[अंतरराष्ट्रीय]
१- गोव्याच्या पर्यटनास नायजेरियनांचा ताप
2- पॅरीस; जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा झाला खुला
३- बँकॉक; 'टायगर टेम्पल'मध्ये वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू
४- रियाध; वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट
५- सिवान; पत्रकार रंजन यांच्या हत्याप्रकरणी संशयित शरण
६- पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस; 14 मृत्युमुखी
७- इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना भूकंपाचा धक्का
८- कॅलिफोर्निया विद्यापीठात गोळीबारात दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- गुजरात दंगल: गुलबर्ग सोसायटी हत्याकांडप्रकरणी आज निकालाची शक्यता
१०- काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची वेळ : सोनिया गांधी
११- पोस्ट ऑफिसला आता बॅंकेचा दर्जा
१२- आशिष खेतान यांना धडा शिकवू: सनातन संस्था
१३- डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन साधकांच्या घरांवर छापा
१४- तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध
१५- ‘सनातन’ साधकांच्या घरांवर सीबीआय छापे
१६- मोदींना पाठींबा दिल्याने माफी मागतो- जेठमलानी
१७- विमान प्रवास महागणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
१९- मुख्यमंत्री आज दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
२०- देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
२१- फुकट्या प्रवाशाला शेवटच्या स्टॉपलाच उतरणार - रावते
२२- नाशिक; कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल
२३- हार्बरवर सिग्नल बिघाड; चाकरमान्यांना बसला फटका
२४- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- संगमनेर; कौमार्य चाचणी : मुलाने माफी मागितली, वधू-वर पुन्हा एकत्र नांदणार
२६- ठाणे - भिवंडी - कल्याण मार्गावर मेट्रो धावणार?
२७- अंबरनाथ स्टेशनवर गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला
२८- खडसे समर्थकांचं दबावतंत्र, जळगावमधील 15 नगरसेवक राजीनामा देणार
२९- वर्धा; पुलगाव स्फोटातील मृतांची संख्या अठरा
३०- गुलबर्ग जळीतकांडप्रकरणी 24 जण दोषी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार
३२- 'सैराट'मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
३३- प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते रज्जाक खान यांचं निधन
३४- उदगीरमध्ये नववीतील मुलाकडून आईची हत्या
३५- माधुरी दिक्षितने हॉकी स्टीक घेऊन केला आमीरचा पाठलाग
३६- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी हिंदी आवश्यक
३७- दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने 'या' क्रिकेटपटूसोबत थाटला संसार
३८- मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आकाश काळे, खुशाल कदम, रामचंद्र सूर्यवंशी, शिवराम देशमुख, उमेश मुंढे, विशाल पाटील, सचिन सोनकांबळे, नागेश शिंदे, बापूराव देशमुख, प्रमोद गव्हाणे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================



















१- गोव्याच्या पर्यटनास नायजेरियनांचा ताप
2- पॅरीस; जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा झाला खुला
३- बँकॉक; 'टायगर टेम्पल'मध्ये वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू
४- रियाध; वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट
५- सिवान; पत्रकार रंजन यांच्या हत्याप्रकरणी संशयित शरण
६- पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस; 14 मृत्युमुखी
७- इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना भूकंपाचा धक्का
८- कॅलिफोर्निया विद्यापीठात गोळीबारात दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- गुजरात दंगल: गुलबर्ग सोसायटी हत्याकांडप्रकरणी आज निकालाची शक्यता
१०- काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची वेळ : सोनिया गांधी
११- पोस्ट ऑफिसला आता बॅंकेचा दर्जा
१२- आशिष खेतान यांना धडा शिकवू: सनातन संस्था
१३- डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन साधकांच्या घरांवर छापा
१४- तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध
१५- ‘सनातन’ साधकांच्या घरांवर सीबीआय छापे
१६- मोदींना पाठींबा दिल्याने माफी मागतो- जेठमलानी
१७- विमान प्रवास महागणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
१९- मुख्यमंत्री आज दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
२०- देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
२१- फुकट्या प्रवाशाला शेवटच्या स्टॉपलाच उतरणार - रावते
२२- नाशिक; कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल
२३- हार्बरवर सिग्नल बिघाड; चाकरमान्यांना बसला फटका
२४- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- संगमनेर; कौमार्य चाचणी : मुलाने माफी मागितली, वधू-वर पुन्हा एकत्र नांदणार
२६- ठाणे - भिवंडी - कल्याण मार्गावर मेट्रो धावणार?
२७- अंबरनाथ स्टेशनवर गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला
२८- खडसे समर्थकांचं दबावतंत्र, जळगावमधील 15 नगरसेवक राजीनामा देणार
२९- वर्धा; पुलगाव स्फोटातील मृतांची संख्या अठरा
३०- गुलबर्ग जळीतकांडप्रकरणी 24 जण दोषी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार
३२- 'सैराट'मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
३३- प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते रज्जाक खान यांचं निधन
३४- उदगीरमध्ये नववीतील मुलाकडून आईची हत्या
३५- माधुरी दिक्षितने हॉकी स्टीक घेऊन केला आमीरचा पाठलाग
३६- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी हिंदी आवश्यक
३७- दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने 'या' क्रिकेटपटूसोबत थाटला संसार
३८- मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आकाश काळे, खुशाल कदम, रामचंद्र सूर्यवंशी, शिवराम देशमुख, उमेश मुंढे, विशाल पाटील, सचिन सोनकांबळे, नागेश शिंदे, बापूराव देशमुख, प्रमोद गव्हाणे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================
खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
नवी दिल्ली: विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एकनाथ खडसेंप्रकरणाचा अहवाल मागितला आहे. राज्य सरकार आणि महाराष्ट्र भाजपकडून त्यांनी हा अहवाल मागितला आहे.
भोसरी एमआयडीसीमध्ये बेकायदेशीररित्या जमीन खरेदी केल्याचे पुरावे खडसेंच्याविरोधात आहेत. त्यामुळे खडसेंना मंत्रिमंडळातून हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे प्रभारी सरोज पांडे खडसेंसंदर्भातला रिपोर्ट अमित शहांना सादर करतील.
याप्रकरणी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी खडसेंचं स्पष्टीकरणही मागितलंय. मात्र या स्पष्टीकरणामुळे अमित शाह समाधानी झाले नाही, तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ खडसेंनी हजेरी लावली नाही. शिवाय जळगावमध्ये खडसेंनी लालदिव्याची गाडीही वापरली नाही. त्यामुळे खडसेंचं मंत्रिपद जाणार की त्यांचं फक्त महसूलमंत्रिपद काढून घेतलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.
============================================
ठाणे - भिवंडी - कल्याण मार्गावर मेट्रो धावणार?
मुंबई : आगामी काळात ठाणे-भिवंडी- कल्याण मार्गावर मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता आहे. कारण एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात या मार्गावर मेट्रोची गरज असल्याचं दिसून आलं.
ठाणे आणि त्यापुढील भागातला औद्योगिक पट्टा आणि वाढती लोकसंख्या पाहता, मेट्रो ठाण्याच्या पुढे नेण्याचा विचार करण्यात येत होता. ठाण्यातील कापूरबावडी ते कल्याणच्या शिवाजी चौकापर्यंत या मेट्रोचा मार्ग विचाराधीन आहे. या मार्गावर सध्या 16 स्थानक निश्चित करण्यात आली आहेत.
ठाण्याच्या पुढे उपलब्ध असलेल्या वाहतूक पर्यायांच्या क्षमतेवर सध्या 15 हजार अतिरिक्त प्रवाशांचा ताण येतोय. हा ताण कमी करण्यासाठी या मार्गावर नवीन मेट्रो मार्ग गरजेचा असल्याचं एमएमआरडीएने म्हटलं आहे.
ठाणे आणि कल्याण ही मोठी स्टेशन्स आहेत. इथे पिक-अवर्सला प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी आता मेट्रोशिवाय पर्याय नसल्याचं मत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचं आहे.
============================================
मुख्यमंत्री आज दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत असणार आहेत. कौशल्य विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा असला तरी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या प्रकरणाबाबत दिल्लीत काही खलबतं होतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी खडसेंवरच्या आरोपांवर बोलताना, राज्य सरकारचं आरोपांची शहानिशा करेल. त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही. असं शाह यांनी म्हटलं होतं. मात्र, तरीही मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांसोबत खडसेंबाबत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं सूत्रांकडून समजतं आहे.
तर दुसरीकडे सलगच्या आरोपानंतर एकनाथ खडसे बंडाच्या पावित्र्यात दिसत आहेत. जळगावात खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदार-खासदारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची काल भेट घेतली.
खासदार ए टी पाटील, आमदार स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे, राजू भोळे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा यात समावेश होता. शिवाय जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे 15 नगरसेवकही आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे आपला राजीनामा देतील. अशी माहिती आहे.
============================================
गुजरात दंगल: गुलबर्ग सोसायटी हत्याकांडप्रकरणी आज निकालाची शक्यता
नवी दिल्ली: तब्बल 14 वर्षानंतर आज गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीत कांड प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांचं वास्तव्य असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात एहसान जाफरींसह 69 जण मृत्यूमुखी पडले होते.
या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी गेल्या 14 वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत. दरम्यान, एसआयटीनं भाजपचे स्थानिक नगरसेवक बिपीन पटलेसह 66 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 9 आरोपी गेल्या 14 वर्षांपासून तुरूंगात असून इतर आरोपी जामीनावर बाहेर आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विशेष SITनं याप्रकरणी तब्बल 335 साक्षीदार आणि 3000 कागदपत्र सादर केले. 61 आरोपींच्या समोर निकाल सुनावण्यात येणार आहे. आज दुपारपर्यंत या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.
============================================
कौमार्य चाचणी : मुलाने माफी मागितली, वधू-वर पुन्हा एकत्र नांदणार
संगमनेर : संगमनेरमधील कौमार्य तपासणी प्रकरणावर पडदा पडला आहे. मुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नानंतर कौमार्य चाचणीत नापास झाल्यानंतर जातपंचायतीच्या आदेशानंतर नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला, असं वृत्त होतं. मात्र जातपंचायतीविरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत एकत्र नांदण्याचं ठरवलं आहे.
मात्र कौमार्य चाचणीसारखी समाजातील कुप्रथा मोडीत निघाली पाहिजे, असं मत दोघांनी व्यक्त केलं आहे.
मुलाचा आधीचा दावा
मुलीच्या कुटुंबीयांनीच मला जबरदस्ती कौमार्याची परीक्षा घ्यायला सांगितली आणि पंचांचं नाव सांगितलंय. याप्रकरणाचा आणि पंचांचा काहीही संबंध नाही, असा दावाही त्यानं केला होता. एवढंच नाही तर मुलींच्या कुटुंबीयांना हे लग्न नको आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. आतापर्यंत मी त्यांना 71 हजार रुपये दिल्याचंही मुलांनी सांगितलं.
याशिवाय मुलीचा सांभाळ करायची तयारीही असल्याचा दावाही त्याने केला होता. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं होतं.
============================================
काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची वेळ : सोनिया गांधी
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्य पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चंदीगडमध्ये एका चॅनलशी बोलताना हा दावा केला आहे. मात्र सोनियांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास तयार आहे. याबाबत काही आठवड्यातच निर्णय घेतला जाईल. राहुल धुरा सांभाळण्याआधी पक्षाच्या सरचिटणीस, सचिव, विभागप्रमुख आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी या सर्व नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील.
काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी चिंतन शिबीर घेणार आहेत. या शिबीरात अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जाणार आहे. तसंच पक्षाचं ध्येयधोरणही ठरवलं जाईल.
============================================
पोस्ट ऑफिसला आता बॅंकेचा दर्जा
नवी दिल्लीः तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस आता बँकेच्या स्वरुपात सुरु होणार आहे. पोस्ट ऑफिसला बँकेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन बँकेंचं नाव ‘इंडीया पोस्ट पेमेंट बँक’ असं असणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे संपुष्टात येत असलेल्या डाक घरांना नवसंजीवनी मिळणार आहे. संपर्काच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे डाक घरांचे काम केवळ औपचारिकते पुरतेच उरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
असा होईल फायदा
ग्रामीण भागांत बँकांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आहे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या निर्णयामुळे आता ज्या गावात डाक घर आहे, अशा ठिकाणी बँकेचे सर्व प्रकारचे व्यवहार करणं शक्य होणार आहे. त्यामुळे खासकरुन ग्रामीण भागाला या निर्णयाचा जास्त लाभ मिळणार आहे.
============================================
'सैराट'मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
सोलापूर : ‘सैराट’मधील आर्ची आणि परशाप्रमाणेच लंगडा बाळ्या आणि सल्याने अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं. प्रेक्षकांनी आर्ची-परशाप्रमाणेच सल्या आणि लंगड्याच्या भूमिकेलाही अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता हाच लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे नव्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तो कोणत्या सिनेमात नाही तर झेरॉक्स मशिनवर काम करताना दिसेल.
पायाने अपंग असल्याने तानाजी गलगुंडेला आता रोजगाराचं साधन देण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या वतीने तानाजीला रोजगाराचं साधन म्हणून अपंग कोट्यातून झेरॉक्स मशिन दिलं जाणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी ही घोषणा केली. तानाजीच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तानाजीला येत्या 6 जून रोजी हे झेरॉक्स मशिन दिलं जाईल. त्यामुळे सिनेमातील प्रदीप बनसोडे आता खऱ्या आयुष्यात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
तानाजी सध्या सोलापुरातील टेंभूर्णी इथे बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटात परशाच्या मित्राची म्हणजेच लंगडा बाळ्याची भूमिका साकारुन प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.
============================================
अंबरनाथ स्टेशनवर गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला
कल्याणः मध्य रेल्वेवर प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर आज सकाळी सहा वाजता कुर्ला ते बदलापूर ट्रेनमधून गोणीतून मृतदेह फेकल्याचा प्रकार घडला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
रेल्वे पोलिसांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे.
तोंड दाबून केली हत्या
अंबरनाथ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सकाळी सहा वाजता आलेल्या ट्रेनमध्ये एक गोणी ठेवण्यात आली होती. ही माहीती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाअंती गोणीत तरुणाचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
============================================
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार
लंडनः आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी 1 जून रोजी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ‘ब‘ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पाहायला मिळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे ग्रुपः
ग्रुप A ग्रुप B
ऑस्ट्रेलिया भारत
न्यूझीलंड साऊथ अफ्रिका
इंग्लंड श्रीलंका
बांगलादेश पाकिस्तान
============================================
आशिष खेतान यांना धडा शिकवू: सनातन संस्था
मुंबई : आशिष खेतान सीबीआयच्या कारवाईपूर्वी ट्वीट करतात आणि मग कारवाई होते, हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. आशिष खेतानच्या तालावर सीबीआय काम करते, असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.
यावेळी, संजीव पुनाळेकर म्हणाले, “आशिष खेतान यांना धडा शिकवू.” मात्र, पत्रकरांनी त्यावर पुन्हा प्रश्न केल्यानंतर संजीव पुनाळेकरांनी सारवासारव केली आणि म्हणाले, “आशिष खेतान यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू”
“डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआय अनेकदा सनातनच्या आश्रमात चौकशीसाठी येऊन गेली. आजही सीबीआयची टीम नियमित चौकशीसीठी आश्रमात आली होती. मात्र, आज आशिष खेतानने सीबीआयची टीम चौकशीसाठी येण्याआधी ट्वीट केला. सीबीआय;r टीम येण्याआधी; खेतान ट्वीट करताl म्हणजे us पूर्वनियोजित षड्यंत्र आहे”, असे अभय वर्तक म्हणाले.
सीबीआय जाणीवपूर्वक सनातनला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. शिवाय, सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही सनातनने गृहमंत्र्यांकडे केली आहे.
============================================
देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
पुणे : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी पहिल्यांदाच जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीवर मत व्यक्त केलं आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या देशविरोधी घोषणांवर मौन बाळगणं, हे देशासाठी घातक असल्याचं डोबाल म्हणाले. अजित डोबाल काल पुण्यात बोलत होते.
जेव्हा काही लोक देश तोडण्याची भाषा करतात तेव्हा इतरांनी त्यावर सामूहिक प्रतिक्रिया देणं गरजेचं असतं. भारत केवळ 125 कोटी लोकांचं पोट भरत नाही तर बाहेरच्या देशातही अन्नधान्य निर्यात करतो. त्यामुळे राष्ट्रशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत डोबाल यांनी व्यक्त केलं.
डोबाल म्हणाले की, जे लोक देशासाठी बलिदान करत नाही, ते रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करतात. भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात. त्यांनी दिलेली ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह’ ही घोषणा महत्त्वाची नाही. पण समाजातील लोक याविरोधात काय प्रतिक्रिया देतात हे अधिक महत्त्वाचं आहे.
============================================
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते रज्जाक खान यांचं निधन
मुंबई: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अनेक भूमिकांनी रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते रझाक खान यांचं आज निधन झालं. काल त्यांना हृदयविकारचा झटका आला होता. त्यानंतर वांद्रे इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या सिनेसृष्टीतल्या वाटचालीत त्यांनी ९० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये भूमिका केल्या.
बादशाह, हेराफेरी, हैलो ब्रदर, अखियोसे गोली मारे अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकेचं कौतुकही झालं.
महत्वाचं म्हणजे अनेक सिनेमात ज्या नावानं त्यांनी भूमिका साकारली पुढे त्याचं नावानं लोक त्यांना ओळखत राहिले.
टक्कर पहलवान, बाबू बिसलेरी सिनेमातली त्यांची अशी अनेक नावं चर्चेतही राहिली.
============================================
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन साधकांच्या घरांवर छापा
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे आणि पनवेलमध्ये छापा टाकला आहे. पुण्यातील सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. तर पनवेलमध्ये विरेंद्र तावडे यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे.
पोलिसांनी यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता सीबीआयनेही सनातनच्या साधकांच्या घरी छापेमारी केल्यामुळे सनातन संस्थेवरील संशय बळावला आहे. दरम्यान, मात्र या धाडसत्रात सीबीआयच्या हाती काय लागलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र या घटनेला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
============================================
उदगीरमध्ये नववीतील मुलाकडून आईची हत्या
लातूर : उदगीर जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या मुलाने सहा मित्रांना सुपारी देऊन आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईची हत्या करण्यासाठी आरोपी मुलाने त्याच्या सहा मित्रांना 3 लाख 25 हजार रुपयांची सुपारी दिली होती.
महत्त्वाचं म्हणजे या हत्येसाठी मुलाने त्याच्या मित्रांना सव्वा लाख रुपयांची अनामत रक्कमही दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून एकाला ताब्यात घेतलं आहे. सहापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
मुलाचे शौक आणि आईचा विरोध
मुलाचे वडील प्रशांत पेन्सलवार उदगीरमधील हे मोठे किराणा व्यापारी आहेत. मुख्य मार्केटमध्ये त्यांचं किराणा दुकान आहे. मुलाचे शौक बघून आई त्याला सतत अडवत होती. दुकानातून पैसे घेण्यास विरोध करत होती. त्याचा राग मुलाच्या मनात होता. त्यामुळे त्याने परभणीतील पलमच्या, उदगीरच्या मित्रांना आईला मारण्याची सुपारी दिली होती.
असा रचला कट!
एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने मुलं घरात घुसली आणि आईच्या गळ्यावर धागदार शस्त्राने वार केले. यात प्रणिता पेन्सिलवार यांचा मृत्यू झाला.
============================================
फुकट्या प्रवाशाला शेवटच्या स्टॉपलाच उतरणार
मुंबई : तोट्यात असलेल्या एसटीचं उतपन्न वाढवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करणार असल्याचं रावतेंनी ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अधे-मधे न उतरवता, शेवटच्या स्टॉपवरच उतरवण्याची शिक्षा परिवहन खात्याच्या विचाराधीन आहे.
एसटीच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई सेंट्रल एसटी डेपोतल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री दीवाकर रावते बोलत होते.
एसटीतून कुणालाही फुकट प्रवास करू देणार नाही
एसटीतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड तर वसूल करणारच, पण त्याचसोबत त्याला शिक्षा म्हणून शेवटच्या स्टॉपपर्यंत उतरु देणार नाही. शेवटच्या डेपोमध्ये नेऊन जाब-जबाब घेणार मगच घरी सोडणार. म्हणजे पनवेलला उतरणारा माणूस जेव्हा पुण्याला उतरेल तेव्हा तो आयुष्यात पुन्हा विना तिकीट प्रवास करणार नाही, असं यावेळी रावते म्हणाले.
तसंच कंडक्टरला स्वत:हून बोलावून प्रवाशाने तिकीट घेतलं पाहिजे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी माझ्याकडे भयानक इलाज आहेत. असंही रावतेंनी नमूद केलं.
============================================
कौमार्य चाचणी प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल
नाशिक: पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्यानं लग्नानंतरच्या अवघ्या ४८ तासात पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली. या धक्कादायक प्रकाराची दखल महिला आयोगाने घेतली आहे.
महिला आयोगाकडून दखल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या अहवालानंतर गरज पडल्यास महिला आयोग पीडित महिलेच्या बाजूने तक्रार दाखल करणार आहे.
काय आहे प्रकरण?
लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेण्यात आली. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्याचा आरोप करत, नवऱ्याने अवघ्या 48 तासात तिच्याशी काडीमोड घेतला. २२ मे ला हा विवाह झाला होता.
जातपंचाच्या आदेशानं लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारिरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग लागला नाही. म्हणून पत्नी कौमार्य परीक्षेत नापास असल्याचा फतवा सुनावून जातपंच मोकळे झाले.
============================================
खडसे समर्थकांचं दबावतंत्र, जळगावमधील 15 नगरसेवक राजीनामा देणार
जळगाव : भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंचा पदभार कमी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र असं असताना जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. कारण खडसेंच्या समर्थनात जळगावमधील भाजपचे 15 नगरसेवक उद्या राजीनामा देणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे नगरसेवक उद्या आपला राजीनामा देतील. गेल्या 15 दिवसांमध्ये एकामोगामाग एक आरोप होत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं अशी बातमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावमधून खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे उद्या राजीनामे देण्याचा निर्णय 15 नगरसेवकांनी घेतला असून, या संबंधी या नगरसेवकांनी आज जळगाव येथे बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावेळी नगरसेवकांनी अंजली दमानिया यांचाही निषेध त्यांनी केला.
त्यामुळे राजीनाम्याच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपचं नेतृत्व काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्वाचं आहे.
============================================
तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध
नवी दिल्ली : तीन वेळा तलाक घेण्याच्या पद्धतीला जवळपास 50 हजार मुस्लिम महिलांचा विरोध आहे. याबाबत महिलांनी न्यायालयात धाव घेऊन जनहीत याचिका दाखल केली आहे. ही याचिका ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’च्या वतीने दाखल करण्यात आली असून राष्ट्रीय महिला आयोगाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनच्या संस्थापिका झाकिया सोमान यांनी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ आणि उत्तरप्रदेशात या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
या संदर्भात माहिती देताना सोमान म्हणाल्या की, तीन वेळा तलाक ही वाईट प्रथा बंद व्हावी यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. ललिता कुमारमंगलम यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. यावर निवेदनावर 50 हजार मुस्लिम स्त्री-पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
============================================
माधुरी दिक्षितने हॉकी स्टीक घेऊन केला आमीरचा पाठलाग
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 02 - धकधक गर्ल माधुरी दिक्षितने परफेक्शनिस्ट आमीर खानचा चक्क हॉकी स्टीक घेऊन पाठलाग केला होता. स्वत: माधुरी दिक्षितने हा किस्सा सांगितला आहे. 1990 मधील सुपरहिट चित्रपट 'दिल'च्या शुटिंगदरम्यान मी हॉकी स्टीक घेऊन आमीर खानच्या मागे धावले होते अशी आठवण तिने सांगितली आहे.माधुरी दिक्षितने ट्विटरवर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपण केलेल्या खोडकर गोष्टी माधुरीने शेअर केल्या. 'दिल चित्रपटाच्या सेटवर आमीर खानने माझी खोड काढली होती तेव्ही मी हॉकी स्टीक घेऊन त्याचा पाठलाग केला होता', ही आतापर्यंत मी केलेली खोडकर गोष्ट असल्याचं', माधुरी दिक्षितने सांगितलं.1990मध्ये आलेल्या 'दिल' चित्रपटात पहिल्यांदा आमीर खान आणि माधुरी दिक्षीत जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मात्र त्यानंतर आमीर खान आणि माधुरीने एकत्र काम केलं नाही. 1984मध्ये माधुरी दिक्षितने 'अबोध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2014 मध्ये आलेल्या 'गुलाबी गँग' चित्रपटात माधुरी शेवटची दिसली होती.
============================================
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपसाठी 'अच्छे दिन' - स्मृती इराणी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २ - राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपचे 'अच्छे दिन' सुरु झाले समजा असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. लवकरच राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होईल अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी अध्यक्ष झाले तर, भाजपला आणखी चांगले दिवस येतील असे इराणी यांनी म्हटले आहे.टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन वर्षातील त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेल्या उपायोजना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान होते. मागच्या दोन वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.हैदराबाद विद्यापीठाचा दाखला देत इराणींना तुम्ही आणि तुमचे मंत्रालय विविध वादात अडकले असा प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, सरकार प्रत्येक विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत नाही. हैदराबाद विद्यापीठासंबंधी मी जे संसेदत बोलले. प्रत्येक वाक्याचा मी कागदपत्राव्दारे दाखला दिला असे त्यांनी सांगितले.
============================================
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी हिंदी आवश्यक
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २ - राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने आज जाहीरात दिली आहे. झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर यांच्या बरोबरचा करार २०१५ आयसीसी वर्ल्डकपनंतर संपला तेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपदाची जागा रिक्त आहे. फ्लेचर यांच्यानंतर रवी शास्त्री यांनी संघ संचालक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावली.बोर्डाने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, निवडीसाठी नऊ निकष ठेवले आहेत. यात प्रशिक्षकाकडे हिंदी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य हवे असेही म्हटले आहे तसेच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराची कोणतीही वादाची पार्श्वभूमी नसावी असेही म्हटले आहे.उमेदवारांना १० जूनपर्यंत भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करता येईल. फ्लेचर यांच्यानंतक माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत संघ संचालक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
============================================
दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने 'या' क्रिकेटपटूसोबत थाटला संसार
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २ - भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचे क्रिकेटबरोबरच खासगी आयुष्यही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिले. स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल बरोबरच्या त्याचे प्रेम प्रकरण माध्यमांमध्ये चांगलेच गाजले. दिनेशच्या आयुष्यात अशी आणखी एक खासगी बाब आहे जी फार कमी जणांना माहित आहे.दिनेशने पहिली पत्नी निकितापासून का घटस्फोट घेतला ? या घटस्फोटाला काय कारण होते ? आणि निकिताने घटस्फोटानंतर कुठल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत संसार थाटला हे फार कमी जणांना माहित आहे. दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. या दरम्यान त्याचे बालपणीची मैत्रिण निकिताबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते.
============================================
पुलगाव स्फोटातील मृतांची संख्या अठरा
- वर्धा/नागपूर : पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे. घटनास्थळ पसिरातील काही इमारती उद्ध्वस्त झाल्याने मलब्याखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आगीमागील नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात असून, नुकसानीबाबतचा अंदाजही लष्कर प्रशासनाने व्यक्त केलेला नाही. बुधवारी सायंकाळपासून शहिदांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून व पुष्पचक्र अर्पण करून दारूगोळा भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढायला सुरुवात झाली.सात जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमी झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांसह सर्व १७ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्राने दिली. यातील डेफ्टी कमांडंट जगदीश चंद्रा, शरद यादव, गजेंद्र सिंह या अधिकाऱ्यांना दुपारी हेलिकॉप्टरने पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने सात जणांच्या कानाचे पडदे फाटले असून, त्यांना बधिरता आली आहे. सेवाग्राम व सामान्य रुग्णालयाच्या चमूने घटनास्थळावरच १८ मृतदेहांचे शवविच्छेदन केले. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते.
============================================
‘सनातन’ साधकांच्या घरांवर सीबीआय छापे
- पुणे/नवी दिल्ली : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी पुणे आणि पनवेल येथील सनातन संस्थेच्या साधकांच्या घरांवर छापे टाकल्याने या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाली आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून, सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीनेच त्यांची हत्या केली, असा खळबळजनक दावा आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी केला आहे.गोव्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी आधीपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर असलेल्या सारंग आकोलकरच्या पुण्यातील घरासह पनवेलमधील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि देवद आश्रमामध्ये सीबीआयने छापे टाकून घराची झडती घेतली. अकोलकरच्या घरामधून वर्तमानपत्रांची कात्रणे, वीजबिल, जुने बँक पासबुक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, तर डॉ. तावडेंचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दोन्ही ठिकाणी सकाळी सात वाजता सुरू करण्यात आलेली ही झडती दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. आॅगस्ट २०१३ मध्ये विवेकवादी विचारवंत दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना तपासात फारशी प्रगती साधता आली नव्हती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपविला होता. कट्टर हिंदुत्ववादी आणि उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून सनातन संस्थेची ओळख असून गोव्यातील पोंडा येथे मुख्यालय आहे. दाभोलकर यांच्या हत्याकांडातील मुख्य कटकर्ता म्हणून आकोलकरवर संशय व्यक्त होत असतानाच एनआयएच्या तपासातही त्याचे नाव समोर आल्याने त्याच्यासह सनातनचे अनेक सदस्य भूमिगत झाले आहेत.
============================================
हार्बरवर सिग्नल बिघाड; चाकरमान्यांना बसला फटका
- मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेला बिघाडांच्या समस्यांनी ग्रासले असतानाच आता यात हार्बरही मागे राहिलेली नाही. बुधवारी संध्याकाळी हार्बर मार्गावरील वडाळ्याजवळील रावळी जंक्शन येथे सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी सिग्नलमध्ये बिघाड झाला आणि हार्बर सेवा तब्बल तीन तास विस्कळीत झाली. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.रावळी जंक्शन येथे संध्याकाळी ५.२५ वाजता सिग्नलमध्ये बिघाड झाला. हा बिघाड होताच सीएसटी ते वडाळा आणि कुर्ला दरम्यानची अप आणि डाऊनची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. बिघाड त्वरित दुरुस्त होईल असे वाटत असणाऱ्या प्रवाशांना मात्र बरीच प्रतीक्षा करावी लागली. बिघाड दुरुस्त होईपर्यंत हार्बरचे वेळापत्रकच बिघडले. हार्बरच्या प्रवाशांना तर स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले. सिग्नलमधील बिघाड दुरुस्त होण्यास जवळपास एक तास लागला. बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत होत्या. स्थानकाबाहेर येऊन रिक्षा आणि टॅक्सी सेवेचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना चालकांनी जास्त भाडे आकारून चांगलेच लुटले. कुर्ला स्थानकाबाहेर तर नवी मुंबईला जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून तब्बल २00 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारले जात होते. रात्री नऊ वाजेपर्यंत हार्बरवरील लोकल या उशिरानेच धावत होत्या.
============================================
‘पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध आंदोलन’
- मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सेवाकरात झालेली दरवाढ अन्यायकारक असून, त्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मोदी सरकार आपला दुसरा वर्धापन दिवस साजरा करताना हा निर्णय झाला आहे. याचाच अर्थ ही भाववाढ मोदी सरकारने सामान्य जनतेला दिलेली वर्धापन दिनाची भेट आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सहाजिकच महागाई वाढणार आहे.. सरकारच्या या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर पुढील तीन दिवसांत तीव्र आंदोलन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. काँग्रेसच्या कार्यकाळात सेवाकर १२.३६ टक्के होता. मोदी सरकारने तो १४ टक्के केला. आता तो १५ टक्के झाला आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना सरकार कर्जमाफी करायला तयार नाही. मग शेतकऱ्यांच्या नावाखाली करवाढ लादण्याचा सरकारला अधिकार तरी काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
============================================
गोव्याच्या पर्यटनास नायजेरियनांचा ताप
- सद्गुरू पाटील, पणजीगोव्याच्या पर्यटन व्यवसायाची व्याप्ती वाढत असतानाच नायजेरियनांसारखे विदेशी पर्यटक गोव्याला अत्यंत तापदायी ठरत असल्याची चिंता गोवा सरकारने व्यक्त केली आहे. नायजेरियनांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणण्याचा विचारही गोवा सरकारने चालविला आहे.उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या विविध भागांमध्ये अनेक नायजेरियन रेस्टॉरंट, पब, शॅक चालविणे अशा प्रकारचे धंदे करतात. पर्यटक टॅक्सी चालविण्याच्याही व्यवसायात ते उतरते आहेत. यामुळे स्थानिक गोमंतकीय लोक नायजेरियनांवर खूप नाराज झाले आहेत. पर्यटक बनून येणारे नायजेरियन व्हिसा संपला तरी, गोव्यातच कायम राहतात. ते गोव्यात आल्यानंतर मग स्वत:कडील पासपोर्ट जाळून टाकतात. त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्यामागेतांत्रिक अडचणी येतात, असा अनुभव पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितला.
============================================
जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा झाला खुला
- ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. 1 - जगातील सर्वात लांब आणि खोल रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये आज उद्घाटन झालं. विशेष म्हणजे 57 किमी लांबीचा हा द्विमार्गी बोगदा असून, त्या बोगद्याचं काम जवळपास 17 वर्षांपासून सुरू होते. या बोगद्याला गोथार्ड बेस टनेल नाव दिलं आहे. हा बोगदा स्वीस अल्पस् पर्वतराजीच्या खालून जाणार असून, हायस्पीड रेल्वेद्वारे उत्तर आणि दक्षिण युरोपला जोडणार आहे.गोथार्ड बोगद्यानं जपानमधील 53.9 किमीच्या सेईकन रेल्वे बोगद्यालाही मागे टाकलं आहे. ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणारा 50.5 किमीचा चॅनल बोगदा तिस-या क्रमाकांवर फेकला गेला आहे. या बोगद्याच्या खोदकामावर 12 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तो तयार करावा की नाही, याबाबत स्वीत्झर्लंडने 1992मध्ये सार्वमत घेतले होते. यात लोकांनी बोगद्याच्या बाजूने कौल दिला होता.
