[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; अमेरिकेत काम करणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येत वाढ
२- वॉशिंग्टन; 'गन कंट्रोल'चा प्रस्ताव अमेरिकन सिनेटने फेटाळला
३- ट्विटरवरील सुमारे 60टक्के लिंक्स दुर्लक्षितच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- राजन यांचा वारसदार ठरवण्यासाठी समिती नाही
५- संरक्षण क्षेत्रात एफडीआय,काळजी वाटते:शरद पवार
६- पाणी गैरव्यवहार:केजरीवाल, दीक्षितांची चौकशी
७- उपोषणादरम्यान भाजप खासदाराने केली योगासने
८- आता कर चुकविणाऱ्यांचे पॅनकार्ड होणार ब्लॉक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक संपला, दरड हटवली, वाहतूक धीम्या गतीने
१०- मुंबई; आंदोलक टॅक्सीचालकांची मुजोरी, माध्यमांच्या वाहनांची तोडफोड
११- येवला; भुजबळांच्या सुटकेसाठी ५१ जोडप्यांचे नागेश्वराला साकडे
१२- मुंबई; ..तर २६ जुलैपासून टॅक्सी-रिक्षा बेमुदत बंद
१३- राज्य बॅंकेला पीक कर्जापोटी 2000 कोटींची हमी - राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई लोकल; दिवा स्टेशनवर तुफान गर्दी
१५- बीडः वैद्यनाथ बँक निवडणूकीत पंकजा मुंडेंचा विजय निश्चित
१६- नागपूर; महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण
१७- रखडलेल्या लोकलच्या लगेज डब्यात महिलेची प्रसुती
१८- माटुंगा; वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणारा हिरे व्यापारी गजाआड
१९- कोल्हापूरमध्ये तरुणीचा भोसकून खून
२०- धुळे; वीज कोसळून २ शेतक-यांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?
२२- दीक्षांत सोहळयात हवाई दलाचे थरारक कौशल्य - पहा व्हिडीओ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=====================================

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक संपला, दरड हटवली, वाहतूक धीम्या गतीने
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-डोंबिवली दरम्यान असणाऱ्या पारसिक बोगद्याजवळ गेल्या साडेपाच तासांपासून सुरु असलेलं दरड हटवण्याचं काम अखेर संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मेगाब्लॉक संपला असून, मध्य रेल्वेवरील वाहतूक आता धीम्या गतीने सुरु झाली आहे.
मेगाब्लॉकमुळे ठाण्यापासून कर्जतपर्यंत सर्व गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरु होती. जवळपास साडेपाच तासांपासून दरड हटवण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, अखेर दरड हटवण्यात यश आलं आहे.
पारसिक बोगद्याजवळचे मोठे दगड पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. लोकलच्या दारात उभे असणाऱ्या प्रवाशांना बोगद्यावरच्या दरडीमुळे कायमच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बोगद्यावरच्या दरडीसाठी कोणतीही संरक्षक जाळी अथवा अन्य उपाययोजना नाहीत. त्यामुळे अचानक जाग आलेल्या रेल्वे प्रशासनानं दरड हटवण्याचं काम सुरू केलं होतं. याचा फटका आता प्रवाशांना बसला.
=====================================
मुंबई लोकल LIVE: दिवा स्टेशनवर तुफान गर्दी
मुंबई: मुंबईतला पाऊस थांबून आता सात ते आठ उलटले आहेत. मात्र, विस्कटलेली लोकल अद्यापही रुळावर येऊ शकलेली नाही. लांब पल्ल्याची लोकल अंदाजे तासाभराच्या अंतरानं येत असल्यानं दिवा स्थानकावर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही.
दिव्याबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, दादरसह पश्चिम आणि हार्बरवरच्या काही रेल्वे स्थानकांवरही हीच परिस्थिती आहे.
काही वेळापूर्वी संतप्त झालेल्या दिवाकरांनी रेल्वे रुळावर ठाण मांडत एक्स्प्रेस रोखण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर टिटवाळ्यातही याची पुनरावृत्ती करण्यात आली. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत लोकांना बाजूला हटवलं. पण खोळंब्यापासून अद्यापही लोकांची सुटका झालेली नाही.
