Wednesday, 15 June 2016

नमस्कार लाईव्ह १५-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मुस्लिमांना वेगळी वागणूक नको: ओबामा 
२- ऑरलँडो; रिसॉर्टमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यासह मगर पसार 
३- अमेरिकन युद्धनौकेचा चिनी नौकेकडून पाठलाग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- ... तर डॉ. नरेंद्र दाभोलकर वाचले असते? 
५- पावसासाठी पर्जन्ययज्ञ करा, शंकराचार्यांचा सरकारला सल्ला 
६- कॅबिनेटची नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी 
७- 6 वर्षांनंतर भारतात पुन्हा पोलिओचा व्हायरस सापडला 
८- चार वर्षात चौपटीने वाढणार इंटरनेट ट्रॅफिक 
९- RSSकडून १० लाख फूल पँट्सची ऑर्डर 
१०- बंगळूरू; फ्लिपकार्ट कंपनीच्या धोरणांवर विक्रेते नाराज 
११- दिल्लीत 'सीआरपीएफ' जवानाची आत्महत्या 
१२- मुस्लिममुक्त भारत वक्तव्यावरून साध्वींवर गुन्हा 
१३- 'उडता पंजाब'चा वाद सर्वोच्च न्यायालयात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी यांनी सर्व आरोप फेटाळले 
१५- पुण्यात 18 डबे मागे सोडून मालगाडी रवाना, कारण... 
१६- नाशिक जिल्हा न्यायालयात आरोपीला चपलेतून गांजा 
१७- लालबागच्या राजाचे पाद्यपूजन 
१८- कोकणात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार 
१९- पुणे; विद्यार्थी सुरक्षेस निर्भय अभियान,दामिनी स्कॉड 
२०- आंध्र प्रदेश: 10 लाख नागरिकांना 'रमजान तोहफा' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- अहमदाबाद; विद्यार्थ्याने स्वत:च उत्तरपत्रिका तपासली, 100/100 गुण देऊनही नापास 
२२- मेघालयात बस दरीत कोसळून 30 प्रवासी दगावल्याची भीती 
२३- 'त्या' कारणासाठी मुंबईतील तरुणाकडून 17 अॅक्टिव्हांची चोरी 
२४- धक्कादायक ! चेन्नईजवळ 50 भटक्या कुत्र्यांची जाळून हत्या 
२५- सोलापूर - छत अंगावर पडल्याने आईसह बाळाचा मृत्यू़ 
२६- पंढरपूर; शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षिकेचा अपघातात मृत्यू 
२७- नोयडा; हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत 
२८- गुडगाव; फेसबुकमुळे वाचले 'आयटी'तील तरुणाचे आयुष्य 
२९- दिल्लीत अल्पवयीन मुलीवर शेजाऱयाचा बलात्कार 
३०- गुवाहाटी; मेघालयात बस दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- सलमान-आमीर साकारणार 'अंदाज अपना अपना २' 
३२- झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारताला 124 धावांची गरज 
३३- आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस  
३४- झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==================================

... तर डॉ. नरेंद्र दाभोलकर वाचले असते?

... तर डॉ. नरेंद्र दाभोलकर वाचले असते?
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 2009 च्या गोवा स्फोटाच्या तपासात हलगर्जी झाली नसती, तर पुढे जाऊन दाभोलकरांच्या हत्येचा कट रचलाच गेला नसता, असा दावा सीबीआयने केला आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार 2009 मधील गोवा बॉम्बस्फोटातील आरोपी मलगोंडा पाटील याने स्फोटानंतर आपला शेवटचा कॉल डॉ. वीरेंद्र तावडेला केला होता. याचसोबत सारंग अकोलकरनेही गोवा स्फोटाच्या आधी आणि नंतर डॉ. तावडेशी फोनवरुन संपर्क साधला होता.

गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य रितीने केला नाही. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे य़सोपवण्यात आला. यात पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाली होती.
==================================

जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणाला आनंद कुलकर्णींचं उत्तर

जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणाला आनंद कुलकर्णींचं उत्तर
मुंबई : लॉटरी घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी यांनी सर्व आरोप फेटाळले. शिवाय, त्यांनी आरोपांवर स्पष्टीकरणही दिलं. मात्र, जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणाला माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी उत्तर दिलं आहे.


जयंत पाटील : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची विनाकारण आणि तडकाफडकी बदलीवर मी आक्षेप घेतल्याच्या रागातून कुलकर्णी यांनी माझ्यावर आरोप केल्याचं दिसतंय.
आनंद कुलकर्णी 1 जानेवारी 2015 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचा चार्ज मी घेतला आणि 31 जानेवारी 2016 रोजी मी सोडला. म्हणजे मी निवृत्त झाले. म्हणजे या 13 महिन्यातील बदल्याच काय, प्रमोशन काय किंवा प्रत्येक फाईलची तुम्ही चौकशी करा. आणि मग बघूया.. विनाकारण झाल्या की सकारण झाल्या.
==================================

आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!

आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!
सोलापूर : आर्ची आलीय असं म्हटलं तरी महाराष्ट्रातली तरुणाई आजकाल पागल होते. आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची एक झलक पाहण्यासाठी पोरं सहज 100-200 किलोमीटरचं अंतर कापून येतात. त्यामुळेच आर्चीचा तिच्या शाळेतला पहिला दिवस कसा आहे

घंटा वाजली, एका लाईनमध्ये जिजामाता कन्या विद्यालयातल्या मुली प्रार्थनेसाठी तयार झाल्या. कॅमेरा आर्चीला शोधतच होता. पण ती काही दिसली नाही. कारण शाळेत गर्दीच तेवढी. प्रार्थना संपली आणि शाळेच्या बाईंनी मुलींचं अभिनंदन केलं आणि शाळेच्या कामगिरीची माहिती पुरवली.


मग मुलींनी आपआपला वर्ग गाठला. दहावी ‘ब’ ची पाटी दिसली. आम्ही रिंकूला शोधू लागलो. पण रिंकू काही दिसली नाही. अर्थात बाई इंग्रजी शिकवत होत्या, त्यामुळे ‘मराठीत सांगितलेलं कळत नाय, इंग्लिशमध्ये सांगू?’, हा आर्चीचा डायलॉग आठवलाच.
==================================

विद्यार्थ्याने स्वत:च उत्तरपत्रिका तपासली, 100/100 गुण देऊनही नापास

विद्यार्थ्याने स्वत:च उत्तरपत्रिका तपासली, 100/100 गुण देऊनही नापास
अहमदाबाद : सध्या शालेय परीक्षा जणू थट्टेचा विषय बनला आहे. बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा समोर आल्यानंतर आता गुजरातमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पेपर लिहिला. त्यानंतर स्वत:च पर्यवेक्षक बनून स्वत:लाच 100 पैकी 100 गुण दिले. मात्र एवढं करुनही तो नापासच झाला. 
हर्षद सरवैया असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने लाल शाईच्या पेनने त्याची भूगोल आणि अर्थशास्त्राची उत्तरपत्रिका तपासली. त्यानंतर उत्तरपत्रिका सुपरव्हायझरकडे जमा केली. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्याविरोधात कॉपी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
==================================

झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारताला 124 धावांची गरज

झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारताला 124 धावांची गरज
हरारे : हरारेच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 123 धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे विजयासाठी भारतासमोर 124 धावांचं आव्हान आहे.


भारतातर्फे जसप्रित बुमराने चार विकेट्स घेऊन झिम्बाब्वेच्या फलंदाजीचं कंबरडं  मोडलं. तसंच यजुवेंद्र चहलने दोन तर धवल कुलकर्णी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेऊन त्याला मोलाची साथ दिली. त्यामुळे झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 123 धावांवर आटोपला.


या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा झिम्बाब्वेला फायदा घेता आला नाही. वुसी सिबांडाने संघातर्फे सर्वाधिक 38 धावा केल्या.
==================================

पावसासाठी पर्जन्ययज्ञ करा, शंकराचार्यांचा सरकारला सल्ला

पावसासाठी पर्जन्ययज्ञ करा, शंकराचार्यांचा सरकारला सल्ला
औरंगाबाद : राज्यभरात दुष्काळी परिस्थितीनंतर पावसाळाही लांबल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यातच ‘पाऊस हवा असेल तर सरकारनं पर्जन्य यज्ञ करावा’, असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी दिला आहे.

राज्यातील जलयुक्त शिवाराचं काम तर उत्तम झालं आहे, असं प्रमाणपत्रही त्यांनी सरकारला दिलं आहे. भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादमध्ये संत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शंकराचार्य नृसिंह भारती बोलत होते.

विशेष म्हणजे शंकराचार्यांनी सल्ला दिला त्यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासारख्या नेत्यांसह राज्यातील वारकरी समुदायही या परिषदेसाठी उपस्थित होता.
==================================

मेघालयात बस दरीत कोसळून 30 प्रवासी दगावल्याची भीती

मेघालयात बस दरीत कोसळून 30 प्रवासी दगावल्याची भीती
सोनापूर : मेघालयामध्ये प्रवासी बस खोल दरीत कोसळून 30 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मेघालयातील पूर्वेकडील डोंगराळ परिसरात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

बसमध्ये 35 जण प्रवास करत होते, त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बचावलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरी प्रचंड खोल असल्यामुळे उर्वरित 30 जण वाचण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

मेघालय आणि आसामच्या बराक व्हॅलीच्या सीमेपासून जवळ असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रातही घटना घडली. या भागात अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यातच पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
==================================

रिसॉर्टमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यासह मगर पसार

रिसॉर्टमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यासह मगर पसार
ऑरलँडो : गे नाईट क्लबवरील दहशतवादी हल्ल्यामुळे चर्चेत आलेल्या ऑरलँडो शहरावरील साडेसाती दूर होण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. रिसॉर्टमध्ये सुट्टीसाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन वर्षांच्या चिमुरड्याला मगरीने हिसकावून पोबारा केल्याची अजब घटना उघडकीस आली आहे.

नेब्रास्कातील एक जोडपं आपल्या दोन वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीसह डिस्नेच्या ल्युक्स ग्रँड फ्लोरिडिअन रिसॉर्ट अँड स्पामध्ये आलं होतं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर पहुडून मंगळवारची रात्र आनंदात घालवण्याचा त्यांचा प्लॅन होता.

सेव्हन सीज लगून या मानवनिर्मित तलावात त्यांचा 2 वर्षांचा चिमुरडा पोटरीभर पाण्यात खेळत होता. ही जागा वाळूपासून अवघ्या काही फुटांवर होती. रात्रीचे नऊ वाजले होते, सारं काही शांत असतानाच अचानक चिमुरड्यावर एका मगरीने हल्ला केला.
==================================

कॅबिनेटची नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी

कॅबिनेटची नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी
नवी दिल्लीः केंद्रिय कॅबिनेटने आजच्या बैठकीत नवीन नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजूरी दिली. या नवीन धोरणामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक फायदे होणार आहेत. पूर्वीच्या धोरणात प्रवाशांना विमानसेवेचा जाच आणणारे अनेक नियम होते, ज्यामुळे विमान प्रवास अडचणीचा होता.


सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला होता. केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या या धोरणात नागरी विमान वाहतूक अधिक सोयीची होणार आहे.
==================================

6 वर्षांनंतर भारतात पुन्हा पोलिओचा व्हायरस सापडला

6 वर्षांनंतर भारतात पुन्हा पोलिओचा व्हायरस सापडला!
हैदराबाद : हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी गटाराच्या पाण्यातून पोलिओचा व्हायरस सापडला आहे. त्यामुळे हादरलेल्या तेलंगणा सरकारने याविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या व्हायरसचं नाव व्हीडीपीव्ही टाईप-2 आहे. गटाराच्या पाण्याची चाचणी केल्यानंतर या व्हायरसचा खुलासा झाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे देशात 2010 नंतर पोलिओचा एकही व्हायरस आढळला नव्हता. मात्र आता चाचणीत व्हायरस सापडल्याने तेलंगणा सरकार चिंतातूर झालं आहे.

तेलंगणाच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्वर तिवारी यांनी सांगितलं की, “आम्ही हैदराबाद आणि रंगा रेड्डी जिल्ह्यात 20 ते 26 जून या काळात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान सहा आठवड्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या बाळांची तपासणी केली जाईल.”

2011 मध्ये देशातून पोलियोचं पूर्णत: उच्चाटन झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखरेख म्हणून तपासणी करण्यात आली होती. त्याचवेळी या व्हायरसचा शोध लागला. 17 मे रोजी नियमित तपासणीदरम्यान गटाराच्या पाण्यात व्हायरस आढळला. हैदराबादच्या विविध भागातून 30 नमुने घेण्यात आले होते.
==================================

पुण्यात 18 डबे मागे सोडून मालगाडी रवाना, कारण...

पुण्यात 18 डबे मागे सोडून मालगाडी रवाना, कारण...
सिग्नल मिळताच गाडी सुरु झाली आणि 18 डबे इंजिनसोबत गेले, तर 18 डबे मागे राहिले. बघ्यांची गर्दी झाल्यावर हा प्रकार ध्यानात आला.
पुणे : काही जणांच्या खोडसाळपणामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या एका मालगाडीला बसला. मालगाडीचे 18 डबे पुढे निघून गेले, तर 18 डबे मागेच राहिले.


कोल्हापूरहुन पुण्याकडे येणारी मालगाडी काळेपडळ या पुण्याजवळील एका जंक्शनवर सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत थांबली होती. त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणा केला आणि दोन डब्यांना जोडणारा पट्टा काढला.


त्यामुळे सिग्नल मिळताच गाडी सुरु झाली आणि 18 डबे इंजिनसोबत गेले, तर 18 डबे मागे राहिले. बघ्यांची गर्दी झाल्यावर हा प्रकार ध्यानात आला.
==================================

'त्या' कारणासाठी मुंबईतील तरुणाकडून 17 अॅक्टिव्हांची चोरी

'त्या' कारणासाठी मुंबईतील तरुणाकडून 17 अॅक्टिव्हांची चोरी
मुंबई : मुंबईत मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका दुचाकी चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे होंडा अॅक्टिव्हा या एकाच मेकच्या तब्बल 17 स्कूटरची चोरी त्याने केल्याचं उघडकीस आलं आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

35 वर्षांच्या राजू नथुलाल शर्माला दुचाकी चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. वाहनचोरीमागील कारण जेव्हा पोलिसांना समजलं, तेव्हा सगळेच जण अवाक झाले. अॅक्टिव्हा ही एकमेव स्कूटर त्याला चालवता यायची, असं त्याने पोलिस चौकशीत सांगितलं.

धारावी, माहिम, वाकोला, भोईवाडा, लोकमान्य टिळक मार्ग, अँटॉप हिल आणि साहूनगर या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून त्याने अॅक्टिव्हा चोरल्याचं तपासात समोर आलं आहे.
==================================

हवाई प्रवाशांसाठी 'अच्छे दिन', नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नव्या बहुप्रतिक्षित नागरी हवाई धोरणाला मंजुरी दिली. नव्या धोरणात हवाई क्षेत्राचा विस्तार आणि प्रवासी संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने ५/२०च्या नियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. 
    आधीच्या अटींनुसार भारतीय हवाई कंपन्यांना परदेशात हवाई वाहतूक सुरु करण्यासाठी पाच वर्षांचा अनुभव अनिवार्य होता. आता नव्या प्रस्तावानुसार भारतीय कंपन्यांकडे परदेशात हवाई सेवा सुरु करण्यासाठी वीस विमानांचा ताफा आवश्यक आहे. मात्र पाचवर्ष थांबावे लागणार नाही. नव्या प्रस्तावानुसार भारतीय हवाई कंपन्या सहजपणे परदेशात हवाई सेवा सुरु करु शकतात. 
    तसेच ठराविक मार्गावरील तासाभराच्या प्रवासाच्या तिकीट दरांवर नियंत्रण आणले आहे. ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. नवे धोरण गेमचेंजर ठरेल आणि २०२२ पर्यंत भारतीय हवाई क्षेत्र जगातील तिस-या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला.
==================================

धक्कादायक ! चेन्नईजवळ 50 भटक्या कुत्र्यांची जाळून हत्या


  • ऑनलाइन लोकमत - 
    चेन्नई, दि. 15 - शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या किझामूर गावात 50 भटक्या कुत्र्यांना जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्यांना मारण्याआधी त्यांच्या जेवणात किटकनाशक औषध मिसळण्यात आलं होतं. मेंढ्या, बक-यांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यांच्या रागातून काही गावक-यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
    एका गावक-याने प्राणीमित्र पी अस्वथ यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर चार दिवसानंतर ही घटना उजेडात आली. अस्वथ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार गावक-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुरली, मुथू, मुरुगदोस आणि जीवा या गावक-यांचा समावेश आहे. आमच्या मेंढ्या, बक-या चरत असताना काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याचं गावक-यांनी सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
    'मी जेव्हा पंचायतीचे प्रमुख आणि इतरांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र 50 हून जास्त कुत्र्यांची हत्या झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत', असं अस्वथ यांनी सांगितलं आहे. 
==================================

सलमान-आमीर साकारणार 'अंदाज अपना अपना २'


  • ऑनलान लोकमत
    मुंबई, दि. १५ : हिंदी चित्रपटांतील विनोदी चित्रपटांची यादी केली तर 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट पहिल्या दहांमध्ये येईल याबाबत काहीच शंका नाही. याचं चित्रपटाचा सिक्वल येत आहे. यामध्ये सलमान आणि अमीर खानचं मुख्य भुमिकेत झळकणार असल्याचे वृत्त आहे. तिकिटबारीवर सरासरी यश मिळवलेल्या या चित्रपटाने लोकांना मनोस्कत हसवलं होतं. यामधील तेजा, क्राइम मास्टर गोगो ह्या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या ओठावर रेंगाळत आहेत. 
    आमीर खान, सलमान खान, रविना, करिष्मा, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना तितकचं खळखळून हसवतो. २२ वर्षांपूर्वी केलेल्या या चित्रपटाची भुरळ प्रत्येकाला अद्याप कायम असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या भागातही सर्व जुनीच स्टार कास्ट असल्याचे वृत्त आहे. अंदाज अपना अपना २ चे कथानक विवेक सोनी आणि हार्दिक मेहतायांनी मिळून लिहले आहे, कॉमेडीने भरलेल हे कथानक चित्रपट निर्मात्याच्या पसंतीस उतरले आहे. 
==================================

झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल


  • ऑनलाइन लोकमत
    हरारे, दि. १५ : मालिकेत विजयी आघाडी घेणारा भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा उडवला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना ४२.२ षटकात झिम्बाब्वेच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडले. भारताने ३ सामन्याच्या मालिकेत आधीच २-१ ने आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून भारत झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याच्या तयारीत आहे. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी मागील २ सामन्याप्रमाणे याही सामन्यात फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजी पुढे त्यांना ५० षटकेही खेळता आली नाहीत. शिंबदाचा अपवाद वगळता एक फलंदाज फार वेळ मैदानावर टिकला नाही. 
    झिम्बाब्वेकडून शिंबदाने ३८ धावांची खेळी केली. सलामीविर चामू चिभाभाने २७ धावांची खेळी केली पण त्याला मोठी खेली करण्यात अपयश आले. ग्रीम क्रेमर, तेंडाई चतारा, डाई चिसोरो, क्रेग इरविन, नेविले मेजिवा, तिमीके यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. 
    भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४ फलंदाज बाद केले, तर चहलने २, पटेल आणि कुलक्रणीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत चागंली गोलंदाजी केली. 
==================================

नाशिक जिल्हा न्यायालयात आरोपीला चपलेतून गांजा


  • ऑनलाइन लोकमत
    नाशिक, दि. १५ :- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या गुन्ह्यातील संशयितास त्याच्या साथीदाराने चपलेतून गांजाच्या पुड्या देण्याचा प्रकार बुधवारी (दि़१५) दुपारी उघडकीस आला़ या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून चपला व गांज्याची पुड्या ताब्यात घेतल्या आहेत़ या संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे़ गत महिन्यात रिपार्इंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी दुहेरी खुनातील आरोपींना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न करून पोलीस कर्मचाऱ्यस दमदाटी केली होती़ या प्रकरणी लोंढे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
==================================

सोलापूर - छत अंगावर पडल्याने आईसह बाळाचा मृत्यू़


  • ऑनलाइन लोकमत - 
    सोलापूर, दि. 15 - घराचे छत पडून मातीच्या ढिगा-याच्या खाली जीव गुदमरून आईसह सहा महिन्याच्या बाळाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना करकंब (ता़ पंढरपूर) येथे घडली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. सारीका रूपेश सदावर्ते (वय ३१) व श्लोक रूपेश सदावर्ते (वय ६ महिने) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
    रात्री एकच्या सुमारास छत अचानक पडले. पावसामुळे छत खराब झाल्याने पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या छताच्या बांधकामात मातीचा वापर जास्त असल्याने झोपी गेलेल्या सारीका व श्लोक यांच्या अंगावर मोठया प्रमाणात माती पडली. ज्यामुळे त्यांचा जीव गुदमरून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पंढरपूर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले़ आहेत. आईसह बाळाता मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़.
==================================

चार वर्षात चौपटीने वाढणार इंटरनेट ट्रॅफिक


  • अरविंद राठोड
    मुंबई : ‘डिजीटल इंडिया’ आणि ४ जी चा वाढता विस्तार पाहता भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेटचा बाजार वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार २०२० पर्यंत भारतात इंटरनेट ट्रॅफिक चौपटीने वाढणार आहे.
    तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘सिस्को’ने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यांच्या ११ व्या ‘सिस्को व्हिज्युएल नेटवर्किंग इंडेक्स’अनुसार २०२० पर्यंत भारतातील इंटरनेट ट्रॅफिक २०१५ च्या तुलनेत दर वर्षी ३४ टक्क्यांची वृध्दी करत असून, चौपटीने वाढत आहे.
    एका सर्वेक्षणानुसार, आगामी पाच वर्षात भारतात १.९ अब्ज इंटरनेटयुक्त उपकरणे असतील, जे २०१५ च्या तुलनेत १.३ अब्जांनी अधिक आहे. त्याच तुलनेत इंटरनेटची गती ५.१ एमबीपीएस वरून २०२० पर्यंत १२.९ एमबीपीएसपर्यंत पोहचू शकेल. या सर्व बाबी लक्षात घेता भारतातील ट्रॅफिक चौपटीने वाढणार हे निश्चित.
==================================

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षिकेचा अपघातात मृत्यू


  • उपरी (पंढरपूर), दि. १५ -  शाळेच्या पहिल्याच दिवशी मोटरसायकवरून शाळेत जाणा-या शिक्षक पती पत्नीच्या दुचाकीला अपघात होऊन शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमधील वाखरी येथे घडली.
    आज प्राथमिक शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे बाळासाहेब पवार व वर्षा पवार हे शिक्षक पती पत्नी दुचाकीवरून शाळेत जात असताना त्यांच्या गाडीला बोलेरो जीपने धडक दिली. या अपघातात वर्षा पवार यांचा मृत्यू झाला तर बाळासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले. शाळेच्या पहिल्या दिवशीच हा अपघात होऊन शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
==================================

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 15 - गणेशोत्सवाचे वेध लागायला लागले की भक्तांना लालबागच्या राजाच्या दर्शनाची ओढ लागते. गणेसोत्सवाच्या काही महिने आधी उत्सवाची तयारी होते. यामध्ये सगळ्यात मोठा भाग असतो गणेश मुर्तीच्या निर्मितीचा...
    याची सुरुवात होते, राजाच्या उजव्या पायाच्या निर्मितिने आणि पाद्यपूजन सोहळ्याने. मंगळवारी हा पाद्यपूजनाचा सोहळा पार पडला असून आता मूर्ती साकारायला सुरूवात होणार आहे. राजाच्या पाद्यपूजनाचे हे छायाचित्र...



==================================

RSSकडून १० लाख फूल पँट्सची ऑर्डर


  • ऑनलाइन लोकमत
    जयपूर, दि. १५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजस्थानमधील टेक्स्टाईल सिटी भिलवाडा येथील ८ कंपन्यांना १० लाख फूल पँट शिवण्याची ऑर्डर दिली आहे. संघाचा गणवेश खाकी विजार ऐवजी फूल पँट असेल, असा निर्णय RSSच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. भिलवाडा शहरातील ८ कंपन्यांना RSSने नवीन पँट तयार करण्यासाठी १० लाख मीटर कापड देण्यात आल्याचे वृत्त ABP न्युजने असे वृत्त दिले आहे. 
    चित्तोडगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये १० लाख मिटर कापडांची प्रोसेसिंग सुरु आहे. चित्तोडगडचे स्वयंसेवक आणि टेलर जयप्रकाश सिंग यांना १० हजार पँट शिवण्याची ऑर्डर मिळाली आहे. पँटच्या शिवणकामाचं स्वरुप अजून ठरलेलं नाही, मात्र एका पँटची किंमक २०० ते ३०० रुपये असेल, असं जयप्रकाश यांनी सांगितलं.
    जयप्रकाश हे यापूर्वी दरवर्षी संघाच्या ५० हजार खाकी विजार, काळी टोपी आणि शर्ट शिवण्याचे काम करत, असं जयप्रकाश यांनी सांगितलं. भिलवाडा येथील ज्या कंपन्यांना १० लाख पँट शिवण्याचं काम देण्यात आलं आहे, त्या सर्व कंपन्या संघ विचारच्या असल्याचे वृत्त आहे.
==================================

हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत


  • ऑनलाइन लोकमत
    नोएडा, दि. १५ - एका भरधाव कारने रिक्षाला जोरदार ठोकर दिल्याने रिक्षा १०० मीटरपर्यंत फरपटत जाऊन दोन तरूणी जखमी झाल्याची घटना नोएडामध्ये घडली. विशेष म्हणजे या अपघाताला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही वा कोणाला अटकही केली नाही. ७ जून रोजी हा अपघात झाला असून त्यामध्ये स्निग्धा बिश्त (२५) व मालविका बिश्त (२३) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
    स्निग्धा ही एक फॅशन डिझायनर असून मालविका एका हॉटेलमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतात. ७ जून रोजी त्या दोघी मॉलमध्ये चित्रपट पाहून ९.३०च्या सुमारास रिक्षातून घरी जात असतानाच सेक्टर ३६ जवळ त्यांच्या रिक्षाला एका भरधाव वेगाने आलेल्या मारती वॅगनने त्यांना जोरदार धडक दिली. एवढेच नव्हे तर कारच्या धडकेमुळे रिक्षा १०० मीटर अंतरापर्यंत फरपटत गेली व त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. 
    अपघातानंतर कारचलाकाने तेथून तत्काळ पळ काढला. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघींना रुग्णालयात दाखल केले.
==================================
कोकणात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीस पोषक वातावरण तयार होत असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर पुन्हा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून (ता. १७) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर रविवारी (ता. १९) काेकणाच्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (ता. १०) जून रोजी कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापलेल्या मॉन्सूनने या भागातून पुढे आगेकूच केलेली नाही. मात्र कोकणासह किनारपट्टीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. १७) बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्राकार वाऱ्यांमुळे मॉन्सूनला चाल मिळणार अाहे. तर पश्‍चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकसह कोकणात पावसाचा जोर वाढण्यास मदत होणार अाहे, रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस बरसण्यास सुरवात होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

==================================
विद्यार्थी सुरक्षेस निर्भय अभियान,दामिनी स्कॉड

पुणे - शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी "निर्भय विद्यार्थी अभियान‘ राबविणार, विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी नव्याने "दामिनी स्कॉड‘ निर्माण करणार अशा ठोस घोषणा मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधींच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आल्या. या बैठकीस मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

"सकाळ‘, पुणे पोलिस आणि महापालिकेचे शिक्षण मंडळ यांनी संयुक्तपणे शहरातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या तुडुंब गर्दीने सभागृह भरले होते. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांवर या वेळी मुक्तपणे चर्चा झाली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी, अवाजवी शुल्कवाढ रोखणे, विद्यार्थिनींची सुरक्षितता अशा विद्यार्थ्यांशी संबंधित विषयावर या वेळी मते व्यक्त करण्यात आली तसेच त्यावर मार्गही सुचविण्यात आले. त्यातील प्रत्येक मुद्दा वहीत नोंदवून घेण्यासाठी मुख्याध्यापकांची लगबग सुरू होती. शाळेभोवती होणारी वाहतूक कोंडी, मुलींची होणारी छेडछाड, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, यांसारखे अनेक प्रश्‍न शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक यांच्यातील समन्वयातून सोडविले जाऊ शकतात, यावर अधिक चर्चा झाली. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेमके काय करणे आवश्‍यक आहे, हे मुख्याध्यापकांनी जाणून घेतले. 
==================================
फेसबुकमुळे वाचले 'आयटी'तील तरुणाचे आयुष्य
-

गुडगाव - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाला फेसबुकमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर वाचविण्यात यश मिळाले आहे.

वरुण मलिक (वय 32) तरुणाने आपल्या कर्मयोगी अपार्टमेंटमधील निवासस्थानात मंगळवारी सकाळी दहा वाजता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वरुण एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. त्याने आपले मनगट कापून छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे आणि सोबत एक पत्र त्याने फेसबुकवर पोस्ट केले. ही पोस्ट पाहून वरुणच्या जवळच्या मित्रांनी वरुण असलेल्या ठिकाणच्या आसपासच्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांनाही कळविले. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर वरुणला त्याच्या डॉक्‍टर असलेल्या भावाने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. तो सध्या अतिदक्षता विभागात असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वरुण सध्या बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती वरुणच्या पालकांनी दिले.

आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र वर्षभरापूर्वी वरुणच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे एकटेपणाच्या भावनेमुळे तो प्रचंड वैफल्यावस्थेत गेला होता. ‘मी एकटा असून यापुढे मला जगणे शक्‍य नाही. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये‘, असे त्याने फेसबुकपोस्टमध्ये लिहिले होते.
==================================
आंध्र प्रदेश: 10 लाख नागरिकांना 'रमजान तोहफा'

हैदराबाद - आंध्रप्रदेशमधील दारिद्य्र रेषेखालील दहा लाख मुस्लिम नागरिकांना रमजाननिमित्त सरकारने भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रमजाननिमित्त देण्यात येणाऱ्या उपहारामध्ये पाच किलो गहू, दोन किलो साखर, एक किलो शेवया आणि 100 ग्रॅम तूप या वस्तूंचा समावेश आहे. हा ‘रमजान तोहफा‘ आंधप्रदेशमधील दारिद्य्र रेषेखालील शिधापत्रिका असलेल्या मुस्लिम नागरिकांना 1 ते 7 जुलै दरम्यान रेशन दुकानात या वस्तू मिळणार आहेत. कॅबिनेटच्या उप समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तसेच नागरी पुरवठा विभागांना या भेटवस्तू उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारने विविध समुदायातील नागरिकांना भेटवस्तू दिल्या आहेत. त्यासाठी अलिकडेच 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. जानेवारी 2015 पासून अशा भेटवस्तू देण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये संक्रांतीनिमित्त भेटवस्तू तसेच नाताळानिमित्त भेटवस्तूंचा समावेश होता. या साऱ्या भेटवस्तू नागरी पुरवठा केंद्राद्वारे वितरित करण्यात आल्या होत्या.
==================================
दिल्लीत अल्पवयीन मुलीवर शेजाऱयाचा बलात्कार

नवी दिल्ली- नैऋत्य दिल्लीतील द्वारका भागात एका चौदा वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱया 35 वर्षाच्या नागरिकाने बलात्कार केल्याची घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घराशेजारी राहणाऱयाने चौदा वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला होता. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर बलात्कार करणाऱ्याला अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.‘

‘पीडित मुलीचे वडील एका स्थानिक राजकीय नेत्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. राजकीय नेता राहात असलेल्या इमारतीमध्येच ते चौथ्या मजल्यावर राहतात. इमारतीमध्ये शेजारी राहणाऱ्या एकाने बलात्कार केला,‘ अशी माहिती पोलिसांनी दिली.
==================================
फ्लिपकार्ट कंपनीच्या धोरणांवर विक्रेते नाराज

बंगळुरू: ऑनलाइन खरेदी-विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टसमोर मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कंपनीच्या नव्या धोरणांवर नाराज असलेल्या काही विक्रेत्यांनी कंपनीच्या मंचावरुन उत्पादनांची विक्री थांबविण्याचा इशारा दिला आहे. फ्लिपकार्टवर तब्बल 90,000 विक्रेते आपल्या उत्पादनांची विक्री करतात. त्या तुलनेत, नाराज विक्रेत्यांचा आकडा नगण्य आहे. परंतु सध्या अॅमेझॉन इंडियाचे देशभरात आपले जाळे पसरविण्यासाठी सुरु असलेले वेगवान प्रयत्न लक्षात घेता विक्रेत्यांची पीछेहाट फ्लिपकार्टसाठी चिंताजनक ठरु शकते.

फ्लिपकार्टने येत्या 20 जूनपासून विक्रेत्यांकडून 5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कमिशन आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिपिंग शुल्क, रिव्हर्स शिपिंग शुल्क आणि त्याशिवाय ग्राहकांनी परत केलेल्या उत्पादनांवरील शुल्कदेखील विक्रेत्यांनाच भरावे लागणार आहे. त्यामुळे कंपनीने धोरणात ‘एकतर्फी बदल‘ केल्याचा आरोप करीत दोन व्यापारी संघटनांनी फ्लिपकार्टवर आपली उत्पादने विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणांमुळे, व्यवसाय खर्चात वाढ होणार असल्याचे त्यांचे मत आहे. 
==================================
दिल्लीत 'सीआरपीएफ' जवानाची आत्महत्या

नवी दिल्ली - दिल्लीतील मुख्यालयात आज (बुधवार) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने स्वतःजवळील पिस्तुलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सीआरपीएफच्या मुख्यालयातील स्वच्छतागृहात आज सकाळी दहा वाजता हेड कॉन्स्टेबल हेमंत कुमार (वय 25) यांचा मृतदेह आढळला. सीआरपीएफच्या जनसंपर्क विभागात कार्यरत असलेला हा जवान नेहमीप्रमाणे ड्युटीवर आला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्याने स्वतःजवळील पिस्तुलमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. 

हेमंत कुमार हा 2012 मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाला होता. घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
==================================
मेघालयात बस दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू

गुवाहाटी (मेघालय)- पूर्व जयंतिया जिल्ह्यात मंगळवारी (ता. 14) रात्री बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.

जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक लेथिंद्र संगमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला मंगळवारी रात्री 9.45 मिनिटांनी अपघात झाला. बस खोल दरीत जाऊन कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर बचाव दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.‘

‘अपघात झालेले ठिकाण हे अपघातग्रस्त ठिकाण आहे. यापूर्वीही तेथे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे बचाव दलाच्या पथकाशी संपर्क होत नाही. यामुळे मृतांची नावे व अधिक माहिती मिळू शकली नाही,‘ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
==================================
मुस्लिमांना वेगळी वागणूक नको: ओबामा

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील रिपल्ब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या दहशतवादासंदर्भात केलेल्या विधानावर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीव्र टीका केली आहे. "आम्हाला अशी अमेरिका नको आहे,‘ अशी प्रतिक्रिया ओबामा यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.

अमेरिकेविरोधातील दहशतवादाशी संबंध असलेल्या सर्व देशांमधील नागरिकांना अमेरिकेमध्ये येण्यास बंदी करावी, अशा आशयाचे विधान ट्रम्प यांनी केले होते. अमेरिकेमधील ओरलॅंडो येथील एका गे क्‍लबवर ओमर मतीन या दहशतवाद्याने नुकत्याच केलेल्या हल्ल्यामध्ये 49 नागरिक मृत्युमुखी पडले. ट्रम्प यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना ही योजना मांडली होती. अमेरिकेच्या राष्ट्रीय हितास बाधा उत्पन्न करण्यासंदर्भातील संशयावरुन कोणत्याही नागरिकाच्या अमेरिकेमधील प्रवेशावर बंदी आणण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना देण्यात यावा, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. 
==================================
मुस्लिममुक्त भारत वक्तव्यावरून साध्वींवर गुन्हा

उन्नाव - भारताला आता मुस्लिममुक्त करण्याची वेळ आल्याचे वक्तव्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राची यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साध्वी प्राची यांनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी थेट भारताला मुस्लिम नागरिकांपासून मुक्त करण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल उन्नाव येथील बहुजन मुक्त मोर्चाचे सदस्य संदीप कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. साध्वी प्राची यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रुरकी येथे झालेल्या सभेत साध्वी प्राची म्हणाल्या होत्या की, भारताला आपण काँग्रेसमुक्त बनविण्यात यशस्वी होत आहोत. आता भारत मुस्लिममुक्त करण्याची वेळ आहे. शाहरुख खानचे दोन चित्रपट फ्लॉप झाला की, हिंदू नागरिकांची आठवण होते. आमीर खानला त्याच्या आगामी दंगल चित्रपटातून परिणाम भोगावे लागतील. ही खान मंडळी खातात हिंदुस्तानात आणि गुणगान गातात पाकिस्तानाचे.
==================================
'उडता पंजाब'चा वाद सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली - "उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत  पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या "ह्युम राईटस्‌ अवेअरनेस असोसिएशन‘ नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘उडता पंजाब‘मधून पंजाबची प्रतिमा खराब दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयात हस्तक्षेप करू नये असे याचिकेत म्हटले आहे. तसेच या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयीन नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच या याचिकेबाबत सुनावणी करता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सेन्सॉर बोर्डाने "उडता पंजाब‘मधील अनेक दृश्‍ये तसेच काही शब्द वगळण्याचा निर्णय दिला होता. त्यावर चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

अंमली पदार्थावर आधारित "उडता पंजाब‘ चित्रपटातील केवळ एक आक्षेपार्ह दृश्‍य वगळून तो प्रदर्शित करण्यात यावा. तसेच दोन दिवसांत चित्रपटाला "ए‘ प्रमाणपत्र द्यावे, असा निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या आदेशामुळे येत्या 17 जून रोजी "उडता पंजाब‘ प्रदर्शित होऊ शकणार आहे. मात्र स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेमुळे कदाचित हे प्रदर्शन लांबण्याची शक्‍यता आहे.
==================================
अमेरिकन युद्धनौकेचा चिनी नौकेकडून पाठलाग

ओकिनावा - दक्षिण चिनी समुद्राजवळील सागरी क्षेत्रामध्ये जपान व भारताबरोबरील आठ दिवसीय नौदल सरावामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या जॉन सी स्टेनिस या अमेरिकन विमानवाहु युद्धनौकेवर एका चिनी नौकेकडून "देखरेख‘ ठेवण्यात येत असल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.

10 हजार टन वजन असलेल्या स्टेनिसने दक्षिण चिनी समुद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर या चिनी नौकेकडून तिचा पाठलाग करण्यात येत होता. पश्‍चिम प्रशांत महासागरामध्ये चिनी नौदल आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा सराव करण्यात येत आहे. 18 एफ-16 विमाने असलेल्या स्टेनिसने ओकिनावा या जपानी द्वीपसमुहाजवळ जपान व भारताच्या नौदलांबरोबर सरावामध्ये सहभाग घेतला आहे.

चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर जपान या बेटांवरील संरक्षण व्यवस्था अधिक बळकट करत आहे. तैवानपासून हे ठिकाण 100 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे.
==================================

No comments: