त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ हा '६ शब्दांचा' लेखनप्रपंच पुन्हा सुरू करण्यात आला असून सध्या तो ट्रेंडमध्ये आला आहे. 'Six Word Stories' नावाची एक वेबसाईटही असून २००८ साली पीट बर्ग यांनी ती साईट सुरू केली होती. हेंमिग्वेच्या लेखनप्रकाराचा वारसा पुढे नेणे हाच त्या साईटचा उद्देश होता. आणि आता याच (Six Word Stories) नावाने फेसबूकवर एक पेजही सुरू करण्यात आले असून तेथे अनेक युझर्स आपल्या ६ शब्दातील गोष्टी पोस्ट करत आहेत. तसेच ट्विटरवरही 'six word stories' हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून तिथेही अनेक ट्विटरकर नेमक्या शब्दांतून आपल्या भावना मांडत आहेत.
.
======================================
.
वडिलांनी धूम्रपान करताना पाहिल्याने आत्महत्या
- मुंबई : वडिलांनी धुम्रपान करताना पाहिल्यामुळे अपराधी भावनेतून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ओशिवरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली.मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली, ज्यात त्याने वडिलांची माफी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.समीर शेख असे या त्याचे नाव आहे. तो जोगेशवरीच्या बेहरामबाग परिसरात राहत होता.ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, शेखला दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी सिगारेट ओढताना पाहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता.जोगेशवरीच्या ओरिएंट महाविद्यालयात शिकणाऱ्या शेखने दुपारी दीड वाजता लेक्चर संपल्यानंतर मित्रांना पुढे जाण्यास सांगितले.मित्रांनी त्याला सोबत येण्यास सांगितले तेव्हा ‘धिस इज माय लास्ट डे फ्रेंड्स’ असे तो मित्रांना म्हणाला. त्यानंतर क्लासरूमचा दरवाजा बंद करून त्याने खिडकीतून खाली उडी मारली. त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
.
======================================
.
मुंबईतील जागांच्या आरक्षणाची माहिती आता आॅनलाइन
- मुंबई : विकास नियोजन आराखडा १९९१ मध्ये संबंधित जागा कशासाठी आरक्षित होती, याची माहिती आता आॅनलाइन मिळणार आहे़ यामुळे नव्या इमारतीमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती ग्राहकांना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे़ प्रत्येक सीटीएस क्रमांकासाठी ग्राहकांना दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत़ ही माहिती मिळवण्यासाठी टेबलाखालून होणाऱ्या व्यवहारांना आळा बसणार आहे़१९९१ ते २०११ या २० वर्षांतील विकास नियोजन आराखड्याची जेमतेम २० टक्के अंमलबजावणी झाली आहे़ त्यामुळे या विकास आराखड्यातील आरक्षणे कायम ठेवून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे़ ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’ अंतर्गत पालिकेने नव्या इमारतींच्या आराखड्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे़ त्यामुळे सीटीएस क्रमांकाची आॅनलाईन नोंद केल्यास त्या भागातील जागांचे १९९१ मधील आरक्षण कळू शकणार आहे़
.
======================================
.
खडसेंच्या ‘बदल्या’ रोखल्या!
- यदु जोशी,मुंबई- महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांनी सुचविलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) आणि तहसीलदारांच्या ११० बदल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखल्या असून त्यांचे प्रस्ताव योग्य चॅनेलमधूनच पाठवा, असे आदेश दिले आहेत.महसूल खात्यातील बदल्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नागरी सेवा मंडळाकडून प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे येतात. कोणत्या बदल्या पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र याचा शेरा ही समिती देते. त्यानंतर फाइल महसूलमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे जाते. अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) आणि एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या तहसीलदारांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. पण त्याचे प्रस्ताव महसूलमंत्र्यांकडून जातात. बोटावर मोजण्याइतके बदल सुचवून मुख्यमंत्री बरेचदा जसेच्या तसे प्रस्ताव मंजूर करतात, असा अनुभव आहे. मात्र, खडसे यांनी सुचविलेल्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले नाहीत. शिवाय, ते योग्य प्रक्रियेनुसार आणि टप्प्यांप्रमाणे आलेले होते की नाही याची तपासणी करण्यास सांगितले आहे. बदल्यांमध्ये योग्य प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसेल तर तो करून नव्याने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही अधिकाऱ्याची तो राहत असलेल्या तालुका वा जिल्ह्यात बदली देऊ नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. निवृत्तीला दीड वर्षे वा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, महसूलमंत्र्यांकडून प्रस्तावित झालेल्या काही प्रकरणांत हा नियम धाब्यावर बसवून काही अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात बदली सुचविण्यात आली होती,
.
======================================
.
भटक्या कुत्र्यांना कसे आवरणार? - हायकोर्ट
- मुंबई : लोकांच्या जिवाला धोका ठरणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे, या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेला गुरुवारी दिले. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले.सांगलीचे मारुती हाले यांच्या मुलाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी नुकसानभरपाई व महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मधील कलम ४४ ची अंमलबजावणी, यासाठी याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्बीजीकरणाने सुटणार नाही. त्यासाठी एकमताने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने म्हटले. धोकादायक व पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना संपवण्याचा अधिकार पोलिसांना आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील मनोज शिरसाट यांनी खंडपीठासमोर केला. न्यायालयाने या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेत केले.
.
======================================
.
८९ दृश्यांना कात्री कशासाठी?
- मुंबई : ‘उडता पंजाब’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने हाताळलेला विषय लक्षात घेता त्यातील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना का केली, याचे स्पष्टीकरण गुरुवापर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी सेन्सॉर बोर्डाला दिले.‘उडता पंजाब’ हा पंजाबची प्रतिमा खराब करणारा चित्रपट आहे, असा शेरा मारत सेन्सॉर बोर्डाने यामधील ८९ दृश्ये वगळण्याची सूचना दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना केली. १७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सेन्सॉर बोर्डाने आयत्या वेळी ही सूचना केल्याने अनुराग कश्यप यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या शीर्षकामधून ‘पंजाब’ वगळण्याची सूचना निर्माते व दिग्दर्शकांना केली. तसेच सुरुवातीच्या दृश्यामध्ये दिसणारा ‘पंजाब’ हटवण्याची सूचना केली आहे. पंजाबमधील अमली पदार्थांची होणारी विक्री आणि त्या विळख्यात अडकलेले लोक हा चित्रपटाचा विषय आहे. पुनर्विचार समितीने १३ दृश्ये कापण्याची सूचना दिली होती, अशी माहिती सेन्सॉरच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. यावर समाधान न झाल्याने खंडपीठाने संपूर्ण माहिती घेऊन युक्तिवाद करण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी आहे.
.
======================================
.
सेनेच्या मेट्रोविरोधामागे ‘बिल्डरप्रेम’
- मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे. समूह विकासाच्या माध्यमातून मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना दुप्पट क्षेत्रफळाचे घर देण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आधीच पुर्नविकासाचे करार केलेल्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. या बिल्डरांचे हित जपण्यासाठीच शिवसेनेने मेट्रो-३ला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, अशी टीका भाजपाने केली.मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मेट्रो रेल कार्पोरेशनला महापालिकेचे १७ भूखंड देण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मुळात मेट्रोने हे भूखंड लीजवर मागितले आहेत. भूखंडांची मालकी महापालिकेकडेच राहणार असून त्यासाठीच्या तब्बल ३७ अटीही कार्पोरेशनने मान्य केल्या आहेत. मेट्रोने मालकीचा आग्रह धरलेला नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
.
======================================
.
तेरावी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया १४ जूनपासून
- मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला म्हणजेच तेरावीच्या प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणीला १४ जून २०१६ पासून सुरुवात होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवीच्या अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ँ३३स्र://े४े.ल्ली३.्रल्ल या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी एन्ड आय), बीकॉम (ए एन्ड एफ), बीकॉम (एफ एन्ड एम) बीएमएस, बीएमएस- एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व नोंदणी करता येईल.
.
======================================
.
‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचा प्रस्ताव धूळ खात
- मुंबई : देशात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून ४२ टक्के अपघात हे व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यातील सर्व कमर्शियल वाहनांना स्पीड गर्व्हनर बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडून असल्याची माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिलचे सदस्य डॉ. कमलजित सोय यांनी दिली.देशभरात दोन कोटी कमर्शियल वाहने असून महाराष्ट्रात त्यांची संख्या जवळपास २० लाख आहे. वाहन चालक किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि त्याला वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र कमर्शियल वाहनांवर असलेले चालक हे दहावी पासही नसतात आणि त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालनही काटेकोरपणे केले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यानेच स्पीड गर्व्हनर बसविणे आवश्यक आहे, असे मत सोय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना स्पीड गर्व्हनर बसविणे बंधनकारक केले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. काही ठराविक राज्ये सोडल्यास इतर राज्यांनी वेग नियंत्रक बसविणे बंधनकारकही केले नसल्याचे सोय यांनी सांगितले.
.
======================================
.
तेराशे कोटींच्या कंत्राटांची चौकशी
- मुंबई : शहरातील रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सहा कंत्राटदारापैकी दोघांना तेराशे कोटींची नवीन कामे दिल्याप्रकरणी मुंबई महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे.याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्त एम. एल. टाहिलियानी यांनी दिले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिलगलगली यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांनी याबाबत चौकशी सुरुकेली आहे.रस्त्याच्या कामातील भष्ट्राचार व गैरव्यवहाराप्रकरणी पालिकेने सहा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे. कुमार यांना हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचे नवीन कंत्राट देण्यात आले.
.
======================================
.
अगुस्ता-मल्ल्या चौकशीसाठी एसआयटी !
- नवी दिल्ली : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स घेण्याच्या सौद्यातील कथित भ्रटाचार आणि विजय मल्ल्या याने बँकांची केलेली फसवणूक या दोन प्रकरणांचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून, राकेश अस्थाना तिचे प्रमुख असतील.गोध्रा येथे २00२ साली साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळण्याच्या प्रकाराची चौकशीही राकेश अस्थाना यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात अगुस्ता वेस्टलँड आणि विजय मल्ल्या या दोन प्रकरणांचा तपास ही एसआयटी करणार असून, भविष्यात याच पथकाकडे आणखी काही प्रकरणे तपासासाठी सोपविली जाण्याची शक्यता आहे. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटल्यामुळे ती रक्कम कोणाला मिळाली, याचा तपास केला जाणार आहे.
.
======================================
.
संघसेवकांना केंद्रीय नोकऱ्या?
- नवी दिल्ली : मोदी सरकारने पाच दशकांपासूनचे निर्बंध हटविताना केंद्रीय नोकऱ्यांची दारे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक तसेच जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांसाठी खुली करण्याचे संकेत दिले आहेत. गोव्यामध्ये नव्या रोजगार भरतीसाठी संघाचे स्वयंसेवक नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागल्याचे वृत्त धडकताच केंद्र सरकारने त्याबाबत खुलासा केल्यामुळे ही बाब स्पष्ट झाली.स्वयंसेवकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश जारी करण्यात आलेला नाही. जुना आदेश कायम ठेवण्यात आला असेल तर गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करीत फेरआढावा घेतला जाणार असल्याचे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी येथे पत्रकारांना सांगितले.आदेशाचे काटेकोर पालन नव्हते...
.
======================================
.
रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू
- नवी दिल्ली : सदोष बांधणीमुळे भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. एकनिष्ठ काम आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या २ वर्षांत फार काही बदल झाला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.भारतातील रस्ते अपघाताबाबत २०१५ सालचा अहवाल जारी करताना, केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला ५७ अपघात होतात आणि त्यात १७ जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्यांत ५४ टक्के लोक तरुण म्हणजे १५ ते ३४ वयांतील असतात.’‘हा अहवाल पाहून जनता आमच्यावर टीका करेल, तरीही मी हा अहवाल उघड करीत आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत काम केले, पण त्यातून फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालाने आपणास खूपच वेदना होत आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.
.
======================================
.
भारत-अमेरिका संबंधाने पाक अस्वस्थ
- इस्लामाबाद : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा होत असताना तिकडे पाकिस्तानची धडधड मात्र वाढली आहे. अमेरिकेला जेव्हा आमची गरज असते तेव्हा ते आमच्यासोबत चांगले संबंध ठेवतात आणि गरज नसते तेव्हा आमची साथ सोडली जाते, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज याबाबत बोलताना म्हणाले की, द्विपक्षीय संबंधाच्या मुद्यावर पाकिस्तान अमेरिकेजवळ आपली चिंता व्यक्त करणार आहे. दोन्ही देशांत येथे उच्चस्तरीय बैठक घेण्याबाबत विचार सुरू आहे. अजीज यांचा हवाला देत ‘डॉन’ने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजीज यांचे हे वक्तव्य आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला जे समर्थन दिले आहे, त्यामुळेही पाकिस्तान नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
.
======================================
.
भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार
- लंडन : भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला असून, एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी २०१५ मध्ये ४० हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता. डब्लिन पुरस्कारासाठी १६० नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना १३ वर्षे लागली. पुरस्कारातील रकमेतून भावाच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
.
======================================
.
युरो चषकात मध्ये ‘स्टार्स’ची गैरहजेरी
- पॅरिस : मोठ्या स्पर्धेत खेळू न शकणे हे कोणत्याही फुटबॉलपटूसाठी वाईट स्वप्नासारखेच असते आणि या आठवड्यात सुरू होत असलेल्या युरो कपमध्येदेखील काही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांना हाती निराशा पडणार आहे.मैदानावर आपला वेग आणि त्याच्या जोडीला आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा जर्मनीचा मिडफिल्डर मार्को रियूस दुखापतीमुळे युरो कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. पाय आणि पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला २0१0 आणि २0१४ च्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतही खेळता आले नव्हते.आघाडीच्या फुटबॉलपटंूमध्ये समाविष्ट असणारा हॉलंडचा कर्णधार आर्जेन रॉबेन हादेखील युरो कपमध्ये खेळताना दिसणार नाही. हॉलंडचा संघ स्पर्धेसाठी पात्र न ठरू शकणाऱ्या तुल्यबळ संघांपैकी एक आहे. स्पर्धेत हॉलंडचा संघ नसल्यामुळे प्रेक्षक मैदानात आर्जेनची जादू पाहण्यापासून वंचित राहतील.युरो कपमध्ये खेळू न शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बेल्जियमचा कर्णधार विन्सेंट कोम्पनी व स्पेनचा डिएगो कोस्टादेखील आहेत. दुखापतीशी संघर्ष करीत असणाऱ्या या खेळाडूंना आपला या वेळेस जलवा दाखविण्याची संधी मिळणार नाही.
.
======================================
.
केरळच्या क्रीडामंत्र्यांकडून अंजूचा अपमान
- त्रिवेंद्रम : लांबउडीतील आॅलिम्पिकपटू अर्जुन पुरस्कार विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळचे क्रीडामंत्री ईपी जयराजन यांच्यावर अपमान केल्याचा आरोप केला आहे. केरळ क्रीडा परिषदेची अध्यक्ष असलेल्या अंजूने या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे करताच क्रीडामंत्री वादात अडकले.२००३ च्या विश्व स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य विजेती अंजू म्हणाली, ‘राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर मी क्रीडा परिषदेच्या उपाध्यक्षांना घेऊन क्रीडामंत्र्यांच्या भेटीला गेले. मला याआधीच्या यूडीएफ सरकारने या पदावर नेमले होते. केरळमधील खेळाच्या प्रगतीवर नवे मंत्री चर्चा करतील, असा आमचा समज होता; पण पहिल्याच बैठकीत मंत्र्यांनी आम्हाला तुम्ही मागच्या सरकारमध्ये पदावर आलात. तुम्ही दुसऱ्या पक्षाचे सदस्य असल्याने ज्या नियुक्त्या आणि बदल्या करीत आहात, त्या नियमबाह्य आहेत, असे सांगितले.
.
======================================
.
आॅनलाइन खरेदीमुळे विमा स्वस्त
- मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारांच्या व्यवहारासाठी ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेत आणि विशेषत: इंटरनेटवरून आर्थिक व्यवहारांसाठी भारतीय ग्राहकांत निर्माण झालेल्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर आता विमा उद्योगही आॅनलाइन जाण्याच्या तयारीत आहे, तसेच विमा कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटसोबतच ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातूनही विविध उत्पादनांची विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या विमा कंपन्यांच्या काही ठरावीक उत्पादनांची विक्री आॅनलाइन पद्धतीने होते, पण ही प्रक्रिया मर्यादित आणि ठरावीक योजनांपुरतीच मर्यादिच आहे.विमा उत्पादनांच्या आॅनलाइन विक्रीचा एक प्रस्ताव विमा नियामक प्राधिकरणाने तयार केला असून, यानुसार ग्राहकांना विम्याची उत्पादने आॅनलाइन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. विमा उत्पादनांच्या विक्रीमध्ये विमा कंपन्या, विमा एजंट अशा विमा विक्रीतील सर्वच घटकांचा समावेश आहे. याकरिता, इरडाने स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. या नियमावलीच्या अंतर्गत विमा कंपन्या आणि विमा एजंटना आॅनलाइन प्लॅटफॉर्म विकसित करून विमा उत्पादनांची खरेदी करावी लागेल, तसेच या माध्यमातून होणाऱ्या सर्व योजनांच्या विक्रीची, तसेच त्या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही सर्वस्वी विमाकंपन्यांची असेल, असेही इरडाने स्पष्ट केले आहे.
.
======================================
.
सोन्यात तेजी कायम, चांदीही उसळली
- नवी दिल्ली : परदेशात उठाव कायम असल्याने व स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी चालविल्याने सोन्या-चांदीत तेजी कायम आहे. गुरुवारी सोने १० रुपयांनी वधारले, तर चांदी चक्क एक हजार रुपयांनी उसळली. सोन्याचे भाव १० रुपयांनी वाढल्याने, २९,१७० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदी एक हजार रुपयांनी वधारल्याने चांदीचा भाव ४०,५०० रुपये प्रतिकिलो झाला.
.
======================================
.
.
.
.
======================================
कच्चे तेल आणखी महागले
- सिंगापूर : अमेरिकी पुरवठ्यातील घसरण आणि नायजेरियातील तेल उत्पादनातील संभाव्य घट, यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी आणखी वाढल्या. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दर ३२ सेंटांनी वाढून ५१.५५ डॉलर प्रति बॅरलवर गेले. ही वाढ ०.६२ टक्का आहे. जुलैनंतरची ही सर्वोच्च वाढ ठरली आहे. ब्रेंट क्रूड तेलाचे दर २२ सेंटांनी अथवा ०.४२ टक्क्याने वाढून ५२.७३ डॉलरवर गेले. आॅक्टोबरनंतरची ही सर्वोच्च वाढ ठरली आहे.
.
======================================
तंबाखू क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस नीति आयोगाचा विरोध
- नवी दिल्ली : तंबाखू क्षेत्रात थेड परकीय गुंतवणुकीस पूर्ण प्रतिबंध घालण्याच्या प्रस्तावास नीति आयोगाने विरोध केला आहे.सध्या तंबाखू क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञान सहयोग, फ्रँचाइजी परवाना, ट्रेड मार्क, ब्रँड नेम आणि व्यवस्थापन करार यात एफडीआयला अनुमती आहे. सिगार, तंबाखूचे, तसेच पर्यायी सिगारेट उत्पादन या क्षेत्रात एफडीआयला बंदी आहे. डीआयपीपीने आता सर्वच प्रकारच्या एफडीआयवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास फ्रंचाइजीचे परवाने, ट्रेड मार्क, ब्रँड नेम आणि प्रबंधन करार यातील एफडीआयवरही बंदी येईल. याचाच अर्थ, तंबाखू क्षेत्रात कोणत्याही प्रकारे एफडीआय येणार नाही.
.
======================================
.
.
'जोरदार मोदी'; शिवसेनेकडून मोदींचे कौतुक!
| |
-
| |
मुंबई - शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखातून "हिंदुस्थानचे पंतप्रधान जोरात असून जग पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर ते निघाले आहेत. त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!‘ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, "मोदी विदेश दौऱ्यावर आहेत व ते अमेरिकेत जाऊन काय करतात व बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मोदी यांच्या भाषणात जोर होता. हिंदुस्थानी लोकांना चांगले इंग्लिश बोलता येत नाही. हिंदुस्थानी मंडळी कसे गमतीदार उच्चार करतात, याच्या नकला अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार मि. ट्रम्प करीत होते, पण त्यांच्याच संसदेत हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांनी "भारतीय‘ इंग्रजीत भाषण केले व मोदी यांच्या भाषणास वाक्यागणिक टाळ्यांचा कडकडाट करून आणि उभे राहून सिनेट सदस्य त्यांना जोरदार प्रतिसाद देताना दिसत होते.‘
अमेरिकेन संसदेत मिळालेला प्रतिसाद मोदी यांच्या लोकप्रियतेची पावती असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच "परदेशात जातील तिथे मोदी यांचे अती जंगी स्वागत व शाही सोहळे साजरे होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर "मेरा देश बदल रहा है‘ या म्हणण्यावर माना डोलावल्या जात आहेत व जग आता हिंदुस्थानला मानसन्मान देत आहे. मोदी यांनी हे सर्व अथक परिश्रमाने घडवून आणले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हे पंतप्रधान मोदी यांचे चांगले दोस्त बनले आहेत.‘

हैदराबाद - अणु पुरवठादार गटाच्या सदस्यत्वासाठी अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली असतानाच आता आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे भारत आण्विक प्रकल्प तयार करण्याच्या विचारात असल्याची चर्चा पाकिस्तानमधील माध्यमात करण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशच्या अमरावती या नव्या राजधानीत कृष्णा नदीच्या काठी विधानसभेची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. ही इमारत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपपद्धतीने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे चीन, जपान आणि सिंगारपूरच्या टीमने अमरावतीचा दौरा केला आहे. या इमारतीच्या डिझाईनचे काम आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार कंपनी "मकी ऍण्ड असोसिएटस्‘ला देण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये भारत अमरावतीमध्ये अणु प्रकल्प उभा करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच तेथील माध्यमांमध्ये या अणुप्रकल्पासाठी भारताला अमेरिकेचे सहकार्य लाभणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील "प्राईम टाईम‘चर्चेत सहभागी झालेल्या काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे. दरम्यान असे वाद टाळण्यासाठी विधानसभा इमारतीला गोल घुमटाचा आकार देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
.
.
अमरावतीत आण्विक प्रकल्प?; पाकमध्ये चर्चा

'टोयोटा'तील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची संधी
| |
-
| |
टोकियो - कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयीन कामकाज यांचे योग्य संतुलन साधता यावे यासाठी जपानस्थित एक कंपनी "वर्क फ्रॉम होम‘ ही योजना राबविण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. या कंपनीने असा निर्णय घेतला तर नोकरदारांसाठी घरात बसून काम करण्याची अनोखी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
जपानस्थित "टोयोटा‘ ही वाहननिर्मिती करणारी कंपनी असा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. घरात बसून कर्मचाऱ्यांना कार्यालयातील कामकाज करता यावे यासाठी "टेलिकम्युट‘ प्रणालीचा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. "टोयोटो‘मधील किमान 25 हजार कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम‘ करण्याची संधी देण्याचा कंपनी विचार करत आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ऑगस्टपासून हा निर्णय कार्यान्वित करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात कंपनीकडून 72 हजार कर्मचाऱ्यांना या संधीचा फायदा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाला आणि पाल्यांना अधिक वेळ देता येणे शक्य होणार आहे. शिवाय महिलांना लग्न झाल्यानंतर, गरोदर किंवा बाळंतपणाच्या काळात काम सोडण्याची आवश्यकता पडणार नाही. शिवाय कर्मचाऱ्यांला वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठीही काम सोडावे लागणार नाही.

कर्वेनगर : घटस्फोटित प्रेयसीचा गळा चिरून खून
| |
-
| |
पुणे/वारजे माळवाडी : घटस्फोटित 35 वर्षे महिलेच्या विवाहित प्रियकराने तिचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. कर्वेनगर येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी भरत दुर्गे (वय 35, रा. सुतारदरा, कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. तिचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याने त्याने त्या रागात हे कृत्य केले. काल रात्री कोथरूडहून सिंहगड रोडला तिला तिच्या घरी सोडण्यास जात होता. मित्राच्या रिक्षातून जात असताना कर्वेंनगरला आल्यानंतर रिक्षात तिचा गळा चिरून खून केला.
या प्रकरणी भरत दुर्गे (वय 35, रा. सुतारदरा, कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. तिचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याने त्याने त्या रागात हे कृत्य केले. काल रात्री कोथरूडहून सिंहगड रोडला तिला तिच्या घरी सोडण्यास जात होता. मित्राच्या रिक्षातून जात असताना कर्वेंनगरला आल्यानंतर रिक्षात तिचा गळा चिरून खून केला.
.
======================================
इस्लामाबाद - अणुपुरवठादार गटात भारताला सामील करण्यासाठी अमेरिकेने भक्कम पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसाठी पाकिस्तान हा केवळ गरजेपुरता असल्याची टीका पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी केली आहे.
अमेरिकेने अणुपुरवठादार गटात सामील करण्यासाठी भारताला पाठिंबा दिल्यानंतर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकमधील विविध माध्यमांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नीतीचे कौतुक करण्यात येत असून ‘अशा प्रकारची नीती पाकिस्तान का वापरत नाही?‘ असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अणुपुरवठा गटात भारताचा समावेश केल्यास पाकिस्तान आपली चिंता अमेरिकेला कळवेल, तसेच यासंदर्भात येत्या 10 जून रोजी पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान एक उच्चस्तरीय बैठक असल्याचे अझीझ यांनी सांगितले.
अमेरिकेसाठी पाकिस्तान केवळ 'कामापुरता मामा'

'त्या'ने केली 'सेल्फी वुइथ डॉटर'साठी वेबसाईट
| |
-
| |
चंदीगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेल्फी वुईथ डॉटर‘ ही कल्पना समोर आणल्यानंतर वर्षभराने जिंद गावातील एका माजी सरपंचाने "सेल्फी वुईट डॉटर‘ नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाची क्षमता तब्बल 10 लाख सेल्फींची आहे.

सुनिल जागलन यांनी तयार केलेल्या http://selfiewithdaughter.world/ या संकेतस्थळाचे नुकतेच हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ही गोष्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि संकेतस्थळावर तेरा हजार जणांनी भेट दिली. दरम्यान केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनीही या संकेतस्थळाची लिंक सोशल मिडियावर शेअर केली. जागलन यांनी जून 2015 मध्ये "सेल्फी वुईथ डॉटर‘ ची स्पर्धा राबविली होती. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत पुढील महिनाभर ठेवण्यात आली होती. मात्र अद्यापही सेल्फी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. "या स्पर्धेची उत्सुकता प्रचंड वाढली आणि त्यामुळेच आतापर्यंत मला वर्षभरात आठ हजार सेल्फी मिळाल्या. त्यामध्ये भारताशिवाय भारताशिवाय, अमेरिका, जर्मनी आदी ठिकाणांहूनही सेल्फी मिळाल्याचे जागलन यांनी सांगितले. "लोकांनी मला फेसबुक पेजवर सेल्फी शेअर करण्याविषयी सुचविले. त्यातूनच या सर्व सेल्फीचे प्रदर्शन करणारे एक ऑनलाईन संग्रहालय तयार करावे म्हणून मी संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला‘, असेही ते म्हणाले.
संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करण्याची सुविधा असून ती प्रिंट करण्याचीही सोय आहे. सुरुवातीला तीन दिवस सेल्फी प्रिंट करताना त्याखाली आपोआप आरोग्य मंत्र्यांची स्वाक्षरी येणार असून त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींची स्वाक्षरी येणार आहे.

नाशिक - खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (एनडीए)च्या दीक्षान्त समारोहात आर स्कॉन या तुकडीच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मान नाशिकच्या ओंकार प्रमोद रुईकर याने मिळविला. लहानपणापासून लष्करात करिअर करण्याचे ध्येय मनात बाळगून ओंकारने सर्व्हिस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय), औरंगाबाद या संस्थेतून प्रशिक्षण घेत पहिल्या प्रयत्नात "एनडीए‘त प्रवेश मिळविला. तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता डेहराडून येथे प्रशिक्षण घेत सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून तो देशसेवाही करणार आहे.
लष्करात लेफ्टनंट पदावरून ओंकार करणार देशसेवा
| |
-
| |
ओंकारचे वडील प्रमोद रुईकर युनियन बॅंकेत नोकरी करतात; तर आई माधवी रुईकर या गृहिणी आहेत. बहीण तेजश्री हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या ती पुण्यात नोकरी करीत आहे. अगदी लहानपणापासून खेळात आवड असलेल्या ओंकारचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पेठे हायस्कूलमध्ये झाले. दहावीत तब्बल 95 टक्के गुण मिळविल्यानंतर विज्ञान शाखा किंवा अन्य कुठल्याही अभ्यासक्रमाची निवड न करता "एनडीए‘मध्येच करिअर करण्याचा दृढ निश्चय पूर्वीपासूनच होता. एसपीआय, औरंगाबाद या संस्थेत इयत्ता दहावीनंतर प्रवेश मिळविला. या संस्थेत प्रवेश मिळविणे तसे कठीणच. परंतु, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर त्याला प्रवेश मिळू शकला. इयत्ता बारावी 83 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्यानंतर ओंकारने सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळवत त्याने "एनडीए‘मध्ये प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करून दाखविले. येत्या 10 जुलैला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी ओंकार डेहराडून येथे जाणार असून, त्यानंतर सैन्यदलात लेफ्टनंटपदाची धुरा सांभाळणार आहे. ओंकारने ज्यूदो या खेळात राज्यस्तरावर सहभाग नोंदविला आहे. याशिवाय बास्केटबॉल, बॉक्सिंग आदी खेळांचीही त्याला आवड आहे.
======================================
चेन्नई - "इंडियन प्रीमियर लिग‘ क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे.
स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीएनपीएल आयोजित करण्यात येणार आहे. "या मागे (टीएनपीएल) दोन उद्देश आहेत. एक म्हणजे तमिळनाडूमधील खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे आयपीएल किंवा इतर कोणतीही टीम त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्यांचे भविष्य घडेल. दुसरे म्हणजे क्रिकेट हा केवळ शहरातील खेळ असून चेन्नईपुरताच मर्यादित असल्याचे समज दूर होऊन तमिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यांत क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल.‘, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सदस्य एन. श्रीनिवासन यांनी दिली.
'आयपीएल'प्रमाणेच तमिळनाडूमध्ये 'टीएनपीएल'

नवी दिल्ली - एका जागेसंदर्भातील प्रकरणाच्या संदर्भाने "आपणास शाळा आवश्यक आहेत की भारतीय जनता पक्षाची कार्यालये?‘ असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे भाजपवर टीका करत लिहिले आहे की, "दिल्लीतील शासकीय विद्यालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भारतीय जनता पक्षाची दोन कार्यालये उघडण्यात येणार आहेत का?‘ असे सांगत नायब राज्यपाल त्याबाबत आज निर्णय घेणार असल्याचेही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ‘आपल्याला जास्तीत जास्त शाळा हव्या आहेत की भाजप कार्यालये?‘ असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
राजधानी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि केजरीवाल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. जंग यांनी अलिकडेच परवाना रद्द झालेल्या एका स्वस्त धान्य दुकानाला परवाना बहाल करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने समिती स्थापन केल्याचे वृत्त आहे.
शाळा आवश्यक की भाजप कार्यालये- केजरीवाल
| |
- -

मुंबई - ‘यिन’च्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांचे अधिवेशनाच्या समारोपात आवाहन; गावे स्मार्ट करण्याचा संकल्प
मुंबई - विकासप्रक्रियेत नियोजनाचा दोष नसतो, तर अंमलबजावणीत अडचणी असतात. म्हणूनच तुमच्यासारखे कम्युनिकेटर असतील, तर सरकारच्या कामाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील इंटर्नशिपमध्ये ‘यिन’ सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या (यिन) अधिवेशनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे अध्यक्ष अभिजित पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्यालयात ‘यिन’ सदस्यांनी करावी इंटर्नशिप

No comments:
Post a Comment