Tuesday, 7 June 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तुर्कस्थान; इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार 
२- 26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य 
३- अमेरिकेकडून २०० दुर्मिळ मूर्ती भारताला परत 
४- लंडन; मेक्‍सिकोला 6.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नवे अॅप 
६- लडाखला दिल्लीहून थेट बस !
७- त्रिपुरा:कॉंग्रेसच्या 6 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश 
८- कॉंग्रेसमध्ये एकाच आडनावाचा नेता- भाजप 
९- मोदींची चांगली कामे 'पप्पू'ला समजत नाहीत - केंद्रीय मंत्री राम शंकर कथेरिया 
१०- नायब राज्यपालांची दिल्लीवर पाळत- केजरीवाल 
११- सरकार आणणार व्हिसा नियमांमध्ये शिथिलता 
१२- उत्तराखंडमधील कुमांऊमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, सर्च ऑपरेशन सुरु 
१३- मान्सून केरळमध्ये दाखल - स्काय मेट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचं राज्यभरात आंदोलन 
१५- पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर 
१६- गुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी 
१७- स्मार्ट सिटीची योजना चुकीची आहे - ममता बॅनर्जी 
१८- भंडारा; ४ लाखांची देशी-विदेशी दारु जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- बोपखेलवासियांना 15 किमीचा वळसा नक्की 
२०- चेन्नई; हेअर ट्रान्सप्लांटनंतर मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 
२१- नाशिक; चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून  
२२- नागपूर; शहीद धनराज प्रभाकर मेश्राम यांना अखेरची मानवंदना 
२३- सिंधुदूर्गात पावसाची हजेरी 
२४- लखनऊ; उत्तर प्रदेशमध्ये उपासमारीने एकाचा मृत्यु 
२५- बंगळूर; अपघात होऊनही 'तिने' गाठला लग्नाचा मुहुर्त 
२६- उत्तर प्रदेश - सीतापुरमध्ये वादळामुळे भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू 
२७- कोल्हापूर : पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २ शाळकरी मुलांचा मृत्यू  
२८- सोलापूर - शहरात मोकाट कुत्र्याचा धिंगाणा, १३ जण जखमी 
२९- मध्यप्रदेश - छत्तरपूर येथील इशा नगर परिसरात बस अपघातात एकाचा मृत्यू तर 25 जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'उडता पंजाब' सिनेमावरुन देशभरात वादाला पंख 
३१- झुकरबर्गचे ट्विटर अकाऊन्ट हॅक; आपण घ्यावयाची काळजी 
३२- इंग्लंडच्या जोडीने मोडला द्रविड-गांगुलीचा विक्रम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===================================

पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर

पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर
पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे माऊण्ट एव्हरेस्ट एकत्र पादाक्रांत करणारं पहिलं भारतीय जोडपं ठरलं आहे.
पुणे : पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे माऊण्ट एव्हरेस्ट एकत्र पादाक्रांत करणारं पहिलं भारतीय जोडपं ठरलं आहे.
महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड यांनी सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून माऊण्ट एव्हरेस्ट एकत्र सरणारं एकमेव जोडपं ठरलं आहे. 30 वर्षीय तारकेश्वरी आणि दिनेश हे दोघंही 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.


दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं ते सांगतात. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती. त्यामुळे हा अभिमानाचा क्षण अनुभवल्यानंतर बाळाची चाहूल घेण्यासही ते उत्सुक आहेत.
===================================

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचं राज्यभरात आंदोलन

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचं राज्यभरात आंदोलन
अकोला/औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरुन सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.  त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विविध जिल्ह्यात सरकारविरोधात आंदोलनं केली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जालन्यातील भोकदरन परिसरात आज मोर्चा काढला. यावेळी सुप्रीया सुळेंनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर जोरदार टीका केली.

राज्यात शेतकरी संकटात असताना सरकारला लाल दिवा महत्वाचा वाटतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात कर्जमाफी झाली नाही तर आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.

तर तिकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादच्या खुलताबादेत आंदोलन केलं. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर, धनंजय मुंडे परळीत मोर्चा काढला.
===================================

बोपखेलवासियांना 15 किमीचा वळसा नक्की

बोपखेलवासियांना 15 किमीचा वळसा नक्की ?
पुणे: पावसळ्यात सुरक्षेच्या कारणामुळे लष्कारानं मुळा नदीवर उभारलेला तरंगाता पूल काढून टाकण्याचं काम सुरु केलंय. त्यामुळे बोपखेल वासियांना पुणे किंवा पिंपरीत येण्यासाठी 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.

मात्र अजूनही पर्यायी रस्त्याविषयी संभ्रमावस्था कायम आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यात चर्चा झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या धर्तीवर तात्पुरता पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यादृष्टीनं अजून तरी कुठलीही कारवाई होत नाही.

बोपखेल येथील रहदारीचा रस्ता वर्षांपूर्वी बंद करण्यात आला. त्यानंतर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात तरंगता पूल उभारण्यात आला. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळ्यात सात जूनपासून तो पूल काढून टाकण्याची भूमिका लष्करानं घेतली. त्यामुळे आता लोकांच्या संतापला सामोरं जावं लागू शकतं.
===================================

गुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी

गुरुदास कामतांच्या घरासमोर समर्थकांची घोषणाबाजी
मुंबई: राजकारण आणि काँग्रेस पक्षातून संन्यास घेतलेले काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या घरासमोर आज काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबईत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणणाऱ्या नेत्याचा राजकारणात अशा प्रकारे शेवट होणं योग्य नसल्याचं म्हणत, कार्यकर्त्यांनी या प्रश्नी पक्षनेतृत्वाला लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.
===================================

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नवे अॅप

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नवे अॅप
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी केंद्र सरकारच्यावतीने विविध शासकीय कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. योग दिनासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने नवीन अॅप नुकतेच लाँच केले. मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर हे अॅप लाँच करण्यात आले आहे.
२१ जून रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा २१ जूनचा दुसरा योग दिन असल्यामुळे यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी होत आहे. यंदाच्या योग दिनाला सोशल मीडियाशी कनेक्ट करण्याच्या उद्देशाने हे नवे अॅप लाँच करण्यात आले आहे.
या अॅपमध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अॅण्ड नॅचरोपॅथी (CCRYN)कडून तयार करण्यात आलेली नियमावली देण्यात आली आहे. तसेच ४५ मिनिटांचा योगा तुम्हाला कसा उत्तम आरोग्य देऊ शकतो याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जीमपेक्षा योगाचे महत्त्व या अॅपच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्व अॅन्ड्राईडधारकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
===================================

अमेरिकेकडून २०० दुर्मिळ मूर्ती भारताला परत

अमेरिकेकडून २०० दुर्मिळ मूर्ती भारताला परत
वॉशिंग्टन : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली.
या भेटीत भारतातून तस्करी करून आणलेल्या 200 दुर्मिळ मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. यावेळी ब्लेअर हाऊसच्या अॅटर्नि जनरलही उपस्थित होत्या.
या दुर्मिळ मूर्तींमध्ये ब्रांझच्या गणपती मूर्तींसोबत जैन धर्मियांची बाहुबालीच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल दहा कोटी अमेरिकन डॉलर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, ” काहींना या मूर्तींचे मूल्य पैशांच्या स्वरूपात वाटत असेल, मात्र आमच्यासाठी हा संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे.”
यातील अनेक मूर्ती या दोन हजार वर्ष प्राचीन आहेत. यातील एक संतमणी विचावर यांची आहे. या मूर्तीला चेन्नईच्या शिलाँग मंदिरातून चोरण्यात आले होते.
या मूर्तीसंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण करून त्या भारतात आणल्या जातील, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते प्रकाश स्वरुप यांनी सांगितले.
===================================

हेअर ट्रान्सप्लांटनंतर मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

हेअर ट्रान्सप्लांटनंतर मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
चेन्नई : हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर चेन्नईतील एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने नंगबक्कमच्या सलूनमध्ये मृत्यूच्या एक दिवस हेअर ट्रान्सप्लांट सीटिंग केलं होतं.


मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांनी चेन्नईच्या वैद्यकीय शिक्षण संचलनालयात तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघड झाली. अॅनास्थेशियामुळे अॅलर्जी झाल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.


तर स्टेट मेडिकल काऊंसिलने तीन डॉक्टरांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे की, पात्र नसतानाही तुम्ही शस्त्रक्रिया का केली आणि तेही नॉन-मेडिकल सेंटरमध्ये?
===================================

'उडता पंजाब' सिनेमावरुन देशभरात वादाला पंख

'उडता पंजाब' सिनेमावरुन देशभरात वादाला पंख
मुंबई : दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी उडता पंजाब या सिनेमावरुन पंजाबमध्ये वादळ उठलं आहे. प्रदर्शनाआधीच त्याच्या नावावरुन वाद सुरु झाले आहेत. त्यातच सेन्सॉर बोर्डाने सिनेमामध्ये एक दोन- नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले आहेत. याशिवाय नावातून पंजाब हा शब्दही हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

निर्माता अनुराग कश्यपचं टीकास्त्र
प्रत्येक चित्रपटाआधी सेन्सॉरच्या जाळ्यात अडकणाऱ्या अनुराग कश्यपचा संयम यावेळी सुटला आहे. त्याच्या आगामी उडता पंजाब चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं चालवलेल्या कात्रीवर तो कमालीचा नाराज झाला आहे.

इतका की त्यानं भारताची तुलना थेट उत्तर कोरियाशी केली आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात एक दोन- नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले असून, नावातील पंजाब शब्दालाही आक्षेप घेतला आहे.
===================================

झुकरबर्गचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले तुमचं काय ?


  • - अनिल भापकर
    औरंगाबाद, दि. ७ - सध्या जगभरातील चर्चेचा विषय म्हणजे जर फेसबुक चा संस्थापक मार्क झुकरबर्ग चे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊ शकते तर आपले काय ? सोशल मेडिया मधील येवढा मोठा बाप माणूस ज्याने सोशल मेडिया कशाला म्हणतात हे अख्या जगाला शिकवले त्यावर ही वेळ यावी . म्हणजे सोशल मेडिया च्या सुरक्षे साठी काय करायला पाहिजे हे सगळ्या जगाला सांगणाऱ्या वर त्याचे ट्विटर अकाऊन्ट हॅक झाले हे सांगण्याची वेळ यावी. असो आपण मात्र आपले सोशल मिडिया अकाऊन्ट कसे सुरक्षित करता येईल हे बघण्याचा पुसटसा प्रयत्न करु.
    सोशल मेडिया अकाऊन्ट जसे कि फेसबुक , ट्विटर , लिंकडन आदी अकाऊन्टच्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे हे पाहू....
    १. तुमच्या' सोशल मेडिया अकाऊन्ट वर अनोळखी माणसाचा मेसेज शक्यतो ओपन करू नका . जर मेसेज फारच महत्वाचा असेल तर शक्य झाल्यास ज्याचा मेसेज आहे त्याला इतर मार्गाने संपर्क करून कन्फर्म करा जसे कि इमेल करून वगैरे .
    २.एखाद्याला ट्विटर वर फॉलो करताना किंवा फेसबुक वर मैत्रीचा स्विकार करताना अकाऊन्ट फेक तर नाही ना याची खात्री करा.
    ३. फ्री ऑफर असणारी लिंक असल्यास त्यावर शक्यतो क्लिक करू नका .
    ४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड नियमीत बदलत राहावे आणि शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये. तसेच तुमचे नाव किंवा तुमच्या परिजनाचे नाव पासवर्ड मध्ये वापरू नये ज्यामुळे हॅकरला पासवर्ड चा अंदाज लावायला सोपे होईल . पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले .
    ५. तुमच्या सोशल मेडिया वर जर काही अनपेक्षित घडत असेल याचाच अर्थ तुमचे अकाऊन्ट हॅक झाले तेव्हा लगेच तुमचा पासवर्ड बदला .
    ६. सोशल मेडिया वर वावरताना प्रत्येक सोशल साईट चा पासवर्ड वेगवेगळा ठेवा जसे कि ट्विटर चा पासवर्ड वेगळा फेसबुक चा पासवर्ड वेगळा असे.
===================================

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून


  • ऑनलाइन लोकमत
    पेठ (नाशिक), दि. ७ -  तालुक्यातील वांगणी येथील एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन केल्याची घटना घडली असून संशयीत पती फरार झाला आहे. तर या हृदयद्रावक घटनेची आठ वर्षाची मुलगी प्रत्यक्षदर्शी ठरली आहे.
       वांगणी येथील बाबुराव प्रधान हा पत्नी व मुलीसह वांगणी शिवारात शेतातील झापावर राहतो. पत्नी वनिता बाबुराव प्रधान वय- 35 हिचेवर तो नेहमी चारित्रया विषयी संशय घेत असे. या कारणावरून त्यांच्यात कौटूबिक कलह निर्माण झाले होते. याच कारणावरून त्यांच्यात झालेल्या वादात पती बाबुराव याने लाकडी दांडक्याने पत्नी वनितास जबर मारहाण केली . यामध्ये डोक्याला मार लागल्याने वनिता बेशुध्द पडली. या प्रकाराने भयभीत झालेल्या पतीने घटनास्थळावरून पळ काढला.
        हा सारा प्रकार घरातच असलेल्या आठ वर्षाच्या चिमूकलीने बघितला. भयभीत अवस्थेत तिने धावत येऊन गाव गाठले. झालेला प्रकार नागरिकांना सांगितला.परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता वनिता निपचित पडल्याचे दिसून आले. वांगणीचे हिरामण बठाले यांनी पेठ पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी वनिता हिस पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उनिरिक्षक मुंढे फरार संशयीत पतीचा शोध घेत आहेत.
===================================

शहीद धनराज प्रभाकर मेश्राम यांना अखेरची मानवंदना


  • शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार : हजारो शोकाकुल नागरिकांनी दिला अखेरचा निरोप
    नागपूर : केंद्रीय दारूगोळा भांडारात (सीएडी कॅम्प) झालेल्या भीषण अग्निस्फोटात वीरमरण आलेले शहिद धनराज प्रभाकर मेश्राम यांच्यावर मंगळवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी शहिद मेश्राम यांना हुंदके आवरत अखेरचा निरोप दिला. पुलगावच्या सीएडीत ३० मेच्या मघ्यरात्री भीषण अग्निस्फोट झाला. जानमालाची भयावह हानी टाळण्यासाठी कर्नल रंजीत पवार आणि मेजर के. मनोजकुमारसह एकूण १९ जणांनी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले.
    स्फोट एवढा भयंकर होता की त्यातील धनराज प्रभाकर मेश्राम (नागपूर), कुलदीपसिंग श्रीसंतलाल (हरियाणा), अरविंदकुमार पीडदान (भिवानी, हरियाणा), शेखर बाळस्कर (पिंपळा ता. आर्वी.), बाळू पाखरे (पुलगाव) आणि प्रमोद मेश्राम(पुलगाव) यांच्या देहाची अवस्था ओळखण्यापलिकडे झाली. त्यामुळे या सहा शहिदांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाने त्यांची नागपूरच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करवून घेतली. सोमवारी तसा अहवाल मिळाल्यानंतर सीएडी प्रशासनाने या शहिदांचे पार्थिव त्यांच्या परिवाराच्या स्वाधिन केले. त्यानुसार, शहिद धनराज मेश्राम यांचे पार्थिव सैन्यदलाच्या सजवलेल्या वाहनात त्यांच्या ओमनगरातील घरी आणण्यात आले. ही माहिती कळताच आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येत नागरिक शहिद मेश्राम यांच्या घरी पोहचले.
===================================

सिंधुदूर्गात पावसाची हजेरी


  • ऑनलाइन लोकमत 
    सिंधुदूर्ग, दि. 07 - पावसाने सिंधुदूर्गात आगमन केलं आहे. मंगळवारी सकाळी सिंधुदूर्गात काही ठिकाणी पाऊस पडला. गर्मीने हैराण झालेल्या सिंधुदूर्गवासीयांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. बुलडाणा, जालना, पिंपरी, मुरुड, गडचिरोलीमध्ये पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी पावसामुळे घरांचे पत्रे उडून गेले होते, तसंच वीजपुरवठाही खंडीत झाला होता. 
    देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे़ त्यामध्ये ८ टक्के फरक पडू शकतो़ हवामान विभागाने १२ एप्रिलला पहिला अंदाज जाहीर केला होता़ त्यात देशभरात १०६ टक्के पावसाचे संकेत दिले होते़ या दुसऱ्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम भारतात १०८ टक्के, मध्य भारत ११३ टक्के, दक्षिण व द्वीपसमूहात ११३ टक्के आणि पूर्वात्तर भारत ९४ टक्के पावसाची शक्यता आहे़ जुलैत संपूर्ण देशभरात १०७ टक्के आणि आॅगस्टमध्ये १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, त्यात ९ टक्के इतका कमी-जास्त फरक पडू शकतो. पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र विभाग (आयआयटीएम), भूविज्ञानशास्त्र मंत्रालयातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी मॉन्सून मिशन प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या कपल्ड डायनॅमिक मॉडेलच्या साहाय्याने यंदाचा मॉन्सून अंदाज जाहीर केला आहे.
===================================

इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोटात, ११ ठार


  • ऑनलाइन लोकमत 
    इस्तंबुल, दि. ७ - तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात ११ जण ठार झाले आहेत. पोलिसांच्या बसला लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा बॉम्बस्फोट करण्यात आला. सकाळच्यावेळेला गर्दीच्या वेळी शहरामध्ये हा बॉम्बस्फोट झाला. 
    कुठल्याही गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुर्दीश फुटीरतवादी आणि सरकारमधील तणाव वाढल्यामुळे टर्कीमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अकरा जणांमध्ये सात पोलिस ठार झाले असून, ३६ जण जखमी झाले आहेत. 
===================================

26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने केलं मान्य


  • ऑनलाइन लोकमत 
    बिजींग, दि. 07 - मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं चीनने मान्य केलं आहे. महत्वाचं म्हणजे चीनने प्रथमच सार्वजनिकरित्या हे मान्य केलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 164 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 308 लोक जखमी झाले होते.
    चीनमधील वृत्तवाहिनी सीसीटीव्ही9 वर (CCTV9) नुकतीच एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. या डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील त्यांच्या समर्थकांबद्दल सांगण्यात आलं होतं. 
    चीनने आपल्या धोरणात बदल केल्याच्या दृष्टीने याकडे पाहिलं जात आहे. नुकतच जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची मागणी भारताने केली होती. मात्र पाकिस्तानची नेहमी बाजू घेणा-या चीनने या मागणीला विरोध केला होता. ज्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवर टीका करण्यात आली होती. 
===================================

लडाख ते दिल्लीहून थेट बस !


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ७ -  भारतातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे लडाख. तसेच, जगातील सर्वात उंच ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या लडाखला भेट देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी हिमाचलच्या रस्ते परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा दिल्ली ते लेह अशी बस चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
    दिल्ली ते लेह दरम्यान १,०५० किमीचे अंतर असून बसने नॉन-स्टॉप ३३ तासांचा कालावधी लागणार आहे. तसेच, यासाठी एका प्रवाशाला १,३६५ रुपये मोजावे लागणार आहेत. लेहला जाण्यासाठी तयार करण्यात आलेला चार पर्वतांच्या महामार्गावरुनचा हा प्रवास आहे. या ठिकाणी अतीव हिमवृष्टी झाल्यास वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रवास करणे अशक्य होते. विशेषत: ऑक्टोबरमध्ये आणि मे, जूनच्या दरम्यान हा अडथळा निर्माण होतो.
    अशा, परिस्थितीत जर लडाखला जाणे मध्येच थांबविले, तर येथून जवऴच असलेल्या पॉप्युलर हिल टाऊन असलेल्या मनालीमध्ये आपल्याला काही दिवस घालवता येतील. त्यानंतर तेथून पुन्हा लेहला जाता येईल. तसेच, येत्या १ जुलैपासून  मनाली ते लेह अशी बस सेवा ही हिमाचलच्या रस्ते परिवहन महामंडळ सुरु करणार आहे. 
===================================
त्रिपुरा:कॉंग्रेसच्या 6 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश

आगरताळा- त्रिपुरामध्ये राजकीय घडामोडी घडल्या असून कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये आज (मंगळवार) प्रवेश केला.

पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष रामेंद्र चंद्रा म्हणाले, ‘कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे सुदीप रॉय बर्मन यांच्याकडून पत्रही मिळाले आहे. पत्रावर सहा आमदारंच्या सह्या असून, या आमदारांशी पुढील दोन दिवसांमध्ये चर्चा करणार आहे.‘

कॉंग्रेसच्या आशिष सहा, बिस्वबंधू सेन, दिबा चंद्रा हरंगख्वाल, प्रंजीत सिंग रॉय व दिलीप सरकार या आमदारांच्या पत्रांवर स्वाक्षऱया आहेत.
===================================
इंग्लंडच्या जोडीने मोडला द्रविड-गांगुलीचा विक्रम


एकदिवसीय सामन्यात धावांचा पाऊस 

नॉटिंगहॅम : इंग्लंडमधील क्रिकेट मोसमात सुरू असलेल्या "रॉयल लंडन‘ एकदिवसीय स्पर्धेत सोमवारी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातील विक्रमांची मोडतोड झाली. त्याचबरोबर मैदानावर पहिल्या चेंडूपासून अखेरच्या चेंडूपर्यंत धावांचा पाऊस पडला. 

या सामन्यात इंग्लंडमधील सर्वोच्च भागीदारी आणि सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदला गेला. ट्रेंटब्रिज येथे नॉटिंगहॅमशायर आणि नार्दम्प्टनशायर असा हा सामना झाला. या सामन्यात नॉटिंगहॅमच्या रिकी वेसेल्स आणि मायकेल लम्ब यांनी 39.2 षटकांत 342 धावांची सर्वोच्च भागीदारी केली. वेसेल्स 97 चेंडूंत 146 धावांवर बाद झाला. लम्बने कौंटीमधील विक्रमी 184 धावांची खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर नॉटिंगहॅमने 8 बाद 445 धावा केल्या. क्रिकेटविश्‍वातील प्रथम श्रेणी सामन्यातील ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली. 
===================================
मेक्‍सिकोला 6.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

लंडन- मेक्‍सिकोच्या पश्‍चिम किनारपट्टीला आज (मंगळवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.4 ऐवढी होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आले.

भूकंपाचा केंद्रबिंदू मॅन्झानिलो शहरापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीत 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
===================================
कॉंग्रेसमध्ये एकाच आडनावाचा नेता- भाजप

वडोदरा - कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाहेर पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर "कॉंग्रेसमध्ये केवळ एकाच आडनावावरून नेता ठरविण्यात येतो‘ अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते अजित जोगी हे कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. तर गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "सर्वप्रथम कॉंग्रेसने हे मान्य करावे की त्यांच्याकडे महान नेते आहेत. त्यांच्याकडे असलेल्या दोन-तीन नेत्यांनाच ते महान मानतात. याच कारणामुळे लोक कॉंग्रेसला नाकारत असून त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव होत आहे.‘ तसेच पक्षाला भरीव योगदान दिलेल्या नेत्यांना कॉंग्रेसमध्ये काहीही मोल नसल्याचे सांगत राम माधव यांनी कॉंग्रेसमध्ये केवळ एका आडनावावरून नेता ठरविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
===================================
'मोदींची चांगली कामे 'पप्पू'ला समजत नाहीत'

कोटा (राजस्थान)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगली कामे ‘पप्पू‘ला समजत नाहीत, असे केंद्रीय मंत्री राम शंकर कथेरिया यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले आहे.

मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कथेरिया म्हणाले, ‘एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले नेतृत्व करत आहेत. मोदी सरकारने देशात विविध योजना सुरू केल्या असून, मोदी सरकार हे खूप चांगली कामे करत आहे. परंतु, पप्पूला ती समजत नाहीत.‘

‘देशाचा विकासदर सन 2015-16 मध्ये 7.9 टक्के झाला आहे. जगातील मोठ्या देशांच्या विकासदराएवढा झाला आहे. मोदी सरकारमुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली सुधारली आहे. मोदींनी सुरू केलेल्या जन धन योजनेद्वारे नागरिकांची बॅंकांमध्ये खाती उघडली गेली आहेत. माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकार विविध योजना राबवत आहे,‘ असे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
===================================
नायब राज्यपालांची दिल्लीवर पाळत- केजरीवाल

नवी दिल्ली - दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे दिल्ली सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच पाळत ठेवून मिळालेली माहिती ते पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवित असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

ट्‌विटरद्वारे केजरीवाल यांनी म्हटले आहे की, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना कोण भेटते यावर राज्यपाल पाळत ठेवत असून ही माहिती ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवित आहेत.‘ तसेच त्यांनी नायब राज्यपालांना पत्रही लिहिले आहे. त्यात दिल्लीमध्ये भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांशिवाय कार्यरत असलेल्या इतर अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाने मागविल्याचा संदर्भ देत याबाबत थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाच पत्र लिहून उत्तर देणार असून आपण त्यात कोणतीही कारवाई करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच दिल्लीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम नायब राज्यपालांचेही असल्याचे पत्रात म्हटले आहे. आपण दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष देण्यापेक्षा 24 तास दिल्ली सरकारच्या कामकाजात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी पत्रात केला आहे.
===================================
सरकार आणणार व्हिसा नियमांमध्ये शिथिलता?

नवी दिल्ली: देशातील सेवा क्षेत्राचा व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने व्हिसा नियमांमध्ये व्यापक बदल सुचविले आहेत. वाणिज्य सचिव रिटा टियोटिया आणि इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांची या प्रस्तावावर पंतप्रधान कार्यालयात चर्चा झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱयाने दिली.

"आम्हाला आरोग्य, पर्यटन, उद्योग क्षेत्रांसह परिसंवाद आणि परिषदांसाठी येणाऱ्या लोकांसाठी व्हिसा नियमांमध्ये शिथिलता हवी आहे. हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे त्यांना लवकरच याविषयी निवेदन पाठविण्यात येईल", अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पर्यटक आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत मागे पडत असल्याने देशाला दरवर्षाला सुमारे 80 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागत आहे. थायलंडसारख्या छोट्या देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील भारताच्या तुलनेत खुप जास्त आहे. शिवाय, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या प्रमुख उपक्रमांचे यश साध्य करण्यासाठी व्हिसा पद्धती शिथीलता असण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 
===================================
उत्तर प्रदेशमध्ये उपासमारीने एकाचा मृत्यु

लखनौ (उत्तर प्रदेश) - गेल्या 15-20 दिवसांपासून जगण्यापुरते अन्न किंवा अन्न खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने उपासमार झाल्याने एका 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

श्रीकांत नावाच्या एका व्यक्तीकडे आणि त्याच्या कुटुंबियांकडे गेल्या 15-20 दिवसांपासून काहीही अन्न किंवा पैसे नव्हते. त्यामुळे अखेर उपासमारीमुळे त्याचा मृत्यु झाला. दरम्यान त्याचा मृत्यु हा उपासमारीने झाल्याचे प्रशासनाने नाकारले असून तो आजारी असल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शवविच्छेदनानंतर श्रीकांतच्या शरीरात काहीही अन्न नसल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे श्रीकांतचे कुटुंबियही प्रचंड व्यथित असून त्यांच्याकडे शिधापत्रिका किंवा दारिद्य्ररेषेखालील कार्ड नसल्याचेही समोर आले आहे. श्रीकांतचा मृत्यु कदाचित उपासमारीमुळे झाला असेलही मात्र त्याचा दारिद्य्राशी संबंध नसल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याने म्हटले आहे.
===================================
इस्तंबूलमध्ये स्फोटात 7 पोलिसांसह 11 ठार

इस्तंबूल- शहरातील मध्य भागात घडवून आणलेल्या बॉम्ब स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 7 पोलिसांचा समावेश आहे, अशी माहिती राज्यपालांनी दिली.

इस्तंबूलचे राज्यपाल वासिप साहिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटके भरलेली मोटार पोलिसांच्या वाहनावर आदळण्यात आली. यावेळी झालेल्या स्फोटात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, तुर्कीमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांपैकी हा चौथा मोठा स्फोट आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु, कुर्दीश दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याची शक्‍यता आहे.
===================================
अपघात होऊनही 'तिने' गाठला लग्नाचा मुहुर्त
-

देवांगिरे (बंगळूर)- येथील एका युवतीचा विवाह ठरून लग्नाचा मुहुर्त काढला होता. परंतु, विवाहाच्या काही दिवस अगोदर तिचा अपघात झाला. रुग्णवाहिकेतून थेट विवाहस्थळी येऊन तिने ठरलेल्या वेळी स्ट्रेचरवर झोपून विवाह केला.

नेत्रावती असे या युवतीचे नाव आहे. बंगळूरपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रदुर्ग येथे रविवारी (ता. 5) विवाह पार पडला. नेत्रावती ही बीजी केरी (ता. मोलाकलमुरू, जि. चित्रदुर्ग) गावात राहात आहे. ती शेतकरी कुटुंबातील असून परिचारीकेचे शिक्षण घेत आहे. छल्लाकेरे गावातील तंत्रज्ञ असलेला गुरुस्वामीसोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू होते. चित्रदुर्ग मठात सामूहिक विवाह सोहळ्यात अमावस्येला रविवारी (ता. 5) लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला होता. दोघे 23 मे रोजी चित्रदुर्ग गडावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी पाय घसरून खाली पडल्याने नेत्रावतीला अपघात झाला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
===================================

===================================

No comments: