Sunday, 19 June 2016

नमस्कार लाईव्ह १९-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- झिम्बाब्वेमध्ये भारतीय क्रिकेटपटूला अटक झालेली नाही 
२- कराची; पाकमध्येही 'उडता पंजाब'च्या प्रदर्शनासाठी संघर्ष 
३- पेशावर; युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'साठी पाककडून 30 कोटी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- शिवसेनेसोबतच्या युतीवरून भाजपात असंतोष 
५- ..म्हणून महिलांनी आतापर्यंत नाही उडवलं लष्कराचं विमान 
६- राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते - सुब्रमण्यम स्वामी 
७- 'भगवेकरण', 'संघवाद' देशासाठी चांगले - कथेरिया 
८- मोदींच्या पदवीचे गूढ वाढत आहे - केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- इफ चीट यू, आय विल क्लिन, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका 
१०- कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रीय, मराठवाड्याकडे वाटचाल 
११- गोरेगावातील शिवसेनेच्या कार्यक्रमस्थळी शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी 
१२- अहमदनगर पावसाला सुरूवात; भंडारदरा जोरदार तर नगरमध्ये रिमझिम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- एका तासात 481 सूर्यनमस्कार, सोलापूरच्या तरुणाचा विक्रम 
१४- नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड 
१५- पुण्यात बाळंतीणीची हत्या करुन 25 दिवसांच्या बाळाची चोरी 
१६- पुणे; 'तिच्या' दीर्घायुष्यासाठी 'त्याची' वटपौर्णिमा 
१७- बंगळूर; दुर्लक्षामुळे शस्त्रक्रियेदरम्यान बालक कोमात 
१८- पिंपरीत भरदिवसा एकाची दगडानं ठेचून हत्या, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- वनप्लस 3 मध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप्स 
२०- हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर फसवणुकीचा गुन्हा 
२१- 'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात 
२२- सलमानकडून 10 कोटींचं घर गिफ्ट, बिपाशाचं स्पष्टीकरण 
२३- नव्या सिनेमात परशासोबत 'ही' अभिनेत्री दिसणार 
२४- ...म्हणून सैराट बिगर मराठी प्रेक्षकांनाही आवडला 
२५- आता अनुरागचा 'हरामखोर' सेन्सॉरच्या कात्रीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=========================================

शिवसेनेसोबतच्या युतीवरून भाजपत असंतोष

शिवसेनेसोबतच्या युतीवरून भाजपत असंतोष
पुणे: शिवसेनेशी युती ठेवण्यावरुन भाजप प्रदेश कार्यकारणीत जोरदार खडाजंगी. निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नये असे मत यावेळी अनेकांनी मांडले.

विनोद तावडे यांनी शिवसेनेला 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर आगामी महापालिका-जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत  शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, यावर चर्चा सुरू झाली. यावेळी प्रदेश कार्यकारणीच्या सदस्यांनी आपली परखड मते मांडली.

मधु चव्हाण यांनी यावेळी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नका, असे मत मांडले. भाजपने स्वतंत्र निवडणुका लढाव्यात. आमच्या मनगटात तेवढे बळ आहे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. त्याला कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
=========================================

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रीय, मराठवाड्याकडे वाटचाल

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रीय, मराठवाड्याकडे वाटचाल
मुंबई : यंदा विदर्भामार्गे राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं आज आपली वाटचाल संपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेनं सुरु ठेवली आहे. आज संपूर्ण विदर्भ व्यापत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मान्सून सक्रीय झाला आहे.
आज सकाळी सातारा, सोलापूर या पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शिवाय विदर्भातील चंद्रपूर, वाशिम आणि परिसरात पावसाची रिमझिम सकाळपासून सुरु आहे.
गेल्या दहा वर्षात यंदा मान्सूननं आपला प्रवेशाचा मार्ग बदलत विदर्भातून प्रवेश केला. मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून मुसळधार बरसावं, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
=========================================

एका तासात 481 सूर्यनमस्कार, सोलापूरच्या तरुणाचा विक्रम

एका तासात 481 सूर्यनमस्कार, सोलापूरच्या तरुणाचा विक्रम
सोलापूर एका तासात तब्बल 481 सूर्यनमस्कार घालण्याची किमया सोलापूरच्या तरुणाने करून दाखवली आहे. स्वप्नील हरहरे अस या तरुणाच नाव असून त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

एका तासात 300 सूर्यनमस्कार घालण्याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. एका तासात सर्वाधिक सूर्यनमस्कार घालणारा हा आशिया खंडातील एकमेव तरुण ठरला आहे. स्वप्नील आता जागतिक विक्रम मोडण्याची तयारी करतो आहे.

सूर्यनमस्कार. शरीराचा सर्वांगसुंदर व्यायाम. लवचिकता आणी निरामय आरोग्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मनाला जातो आहे. सोलापूरचा स्वप्नील हरहरे सुद्धा हाच व्यायाम करतो. पण स्वप्नीलचा हा व्यायाम नव्या विक्रमासाठी होता. आज त्याने एका तासात तब्बल 481 सूर्यनमस्कार घातले. आशिया खंडात एका तासात सर्वाधिक सूर्यनमस्कार घालयचा विक्रम आज त्याच्या नावे झाला.

स्वप्नील वयाच्या सातव्या वर्षापासून योगाभ्यास करतोय. गेल्या चार महिन्यापासून सतत तो या विक्रमासाठी सराव करत होता. घरात रोज तीन तास सूर्यनमस्कारचा सराव तो करत होता. तीन तासात एक हजार सूर्यनमस्कारचा जागतिक रेकॉर्ड त्याला मोडायचा आहे.  सततचा सराव आणि कुटुंबीयांनी दिलेल सहकार्य यामुळे स्वप्नीलला हा विक्रम करण शक्य झाल.
=========================================

नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड

नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड
अहमदनगर : मुळा धरणातून अहमदनगरात एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज पुन्हा फुटली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

देहरे जवळ आज पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली. मनमाड महमार्गाजवळ पाण्याची जलवाहिनी फुटल्याने वाहतूक विस्कळीत झालीच, शिवाय लाखो लीटर पाणी वाया गेलं. सकाळी अकरा वाजता जलवाहिनीला भगदाड पडलं.

कालही नगरमधल्या मुळा धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देहरे गावाजवळ फुटली. वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा जोरात होता की रेल्वे ट्रॅकखालची वाळूही वाहून गेली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला.

जूनच्या महिना निम्मा संपला आहे, तरी पावसानं अद्याप पाठ फिरवल्यानं नगर जिल्हा भीषण दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात सलग दुसऱ्या दिवशी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. त्यामुळे दुष्काळाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे.
=========================================

पुण्यात बाळंतीणीची हत्या करुन 25 दिवसांच्या बाळाची चोरी

पुण्यात बाळंतीणीची हत्या करुन 25 दिवसांच्या बाळाची चोरी
पुणे : बाळचोरीच्या घटना ताज्या असतानाच आता एका आईची हत्या करुन तिच्या 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातल्या हडपसर परिसरात उघड झाली आहे.


या प्रकरणी तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळ आणि आरोपी महिला सध्या हडपसर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पुण्यात मुलं पळवणाऱ्या टोळींनी गेल्या अनेक दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. मात्र आता एका आईची हत्या करुन तिचं बाळ पळवण्यापर्यंत या टोळीची मजल गेल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.
=========================================
=========================================

वनप्लस 3 मध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप्स

वनप्लस 3 मध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप्स
नवी दिल्लीः वनप्लस 3 या नुकत्याच लाँच झालेल्या फोनविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनप्लस 3 मध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप मिळाली असल्याचं एका वापरकर्त्यांने सांगितलं आहे.


वनप्लस 3 हा फोन जास्त फीचर्स आणि कमी किंमतीसाठी ओळखला जात आहे. मात्र कोणी कल्पनाही केली नसेल असा प्रकार एका ग्राहकासोबत घडला आहे, अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.


फोन खरेदी केल्यानंतर एका वापरकर्त्याने या फोनमध्ये प्री लोडेड पॉर्न क्लिप असल्याचं रेडिट या सोशल साईटवरुन सांगितलं आहे. मात्र वापरकर्त्यांने अजबच तक्रार केली आहे. या फोनमध्ये पॉर्न क्लिप दिल्या याला आक्षेप नाही, तर त्या एचडी मध्ये नाही दिल्या, या गोष्टीवर वापरकर्त्याने आक्षेप घेतला आहे.


फोनमध्ये कंपनीकडूनच पॉर्न क्लिप कशा येऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होताच, वापरकर्त्यांने केलेल्या या अजब तक्रारीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
=========================================

हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर फसवणुकीचा गुन्हा

हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर फसवणुकीचा गुन्हा
पणजी : बॉलिवूडस्टार हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी, सुप्रसिद्ध डिझायनर सुझान खानविरोधात पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुझान खान अडचणीत आली आहे.

एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मच्या तक्रारीनुसार सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती आहे.

उत्तर गोवातील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाऱ्या नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता. करारात नमूद केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, असंही गुप्तांनी सांगितलं. सुझान खानकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
=========================================

इफ चीट यू, आय विल क्लिन, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

इफ चीट यू, आय विल क्लिन, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
परळी : मुख्यमंत्र्यांनी सर्वच वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना एकदम क्लीन चीट देवून अशा काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. राज्याचा कारभार सध्या ‘इफ चीट यू, आय विल क्लीन यू ‘ असा सुरु असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीत केला.  परळी-वैजनाथ बँकेच्या निवडणूकीसाठी आज मतदानासाठी ते आज आले होते.
तसेच यावरून अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्यचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लीन चीट दिली. खडसेंना राजीनामा देण्यास सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदम त्यांच्यासह सर्वांनाच क्लीन चीट दिली, हे न कळण्यासारखे असल्याचा आरोपही मुंडे यांनी सरकारवर केला.
=========================================

'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात

'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
मुंबई : सैराट चित्रपटाने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांना याड लावलं आहे. अगदी सातासमुद्रापारही सैराट सिनेमाची दखल घेण्यात आली आहे. मात्र या सिनेमाची कथा आपल्या कादंबरीवरुन चोरल्याचा दावा कादंबरीकार नाथ माने यांनी केला आहे.

‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीवरुन नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा ढापल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.

माने सध्या कामोठे परिसरात राहत असून मूळ साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. 2010 मध्ये त्यांनी ‘बोभाटा’ कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.

नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला आहे. मात्र वारंवार इमेलद्वारे संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावल्याचं म्हटलं आहे.
=========================================

सलमानकडून 10 कोटींचं घर गिफ्ट, बिपाशाचं स्पष्टीकरण

सलमानकडून 10 कोटींचं घर गिफ्ट, बिपाशाचं स्पष्टीकरण
मुंबई : नुकतीच विवाहबंधनात अडकलेली बॉलिवू़ड अभिनेत्री बिपाशा बासू आणि सलमान खान यांचा घरोबा सर्वांनाच माहित आहे. याच मैत्रीतून सलमानने बिपाशाला 10 कोटींचं घर गिफ्ट केल्याच्या अफवा फेर धरु लागल्या. मात्र यावर चिडलेल्या बिपाशाने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

सलमान खानने आपल्याला कोणतंही घर गिफ्ट केलेलं नाही, असं बिपाशाने स्पष्ट केलं आहे. ‘आतापर्यंत मी वाचलेली ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मी कधीतरी कोणाकडून अशाप्रकारचं गिफ्ट का घेईन?’ असा संतप्त सवाल करत बिपाशाने चिडलेला इमोट आयकॉन पोस्ट केला आहे.
=========================================

..म्हणून महिलांनी आतापर्यंत नाही उडवलं लष्कराचं विमान

..म्हणून महिलांनी आतापर्यंत नाही उडवलं लष्कराचं विमान
नवी दिल्लीः भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवण्याचा मान महिलांना मिळाला आहे. भावना कांथ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यांनी पहिल्यांदाच वायू सेनेचं विमान उडवून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.
लष्करामध्ये महिलांना प्रवेश 90 च्या दशकामध्येच देण्यात आला मात्र, महिलांना मर्यादित कालावधीसाठी सेवेत घेतलं जात असे. तसंच महिलांचा लष्करातील समावेश केवळ प्रशासकिय पातळीवरील असल्यामुळे महिलांना आतापर्यंत लष्कराचं विमान उडवण्याची संधी मिळाली नव्हती.
सेनेच्या तिन्ही दलांमध्ये साल 2011 पर्यंत महिलांना केवळ प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सेवांसाठीच संधी होती. मात्र 2014 सालानंतर पंतप्रधाव नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे महिलांना लष्करामध्ये लढाऊ सैनिकाच्या स्वरुपात स्थान देण्यात आलं.

=========================================

नव्या सिनेमात परशासोबत 'ही' अभिनेत्री दिसणार

नव्या सिनेमात परशासोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
फोटो सौजन्यः फेसबुक
मुंबईः ‘सैराट’ चा सुपरस्टार आकाश ठोसर म्हणजेच परशा सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘फु’ या सिनेमात काम करत आहे, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र या सिनेमात त्याची अभिनेत्री कोण असेल, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

=========================================

झिम्बाब्वेमध्ये भारतीय क्रिकेटपटूला अटक झालेली नाही


  •  ऑनलाइन लोकमत 
    हरारे, दि. १९ - झिम्बाब्वेमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय क्रिकेटपटूला अटक झाल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. एएनआयने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला अटक झाली नसल्याचे म्हटले आहे. 
    मालिकेच्या प्रायोजकाशी संबंधित असणा-या भारतीय नागरिकाला अटक झाली आहे. आरोपीने बलात्काराचा आरोप फेटाळला असून, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणीसाठीही तयार असल्याचे म्हटले आहे. 
    भारतीय क्रिकेटपटू यामध्ये सहभागी असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. झिम्बाब्वेमधील भारतीय राजदूत या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. 
    झिम्बाब्वेच्या प्रसारमाध्यमांनी बलात्काराच्या आरोपाखाली एका क्रिकेटपटूला अटक झाल्याचे वृत्त दिल्यानंतर एकच वादळ निर्माण झाले होते. झिम्बाब्वेतील भारताच्या राजदूतांनी या क्रिकेटपटूची अटक रोखण्याचा प्रयत्न केला, असे वृत्तात म्हटले होते. 
=========================================

...म्हणून सैराट बिगर मराठी प्रेक्षकांनाही आवडला


  • ऑनलाइन लोकमत 
    सैराटच्या आधी कुठल्या मराठी चित्रपटाची इंग्रजी माध्यमांनी इतकी दखल घेतली होती ? कुठला शेवटचा मराठी चित्रपट आहे ज्याचा खेळ मध्यरात्री तीन वाजता चित्रपटगृहात दाखवला होता ? कुठला मराठी चित्रपट आहे ज्याचा दुबईमध्ये विशेष खेळ झाला ? या सर्वप्रश्नांचे उत्तर एकच आहे सैराट. 
    सलग सहा आठवडे चित्रपटगृहात रहाणारा हा चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर, बिगर मराठी प्रेक्षकांनाही मोठया प्रमाणात पसंत पडला आहे. सैराटने भाषेची वेस केव्हाच ओलांडली असून, सैराट आता दक्षिणेतील चार भाषामध्ये बनणार असल्याची माहिती आहे. मराठीसह अन्य भाषिक प्रेक्षकांनाही हा चित्रपट इतका का आवडला असावा ? याची कारणे चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दडली आहेत. 
    सैराटच्या सादरीकरणामध्ये त्याचे यश दडले आहे. याचे श्रेय दिग्दर्शकाला जाते. सैराट म्हणजे फक्त दोन किशोरवयीन तरुण-तरुणीची प्रेमकथा नाही. जातीसंघर्षाच्या पलीकडे जाणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांची निवड हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. चित्रपटातील सर्व पात्र विश्वसनीय आणि वास्तववादी वाटतात. 
    परश्या-अर्चीबरोबर असणा-या त्यांच्या मित्रांनी अभिनय कुठे ओढून ताणून केला आहे असे वाटत नाही. त्यांच्या भूमिका ख-याखु-या मनाला भिडणा-या वाटतात. प्रेमकथेमध्ये नवीन चेहरे असतील तर, त्यांच्यातील निरागसता लोकांना जास्त आवडते. सैराट फक्त नवीन चेह-यांमुळेच नव्हे तर, त्यांच्या जबरदस्त अभियनामुळे प्रेक्षकांना जास्त पसंत पडतो. या चित्रपटात प्रेक्षक कलाकारांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतात. 
    चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक कलाकाराचे काम त्यांच्या लक्षात रहाते हा विशेष गुण आहे. अर्चीचा बिनधास्तपणा आणि परश्याचा लाजाळूपणाही प्रेक्षकांना आवडला आहे. दिग्दर्शकाने चित्रपट बनवताना काळसुसंगतीचे जे भान दाखवले आहे त्यामुळेही हा चित्रपट अन्य भाषिक प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो. 
=========================================

मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकणात पावसाच्या सरी


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १९ - कोकणऐवजी विदर्भाच्या वाटेने महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून मध्य अरबी समुद्रातून पुढे सरकला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार कोकणात हरणीत सात सेमी, देवगडमध्ये सहा सेमी, कानाकोना तीन मार्मगोवामध्ये पाच सेमी पावसाची नोंद झाली आहे. 
    सोलापूरमध्ये ३.२ सेमी आणि सांगलीत ६.४ सेमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि परभणीमध्येही काही भागात पाऊस झाला आहे. कोकण, गोव्यामध्ये पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
=========================================

राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते - सुब्रमण्यम स्वामी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १९ - भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून रघुराम राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते असा गंभीर स्वरुपाचा आरोप राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. राजन यांच्यावर आरोप करण्याची स्वामींची ही पहिली वेळ नाही. 
    यापूर्वीही स्वामींनी राजन यांना आरबीआय गव्हर्नरपदावरुन हटवण्याची मागणी केली होती. राजन यांच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. राजन छोटे आणि मध्यम उद्योग बंद करण्याच्या मागे लागले होते असा आरोप स्वामींनी केला आहे. 
    रघुराम राजन यांनी गर्व्हनरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोशल मिडीयामधून मोदी सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. 
=========================================

आता अनुरागचा 'हरामखोर' सेन्सॉरच्या कात्रीत


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १९ - 'उडता पंजाब' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन निर्माण झालेला वादाचा धुरळा आता कुठे खाली बसत असताना अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेल्या 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. 
    सेन्सॉरने चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटामध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षकाचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. अनुराग फिल्म सर्टीफिकेशन  न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे.  
    समाजात शिक्षकाला आदराचे स्थान आहे आणि चित्रपटात विद्यार्थिनी आणि शिक्षकामध्ये संबंध दाखवले आहेत त्या आधारावर सेन्सॉरने प्रमाणपत्र द्यायला नकार दिला आहे. श्लोक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गुजरातमधील एका छोटया शहरात कथानक घडते. शिक्षक आणि किशोरवयीन विद्यार्थिनीमधील प्रेमकथा यात दाखवण्यात आली आहे. 
=========================================
'तिच्या' दीर्घायुष्यासाठी 'त्याची' वटपौर्णिमा


अतुल करतोय दीप्तीसाठी पाच वर्षांपासून वडपूजन 

पुणे - आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना पाहावयास मिळते; पण हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून "तो‘ वडाची पूजा करतोय. असा सत्यवान दुर्मिळच; पण असा एक सत्यवान गेल्या पाच वर्षांपासून वडाची पूजा करीत आहे. अतुल सातपुते असे त्याचे नाव.

व्यवसायाने अभियंता असलेला अतुल दीप्तीसाठी वटपौर्णिमेला वडाचे पूजन करतो. अतुल व दीप्ती हे दोघे मूळचे कोल्हापूरचे. दोघांच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध. अभियांत्रिकीचे अध्ययन करण्यासाठी अतुल आणि कलाशाखेची पदवी घेण्यासाठी दीप्ती सांगलीला राहायला होते. महाविद्यालयीन जीवनात दोघांची घट्ट मैत्री जमली. एकमेकांची मने जुळली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेत दोघेही विवाहबद्ध झाले. दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या लग्नास सहमती दिली.

कालांतराने दोघेही नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. वैवाहिक जीवनातले निर्णय दीप्ती व अतुल दोघे मिळून घेतात. एकमेकांच्या साथीने दोघेही "जीवनाच्या सप्तपदी‘ वरून चालत आहेत. लग्न झाल्यापासून प्रत्येक वटपौर्णिमेला दीप्तीसोबत अतुलसुद्धा वटसावित्रीची पूजा करतो. या दिवशी पारंपरिक वेशभूषा परिधान करून "जन्मोजन्मी हीच पत्नी‘ मिळावी, अशी प्रार्थना करतो. प्रत्येक निर्णय जेव्हा अर्धांगिनीसोबत घ्यायचा असेल तर वटसावित्रीचे पूजन दोघांनी करायला काय हरकत आहे, अशी या दाम्पत्याची भावना आहे.

याबाबत अतुल म्हणाले, ‘दीप्तीने मला पावलोपावली साथ दिली. दीप्तीसोबत वटसावित्रीचे पूजन करण्याचा माझा निर्णय कुटुंबीयांनाही आवडला. मित्रांनी तर खूप कौतुक केले. पहिल्यावेळेस मी पूजन केले, तेव्हा थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. माझी भूमिका जेव्हा इतर महिलांना मी व दीप्तीने सांगितली, तेव्हा त्यांनीही कौतुक केले.‘‘

दीप्ती म्हणाल्या, ‘आम्ही दोघेही उच्चशिक्षित आहोत. सहजीवनात प्रत्येक पावलावर आम्ही एकमेकांना समान वागणूक देतो. म्हणून आम्ही एक आहोत. हीच आमची भावना आहे.‘‘
=========================================
पाकमध्येही 'उडता पंजाब'च्या प्रदर्शनासाठी संघर्ष

कराची - सेन्सॉर बोर्डासोबत झालेल्या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेला "उडता पंजाब‘ अखेर 17 जूनला भारतात प्रदर्शित झाल्यानंतर आता पाकिस्तानमध्येही या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानच्या सिंध येथील सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी हा चित्रपट पाहिला असून वितरकांना त्यात काही बदल करण्यास सांगितल्याचे वृत्त एका स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. "आम्ही वितरकांना सेन्सॉर बोर्डाच्या कायद्याचे उल्लंघन होत असलेली चित्रपटातील वाईट भाषा, अतिशय स्पष्ट शब्दातील शिव्या काढून टाकण्यास सांगितल्या आहेत. हे बदल झाले आहेत की नाहीत याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाला प्रमाणपत्र देणार आहोत‘, असे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान "उडता पंजाब‘च्या पाकिस्तानमधील प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही.

भारतातील सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्‍ये वगळण्याची सूचना केल्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने किरकोळ बदल करण्याचे निर्देश देत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्याने 17 जून रोजी चित्रपट प्रदर्शित झाला.

=========================================
दुर्लक्षामुळे शस्त्रक्रियेदरम्यान बालक कोमात

बंगळूर - शस्त्रक्रियेदरम्यान पाच वर्षाचा बालक कोमात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पीडित मुलाच्या कुटुंबियांना वैद्यकीय दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.

येथील लक्ष्य पी. नावाच्या विद्यार्थ्याच्या दोन बोटांना 10 जून रोजी शाळेतील बाकावर खेळत असताना गंभीर जखम झाली. डॉक्‍टरांनी लक्ष्यला मल्ल्या रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्या पालकांना कळविले. पालक रुग्णालयात आल्यानंतर मुलाच्या दोन बोटांपैकी किमान एक बोट तरी कार्यरत राहायला हवे आणि दुसऱ्या एका बोटावर प्लास्टिक सर्जरी करणे आवश्‍यक असल्याचे एका महिला डॉक्‍टरने सांगितले. तसेच त्यासाठी 60 हजार रुपये भरण्यास सांगितले, अशी माहिती लक्ष्यचे वडिल पुरुषोत्तम यांनी दिली. मात्र एवढे पैसेजवळ पुरुषोत्तम यांनी शस्त्रक्रियेपूर्वी तातडीने 25 हजार रुपये जमा केले.

मात्र शस्त्रक्रियेनंतर लक्ष्यला ऑक्‍सिजन पुरविला नसल्याने त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना धोका असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसेच लक्ष्यला हृदयाचा विकार असल्याचे सांगितले. "हे ऐकून आम्हाला धक्का बसला. रुग्णालयाने आम्हाला लक्ष्यला मणिपाल रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर नऊ दिवसांपासून लक्ष्य कोमामध्ये गेला आहे. मल्ल्या रुग्णालयाने माझ्या मुलाविषयी त्यानंतर काहीही चौकशी केली नाही‘, असे पुरुषोत्तम यांनी सांगितले.
=========================================
"युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'साठी पाककडून 30 कोटी

पेशावर - "युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका मदरसास पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वां प्रांतामधील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा अर्थनिधी मंजूर केला आहे. या मदरसामध्ये तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला ओमर याच्यासहित इतर अनेक अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी शिक्षण घेतले आहे. ओमर याला या मदरसाकडून मानद डॉक्‍टरेटही देण्यात आली आहे.

""दारुल उलूम हक्कानिया नौशेरा मदरसास 30 कोटी रुपयांचा अर्थनिधी मंजूर करताना मला अभिमान वाटतो,‘‘ असे या प्रांतामधील मंत्री शाह फरमान यांनी सांगितले. या प्रांतामधील इतर मशिदी व मदरसांनाही सरकारकडून निधी पुरविण्यात येत आहे. तेहरिक-इ-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार या प्रांतामध्ये आहे. धार्मिक संस्थांवर छापे न मारता त्यांना आर्थिक मदत देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे फरमान यांनी स्पष्ट केले. 
=========================================
'भगवेकरण', 'संघवाद' देशासाठी चांगले - कथेरिया

नवी दिल्ली - ‘भगवेकरण‘, "संघवाद‘ हे देशासाठी चांगले असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री राम शंकर कथेरिया यांनी केले आहे.

कथेरिया हे भारतीय जनता पक्षाचे आग्रा येथील खासदार आहेत. "आपल्या मुलांनी जर महाराणा प्रताप यांच्याबद्दल वाचायचे नाही तर काय चंगेज खान यांच्याबद्दल वाचायचे का?‘, अशा प्रश्‍न त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. तसेच "आपण दीर्घकाळापासून शांत राहिलो असून कोणावरही आरोप केलेले नाहीत. मात्र आता ती वेळ आली आहे. आज आपण असा अभ्यासक्रम तयार करायला हवा की ज्यामुळे संपूर्ण जगात आपल्या देशाच सन्मान वाढला पाहिजे‘, असेही ते पुढे म्हणाले.

कथेरिया यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण माहौर यांच्या हत्येनंतर कथेरिया यांनी एका विशिष्ट समुदायाला आपली शक्ती दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य मार्चमध्ये केले होते.
=========================================
मोदींच्या पदवीचे गूढ वाढत आहे - केजरीवाल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कला शाखेतील पदवीबाबत माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास दिल्ली विद्यापीठाने नकार दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीचे गूढ आणखी वाढत असल्याचा म्हणत सरकारवर टीका केली आहे.

मोदी यांच्या पदवीबाबत दिल्ली विद्यापीठाला एका वकिलाने विचारलेल्या प्रश्‍नाची उत्तरे देता येत नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. ‘दिल्ली विद्यापीठातील संबंधित विद्यार्थ्याची माहिती ही खाजगी असून ती सार्वजनिक करण्याचा आणि जनहिताचा काहीही संबंध नाही‘, असे विद्यापीठाने कळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी मोदींच्या पदवीबाबतचे गूढ आणखी वाढत जात असल्याचे म्हटले आहे. तसेच विद्यापीठाने माहिती नाकारल्याबाबत ते म्हणाले, ‘पण का? अमित शहा आणि जेटलीजी म्हटले नाहीत का की ही पदवी खरी आहे आणि कोणीही ती दिल्ली विद्यापीठातून घेऊ शकतो?‘ असा प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
=========================================

No comments: