===============================
आघाडीच्या काळात अब्जावधींचा ‘लॉटरी घोटाळा’?
मुंबई : सत्तेतून पायउतार होऊन 2 वर्षे उलटूनही आघाडी सरकारचं नावं घोटाळ्यांनीच चर्चेतून जाण्याचं नाव घेत नाही. 2001 ते 2009 या काळात राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे.
या आरोपांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, लॉटरी संचलनालयाच्या तत्कालीन आयुक्त कविता गुप्ता आणि अनेक अधिकारी आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आरोपांच्या केंद्रस्थानी
महत्वाचं म्हणजे तत्कालीन सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं चौकशीअंती हा गैरव्यवहार उजेडात आणला आहे. मात्र, तो चौकशी अहवाल दाबून जयंत पाटील यांनी घोटाळेबाजांना अभय दिल्याचा आरोपही केला जातो आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा छडा लागला?
पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे.
हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक मंदावली
मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांद्रे स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
या मार्गावरील अप आणि डाऊन गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन पिकअवरला कामावर पोहोचण्याच्या धावपळीत असलेल्या मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
हा बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
नववी आणि अकरावीच्याही आता बोर्ड परीक्षा!
पुणे : यंदापासून नववी आणि अकरावीच्या परीक्षाही राज्याच्या बोर्डाकडून घेण्याचा विचार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानं हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर हा निर्णय अंमलात येईल.
जर हा निर्णय अंमलात आला तर नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. दहावीत शंभर टक्के निकाल लागावा यादृष्टीनं विद्यार्थ्यांना नववीपासूनच बोर्डाच्या परीक्षेची तयारी व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ‘जम्बो’ अर्ज
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी एक जम्बो अर्ज दाखल झाला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेही भारतीय संघप्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. या पदासाठी एकूण 57 अर्ज आले आहेत.
अनिल कुंबळेच्या नावावर 132 कसोटी सामन्यांत 619, तर 271 वन डे सामन्यांत 337 विकेट्स आहेत. शिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि बंगलोरचा मेन्टॉर म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी ‘जम्बो’ अर्ज
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी एक जम्बो अर्ज दाखल झाला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेही भारतीय संघप्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. या पदासाठी एकूण 57 अर्ज आले आहेत.
अनिल कुंबळेच्या नावावर 132 कसोटी सामन्यांत 619, तर 271 वन डे सामन्यांत 337 विकेट्स आहेत. शिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि बंगलोरचा मेन्टॉर म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आहे.
मुंबईतील 'या' भागात पाणीबाणी
मुंबई: तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात येत आहे. या काळात भायखळा व दक्षिण मध्य मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात येणार आहे.
अचानक हाती घेण्यात येणाऱ्या या कामामुळे नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. दक्षिण मुंबईत 15 जून रोजी सकाळी 8 ते 16 जून रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
कुठल्या भागात कधी बंद असणार पाणीपुरवठा?
15 जून दुपारी 2 ते 3:
- नायर रुग्णालय
- मुंबई सेंट्रल
- कस्तुरबा रुग्णालय
- ना. म. जोशी मार्ग
- बीडीडी चाळ
- प्रभादेवी जनता कॉलनी
- आदर्श नगर
- एलफिन्स्टन
- लोअर परळ
15 जून दुपारी 4 ते सायंकाळी 7 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10:
- एलफिन्स्टन
- काकासाहेब गाडगीळ मार्ग
- सेनापती बापट मार्ग
- गोखले रोड
- वीर सावकर रोड
- एल. जे. रोड
- सयानी रोड
- भवानी शंकर रोड
- सेना भवन परिसर
- मोरी रोड
- टी. एच. कटियार मार्ग
- कापड बाजार
- माहिम
- माटुंगा
- दादर पश्चिम
16 जून सकाळी 4 ते सायंकाळी 7:
- बीडीडी चाळ
- ना. म. जोशी मार्ग
- सखाराम बाळा पवार मार्ग
- महादेव पालव मार्ग
प्रदर्शनापूर्वी 'उडता पंजाब' समोर आणखी एक अट
चंदीगढः उडता पंजाब या सिनेमाला मुंबई हायकोर्टाने प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले असले तरी, या सिनेमावर वादाचं ग्रहण कायम आहे. पंजाब-हरियाणा हायकोर्टाने सिनेमा रिलीज करण्यापूर्वी प्री-स्क्रिनिंग करण्याची अट ठेवली आहे.
पंजाब-हरियाणा हायकोर्टाने सेन्सॉर बोर्ड आणि उडता पंजाबचे निर्माते यांना 14 जून रोजी प्री स्क्रिनिंगचं आयोजन करण्याची नोटीस बजावली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मान्यता देण्याबाबत कोर्ट निर्णय घेईल, असं वकिलांनी सांगितलं. आज या सिनेमाचं प्री स्क्रिनिंग केलं जाणार आहे.
पंजाब राज्यातील ड्रग्जच्या समस्येवर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखू नयेत, यासाठी सिनेमा पाहूनच कोर्ट निर्णय घेईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला उडता पंजाब सिनेमात 89 कट सुचवून प्रदर्शन रोखल्याबद्दल चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर कोर्टाने सिनेमाला प्रमाणपत्र देण्याचे आदेशही दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर उडता पंजाबच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता, मात्र पंजाब आणि हरियाणा राज्यात सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी कोर्ट सिनेमाची पडताळणी करणार आहे. त्यामुळे उडता पंजाब सिनेमावर वादाचं ग्रहण कायम दिसत आहे.
सचिनचं 'मेटल आर्ट पीस' 24 तासात हटवा, मुंबई महापालिकेचं अल्टिमेटम
मुंबईः मरिन ड्राईव्ह येथे सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ बनवलेलं मेटल आर्ट पीस काढून टाकण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. आरपीजी आर्ट फाउंडेशनला नोटीस बजावून 24 तासांत ही वास्तू हटवण्यास सांगितलं आहे.
आर्ट फाऊंडेशनने 24 तासांत ही वास्तू न हटवल्यास महापालिका स्वतः यावर कारवाई करेल, असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं. यापूर्वीही आरपीजी फाऊंडेशनला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने नोटीस बजावली होती. मात्र त्याचं पालन न झाल्यामुळं पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.
मरीन ड्राईव्ह ही हेरिटेज दर्जा असलेली जागा आहे. मरिन ड्राईव्हला युनोस्कोने देखील हेरिटेज जागेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही वास्तू उभारली जाऊ शकत नाही, असं हेरिटेज समितीचं म्हणणं आहे.
...तूर्तास पेरण्या करु नका: हवामान विभाग
मुंबई: मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळात दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवरच अडकून पडला आहे. त्यामुळे तूर्तास पेरणी करु नका. असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. मात्र, या पावसावर विश्वास ठेवून तूर्तास पेरणी करु नये. कारण मान्सूनसाठी अजूनही अनुकूल स्थिती झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी कऱण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही. यंदा मान्सूनचं केरळमध्ये झालेलं आगमन लांबलं. त्यानंतर अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेनं मार्गक्रमण केलं, परंतु कर्नाटकच्या काही भागात पोहोचल्यानंतर मान्सून पुन्हा मंदावला.
बाष्पयुक्त ढगांचे प्रमाणही कमी असल्यामुळे आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. शिवाय जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमीच राहू शकेल. असंही हवानतज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयएमडीचा अंदाजानुसार राज्यात १३ ते १५ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
स्वत:ची चिता रचून जळगावातील शेतकऱ्याने आयुष्य संपवलं!
जळगाव : जळगावमध्ये शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नामदेव पाटील असं या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. अमळनेर तालुक्यातील सब गव्हाण गावचे ते रहिवाशी होते.
नामदेव पाटील यांनी स्वतःची चिता रचून त्या मध्ये आत्महत्या केल्याचा दुर्दैवी तितकाच धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सब गव्हाण या गावामध्ये घडला आहे. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कर्जबाजारीपणातून ही आत्महत्या केल्याचा नामदेव पाटील यांच्या नातेवैकांचा अंदाज आहे.
नामदेव पाटील याना तीन मुले असून, ते आपल्या लहान मुलाकडे राहत होते. परवा रात्री ते गावाला जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतात आग लागल्याचे दिसल्याने काही तरुण त्या ठिकाणी पोहोचले असता त्याना हा दुर्दैवी प्रकार दिसला. त्यांनी त्यातील व्यक्ती जळताना पाहून वाचविण्याचा देखील प्रयत्न केला.
ठाण्यात चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीत कैद, चोरट्यांचा शोध सुरु
ठाणे : नागरिकांच्या सर्तकेतेनं ठाण्यात मोठी घरफोडी टळली आहे. चड्डी बनियान गँगनं चोरीच्या इराद्यानं ठाण्यातल्या रौनक पार्क सोसायटीत प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.
तसंच ही गँग चोरीच्या आधी कशा शक्कली लढवतात, हेही सीसीटीव्हीत कैद झालं आहे. ठाण्यातल्या वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रौनक पार्कमधल्या बी विंगमध्ये रविवारी रात्री चड्डी गँगनं प्रवेश केला. त्यावेळी फ्लॅट धारकांचे दरवाजे बाहेरुन लावून घेतले. तसंच दरवाजाच्या दुर्बिणीला चिकटपट्टीही लावली.
मात्र, दार तोडण्याचा आवाज ऐकताच रहिवाशांना शंका आली आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना इंटरकॉमवरुन माहिती दिली. सुरक्षारक्षक येत असल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी धूम ठोकली.
रेसिंगचा नाद अंगलट, कार अपघातात पुण्याच्या तरुणीचा मृत्यू
पुणे : विकेंड आला की तरुणाई पार्टी आणि लाँग ड्राईव्हचे प्लॅन आखतात. मात्र पुण्यात अशीच एक पार्टी आणि रेसिंगचा नाद जीवावर बेतला आहे.
मध्यरात्रीपूर्वी पार्टी आणि नंतर कार रेसिंगच्या नादानं पुण्याहून निघालेल्या कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आंबेगावात शुक्रवारी मध्यरात्री कृतिका आणि तिचे एकूण 7 मित्र पार्टी संपवून लाँग ड्राईव्हला निघाले. दोन्ही आय ट्वेंटी कार हाय वेवर निघाल्या. काही मिनिटात रेसिंगचं भूत डोक्यात गेलं आणि वेगानं घात केला.
आय ट्वेंटी कारच्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली: दिल्लीतील एका कार चालकानं मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला अक्षरश: वाऱ्यासारखं उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताची भयानक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
कारचालक एक तरुण असून त्यानं तब्बल चार जणांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.
सुरुवातीला रस्तावरुन चालत असणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला या कारनं जोरदार धडक दिली. कारनं उडवल्यानंतर हा वृद्ध जवळपास 20 फूट लांब रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या गाडीवर जाऊन आदळला. अंगावर काटा आणणारी हि दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
गाडी चालक रात्रीपासून पहाटेपर्यंत दारु पित होता आणि त्यानंतर गाडी चालवताना त्यानं चौघांना उडवलं. त्यापैकी एक घटनेची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
आठव्या वर्षी मॅट्रिक, पंधराव्या वर्षी एमए, उषा सिन्हांच्या डिग्रीवर शंका
पाटणा : बिहारमधील कथित टॉपर्सचे गुण आणि सामान्यज्ञान यांचा ताळमेळ बसत नसतानाच बिहार राज्य शिक्षण मंडळाच्या माजी प्रमुखांची पत्नीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बोर्डाचे माजी प्रमुख लालकेश्वर सिंह यांची पत्नी उषा सिन्हा वयाच्या आठव्या वर्षी मॅट्रिक आणि वर्षभरातच एमए झाल्याचं डिग्रीवरुन दिसत आहे.
बिहार शिक्षण मंडळातील कथित घोटाळ्यात उषा सिन्हा यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मात्र लंकेश्वर आणि उषा सिन्हा हे दाम्पत्य पसार झाल्याची माहिती आहे. कथित घोटाळ्यात त्यांचं नाव आलेलं असतानाच आता उषा यांच्या स्वतःच्या डिग्रीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
उषा सिन्हा या जनता दलाच्या माजी आमदार आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार 2010 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्या 49 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म 1961 मधील आहे, तर उत्तर प्रदेश बोर्डातून 1969 मध्ये (वयाच्या 8 व्या वर्षी) मॅट्रिक झाल्याची नोंद त्यांच्या डिग्रीवर आहे.
बिहार शिक्षण मंडळातील कथित घोटाळ्यात उषा सिन्हा यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मात्र लंकेश्वर आणि उषा सिन्हा हे दाम्पत्य पसार झाल्याची माहिती आहे. कथित घोटाळ्यात त्यांचं नाव आलेलं असतानाच आता उषा यांच्या स्वतःच्या डिग्रीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
उषा सिन्हा या जनता दलाच्या माजी आमदार आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार 2010 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्या 49 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म 1961 मधील आहे, तर उत्तर प्रदेश बोर्डातून 1969 मध्ये (वयाच्या 8 व्या वर्षी) मॅट्रिक झाल्याची नोंद त्यांच्या डिग्रीवर आहे.
1976 मध्ये (वयाच्या 15 व्या वर्षी) अवध युनिव्हर्सिटीतून एमए झाल्याचं त्यांची डिग्री सांगते. विशेष म्हणजे अवध विद्यापीठाची स्थापनाच 1975 मध्ये झाल्याने वर्षभरात त्यांनी मिळवलेल्या पदव्युत्तर पदवीवरही शंका उपस्थित केली जात आहे. 23 व्या वर्षीच त्या मगध विद्यापीठातून पीएचडी झाल्याचं प्रमाणपत्र आहे.
सेक्ससाठी नकार दिला म्हणून पत्नीने केली पतीची हत्या
- ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. १४ - सेक्ससाठी नकार दिला म्हणून पतीची हत्या करणा-या पत्नीला अहमदाबाद सत्र न्यायालयाने सोमनारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषी विमला वाघेलाला (५४) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम.भट्ट यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताना दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला.दंडाची रक्कम भरली नाही तर, विमलाला आणखी सहा महिने तुरुंगात काढावे लागतील. विमला आणि तिचा पती नरसिन नोबेलेनगरमध्ये रहात होते. दोन नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी विमला आणि नरसिन दोघेच घरी होते. विमालाला त्यावेळी पतीबरोबर सेक्स करण्याची इच्छा झाली.पण नरसिनची इच्छा नसल्याने त्याने सेक्ससाठी नकार दिला. विमलाला नरसिनच्या नकाराने संताप आला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. विमलाने नरसिनवर संशय घेत त्याच्यावर विवाहबाहय अनैतिक संबंधांचा आरोप केला.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा अर्ज
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 14 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेनेदेखील अर्ज केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून 57 अर्ज आले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिली आहे. अनिल कुंबळेच्या नावावर 132 कसोटी सामन्यांत 619, तर 271 वन डे सामन्यांत 337 विकेट्स आहेत. शिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि बंगलोरचा मेन्टॉर म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आहे.भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १० जून होती. रवी शास्त्री यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची दीड वर्षे धुरा सांभाळली असून, तेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत. या शिवाय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील, माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत, माजी सहप्रशिक्षक रॉबिन सिंग, विक्रम राठोड व बलविंदर सिंह संधू हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
नागपूरमधील त्या हर्लेक्विन बेबीचा मृत्यू
- नागपूर, दि. १४ - लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे जन्माला आलेल्या 'हर्लेक्विन बेबी'चा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या बालिकेला वाचविण्यासाठी हॉस्पिटलने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु संसर्ग झाल्याने बाळ दगावल्याचे सांगण्यात येते. 'हर्लेक्विन इथायसिस' हा दुर्मिळ त्वचारोग आहे. शनिवारी या आजाराच्या बालिकेला एका महिलेने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जन्म दिला.रुग्णालय प्रशासन या बालिकेच्या उपचारावर विशेष लक्ष ठेवून होते. उपचाराचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलने स्वत:वर घेतला होता. बाळाला बघण्याची नागपूरच्या काही बालरोग तज्ज्ञांनी इच्छा व्यक्त केली. परंतु, बाळावर निओनेटल आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याने पाहता आले नाही. सोमवार १३ जून रोजी बाळाच्या हृदयाची २-डी 'इको' चाचणी करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच बाळ दगावले. गेल्या दोन दिवसांपासून बाळाची श्वसन यंत्रणा तसेच नाडीचे ठोके सामान्य होते. हृदयाच्या इको चाचणीनंतर पुढील उपचाराची दिशा ठरविण्यात येणार होती.दोन दिवस उपचाराला प्रतिसादही मिळत होता. त्यामुळेच शरीराला आवश्यक घटक मिळावे यासाठी नाकात नळी टाकून दूध देण्यात आले.
१५-१६ जून रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे राहणार बंद
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ - लवकरच सुरू होणा-या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्यात येणार असल्याने १५ व १६ जून रोजी एक्स्प्रेस वे बंद राहणार आहे.दुपारी १२ वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होणार असून दोन्ही दिवशी १५-१५ मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळेत एक्सप्रेस हाईवे वरील वाहतूक पूर्णतः बंद राहील.
===============================
रायगडमध्ये २४ तासात ६३.२०मिमी पाऊस
- जयंत धुळपअलिबाग, दि. १४ - गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात एकुण ६३.२० मिमी पाऊस झाला असून, सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद श्रीवर्धन येथे झाली आहे.जिल्ह्यात अन्यत्र म्हसळा १७, मुरुड ९, तळा ६, पोलादपुर ४, सुधागड ३, माथेरान २ तर माणगांव येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातील जिल्ह्यातील सरसरी पर्जन्यमान ३.९५ मिमी आहे.
बर्फाच्या कारखान्यांवर महापालिकेचे छापे
- मुंबई : मुंबईत शीतपेय, फळांचे रस तसेच गोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फामध्ये ई-कोलाय विषाणू आढळल्यानंतर पालिकेने बर्फाच्या कारखान्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे़ यापैकी चार कारखान्यांवर न्यायालयीन कारवाई सुरू आहे़ तर एका कारखान्यातील सामान जप्त करण्यात आले आहे़उष्णतेमुळे हैराण मुंबईकरांच्या शीत पेय व बर्फाच्या गोळ््यांवर उड्या पडू लागल्या आहेत़ मात्र रस्त्यावरच्याच नव्हे तर हॉटेलमध्ये विकण्यात येणाऱ्या थंड पेय व बर्फाच्या गोळ्यात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्याचे उजेडात आले आहे़ अशा काही ठिकाणांहून पाण्याचे नमुने पालिकेने तपासणीसाठी पाठविले असता त्यात ९२ टक्के ई-कोलाय विषाणू आढळले आहेत़याचे तीव्र पडसाद आरोग्य समितीच्या बैठकीत आज उमटले़ याबाबत माहिती देताना प्रशासनाने सांगितले की, मुंबईतील १३ बर्फाच्या कारखान्यांवर छापे टाकण्यात आले़ मुंबईकारांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या पाच कारखान्यांना न्यायालयीन नोटीस पाठविण्यात आली आहे़
ओरलँडो हत्याकांड आम्ही घडविले
- बैरूत : ओरलँडो येथील गे नाइट क्लब हत्याकांडाची जबाबदारी सोमवारी इसिसने घेतली आहे. हे हत्याकांड ‘इस्लामच्या सैनिकाने’ घडविल्याचे म्हटले.इस्लामच्या सैनिकांपैकी एकाला परमेश्वराने ओरलँडोच्या क्लबमध्ये हत्याकांड घडविण्यास परवानगी दिली, असे अल बयान रेडिओच्या बातमीपत्रात म्हटले. वृत्तसंस्था अमाकने रविवारी गे नाइट क्लबवरील हल्ला इस्लामिक स्टेटच्या सैनिकाने केल्याचे म्हटले होते. या हत्याकांडात ५० जण ठार व ५३ जण जखमी झाले. हल्लेखोर ओमर मतीनही यात ठार झाला. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतरचे हे मोठे हत्याकांड ठरले आहे. (वृत्तसंस्था)एकाला अटकदक्षिण कॅरोलिनात तीन बंदुका व स्फोटकांची रसायने बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आपण ‘गे प्राइड परेड’कडे जात होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पश्चिम हॉलीवूडमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘गे प्राइड परेड’मध्ये (समलिंगी व्यक्तींची मिरवणूक) हजारो लोक सहभागी होतात. जेम्स वेस्ले हॉवेल (२०) असे या आरोपीचे नाव आहे.
ट्रम्प म्हणाले, ओबामांनी राजीनामा द्यावा
- वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गे नाइट क्लब’मधील गोळीबाराच्या घटनेसाठी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा न वापरल्याबद्दल अध्यक्ष बराक ओबामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी दहशतवादी संघटनांना धूळ चारण्यासाठी प्रयत्न वाढविण्यास पाठिंबा दर्शविला.ट्रम्प यांनी अनेक टिष्ट्वट करून ओरलँडो हल्ल्यासाठी कट्टर इस्लामी दहशतवादाला दोष न दिल्याबद्दल ओबामांवर टीका केला. ओबामा आता तरी ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करणार आहेत की नाहीत? जर ते करणार नसतील, तर त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले. (वृत्तसंस्था)शिखांना आपल्यावर हल्ले होण्याची वाटते भीतीओरलँडो येथे शनिवारी रात्री झालेल्या ५० जणांच्या हत्याकांडानंतर सूड म्हणून आपल्यावर हल्ले होतील, अशी भीती शीख समाजाला वाटत आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या हत्याकांडानंतर शिखांना ते मुस्लिमांसारखे दिसतात, एवढ्या कारणावरून गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत.
दहशतवाद नष्ट करण्यास एकत्रित प्रयत्न हवेत : मुखर्जी
- अक्रा : दहशतवादाला कोणतीही सीमा नाही आणि त्याला नष्ट करण्यासाठी सुसंस्कृत जगाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. घानाला दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताचा पाठिंबा जाहीर करताना मुखर्जी बोलत होते. मुखर्जी यांचे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले आहे. ते म्हणाले,‘गेल्या तीन दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरलाआहे. दहशतवाद जागतिक संकट बनल्याची घानाची भावना योग्य आहे.’ घानाचे अध्यक्ष जॉनड्रॅमिनी महामा यांनी रविवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात मुखर्जी म्हणाले, ‘दहशतवादाला ना कोणती सीमा आहे ना कोणता विचार. विचारधारा आहे ती हेतुपुरस्सर विध्वंसाची. तुम्ही या संकटाला तोंड देत आहात. भारत त्यात तुमच्यासोबत आहे.’
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलला विक्रेत्यांची पसंती
- मुंबई : आॅनलाइन खरेदी-विक्री वाढलेली असताना विक्रेत्यांकडूनही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-वाणिज्य वेबसाइटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.नेल्सनने जानेवारी ते मार्च या तिमाहीत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. कंपनीने ११८४ आॅनलाइन विक्रेत्यांना या सर्वेक्षणात सहभागी केले होते.या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ३९ टक्के आॅनलाइन विक्रेते हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक ई- वाणिज्य वेबसाइट तपासून पाहतात. या माध्यमातून आपले उत्पादन विकता यावे आणि व्यवसाय वाढविता यावा, हा त्यामागचा उद्देश असतो. ई-वाणिज्य वेबसाइटच्या बाबतीत चांगली माहिती असणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण त्या माध्यमातून बँ्रडबाबत सकारात्मकता वाढते.
आवक घटल्याने टोमॅटो १०० रुपये किलो!
- नाशिक : पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने त्याचा टोमॅटोच्या लागवडीवर मोठा झाला. त्यातच पाणी टंचाई व उन्हाच्या तडाख्यामुळे पिकांवर परिणाम झाला. पंधरवड्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फुलोरा गळून गेला, तर बऱ्याच ठिकाणी उन्हामुळे रोपे सुकली. सध्या बाजार समितीत माल विक्र ीसाठी येत असून, २० किलो टोमॅटोच्या क्रेटला १,३५० रुपये बाजारभाव मिळत आहे. ६५ रुपये प्रति किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे, तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहे. (प्रतिनिधी)पंधरवड्यापासून टोमॅटोला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात आवक घटल्याने भाव तेजीत आले आहेत. वादळी वारा व उन्हामुळे काही ठिकाणी फुलोरा झडला, तर रोपे सुकली. आवक कमी असल्याने व त्यातच मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.
हिंदू सेना साजरा करतेय ट्रम्प यांचा वाढदिवस
| |
-
| |
नवी दिल्ली - मुस्लिम नागरिकांना अमेरिका प्रवेशबंदी करण्याबाबत वक्तव्य करणारे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस आज हिंदू सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
हिंदू सेनेने ट्रम्प यांचे छायाचित्र असलेल्या आमंत्रणात लिहीले आहे की, अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प या मानवतेच्या रक्षणकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले होते. मागील महिन्यात हिंदू सेनेने ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमधल्या यशासाठी होमहवन आयोजित केले होते. ‘वुई लव्ह ट्रम्प‘ असे लिहिलेले पोस्टरही झळकवण्यात आले होते.
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले, "ट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त सात किलोचा केक व भव्य वाद्यवृंदाची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑरलँडो येथे गोळीबाराची घटना घडली असताना देखील आम्ही ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत, कारण त्यांनी इस्लामिक दहशतवादाला ठामपणे विरोध केला आहे. या प्रकारच्या दहशतवादाचा त्रास भारतालाही होत असल्याने ट्रम्प यांची ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. ही एकच व्यक्ती आपल्याला या आजारापासून मुक्तता देऊ शकते. मी प्रार्थना करतो, की ट्रम्प बहुमताने निवडून येऊन इस्लामिक दहशतवादाला नष्ट करतील".
सेन्सॉर बोर्ड दृष्टिकोन बदलेल अशी आशा- बेनेगल
| |
-
| |
वृत्तसंस्थेशी बोलताना बेनेगल म्हणाले, ‘जे चित्रपट निर्माते सेन्सॉरकडे अर्ज करतात ते ‘अडल्ट‘ प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. ते "युनिव्हर्सल‘ (युए) प्रमाणपत्रासाठी अर्ज करीत नाहीत. ही महत्वाची गोष्ट फार थोड्या जणांना माहिती आहे. न्यायालयाने अतिशय महत्वाच्या प्रश्नावर योग्य निर्णय दिला आहे. यासाठी परिश्रम घेतलेल्या वकिलांना आणि चित्रपट निर्मात्यांच्या धैर्याला मी सलाम करतो. मला या निर्णयाने खूप आनंद झाला आहे.‘
इसिसचा म्होरक्या बगदादी हवाई हल्ल्यात ठार?
| |
-
| |
रोम - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त फौजांनी उत्तर सिरीयामधील रक्का शहराजवळ केलेल्या हवाई हल्ल्यांत इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
इराणी सरकारी माध्यमे आणि तुर्कस्तानमधील वृत्तसंस्थांनी इसिसच्या ‘अल अमाक‘ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बगदादीला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी अडीच कोटी अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
‘अल अमाक‘ने जाहीर केलेल्या वृत्तानुसार रमझानच्या पाचव्या दिवशी रक्का येथे झालेल्या हवाई हल्ल्यात ‘खलिफा‘ अल-बगदादी मारला गेला आहे. संयुक्त फौजांकडून याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही. यापूर्वी इराकमधील वृत्तवाहिनी अल सुमारीयाने हवाई हल्ल्यात बगदादी जखमी झाल्याचे वृत्त दिले होते. इसिसच्या विरोधी अमेरिकन फौजांच्या नेतृत्वाखाली विविध देशाच्या फौजांकडून हल्ले करण्यात येत आहे. सिरीया आणि इराकमधील काही शहरांना या फौजांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.
भारतीय हद्दीत 250 चिनी सैनिकांची घुसखोरी
| |
-
| |
इटानगर - अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याच्या घुसखोरीचे नव्याने वृत्त समोर आले असून, सुमारे 250 सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत काही काळ भारतीय भूमीवर वास्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे.
भारतीय हद्दीत चिनी सैन्याची अरेरावी वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. चार दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेकडील कामेंग जिल्ह्यात तब्बल 250 चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. या वर्षातील ही पहिली घुसखोरी आहे. भारतीय सैन्यातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, 9 जून रोजी गस्तीवर असलेल्या चीनी सैन्याने काही काळासाठी ही घुसखोरी केली. मात्र, यांग्स्ते या पूर्व कामेंग भागात तीन तास राहून परत फिरले.
अरुणाचल प्रदेशातील हा भाग चीनने त्यांचा असल्याचा दावा केला होता. मात्र आण्विक पुरवठा समूहाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये चीनने भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर चीनी सैन्याने केलेल्या या घुसखोरीकडे अधिक गांभीर्याने पहिले जात आहे.
वरुण गांधी असावे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारःसिन्हा
| |
-
| |
अलाहाबाद येथे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा भाजपकडून बिगुल वाजविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेत मुलायमसिंह यादव आणि मायवती यांच्यावर जोरदार टीका केली. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा सुरु असताना वरुण गांधींचे नाव घेतले आहे.
सिन्हा म्हणाले की, माझ्या मते उत्तर प्रदेशात वरुण गांधीच मुख्यमंत्रिपदाचे चांगले उमेदवार असतील. ते युवा असून, नागरिकांचीही त्यांना पसंती आहे. त्यांना या पदासाठी संधी दिली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात यावी. बिहारमध्ये केलेल्या चुकीतून बोध घेऊन पक्षाने निर्णय घ्यायला हवा. उत्तर प्रदेशातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे, की त्यांचा सेनापती कोण असणार आहे.
दाभोलकर हत्येच्या कटाचा वीरेंद्रसिंग तावडे सूत्रधार
| |
-
| |
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार डॉ. वीरेंद्रसिंग तावडे असल्याचे तपासात समोर येत असून, याबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ठोस पुरावे गोळा करीत आहे, अशी माहिती तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी सोमवारी "सकाळ‘शी बोलताना दिली. दरम्यान, दाभोलकर यांच्यावर नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एक जून रोजी तावडेच्या पनवेल आणि सारंग अकोलकर याच्या पुण्यातील शनिवार पेठेतील घराची झडती घेतली. चौकशीदरम्यान त्याच्यावर संशय बळावल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तावडेच्या पनवेल येथील घरामधून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधून काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तो मडगाव बॉंबस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्यासोबत इ-मेलद्वारे संपर्कात होता. त्यांना शस्त्रांचा कारखाना सुरू करावयाचा होता. काही हजार सैनिकांची फौज उभी करायची होती, ही बाब त्यांच्या इ-मेलवरील संभाषणातून समोर आली आहे. तसेच, दोन हल्लेखोरांपैकी अकोलकर याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती सीबीआयच्या तपासातून पुढे येत आहे. मात्र, तपास अधिकारी सिंग यांनी त्याला दुजोरा दिला नाही. सीबीआयने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एक जून रोजी तावडेच्या पनवेल आणि सारंग अकोलकर याच्या पुण्यातील शनिवार पेठेतील घराची झडती घेतली. चौकशीदरम्यान त्याच्यावर संशय बळावल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तावडेच्या पनवेल येथील घरामधून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधून काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तो मडगाव बॉंबस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर याच्यासोबत इ-मेलद्वारे संपर्कात होता. त्यांना शस्त्रांचा कारखाना सुरू करावयाचा होता. काही हजार सैनिकांची फौज उभी करायची होती, ही बाब त्यांच्या इ-मेलवरील संभाषणातून समोर आली आहे. तसेच, दोन हल्लेखोरांपैकी अकोलकर याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती सीबीआयच्या तपासातून पुढे येत आहे. मात्र, तपास अधिकारी सिंग यांनी त्याला दुजोरा दिला नाही. सीबीआयने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लाखो विद्यार्थी पटावरून गायब
| |
-
| |
सोलापूर - यू-डायस (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इनफॉरमेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) २०१४-१५ व २०१५-१६ नुसार राज्यातील तीन लाख ८७ हजार ५९६ विद्यार्थी पटावरून गायब झाले आहेत. दोन वर्षांत एवढ्या विद्यार्थ्यांची गळती झाल्याचा साक्षात्कार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला झाला आहे. त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका स्तरावर प्राथमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
यू-डायस प्रणालीच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील विद्यार्थी संख्या निश्चित केली जाते. मागील दोन शैक्षणिक वर्षातील यू-डायसचा अभ्यास केला असता, त्या दोन वर्षांत राज्यात तीन लाख ८७ हजार ५९६ विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांत एवढ्या मुलांची गळती होणे शक्य आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पटावरून गायब झालेली ही मुले सध्या शिक्षणाच्या प्रवाहात आहेत की नाही, हे शोधण्याचे काम करावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी राज्यातील प्रत्येक शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरीत मुसळधार; 101 मिलिमीटर पाऊस
| |
-
| |
रत्नागिरी : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी तालुक्याला बसला. मिऱ्या डोंगरावर ढगफुटी झाल्याप्रमाणे झालेल्या पावसाने आनंदनगर कॉलनीत पाण्याचा लोंढा घुसला. त्यात तीन घरांचे नुकसान झाले. किल्ला येथे घरावर भिंत कोसळून तीनजण जखमी झाले आहेत. वायंगणीत पाणी भरल्याने तीन तास गावाचा संपर्क तुटला होता. निवखोल भिंत कोसळून सहा घरांमध्ये पाणी घुसले. दिवसभरात रत्नागिरीत 101 मिमी पावसाची नोंद झाली.
कोकणात मॉन्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले; मात्र रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागांत पाऊस पडला नाही. काल (ता. 12) रात्री भडे, जाकादेवी, पावसला पाऊस झाला. दुपारी विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्याने रत्नागिरीला झोडपले. मुसळधार पावसामुळे वायंगणी येथील नदीला आलेल्या पुराने गावाचा संपर्क तुटला. सुमारे तीन तास पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. रत्नागिरीत आलेल्या ग्रामस्थांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी पोलिसपाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले होते.
कोकणात मॉन्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले; मात्र रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागांत पाऊस पडला नाही. काल (ता. 12) रात्री भडे, जाकादेवी, पावसला पाऊस झाला. दुपारी विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्याने रत्नागिरीला झोडपले. मुसळधार पावसामुळे वायंगणी येथील नदीला आलेल्या पुराने गावाचा संपर्क तुटला. सुमारे तीन तास पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. रत्नागिरीत आलेल्या ग्रामस्थांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी पोलिसपाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले होते.
किल्ला येथे इस्माइल अली मुजावर यांच्या घरावर भिंत कोसळून नुकसान झाले. घरामध्ये असलेले इस्माइल आणि घरातील दोघे जखमी झाले. त्यात बानू मुजावर, अमिना मुजावर यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवखोल येथील संतोष भुर्केंच्या चाळीजवळ पाच फूट भिंत घरावर कोसळली. त्यामुळे नाल्याचे पाणी भाडेकरूंच्या घरात शिरले. पालिकेने वेळीच लक्ष न दिल्याने हे नुकसान झाल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले.
स्पेनचा चेक प्रजासत्ताकवर निसटता विजय
| |
-
| |
पॅरिस - गेरार्ड पिक्वे याच्या गोलमुळे स्पेनने अखेर चेक प्रजासत्ताकचा बचाव भेदला. युरो विजेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील असलेल्या स्पेनला निर्णायक गोलसाठी 87 व्या मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
आंद्रेस इनिएस्ताच्या पासवर पिक्वे याने निर्णायक गोल करीत चेकचा बचाव भेदला. स्पेनने सामन्यावर हुकमत राखली; पण त्यांच्या आक्रमणात सफाई नव्हती, तसेच फिनिशिंग टचचाही अभाव होता. खरे तर सेस फेब्रॅगॅस याचा हेडरवरील गोल थोडक्यात चुकला, हेही स्पेनचे सुदैवच. त्याचबरोबर स्पेन गोलरक्षक डेव्हीड डे गिया याने चेक आक्रमणांवर चेक ठेवला.
दोन वर्षांपूर्वीच्या विश्वकरंडक स्पर्धेत स्पेन साखळीत गारद झाले होते, तर या स्पर्धेपूर्वी त्यांनी जॉर्जियाविरुद्धचा सराव सामना गमावला होता; पण हे अपयश मागे ठेवताना स्पेनने शॉर्ट पासेसमधील दादागिरी दाखवली होती, त्यांची आक्रमणेही सातत्याने होती. मात्र गोलचा दुष्काळ राहिला. उत्तरार्धात स्पेन जरा जास्तच आक्रमक झाले, पण अखेरच्या मिनिटापर्यंत गोल झाला नाही.
आंद्रेस इनिएस्ताच्या पासवर पिक्वे याने निर्णायक गोल करीत चेकचा बचाव भेदला. स्पेनने सामन्यावर हुकमत राखली; पण त्यांच्या आक्रमणात सफाई नव्हती, तसेच फिनिशिंग टचचाही अभाव होता. खरे तर सेस फेब्रॅगॅस याचा हेडरवरील गोल थोडक्यात चुकला, हेही स्पेनचे सुदैवच. त्याचबरोबर स्पेन गोलरक्षक डेव्हीड डे गिया याने चेक आक्रमणांवर चेक ठेवला.
दोन वर्षांपूर्वीच्या विश्वकरंडक स्पर्धेत स्पेन साखळीत गारद झाले होते, तर या स्पर्धेपूर्वी त्यांनी जॉर्जियाविरुद्धचा सराव सामना गमावला होता; पण हे अपयश मागे ठेवताना स्पेनने शॉर्ट पासेसमधील दादागिरी दाखवली होती, त्यांची आक्रमणेही सातत्याने होती. मात्र गोलचा दुष्काळ राहिला. उत्तरार्धात स्पेन जरा जास्तच आक्रमक झाले, पण अखेरच्या मिनिटापर्यंत गोल झाला नाही.
No comments:
Post a Comment