मुंबईत मान्सूनचं आगमन होऊन दोन दिवस झाले आहेत. त्यात आज पहाटेच पहिला मोठा पाऊस झाला आणि या एका पावसातच मुंबई लोकलचे पुन्हा तीन तेरा झालेले पाहायला मिळत आहेत.
=====================================
बीडः वैद्यनाथ बँक निवडणूकीत पंकजा मुंडेंचा विजय निश्चित
बीडः राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना हाबाडा देत पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेवर झेंडा फडकवला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार आघाडीवर आहेत.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पॅनलमधील उमेदवारांना फक्त 25 टक्के मतदान झालं आहे. तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनलाला 75 टक्के मतदान झालं आहे.
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत बीडच्या खासदार प्रितम मुंडेंना सर्वाधिक मत मिळाली आहेत. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी बाजी मारत धनंजय मुंडेंना धूळ चारली आहे.

महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण
नागपूर : नागपूरमध्ये एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका शूज स्टोअरच्या मॅनेजरला पोलिस कॉन्स्टेबल कविता यादवने मारहाण केली.
कविता यादवचा भाऊ पवन हा मोंटिना शूज स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून काम करतो. मात्र दुकानाचा मॅनेजर जयेंद्र गोगादे याने तिच्या भावाला काम व्यवस्थित का करत नाहीस, असा जाब विचारला.
पण मॅनेजर भावाला ओरडल्याचा राग आल्याने कविताने भरदिवसा दुकानात जाऊन त्याला मारहाण केली. कविताने जयेंद्रला थोबाडीत मारलं. इतकंच नाही तर त्याला दुकानातून ओढत पोलिस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला.
दुकानाच्या मॅनेजरने घडलेल्या प्रकाराबद्दल सीताबर्डी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
=====================================
आंदोलक टॅक्सीचालकांची मुजोरी, माध्यमांच्या वाहनांची तोडफोड
मुंबई: ओला आणि उबर मालकांविरोधात टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागलं आहे. आझाद मैदानावरील आंदोलनात टॅक्सी चालकांनी कायदा हातात घेतला आणि माध्यमांच्या दोन वाहनांची तोडफोड केली आहे.
ओला, उबर टॅक्सींविरोधात टॅक्सीचालकांनी आझाद मैदानावर सकाळपासून आंदोलन सुरु केलंय. सुमारे 1 हजार टॅक्सीचालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मात्र उबेर आणि ओलाविरोधात संताप व्यक्त करताना टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय. आंदोलकांनी प्रसार माध्यमांच्या दोन गाड्यांची तोडफोड केलीय. उबर आणि ओलाच्या गाड्या आहेत असं समजून ही तोडफोड करण्यात आली आहे.
मुंबईत चालणाऱ्या खासगी टॅक्सींमुळे आपल्या रोजगारावर गदा येत असल्याचं टॅक्सी चालकांनी संप पुकारलाय. अनेक टॅक्सी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्यात.
=====================================
व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?
मुंबई/सोलापूर: सैराट सिनेमामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकू राजगुरू अर्थात आर्चीचं नाव शाळेच्या पटावरुन काढण्याचा इशारा दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र शाळेने असा कोणताही इशारा, नोटीस दिली नसल्याची माहिती, रिंकूच्या वडिलांनी दिली.
=====================================
रखडलेल्या लोकलच्या लगेज डब्यात महिलेची प्रसुती
मुंबई : पहिल्या पावसानंतर सुखावलेल्या मुंबईकरांची लोकलने मात्र दाणादाण उडवली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल विस्कळीत असतानाच, रखडलेल्या लोकलमध्येच एका महिलेची प्रसुती झाली.
मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप स्टेशनजवळ लोकलच्या डब्यात गुडीया प्रमोद गुप्ता यांनी बाळाला जन्म दिला. गुडीया गुप्ता या दिव्याहून सीएसटीला जात होत्या. मात्र आज सकाळपासूनच लोकची दैना उडाली. लोकल रखडली असल्यामुळे गुडीया यांना दवाखान्यात जाता आलं नाही. त्यामुळे लोकलच्या लगेज डब्यात प्रसुत होण्याची वेळ ओढावली.
सध्या या महिलेला सावित्रीबाई प्रसुती गृहात दाखल करण्यात आले आहे.
=====================================
रखडलेल्या लोकलमध्ये माणुसकीचं दर्शन, पुरूषांनी केली महिलेची प्रसूती
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 21 - थोड्याशा पावसाचा फटका बसून मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा रखडल्याने मुंबईकरांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक प्रवासी गाडीत व स्टेशनवर अडकून पडले. मात्र त्यातही मुंबईकरांची माणुसकी जिवंत असल्याचे एका उदाहरण म्हणजे, रखडलेल्या लोकलमध्ये पुरूषांनी एका महिलेची प्रसूती केली. दिवा येथे राहणा-या गुडिया प्रमोद गुप्ता या मंगळवारी सकाळी जे जे रुग्णालयात जात होत्या, मात्र त्यांनी भांडुप रेल्वे स्थानकात लोकलमध्येच एका गोंडस मुलीला जन्म दिला.गुडिया प्रमोद गुप्ता यांची आज जे जे रुग्णालयात तारीख असल्याने त्या सीएसटीला चालल्या होत्या. मात्र सकाळपासूनच विस्कळीत असलेल्या मध्य रेल्वेचा फटका त्यांना बसला. सकाळपासून खूप वेळ लोकलची वाट पाहत त्या दिवा स्थानकावर उभ्या होत्या. मात्र गर्दीमुळे त्यांना कोणत्याच गाडीत चढता आले नाही. अखेर दिवा येथून सीएसटीच्या दिशेने जाणा-या लेडिज स्पेशल गाडीत चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र प्रचंड गर्डीमुळे त्यांना लेडीज डब्यात चढता आले नाही. तसेच काही डब्यात पुरूषांनी जागा अडवली होती. अखेर त्या माल डब्यात चढल्या. मात्र लोकल मुलुंड ते भांडूपदरम्यान पोहोचली असताना कळा वाढल्याने तेथील पुरूषांनीच त्यांची प्रसूती केली व गुडिया गुप्ता यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ व आईची प्रकृती स्थिर असून दोघांनाही भांडूपच्या सावित्रीबाई रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.
=====================================
भुजबळांच्या सुटकेसाठी ५१ जोडप्यांचे नागेश्वराला साकडे
- ऑनलाइन लोकमतयेवला, दि. २१ - माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांची तुरूंगातून सुटका व्हावी, यासाठी तालुक्यातील अंगुलगाव येथील ५१ जोडप्यांनी नागेश्वराला साकडे घालत होम हवन केले. बहुजनाचा पोशिंदा आमदार छगन भुजबळ आहे अशी भावना नागेश्वराजवळ व्यक्त करीत त्यांची तुरूंगातून सुटका व्हावी अशी प्रार्थना केली. यावेळी ज्ञानेश्वर जगझाप,सुभाष जगझाप,दीपक जेजुरकर,बाळू जगझाप, सुदाम बटवल,यांचेसह ग्रामस्थांनी ही प्रार्थना केली.बारामतीनंतर येवला हे विकासाचं मॉडेल बनावं यासाठी भुजबळांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद, पर्यटनमंत्री, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातलं ज्येष्ठत्व, सारी ताकद पणाला लावली. त्यातून येवल्याचा बदललेला चेहरा सर्वांच्या पुढ्यात असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
=====================================
..तर २६ जुलैपासून टॅक्सी-रिक्षा बेमुदत बंद
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ - ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीसेवांना येत्या २६ जुलैपर्यंत कायद्याच्या कक्षेत आणले नाही तर, मुंबईच्या रस्त्यावर एकही टॅक्सी आणि रिक्षा धावणार नाही. २६ जुलैपासून बेमुदत बंद पुकारू असा इशारा जय भगवान टॅक्सी-रिक्षा चालक मालक महासंघाने दिला आहे. जयभगवान टॅक्सी चालक मालक सेनेने आज आझाद मैदानात आंदोलन केले. यामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालक सहभागी झाले होते.आंदोलनाला हिंसक वळणजयभगवान महासंघाच्या आंदोलनाला यावेळी हिंसक वळण लागले. काही आंदोलकांनी इंडिया टीव्ही आणि झी मिडीयाची गाडी फोडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी सिराज वारीस (३०), रामचंद्र राय (३३), अब्दुल वहाब शेख (३०), अजय जैस्वाल (३०), अनिलकुमार गौर (३४), परमेश्वर जाधव (३०) आणि इम्तियाज खान (४३) या सात जणांना अटक केली आहे. जयभगवान महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी प्रसारमाध्यमांवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हल्ला करणारे संघटनेचे कार्यकर्ते नसल्याचा त्यांचा दावा आहे.
=====================================
दीक्षांत सोहळयात हवाई दलाचे थरारक कौशल्य - पहा व्हिडीओ
=====================================
वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणारा हिरे व्यापारी गजाआड
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ - परदेशातील नातेवाईकांची खोटी ओळख दाखवून वृद्ध मुंबईकरांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या डायमंड व्यापा-याला मुंबई पोलिसांनी अटक केली. सुनील प्रेमजी पुजारा (५०) असे अटक केलेल्या व्यापा-याचे नाव असून तो गेल्या १२ ते १५ वर्षापासून तो वृद्धांची फसवणूक करत आहेत. ११ वर्षापूर्वी माटुंगा पोलिसांनी फसवणुकीच्या गुह्यांत त्याला अटक केली होती.मुंबईत एकट्या राहत असलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या परदेशात राहत असलेल्या नातेवाईकांची ओळख दाखवून तो त्यांना लुटत असे.
=====================================
राजन यांचा वारसदार ठरवण्यासाठी समिती नाही
- हरीश गुप्ता, नवी दिल्लीरिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वारसदाराची निवड करण्यासाठी कोणत्याही समितीची स्थापना केली जाणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.नव्या गव्हर्नरची घोषणा वेळेपूर्वीच केली जाईल. त्याबाबत आम्हाला कोणतेही तर्कवितर्क नको आहेत. निवडीची प्रक्रिया याआधीच सुरू करण्यात आली असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सोमवारी सांगितले. राजन यांनी आपल्याला दुसरी टर्म नको असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले आहे. त्यांची कारकीर्द ४ सप्टेंबर रोजी संपत आहे. राजन यांनी कार्यकाळ पूर्ण करताच अध्यापनाकडे वळणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला होता. सरकारसोबत पूर्ण सल्लामसलत केल्यानंतर मी गव्हर्नरपदाची कारकीर्द संपुष्टात येताच अध्यापनाकडे वळण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो असे राजन यांनी आरबीआयच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक पोस्टवर राजन यांच्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली
=====================================
पुणे - संरक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक स्विकारण्याची केंद्र सरकारची भूमिका काळजी करण्यासारखी वाटते, असे मत माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
केंद्र सरकारने परकीय गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत विचारणा केल्यावर ते बोलत होते. पवार म्हणाले, ""देशात गुंतवणूक वाढणे हे कारखानदारीसाठी हिताचे असते. पण काही क्षेत्रात गुंतवणूक करायची की नाही, ते ठरवावे लागते. संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला शंभर टक्के परवानगी देण्याची भूमिका या सरकारने स्विकारली. आपल्या शेजारी मित्राने अन्य कोणाला पुढे करून संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास, त्या कारखानदारीवर त्यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे, हे का केले, ते समजत नाही.‘‘
संरक्षण क्षेत्रात एफडीआय,काळजी वाटते:शरद पवार
| |
-

वॉशिंग्टन डी सी - ज्येष्ठांच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने चीन त्रस्त झालेला असताना अमेरिकेत मात्र काम करणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येत वाढ होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. तर गेल्या काही वर्षांत काम करणाऱ्या प्रौढांच्या लोकसंख्येत घट होत असल्याचेही आढळून आले आहे.
"द प्यु रिसर्च इन्स्टिट्युट‘ने केलेल्या संशोधनातून याबाबतची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत 2000 साली 65 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या एकूण लोकसंख्येपैकी 12.8 टक्के लोकसंख्या ही काम करत होती. आता मे 2016 मध्ये त्यामध्ये वाढ होऊन ज्येष्ठांच्या एकूण लोकसंख्येपैकी काम करणाऱ्यांची प्रमाण 18.8 टक्के असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे प्रौढांचे काम करण्याचे प्रमाण कमी होत असल्याचेही या संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेत 2000 साली प्रौढांच्या एकूण लोकसंख्येपैकी 64.4 टक्के लोकसंख्या काम करणारी होती. 2008 मध्ये हे प्रमाण 62.5 टक्के झाले तर 2011 मध्ये त्यामध्ये आणखी घट होऊन हे प्रमाण 57.6 टक्क्यांवर पोचले. तर मे 2016 मध्ये यामध्ये किंचित वाढ होऊन हे प्रमाण 59.9 टक्के असल्याचे आढळून आले आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येत वाढ

पाणी गैरव्यवहार:केजरीवाल, दीक्षितांची चौकशी
| |
-
| |
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील पाण्याच्या टॅंकरमध्ये झालेल्या तथाकथित गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची लवकरच लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना लाचलुचपत विभागाचे प्रमुख एम. के. मीना यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "आमच्याकडे कपिल मिश्रा आणि विरेंद्र गुप्ता यांच्याकडून 400 कोटी रुपयांचा पाणी गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व शक्यता तपासल्यानंतर आम्ही आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तपास सुरु असून आम्ही कायदेशीर मार्गाने काम करत आहेत. या प्रकरणात जे सहभागी आहेत त्यांची लवकरच चौकशी होईल.‘ तसेच "अगदी अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षित यांचे नाव या गैरव्यवहाराशी जोडले गेल्याने आम्ही त्यांचीही चौकशी करणार आहोत‘, असेही मीना यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करत असलेले पूर्व दिल्लीतील खासदार महेश गिरी यांनी उपोषणस्थळी योगासने करून योगदिन साजरा केला.
दिल्ली महानगरपालिकेतील अधिकारी एम. एम. खान यांच्या खूनप्रकरणात केजरीवाल यांनी गिरी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधात त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना 15 जून रोजी पत्र लिहिले आहे. यावर गिरी यांनी केजरीवाल यांना या प्रकरणासंदर्भात खुल्या चर्चेचे आव्हान दिले. तसेच जोपर्यंत केजरीवाल यांचा प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन दिवसांपासून गिरी यांचे उपोषण सुरू आहे. सोमवारी भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि मनोज तिवारी यांनी गिरी यांना उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी स्वामी यांनी केजरीवाल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
उपोषणादरम्यान भाजप खासदाराने केली योगासने

वॉशिग्टन - अमेरिकेमधील शस्त्रास्त्रांच्या वापरावर निर्बंध आणण्यासंदर्भातील प्रस्ताव येथील सिनेटने आज (मंगळवार) फेटाळून लावला. फ्लोरिडामधील एका क्लबवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 49 नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र भविष्यामध्ये असे हल्ले रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात सिनेटर्समध्ये तीव्र मतभेद दिसून आले. तेव्हा स्वत:च्या पक्षाच्या धोरणाचा पुरस्कार करताना रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांचे प्रस्ताव फेटाळून लावले.
'गन कंट्रोल'चा प्रस्ताव अमेरिकन सिनेटने फेटाळला
| |
-
| |
=====================================
ट्विटरवरील सुमारे 60टक्के लिंक्स दुर्लक्षितच
| |
-
| |
नवी दिल्ली - ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर शेअर करण्यात आलेल्या लिंक्सपैकी 59 टक्के लिंक्स या पाहिल्याच जात नसल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या या अभ्यासात काहीवेळा तर केवळ लिंक शेअर करणारी व्यक्तीही त्या लिंकला ओपन करून पाहत नसल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
यासाठी सुमारे महिनाभर ट्विटरवरील 28 लाख लिंक्सचा अभ्यास करण्यात आला, यामध्ये बीबीसी, सीएनएन, फॉक्स न्यूज, द न्यू यॉर्क टाइम्स आणि हफिंगटन पोस्ट सारख्या नामांकित संकेतस्थळांच्या लिंक्सचा समावेश होता. ट्विटरवर "ब्लॉकबस्टर‘च्या आर्टीकल्सना मात्र चांगले क्लिक मिळत असले तरी त्यांचे क्लिकचे प्रमाण हे केवळ नऊ टक्के असल्याचेही येथे नमूद करण्यात आले आहे.

सोशल मिडियावर अतिशयोक्ती असलेली शीर्षके ही स्वत:च स्वत:चा पराभव करून घेणारी ठरत असल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. अतिशयोक्ती असलेल्या लिंक्सकडेही अनेकांनी दुर्लक्षच करणे पसंत केले आहे. याउलट सनसनाटी किंवा दिशाभूल करणारी शीर्षके लोक आवर्जून वाचतात लिंक्सवर क्लिक करून त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतात असेही येथे दिसले आहे. अर्थातच सोशल शेअरिंगमुळे बातमीच्या परिणामावर पडणारा प्रभाव हा गौण असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.
=====================================
नवी दिल्ली - जाणूनबुजून कर चुकविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभागाने त्यांचा पॅन क्रमांक ‘ब्लॉक‘ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, त्यांना सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान रोखण्याचा विचार असून त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळू नये, अशी सोय करण्यात येणार आहे.
कर बुडवून सरकारला फसविणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आपल्या अहवालात हे उपाय सुचविले आहेत. याअंतर्गत, प्राप्तिकर विभागाकडून ब्लॉक करण्यात आलेल्या पॅन क्रमांकांची यादी प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे पाठवली जाईल व त्यांना संबंधित व्यक्तींच्या कोणत्याही मालमत्तेची नोंदणी नाकारण्याची विनंती केली जाईल. त्याशिवाय, अशा व्यक्तींच्या बँक खात्यात जमा होणारे सिलिंडर अनुदान बंद करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मिळणारी कर्जे, ओव्हरड्राफ्ट सुविधादेखील बंद करण्यात येईल. सोबतच, देशाच्या कोणत्याही भागात या लोकांना मिळणाऱ्या कर्ज किंवा अनुदान सुविधा थांबविण्यासाठी प्राप्तिकर कार्यालयांमध्ये या माहितीचा प्रसार केला जाणार आहे.
आता कर चुकविणाऱ्यांचे पॅनकार्ड होणार ब्लॉक

कोल्हापूरमध्ये तरुणीचा भोसकून खून
| |
-
| |
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथील पाटील महाराज समाधी शेजारच्या मोकळ्या जागेत तरुणीचा चाकूने भोकसून निर्घृण खून झाल्याचा प्रकार आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आला. तिच्यावर अज्ञात मारेकऱ्याने तब्बल 18 वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी सूरा, मेमरीकार्ड जप्त केले. तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून तपास सुरू केला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती, आज सकाळी साडेसातच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते उदय निंबाळकर हे पंचगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करून ते नदी पात्राच्या पलीकडील पाटील समाधीच्या दर्शनासाठी जात होते. समाधी शेजारील डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेत एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ करवीर पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार करवीर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी अंदाजे गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले. तिचे वय अंदाचे 20 ते 23 वर्षे आहे. मारेकऱ्यांने तिच्या मानेवर, छातीवर, खुब्यात आणि पाठीवर असे सुऱ्याने 18 वार करून तिचा निर्घृण खून केला. मानेवर व खुब्यात खोलवर झालेल्या सहा वार तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. तरुणीच्या डाव्या हताचा अंगठा तुटला असून उजव्या हाताच्या बोटावरही खोलवर जखमा आणि कपडेही चिखलाने मळकटलेले होते. हल्लेखोराला प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहा शेजारी पोलिसांना कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड मिळून आले. तसेच दहा ते पंधरा फुटावरील एका झाडाच्या मागे मारेकऱ्याने मातीत लपवून ठेवलेला सुरा पोलिसांच्या हाती लागला. मेमरी कार्ड व सूरा त्यांनी जप्त केला. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
=====================================
No comments:
Post a Comment