============================================
'टायगर टेम्पल'मध्ये वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू
- ऑनलाइन लोकमतबॅंकॉक, दि. 1 - थायलंडमध्ये असलेल्या 'टायगर टेम्पल' परिसरात वाघांच्या 40 बछड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.पश्चिमेकडील कांचनाबुरी प्रांतात असलेल्या 'टायगर टेम्पल' परिसरात वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वन अधिका-यांनी दिली. त्यामध्ये एकूण 40 बछड्यांचा समावेश आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात तपास सुरु असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.'टायगर टेम्पल' हे वाघांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी विदेशातून अनेक पर्यटक येतात.
============================================
वजन कमी करणे पडले महागात, पतीने दिला पत्नीला घटस्फोट
- ऑनलाइन लोकमतरियाध, दि. ०१ - वजन कमी करण्याचे ऑपरेशन करून पतीला सरप्राइज देण्याचा प्रयत्न सौदी अरेबियातील महिलेच्या चांगलाच अंगाशी आला असून त्या ऑपरेशचा खर्च पाहून पतीने तिला घटस्फोटच देऊन टाकला. रियाधमध्ये राहणारी ही महिला शिक्षकी पेशातील असून तिच्या अतिलठ्ठपणामुळे तिचा पती नाराज होता. त्याने अनेकवेळा लठ्ठपणाबद्दल तक्रार करत तिच्याकडे बारीक होण्याचा तगादा लावला होता. ही गोष्ट मनावर घेतलेल्या पत्नीने बारीक होण्याचा निर्धारच केला. पतीची दुस-या शहरात बदली झाल्यावर तिने एका डॉक्टरची भेट घेतली आणि वजन कमी करण्यासाठीचे ऑपरेशनही करून घेतले. मात्र या ऑपरेशनसाठी तब्बल २१ हजार डॉलर्सचा खर्च आला.बदलीच्या ठिकाणाहून घरी परतलेला पती आपल्या स्लिम-ट्रीम बायकोला पाहून भलताच खुश झाला. मात्र या ऑपरेशनसाठी झालेल्या खर्चाचा आकडा ऐकून तो संतापला. काबाडकष्ट करून साठवलेल्या या पैशांनी त्याला एक घर विकत घ्यायचे होते, मात्र पत्नीने ते पैसे ऑपरेशनवर उडवल्याने तो नाराज झाला आणि तिच्यापासून दूर राहू लागला. काही दिवसांनी त्यांच्यातील हा दुरावा वाढतच गेला आणि त्या पतीने पत्नीला सरळ घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
============================================
विमान प्रवास महागणार!
- नवी दिल्ली : जेट इंधनाच्या दरात ९.२ टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे येत्या काळात विमान प्रवासाचे भाडेही महागण्याची चिन्हे आहेत. तेल कंपन्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील किमती सलग चौथ्या महिन्यात वाढल्या आहेत. दिल्लीत जेट इंधनाचा दर (एटीएफ) ९.२ टक्क्यांनी वाढला. हे इंधन किलोमागे ३,९४५.४७ रुपयांनी वाढले. आता त्याची किंमत ४६,७२९.४८ रुपये किलो झाली आहे. तत्पूर्वी १ मे रोजी जेट इंधनाचा दर १.५ टक्क्याने, तर १९ एप्रिल रोजी ८.७ टक्क्यांनी वाढला होता. स्थानिक विक्रीकर आणि मूल्यवर्धित कर स्वतंत्रपणे द्यावा लागत असल्याने विभिन्न विमानतळांवर दर वेगळवेगळे आहेत. इंधनाच्या दरवाढीचा प्रवासी भाड्यावर काय परिणाम होईल, याबाबत विमान वाहतूक कंपन्यांची कोणतीही प्रतिक्रिया तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सिलिंडरमागे २१ रुपयांनी वाढविली आहे. ग्राहकांना वर्षाला १२ गॅस सिलिंडर अनुदानात मिळतात. हा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागतात.
============================================
मोबाइल इंटरनेटचा वापर सुसाट
- मुंबई : मोबाइलवरून वेगवान इंटरनेट सेवा मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर सरत्या तीन वर्षांत इंटरनेटच्या वापरासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसून आले आहे.कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या तुलनेत मोबाइल इंटरनेटच्या वापराचा वेग वर्षाकाठी १५ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मोबाइल उद्योगाशी संबंधित एका अहवालात प्रसिद्ध झाली आहे.गेल्या पाच वर्षात देशात इंटरनेट झपाट्याने वाढले आहे. मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना वापर करणे अधिक सुलभ झाले आहे. मोबाइल इंटरनेटच्या वापरात वाढ होण्यामागचे दुसरे कारण म्हणजे, हा वाढता वापर लक्षात घेऊन आॅनलाइन क्षेत्रात असलेल्या अनेक कंपन्यांनी आपल्या वेबसाइट आणि अॅप्स ही मोबाइलच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभतेने वापरता येतील, अशा पद्धतीने विकसित केली आहेत.
============================================
अहमदाबाद- गुजरातमध्ये 14 वर्षांपूर्वी झालेल्या गुलबर्ग सोसायटी जळीतकांडप्रकरणी अहमदाबाद विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) निकाल देत 24 जणांना दोषी ठरवले असून, 36 जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. 6 जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
गोध्रा दंगलीनंतर अहमदाबाद शहरातील गुलबर्ग सोसायटीत 28 फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या हिंसाचारात कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 58 जणांची हत्या करण्यात आली होती. दंगलीचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने याप्रकरणी नरेंद्र मोदी यांना अंतिम अहवालात क्लीन चीट दिली आहे. एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांना एसआयटीच्या या निर्णयाला विरोध करणारी याचिका महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी या दंगलीचा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीच्या ऐवजी पुन्हा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करावा, अशी मागणी केली होती. ही याचिका 510 पानांची असून, याचिकेसोबत दहा सीडीही न्यायालयात जमा करण्यात आल्या आहेत.
गुलबर्ग जळीतकांडप्रकरणी 24 जण दोषी
| |
-
| |
गोध्रा दंगलीनंतर अहमदाबाद शहरातील गुलबर्ग सोसायटीत 28 फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या हिंसाचारात कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 58 जणांची हत्या करण्यात आली होती. दंगलीचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने याप्रकरणी नरेंद्र मोदी यांना अंतिम अहवालात क्लीन चीट दिली आहे. एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांना एसआयटीच्या या निर्णयाला विरोध करणारी याचिका महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी या दंगलीचा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीच्या ऐवजी पुन्हा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करावा, अशी मागणी केली होती. ही याचिका 510 पानांची असून, याचिकेसोबत दहा सीडीही न्यायालयात जमा करण्यात आल्या आहेत.
============================================
पत्रकार रंजन यांच्या हत्याप्रकरणी संशयित शरण
| |
-
| |
सिवान - सिवानमधील एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाचे ब्यूरो चीफ राजदेव रंजन यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित लड्डन मियाँ हा आज (गुरुवार) न्यायालयात शरण आला. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
राजदेव रंजन यांची 13 मे रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात लड्डन मियाँ याच्यावर संशय होता. तेव्हापासून तो फरार होता. अखेर तो आज न्यायालयात शरण आला. मियाँ हा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचा सहकारी आहे. या दोघांवर रंजन यांच्या हत्येचा आरोप आहे. रंजन यांच्या हत्येनंतर शहाबुद्दीनला सिवानमधून भागलपूरमधील कारागृहात हलविण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली आहे.
बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून टीकेचा सामना करावा लागत असलेल्या नितीशकुमार सरकारने रंजन हत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याचा निर्णय घेतला आहे.
============================================
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत असून, घरांची पडझडी होऊन 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
‘इस्लामाबाद, पंजाब व पख्तनूख्वा भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आहेत. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्लामाबादमधील एक घर पडून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी झालेल्या पडझडीमध्ये 14 नागरिकांना जीव गमवावा लागला असून, 149 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. रावळपिंडीमधील ढोक भागात इमारत पडल्यानंतर विजेचा प्रवाह लागून पाच जणांचा मृत्यू झाला आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.
रावळपिंडीमध्ये 148 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. वादळी वारे व पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस; 14 मृत्युमुखी
| |
-
| |
‘इस्लामाबाद, पंजाब व पख्तनूख्वा भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आहेत. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्लामाबादमधील एक घर पडून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी झालेल्या पडझडीमध्ये 14 नागरिकांना जीव गमवावा लागला असून, 149 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. रावळपिंडीमधील ढोक भागात इमारत पडल्यानंतर विजेचा प्रवाह लागून पाच जणांचा मृत्यू झाला आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.
रावळपिंडीमध्ये 148 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. वादळी वारे व पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
============================================
इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना भूकंपाचा धक्का
| |
-
| |
पडांग - इंडोनेशियातील सुमात्रा बेटांना आज (गुरुवार) सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 इतकी मोजण्यात आली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील पडांग शहराला या भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपानंतर अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पडांग शहरापासून दक्षिणेकडे 155 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुमात्रा बेटांच्या किनाऱ्यालाही धक्का जाणविला आहे.
इंडोनेशियातील सुमात्रा बेटे भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी सतत भूकंपाचे धक्के बसत असतात. या भूकंपामुळे हिंदी महासागरात आलेल्या 9.15 तीव्रतेचा भूकंपाच्या धक्क्याची आठवण झाली. या भूकंपात 12 हून अधिक देशांतील दोन लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
============================================
नवी दिल्ली - ज्येष्ठ विधिज्ञ व माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देऊन चूक झाल्याचे सांगत, त्याबद्दल मी देशातील नागरिकांची माफी मागतो, असे म्हटले आहे.
मोदींना पाठींबा दिल्याने माफी मागतो- जेठमलानी
| |
-
| |
जेठमलानी यांनी मोदींना लक्ष्य करताना म्हटले आहे की, मोदींनी निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. मोदी सरकारने लोकांना फसवले आहे आणि मी त्यांना पाठींबा दिला होता. ती एक चूक होती आणि त्याबद्दल मी सर्व जनतेची माफी मागतो.
============================================
कॅलिफोर्निया विद्यापीठात गोळीबारात दोघांचा मृत्यू
| |
-
| |
लॉस एन्जल्स - येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात बुधवारी झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठात बुधवारी हत्या आणि आत्महत्या प्रकरणात झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळ विद्यापीठ बंद करण्यात आले होते. विद्यापीठातील एका कार्यालयात ही घटना घडली असून, याठिकाणी एकूण तीन गोळ्या चालविण्यात आल्या. घटनास्थळावरून एक बंदुक जप्त करण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून अद्याप या प्रकरणी काही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मृत नागरिकांची ओळख अद्याप पटलेली नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर दुपारपर्यत विद्यापीठ बंद ठेवण्यात आले होते व नंतर पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र, बुधवारी एकही क्लास होऊ शकला नाही.
============================================
No comments:
Post a Comment